Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • Amma Chowk controversy । चंद्रपुरात “अम्मा’ वरून नवा वाद, कांग्रेसचे मनपाला निवेदन

    Amma Chowk controversy

    Amma Chowk controversy : चंद्रपूर | शहर पोलीस स्टेशन आणि सात मजली इमारत यांच्या मधोमध असलेल्या जागेवर चंद्रपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून अचानक एका पुतळ्याचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. ही जागा सध्या पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली असतानाही कोणतीही पूर्वसूचना अथवा परवानगी न घेता सुरू करण्यात आलेल्या या कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

    चंद्रपुरात गुंतवणुकीच्या नावावर कोट्यवधींची फसवणूक

    या अनधिकृत कामाचा तीव्र निषेध करत चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी हे बांधकाम तातडीने थांबविण्याची मागणी केली. त्यांनी या संदर्भात महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवाल यांना निवेदन सादर करून सदर बांधकामास त्वरित स्थगिती देण्याची मागणी केली आहे. Congress complaint to municipal commissioner

    congress complaint to municipal commissioner

    ओळख पुसण्याचा डाव

    चंद्रपूर शहरातील सात मजलीसमोरील फुटपाथ वर स्व. गंगुबाई जोरगेवार (अम्मा) टोपल्या विकायला बसायच्या. त्या सदर जागेला परिसराला “अम्मा चौक” असे नांव देण्याबाबत मनपा प्रशासकाने मान्यता प्रदान केली. चंद्रपूर शहरातील स्वातंत्र्य संग्राम सैनिक, समाजसेवक, माजी लोकप्रतिनिधी यांच्या कार्याची आठवण ठेवून मनपाने कधीच स्मारक बनण्याचा विचार केला नाही. मात्र एखादी महिला त्या ठिकाणी टोपल्या विकत होती म्हणून त्या परिसराला त्यांचे नाव देणे कितपत योग्य आहे. हा संपूर्ण परिसर गांधी चौक म्हणून ओळखला जातो मात्र ही ओळख पुसण्याचा डाव आखण्यात देत आहे, असा आरोप तिवारी यांनी केला. 


    तिवारी यांनी सांगितले की, हा परिसर पुरातत्व विभागाच्या संरक्षणाखाली येतो. त्या जागेवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करणे कायद्याच्या विरोधात आहे. अशा प्रकारची कारवाई केल्यास शहरातील ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला धोका पोहोचू शकतो. महानगरपालिकेने या प्रकरणी तातडीने खुलासा करावा आणि संबंधित काम थांबविण्याची कारवाई करावी, अशी मागणी देखील या निवेदनात करण्यात आली आहे.

  • India Today ranking SP College Chandrapur । 📊 देशात नामवंत ठरले SP कॉलेजचे कोर्सेस – जाणून घ्या कोणते अभ्यासक्रम मिळाले टॉप रँक!

    India Today ranking SP College Chandrapur

    India Today ranking SP College Chandrapur : चंद्रपूर- ‘इंडिया टुडे’ या नामांकित मासिकातर्फे दरवर्षी महाविद्यालयाचे शाखानिहाय मूल्यांकन स्वयंप्रेरणेने करण्यात येते. अलीकडेच २०२४-२५ सत्रासाठी देखील ‘इंडिया टुडे’ ने मूल्यांकन करून राष्ट्रीय स्तरावर महाविद्यालयातील शाखांच्या मानांकनामध्ये येथील सरदार पटेल महाविद्यालयातील सर्वच शाखांना मानांकनात स्थान मिळाले आहे. सर्वोत्कृष्ट मानांकनात मागील वर्षीच्या तुलनेत महाविद्यालयातील कला, विज्ञान व वाणिज्य विभागाने यंदा भरारी घेत वरचे स्थान पटकाविले आहे.

    चंद्रपुरात गुंतवणुकीच्या नावावर नागरिकांची फसवणूक

    पालकांना आपल्या पाल्याला प्रवेश देताना उत्कृष्ट महाविद्यालय निवडण्यासाठी या मानांकनाचा उपयोग होतो. हे मानांकन ठरवताना ‘इंडिया टुडे’ मासिकातर्फे महाविद्यालयात उपलब्ध सोयी सुविधा, इमारत, विद्यार्थ्यांचा परीक्षेतील गुणानुक्रम, उपलब्ध प्राध्यापकांची संख्या, शैक्षणिक व इतर उपक्रम, विद्यार्थ्यांना दिलेल्या नोकरी विषयक संधी, प्रशिक्षण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न, अभ्यासक्रमाची पातळी इत्यादी बाबींचा अहवाल मागविण्यात येतो.

    मानांकनात मोठी झेप

    त्या आधारावर या मानांकनाची क्रमवारी प्रसिद्ध करण्यात येते. नुकतीच ती ‘इंडिया टुडे’ च्या ३० जून २०२५ च्या विशेष अंकात प्रकाशित करण्यात आली आहे. २०२४ च्या तुलनेत कला शाखेचे मानांकन १७० वरून १६४ वर, विज्ञान शाखेचे मानांकन ११७ वरून ११० वर, तर वाणिज्य शाखेचे मानांकन १४० वरून १३९ वर जाहीर झाले आहे.
    फॅशन विभागाला ५४, तर जनसंवाद विभागाला राष्ट्रीय स्तरावर ५८ वा क्रमांक मिळाला असल्याची माहिती समोर आली आहे. Sardar Patel Mahavidyalaya Chandrapur top ranked in India Today survey

    किमान प्रवेश शुल्क आकारणाऱ्या देशातील पहिल्या १० मध्ये महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र विभागाचा बीसीए हा अभ्यासक्रम पहिल्या दहात चौथ्या क्रमांकावर, जनसंवाद विभागाचा एम.एम.(मास कम्युनिकेशन) हा अभ्यासक्रम पहिल्या दहा मध्ये चौथ्या स्थानावर आहे. यातच वाणिज्य विभागही पहिल्या दहात सातव्या क्रमांकावर आहे. India Today ranked Mass Communication course Chandrapur college

    महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व सतत सहयोग देणारे सर्वोदय शिक्षण मंडळ यांच्या सामूहिक प्रयत्नांची ही फलश्रुती असल्याचे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एम.काटकर यांनी व्यक्त केले. हे सर्व अहवाल तयार करण्यासाठी उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रकाश शेंडे, डॉ. विजय वाढई, डॉ. एस.बी. किशोर, डॉ. राहुल सावलीकर, डॉ. पंकज मोहरीर, डॉ.अनिता मत्ते यांनी ही पूर्ण प्रक्रिया पार पाडली.

    दरम्यान दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणाताई तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य, राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर, जिनेश पटेल यांनी उपरोक्त उपक्रमाबद्दल शुभेच्छा यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एम.काटकर व त्यांच्या चमूचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. Sardar Patel College arts science commerce national India Today ranking

  • rail roko protest at Ghugus । पूल नसेल, तर ट्रेन थांबेल! – घुग्घुसमधील महिलांचा तीव्र इशारा

    rail roko protest at Ghugus

    rail roko protest at Ghugus : चंद्रपूर – घुग्गुसमध्ये जी 39 रेल्वे गेट आणि अपूर्ण रेल्वे पुलाच्या बांधकामामुळे रेलवे गेट वर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे काही प्रकारचे छोटे-मोठे अपघात होत आहेत. या अपघातांमध्ये अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. शहरवासीयांसाठी कोणत्याही सर्व्हिस रोडशिवाय रेल्वे पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले. त्यामुळे शहरवासीयांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

    चंद्रपुरात गुंतवणुकीच्या आमिषाला बळी पडले नागरिक, मोठी फसवणूक

    पुलाचे बांधकामात अनेक प्रकारचे भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, माला मेश्राम आणि घुग्घुस च्या सर्व महिलांनी पुलाचे बांधकाम लवकर सुरू केले नाही तर 16 ऑगस्ट ला रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा पत्रपरीषदेत दिला आहे.
    गेल्या 3 वर्षांपासून जी-39 रेल्वे गेट वारंवार आणि दीर्घकाळ बंद राहिल्याने आणि रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामात होत असलेल्या विलंबामुळे नागरिकांचा संयम सुटला आहे. या समस्येमुळे मुलांचे शिक्षण, रुग्णांवर उपचार, महिलांची सुरक्षितता आणि सामान्य जीवनावर वाईट परिणाम होत आहे. सतत वाहतूक कोंडी, वायू प्रदूषण आणि वेळेचा अपव्यय या भागात होत आहे. Ghugus city traffic woes unfair railway gate closure


    जी-39 रेल्वे गेट दिवसातून अनेक वेळा बंद राहते, त्यामुळे रुग्णवाहिका, स्कूल बस, जड ट्रक आणि अत्यावश्यक सेवा ठप्प होतात. जड ट्रकांमुळे गेटवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. जड वाहतुकीमुळे लहान वाहनेही त्यात अडकतात. यातुनच 12 जुलै ला एक अपघातात गर्भवती महिला आणि बाळाला जीव गमवावा लागला. गेल्या 3-4 वर्षांपासून नवीन रेल्वे पूल अपूर्ण आहे, त्यामुळे वाहतुकीचा संपूर्ण ताण जुन्या रेल्वे फाटकावर आहे.

    या समस्येवर 3 ऑगस्ट रोजी महिलांनी आयोजित केलेल्या रास्ता रोको आंदोलनाबाबत घुग्घुस पोलिस ठाण्यात बैठक घेण्यात आली. ज्यामध्ये जनरल रेल्वे अधिकारी डीजीएम सिव्हिल पी. श्रीकांत, वेकोली अधिकारी टिपले, रेल्वे संरक्षण दलाचे अधिकारी बलवीर सिंग, पोलिस निरीक्षक प्रकाश राऊत, रेल्वे विभागाचे अधिकारी विकास प्रसाद, आंदोलक माला मेश्राम, संजय तिवारी, साजन गोहणे आणि इतर कामगार उपस्थित होते. rail roko protest at Ghugus G‑39 gate incomplete bridge

    १६ ऑगस्ट रोजी रेल रोको आंदोलन

    बैठकीत पुलाचे बांधकाम त्वरित पूर्ण करावे, रेल्वे फाटक वारंवार बंद होत असल्याने उपाययोजना कराव्यात, राजीव रतन चौकात 24 तास पोलिस नियुक्त करावे, राजीव रतन चौकातील खड्डे तातडीने भरावे, जड वाहतुकीच्या वेळेचे नियोजन करावे अशा मागण्या करण्यात आल्या. अधिकायांनी बैठकीत काम 15 दिवसांत पूर्ण होईल असे लेखी आश्वासन दिल्याची माहिती मेश्राम यांनी दिली. अधिकायांच्या आश्वासनामुळे 3 ऑगस्टचे रास्ता रोको आंदोलन पुढे ढकलण्यात आले आहे. जर 15 दिवसांत काम पूर्ण झाले नाही तर 16 ऑगस्ट रोजी घुग्घुसच्या सर्व महिलां द्वारे रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. G‑39 railway gate congestion incomplete flyover

    पत्रपरिषदेत माला मेश्राम, सुरेखा भोयर, उज्वला उईके, अनिता कोल्हे, अलका चुनारकर, भारती निमसटकर आदी उपस्थित होते.

  • Chandrapur MP demands road repair potholes । खड्ड्यांनी घेतले प्राण, खासदारांचा संताप अनावर – गडकरींना केली ही तातडीची मागणी!

    Chandrapur MP demands road repair potholes

    Chandrapur MP demands road repair potholes : चंद्रपूर: खासदार प्रतिभा सुरेश धानोरकर यांनी आज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. चंद्रपूर महामार्गावर खड्ड्यांमुळे होणारे अपघात आणि त्यामुळे होणारी जीवितहानी थांबवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

    रक्तरंजित चंद्रपूर, लहान भावाने मोठ्या भावावर झाडली गोळी

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या निवेदनात चंद्रपूर महामार्गावरील गंभीर परिस्थितीकडे केंद्रीय मंत्र्यांचे लक्ष वेधले. जानाळा फाट्याजवळ खड्ड्यांमुळे झालेल्या दुर्दैवी अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आणि त्याला मागून येणाऱ्या ट्रकने चिरडले, तर चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील साखरवाही फाट्याजवळ रस्त्याच्या खराब स्थितीमुळे भरधाव वेगाने येणाऱ्या कारच्या धडकेत पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना त्यांनी नमूद केली. याव्यतिरिक्त, बामणी-राजुरा महामार्गावरील वर्धा नदीच्या पुलाजवळ एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचाही मृत्यू झाला आहे. या घटना आपल्या विभागाच्या घोर निष्काळजीपणाची आणि बेफिकीर कार्यपद्धतीची भयावह परिणाम दर्शवितात असे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी म्हटले आहे. Chandrapur pothole road safety demand action

    वारंवार तक्रारी पण परिस्थिती जैसे थे

    चंद्रपूर महामार्गावरील खड्ड्यांची समस्या नवी नाही, या संदर्भात वारंवार तक्रारी करूनही परिस्थिती “जैसे थे” असल्याचे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी निदर्शनास आणून दिले. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून , ही केवळ प्रशासकीय चूक नसून, नागरिकांच्या जीविताच्या सुरक्षेशी केलेला गंभीर खेळ आहे, असेही त्या म्हणाल्या.

    याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली. या अपघातांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कठोर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करावी. तसेच, चंद्रपूर महामार्गावरील सर्व खड्डे आणि खराब रस्त्यांची युद्धपातळीवर दुरुस्ती करावी आणि भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना त्वरित लागू कराव्यात अशी मागणी त्यांनी केली. Chandrapur potholes accidents government negligence

    याव्यतिरिक्त, अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना तातडीने आणि पुरेशी आर्थिक मदत देऊन त्यांना न्याय मिळवून द्यावा. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी, रस्त्यांच्या दुरुस्ती आणि देखभालीच्या प्रक्रियेवर कठोर आणि नियमित देखरेख ठेवण्यासाठी एक पारदर्शक व्यवस्था तातडीने स्थापित करावी असेही त्यांनी सुचवले.

    चंद्रपूर महामार्गावर खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांवर अंकुश लावण्यासाठी तातडीने उपाययोजना करून दोषींवर नियमानुसार कारवाई करण्याची विनंती खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना केली.

  • new skill development courses in ITI Maharashtra । महाराष्ट्रातील ITI मध्ये नवा क्रांतीकारी बदल – जाणून घ्या टॉप 5 अभ्यासक्रम!

    new skill development courses in ITI Maharashtra

    new skill development courses in ITI Maharashtra : मुंबई, दि. ३० जुलै (News३४) : केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या प्रशिक्षण महासंचालक यांनी राज्यातील ७० शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आय.टी.आय.) नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता दिली आहे. तसेच चेंबूर येथे शासकीय उच्चस्तरीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्थापनेसाठी मान्यता देण्यात आली आहे. काळानुरूप बदलत्या अभ्यासक्रमामुळे रोजगाराच्या संधीमध्ये वाढ होवून यामुळे महाराष्ट्रातील आय.टी.आय मध्ये क्रांती घडणार आहे, असे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले. upcoming ITI courses 2025 Maharashtra

    रेल्वे स्थानकावर प्रवाश्यांची लूट, खासदार धानोरकरांचा संताप

    महाराष्ट्रातील ७० शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये सोलर टेक्निशियन (इलेक्ट्रिक), ईव्ही मेकॅनिक (इलेक्ट्रिक व्हेईकल) हे नवीन अभ्यासक्रम  शिकविण्यात येणार आहेत. पर्यावरण संवर्धनावर आधारित योजना राबविण्यार राज्य शासनाचा भर असून राज्यात सौर ऊर्जाशी निगडीत तंत्रज्ञानांची व सोलर टेक्निशियन तसेच मेकॅनिक इलेक्ट्रिक व्हेईकलची गरज लक्षात घेवून या क्षेत्रातील टेक्निशियन मागणी वाढणार आहे. त्यानुषंगाने दोन नवीन अभ्यासक्रमाची मागणी व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाने केंद्रीय कौशल्य  विकास आणि उद्योजकता विभागाच्या प्रशिक्षण महासंचालक  यांच्याकडे केली आहे. Maharashtra skill development new initiatives

    राज्यातील ७० औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये नवा अभ्यासक्रम

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य विकास विभाग नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर आणि मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या सूचना व सल्ल्याने औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये काळानुरूप अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. सध्या राज्यातील ७० औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये हा अभ्यासक्रम शिकविण्यात येणार आहे. ज्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रमांची मागणी करतील त्यांना मंजूरी देण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल, असेही मंत्री श्री.लोढा (Minister Mangal Prabhat Lodha) यांनी सांगितले.

    केंद्रीय कौशल्य  विकास आणि उद्योजकता विभागाच्या प्रशिक्षण महासंचालक यांनी  अनसूचित जातीतील व नवबौध्द घटकातील प्रशिक्षणार्थ्यींचे सामाजिक सक्षमीकरण व उन्नतीसाठी चेंबूर  येथे शासकीय उच्चस्तरीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्थापनेसाठी मान्यता देण्यात दिली आहे.  या संस्थेत सन २०२५-२६ साठी रेफ्रिजरेशन ॲण्ड एअर कंडिशनिंग टेक्निशीयन, इलेक्ट्रिशियन, वायरमन, आय. ओ. टी. टेक्निशियन (स्मार्ट सिटी), इलेक्ट्रीक मेकॅनिक हे अभ्यासक्रम शिकविले जाणार आहेत.

    मंत्री श्री.लोढा म्हणाले की, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना काळानुरूप शिक्षण देवून जास्तीत जास्त  कुशल मनुष्यबळ तयार करणे  हा कौशल्य विकास विभागाचा उद्देश आहे. आय.टी.आय हा एक उच्च कौशल्य गुणवत्ता ब्रँड म्हणून प्रस्थापित करण्यासाठी खाजगी औद्योगिक आस्थापनांच्या सहाय्याने राज्यातील ३६ जिल्हास्तरीय आद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये दर्जावाढ करण्यात येत आहे. औद्योगिक आस्थापनाच्या सहायाने प्रशिक्षण व प्रशिक्षण सुविधा वृध्दींगत करणे, राज्यात दरवर्षी अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अनुषंगाने कौशल्य अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत.

    आय.टी.आय मध्ये नविन कौशल्य आधारित अभ्यासक्रम सुरू करण्यावर भर देण्यात येत आहे. उद्योग जगताला आवश्यक असे अधिक मागणीचे अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत. तंत्रप्रदर्शन व युवा शक्ती करिअर मार्गदर्शन शिबीरांच्या माध्यमातून अधिक कुशल मनुष्यबळ निर्माण करून रोजगाराच्या संधी अधिकाधिक निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे, असेही  मंत्री श्री.लोढा यांनी सांगितले.

    मंत्री लोढा यांच्या या नव्या निर्णयामुळे राज्यातील आयटीआय धारकांसाठी रोजगाराचे नवे दालन उघडणार हे नक्कीच आहे. कारण ईव्ही वाहन मेकॅनिक व सोलर मेकॅनिक यांची कमतरता आजही मोठ्या प्रमाणात भासत आहे. या नव्या अभ्यासक्रमामुळे आयटीआय क्षेत्रात नवी कर्णाती घडेल हे नक्कीच.

  • Pratibha Dhanorkar vs railway food policy । 🧾 फक्त ४ प्रकरणांवर दंड? धानोरकर म्हणतात – शेकडो प्रवासी लुटले जातात रोज!

    Pratibha Dhanorkar vs railway food policy

    Pratibha Dhanorkar vs railway food policy : चंद्रपूर: बल्लारशाह रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थांची छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री होत असल्याचा मुद्दा खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभेत उपस्थित केला. यावर रेल्वे मंत्रालयाने दिलेले उत्तर प्रवाशांची दिशाभूल करणारे आणि वास्तवापासून दूर असल्याचे खासदार धानोरकर यांनी म्हटले आहे. त्यांनी या गंभीर समस्येकडे अधिक गांभीर्याने पाहण्याचे आवाहन सरकारला केले आहे. overpricing of food at Ballarshah railway station

    चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने केली इरई धरणातील पाण्याच्या पातळीची पाहणी

    खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रश्नांना उत्तर देताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Railway Minister Ashwini Vaishnav) यांनी सांगितले की, रेल्वे स्थानकांवर मंजूर दरानुसार उच्च दर्जाचे आणि आरोग्यदायी अन्न उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. जास्त किंमत आकारल्याच्या 4 प्रकरणांमध्ये 35,500 रुपयांचा दंड आकारण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच, FSSAI मंजूर वस्तू विकल्या जात असून, नियमित तपासणी केली जात असल्याचेही मंत्र्यांनी सांगितले.

    रेल्वे मंत्र्याचे कागदी घोडे

    मंत्र्यांच्या या उत्तरावर तीव्र आक्षेप नोंदवताना खासदार धानोरकर म्हणाल्या की, “रेल्वे मंत्रालय केवळ कागदी घोडे नाचवत आहे.” फक्त 4 प्रकरणांवर कारवाई करणे ही ‘हिमनगाची फक्त एक टीप’ आहे, प्रत्यक्षात शेकडो प्रवाशांना दररोज वाढीव दराने खाद्यपदार्थ खरेदी करावे लागतात. ‘नियमित आणि आकस्मिक तपासणी’ केवळ कागदावरच असून, ‘रेलमदद’ सारख्या तक्रार यंत्रणा कुचकामी असल्याचे त्यांनी म्हटले. बिलिंग, डिजिटल पेमेंट आणि आरपीएफ मोहिम हे केवळ दिखाव्याचे उपाय असून, प्रवाशांना अजूनही शुद्ध आणि परवडणारे भोजन मिळत नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केवळ दंडात्मक कारवाई पुरेशी नसून, प्रभावी अंमलबजावणी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. प्रवाशांच्या आरोग्याशी आणि हक्काशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. या गंभीर आरोपांवर रेल्वे मंत्रालय कोणती पुढील पावले उचलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

  • Water level of Irai Dam । इरई धरणातील पाण्याची पातळी वाढली, प्रशासनाने केली पाहणी

    Water level of Irai Dam

    Water level of Irai Dam : चंद्रपूर, दि. 30 : गत आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली.  तसेच इरई धरणाच्या पाणी पातळीमध्ये सुध्दा वाढ झाली असून  इरई धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे चंद्रपूर शहरातील नदीलगत असलेल्या वस्तीला पुराच्या पाण्याचा तडाखा बसतो. त्यामुळे प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, तहसीलदार विजय पवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सलीम शेख यांनी इरई धरणाच्या पाणी पातळीची पाहणी केली.

    दारू पिणाऱ्यांनो सावधान, तुमच्या पोटात दुसऱ्या राज्याची दारू

    चंद्रपूर जिल्ह्याला 24 जुलै रोजी ऑरेंज आणि 25 व 26 जुलै रोजी रेड अलर्ट होता. त्याअनुषंगाने जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती.  यावेळी इरई धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली. सध्या पाणी पातळी ही 206.35 मीटर एवढी आहे. जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत ही पाणी पातळी 206.08 मीटर एवढी नियंत्रणात ठेवणे आवश्यक असते. धरणाची पाणी पातळी ही एस.ओ.पी. नुसार मेंटन ठेवावी तसेच एक तांत्रिक अधिकारी त्या ठिकाणी नियुक्त करावा, जेणेकरून त्यांच्या ऑपरेटिंग प्रोसिजरमध्ये किंवा धरणाच्या पातळीतील नोंदी अचूक असाव्यात. कोणत्याही निष्काळजीपणाचा फटका नदीकाठावरील वस्त्यांना होऊ नये, अशा सुचना प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. व्यवहारे यांनी दिल्या. Irai Dam water level today Chandrapur

    Somayya institute of technology

    धरणाचे पाणी पुन्हा सोडणार

    त्या अनुषंगाने 28 जुलै पासून धरणाचे दोन दरवाजे 0.25 मीटर ने उघडून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात येईल किंवा पाण्याचा विसर्ग थांबण्यात येईल, अशी माहिती धरण व्यवस्थापन अधिकारी श्री. राजूरकर यांनी दिली. यावेळी जलसंपदा विभागाचे विजय यादव, नायब तहसीलदार राजू धांडे आदी उपस्थित होते

  • chital hit by speeding vehicle । चितळाला भरधाव गाडीची धडक!

    chital hit by speeding vehicle

    chital hit by speeding vehicle : जुनोना, [२९ जुलै, २०२५]: जुनोना गावाजवळच्या मार्गावर भरधाव वाहनाने धडक दिल्याने एका चितळाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी उघडकीस आली. ही घटना रविवारी (दि. २७) रात्रीच्या सुमारास घडली असावी, जेव्हा चितळ रस्ता ओलांडत होते.

    चंद्रपुरातील जेष्ठ पत्रकार कर्मवीर पुरस्काराचे ठरले मानकरी

    या घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी मेश्राम, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन पोडसेलवार, तसेच दिनेश खाटे आणि किरण बावस्कर हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीची पाहणी केली.

    चितळावर अंत्यसंस्कार

    मृत चितळाचे शवविच्छेदन वनविकास महामंडळाच्या बांबू डेपोमध्ये करण्यात आले. त्यानंतर, त्याच परिसरात चितळावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

    या घटनेमुळे वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महामार्गांवरून भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे अनेकदा वन्यजीव अपघातांना बळी पडत आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी रस्त्यावरून जाताना अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

  • karmaveer award for senior journalists । वरोरा-बल्लारपूरचे पत्रकार ठरले कर्मवीर पुरस्काराचे मानकरी

    karmaveer award for senior journalists

    karmaveer award for senior journalists : चंद्रपूर – चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघ चंद्रपूरच्या वतीने शुक्रवार 01 ऑगस्ट 2025 ला सकाळी 11 वाजता पत्रकार दिन व कर्मवीर पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

    या निर्णयामुळे शासकीय कर्मचाऱ्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात

    १ ऑगस्ट रोजी होणार सन्मान

    वरोरा नाका पत्रकार संघाचे कार्यालय येथे आयोजित सोहळ्यात वरोरा येथील जेष्ठ पत्रकार श्याम ठेंगडी व बल्लारपूर येथील जेष्ठ पत्रकार मंगल जीवने यांना कर्मवीर पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

    यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह,उ‌द्घाटक व मार्गदर्शक म्हणून दैनिक नवराष्ट्रचे वृत्त संपादक डॉ.प्रा.गणेश खवसे व प्रमुख अतिथी म्हणून सिडीसीसी बँक
    चंद्रपूरचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांची उपस्थिती राहणार आहे.कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाने केले आहे.

  • Maharashtra Government Social Media Circular । 🛑 “शासकीय कर्मचाऱ्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात?”, खासदार धानोरकर आक्रमक!

    Maharashtra Government Social Media Circular

    Maharashtra Government Social Media Circular : चंद्रपूर : महाराष्ट्र शासनाच्या २८ जुलै २०२५ रोजीच्या सोशल मीडिया वापरासंदर्भातील परिपत्रकामुळे नवा वादंग निर्माण झाला आहे. हे ‘जुलमी’ परिपत्रक तात्काळ रद्द करावे, अशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. हे परिपत्रक शासकीय कर्मचाऱ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर थेट गदा आणणारे असून, लोकशाही मूल्यांच्या विरोधात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. freedom of speech for government employees maharashtra

    चंद्रपुरातील या मार्गाची दयनीय अवस्था

    खासदार धानोरकर यांनी यातील ‘प्रतिकूल टीका करू नये’ किंवा ‘स्वयं-प्रशंसा होणार नाही’ यांसारख्या अटी अत्यंत जाचक असल्याचे म्हटले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांवर अनावश्यक दबाव येईल आणि त्यांची सर्जनशीलता मारली जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. गोपनीय माहितीचा प्रसार रोखणे आवश्यक असले तरी, त्याचा अर्थ अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेणे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. “हे केवळ एक परिपत्रक नसून, संविधानाने दिलेल्या अधिकारांवर गदा आणण्याचा प्रकार आहे,” असे नमूद करत, कर्मचाऱ्यांच्या घटनात्मक अधिकारांसाठी आपण लढा देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. maharashtra social media rules for government employees

    परिपत्रक रद्द करा

    महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९७९’ च्या आधारावर हे परिपत्रक काढले आहे. गोपनीय माहितीचा प्रसार, खोटी माहिती पसरवणे आणि राजकीय,शासकीय धोरणांवर प्रतिकूल अभिप्राय व्यक्त करण्याच्या गैरवापरावर नियंत्रण ठेवणे हा यामागील उद्देश आहे. यात प्रतिकूल टीका टाळणे, वैयक्तिक व कार्यालयीन सोशल मीडिया खाते स्वतंत्र ठेवणे, बंदी घातलेल्या ॲप्सचा वापर न करणे आणि गोपनीय दस्तऐवज शेअर न करणे अशा अनेक अटींचा समावेश आहे. या सूचनांचा भंग केल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असेही नमूद आहे.

    Somayya institute of technology

    खासदार धानोरकरांनी हे परिपत्रक तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून शासकीय कर्मचाऱ्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहील आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण होईल. या मागणीवर राज्य सरकारची भूमिका काय राहते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.