rising theft cases in Chandrapur city
rising theft cases in Chandrapur city : चंद्रपूर – शहरात काही दिवसांपासून चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहे, यामुळे पोलिसांच्या रात्र गस्तीवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. चोरी करणारे आरोपी हे घरी कुणी नसल्याची संधी साधत हात साफ करीत आहे. शहरातील नगिनाबाग सिस्टर कॉलोनी व बाबुपेठ भागात उघडकीस आले आहे. घरात कुणी नसल्याचे बघून चोरांनी रोख व सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. सदरची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. chandrapur night patrol police failure
चंद्रपुरातील विकास खड्ड्याच्या रूपात बाहेर
गन्नुरवार चौक स्थित बाळू खनके यांच्या घरी भाड्याने राहणाऱ्या लता मनोहर पोटे ह्या कुटुंबासहित बाहेर गावी गेल्या होत्या, २६ जुलै च्या मध्यरात्री ३ जण दुचाकी वाहनाने पोटे यांच्या घराचे गेट ओलांडत आत प्रवेश करीत घरातील कपाटात असलेली रोख व सोन्याचे दागिने लंपास करून नेले. हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याबाबत चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्यात आली असून चंद्रपूर पोलीस घटनेचा पुढील तपास करीत आहे.

रात्र गस्त वाढवा
दुसऱ्या घटनेत शहरातील स्वावलंबी नगर सिस्टर कॉलोनी मध्ये राहणाऱ्या शीतल राजू इटनकर या कुटुंबासहित २२ जुलै रोजी बाहेरगावी गेल्या होत्या या संधीचा फायदा घेत २२ जुलै च्या रात्रीचं अज्ञात चोरटयांनी इटनकर यांच्या घरी प्रवेश करीत सोन्याची पोत व चांदीचा प्याला सहित दुचाकी वाहन लांबवीले. दुसऱ्या दिवशी शेजाऱ्यांनी इटनकर यांना तुमच्या घरी चोरी झाली असे मोबाईलद्वारे कळविले. house burglary during vacation
इटनकर कुटुंब बाहेर गावावरून परतले असता याबाबत रामनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदविली असता दुचाकी सहित एकूण ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी गेला असल्याची तक्रार देण्यात आली. रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत अज्ञात आरोपीचा शोध घेत आहे. शहरात चोरांचा धुमाकूळ वाढला असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा शहरात चोर मचाए शोर होणार हे नक्कीचं.
Leave a Reply