महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.
बाळुभाऊ यांच्या जाण्याने निर्भीड युवा नेतृत्व हरपल्याचे दुःख – आ. किशोर जोरगेवार
Balubhau Dhanorkar Memorial Event Chandrapur : वरोरा – आठवणीतले बाळुभाऊ… द्वितीय पुण्यस्मरण सोहळा हा कार्यक्रम म्हणजे त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याची संधी आहे. बाळु धानोरकर हे एक निस्वार्थ, प्रामाणिक आणि धडाडीचे नेते होते. त्यांच्या जाण्याने चंद्रपूर जिल्ह्याने एक सक्षम युवा नेतृत्व गमावले असल्याची भावना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली.
बाळुभाऊ धानोरकर मित्र परिवाराच्या वतीने वरोरा येथे “आठवणीतले बाळुभाऊ” द्वितीय पुण्यस्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, माजी आमदार सुभाष धोटे, विनोद दत्तात्रय यांची उपस्थिती होती. Tribute to a Visionary Leader
प्रेरणादायी शैली
शिवसेनेत सोबत काम करण्याची संधी लाभली. त्यांच्या जिद्दीने, काम करण्याच्या पद्धतीने नेहमीच ते कार्यकर्त्यांसाठी एक आदर्श नेता राहिले. त्यांचे स्पष्ट विचार, कुठल्याही गोष्टीत सडेतोड भूमिका घेण्याची त्यांची शैली कायमच प्रेरणादायी राहिली. त्यांच्या स्वप्नांचा सन्मान करण्यासाठी सर्वांनी मिळून काम करायला हवे. त्यांनी कधीही कुठल्याही संकटापुढे हार मानली नाही. बाळु धानोरकर यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण असल्याची भावना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली.
Chichdoh barrage water release schedule : चंद्रपूर : वैनगंगा नदीवर गडचिरोली जिल्हयातील चामोर्शी तालुक्यात चिचडोह बरेजचे बांधकाम जून 2018 मध्ये पूर्ण झाले आहे. सदर बॅरेजची एकूण लांबी 691 मी. असून 15 मीटर लांब आणि 9 मी. उंचीचे 38 लोखंडी उभे उचल दरवाजे बसविण्यात आले आहेत. 15 ऑक्टोबर 2024 पासून सर्व दरवाजे बंद करण्यात आले होते. पावसाळ्यातील पूर नियंत्रणाच्या दृष्टीने बॅरेज मध्ये साठविलेला पाणीसाठा कमी करून सर्व 38 दरवाजे 1 जुन 2025ला उघडण्याचे नियोजित आहे.
सद्यस्थितीत पाणी पातळी 183 मी. व जिवंत साठा 53.52 द.ल.घ.मी. इतका आहे. त्या अनुषंगाने 1 जून 2025 रोजी सकाळी 8 वाजता प्रकल्पाचे उभ्या उचल द्वारातून / River Sluice मधून 472.84 क्यूमेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार असून टप्याटप्याने सदर विसर्ग वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे नदीतील निम्न भागातील पाण्याची पातळी वाढणार आहे.
वाढीव पाणी पातळीमुळे जिवित व वित्त हानी होवू नये म्हणून नदी लगतचे सर्व गावांना / ग्रामपंचायतीना सूचना देण्यात येते की, सदर कालावधीत नदीकाठावर जाणे टाळावे तसेच नदीकाठावरील शेतामध्ये कामे करताना सतर्क राहावे. मार्कंडा देवस्थान येथील यात्रेकरू नदीवर आंघोळ करणारे, मासेमारी करणारे, नदीघाटातुन रेती काढणारे, पशुपालक, नदीतून ये-जा करणा-या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेवून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन गडचिरोली पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रा.ल. मोरघडे यांनी केले आहे.
चिचडोह बॅरेजचे बुडीत क्षेत्रामुळे खाजगी जमीन बाधीत होणा-या व नदी काठावरील गावांची यादी
सावली तालुक्यातील हरांबा कढोली,उमरी काजळवाही, डोनाळा माल, डोनाळा चक, वढोली गाडंली, वढोली चक, पेडगांव, सोनापूर, सामदा, वाघोली बुटी, व्याहाड (बु.), लोंढोली, उसेगांव, कापसी, उपरी. impact of Chichdoh barrage on local villages
टायगर सफारीने चंद्रपूरच्या पर्यटनाला नवी दिशा मिळणार – आ. किशोर जोरगेवार
Chandrapur tourism tiger safari : चंद्रपूर – चंद्रपूर येथे १७१ हेक्टर जागेत टायगर सफारीसाठी २८६ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या अधिनस्त एफडीसीएम गोरवाडा झू लिमिटेडकडे आराखडा तयार करण्याचे काम सोपविण्यात आले असून, आमदार किशोर जोरगेवार यांनी नागपूर येथील वन विभागाच्या विश्रामगृहात एफडीसीएम गोरवाडा झू लिमिटेडच्या अधिकाऱ्यांसह बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला आहे. या बैठकीला एफडीसीएम गोरवाडा झू लिमिटेडचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी शतनीक भागवत यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. upcoming tiger safari projects
चंद्रपूरमध्ये टायगर सफारी सुरू व्हावी, यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. अनेक अधिवेशनांमध्ये आमदार जोरगेवार यांनी सदर मागणीवर सभागृहाचे लक्ष वेधले होते. परिणामी, या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. यासाठी २८६ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, महाराष्ट्र वन विकास महामंडळाने सदर कामाचा आराखडा तयार करण्याचे काम गोरवाडा झू लिमिटेड कडे दिले आहे. त्यांनी उत्कृष्ट आराखडा तयार केला आहे. tiger safari in Chandrapur
चंद्रपूरच्या पर्यटनात मोठी वाढ होणार
सदर बैठकीत या आराखड्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. चंद्रपूरच्या टायगर सफारीत प्रत्येकी पाच हेक्टरमध्ये तीन झोन तयार करण्यात येणार असून, यात ‘ऑस्ट्रेलियन ट्रेल’, ‘साउथ अमेरिकन ट्रेल’ आणि ‘इंडियन ट्रेल’ असणार आहेत. पर्यटकांना पायवाटांवरून चालत प्राण्यांना पाहण्याचा अनुभव घेता येणार आहे. तर ४४ हेक्टरमध्ये पर्यटकांना वाहनातून सफारीचा अनुभव घेता येईल. २० एकरमध्ये चिल्ड्रन पार्क आणि पर्यटकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हे एक भव्य पर्यटन क्षेत्र ठरेल आणि चंद्रपूरच्या पर्यटनात मोठी वाढ होईल, असा विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला आहे.
या टायगर सफारी प्रकल्पामुळे रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहेत. स्थानिक युवकांना मार्गदर्शक, संरक्षण कर्मचारी, सफारी वाहनचालक, प्राणी संग्रहालय अशा विविध भूमिका मिळतील. शिवाय, स्थानिक व्यवसायांना – हॉटेल, होम-स्टे, स्मृतिचिन्ह, खाद्यपदार्थ विक्री व्यवसायाला देखील चालना मिळेल. यामुळे चंद्रपूरच्या अर्थव्यवस्थेला आणि विकासाला गती मिळेल, असे आमदार जोरगेवार यांनी सांगितले.
विदेशी प्राणी ठरणार आकर्षण..
ऑस्ट्रेलियन ट्रेनमध्ये कांगारू, कॅसोवरी, वाला, लाफिंग कूकाबुरा आणि विविध रंगीबेरंगी पक्षी पर्यटकांना पाहता येणार आहेत. साऊथ अमेरिकन ट्रेलमध्ये जग्वार, कॅपुचिन माकड, स्पायडर माकड, कॅपीबारा, निळे व लाल मकाव असे विदेशी प्राणी पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरणार आहेत.
आमदार सुधाकर अडबाले यांच्या मागणीला यश; गृह विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय
mandatory police verification for workers : चंद्रपूर : जिल्ह्यातील उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय कामगार कार्यरत आहेत. मात्र, त्यांची पोलीस पडताळणी न करता थेट कामावर घेण्यात येत असल्याने गंभीर गुन्हेगारीला चालना मिळत असल्याचा धोका निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी ही गंभीर बाब गृहमंत्र्यांना निदर्शनास आणून दिली होती. या मागणीची दखल घेत गृह विभागाच्या उपसचिवांनी महाराष्ट्र पोलीस महासंचालक आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.
औद्योगिक दृष्टिकोनातून चंद्रपूर हा महत्त्वाचा जिल्हा असून येथे बाहेरून येणाऱ्या मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या वर्षाच्या सुरुवातीला अमृतसर येथील पोलीस चौकीवर हल्ला करणाऱ्या खलिस्तानी दहशतवाद्याला चंद्रपूर येथून अटक करण्यात आली होती. या घटनेनंतर परप्रांतीय कामगारांच्या पार्श्वभूमीची शहानिशा करणे किती आवश्यक असल्याचे आमदार सुधाकर अडबाले यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांना निवेदनाद्वारे निदर्शनास आणून दिले होते.
गृह विभागाने दिले निर्देश
आमदार अडबाले यांच्या मागणीची दखल घेत औद्योगिक क्षेत्रात कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी तसेच गुन्हेगारीला आळा घालण्याकरिता औद्योगिक क्षेत्रात परप्रांतीय कामगारांची नियुक्ती करताना पोलिस पडताळणी अनिवार्य करण्यात यावी व याबाबत सर्व पोलिस घटकांना सुचित करण्यात यावे, असे निर्देश महाराष्ट्र पोलीस महासंचालक आणि चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांना गृह विभागाचे उपसचिव चेतन निकम यांनी दिले आहे. industrial worker police verification process
पडताळणी बंधनकारक
आता जिल्ह्यातील सर्व उद्योगांनी परप्रांतीय कामगारांची पोलीस पडताळणी करणे बंधनकारक असेल. त्यांच्या ओळखीची सर्व कागदपत्रे तपासल्यानंतरच त्यांना कामावर घेता येणार आहे. कंपन्यांनी अशा कामगारांची माहिती स्थानिक पोलीस विभागास सादर करणे अनिवार्य राहील.
या निर्णयामुळे औद्योगिक क्षेत्रात कायदा-सुव्यवस्था टिकवून ठेवणे सुलभ होणार असून, गुन्हेगारी प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवता येणार आहे. आमदार सुधाकर अडबाले यांच्या प्रयत्नामुळे जिल्ह्यातील सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.
छत्तीसगडच्या 39 प्रशिक्षणार्थी वन अधिकाऱ्यांचाचंद्रपूर वन प्रबोधिनी येथे दीक्षांत समारंभ
forest officer training academy : चंद्रपूर – येथील वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी (वन अकॅडमी) या प्रशिक्षण संस्थेत छत्तीसगड राज्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशिक्षणार्थी बॅच-2 (2023-25) यांचा प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहात पार पडला. या समारंभात 39 प्रशिक्षणार्थींनी 18 महिन्यांचे कठोर प्रारंभिक प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करत ‘वन अधिकारी’ म्हणून पुढील सेवेसाठी सज्ज झाल्याची घोषणा करण्यात आली.
या प्रशिक्षणार्थ्यांमध्ये 26 पुरुष व 13 महिला अधिकाऱ्यांचा समावेश होता. प्रमुख पाहुण्या म्हणून प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) शोमिता बिस्वास उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण) एम. श्रीनिवास रेड्डी तर विशेष अतिथी म्हणून छत्तीसगडचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक नाविद शुजाउद्दीन आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. forest officer training program
प्रशिक्षणक्रमात 19 शैक्षणिक विषय आणि 7 प्रात्यक्षिक सत्रांचा समावेश होता, तर 5 मोठ्या अभ्यास दौऱ्यांमधून संपूर्ण भारतातील जैवविविधता व वनसंवर्धनाच्या क्षेत्रातील अनुभव प्रशिक्षणार्थ्यांना मिळाले. अभ्यास दौऱ्यामध्ये हिमालयीन देवदार जंगलांपासून ते सुंदरबनच्या मॅंग्रोव्ह्स, ओडिशातील कासव संवर्धन, दक्षिणेतील व्याघ्र प्रकल्प, वाळवंटी जंगल व्यवस्थापनापर्यंतचा व्यापक अभ्यास करण्यात आला.
दिनेशकुमार साहू प्रथम
या बॅचमधील 30 प्रशिक्षणार्थींनी 75 % पेक्षा अधिक गुण मिळवून ‘ऑनर्स’ प्राप्त केले. यात दिनेश कुमार साहू यांनी 87.30 % गुण मिळवून प्रथम क्रमांकासह ऑनर्स पदक आणि तीन विभागांतील रौप्यपदके पटकावली. अंतरंग पांडे यांनी परिस्थितिकी विषयात विशेष प्राविण्य मिळवले.
आपल्या भाषणात संचालक श्री. रेड्डी यांनी सांगितले की, ही तुमच्या सेवापथाची सुरुवात आहे. ज्ञान, संवेदनशीलता आणि नेतृत्वगुण हेच खरे वनअधिकाऱ्याचे ओळखचिन्ह आहेत. त्यांनी विज्ञानाधिष्ठित धोरणे आणि समुदाय-संवर्धनाभिमुख दृष्टिकोन अंगीकारण्याचे आवाहन केले.
समारोपाच्या भाषणात त्यांनी पुढे सांगितले, छत्तीसगडची जंगले पवित्र आहेत. ही सेवा केवळ नोकरी नसून वन्यजीव, पर्यावरण व समुदायांप्रती असलेली जबाबदारी आहे. तुम्हीच हरित प्रशासनाचे भविष्य आहात.
सावनेरच्या धर्तीवर चंद्रपुरात भूमिगत खान पर्यटन सुरु करणार – आ. किशोर जोरगेवार
Western Coalfields Limited tourism : सावनेर नागपूर येथील भूमिगत कोळसा खाण पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे. याच धर्तीवर चंद्रपूर येथील बंद पडलेली महाकाली कॉलरी भूमिगत खाण देखील पर्यटनासाठी खुली व्हावी, यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी महत्त्वपूर्ण बैठक घेऊन पुढाकार घेतला आहे. नागपूरच्या सावनेर विश्रामगृह येथे वेकोलि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ही बैठक पार पडली. underground coal mine tourism India
यावेळी चंद्रपूर वेकोलि क्षेत्राचे मुख्य महाप्रबंधक दातार, चंद्रपूर वेकोलिचे प्रबंधक विनोद शेंडे, संजय रेड्डी, सावनेर चे उपक्षेत्रीय प्रबंधक सोहन डेहरिया, सावनेर चे उपक्षेत्रीय कार्मिक प्रबंधक पी. सुभाष, एकोपार्क चे चिप मॅनेजर रुपराव महाजन, अभियंता तपास बनर्जी, राकेश निखारिया यांच्या सह भारतीय जनता पार्टीचे माझी शहर अध्यक्ष दशरथ सिंह ठाकूर, भाजप नेते प्रकाश देवतळे, अजय जयस्वाल, तुषार सोम, नामदेव डाहुले, माजी नगर सेवक सुभाष कासनगोट्टूवार, प्रदीप किरमे, रवी गुरुनुले, अमोल शेंडे, राकेश पिंपळकर, संजय तिवारी, नकुल वासमावर, करण नायर, कार्तिक बोरेवार आदींची उपस्थिती होती.
या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी नागपूर सावनेर येथील भूमिगत खाण पर्यटन प्रकल्पाची सविस्तर माहिती घेतली. पर्यटकांना खाणीत प्रवेश देताना कोणत्या सुविधा उपलब्ध केल्या जातात, सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणती उपाययोजना करण्यात आली आहे, आणि या उपक्रमाचा स्थानिक स्तरावर कसा सकारात्मक परिणाम होत आहे, याचा सखोल आढावा या बैठकीत घेण्यात आला. Western Coalfields Limited tourism
महाकाली कॉलरी भूमिगत खाण पर्यटनासाठी खुली करावी
बैठकीनंतर आमदार जोरगेवार यांनी प्रत्यक्ष खाणीत जाऊन खाण पर्यटनाचा अनुभव घेतला. त्यांनी खाणीत तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शन सुविधा, पर्यटकांसाठी लावण्यात आलेले माहिती फलक, प्रकाशयोजना आणि गाईड सेवा यांची बारकाईने पाहणी केली. महाकाली कॉलरी भूमिगत खाण पर्यटनासाठी खुली करावी (Mahakali Colliery tourism project) यासाठी प्रस्ताव तयार करून लवकरात लवकर सादर करावा, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. पर्यटकांच्या सुरक्षिततेला सर्वाधिक महत्त्व देत प्रकल्पाची अंमलबजावणीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या.
यावेळी आमदार जोरगेवार यांनी सांगितले की, “आपण चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी सातत्याने प्रयत्नशील आहोत. महाकाली कॉलरीसारख्या प्रकल्पामुळे केवळ चंद्रपूरच्या पर्यटनाला चालना मिळणार नाही, तर येथील नागरिकांना रोजगाराची नवी दारेही उघडतील. लवकरच आपण महाराष्ट्र आणि केंद्रीय पर्यटन मंत्री यांच्याकडे या प्रकल्पाचा प्रस्ताव मांडून या उपक्रमाला मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.
इको पार्क ची पाहणी
आमदार जोरगेवार यांनी यावेळी सावनेर इको पार्कचीही पाहणी केली. त्यांनी इको पार्कमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांचा आढावा घेतला आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी करण्यात आलेल्या कामांची माहिती घेतली. इको पार्कमधील हरित परिसर, सायकल ट्रॅक, निसर्गसंपन्नता यांचे कौतुक करत त्यांनी असे उपक्रम चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवरही राबवण्याची गरज व्यक्त केली. इको पार्कमधील व्यवस्थापन, देखभाल आणि स्वच्छतेच्या बाबींचेही निरीक्षण यावेळी त्यांनी केले.
how to report illegal liquor Maharashtra toll-free
how to report illegal liquor Maharashtra toll-free : मागील वर्षभरात जिल्ह्यात अवैध दारुची निर्मिती, त्याची वाहतूक व विक्री करणा-या 1668 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणा- या 151 दारु दुकानांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत 129 अनुज्ञप्त्यांधारकांना एकूण 47 लक्ष रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तर 15 दुकाने 5 ते 15 दिवसांपर्यंतच्या कालावधीकरिता निलंबित ठेवण्यात आली आहेत.
1668 आरोपीना अटक
राज्य उत्पादन शुल्क विभागाने 2023-24 या आर्थिक वर्षात 963 गुन्ह्यात 773 आरोपींना अटक केली होती. त्यांच्या ताब्यातून 42 वाहनांसह 98 लक्ष 95 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. त्या तुलनेत 2024-25 या आर्थिक वर्षात अवैध दारुविरुद्ध केलेल्या कारवाईत दुपटीने वाढ झाली आहे. या कालावधीत अवैध दारुची निर्मिती, विक्री, वाहतूक करणा-यांविरोधात नोंदविलेल्या 1840 गुन्ह्यात 1668 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून 135 वाहनांसह 1 कोटी 9 लक्ष 11 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायद्याचे कलम 93 अन्वये सराईत आरोपींकडून चांगल्या वर्तणूकीचे बंधपत्र घेण्यासाठी 249 प्रस्ताव सर्व उपविभागीय दंडाधिका-यांकडे पाठविण्यात आले आहेत. illegal liquor raids 2024-25 Maharashtra
तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्य विक्री दुकानांचे अचानकपणे निरिक्षण केले जाते व नियमांचे उल्लंघन आढळून आल्यास विसंगती प्रकरण नोंदवण्यात येते. मागील वर्षभरात (एप्रिल 2024 ते मे 2025) राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आलेल्या तपासणीत एकूण 151 अनुज्ञप्त्यांमध्ये नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले होते. ही विसंगती प्रकरणे जिल्हाधिकारी यांच्याकडे कारवाईस्तव सादर केली असता जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी 129 प्रकरणात प्रत्येकी 25 ते 50 हजार रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला असून गंभीर प्रकरणात दारु दुकानांचे व्यवहार 15 दिवसांपर्यत निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. मागील वर्षभरात नोंदविलेल्या प्रकरणात नियमांचे भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांना एकूण 47 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
तक्रारीसाठी डायल करा
नागरिकांना त्यांच्या परिसरात अवैध दारूची माहिती मिळाल्यास त्याबाबतची तक्रार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 व व्हाट्सअप क्रमांक 8422001133 वर नोंदवावी, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितिन धार्मिक यांनी केले आहे.
extra teacher staffing irregularities Maharashtra : चंद्रपूर : राज्यातील इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या अनुदानित विजाभज आश्रमशाळांमध्ये अतिरिक्त शिक्षक व कर्मचारी यांची संख्या प्रचंड वाढली आहे. असे असतांना शिक्षकांचे कायम समायोजन न करता सर्रास पदभरत्या करणे सुरू आहे. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांवर अन्याय होत आहे. अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे कायम समायोजन पूर्ण होईपर्यंत नविन पदांना मान्यता प्रदान करण्यात येऊ नये, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे व प्रधान सचिव विनिता सिंघल यांच्याकडे केली.
राज्यात अनुदानित तत्वावर ९७७ खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा असुन दिवसेंदिवस अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढतच आहे. सन २०१२ पासून शिक्षकांचे कायम समायोजन न करता पडद्यामागून मोठ्या प्रमाणावर रिक्त पदांना मान्यता देण्याचे कारस्थान सुरू आहे. अतिरिक्त शिक्षक व कर्मचाऱ्यांचे पूर्ण समायोजन होईपर्यंत नवीन पदांना मान्यता प्रदान करण्यात येऊ नये, याबाबत दिनांक १६ ऑक्टोबर २०१२, दिनांक ८ मार्च २०१८ व दिनांक २८ मार्च २०१८ असे अनेक शासननिर्णय या विभागाने निर्गमित केले असून या शासन निर्णयांना केराची टोपली दाखवत ह्या नियुक्त्या प्रदान करण्यात आलेल्या आहेत. teacher recruitment policy violations Maharashtra
सन २०१२ पूर्वी मान्यतेचे अधिकार हे विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांचेकडे होते. मात्र, शासनाने घालून दिलेल्या दिशादर्शक सूचना व नियमांचे पालन न करता संस्थाचालकांशी संगनमत करून मोठ्या प्रमाणावर शिक्षक व कर्मचारी यांच्या नियुक्तीस मान्यता दिल्या. यामध्ये अनियमितता झाल्याचे लक्षात आल्यामुळे विभागाने दिनांक १६ ऑक्टोबर २०१२ ला शासननिर्णय निर्गमित करून नियुक्तीचे अधिकार प्रादेशिक उपायुक्तांना देत अतिरिक्त शिक्षक व कर्मचाऱ्यांचे पूर्ण समायोजन होईपर्यंत नवीन पदांना देऊ नये, अशी अट टाकली. मात्र, स्थानिक अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या समायोजनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.
अतिरिक्त कर्मचारी वाढले
परिणामी राज्यात अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले. एका सोलापूर जिल्ह्यात २४५ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी अतिरिक्त आहेत. तरीही अर्धन्यायिक अपीलाच्या आयुधाचा वापर करून पडद्यामागून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी भरती सुरूच आहे. हे करत असतांना मात्र याच विभागाकडून निर्गमित शासननिर्णय दिनांक १५ मे २०१९ नुसार पवित्र पोर्टलचा अवलंब करण्यात आला नाही तसेच TET उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांनाही मान्यता दिली. तसेच ही प्रक्रिया करतांना संचालकांना डावलून संस्थाचालकांनी मान्यतेचे प्रस्ताव थेट मंत्रालयात दाखल करून ह्या मान्यता घेतलेल्या आहेत. यात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाली असून याबाबत सखोल चौकशी केल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे. extra teacher staffing irregularities Maharashtra
त्यामुळे मागील दोन वर्षाच्या कालावधीमध्ये अशाप्रकारे झालेल्या सर्व नियमबाह्य पदभरत्या रद्द करून अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे कायम समायोजन प्राधान्याने करण्यात यावे, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी विभागाचे मंत्री अतुल सावे व प्रधान सचिव विनिता सिंघल यांच्याकडे केली आहे.
MLA health initiative : जिल्ह्यातील गरजू रुग्णांसाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून मोठा दिलासा देणारी मोहीम राबवण्यात आली आहे. ज्युपिटर हॉस्पिटल, मुंबई आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात तपासण्यात आलेल्या बालकांपैकी ११ बालकांना पहिल्या टप्प्यात पुढील उपचारासाठी आज मुंबईला रेल्वेने रवाना करण्यात आले. तेथे त्यांच्यावर हृदयविकारावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. Free heart surgery aid
या शस्त्रक्रियांसाठी एका रुग्णावर अंदाजे २ ते ४ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या ११ रुग्णांवर साधारणतः ४० लाख रुपयांच्या शस्त्रक्रिया होणार आहेत. हा संपूर्ण खर्च आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून करण्यात आला आहे. याशिवाय, रुग्ण बालकासह त्यांच्या दोन नातलगांच्या मुंबईतील राहण्याची व प्रवासाची संपूर्ण व्यवस्था आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांनी आमदारांच्या सामाजिक भानाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.विनोद बुरांडे, प्रविण वाभितकर, रिया सराटे, प्रांजली जिवतोडे, रोहिनी मोहुर्ले, यश वय्यातकर, प्रविन वासेकर, प्रज्ञा नागोसे, नीलिमा शेंडे, रिद्धी बत्तुलवार अशी पाठविण्यात आलेल्या रुग्णांची नावे आहेत.
आज सकाळी ९.३० वाजता या बालकांना त्यांच्या पालकांसह मुंबईकडे रेल्वेने रवाना करण्यात आले. आमदारांच्या पुढाकारामुळे कोणतीही आर्थिक अडचण न येता मोफत उपचार मिळणार असल्याने रुग्णांचे नातेवाईक भारावून गेले आहेत. आमच्या घरात अशा महागड्या उपचारांची सोय शक्यच नव्हती. आमदार किशोर जोरगेवार यांनी आमच्यावर मायेची सावली धरली, असे भावुक उद्गार बालकांच्या आई-वडिलांनी व्यक्त केले आहेत. medical help for poor children
उपचारासाठी सर्वतोपरी मदत करणार
समाजातील गरजू रुग्णांना दर्जेदार उपचार मिळवून देणे हे माझे कर्तव्य आहे. आरोग्य शिबिरात पात्र झालेले रुग्ण गंभीर आजारांशी झुंज देत आहेत. त्यांच्या उपचारासाठी आर्थिक अडचण येऊ नये, यासाठीच आमच्या पुढाकारातून या शस्त्रक्रियांचा संपूर्ण खर्च उचलण्यात आला आहे. या बालकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यात आपण यशस्वी होत आहोत. त्यांच्या उत्तम उपचारासाठी सर्वतोपरी मदत करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत, असे आमदार जोरगेवार यांनी सांगितले.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे गरजू रुग्णांना केवळ उपचारच मिळत नाहीत, तर त्यांच्या जीवनात नव्या आशा निर्माण होत आहेत. चंद्रपूरसारख्या जिल्ह्यातून मुंबईसारख्या मोठ्या शहरातील नामांकित रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रियेची संधी मिळणे ही निशुल्क आरोग्यसेवा उपक्रमाची मोठी देणगी ठरली आहे. तर पुढील टप्यात आणखी रुग्णांना उपचाराकरीता मुंबई येथे पाठविण्यात येणार आहे.
Ballarshah gondia railway wildlife deaths : बल्लारशाह-गोंदिया रेल्वे मार्ग हा वन्यजीवांसाठी अक्षरशः कर्दनकाळ ठरत आहे. पोल नंबर 1203 जवळील कक्ष क्रमांक 535 मध्ये अस्वलाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची एक दुर्दैवी घटना घडली, ज्यात अनेक वन्यजीवांना रेल्वे अपघातात आपला जीव गमवावा लागला. वारंवार अशा घटना घडत असूनही, रेल्वे प्रशासन उपशमन योजना (Mitigation Measures) राबविण्यास गंभीर दिसत नाही, हे अत्यंत चिंताजनक आहे.
आता तर आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे, ती म्हणजे या मार्गावर दुसरी रेल्वे लाईन प्रस्तावित आहे. जर हे घडले, तर बल्लारशाह-गोंदिया रेल्वे मार्गावर वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात येईल. हा वन्यजीवांचा भ्रमणमार्ग आधीच बाधित झाला आहे आणि दुसऱ्या लाईनमुळे तो पूर्णपणे संपुष्टात येईल. सध्या या मार्गावर एक्सप्रेस गाड्या जवळपास 110 किमी प्रतितास वेगाने धावतात. दुसरी लाईन झाल्यास, रेल्वे गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ होईल आणि वन्यप्राण्यांना रेल्वे लाईन ओलांडणे अधिक कठीण जाईल. त्यामुळे वन्यजीवांना वाचवण्यासाठी तातडीने उपशमन योजना राबवणे अत्यंत आवश्यक आहे. chandrapur railway
महाराष्ट्र राज्यातील रेल्वे प्रशासन कधी जागे होणार? । wildlife deaths
हा रेल्वे मार्ग ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या अगदी जवळून जातो आणि हा वाघांचा महत्त्वाचा भ्रमणमार्ग आहे. याशिवाय, नव्याने घोषित झालेले कन्हाळगाव अभयारण्य, कावल अभयारण्य आणि उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याच्या भ्रमणमार्गातही हा रेल्वे मार्ग येतो. विशेष म्हणजे, याच मार्गाचा पुढील भाग मध्य प्रदेशातील बालाघाट-नैनपूरमधून जातो. तेथील रेल्वे प्रशासनाने वन्यजीवांसाठी उपाययोजना म्हणून अनेक ठिकाणी अंडरपासेस (Underpasses) आणि ओव्हरपासेस (Overpasses) बांधले आहेत. मग महाराष्ट्रातील रेल्वे प्रशासन वन्यजीवांसाठी अशा उपाययोजना का करत नाही, हा मोठा प्रश्न आहे. wildlife deaths
हॅबीटॅट कंझर्वेक्षण सोसायटी लँडस्केप रिसर्च अँड कंझर्वेक्षण फाऊंडेशन (Habitat Conservation Society Landscape Research & Conservation Foundation) ही संस्था वन्यजीवांच्या अपघातांची नियमितपणे नोंद ठेवते आणि वनविभाग, रेल्वे प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाशी पत्रव्यवहार करून वन्यजीवांसाठी आवश्यक उपाययोजना सुचवत असते, जेणेकरून या निष्पाप जीवांचे प्राण वाचवता येतील. Ballarshah Gondia Railway Line
या दुर्दैवी घटनेच्या ठिकाणी संजीवणी पर्यावरणचे तन्मय झिरे, पशुवैद्यकीय अधिकारी छोणकर साहेब, वनपरिक्षेत्र अधिकारी वेलमे, क्षेत्र सहाय्यक खनके आणि वनरक्षक ठाकूर यांनी भेट दिली. आता गरज आहे ती रेल्वे प्रशासनाने तातडीने जागे होण्याची आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी ठोस पाऊले उचलण्याची. आणखी किती वन्यजीवांना या रेल्वे लाईनवर आपला जीव गमवावा लागणार आहे?