महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.
Outdoor Skating in Natural Parks : चंद्रपूर : व्याघ्रभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर शहरातील शंकर क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने नुकतेच ‘नेचर स्केटिंग सफारी’ चे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात सहभागी 10 स्केटिंग खेळाडूंनी दुर्गापूर – पद्मापूर – आगरझरी ते मोहरली या ताडोबा अभयारण्याच्या क्षेत्रातील एकूण १० किलोमीटरचा निसर्गरम्य आणि जंगल रस्ता स्केटिंग करत पार केला.
या स्केटिंग सफारीचा मुख्य उद्देश निसर्ग संवर्धन, व्यायाम, खेळ व आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा संदेश देणे आणि वृक्षारोपणाबाबत जनजागृती करणे हा होता. सफारीमध्ये सहभागी स्केटर्सनी साहसी व खेळाडू वृत्तीने परिसरात सामाजिक प्रबोधन केले. या साहसी सफारी उपक्रमात यज्ञेश प्रवीण भोंगळे (10), देवांशी गोजे (9), अंश मल्लेलवार (6), कृष्णा कलोडे (15), अनिश निखाडे (13), पार्थ रामटेके (9), युवराज चौधरी, अक्षित करडभुजे (12), माहांश राखुंडे (6). या बालखेळाडू स्केटर्सनी सहभाग घेतला. Adventure Skating Tours for Children
नामवंत खेळाडूंची उपस्थिती
या सफारीचे मार्गदर्शन राष्ट्रीय स्तरावरील नामवंत स्केटिंग प्रशिक्षक तथा तांत्रिक अधिकारी विनोद निखाडे व राष्ट्रीय रोलर हॉकी खेळाडू ईशा विनोद निखाडे यांनी केले.खेलो इंडिया या संकल्पनेतून खेळाडूंची साहसी वृत्ती प्रदर्शित करणारा हा उपक्रम निसर्ग संवर्धनासाठी समाजाला प्रेरणा देणारा ठरला.
tiger attack compensation policy Maharashtra : चंद्रपूर – मागील एक महिन्याच्या कालावधीत सिंदेवाही तालुक्यातील तेंदुपत्ता हंगामा दरम्यान वाघ हल्यात 4 जणांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्दैवी घटनांमुळे सदर परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली. अशा भयावह परिस्थितीत विधिमंडळ पक्षनेते तथा लोकलेखा समिती अध्यक्ष आ. विजय वडेट्टीवार यांनी मृतकांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करत त्यांना शासनाच्या वतीने मिळणारी मदत तातडीने देण्याचे आदेश दिले होते. तर आज वनविभागाच्या सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात विधिमंडळ पक्षनेते तथा लोकलेखा समिती अध्यक्ष आ. विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत धनादेशाचे वितरण करण्यात आले. (MLA Vijay Wadettiwar tiger attack relief) सोबतच मानव – वन्यजीव संघर्षावर उपाययोजना यावर विस्तृत चर्चा करण्यात आली.
वनपरिक्षेत्र सिंदेवाही अंतर्गत तालुक्यातील जाटलापूर येथील शामराव अर्जुन मंगाम यांचा दि.25 एप्रिल रोजी वाघ हल्यात मृत्यू झाला होता. तर दि.10 मे रोजी मेंढामlल येथील सारिका शालिक शेंडे, कांता बुधाजी चौधरी, शुभांगी मनोज चौधरी, या तीनही महिलांचा तेंदुपत्ता संकलन करण्याकरिता गेल्या असता वाघिणीने चढविलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. सिंदेवाही तालुक्यात सलग सुरू असलेल्या मानव – वन्यजीव संघर्षावर (human wildlife conflict compensation Maharashtra) विधिमंडळ पक्षनेते तथा लोकलेखा समिती अध्यक्ष आ. विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक भूमिका घेत नरभक्षक वाघांना त्वरित जेरबंद करून, परिसरात नियमित गस्त व अन्य उपाय योजना करण्याचे तातडीने निर्देश दिले. यावर वनविभागाने तात्काळ अंमलबजावणी करीत गेल्या 10 दिवसाच्या आत नरभक्षक वाघीण ,व तिच्या बछड्याला तसेच नरभक्षक वाघाला जेरबंद केले.
४५ लक्ष रुपयांच्या धनादेशाचे वितरण
आज सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात विधिमंडळ पक्षनेते तथा लोकलेखा समिती अध्यक्ष आ. विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत वाघ हल्यात मृत पावलेल्या कुटुंबीयांच्या वारसांना ध्येय असलेले एकूण 45 लक्ष रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. (Chandrapur tiger attack relief fund) सोबतच भविष्यात मानव – वन्यजीव संघर्षाच्या घटना घडू नये याकरिता वनविभागाने ठोस पावले उचलून विशेष उपाययोजना करण्या संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर यांनी गेल्या दहा दिवसात वनविभागाच्या वतीने जेरबंद करण्यात आलेल्या एक मादी वाघ, बछडा व एक नरभक्षक वाघ , तसेच नियमित गस्त , व इतर उपाययोजनांबाबत समाधानकारक माहिती दिली.
याप्रसंगी प्रामुख्याने सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर, ब्रम्हपुरी दक्षिण वनवृत्तचे वनपरिक्षेत्र अधिकारी राम शेंडे , तालुका काँग्रेस अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रमाकांत लोधे, शहर काँग्रेस अध्यक्ष सुनील उट्टलवार, तालुका काँग्रेस सहकार क्षेत्राचे मधुकर बोरकर, माजी नगराध्यक्ष स्वप्निल कावळे, मेंढामाल ग्राम काँग्रेस कमिटी अध्यक्ष वामनराव कोकोडे, तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष सीमा सहारे, नंदा नरसाळे, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष अभिजीत मुप्पीडवार , महेश मंडलवार ,सचिन नाडमवार, नगरसेवक पंकज नन्नेवार,श्याम छत्रवाणी, युनुस शेख, पंकज मूलकलवार व वाघ हल्ल्यातील मृतकांच्या कुटुंबीयांचे वारसदार लाभार्थी, वनविभागाची अतिशीघ्र मदत चमू, व वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
toll-free number to report illegal alcohol sales : चंद्रपूर – जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती व विक्रीवर अंकुश ठेवण्यासाठी कठोर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
राजुरा विधानसभेचे भाजप आमदार देवराव भोंगळे यांनी नागरिकांच्या तक्रारीवर अवैध दारू पकडल्याने चंद्रपूर जिल्हा प्रशासन आता खळबळून जागे झाले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेकठिकाणी अवैध व नकली दारूचा पुरवठा होतो मात्र यावर उत्पादन शुल्क विभाग कारवाई करीत नाही, यावर आमदार भोंगळे यांनी तत्परता दाखविल्याने प्रशासन तोंडघशी पडले आहे.
या बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षक रीना जैनबंधू, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा प्रमुख नितीन धार्मिक, प्रभारी पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) योगेश पारधी व अन्य अधिकारी उपस्थित होते.
नागरिकांच्या तक्रारींवर कारवाई करा
बैठकीत पोलिस विभाग व राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात अवैध दारूविरोधात राबवलेल्या विविध कारवायांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या प्रत्येक तक्रारीवर दोन्ही विभागांनी संयुक्तपणे तात्काळ कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी यावेळी दिले. प्रशासनाच्या तत्परतेमुळे नागरिकांचा यंत्रणांवरील विश्वास वाढेल आणि अवैध दारूमुळे उद्भवणाऱ्या सामाजिक व आरोग्यविषयक समस्यांपासून त्यांना प्रभावी संरक्षण मिळेल, असेही ते म्हणाले. how to report illegal liquor in Maharashtra
पोलीस व उत्पादन शुल्क विभागाचे संयुक्त पथक कारवाई करणार
अवैध दारू निर्मिती व विक्री रोखण्यासाठी पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे संयुक्त पथक नियमितपणे कारवाईचा आढावा घेईल. तसेच तालुका स्तरावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समित्या गठीत करून प्रभावी नियंत्रण ठेवण्यात यावे. अवैध दारूच्या विरोधात जनतेचा सहभाग महत्त्वाचा असल्याने दिलेल्या क्रमांकांवर नागरिकांनी तक्रारी नोंदवाव्यात. जिल्हा प्रशासन अवैध दारू निर्मिती व विक्री रोखण्यासाठी कटीबद्ध असून, सर्व नागरिकांनी या मोहिमेत सहकार्य करावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
तक्रारी करिता क्रमांक
जिल्हा प्रशासनाचे “वंदे मातरम चांदा” टोल फ्री क्रमांक : 1800-233-8691. राज्य उत्पादन शुल्क विभाग टोल फ्री क्रमांक : 1800-233-9999- व्हाट्सअप क्रमांक : 8422001133).
man eater tiger captured : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात ५ महिन्यात वाघाने अक्षरक्षा धुमाकूळ घातला असून आतापर्यन्त तब्बल २२ नागरिकांचा बळी वाघाने घेतला आहे. मे महिन्यात ९ नागरिकांना वाघाने ठार केले असून यामध्ये तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी गेलेल्या नागरिकांचा समावेश आहे. forest conflict
नागभीड तालुक्यात २ नागरिकांची शिकार करणारा TATR 224 या नर वाघाला २३ मे रोजी सकाळी ११.३० वाजता गंगासागर हेठी बिट, सावर्ला रिट, शासकीय जमीन सर्वे क्र.२ तळोधी-बाळापूर वनपरिक्षेत्र येथे वनविभागाने डार्ट मारीत जेरबंद केले.
नागभीड तालुक्यातील तळोधी वनपरिक्षेत्रात १५ एप्रिल रोजी गंगासागर हेठी येथील मारोती सखाराम बोरकर (वय ४५) व १८ मे रोजी वाढोणा येथील मारोती नकटू शेंडे (वय ६४)या दोघांवर आलेवाही बीट परिसरात हल्ला करून त्यांचा बळी घेतला होता . या घटनेनंतर वनविभागाने वरिष्ठांची परवानगी घेत वाघाला पकडण्यासाठी मोहीम राबवली. आज वनविभागाच्या मोहिमेला यश मिळाले सदर नरभक्षक नर वाघ हा अंदाजे ८ वर्षाचा आहे.
सदर नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी या मोहिमेत उपवन संरक्षक राकेश हेपट, सहायक वनसंरक्षक महेश गायकवाड, बायोलॉजिस्ट राकेश अहुजा, डॉ, रविकांत खोब्रागडे, पोलीस दलातील शुटर अजय मराठे, वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण कन्नमवार,अरविंद माने, राजेंद्र भरणे, घनश्याम लोनबले यांनी अथक परिश्रम केले.
vocational training for female prisoners : चंद्रपूर – कारागृह हे केवळ शिक्षा भोगण्याचे ठिकाण राहिलेले नसून, आता ते महिला कैद्यांच्या पुनर्वसनाचे केंद्र बनले आहे. श्री लक्ष्मी नृसिंह नागरी सहकारी पतसंस्था, बल्लारपूर यांनी चंद्रपूर जिल्हा कारागृहातील महिला कैद्यांसाठी मेहंदी, ब्युटी पार्लर, शिवणकाम आणि भरतकामाचे प्रशिक्षण सुरू केले आहे. या उपक्रमामुळे महिला कैद्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून, त्यांचे जीवन उजळण्यास मदत मिळत आहे.
या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन तुरुंग अधीक्षक अनुप कुमार कुमारे यांच्या हस्ते झाले. या वेळी पतसंस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास सुंचुवार, वरिष्ठ तुरुंगाधिकारी नागेश कांबळे, कारागृह शिक्षक संजीव हातवडे, तसेच प्रशिक्षिका कविता डेरकर आणि रीना पोर्टेट उपस्थित होत्या.
श्री लक्ष्मी नृसिंह नागरी सहकारी पतसंस्था हे केवळ चंद्रपूर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील तुरुंगांमध्ये कैद्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी कार्यरत आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे महिला कैद्यांना सुटकेनंतर नवजीवन सुरू करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची संधी मिळते. beauty parlour courses in jail
आमच्या जीवनात आशेचा किरण
महिला कैद्यांनीही या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, “या प्रशिक्षणामुळे आमच्या अंधाऱ्या जीवनात आशेचा किरण निर्माण झाला आहे. सुटकेनंतर आम्ही हे कौशल्य वापरून आमच्या कुटुंबाचा आधार बनू, तसेच समाजातील इतर महिलांनाही स्वावलंबी बनवण्यासाठी प्रेरणा देऊ.”
या कार्यक्रमाला महिला कैदी, तुरुंग कर्मचारी आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Amrit Bharat Station Chandrapur news : चंद्रपूर : अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील चांदाफोर्ट अमृत स्टेशनचे लोकार्पण आज देशाचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून, खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत थाटामाटात संपन्न झाले. Chandafort station inauguration Narendra Modi
आधुनिक सुविधांनी सज्ज असलेले हे स्टेशन चंद्रपूरच्या प्रगतीचा नवा अध्याय आहे. नागरिकांच्या सुरक्षित व सुलभ प्रवासासाठी उभारलेले हे अत्याधुनिक स्थानक चंद्रपूरकरांच्या स्वप्नांची पूर्ती करेल, यात शंका नाही. रेल्वे केवळ प्रवासाचे माध्यम नसून, हा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा दुवा आहे, आणि हा दुवा आम्ही अधिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहोत असे मत खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी यावेळी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रिय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रिय विधी व न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. तसेच चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार, बिलासपूरचे सीई बी.व्ही.एस. सुब्रमण्यम, नागपूरचे सिनिअर डीएम एस. एन नामदेव, स्वातंत्र्य सेनानी डॉ. शेषराव इंगोले, काँग्रेस शहर अध्यक्ष रामू तिवारी, काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल शेख, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष चंदाताई वैरागडे, कॉग्रेस ओबीसी जिल्हाध्यक्ष राहुल चौधरी, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, इंटक युवक काँग्रेस जिलाध्यक्ष प्रशांत भारती, माजी नगरसेवक प्रसन्न शिरवार यांची उपस्थिती होती.
चांदाफोर्ट स्टेशनच्या पुनर्विकासातील पहिल्या टप्पयात एकूण अंदाजित खर्च
१९.३ कोटी रुपयाची कामे करण्यात आली आहेत. यामध्ये नवीन स्टेशन इमारत: ३९६ चौ.मी. (एकूण क्षेत्र – ७९२ चौ.मी.), फिरणारे क्षेत्र ६०५० चौ.मी. (एकूण – ६९९५ चौ.मी.), प्लॅटफॉर्म निवारा ९६० चौ.मी. (एकूण – १८७९ चौ.मी.), प्लॅटफॉर्म पृष्ठभाग २००० चौ.मी. (एकूण – २५०० चौ.मी.), फूट ओव्हर ब्रिज (एफओबी) १२ मीटर रुंदीचा नवीन ब्रिज, सुगम प्रवेशासाठी नवीन बांधलेले रॅम्प आणि स्पर्शिक मार्ग (टॅक्टाइल पाथ) या अद्ययावत सुविधांमुळे चंद्रपूरकरांना अधिक सुरक्षित, सुलभ व आरामदायक रेल्वे प्रवासाचा अनुभव मिळेल. तसेच, जिल्ह्याच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला यातून बळ मिळेल, असा विश्वास खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केला.
Chandrapur free sand scheme news : चंद्रपूर – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य सरकारने अनेक जनहिताचे निर्णय घेतले आहेत. या निर्णयांचा थेट लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळत आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घरकुलासाठी शासन मोफत रेती देणार असल्याची घोषणा केली होती. आज ती घोषणा प्रत्यक्षात आली असून चंद्रपूर शहरातून याची सुरुवात होत असल्याचा आनंद आहे. शासनाच्या या निर्णयामुळे अनेक गरजू आणि गरीब कुटुंबांना आपले हक्काचे घर उभारताना मोठा दिलासा मिळणार आहे. सर्वसामान्य नागरिक हा शासनाच्या प्रत्येक योजनेचा केंद्रबिंदू आहे, असे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घरकुलाच्या कामासाठी शासनातर्फे मोफत रेती उपलब्ध करून देण्यात येईल असे जाहीर केले होते. त्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहरातून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत वढा रेती घाटावरून लाभार्थ्यांना रेती वितरित करण्यात आली. एका लाभार्थ्याला पाच ब्रास प्रमाणे रेती दिली जात आहे. या कार्यक्रमात आमदार जोरगेवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रेतीचे ट्रॅक्टर रवाना करण्यात आले. या प्रसंगी लाभार्थी नागरिकांना रेतीच्या टीपी चे ही वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. sand supply for government housing project
कार्यक्रमास महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, नायब तहसीलदार खंडारे, संवर्ग विकास अधिकारी संगीता भांगडे, मंडळ अधिकारी प्रकाश दुर्वे, भाजप नेते प्रकाश देवतळे, वढा गावचे सरपंच किशोर वराडकर, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, मनोज पाल, राकेश पिंपळकर, धनंजय नागरकर, खुटाळा येथील माजी उपसरपंच गुड्डू सिंग, धनराज हनुमंते, समीर भिवापूर यांची उपस्थिती होती. free sand for housing beneficiaries Maharashtra
माझ्यासह अनेक आमदारांनी लक्ष वेधले
या प्रसंगी बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की, घरकुलाचे अनुदान मिळाल्यानंतरही अनेक लाभार्थ्यांना बांधकाम साहित्याच्या वाढत्या किमतीमुळे अडचणी येतात. ही अडचण लक्षात घेऊन शासनाने मोफत रेती देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या रेती घाटांचे लिलाव थांबलेले असल्याने घरकुल मंजूर होऊनही घराचे बांधकाम रखडले होते. त्यामुळे माझ्यासह अनेक आमदारांनी शासनाचे लक्ष वेधले होते. शासनाच्या या निर्णयामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळणार आहे.
आजच्या कार्यक्रमात प्रत्येक लाभार्थ्याला पाच ब्रास प्रमाणे रेती दिली जात आहे. ही रेती शासनाच्या नियमानुसार आणि पारदर्शक पद्धतीने घाटावरून मोफत दिली जात आहे. या उपक्रमामुळे लाभार्थ्यांचा खर्च कमी होणार असून गरजू नागरिकांना मोठा आधार मिळणार आहे. शासनाची ही कृती म्हणजे गरजूंना मदतीचा हात देण्याचा एक चांगला उपक्रम आहे. आजचा दिवस चंद्रपूर जिल्ह्यासाठी महत्त्वाचा असून शासनाच्या घरकुल योजनेतून आपले घर उभारण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक कुटुंबांसाठी ही मोठी संधी आहे. free sand for housing beneficiaries Maharashtra
‘घरकुल योजना’ फक्त एका घरापुरती मर्यादित नाही, तर ती कुटुंबाचे भविष्य घडवते. स्वतःचे घर म्हणजे स्वाभिमान, सुरक्षितता आणि स्थैर्याचे प्रतीक आहे. घरकुल म्हणजे चार भिंती नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाची स्वप्नपूर्ती आहे. त्यामुळे हे घर उभे राहण्यासाठी शासनाने आपली साथ देणे ही जबाबदारी आहे. शासन गरजूंच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. असे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. या उपक्रमाअंतर्गत चंद्रपूर तालुक्यातील १,१८३ लाभार्थ्यांना आठ रेती घाटांवरून एकूण ५,९१५ ब्राज रेती दिली जाणार आहे. Chandrapur free sand scheme news
Chanda fort station heritage design features : चंद्रपूर : भारत सरकारने देशभरातील रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी हाती घेतलेल्या “अमृत भारत स्टेशन योजने” अंतर्गत 22 मे 2025 रोजी देशभरातील 103 स्थानकांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे.
या राष्ट्रीय कार्यक्रमात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर मंडळ अंतर्गत येणाऱ्या देवाडी, डोंगरगड, नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी, चांदाफोर्ट व आमगाव या स्थानकांचा समावेश आहे.
महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील चांदाफोर्ट रेल्वे स्थानक गोंदिया–नागभीड–बल्हारशाह या महत्त्वाच्या रेल्वेमार्गावर स्थित आहे. या स्थानकाची स्थापना इ.स. 1908 मध्ये झाली असून, 1999 मध्ये ब्रॉडगेजमध्ये रूपांतर व 2018 मध्ये विद्युतिकरण पूर्ण झाले आहे. हे स्थानक कृषिप्रधान भागात असून, प्रवाशांसाठी तसेच स्थानिक नागरिकांसाठी एक महत्त्वाचे केंद्र ठरले आहे. Amrit Bharat Scheme Chandafort station inauguration
अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत चांदाफोर्ट स्थानकाचा 19.3 कोटी रुपये खर्च करून पुनर्विकास करण्यात आला आहे. या योजनेचा उद्देश स्थानकाचा कायापालट करून ते आधुनिक, प्रवासी अनुकूल व सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध केंद्रात रूपांतरित करणे आहे.
करण्यात आलेल्या प्रमुख सुधारणा व सुविधा:
पार्किंग व सर्क्युलेशन क्षेत्राचा विस्तार, विशेषतः सण-उत्सव व गर्दीच्या वेळी उपयोगी, उंच मास्ट लाइट्स – उत्तम प्रकाश व्यवस्था व सुरक्षा, बाह्य स्वरूपाचे उन्नतीकरण – चांदाफोर्टच्या ऐतिहासिक स्थापत्यशैलीत, ‘खुर्दा पॅटर्न’नुसार पारंपरिक प्रवेशद्वार, लिफ्ट व एस्केलेटर (दुसऱ्या टप्प्यात) – सुलभ प्रवासासाठी, कोळसा उद्योग व गोंड संस्कृतीवर आधारित भित्तीचित्रे व सजावट, फ्लॅग माउंट व सजावटी ध्वज – राष्ट्रीय गौरवाचे प्रतीक, 12 CCTV कॅमेऱ्यांद्वारे वाढवलेली सुरक्षा व्यवस्था, ‘वन स्टेशन वन प्रॉडक्ट’ योजना – स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन इत्यादी. Chandafort station redevelopment cost and features
स्थानकांची वैशिष्ट्ये :
या स्थानकाच्या नव्या रचनेत चांदाफोर्ट किल्ल्याच्या स्थापत्यशैलीचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये झरोखे, बुर्ज, बलुआ दगडाची रंगसंगती व पारंपरिक सजावट यांचा समावेश असून, स्थानिक वारसा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचे उत्कृष्ट मिश्रण येथे पाहायला मिळते.
नागपूर मंडळाचे मंडळ रेल्वे व्यवस्थापक दीपक कुमार गुप्ता यांनी माहिती दिली की, चांदाफोर्ट रेल्वे स्थानकाचा हा कायापालट स्थानिक इतिहास, वारसा व आधुनिक सुविधा यांची सांगड घालणारा आहे. हा विकास केवळ रेल्वे विभागासाठी नव्हे, तर संपूर्ण चंद्रपूर जिल्हा व परिसरातील नागरिक व पर्यटकांसाठीही अभिमानाची बाब ठरेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज या स्थानकाचे लोकार्पण होईल, तेव्हा चांदाफोर्ट रेल्वे स्थानक हे देशाच्या सांस्कृतिक वारशाचे व तांत्रिक प्रगतीचे प्रतीक म्हणून उभे राहील.
Zolgensma injection For Ayush : चंद्रपूर – शहरातील भिवापूर वॉर्डातील गवळी मोहल्ला येथील रहिवासी अर्जुन गजर यांना चार महिन्यांचा मुलगा आयुष आहे, जो स्पाइनल मस्क्युलर अॅट्रोफी नावाच्या गंभीर आजाराने ग्रस्त आहे. हा गंभीर आजार लाखोंपैकी एकाला होतो. त्याच्या उपचारासाठी 1 इंजेक्शनचा खर्च 16 कोटी रुपये असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. जे फक्त एकदाच दिल्याने बाळ तंदुरूस्त होऊ शकते. परंतु हा खर्च मजूर म्हणून काम करणाया या असहाय्य वडिलांच्या क्षमतेपलीकडे आहे. SMA disease injection
अर्जुन चार महिन्यांच्या मुलाला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. अर्जुनने त्याचा मुलगा आयुषला वाचवण्यासाठी सामाजिक, सेवाभावी, स्वयंसेवी संस्थां कडून आर्थिक मदतीची विनंती केली आहे. तसेच, असहाय्य वडिलांनी माहिती दिली की त्यांनी लोकप्रतिनिधींमार्फत मोदी सरकारकडे त्यांच्या मुलाच्या उपचारासाठी मदत मागितली असल्याची माहिती पत्रपरिषदेत दिली. वडील अर्जुन गजर यांनी सांगितले की, आयुषचा जन्म 26 जानेवारी 2025 रोजी चंद्रपुर सरकारी रुग्णालयात झाला. त्यानंतर तो त्याला घरी घेऊन आले.
15 दिवसांनंतरही आयुषने कोणतीही हालचाल केली नसल्याने मुलाला डॉ. मोहुर्ले यांच्याकडे नेण्यात आले. या काळात आयुषला वारंवार न्यूमोनियाचा त्रास होत होता. उपचार करूनही तो बरा होत नव्हता. दरम्यान, सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी आयुषवर मुंबईतील वाडिया रुग्णालयात उपचार केले जातील अशी माहिती दिली. दरम्यान, मुलाला नागपूरच्या एनएसएच क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि त्याचे रक्त तपासणीसाठी बंगळुरूला पाठवण्यात आले. parents appeal for SMA treatment donation
इंजेक्शनचा खर्च १६ कोटी रुपये
अहवालात असे दिसून आले की मुलाला स्पाइनल मस्क्युलर अॅट्रोफी नावाच्या गंभीर आजाराने ग्रासले होते. नागपूरमधील डॉक्टरांनी त्यांना सांगितले की हा आजार लाखो मुलांपैकी एकाला होतो. डॉक्टरांनी सांगितले की त्याच्या उपचारासाठी इंजेक्शनचा खर्च 16 कोटी रुपये असेल. आणि ते एकदाच दिल्याने बाळ तंदुरूस्त होऊ शकेल परंतु हा खर्च अर्जुनच्या आवाक्याबाहेर आहे. स्पाइनल मस्क्युलर अॅट्रोफी (SMA) हा एक अनुवांशिक आजार आहे जो पाठीचा कणा आणि नसा यांना प्रभावित करतो, ज्यामुळे स्नायू कमकुवत होतात. हा रोग प्रामुख्याने मोटर न्यूरॉन्सवर परिणाम करतो जे स्नायूंवर नियंत्रण ठेवणाया चेतापेशी असतात.
मुलाने त्याच्या शरीरावरचा ताबा गमावला आहे आणि आता तो त्याचे हात, पाय आणि मान व्यवस्थित हाताळू शकत नाही. मुलाच्या रडण्याचा आवाजही बाहेर येत नाही. यासाठी 16 कोटी रुपयांचे झोल्गेसमा इंजेक्शन आवश्यक आहे. ते ही 16 महिन्यांचे आत बाळाला द्यायचे आहे. हे इंजेक्शन जितक्या लवकर दिले जाईल तितके बाळ बरे होण्याची शक्यता जास्त असेल. योग्य उपचार न मिळाल्यास अशी मुले सहसा फक्त दोन वर्षे जगतात. help for Zolgensma injection cost
दानशूर लोकांकडून आर्थिक मदतीची अपेक्षा
अर्जुन गजर म्हणाले की, या आजाराने ग्रस्त असलेल्या अनेक मुलांवर उपचार करण्यात आले आहेत. त्यांना प्रशासना व्यतिरिक्त, दानशूर लोकांनीही सहकार्य केले आहे. अशा परिस्थितीत, त्याला पूर्ण आशा आहे की त्याच्या मुलाचा जीव वाचेल. त्यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्याकडे तक्रार केली आहे.
district administration against drug abuse : चंद्रपूर : अंमली पदार्थाचे सेवन म्हणजे मृत्युला आमंत्रण आहे. आजची युवा पिढी या सेवनाच्या आहारी जाऊ नये, यासाठी अंमली पदार्थाच्या सेवनमुळे मानवी जीवनावर होणा-या दुष्परिणामाबाबत लोकांमध्ये जनजागृती करा. तसेच जिल्ह्यात अंमली पदार्थाची वाहतुक, साठवणूक आणि विक्री प्रतिबंधासाठी संबंधित यंत्रणांनी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात नार्को – कोऑर्डिनेशन समितीच्या जिल्हास्तरीय बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी मिना साळूंके, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक, केंद्रीय जीएसटी विभागाचे अधिक्षक विजयकुमार, पोलिस निरीक्षक अमोल काचोरे, प्रदीप मडावी आदी उपस्थित होते.
शाळा – महाविद्यालये व इतर शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांकडून अंमली पदार्थ, दारु, तंबाखुचे सेवन होणार नाही, याकडे विशेष लक्ष द्यावे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत शिक्षण विभागाने मॅरेथॉन रॅली, निबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, पथनाट्य व इतर माध्यमातून जनजागृती करावी. पोलिस विभागाच्या सहकार्याने शाळा – महाविद्यालयात कार्यशाळा आयोजित कराव्या. यासाठी वर्षभराचे योग्य नियेाजन करावे.
अचानक भेटी द्या
अन्न व औषध प्रशासन विभागाने जिल्ह्यात असलेल्या रासायनिक कारखान्यांमध्ये कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थाचे उत्पादन होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच मेडीकल स्टोअर्सला अचानक भेटी देऊन प्रतिबंधित ड्रग्ज विक्री होत आहे की कसे, याची तपासणी करावी. drug abuse awareness campaign in schools
शेतकऱ्यांना अवगत करा
जिल्ह्यात तसेच आंतरराज्य सीमेवरील शेतीमध्ये खसखस किंवा गांजा पिकाची लागवड होणार नाही, याबाबत शेतक-यांना अवगत करावे. सोबतच ग्रामस्तरावरील कृषी अधिका-यांकडून पाहणी करण्यात यावी. टपालाद्वारे येणा-या पार्सलमध्ये काही अंमली पदार्थाबाबत संशय आला तर तात्काळ पोलिसांना कळवावे. खाजगी वाहनाद्वारे येणारी टपाल, पार्सल, कुरीअर अकस्मितपणे तपासावे. एमआयडीसी परिसरात किती कारखाने आहेत, तेथे प्रतिबंधित उत्पादन होते काय, तसेच बंद असलेल्या कारखान्यांची संयुक्तरित्या तपासणी करावी, आदी सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या. police action on drug trafficking
बैठकीचे सादरीकरण पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांनी केले. यावेळी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.