Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • Chandrapur Amma Chowk controversy । अम्मा चौक वाद: पुरातत्त्व विभागात काँग्रेसची तक्रार!

    Chandrapur Amma Chowk controversy

    Chandrapur Amma Chowk controversy : चंद्रपूर ४ ऑगस्ट (News३४) | शहर पोलीस स्टेशन व सात मजली इमारतीच्या मधोमध असलेल्या जागेवर चंद्रपूर महानगरपालिकेने कोणतीही पूर्वपरवानगी न घेता अम्मा चौक स्मारकाचे बांधकाम सुरू होते.  या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी पुरातत्त्व विभागाकडे लेखी निवेदन सादर करीत परवानगी देणाऱ्या महानगरपालिकेची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

    अम्मा चौक वर राजकारण करू नका

    गांधी चौक परिसराची ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेता, येथे भारतीय पुरातत्त्व विभागाच्या सूचनेनुसार कोणतेही काम करता येत नाही, असे असताना देखील केवळ आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्रींच्या नावे स्मारक उभारण्याचा प्रकार सुरू होता. हे काम १९५८ च्या भारतीय पुरातत्त्व अधिनियमाचे उल्लंघन असून, तातडीने हे बांधकाम थांबवावे व चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. तसेच, याठिकाणी भारतीय पुरातत्त्व विभागाची अधिसूचना लावण्यात यावी, अशी मागणी रितेश तिवारी यांनी केली आहे. archaeology department Amma Chowk complaint

    हा पक्षपाती निर्णय

     चंद्रपूरमधील अनेक स्वातंत्र्यसैनिक, समाजसेवक, माजी लोकप्रतिनिधींनी मोठे योगदान दिले आहे, मात्र त्यांना कधीही स्मारक वा गौरव मिळाला नाही. मात्र टोपल्या विकणाऱ्या एका महिलेसाठी स्मारक उभारण्याचा निर्णय हा पक्षपाती आणि चुकीचा असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.


    या संपूर्ण प्रकरणावर महानगरपालिकेने तातडीने खुलासा करावा व या बांधकामाची परवानगी देणाऱ्या महानगरपालिकेवर पुरातत्त्व विभागा कडून कारवाई करावी, अन्यथा काँग्रेस पक्षाकडून जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही तिवारी यांनी दिला आहे.

  • Chandrapur District Collector honored । चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना सुवर्णपदक – संपूर्ण महाराष्ट्रात पहिला क्रमांक!

    Chandrapur District Collector honored

    Chandrapur District Collector honored : चंद्रपूर दि. 3 :”आकांक्षित जिल्हे व तालुके” कार्यक्रमांतर्गत 1 जुलै 2024 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत राबविण्यात आलेल्या संपूर्णता अभियान मधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्या वतीने प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन गौरव करण्यात आला.

    अम्मा चौक वर राजकारण कशाला?

    सहापैकी सहा इंडिकेटर्स पूर्ण

    हा सन्मान नागपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या सभागृहात पार पडलेल्या राज्यस्तरीय सन्मान समारंभात प्रदान करण्यात आला. जिल्हाधिकारी श्री. गौडा यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याने संपूर्णता अभियानातील सहापैकी सहा इंडिकेटर्स पूर्ण केले. विशेष बाब म्हणजे यापैकी तीन इंडिकेटर्स आरोग्य विभागाशी संबंधित असून ते 100 टक्के समृद्ध करण्यात आले होते. Chandrapur district

    समारंभप्रसंगी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य सचिव राजेश कुमार देवरा, अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे, अप्पर मुख्य सचिव (नियोजन) राजकुमार उपस्थित होते.

    यावेळी जीवती तालुक्यातील यशस्वी सहभागाचे प्रतिनिधीत्व करत गटविकास अधिकारी लक्ष्मीनारायण दोडके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील टेंभे, आकांक्षित तालुका समन्वयक गणेश चिंटकुंटलवार व ‘उमेद’चे  राजेजी दुधे यांनीही सन्मान स्वीकारला. Jiwati Taluka

    या यशामध्ये जिल्हा परिषद चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हास्तरीय समन्वयक यांचे मार्गदर्शन महत्वाचे ठरले. विशेषतः जीवती तालुक्यातील आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिद्द, चिकाटी व समर्पण भावनेने केलेल्या कार्याची दखल घेण्यात आली.

  • Ganesh festival online permission portal । चंद्रपुरातील गणेश मंडळांसाठी खुशखबर!, फक्त एका क्लिकवर मिळणार गणेशोत्सवाच्या सर्व परवानग्या

    Ganesh festival online permission portal

    Ganesh festival online permission portal : चंद्रपूर 3 ऑगस्ट – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे गणेशोत्सवाप्रसंगी सार्वजनीक गणेश मंडळांना लागणाऱ्या विविध परवानग्या या एकाच ठिकाणाहुन मिळाव्या यासाठी एक खिडकी प्रणाली सुरु करण्यात आली असुन मनपा मुख्य इमारत येथे गणेश मंडळांसाठी मदतकक्ष सुद्धा सुरु करण्यात आला आहे.

    महिलांच्या नावावर मिळणार घर, चंद्रपूर मनपाने नागरिकांना अर्ज करण्याचे केले आवाहन

          येत्या 27 ऑगस्टपासुन शहरात दहा दिवस गणेशोत्सव साजरा होणार आहे. गणेश मंडळांना महापालिका व इतर विभागाकडून रीतसर परवानग्या या घ्याव्या लागतात. पोलीस स्टेशन, ट्राफिक पोलीस स्टेशन,सार्वजनिक बांधकाम, अग्निशमन, महावितरण केंद्र, महानगरपालिका इत्यादी विभागाच्या परवानगी या एकच ठिकाणाहुन घेता याव्या यासाठी एक खिडकी प्रणाली चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे सुरु करण्यात आली आहे. how to get permission for Ganesh pandal

    ऑनलाईन करा अर्ज

           गणेश मंडळांना अर्ज करणे सोपे जावे याकरीता महानगरपालिका कार्यालयात एकल खिडकी प्रणाली मदतकक्ष सुद्धा स्थापन करण्यात आला आहे. https://pandal.cmcchandrapur.com या लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करता येऊ शकतो. गणेशोत्सव प्रदुषणमुक्त होण्याच्या दृष्टीने पीओपी मुर्तींना थारा न देता शाडूच्या मुर्तींचाच वापर करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

  • tenant beaten by landlord । रूमच्या वादातून राडा! किरकोळ कारणावरून ८-९ जणांनी केली भाडेकरूला मारहाण

    tenant beaten by landlord

    tenant beaten by landlord : ब्रह्मपुरी – रूम खाली करण्याचा तगादा लावत घर मालकाने भाडेकरूला मारहाण केल्याचा प्रकार गुजरी वार्ड ब्रह्मपुरी मध्ये घडला. या प्रकरणात घर मालकाच्या मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    ३८ वर्षीय सचिन बांबोळे असे भाडेकरूचे नाव आहे. बांबोळे हे १५ एप्रिल पासून वंदना भैसारे यांच्या घरी भाड्याने राहतात, मात्र रूम खाली करण्यासाठी घरमालक वंदना भैसारे यांनी वीज व पाण्याचे पैसे वाढवून मागत होते, मात्र ठरल्याप्रमाणे बांबोळे हे किराया देत होते, पैसे वाढवा अन्यथा रूम खाली करा असा तगादा घर मालकाने लावला. police case against house owner

    अम्मा चौक हवा राजकारण करू नका

    बांबोळे हे घर मालकाच्या त्रासाला कंटाळून १४ जुलै रोजी त्यांच्या विरुद्ध पोलिसात तक्रार दिली. व लवकर मी दुसरी रूम शोधतो असे सांगितले. बांबोळे यांनी दुसऱ्या ठिकाणी रूम चा शोध घेतला मात्र त्यांना रूम मिळाली नाही.

    भाडेकरूला लाथा बुक्क्यांनी मारहाण

    ३१ जुलै रोजी सचिन बांबोळे यांनी रूम खाली करतो असे सांगितले होते मात्र त्यांना दुसरीकडे रूम मिळाली नाही, १ ऑगस्ट रोजी बांबोळे हे रूमवर असताना घर मालकीण वंदना भैसारे, त्यांची मुलगी प्रीती भैसारे व त्यांचे नातेवाईक सह इतर ८ ते ९ तरुणांनी बांबोळे सोबत रूम का खाली केली नाही म्हणून भांडण सुरु केले. काही वेळातच उपस्थित तरुणांनी खिडकीच्या काचा तोडत बांबोळे यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण सुरु केली.

    मारहाणीनंतर सचिन बांबोळे यांनी याबाबत ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असता पोलिसांनी प्रीती मोहन भैसारे यांचेवर कलम ११५ (२), १८९ (२), १९१ (२), ३३३ व ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल केला. पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस करीत आहे.

  • amma chowk naming controversy । 🛑 ‘अम्मा चौक’ व्हायलाच पाहिजे!, कष्टकऱ्यांवर राजकारण कशाला?, कुणी केली मागणी?

    amma chowk naming controversy

    amma chowk naming controversy : चंद्रपूर – फुटपाथवर टोपल्या विकत आपला संसार सावरणाऱ्या आणि अनेक लढ्यांतून फुटपाथ विक्रेत्यांना न्याय मिळवून देणाऱ्या गंगुबाई जोरगेवार अम्मा या संघर्षशील महिलेला सन्मान देण्यासाठी, त्यांच्या व्यवसायाच्या जागेला ‘अम्मा चौक’ नाव देण्याची मागणी फुटपाथ असोसिएशनने केली आहे. मात्र, दुर्दैवाने या प्रस्तावाला काही राजकीय व्यक्तींकडून विरोध करण्यात आला असून, ही भूमिका निंदनीय असल्याचे असोसिएशनने स्पष्ट केले आहे. street vendor memorial proposals

    कायद्याला न जुमानणाऱ्या गुन्हेगाराला पोलिसांनी दाखविला हिसका
    गंगुबाई अम्मा यांनी केवळ स्वतःच्या कुटुंबासाठी नव्हे, तर फुटपाथ विक्रेत्यांसाठीही आपले आयुष्य झिजवले. प्रशासनाकडून फुटपाथ हटाव मोहीम राबवली जात असताना, अम्मा नेहमी या विक्रेत्यांच्या बाजूने उभी राहिल्या. त्यांच्या संघर्षामुळे अनेकांचा रोजगार टिकून राहिला. कष्ट आणि प्रामाणिकता हा मंत्र देत त्यांनी जीवनभर ज्या परिस्थितीत मुलांना घडवले, त्या परिस्थितीला वंदन करण्याची वेळ आज आली आहे.


    आज जोरगेवार कुटुंब व्यवसाय आणि राजकारणात आपला ठसा उमटवत असतानाही, त्या संघर्षाचे मूळ अम्मा यांच्या त्यागात आणि सातत्यात आहे. फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या असंख्य छोट्या विक्रेत्यांसाठी त्या एक प्रेरणास्रोत ठरल्या आहेत. त्यामुळे त्या व्यवसाय करत असलेल्या ठिकाणी ‘अम्मा चौक’ म्हणून ओळख निर्माण व्हावी, अशी भूमिका असोसिएशनने घेतली आहे. Amma Chowk Proposal and Legacy of Gangubai Joragewar


    गांधी चौकाचे नाव बदलण्याचा प्रश्नच येत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. “गांधी चौकापासून 100 मीटर अंतरावर ‘अम्मा चौक’ म्हणून एक प्रेरणादायी स्थळ निर्माण व्हावे, जे भविष्यात कष्टकरींसाठी स्मरणीय ठरेल,” असेही त्यांनी म्हटले आहे.


    अनेक छोटे विक्रेते हलाखीच्या परिस्थितीत व्यवसाय सोडून हमाली वा रोजंदारीच्या नोकऱ्या पत्करू लागले आहेत. ज्या व्यक्तींनी मालक म्हणून व्यवसाय केला, त्या आज नोकरशाही स्वीकारत आहेत. ही परिस्थिती हृदयद्रावक असून, संघर्ष करणार्यांसाठी एक प्रेरणास्थान निर्माण व्हावे, ही मागणी केवळ भावनिकच नव्हे तर सामाजिक गरज असल्याचे फुटपाथ असोसिएशनने म्हटले आहे.

    राजकारण करू नका

    कष्ट, प्रामाणिकता आणि आत्मसन्मानाचे प्रतीक असलेल्या अम्मा यांचे स्मरण म्हणून त्यांच्या स्मृतीला या चौकाच्या रूपाने अजरामर करावे,” असे आवाहन फुटपाथ असोसिएशनच्या वतीने करण्यात आले असुन अम्मा आणि राजकारणाचा संबध नाही. त्या कष्ट आणि सेवेच्या प्रतिक होत्या. त्या नसतांना त्यांच्या स्मारकावरुन राजकारण करणे योग्य नसल्याचेही फुटपाथ असोसिएशनच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

  • Sudhir Mungantiwar road inspection । 📢 चंद्रपूर रस्त्यांवरून संतापले आमदार! ‘काम दर्जेदार नसेल तर ठेकेदार जबाबदार’

    Sudhir Mungantiwar road inspection

    Sudhir Mungantiwar road inspection : चंद्रपूर – सर्वसामान्य नागरिकांना उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी कायम आग्रही असलेले राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी खड्डेमुक्त रस्त्यांसाठी पुढाकार घेतला आहे. तातडीने रस्ते दुरुस्ती करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहे. यातून जनहिताच्या कामांमधील त्यांची तत्परता पुन्हा एकदा बघायला मिळत आहे. pothole accidents in Chandrapur

    चंद्रपूर जिल्ह्यातून हद्दपार गुन्हेगार देशी कट्ट्यासह परतला आणि केली एकाची हत्या

    चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर-बामणी-कोठारी, चंद्रपूर-मुल आणि चंद्रपूर-जाम या प्रमुख मार्गांवरील खड्डे आणि उखडलेले रस्ते, ही गंभीर समस्या बनली आहे. रस्त्यावरील खड्डे म्हणजे थेट मृत्यूचे निमंत्रण ठरत आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही स्थिती अत्यंत चिंताजनक असून संबंधित विभागांना तात्काळ रस्ते दुरुस्तीची कार्यवाही करण्याचे निर्देश आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीत दिले.

    बल्लारपूर-बामणी-कोठारी आणि चंद्रपूर-मुल या दोन्ही रस्त्यांच्या डागडुजी संदर्भात बल्लारपूर येथील शासकीय विश्रामगृहात आ. श्री. मुनगंटीवार यांनी आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या.

    यावेळी वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा,उपविभागीय अधिकारी अजय चरडे, तहसीलदार रेणुका कोकाटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अशोक गाडेगोणे, कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, भाजपा नेते रामपाल सिंग, चंदू मारगोनवार, अक्षय पगारे, उपअभियंता संजोग मेंढे, राज्य महामार्ग विभागाचे उपअभियंता श्री. बोबडे, उपविभागीय अभियंता श्री. अंबुले, श्री. चव्हाण, श्री.राठोड, आदींची उपस्थिती होती.

    ‘रस्त्याच्या डागडुजीसंदर्भात संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही करावी. रस्त्याचे अंदाजपत्रक तयार करून तीन दिवसांत निविदा प्रक्रिया सुरू करण्यात यावी. पावसाचा खंड पडताच रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात यावे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी खड्डे बुजवण्याचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा. खड्ड्यांमुळे अपघातात अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेलेला असून, अशा घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी रस्ते अपघाताच्या बाबतीत कायदा प्रस्थापित करणे आवश्यक आहे. रस्ता उखडलेला असेल किंवा मोठे खड्डे पडले असतील, तर अशा ठिकाणी 100 फुटांपर्यंतचा रस्ता खोदून त्याचे रेडियम पट्ट्यासह संपूर्ण नूतनीकरण करण्यात यावे,’ असे निर्देश आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी या बैठकीत दिले. bad road conditions in Chandrapur

    त्यासोबतच बीओटी मार्गांवर खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात एखाद्याचा मृत्यू झाला, तर अपघातग्रस्त कुटुंबाला 50 लाखांची आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी शासनाकडे करणार असल्याचेही आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले. ‘बामणी येथे सर्व्हिस रोड देण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करण्यात यावी. कोठारीकडे जाणारा रस्ता आणि कोठारी पुलाचे काम तात्काळ हाती घेण्यात यावे. सर्व रस्त्यांचा ‘रफनेस इंडेक्स’ तपासून तो निर्धारित मानकांनुसार आहे की नाही, हे निश्चित करणे आवश्यक आहे. तसेच, मुल रस्त्यावरील अपघातांने किती मृत्यू झाले आहेत, याबाबतची माहिती पोलीस अधीक्षकांकडून घेण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. Chandrapur road repair update

    आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून बल्लारपूर-कोठारी आणि चंद्रपूर-मुल रस्त्याची पाहणी

    आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी बल्लारपूर-कोठारी आणि चंद्रपूर-मुल रस्त्याची पाहणी केली तसेच संबंधित विभागाला तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या. ज्या दर्जेदार रस्ते तयार होणे अपेक्षित आहे, त्या दर्जाचे काम कंत्राटदारांकडून होताना दिसत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. प्रत्येक प्रकल्पासाठी दिला जाणारा ‘डिफेक्ट लायबिलिटी पिरियड’ (DLP) हा पाच वर्षांचा असून, त्या कालावधीत संबंधित रस्त्याचा ‘रफनेस इंडेक्स’ मोटरेबल ठेवणे बंधनकारक आहे. pothole accidents in Chandrapur

    खड्डा लहान असतानाच त्याची तत्काळ दुरुस्ती करावी. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती होणे आवश्यक असून, गरज असल्यास त्यावर कार्पेटिंग करावे. मोठ्या प्रमाणात खड्डे असलेल्या व उखडलेल्या रस्त्यांच्या नूतनीकरणाचे काम कंत्राटदाराकडून तातडीने करून घेण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी संबंधित विभागाला यावेळी दिले.

  • Truck collapses under Belora bridge । दुर्दैवी घटना, तो ५ तास मृत्यूशी लढला

    Truck collapses under Belora bridge

    Truck collapses under Belora bridge : घुग्घुस: आज सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास वर्धा नदीवरील बेलोरा पुलावरून चड्डा ट्रान्सपोर्ट कंपनीचा १८ चाकी ट्रक (क्रमांक MH34 BZ 1402) अनियंत्रित होऊन ७० फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात ट्रक चालक राजा यादव गेल्या पाच तासांपासून केबिनमध्ये अडकून जीवन-मरणाशी झुंज देत होता. त्याला वाचवण्यासाठी शासन-प्रशासन, वेकोली प्रशासन, चड्डा कंपनी आणि स्थानिक नागरिकांनी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले होते.

    चंद्रपुरात बनावट देशी दारूची वाहतूक

    वेकोली प्रशासनाने गॅस कटर, हायड्रा मशीन, ऑक्सिजन मशीन, व्हेंटिलेटर आणि डॉक्टर्ससह सर्व आपत्कालीन सुविधा घटनास्थळी बोलावून चालकाला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर शिरपूर पोलीस आणि घुग्घुस पोलिसांनीही केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला वाचवण्यासाठी पूर्णपणे सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियंत्रण आणि इतर तत्पर सेवा पुरवत सहकार्य केले. Big accident

    अखेर घटनेला पाच तास उलटल्यानंतर, केबिनमध्ये अडकलेल्या घुग्घुस शास्त्रीनगर येथील रहिवासी ट्रक चालक राजा यादव यांनी घुग्घुस वेकोलीच्या राजीव रतन दवाखान्यात अखेरचा श्वास घेतला.

    शिरपूर पोलीस निरीक्षक माधव शिंदे यांच्या प्रयत्नाने वणी नगर परिषदेतून केबिन कापण्यासाठी स्पायडर कटर मशीन मागवण्यात आले होते. तसेच घुग्घुस पोलीस ठाण्याचे एपीआय पाटील यांनीही चालकाला वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले होते.

    ५ तासाच्या मरण यातना

    वेकोलीचे अधिकारी, सुरक्षा कर्मचारी आणि पोलीस दल गेल्या पाच तासांपेक्षा अधिक काळ घटनास्थळी उपस्थित राहून भूक-तहान विसरून उन्हात उभे राहून जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते.

    पण नशिबात लिहिलेल्या मृत्यूला कोण टाळू शकतं! अखेर राजाला वाचवण्याच्या प्रयत्नांतील अपयशामुळे उपस्थित सर्वांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

    कुटुंबीयांनी दवाखान्यात पोहोचून चड्डा ट्रान्सपोर्ट कंपनीकडून नुकसानभरपाईची मागणी केली.

    घुग्घुस पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी चंद्रपूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. पुढील तपास घुग्घुस पोलीस करत आहेत.

  • Aga Khan India climate adaptation initiatives । चंद्रपूरसाठी नवा अध्याय! आगा खान संस्था घेणार हवामान संकटांवर थेट उपाय

    Aga Khan India climate adaptation initiatives

    Aga Khan India climate adaptation initiatives : चंद्रपूर 1 ऑगस्ट –  हवामान बदलामुळे वाढता धोका लक्षात घेता, चंद्रपूर महापालिका आणि आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडिया यामध्ये 3 वर्षांसाठी करार करण्यात आला असुन उष्णता आणि पूर यांसारख्या अडचणींवर उपाय शोधले जातील. टाटा ट्रस्ट्स या उपक्रमासाठी पाठबळ देत असुन यामध्ये स्थानिक लोकांचा सहभाग आणि शाश्वत (टिकाऊ) शहर विकास यावर भर दिला जाईल. Tata Trusts supported community training program

    चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बनावट देशी दारूचा पुरवठा

       या सहकार्यांतर्गत सार्वजनिक ठिकाणी हवामानाशी जुळणारे बदल करणे जसे की अतिउष्णता किंवा अतिवृष्टी यामुळे पुराचा धोका ओळखणे, नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन उपाययोजना करणे इत्यादी अनेक कामे केली जातील.त्याचप्रमाणे 200 हून अधिक गरजू कुटुंबांची घरांमध्ये उष्णता कमी करणाऱ्या उपायांचा अवलंब केला जाईल, जे उन्हाळ्यात घराचे तापमान कमी करण्यात मदत करतील. त्यांच्या परिणामाचा अभ्यास करू इतरांना या उपाययोजना बाबत मार्गदर्शन केले जाईल. heatwave solutions for low-income households


       जमिनीचे तापमान, अधिक वेळ टिकून राहणारी उष्णता,जोखीम मूल्यांकन व इतर नैसर्गिक संकटांचा अभ्यास करून आवश्यक भागांमध्ये उपाय योजले जातील. काही शाळा व महापालिकेच्या इमारतींमध्ये ऊर्जा आणि पाण्याचा कमी वापर करणारी उपकरणे बसवण्यात येऊन हरीत भाग वाढवण्यासाठीही प्रयत्न केले जातील. पूर धोका कमी करण्यासाठी निर्णय घेता यावा म्हणून पाण्याचा प्रवाह, भूजल यावर अभ्यास केला जाईल. पावसाचे पाणी मुरवण्यासाठी पेव्हर ब्लॉक्स, पुनर्भरण विहिरी असे काही प्रयोग देखील राबवले जातील.


       या उपक्रमात नागरिकांना त्यांनी आपत्तीच्या काळात तत्काळ मदत कशी करावी याचे प्रशिक्षण देण्यात येईल, जेणेकरून ते स्वतःचे व इतरांचे संरक्षण करू शकतील.सदर वेळी उपायुक्त संदीप चिद्रावर,डॉ.नयना उत्तरवार,डॉ.अमोल शेळके, आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडिया चे सीईओ प्रेरणा लांगा, प्रकल्पप्रमुख जुबेर शेख, प्रकल्प व्यवस्थापक विक्रांत हरंखेडे, प्रकल्प समन्वयक हर्षल बारंगे तसेच समुदाय प्रेरक अमित नागदिवे, ऋतिक वाळके, शीतल मगार आणि योगिता खामणकर उपस्थित होते. Aga Khan Habitat India Maharashtra partnership

    “चंद्रपूरच्या भौगोलिक रचनेनुसार आणि नागरिकांच्या विविध गरजांनुसार आम्हाला अशा उपायांची गरज आहे जे स्थानिक पातळीवर उपयोगी पडतील व शास्त्रीय माहितीवर आधारित असतील. आगा खान एजन्सी व टाटा ट्रस्ट्स यांच्या सहकार्यामुळे आम्ही उष्णतेच्या लाटांपासून आणि पूर संकटांपासून संरक्षण करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. हा उपक्रम चंद्रपूरला एक सुरक्षित, सर्वसमावेशक आणि हवामानदृष्ट्या मजबूत शहर बनवण्याच्या दिशेने पुढे नेईल.” – आयुक्त विपिन पालीवाल

    “हा करार म्हणजे प्रत्यक्ष काम करणाऱ्या उपायांनी हवामान बदलास सामोरे जाण्याची सुरुवात आहे. आम्ही वैज्ञानिक अभ्यास आणि जमिनीवर राबवता येतील अश्या प्रयोगांद्वारे चंद्रपूरची उष्णता व पूर परिस्थितीच्या अडचणींवर काम करून  चंद्रपूरला हवामान अनुकूल शहरात रूपांतरित करणे आमचे उद्दिष्ट आहे.” – प्रेरणा लांगा, मुख्य कार्यकारी अधिकारी, आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडिया

    आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडियाबद्दल –

    ही संस्था २०१६ साली स्थापन झाली असून ती लोकांना नैसर्गिक आपत्तींपासून सुरक्षित ठेवणे, हवामान बदलाशी जुळवून घेण्यास मदत करणे, आणि चांगल्या जीवनासाठी लागणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम करते. ही संस्था ना नफा तत्वावर कार्य करणारी असुन सध्या ही संस्था महाराष्ट्र, गुजरात आणि तेलंगणामध्ये काम करते.   

  • How to start an M-Sand project । M-Sand युनिट सुरू करण्यासाठी अर्ज कसा कराल? जाणून घ्या प्रत्येक पायरी इथेच!

    How to start an M-Sand project

    How to start an M-Sand project : चंद्रपूर, दि. 1 : कृत्रिम वाळू (एम-सॅण्ड) उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने धोरण जाहीर केले आहे. या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी व नागरिकांसाठी प्रक्रिया सुलभ व्हावी म्हणून महसूल व वनविभागाने परवानगी मिळविण्याची स्पष्ट कार्यपद्धती जाहीर केली आहे.

    ७८ लाख पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी

    एम-सॅण्ड प्रकल्प सुरू कसा करावा (परवानगी घेण्याची प्रक्रिया) :

    कोण अर्ज करू शकतो  : शासन, महामंडळ किंवा खाजगी क्षेत्राकडे उपलब्ध असलेल्या / मंजूर झालेल्या जमिनीवर तसेच पूर्वी मंजूर असलेल्या खाणपट्ट्या मधून इच्छुक व्यक्ती, संस्था, कंपनी किंवा युनिट मालक अर्ज करू शकतात. अर्जदार अवैध गौण खनिज उत्खनन किंवा वाहतूक प्रकरणात दोषी असल्यास त्यास अर्ज करता येणार नाही.

    अर्ज कसा व कोठे करावा : ‘महाखनिज’ (Mahakhanij) ऑनलाइन संगणक प्रणालीवर जिल्हानिहाय ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

    आवश्यक कागदपत्रे : 7/12 उतारा किंवा जमीन मिळकतीचे कागद (जमीन खाजगी असेल तर), आधारकार्ड व पॅनकार्ड, आवश्यक अर्ज फी ची पावती, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे “Consent to Establish CTE” प्रमाणपत्र, उद्योग आधार नोंदणी अथवा जिल्हा उद्योग केंद्राचे नोंदणी प्रमाणपत्र, व्यापारी परवाना (महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन कायदा 2013, नियम 71 अन्वये), प्रकल्प स्थळी व परिसरातील वापरासाठी संबंधित प्राधिकरणाची मंजूरी किंवा ना-हरकत प्रमाणपत्र.

    अशी आहे प्रक्रिया

    अर्ज केल्यानंतर जिल्हाधिकारी व संबंधित विभागांकडून प्रस्तावाची छाननी होईल. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर राज्य शासनाची अंतिम योग्य किंवा अयोग्यतेची मान्यता मिळेल. शासनमान्यता मिळाल्यानंतर सर्व परवानग्या (CTE, व्यापारपरवाना, इ.) पूर्ण झाल्या असेल, तर 6 महिन्यांच्या आत प्रत्यक्ष एम-सॅण्ड युनिट सुरू करणे बंधनकारक आहे. Mahakhanij online system step by step

    आवश्यक बाबी : जिल्हाधिकारी हे जिल्ह्यातील नोडल अधिकारी असून, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सर्व प्रक्रिया पार पडेल. जिल्ह्यातील पहिल्या 50 प्रकल्पांना ‘महाखनिज ‘प्रणालीवर अर्ज सादर करून महसूल व उद्योग विभागाच्या सवलती लागू करू शकतात. सर्व प्रकारची मंजुरी व परवानग्या प्राप्त झाल्यानंतरच एम-सॅण्ड युनिट कार्यान्वित करता येईल. सुरुवातीला Consent to Operate’ परवानगी घ्यावी लागेल,  असे जिल्हा खनीकर्म अधिकारी रोहन ठवरे यांनी कळविले आहे.

  • GST exemption on eye care devices in India । 🏛️ 78 लाख पेन्शनधारकांसोबत डोळ्यांच्या उपकरणांवरील जीएसटी हटवण्याची मागणी!

    GST exemption on eye care devices in India

    खासदार प्रतिभा धानोरकरसह शिष्टमंडळाची केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट

    GST exemption on eye care devices in India : चंद्रपूर : सार्वजनिक आरोग्याची निकड आणि देशातील कोट्यवधी नागरिकांची गरज लक्षात घेऊन दृष्टी-बचत करणाऱ्या डोळ्यांच्या उपकरणांवरील जीएसटी आणि सीमाशुल्क माफ करण्याची शिफारस केली आहे. तसेच  सहकारी आणि खाजगी क्षेत्रातील  निवृत्त झालेल्या सुमारे ७८ लाख पेन्शनधारकांच्या मागण्यांची दखल घेण्याची विनंती खासदार प्रतिभा धानोरकर सह शिष्टमंडळाची केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन केली आहे.  EPS 95 pensioners demand 2025 update

    महामार्गावरील जीवघेणे खड्ड्याबाबत खासदार धानोरकर यांचं नितीन गडकरी यांना निवेदन

    याच मागणीला पाठिंबा देत, खासदार प्रतिभा धानोरकर यासह खासदार डॉ. शिवाजी काळगे, खासदार डॉ. शोभा बचाव, खासदार प्रा. वर्षा गायकवाड, खासदार डॉ. कल्याण काळे, खासदार बळवंत वानखेडे यांच्यासह अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. 

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी त्यांच्या पत्रात नमूद केले आहे की, ‘ऑल-इंडिया ऑप्थल्मोलॉजिकल सोसायटी’ (AIOS) ने या उपकरणांवरील कर पुन्हा लागू केल्यामुळे त्यांच्या किमतीत मोठी वाढ झाली असून, त्यामुळे गरीब आणि गरजू रुग्णांना डोळ्यांची योग्य काळजी घेणे अवघड झाले आहे. देशात करोडो लोकांना दृष्यदोष किंवा अंधत्वाचा त्रास होत आहे, ज्यापैकी बहुतांश लोक आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आहेत.

    मोफत नेत्रसेवा पुरवण्यात अडचणी

    या उपकरणांवरील ७.५-१०% सीमाशुल्क आणि १२% जीएसटीमुळे आवश्यक उपचारांचा खर्च वाढला आहे. याचा थेट परिणाम धर्मादाय आणि सार्वजनिक आरोग्य संस्थांच्या कार्यावर होत असून, त्यांना अनुदानित किंवा मोफत नेत्रसेवा पुरवण्यात अडचणी येत आहेत.

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की, भारत सरकारने यापूर्वी ‘नोटिफिकेशन ६९/९३-CE’ अंतर्गत या उपकरणांना सूट दिली होती. ही सूट पुन्हा लागू केल्यास ‘राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम’ आणि ‘व्हिजन २०३०’  यांसारख्या राष्ट्रीय उपक्रमांना बळ मिळेल.

    तसेच यावेळी  ‘ईपीएस अंतर्गत १८६ सार्वजनिक, सहकारी आणि खाजगी क्षेत्रातील  निवृत्त झालेल्या सुमारे ७८ लाख पेन्शनधारकांच्या मागण्यांची दखल घेण्याची विनंती करण्यात आली आहे. या पेन्शनधारकांना सन्मानपूर्वक जीवन जगता यावे यासाठी त्यांच्या मागण्यांचा तातडीने विचार करण्याची विनंती शिष्टमंडळाने केली.