महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.
Red Run marathon Chandrapur 2025 : चंद्रपूर, दि. 29 : एचआयव्ही/एड्स विषयक जनजागृतीसाठी आज जिल्ह्यात भव्य रेड रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर आणि जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा पार पडली.
जिल्हा क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या या स्पर्धेचे आयोजन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार आणि क्रीडा अधिकारी मोरेश्वर गायकवाड यांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेला सुरुवात झाली.
युवक गटामध्ये भूषण आस्वले यांनी प्रथम क्रमांक, साईनाथ पुंगाटी यांनी द्वितीय क्रमांक व रोशन नैताम यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तर युवती गटात श्रद्धा थोरात प्रथम, साक्षी पोलोजवार द्वितीय आणि आचल कडुकर तृतीय क्रमांकाने विजयी ठरल्या. Chandrapur HIV AIDS awareness marathon
निवडक स्पर्धकांना राज्यस्तरीय रेड रन मॅरेथॉन मध्ये सहभागी होण्याची संधी
विजेत्यांना शिल्ड आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यापैकी निवडक स्पर्धकांना 12 ऑगस्ट रोजी मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय रेड रन मॅरेथॉन मध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार असल्याचे श्री. पानगंटीवार यांनी सांगितले.
स्पर्धेचे मुख्यगुणलेखक म्हणून रोशन भुजाडे, दर्शन माशीरकर, भुमेश्वर कन्नमवार यांचे योगदान लाभले. पंच म्हणून आदर्श चिवंडे, नावेद खान, सौरभ कन्नाके व ऋतिक धोडरे यांनी काम पाहिले.
स्पर्धेचे संचालन जिल्हा पर्यवेक्षक निरंजन मंगरूळकर यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संकल्प बहुउद्देशीय ग्रामविकास संस्था, नोबल शिक्षण संस्था, पॅन इंडिया आणि क्रॉईस्ट हॉस्पिटल सोसायटी यांचा मोलाचा सहभाग लाभला.
Pathetic condition of Chandrapur-Ghugus road : घुग्घुस, [२९ जुलै, २०२५]:चंद्रपूर-घुग्घुस मुख्य मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली असून, जागोजागी पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. या रस्त्यावर नियमित टोल वसुली केली जात असतानाही, रस्त्याची देखभाल आणि दुरुस्तीकडे टोल प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नुकताच, १६ जुलै रोजी झालेल्या एका भीषण अपघातात आठ महिन्यांच्या चिमुकल्याचा बळी गेल्याने परिस्थितीचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.
घुग्घुसजवळ, धानोरा फाटा परिसरात एक अधिकृत टोल नाका उभारण्यात आला आहे. या टोल नाक्याचा मूळ उद्देश प्रवाशांसाठी चांगल्या रस्त्यांची निर्मिती, योग्य देखभाल आणि आवश्यक सुविधा पुरवणे हा आहे. मात्र, सध्या हा मार्ग केवळ खड्ड्यांसाठी ओळखला जात आहे. मोठ्या प्रमाणात टोल आकारणी करूनही रस्त्याची अवस्था अत्यंत खराब असल्याने दुचाकी आणि चारचाकी वाहनांना अपघात होत आहेत. इतकेच नाही, तर मोठ्या वाहनांनाही या खड्ड्यांमुळे नुकसान सहन करावे लागत आहे. fix Ghuggus road before tol
निष्पाप चिमुकल्याचा मृत्यू : टोल अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
गेल्या आठवड्यात, १६ जुलै रोजी रस्त्यावरील एका मोठ्या खड्ड्यामुळे एक दुचाकीस्वार अपघातग्रस्त झाला. या अपघातात केवळ आठ महिन्यांच्या निरागस बाळाला आपला जीव गमवावा लागला. या घटनेला टोल अधिकारी आणि त्यांच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरले जात आहे. यापूर्वीही अनेक घटनांमध्ये नागरिकांना गंभीर दुखापती झाल्या आहेत, तर काही अपघातात निरपराध लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. संतप्त नागरिकांनी टोल अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची आणि जोपर्यंत रस्त्याची पूर्णपणे दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत टोल वसुली पूर्णपणे बंद करण्याची मागणी केली आहे. demand halt toll till road repair
पालकमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी केवळ ‘दिखावा’
काही दिवसांपूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या घुग्घुस दौऱ्याच्या नियोजित कार्यक्रमानिमित्त प्रशासन आणि ठेकेदारांनी अचानक सक्रियता दाखवली. त्यांच्या दौऱ्यापूर्वी बसस्थानक परिसर आणि चंद्रपूर-घुग्घुस महामार्गावरील खड्डे पावसाळ्यात तात्पुरत्या स्वरूपात गट्टू आणि गिट्टी टाकून बुजवण्यात आले. नागरिकांनी या तात्पुरत्या उपायाला केवळ ‘दिखावा’ असे संबोधले आहे. मोठ्या अधिकारी येण्यापूर्वीच व्यवस्था दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला जातो, पण सामान्य जनतेला मात्र रोजच खराब रस्त्यांमुळे होणाऱ्या त्रासाचा आणि अपघातांचा सामना करावा लागतो, असे नागरिकांचे म्हणणे आहे. पालकमंत्र्यांसमोर तात्पुरती सारवासारव करण्याऐवजी, कायमस्वरूपी दुरुस्ती करून अपघातांना आळा घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
कायमस्वरूपी उपायांची आणि भरपाईची मागणी
स्थानिक रहिवासी आणि वाहनचालक नियमितपणे टोल कर भरत असले तरी, त्यांना बदल्यात तुटलेले रस्ते आणि जीवघेणा धोका मिळत आहे. अनेकवेळा संबंधित विभागाला लेखी तक्रारी करूनही कोणतीही दखल घेतली गेली नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. रस्त्याची दुरुस्ती होईपर्यंत टोल वसुली तात्काळ थांबवावी, अशी त्यांची मागणी आहे. यासोबतच, अपघातात जखमी झालेल्या आणि मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई मिळावी, टोल संचालन करणाऱ्या एजन्सीविरुद्ध कठोर प्रशासकीय कारवाई करावी आणि भविष्यात रस्त्यांची नियमित तपासणी करून तातडीने दुरुस्तीची व्यवस्था सुनिश्चित करावी, अशा मागण्याही नागरिकांनी केल्या आहेत. Chandrapur Ghuggus road accidents toll protest
रास्ता रोको आंदोलन: प्रशासनावर दबाव
नारायण स्कूल परिसरात मुख्य रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांविरोधात अनिल डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. पदोली पोलिसांनी आयव्हीआरसीएल (टोल कंपनी) आणि आंदोलनकर्ते यांच्यात चर्चा घडवून आणल्यानंतर सुमारे २० मिनिटांनी आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनाने प्रशासनावर दबाव वाढला असून, आता तरी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ठोस पावले उचलली जातील का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Gondwana University carry on policy update : चंद्रपूर – गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत सलग्नित महाविद्यालयात शिकणाऱ्या बी. ए. ,बी एस सी, बी कॉम इत्यादी अभ्यासक्रमातील अनेक विद्यार्थी मागील सत्रामध्ये काही विषयात नापास झालेत. नवीन शैक्षणिक धोरण मागील सत्रापासून लागू केले आहे. त्यामुळे सुरुवातीला अनेक दिवस त्याचा अभ्यासक्रमांचा सिलॅबस व अभ्यास साहित्य उपलब्ध होऊ न शकल्यामुळे निकालामध्ये मोठ्या प्रमाणावर घट झालेली आहे. academic year loss due to new education policy
मात्र याचा फटका विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेश घेताना बसत आहे. अनेक विद्यार्थी अंतिम वर्षाच्या प्रवेशापासून वंचित राहणार आहे. काही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. निलेश बेलखेडे व प्रा. डॉ. दिलीप चौधरी यांच्याशी संपर्क साधून सदर बाब लक्षात आणून दिली.
विद्यार्थ्यांचा गंभीर प्रश्न लक्षात घेऊन दोन्ही सिनेट सदस्यांनी तत्काळ गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्याशी संपर्क साधला व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विशेष बाब म्हणून यावर्षी सगळ्या विद्यार्थ्यांना सरसकट कॅरी ऑन लागू करावे अशा पद्धतीची विनंती केली.
तोडगा निघणार
कुलगुरूंनी सकारात्मक निर्णय घेऊ, सदरचा निर्णय हा अकॅडमिक कौन्सिलच्या अंतर्गत येत असल्यामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या अकॅडमी कौन्सिलच्या बैठकीमध्ये सदर विषय ठेवून त्यावर निश्चितपणे विद्यार्थी हिताच्या दृष्टीने काहीतरी तोडगा काढू असे आश्वासित केलेले आहे.
त्यामुळे येणाऱ्या अकॅडमी कौन्सिलच्या बैठकीत विद्यार्थ्यांना कॅरी ऑन लागू करून त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याची विद्यापीठाने काळजी घ्यावी. अशा स्वरूपाची मागणी दोन्ही सिनेट सदस्यांकडून विद्यापीठाकडे करण्यात आली आहे.
amruta fadnavis chandrapur visit : चंद्रपूर – देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहाच्या निमित्ताने आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून पहिल्या श्रावण सोमवारी आयोजित विशेष कार्यक्रमात राज्यातील सर्वात मोठ्या प्राचीन शिवलिंगाचा जलाभिषेक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ५५ नद्यांचे पवित्र जल आणि १ लाख ५५ हजार बेलपत्र अर्पण करण्यात आले. या भव्य धार्मिक कार्यक्रमाला हजारो भाविकांची उपस्थिती लाभली. आमदार किशोर जोरगेवार आणि त्यांच्या पत्नी तथा माजी मंत्री शोभा फडणवीस यांची यावेळी उपस्थिती होती. ही एक जागृत देवस्थान असल्याची अनुभूती झाल्याचे अमृता फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह साजरा करण्यात येत असून, त्याअंतर्गत ३५५ हून अधिक विविध सेवाभावी उपक्रम राबवले जात आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून भिवापूर वॉर्डातील प्राचीन आणि राज्यातील सर्वात मोठ्या शिवलिंगाच्या रुद्राभिषेकाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी राज्यातील तसेच राज्याबाहेरील नामवंत पंडितांना आमंत्रित करण्यात आले होते. 55 rivers water abhishek ritual
दरम्यान, या कार्यक्रमासाठी अमृता फडणवीस आज चंद्रपुरात दाखल झाल्या. सायंकाळी चार वाजता त्या कार्यक्रमस्थळी पोहोचल्या. कावड घेऊन त्या शिवलिंगाजवळ आल्या आणि राज्यभरातून आणलेल्या ५५ नद्यांच्या पवित्र जलाने व १ लाख ५५ हजार बेलपत्रांनी शिवलिंगाचे जलाभिषेक केले. त्यानंतर त्यांनी शिवलिंगाची आरती केली.
यावेळी बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, “चंद्रपूर ही विविध रूपातील सौंदर्याने नटलेली नगरी आहे. हे सुंदर आणि प्राचीन मंदिर आहे. त्याचा विकास व्हायला हवा. मी वर्षातून किमान दोनदा तरी चंद्रपूरला भेट देईन, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी त्यांनी महामृत्युंजय मंत्राचे पठण केले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध उपक्रमांचे कौतुक केले.
अमृता फडणवीस यांच्या हस्ते सायकल वाटप व चित्रप्रदर्शनाचे निरीक्षण
देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहानिमित्त २०५५ विद्यार्थिनींना सायकली वाटप करण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा शुभारंभ आज अमृता फडणवीस यांच्या हस्ते झाला. आमदार किशोर जोरगेवार यांच्या ‘राजमाता निवासस्थान’ येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी ५५ विद्यार्थिनींना सायकली वाटप करून या उपक्रमाचा प्रारंभ केला.
तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनपटावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचीही त्यांनी पाहणी केली.
how to buy scrap vehicles from police : चंद्रपूर, दि. 28 : पोलिस स्टेशन माजरी, येथे बरेच कालावधीपासुन जमा असलेली जंगम मालमत्तेबाबत कोणताही व्यक्ती त्याचा हक्क सांगण्याकरीता किंवा प्रस्थापित करण्यासाठी हजर न झाल्याने एकूण 37 मोटार सायकल, (शासकीय किंमत 1 लक्ष 88 हजार 210 रुपये) यांचा लिलाव होणार आहे. नमुद वाहने टेंडरद्वारे जिथे आहे तिथे वाहनाचे इंजिन व चेचिस नंबर मिटवून व वाहनाची विल्हेवाट लावून भंगारमध्ये विक्री करण्यात येणार आहे. त्याकरीता इच्छुक खरेदीदार यांच्याकडून सिलबंद टेंडर मागविण्यात आले आहे. police confiscated bike auction process
वाहने परिक्षणाची तसेच अनामत रक्कम व नोंदणी तारीख 11 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी वाजेपर्यंत अनामत रक्कम भरावी लागेल. लिलाव 12 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 यावेळेत होईल.
लिलावाच्या अटी व शर्ती
वरीलप्रमाणे नमुद केलेल्या जंगम मालमत्तेची जशी आहे तशी जिथे आहे तिथे व ज्या स्थितीत आहे, तशी विक्री केली जाईल. लिलावाच्या वेळी व ठिकाणी लिलावाबाबत तपशिलवार अटी व शर्ती वाचुन दाखविण्यात येतील. विक्री रकमेच्या 10 टक्के रक्कमेचा (अनामत) भरणा केल्यावर लिलाव बोली बोलुन झाल्यानंतर ज्यांचे नावाने सदर वाहनाचा लिलाव मंजुर होईल, त्या खरेदीदारास उर्वरित रक्कमचा भरणा त्वरीत लिलावाच्या ठिकाणीच भरणे बंधनकारक राहील.
जर सदरचा भरणा त्वरीत मुदतीत केला नाही तर भरलेली 10 टक्के रक्कम कोणत्याही प्रकारची नोटीस न देता जप्त करण्यात येईल. जे खरेदीदार भंगार व्यावसायिक आहे (ज्याचे नावे भंगार व्यवसायाचे प्रमाणपत्र आहे.) तेथ विक्री रक्कमेच्या 10 टक्के रकमेचा (अनामत) भरणा करतील व फक्त त्याच खरेदीदारास विक्री बोली लिलावामध्ये प्रवेश मिळणार, त्याचप्रमाणे अनामत रक्कमेचा भरणा करतांना त्याचे प्रमाणपत्र ची आधारकार्डची झेरॉक्स प्रत्त सादर करावी लागेल.
सदर लिलावाच्या बोली/ऑफर स्विकारणे न स्विकारणे लिलाव कायम करणे, पुढे ढकलणे किंवा रद्द करणे व इतर कोणतेही कारण न देता निर्णय घेणे, हे सर्व अधिकार ठाणेदार, पोलीस स्टेशन माजरी यांचे राहतील याची नोंद घ्यावी, असे ठाणेदार अमितकुमार पांडेय यांनी कळविले आहे.
Aadhar card mismatch issues in schools : चंद्रपूर : खासदार प्रतिभा धानोरकर यांनी महाराष्ट्र तसेच देशभरातील सरकारी आणि खासगी शाळांमधील नामांकित विद्यार्थ्यांच्या आधार कार्डमध्ये आढळलेल्या विसंगती आणि अवैध आधार कार्डच्या संदर्भात शिक्षण मंत्रालयाकडून स्पष्टीकरण मागितले आहे. लोकसभा सचिवालयाला सादर करण्यात आलेल्या अतारांकित प्रश्न क्रमांक-1333 च्या लेखी उत्तरात, शिक्षण मंत्रालयातील राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीची स्थिती आणि आधार तपशिलांच्या पडताळणी प्रगतीची सविस्तर माहिती दिली. aadhaar correction process for students
सरकारने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात एकूण 1,84,89,092 विद्यार्थी नामांकित आहेत. यापैकी 4,55,263 विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड उपलब्ध नाहीत , 6,80,686 विद्यार्थ्यांची आधार पडताळणी प्रलंबित आहे , आणि 2,08,903 विद्यार्थ्यांची आधार पडताळणी अयशस्वी झाली आहे, यशस्वी आधार पडताळणी झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 1,71,44,240 असून, त्यापैकी 1,70,36,596 आधार पूर्णपणे सत्यापित आहेत.
सरल पोर्टलवर नोंदणी करताना झालेल्या चुका
सरकारने नमूद केले की, पडताळणी अयशस्वी होण्याची सामान्य कारणे म्हणजे नाव, स्पेलिंग, जन्मतारीख मधील विसंगती, आधार कार्ड अद्ययावत नसणे, आधार कार्डवर जन्मतारीख नसणे, राज्याच्या सरल पोर्टलवर नोंदणी करताना झालेल्या चुका आणि लिंग विसंगती इत्यादी चुकीच्या नोंदी दिसून येत आहे.
शिक्षण मंत्रालयाने हे देखील स्पष्ट केले की, आधार अवैध असल्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याला योजना आणि शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यापासून वंचित ठेवण्यात येणार नाही. केंद्र सरकार समग्र शिक्षा आणि पीएम-पोषण यांसारख्या केंद्र पुरस्कृत योजनांसह, प्रत्येक पात्र विद्यार्थ्याला सर्व योजनांचा लाभ मिळावा यासाठी कटिबद्ध आहे. Ministry of Education
या विसंगती दूर करण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलांचीही माहिती दिली. आधार कार्डमधील नवीन नोंदणी आणि दुरुस्तीचे काम ब्लॉक आणि क्लस्टर स्तरावर एक सतत प्रक्रिया आहे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक ब्लॉकमध्ये आधार संबंधित कामे करण्यासाठी दोन आधार किट विकसित करण्यात आले आहेत. विभाग सतत आढावा घेतो आणि राज्ये तसेच प्रकल्प मूल्यमापन मंडळ (PAB) आणि राज्यांसोबतच्या त्रैमासिक बैठकांमधून जमिनीवर येणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी राज्यांना मार्गदर्शन करतो.
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सरकारच्या उत्तरावर समाधान व्यक्त केले आणि आधार संबंधित विसंगतींमुळे कोणताही विद्यार्थी शैक्षणिक किंवा आर्थिक लाभापासून वंचित राहणार नाही याची खात्री करण्याचे आवाहन केले.
Amruta Fadnavis in chandrapur : चंद्रपूर – आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह अंतर्गत आयोजित विविध सामाजिक उपक्रमांसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी सौ. अमृता फडणवीस उद्या (सोमवार) चंद्रपूर दौर्यावर येत असून, त्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.
दुपारी ३ वाजता सौ. फडणवीस यांचे चंद्रपूर येथे आगमन होईल. त्यानंतर त्या आमदार किशोर जोरगेवार यांच्या कोतवाली वार्ड येथील ‘राजमाता निवास’ या निवासस्थानी भेट देतील. दुपारी ३.३० वाजता २०५५ विद्यार्थ्यांपैकी ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करून सायकल वितरण कार्यक्रमाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम ‘राजमाता निवास’ येथेच होणार आहे.
दुपारी ४ वाजता सौ. फडणवीस छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनपटावर आधारित चित्रप्रदर्शनीची पाहणी करतील. यानंतर ४.२५ वाजता भिवापूर येथील शिवलिंग परिसरात आयोजित महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या शिवलिंगाचे त्यांच्या हस्ते पूजन करण्यात येणार आहे. येथे एक लाख ५५ बेलपत्रे आणि ५५ नद्यांच्या पवित्र जलाने शिवलिंगाचा जलाभिषेक करण्यात येणार आहे.
compensation increase for coal mine farmers : चंद्रपूर : वेकोलि बल्लारपूर क्षेत्र अंतर्गत, बल्लारपूर नॉर्थ वेस्ट खुली खदान प्रकल्पातील मागास व अन्य प्रवर्गातील शेतकऱ्यांनी दि. 27 जुलै रोजी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांची प्रत्यक्ष भेट घेवून या प्रकल्पासाठी मिळणारा प्रति एकर आर्थिक मोबदल्यामध्ये दरवाढ मिळवून देण्याविषयी चर्चा केली यावेळी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
जिल्हा भाजपा सचिव मधुकर नरड, पूर्व जिल्हाध्यक्ष किसान आघाडी राजु घरोटे, कोलगाव उपसरपंच पुरूषोत्तम लांडे यांचे नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी हंसराज अहीर यांना या आशयाचे निवेदन सादर केले. आर/आर पॉलिसी नुसार मिळणाऱ्या नोकरी सोबतच प्रति एकरी दरवाढ देण्याविषयी कोल इंडियाने तत्वतः मान्य केले असल्याने ही दरवाढ लवकरात लवकर मिळवून देवू असा निर्धार हंसराज अहीर यांनी उपस्थित शेतकऱ्यांसमोर व्यक्त केला.
अहीर यांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आश्वासित केले की, नोकरी व शेतीला दरवृध्दी प्राप्त करून घेणे हा आपला न्याय अधिकार आहे. सन 2012 मध्ये कोल इंडिया व राज्य शासनाच्या धोरणानुसार कोरडवाहू प्रति एकर जमिनीस रू. 8 लाख व सिंचीत प्रति एकर जमिनीकरिता रू. 10 लाख दरवाढ लागु करण्यात आली होती. farmer land compensation policy Maharashtra
दरवाढ होणार
परंतु, जमिनीचे विद्यमान बाजारमुल्य आणि आजचे सरकारी दराच्या तुलनेत वेकोलिद्वारा आजघडीला मिळणारे हे दर अत्यल्प असल्याची भुमिका कोल इंडियाचे अध्यक्ष श्री. पी. मल्लिकार्जूना प्रसाद यांच्या तसेच वेकोलि मुख्यालय, नागपुर यांचे वरिष्ठा प्रबंधनाच्या उपस्थितीत दि. 10 जुलै 2025 रोजी कोलकाता येथे झालेल्या बैठकीत राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाद्वारे दरवाढीचा हा मुद्दा आग्रही स्वरूपात मांडण्यात आला असल्याचे हंसराज अहीर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले. सदर दरवृध्दीबाबत कोल इंडिया प्रबंधनाने सकारात्मक भुमिका स्विकारत ओबीसी आयोगाद्वारे मांडण्यात आलेली भुमिका व्यावहारीक असल्याने ही मागणी तत्वतः मान्य केली असल्याचेही अहीर यांनी यावेळी सांगितले. farm land rate revision coal India project
हा निर्णय कोल इंडियाद्वारे लवकरात लवकर जाहीर व्हावा यासाठी आपण वारंवार पाठपुरावा करीत असल्याचे तसेच ज्या प्रकल्पांचे दर निश्चितीचे करारनामे झालेले नाही त्या प्रकल्पांना ही होणारी दरवाढ लागू राहण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अहीर यांनी सांगितले. दर निश्चितीच्या करारनाम्यापुर्वी प्रकल्प धारकांनी द्यावयाच्या कौटूंबिक शपथपत्रात असलेला वर्ष 2012 च्या शासन धोरणानुसार, दर मान्य असल्याचा अनावश्यक उल्लेख वगळण्यासाठी वेकोलि प्रबंधनास सुचना व पाठपुरावा करणार असल्याचे सुध्दा अहीर यांनी सांगितले.
शेकडो शेतकऱ्यांच्या जिवीताला निर्माण होणारा संभाव्य धोका लक्षात घेता, कोलगाव येथील उर्वरित 337 हेक्टर जमीन अधिग्रहण व गावाचे पुनर्वसन याविषयासाठी आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीलात तसेच या दरवृध्दीसाठी आमच्या पाठीशी उभे राहावे असा आशावाद उपस्थित शेतकऱ्यांनी अहीर यांचेशी संवाद साधतांना व्यक्त केला.
Maha Smiles : मुंबई, दि. 27 : बालकांच्या चेहऱ्यावरील दुभंगलेले ओठ (क्लेफ्ट) व फाटलेले टाळू (पॅलेट) या जन्मजात विकारावर उपचार आणि जनजागृती करून या बालकांच्या निरागस चेहऱ्यावर हसू फुलविणे, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ध्येय आहे. यासाठी त्यांनी विदर्भातील अशा बालकांवर उपचार आणि जनजागृतीची गरज ओळखत त्यांनी स्वयंसेवी संस्थांना आवाहन केले. cleft awareness and treatment campaign
मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या आवाहनाला ‘स्माईल ट्रेन इंडिया’ ही स्वयंसेवी संस्था आणि बजाज फिनसर्वच्या शेफाली बजाज यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे हे स्वप्न आता मिशनमोडवर साकार होतांना दिसत आहे.
‘स्माईल ट्रेन इंडिया’ ही आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था आणि बजाज फिनसर्व यांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून आता ही मोहीम पूर्णपणे मोफत राबविली जाणार आहे. ‘महा स्माईल्स क्लेफ्ट जनजागृती आणि उपचार मोहीम’ ही केवळ वैद्यकीय मोहीम नसून, हजारो बालकांना नवजीवन देणारी एक आशावादी चळवळ ठरणार आहे.
या आगळ्यावेगळ्या मोहिमेचा नागपूर येथे 31 जुलै 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 12.30 या वेळेत स्वामी विवेकांनद मेडिकल मिशन हॉस्पिटल, खापरी, येथून शुभारंभ होणार आहे.
तीन विशेष मोबाईल व्हॅन विदर्भात
या पहिल्यावहिल्या उपक्रमाअंतर्गत पुढील 90 दिवसांत तीन विशेष मोबाईल व्हॅन विदर्भातील संपूर्ण 11 जिल्ह्यात फिरून लोकांमध्ये क्लेफ्ट विकाराविषयी माहिती देणार आहेत. यामध्ये लवकर निदान, उपचाराची शिफारस आणि गरजू बालकांसाठी मोफत शस्त्रक्रियांची नोंदणी असे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. या बालकांवर नागपूर, गोंदिया, अकोला, वर्धा येथील रूग्णालयात शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. free cleft palate surgery for children
क्लेफ्ट विकार हा जन्मजात असून यात ओठ आणि टाळू हे दुभंगलेले असतात. जवळपास 700 मुलांपैकी एका मुलांमध्ये हा विकार दिसून येतो. यावर शस्त्रक्रिया करूनच हा विकास दूर करता येते. वेळीच उपचार केले नाहीत तर कान बधिर होणे, बोलण्यात अडथळा येणे अशा वेगवेगळ्या व्यंगासोबत सामाजिक एकटेपणा येऊ शकतो. तथापि या विकारावर उपचार असून 6-7 शस्त्रक्रियेनंतर यावर पूर्णपणे मात करता येते. या सर्व शस्त्रक्रिया खर्चिक असल्याने आर्थिक दुर्बल कुटुंबातील व्यक्तींना ते परवडणारे नाही. म्हणूनच संवेदशील नेतृत्व असलेल्या मुख्यमंत्र्यांनी क्लेफ्ट वरील उपचार संपूर्ण मोफत व्हावे, यासाठी या विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे. free plastic surgery for cleft kids in Vidarbha
महा स्माईल्स’ मोहीम
क्लेफ्ट विकार असलेल्या बालकांना वेळेवर उपचार मिळाल्यास त्यांचे जीवन पूर्णतः सामान्य होऊ शकते. यासाठी केवळ उपचारच नव्हे, तर जागरूकता ही देखील तितकीच गरजेची आहे. त्यामुळे ‘महा स्माईल्स’ ही मोहीम विदर्भातील बालकांसाठी आरोग्यदूत ठरणारी आहे. या मोहिमेमुळे ग्रामीण आणि आदिवासी भागातील हजारो कुटुंबांना एक नवीन आशेचा किरण दिसणार आहे. अपूर्ण माहितीमुळे दुर्लक्षित राहिलेल्या समस्येवर आता तज्ज्ञांच्या मदतीने प्रभावी उपचार मिळणार आहे.
स्माईल ट्रेन आणि बजाज फिनसर्व यांच्या सहकार्याने महाराष्ट्राच्या 11 जिल्ह्यातील मुलांमध्ये जन्मजात आलेले दुभंगलेले होठ आणि टाळू विकार दूर होऊन त्यांच्या जीवनात आशेचा किरण नक्कीच जागणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
devendra fadnavis birthday special events : चंद्रपूर २६ जुलै – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांनी सुरू केलेली जनसेवेची ही ३५५ कार्यक्रमाची मालिका कौतुकास्पद आहे. या उपक्रमांचा थेट लाभ जनतेपर्यंत पोहोचत आहे. मि आमदार असता पासून किशोर जोरगेवार हे आमचे मित्र असून ही मैत्री आज अधिक दृढ झाली आहे. कामाचा सातत्याने पाठपुरावा करून त्यांना मार्गी लावणारा आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. आज त्यांचे सामाजिक भान आणि नियोजनही पाहता आले असून सेवाभावी कार्यक्रमांनी चंद्रपूरचा सेवा सप्ताह सजला असल्याचे प्रतिपादन राज्याचे बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले (PWD Minister Chhatrapati Shivendrasingh Raje Bhosale) यांनी केले.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून आयोजित देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहानिमित्त बालाजी सभागृहात कार्यकर्ता मेळावा, रक्तदान शिबिर, मंडळ अध्यक्षांना संगणक वाटप. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील नवनियुक्त पदाधिकारी आणि संचालकांचा सत्कार, आणि पक्षप्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मंत्री भोसले बोलत होते.
या कार्यक्रमाला आमदार किशोर जोरगेवार, महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टुवार, भाजप नेते अशोक जिवतोडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे, उपाध्यक्ष संजय डोंगरे, प्रकाश देवतळे, रघुवीर आहिर, दशरथसिंह ठाकूर, नामदेव डाहुले, संजय कंचर्लावार, संदीप आवारी, अजय जयस्वाल, बलराम डोडाणी, तुषार सोम, छबू वैरागडे, मनोज पाल, राहुल घोटेकर, मंडळ अध्यक्ष रवी गुरुन्नूले, प्रदीप किरमे, स्वप्नील डुकरे, सुभाष अदमाने, ॲड. सारिका सिंदुरकर, विनोद खेवले, रवींद्र गुरुनुरे, आशिष मासिरकर, संजय तिवारी, वंदना हातगावकर, सविता दंढारे आदींची उपस्थिती होती. devendra fadnavis birthday special events
पक्षाचे काम अधिक गतिशील करण्याच्या हेतूने आमदार किशोर जोरगेवार यांच्या वातीने नवनियुक्त पाच मंडळ अध्यक्षांना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते संगणक व प्रिंटरचे वाटप करण्यात आले. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील नवनियुक्त पदाधिकारी आणि संचालकांचा सत्कारही मंत्री भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.
राज्यातील प्रत्येक घटकांचे प्रश्न समजून घेणारे मुख्यमंत्री
यावेळी पुढे बोलताना मंत्री भोसले म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देशातील सर्वमान्य नेतृत्व आहे. पक्ष संकटात असतानाही राज्यासह इतर राज्यातील निवडणुकांमध्ये त्यांनी नियोजनबद्ध काम करत सत्ता मिळवून दिली आहे. राज्यातील प्रत्येक घटकांचे प्रश्न समजून घेणारे मुख्यमंत्री म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्य प्रगतीपथावर आहे. chandrapur bjp seva saptah 2025 highlights
आज आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनपटावर आधारित छायाचित्र प्रदर्शन आयोजित केले असून त्याद्वारे त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास दर्शविण्यात आला. पक्षनिष्ठा, सातत्य, प्रामाणिकपणा हे गुण फडणवीस यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेच्या अपेक्षेप्रमाणे काम करत स्वराज्याची स्थापना केली. राज्य सरकारही त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आहे. आमदार किशोर जोरगेवार यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी स्नेहसंबंध असल्यामुळे चंद्रपूरच्या विकासासाठी त्यांनी मांडलेल्या मागण्या पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाकाली मंदिर यंत्रा परिसर, दीक्षाभूमी विकास, धानोरा बॅरेज, टायगर सफारी यांसारखे अनेक प्रकल्प प्रस्तावित आहेत. आमच्या विभागामार्फत या व भविष्यातील सर्व विकासकामांना प्राधान्याने मंजुरी दिली जाईल, असेही मंत्री भोसले यांनी स्पष्ट केले. devendra fadnavis birthday special events
शिवेंद्रसिंहराजे भोसले जनसेवेचे भान असणारे राजे – आ. किशोर जोरगेवार
देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहानिमित्त (seva saptah) आपण ४०० हून अधिक विविध सामाजिक, धार्मिक, आरोग्यवर्धक व शैक्षणिक कार्यक्रम राबवित आहोत. आज मंत्री भोसले यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला एक वेगळी उंची प्राप्त झाली आहे. मंत्री म्हणून जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात ते नेहमी तत्पर राहतात. त्यामुळे ते जनसेवेचे भान असणारे राजे आहेत, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
पुढे बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की, आज पक्षात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी जनसेवेचा संकल्प केला आहे. रक्तदानाच्या माध्यमातून मागील सहा दिवसांत २ हजारहून अधिक रक्त युनिट्स संकलित करण्यात आले आहे. ही कार्यकर्त्यांची समर्पणशील भावना दर्शवते. या सप्ताहाच्या माध्यमातून शेवटच्या गरजूंपर्यंत पोहोचण्याचा आमचा संकल्प आहे. devendra fadnavis birthday special events
विद्यार्थिनींना सायकल वाटप असो वा भव्य आरोग्य शिबिर – हे सर्व आयोजन थेट नागरिकांच्या हिताचे आहे. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी येथील विकासकामांना प्राधान्य द्यावे अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
मंत्री भोसले यांचे चंद्रपूर आगमन झाल्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी माता महाकाली मंदिरात दर्शन घेतले. भिवापूर वार्डातील राज्यातील सर्वात मोठ्या शिवलिंगाचेही त्यांनी दर्शन घेतले. छत्रपती शिवाजी चौकात मुख्यमंत्री फडणवीस (devendra fadnavis) यांच्या जीवनपटावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन आणि बालाजी सभागृहातील रक्तदान शिबिराचे उद्घाटनही त्यांनी केले. या शिबिरात २०० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. या मेळाव्याला कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. श्याम हेडाऊ यांनी केले.