Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • भारत मातेला वाचविण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुढे यावे – नाना पटोले

    News34

    चंद्रपूर : स्वातंत्र्याची लढाई काँग्रेस कार्यकर्ते लढले आहे,आता भारत मातेला वाचविण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्याला लढावं लागेल. देशातील लोकशाही वाचविण्यासाठीची ही लढाई आहे, आणि काँग्रेस कार्यकर्त्याची जास्त जबाबदारी आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

    चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात ते सोमवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत जनसंवाद यात्रेत बोलत होते.

    आनंदवन चौकातून सकाळी सहा वाजता ही पदयात्रा निघाली. पदयात्रेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार अभिजित वंजारी, आमदार सुधाकर अडबाले, काँग्रेस पक्षाचे चंद्रपूर जिल्हा निरीक्षक मुजीब पठाण, भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, जनसंवाद यात्रेचे नागपूर विभाग समन्वयक नाना गावंडे, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमसकर, चंद्रपूर शहर अध्यक्ष रामू तिवारी, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, माजी महापौर संगीता अमृतकर, कामगार नेते केके सिंग, विनोदजी अहिरकर, तानाजी सावंत, संजय महाकाळकर, माजी सभापती दिनेश चोखारे, पत्रकार बाळ कुळकर्णी, चंद्रपूर शहर महीला अध्यक्षा चंदाताई वैरागडे,प्रशांत भारती आदींसह शेकडो काँग्रेस पदाधिकारी आणि शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला.

    पदयात्रा रेल्वे स्टेशन रोड, डॉक्टर जाजू हॉस्पिटल, सद्भावना चौक, डाॅ.आंबेडकर चौक, मेन रोड वरोरा, मिलन चौक येथून पुढे शगुन हाॅल येथे समारोप झाला.

    यावेळी नानाभाऊ पटोले यांनी भाषणात केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारने जनतेच्या मुलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार यासारख्या समस्यांचा सामना जनतेला करावा लागत आहे.

    पटोले म्हणाले की, काँग्रेस पक्ष जनतेच्या प्रश्नांवर लढणार आहे. पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज आहे.

    यावेळी आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार अभिजित वंजारी, आमदार सुधाकर अडबाले यांनीही मार्गदर्शन केले.

    वरोरा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मिलिंद भोयर, वरोरा शहर अध्यक्ष विलास टिपले, भद्रावती तालुकाध्यक्ष प्रशांत काळे, शहराध्यक्ष सुरज गावंडे, बाजार समितीचे माजी सभापती राजू चिकटे, विशाल बदखल, माजी नगराध्यक्ष गजानन मेश्राम,डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डाॅ. हेमंत खापणे,माजी सभापती छोटुभाई शेख,विधानसभा युवक अध्यक्ष शुभम चिमूरकर ,माजी उपनगराध्यक्ष अनिल झोटिंग, प्रविण काकडे,माजी नगरसेवक राजू महाजन,सन्नी गुप्ता, राहुल देवडे, महिला काँग्रेस अध्यक्ष ऐश्वर्या खामकर, शहराध्यक्ष दिपाली माटे,रत्ना अहिरकर, भद्रावती तालुकाध्यक्ष वर्षा ठाकरे, शहराध्यक्ष सरिता सूर,मनोज दानव,निलेश भालेराव, सुभाष दांदडे,फिरोज पठाण,काँग्रेस पदाधिकारी सुधीर मुळेवार, रवींद्र धोपटे, हरीश जाधव ,चंदू दानव, ईस्तेखां पठाण,सुरेश टेकाम,अमर गोंडाणे, पुरुषोत्तम पावडे, सुनंदा जीवतोडे, धम्मकन्या भालेराव, चेतना शेट्ये,देवानंद मोरे,अनिल चौधरी, पद्माकर कडूकर, मनोहर स्वामी,किशोर डुकरे,उमेश देशमुख, अमोल सेलकर, सलिम पटेल, अरुण बर्डे, सुजीत कष्टी, प्रकाश शेळकी, योगेश खामनकर,गिरीधर कष्टी,दिवाकर निखाडे ,पुरुषोत्तम निखाडे, ग्यानिवंत गेडाम, सारिका धाबेकर, देवानंद मोरे ,रुपेश तेलंग, अनिरुद्ध देठे,मयुर विरूटकर, सुरज बावणे, विलास गावंडे, महादेवाचे आसेकर, पुरुषोत्तम कुडे, गणेश मडावी,गणेश काळे यांच्यासह शेकडो पदाधीकारी सहभागी झाले होते.

  • चंद्रपूर शहरातील रिलायन्स पेट्रोलपंप जवळ अपघात शिक्षिका ठार

    News34

    चंद्रपूर – 4 सप्टेंबर ला सकाळी 10 वाजताच्या सुमारास चंद्रपूर-नागपूर महामार्गावर भरधाव वेगात असलेल्या ट्रक ने दुचाकीला धडक दिली, या धडकेत दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला.

    मृतक 48 वर्षीय अनिता किशोर ठाकरे श्रीकृपा कॉलोनी, जगन्नाथ बाबा नगर चंद्रपूर येथे राहणाऱ्या होत्या, त्या जिल्हा परिषद शाळा लखमापूर येथे शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या.

    4 सप्टेंबर ला सकाळी 10 वाजता शिक्षिका ठाकरे ह्या शाळेत जाण्यासाठी निघाल्या होत्या, चंद्रपूर-नागपूर मार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंप जवळ अचानक भरधाव वेगात येणाऱ्या ट्रक क्रमांक RJ11GC-0824 ने ठाकरे यांच्या दुचाकी वाहन क्रमांक mh34bs4977 ला धडक दिली.

    या धडकेत शिक्षिका ठाकरे यांचा जागीच मृत्यू झाला, धडक दिल्यावर ट्रक चालक वाहन सोडून घटनास्थळावरून पसार झाला.

    सदर घटनेचा पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.

  • चंद्रपूर पोलिसांच्या माणुसकीचे उदाहरण

    News34

    चंद्रपूर – खाकी चं नाव ऐकलं की भल्या-भल्याना घाम फुटतो, मात्र आज पोलिसांचा प्रामाणिकपणा व कर्तव्यावरील संघर्ष काय असतो हे फक्त पोलीस कर्मचाऱ्यांना माहीत असते.

    चंद्रपुरात आज पोलीस कर्तव्यावर काय संघर्ष करतात याचं उदाहरण पुढं आलं आहे, बाबूपेठ ते बल्लारपूर रेल्वे रुळावर अज्ञात इसम रेल्वेतून खाली पडला असावा, आणि त्याचा मृत्यू झाला.

    सदर माहिती रेल्वे कर्मचारी यांनी चंद्रपूर शहर व महाकाली पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक विजय मुक्के यांना दिली, मुक्के आपल्या सोबत पोलीस चमू नेत घटनास्थळी दाखल झाले.

    मृतदेहाची अंगझडती घेतली असता त्याच्या खिशात आधार कार्ड व पॅन कार्ड आढळून आले त्यामध्ये सदर इसमाचे नाव प्रेमलाल बाबूलाल पंचतीलक राहणार सालटेकरी बालाघाट, मध्यप्रदेश असे निष्पन्न झाले.

    पोलिसांनी या घटनेची माहिती मृतक पंचतीलक यांच्या नातेवाईकांना दिली, मृतदेह बाबूपेठ व बल्लारपूर च्या मध्यभागात होता, त्याठिकाणी पोलिसांचे वाहन पोहचू शकले नाही, पोलिसांपुढे मृतदेह पुढे न्यायचा कसा असा प्रश्न उपस्थित झाला.

    मात्र कर्तव्य निष्ठा मनात असली की पोलीस नेहमी चांगले काम करतात पोउपनी विजय मुक्के यांनी मृतदेह पायी नेण्याचे ठरविले, पोलिसांनी मृतदेह नाल्यातून व खडतर भागातून मार्ग काढत तब्बल अडीच किलोमीटर पायी आणला.

    सदर कर्तव्यनिष्ठ कामगिरी पोउपनी विजय मुक्के यांच्या नेतृत्वात संजय धोटे व रेल्वे कर्मचारी व विसापूर गावातील अशोक तुराणकर यांनी केली.

  • Harish Salve, Veteran Indian Lawyer, Ties the Knot for the Third Time

    Harish Salve, one of India’s most renowned lawyers and former Solicitor General, has once again taken the plunge and married for the third time. At the age of 68, Salve recently exchanged vows with Trina in a lavish wedding ceremony held in London. The event was graced by the presence of several high-profile celebrities, including Nita Ambani and Lalit Modi.

    This is not Salve’s first experience with marriage. In 2020, he tied the knot with Caroline Brossard, an artist by profession. However, this union did not stand the test of time. Despite the end of his previous marriage, Salve remains optimistic about love and the possibility of finding happiness once again.

    Notably, Salve’s recent nuptials have also marked a significant spiritual transformation in his life. He has converted to Christianity, embracing a new faith and finding solace in its teachings. This personal journey towards spirituality has undoubtedly played a role in shaping Salve’s perspective on relationships and his decision to embark on a new marital journey with Trina.

    Looking back at Salve’s first marriage, he was legally separated from his former wife, Meenakshi Salve, at the beginning of 2020. The couple shares two daughters, Sakshi and Sania. As Salve begins this new chapter in his life, it is evident that he values love and companionship, seeking happiness and fulfillment despite past challenges.

    The wedding of Harish Salve and Trina in London has captured the attention of many, sparking public curiosity and intrigue. While some may question the decision to marry for the third time, it is important to remember that love knows no boundaries and can manifest itself at any age or stage in life.

  • महाजनकोच्या सहाय्यक अभियंता पदाच्या परीक्षेत चंद्रपूरचा अभिजित राज्यात दुसरा

    News34

    चंद्रपूर –  महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी द्वारा घेण्यात आलेल्या कनिष्ठ अभियंता व सहाय्यक अभियंता परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून या परीक्षेत चंद्रपूरच्या अभिजित बाळकृष्ण धांडे याने दोन्ही पदाची परीक्षा पास होत सहाय्यक अभियंता पदाचे यादीत 180 पैकी 151 गुण घेऊन २ रा तर कनिष्ठ अभियंता पदाचे निवड यादीत 180 पैकी 149 गुण घेऊन ९ वा क्रमांक मिळविला आहे. या दुकानात मिळेल महागड्या वस्तू अगदी स्वस्त दरात

     

    यानिमित्ताने प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष उमाकांत धांडे, किसान काँग्रेसचे शहर अध्यक्ष भालचंद्र दानव, साई सेवा संकल्प समितीचे विनोद गोवारदिपे यांनी त्याचे जुनोना रोड स्थित घरी जाऊन अभिनंदन केले.

    अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आधी बजाज पॉलिटेक्निक चंद्रपूर येथे इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग मध्ये पदविका व त्यानंतर अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी चे शिक्षण घेणारा अभिजित बालपणापासून अभ्यासात हुशार आहे. पदविका परीक्षा देखील त्याने मेरिट मध्ये उत्तीर्ण केली होती. अभिजित चे आई, वडीलांनी खाजगी नोकरी करून मुलांना शिकविले.

  • शहरातील राजकीय पुढाऱ्याच्या थोबाडीत पडली तेव्हा

    News34

    चंद्रपूर – शहरातील वर्दळीच्या ठिकाणी राजकिय पुढाऱ्याच्या थोबाडीत हाणल्याची चर्चा 2 सप्टेंबर पासून शहरात चांगलीच रंगली आहे.

    चंद्रपूर शहरात हाणामारी तुन गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहे, असो जर आपण कुणाच्या फाटक्यात पाय टाकणार नाही तर आपल्या वाटेला कुणी जाणार नाही, मात्र शहरातील या अतिउत्साही राजकीय पुढाऱ्याला नेहमीच चर्चेत राहायची जणू छंद जडला आहे.

    राजकारणात वरचढ असलेल्या पक्षातील पदाधिकारीला शनिवार 2 सप्टेंबर ला चंद्रपूर शहरातील वर्दळीच्या ठिकाणी थोबाडीत खावी लागली, कारण सुद्धा तसेच होते.

    पैश्याचा वाद मागील काही दिवसांपासून सुरू होता, शनिवारी तो वाद पुन्हा उफाळला, पुढच्या व्यक्तीला झोडपायचा विचार त्या पुढाऱ्याने केला, मात्र पुढचा व्यक्ती हा शून्यातून जग निर्माण करणारा होता.

    पुढच्या व्यक्तीने मै झुकेगा नही साला अशी भूमिका घेतली, आणि वाद जास्त वाढला, तू तू मै मै करीत सरळ अंगावर हातवारे सुरू झाले, मग काय पुढाऱ्याला पुष्पा फेम हिरोने चांगलंच धुवून काढले.

    आधी प्रकरण बाचाबाची चे वाटले मात्र प्रत्यक्षदर्शीला विचारणा केल्यावर सदर प्रकरण मारामारी चे निघाले, पुढाऱ्याने मार खाल्ला म्हणून आता शेअर बाजारातील मार्केट मध्ये बदनामी होणार म्हणून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला.

    प्रकरण दाबण्याचा प्रयत्न काही प्रमाणात यशस्वी सुद्धा झाला, मात्र पत्रकारांच्या कानावर माहिती आली की ती सरळ बातमी बनते ही बाब तो पुढारी विसरला.

    राजकारणात पद मिळालं की मी मोठा असा गैरसमज नेहमी असणारा हा पुढारी आपल्या अतिउत्साही स्वभावाने एकदिवस मार खाणार ही कल्पना सर्वाना होती, मात्र तो मार पदावर गेल्यावर खाणार याची कल्पना मात्र कुणालाच नव्हती.

    मार खाल्ल्यावर बदनामी झाली आता बाब शहरात पसरली तर कुणाला काय उत्तर द्यावे लागेल हा विचार करून तो पुढारी आज गप्प बसला असला तरी ज्याने त्याची वरात भर चौकात काढली त्याच्यावर राजकीय वजन वापरून काही उलट करू नये म्हणजे झालं.

  • अमृत योजनेचे काम पूर्ण करा अन्यथा…..आप पार्टीचा इशारा

    News34 Aap Party

    चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील बाबुपेठ प्रभागातील अमृत योजनेचे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी आम आदमी पार्टीने केली आहे. प्रभागातील डॉ. आंबेडकर नगर आणि बाबुपेठ या दोन भागातील नागरिकांना अजूनही पाणीपुरवठा होत नाही. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे.

    आम आदमी पार्टीचे शहर सचिव राजू कुडे यांनी सांगितले की, “बाबुपेठ प्रभागातील अमृत योजनेचे काम 2017 मध्ये सुरू झाले होते. त्यानुसार 2019 पर्यंत काम पूर्ण करावे लागते होते. मात्र, 2023 हे वर्ष संपत असतानाही अद्यापही काम पूर्ण झालेले नाही.

    यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. कंत्राटदाराकडून कामात लापरवाई केली जात आहे. कामाची गुणवत्ताही चांगली नाही. अनेक ठिकाणी खोदकाम करून ठेवले आहे. यामुळे रस्ते खराब झाले आहेत. यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे, असा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.
    यासंदर्भात महानगरपालिकेला निवेदन देण्यात आले.

    यावेळी आम आदमी पार्टीचे नेते सुनील मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, शहर अध्यक्ष योगेश गोखरे, युवा अध्यक्ष संतोष बोपचे, उपाध्यक्ष सुनील सतभय्या तब्बसुम शेख, सुधीर पाटील अनुप तेलतुंबडे, डॉ. देवेंद्र अहेर, जयदेव देवगडे, अजय बाथव, भिमराज बागेसर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

    “आम्ही मनपा प्रशासनाला एक महिन्याचा अल्टिमेटम देत आहोत. जर एक महिन्यात काम पूर्ण झाले नाही तर आम आदमी पार्टीकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल.”
    – राजू कुडे, शहर सचिव

  • चंद्रपूर कांग्रेसच्या जनसंवाद यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

    Chandrapur congress news

    चंद्रपूर – केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारच्या धोरणांचा पदार्फाश करण्यासाठी चंद्रपूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीने रविवारी, ३ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ६ वाजता महाकाली माता मंदिर, चंद्रपूर येथून जनसंवाद यात्रा निघाली. News34

    या यात्रेत चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार सुधाकर अडबाले, चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामु) तिवारी, माजी अध्यक्ष विनायक बांगडे, माजी अध्यक्ष सुभाषसिंग गौर, विनोद दत्तात्रेय, के. के. सिंग, दिनेश चोखारे, माजी नगरसेवक संतोष लहामगे, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, चंद्रपूर ग्रामीण महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर, शहर महिला काँग्रेस अध्यक्ष चंदाताई वैरागडे, माजी महापौर संगीता अमृतकर, प्राचार्य नरेंद्र बोबडे, युवक काँग्रेस अध्यक्ष राजेश अडूर, काँग्रेस नेते महेश मेंढे, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष भालचंद्र दानव, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष प्रशांत दानव, ओबीसी सेलचे शहर अध्यक्ष राहुल चौधरी, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष ताजुद्दीन शेख, विजय नळे, प्रशांत भारती यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. Jan samvad yatra

    या यात्रेत उपस्थित मान्यवरांनी चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकाली देवीचे पुजन केले. त्यानंतर माता महाकाली मंदिर येथून पदयात्रा निघाली. गांधी चौक येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण व अभिवादन करण्यात आले. गांधी चौक येथे सेवादल काँग्रेस चंद्रपूरद्वारा ध्वजारोहण कार्यक्रम झाला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. पुढे शहराच्या प्रमुख मार्गाने ही जनसंवाद यात्रा निघाली. आझाद बगीचा येथे जनसंवाद साधण्यात आला. त्यानंतर पदयात्रा पुन्हा मार्गस्थ झाली. कामगार चौक, नेहरू स्कुल घुटकाला येथे सभेनंतर समारोप झाला. यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुभाषजी धोटे यांनी सांगितले की, चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस पक्षाने जनसंवाद यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेतून पक्षाच्या धोरणांविषयी जनतेला माहिती देण्यात येईल. तसेच, जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील.

    आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सांगितले की, काँग्रेस पक्ष नेहमीच जनतेच्या सोबत आहे. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी पक्षाने कोणतीही कसर सोडणार नाही. आमदार सुधाकर अडबाले म्हणाले की, काँग्रेस पक्ष जनतेचा पक्ष आहे. पक्षाच्या धोरणांमुळे देशात विकास झाला आहे. सध्याच्या मोदी सरकारच्या धोरणाचा विरोध करण्यासाठी ही पदयात्रा आहे.

    या यात्रेच्या माध्यमातून जनतेशी कांग्रेसचा थेट संपर्क – रामू तिवारी

    चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामु) तिवारी यांनीही यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या यात्रेमुळे चंद्रपूरच्या जनतेशी पक्षाचा जवळचा संपर्क निर्माण होईल. आपण सर्वांनी एकत्रित येऊन चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे पुनरुज्जीवन करायचे आहे. यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करायला हवे, असे आवाहन केले.

    या जनसंवाद यात्रेत महिला काँग्रेस, युथ काँग्रेस, एनएसयुआय, ओबीसी विभाग, अनुसूचित विभाग, अल्पसंख्यांक विभाग, इंटक, प्रोफेशनल काँग्रेस, पर्यावरण विभाग व इतर सर्व विभागाचे पदाधिकारी, चंद्रपूर शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

    ५ सप्टेंबरला गांधी चौकात जाहीर सभा

    आजपासून सुरू झालेली ही यात्रा १२ सप्टेंबरपर्यंत राहणार आहे. ५ सप्टेंबरला सकाळी ६ वाजता तुकुम प्रभागातील मातोश्री विद्यालय येथून सुरू होणाऱ्या यात्रेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सहभागी होणार आहेत. यावेळी ते चंद्रपुरातील जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता गांधी चौकात जाहीर सभा होणार आहे. यावेळी काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशनच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केले आहे.

  • चंद्रपूर जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळांने सवलतीच्या दरात मिळेल वीज पण या अटीवर

    News34 ganesh utsav 2023

    चंद्रपूर :- सार्वजनिक गणेश उत्सवमंडळांनी सवलतीच्या माफक वीजदराने तात्पुरती व अधिकृत वीजजोडणी घ्यावी तसेच गणेशोत्सवासाठी वीजसुरक्षेबाबत गांभीर्याने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

     

    तात्पुरत्या वीजजोडणीच्या बिलींगची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वीजमीटरसाठी घेतलेल्या रक्कमेतील उर्वरित रक्कम गणेश मंडळांना त्वरीत परत करण्याचे निर्देश क्षेत्रिय कार्यालयांना देण्यात आलेले आहेत.
    धार्मिक उत्सवांसाठी अधिकृतच वीजपुरवठा घ्यावा आणि त्यायोगे सार्वजनिक सुरक्षेला महत्व द्यावे, यासाठी तात्पुरत्या वीज जोडणीचा वीजदर कमी ठेवण्यात आलेला आहे.

    सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडप किंवा रोषणाई, देखाव्यांसाठी लागणारी वीजयंत्रणा ही अधिकृत वीज कंत्राटदारांकडूनच करून घेण्यात यावी व अर्थिंग चीही खबरदारी घेण्यात यावी. वायरिंगसाठी वापरण्यात येणारे वायर्स हे वीजभारासाठी सक्षम नसल्यास शार्टसर्किटचा धोका निर्माण होतो. याशिवाय सध्या पावसाळी दिवस असल्याने तसेच मंडपासाठी टिनपत्र्यांचा वापर होत असल्याने वायर्स लूज किंवा अनेक ठिकाणी तुटलेले पण टेपने जोडलेले असल्यास वीजपुरवठा खंडित होण्यासह अपघाताची मोठी शक्यता असते. Mahavitran

    गणेशोत्सवात वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे अत्यावश्यक आहे. वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरु केल्यास एकाच न्यूट्रलमूळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहित होते आणि त्यातून जीवघेणे अपघात घडतात.विजेच्या लघुदाब, उच्चदाब वाहिन्या आणि रोहित्रांचा गणेशोत्सवातील आणि मिरवणुकीतील देखाव्यांना स्पर्श होणार नाही, अशा सुरक्षित अंतरावर देखावेतयार करावेत.

    त्यामुळे हजारो भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक गणेश मंडळांनी वीजसुरक्षेबाबत उपाययोजनांमध्येत तडजोड करू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.

    तातडीच्या मदतीसाठी संपर्क करा

    तातडीच्या मदतीची संभाव्य गरज पाहता मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यानी २४ तास सुरु असणारे टोल फ्री क्रमांक१९१२०, १९१२,१८००२१२३४३५ किंवा१८००२३३३४३५ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच चंद्रपूर मंडळातील ग्राहकांनी ७८७५७६११९५ व गडचिरोली मंडळातील ग्राहकांना ७८७५००९३३८ क्रमांकावर मदत मिळेल. याशिवाय संबंधित क्षेत्रातील महावितरणचे अभियंता यांचे मोबाईलक्रमांक नोंदवून ठेवावेत, असेही आवाहन महावितरणने केले आहे.

  • चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी कांग्रेसचे सर्व पदाधिकारी अजित पवार गटात जाणार

    News34 politics

    चंद्रपूर – राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटातून बाहेर पडत अजित पवार यांनी भाजप व शिंदे गटासोबत हातमिळवणी करीत सत्तेत सहभागी झाले, अजित पवार यांच्या निर्णयाने अनेक बडे नेते शरद पवार गटाला रामराम करीत निघून गेले.

    अजित पवार गटाने चंद्रपुर जिल्ह्यात जोरदार मुसंडी मारली असून राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर, चंद्रपूर शहर राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष राजीव कक्कड सहित शहर राष्ट्रवादी कांग्रेसचे पदाधिकारी, चंद्रपूर जिल्ह्यातील 12 तालुक्यातील पदाधिकारी नगरसेवक व कार्यकर्त्यांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

    मागील अनेक वर्षांपासून चंद्रपूर राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात कुजबुज सुरू होती, अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडली व भाजप-सेना सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले, त्यामुळे जिल्ह्यातील समस्यांचे निराकरण होणार तरी कसे याबाबत अनेक पदाधिकारी चिंतेत होते, व मागील अनेक वर्षांपासून चंद्रपूर राष्ट्रवादी कांग्रेस च्या जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे राजेंद्र वैद्य यांच्याकडे असल्याने नव्या नेतृत्वाला संधी मिळत नव्हती म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी कांग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

    यासाठी सर्व पदाधिकारी, तालुकाप्रमुख व कार्यकर्ते अजित पवार गटाच्याया बैठकीसाठी नागपूरला रवाना झाले आहे.

    मोठ्या संख्येतून चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी कांग्रेसचे पदाधिकारी अजित पवार गटात जात असल्याने शरद पवार गटाला हा मोठा हादरा मानला जात आहे, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आता चंद्रपुरातील राष्ट्रवादी कांग्रेसला नवसंजीवनी देणार काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.