Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • कोरपना पोलीस उपनिरीक्षकाची चंद्रपुरात उचलबांगडी

    News34

    Chandrapur police

    चंद्रपूर – कोरपना पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर खेकाडे यांची जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी उचलबांगडी करीत त्यांना रामनगर पोलीस स्टेशनसोबत तात्पुरते संलग्नित करण्यात आले आहे, याबाबत 30 ऑगस्टला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाद्वारे पत्र निघाले आहे.

    सदर पत्रात बदलीचे कारण हे प्रशासकीय नमूद आहे मात्र त्यांचा कोरपना येथील कार्यकाळ वादग्रस्त स्वरूपाचा असल्याची चर्चा कोरपना शहरात रंगली होती.

    कोरपना पोलीस स्टेशनमध्ये खेकाडे हे काही महिन्यांपूर्वी रुजू झाले होते मात्र त्यांना पोलीस अधीक्षकांनी कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी चंद्रपूर येथील रामनगर पोलीस स्टेशनमध्ये संलग्नित केल्याने अनेक चर्चाना उधाण आले आहे.

  • चंद्रपुरातील रोजगार मेळाव्यातून 95 महिला उमेदवारांची निवड

    News34

     

    चंद्रपूर : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडल करिअर सेंटर व सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार पटेल महाविद्यालयात महिलांसाठी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

    या रोजगार मेळाव्यात जय महाराष्ट्र प्लेसमेंट सर्व्हिसेस चंद्रपूर, व्हि-1 क्लिक सोलुशन, स्वातंत्र्य फायनान्स बल्लारपूर, एस.बी.आय. लाइफ इन्शुरन्स, एल.आय.सी. वरोरा, एलिव्हेट फायनान्स लिमि., व्हि.व्हि.आर. फायनान्स आदी कंपन्या सहभागी होत्या. या रोजगार मेळाव्यात 379 महिला उमेदवारांची उपस्थिती होती, त्यापैकी 95 महिला उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.

    याप्रसंगी पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, सुधा पोटदुखे, सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे, अॅड. प्रिया पाटील आदींची उपस्थिती होती.

    पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी म्हणाले, कौशल्याचा वापर रोजगार व स्वयंरोजगार मिळवण्यासाठी करावा, उमेदवारांनी नवउद्योजक बनावे तसेच या ठिकाणी आलेल्या उद्योजकांनी जास्तीत-जास्त उमेदवारांना रोजगाराची संधी द्यावी. यासोबतच महिला उमेदवारांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

    अॅड. प्रिया पाटील म्हणाल्या, स्त्रियांनी चुल व मूल या संकल्पनेत गुंतून न राहता उच्च शिक्षण घेऊन स्वावलंबी बनावे, रोजगार मेळाव्यातून संधीचा लाभ घ्यावा व महिला उद्योजक म्हणून नावारुपास यावे.

    रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे म्हणाले, या रोजगार मेळाव्यात विविध कंपन्या सहभागी झाल्या आहेत. या माध्यमातून उमेदवारांना रोजगाराची संधी चालून आली आहे.

    या संधीचा लाभ घ्यावा तसेच उमेदवारांनी आपल्या कौशल्याचा वापर रोजगार मिळवण्यासाठी करावा व नोकरीसाठी बाहेर जाण्याची मानसिकता ठेवावी असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापिका कविता रायपूरकर तर आभार मुकेश मुजंनकर यांनी मानले.

  • विद्यार्थ्यांनी पोलीस बांधवांसोबत साजरा केला रक्षाबंधन

    News34

     

    चंद्रपूर: भारतीय संस्कृतीत सण, उत्सव यांना अनन्यसाधारण महत्व आहे. सर्वधर्म समभाव, ऐक्य, निरपेक्ष, निस्वार्थ, आपलेपणा जपणारे सण, उत्सव साजरे करून एकनिष्ठ असल्याची जाणीव या माध्यमातून होते.

    रक्षाबंधन हा बहीण भावाच्या प्रेमाचे प्रतीक असणारा सण आहे. या दिवशी बहीण भावला राखी बांधून आपले रक्षण करण्यासाठी साकडे घालते,भाऊ हातातील राखीचा धागा म्हणजे बहिणीचे रक्षण करण्याची जबाबदारीची जाणीव करून देणारा असल्याचे विचार आत्मसात करतो.

    हा उत्सव सगळीकडे आनंदात साजरा होत असला तरी आपल्या सर्वांचे रक्षण करणारे महाराष्ट्र पोलीस दलातील चंद्रपूर पोलिस व वाहतूक शाखेतील पोलीस दादांना विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने पोलीस ठाण्यातील परिसरात जाऊन त्यांना औक्षण करून त्यांना रक्षणाचे बंधन बांधले. तसेच या रक्षाबंधन पर्वाच्या औचीत्याने सर्वसमभाव, आणि संस्कृतीचे जतन करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चंद्रपूर महानगर तर्फे हे अनोखा उपक्रम चंद्रपूर महानगर तसेच जिल्हयातील विविध शाखेत चालविल्या गेला.

    या वेळी अभाविप चंद्रपूर महानगर तर्फे रामनगर पोलीस, तसेच शहर वाहतूक नियंत्रण शाखा येथे हा उपक्रम गुरूवार 31 ऑगस्ट रोजी चालविल्या गेला.
    यावेळी विभाग संयोजक वैदेही मुडपल्लिवार , स्वरा गंपवार, विद्या मेश्राम, जान्हवी भोयर, प्रतीक्षा श्रोती, तनवी, जिल्हा संयोजक पियूष बनकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य शैलेश दिंडेवार, महानगर मंत्री आदित्य गच्केश्र्वर , रोहित खेडेकर, तन्मय बनकर, हर्ष भांदकर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

  • गणेश मंडळांना मिळणार 5 लाखांचं पारितोषिक

    News34

    मुंबई / चंद्रपूर : राज्य शासनाने, 19 सप्टेंबर 2023 पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी 15 सप्टेंबर 2023 पर्यंत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. या गणेश उत्सवाला खरेदी करा, मोबाईल, लॅपटॉप व अनेक महागड्या वस्तू ते सुद्धा माफक दरात फक्त amazon वर

    या स्पर्धेसाठी मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या जिल्ह्यांतून प्रत्येकी 3 व अन्य जिल्ह्यांतून प्रत्येकी एक या प्रमाणे उत्कृष्ट 44 गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यात येईल. या 44 गणेशोत्सव मंडळांमधून राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास पाच लाख रुपयांचे, द्वितीय क्रमांकास अडीच लाख रुपयांचे, तर तृतीय क्रमांकास एक लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. उर्वरित 41 गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 25 हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येईल.

    उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे वेळापत्रक :

    उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गणेश मंडळांना 15 सप्टेंबर 2023 पर्यंत स्पर्धेत अर्ज करता येईल. mahotsav.plda.@gmail.com या ई – मेलवर गणेशमंडळांनी अर्ज करावा. पु. ल. देशपांडे कला अकादमी तर्फे ई-मेलवर प्राप्त अर्ज संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाला 18 सप्टेंबरपर्यंत परीक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येईल. 19 ते 28 सप्टेंबर दरम्यान जिल्हास्तरीय समितीचे सदस्य स्पर्धेत सहभागी गणेशोत्सव मंडळांचे प्रत्यक्ष भेटी देऊन परीक्षण करतील.

    व्हिडिओग्राफी आणि कागदपत्रे तपासून अभिप्रायासह गुणांकन करतील. जिल्हास्तरीय समिती जिल्ह्यातून एका उत्कृष्ट गणेश मंडळाची शिफारस 1 ऑक्टोबरपर्यंत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीला करेल. राज्यस्तरीय समिती राज्यातील उत्कृष्ट 3 गणेश मंडळाची शिफारस अकादमीला करेल. त्यानुसार कला अकादमी विजेत्या मंडळांची घोषणा करेल व 12 ऑक्टोबरला विजेत्या गणेश मंडळांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

    राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या 4 जुलै 2023 रोजीच्या शासन निर्णयात स्पर्धेचा तपशील, स्पर्धा निवडीचे निकष नमूद केले आहेत. तसेच अर्जही उपलब्ध करून देण्यात आला आहे. अर्जाच्या या नमुन्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु. ल. देशपांडे, महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई- मेल 15 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करावा. या स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी सहभाग नोंदवावा, असेही आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केले आहे.

     

  • बल्लारपूर शहरात अपघाताचा थरार नातवासमोर आजीचा मृत्यू

    News34 road accident

    बल्लारपूर – आजी आपल्या नातवाला सोबत घेत पेन्शन घेण्यासाठी दुचाकीवर निघाली होती, मात्र वाटेतच मृत्यूने त्यांना पाठीमागून धडक दिली, या धडकेत आजीचा मृत्यू झाला.

    बल्लारपूर येथील रहिवासी लक्ष्मीबाई बंडेलवार व नातू नरसिंग कोंडा हे बुधवारी दुपारी पेन्शन घेण्यासाठी एमएच 34_8320 क्रमांकाच्या अॅक्टिव्हाने राजुरा येथे जात होते. यादरम्यान दोघेही व्हीटीएस प्लॉटच्या वेलंकी पेट्रोल पंपाजवळ पोहोचले, त्याचवेळी मागून येणाऱ्या एमएच 34 बीजी 9131 क्रमांकाच्या ट्रकने अॅक्टिव्हाला धडक दिली.

     

    त्यामुळे दोघेही रस्त्यावर पडले. दरम्यान नातू नरसिंग कोंडा याने ट्रकचालकाला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रक चालक ट्रकसह पळून गेला. या अपघातात नातू किरकोळ जखमी झाला. दरम्यान, ट्रकने धडक दिल्याने आजी लक्ष्मीबाई बंडेलवार यांचा जागीच मृत्यू झाला.

     

    घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह रुग्णालयात पाठवला. काही वेळातच पोलिसांनी चालकाला अटक करून ट्रक जप्त केला.

  • परिचारिका मृत्यू प्रकरणानंतर जिल्हाधिकारी पोहचले जिल्हा रुग्णालयात

    News34

    चंद्रपूर – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे परिचारिकेच्या झालेल्या मृत्युप्रकरणाची जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गंभीर दखल घेऊन प्रशासनाला चौकशीचे आदेश दिले आहे. तसेच सामान्य रुग्णालयातील उणिवा, त्रृटी आदी बाबींमध्ये जिल्हाधिका-यांनी विशेष लक्ष देण्याच्या सुचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी बुधवारी (दि.30) जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली.

    यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, रुग्णालयात मिळणा-या आरोग्य सेवेबद्दल नागरिकांच्या तक्रारीसाठी लावण्यात आलेली तक्रारपेटी सुस्थितीत असणे आवश्यक आहे व त्याची नागरिकांना माहिती असावी. जिल्हा रुग्णालयातील औषध पुरवठा, साहित्य, उपकरणे, रिक्त जागा आदी बाबीं प्रत्येक महिन्याला शासनाला कळवाव्यात. तसेच त्याची एक प्रत जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून द्यावी. अतिदक्षता कक्ष चांगल्या स्थितीत असावा. देखभाल व दुरुस्ती करीता देण्यात आलेल्या निधीमध्ये अतिदक्षता कक्ष, संरक्षण भिंत, प्रवेशद्वार, पाण्याची टाकी याव्यतिरिक्त इतर बाबींचा समावेश करायचा असल्यास त्वरीत कळवावे.

    रुग्णालयात कोणत्या डॉक्टर्सची ड्यूटी आहे, ते कधी येतात, त्यांच्या येण्या-जाण्याच्या वेळा कोणत्या आहेत, याबाबत रुग्णालय प्रशासनाने अतिशय गांभिर्याने लक्ष द्यावे. यात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. रुग्णाशी निगडीत असलेल्या व अत्यावश्यक बाबी जसे औषध पुरवठा, उपकरणे यांची मागणी त्वरीत करा. रुग्णालयातील सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन त्या-त्या विभागात कशाची आवश्यकता आहे, प्रथम प्राधान्य कोणते, त्याचे बजेट किती याबाबत अहवाल मागवून घ्या. रुग्णालयातील स्टाफ किती वाजता येतो, वेळेवर उपस्थित नसलेल्यांची नोंद घेणे, स्वाक्षरीची पडताळणी करण्यासाठी हस्ताक्षर तज्ञांकडे पाठविणे, बायोमेट्रीक मशीन असल्यास उपस्थितांची नोंद घेणे, अशा सुचनाही त्यांनी केल्या.

    जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, रुग्णालयात औषधी पुरवठा व मागणी, उपकरणे, सर्जिकल साहित्य याचा गत तीन वर्षाचा रेकॉर्ड, त्यासाठी आलेला निधी याबाबत अहवाल सादर करावा. येथे उपलब्ध असलेले सीसीटीव्ही सर्व चालू स्थितीत असणे आवश्यक आहे. आणखी सीसीटीव्ही लागत असल्यास तसा प्रस्ताव सादर करा. डॉक्टरांची येण्या-जाण्याची वेळ नोंद होण्यासाठी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही त्वरित लावा. त्याचा ॲक्सेस उपविभागीय अधिकारी यांना आय.पी.द्वारे द्यावा. इतर विभागापेक्षा नवजात बालक कक्ष, बालरोग विभाग, तेथील आयसीयू हे चांगल्या प्रकारे सुरू असले तरी बालकांची अदलाबदल, बाळ चोरीचे प्रकार घडणार नाही, यासाठी दक्ष रहा. रुग्णालयात रुग्णासोबत कमीतकमी नातेवाईक आत येण्यासाठी सुरक्षा रक्षकांकडून नियोजन करा, असेही निर्देश त्यांनी दिले.

    यावेळी जिल्हाधिका-यांनी टेलिमेडीसीन विभाग, अपघात विभाग, अतिदक्षता विभाग, लहान मुलांसाठी असलेला अतिदक्षता विभाग, ड्रेसिंग रूम, डिलिव्हरी रुम, डायलिसिस युनीट, थॅलेसमिया रुम व बाहृयरुग्ण विभाग आदींची पाहणी केली. याप्रसंगी सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलींद फुलपाटील, बालरोग्य तज्ञ डॉ. मिलींद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, डॉ. प्रशांत उईके, डॉ. मंगेश गुलवाडे, आयएमए चंद्रपूरच्या सचिव डॉ. कल्पना गुलवाडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके, वैद्यकीय अधिक्षक डॉ. निवृत्ती जिवणे आदी उपस्थित होते.

  • चंद्रपूरच्या आमदाराने घेतली मुख्यमंत्री शिंदे यांची भेट

    News34

    चंद्रपूर – विविध मागण्यांना घेऊन होमगार्ड महासंघाच्या वतीने मुंबई येथील आझाद मैदानात आंदोलन सुरु करण्यात आले आहे. दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई मंत्रालय येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत होमगार्ड यांच्या रास्त मागण्या मान्य करण्याची मागणी केली आहे.

    राज्यातील होमगार्ड हे पोलीस दलासोबत खांद्याला खांदा लावून नागरिकांच्या सुरक्षतेसाठी तत्पर असतात. परंतु सद्यास्थितीत त्यांच्यासमोर अनेक आव्हाने असून राज्यातील होमगार्ड यांच्या प्रमुख २० मागण्यांसाठी त्यांनी मुंबई येथील आजाद मैदानात आंदोलन सुरु केले आहे.

    महाराष्ट्र होमगार्ड अॅक्ट 1947 मध्ये सुधारणा अथवा बदल करण्यात यावा, भारत सरकारच्या आदेशानुसार होमगार्ड यांना 365 दिवस नियमित रोजगार उपलब्ध करुन देण्यात यावा, महाराष्ट्र होमगार्ड अॅक्ट 1947 मधील दर 3 वर्षानी होणार्या पुनरनोंदणी पुनर्नियुक्ती प्रणाली पद्धत कायमस्वरूपी बंद करण्यात यावी, महाराष्ट्र होमगार्ड अॅक्ट 1947 मधे बॉम्बे पोलीस अॅक्ट प्रमाणे किंवा प्रादेशिक सेना टि.ए 118 इन्फैंट्री बटालियन या धर्तीवर सुधार करण्यात यावा, मानसेवी कर्मचारी पद आणि वेतनिय कर्मचारी पद असे भेदभाव चे प्रकार नष्ट करून महाराष्ट्र होमगार्ड विभागात होमगार्ड सैनिकांना प्रतिनिधित्वाची समान संधी देण्यात यावी.

    तसेच पोलीस विभाग प्रमाणेच होमगार्ड विभागा करिता स्वतंत्र बजट ची व्यवस्था तसेच प्रतिवर्ष महामाई दरानुसार महागाई भत्ता देण्यात यावा, साप्ताहिक परेड भत्ता, उजळणी प्रशिक्षण भत्ता व तसेच आगामी काळात मध्ये येणारे सर्व प्रशिक्षण भत्ता व त्याचप्रमाणे शासनाचे पैरामिलिट्री फोर्स ला लावून दिलेले 6 महिन्याचे अतिदक्ष प्रशिक्षण शिबीर कर्तव्य भत्ता चे दर मानधनाचा सम प्रमाणानुसार देयक असावेत, इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्य मध्ये देखील 3 वर्षे सेवा देवू केलेले होमगार्ड सैनिकांना पोलीस विभाग, वन विभाग किंवा इत्यादी शासकीय प्रशासकीय विभागात 50% आरक्षण सह भरती निवड प्रक्रियेत वयात आणि उंचीत विशेष सवलत देत सरळ भरतीने नेमणूक देण्यात यावी यासह इतर मागण्यांना घेऊन होमगार्ड महासंघाच्या वतीने मुंबई येथील आजाद मैदानात आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

    दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई मंत्रालय येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत होमगार्ड महासंघाच्या मागण्यांकडे त्यांचे लक्ष वेधले असून या बाबत चर्चा केली आहे. सदर विषय हा राज्यातील ४५ हजार १७१ होमगार्ड यांचा असून ही संख्या मोठी आहे. त्यामुळे त्यांच्या मागण्यांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

    या होमगार्ड यांनी होमगार्ड महासंघाच्या नेतृत्वात आझाद मैदानात सुरु केलेल्या आंदोलनाची आपण दखल घेत त्यांच्या रास्त असलेल्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणीही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना केली आहे.

  • हार्डवेअर च्या दुकानाला भीषण आग चौघांचा मृत्यू

    News34

    Pimpri chinchwad fire

    पुणे/चंद्रपूर – पिंपरी-चिंचवड भागातील चिखली येथील हार्डवेअर दुकानाला पहाटेच्या सुमारास आग लागल्याने अख्ख कुटुंब संपल्याची धक्कादायक घटना बुधवार 30 ऑगस्टला घडली.

    आज पहाटे चिखली येथील सचिन हार्डवेअर ला भीषण आग लागली, ही आग इतकी भीषण होती की हार्डवेअर मध्ये वास्तव्यास असलेले कुटुंबाचा होरपळून मृत्यू झाला.

    मृत्यू झालेल्या मध्ये 48 वर्षीय चिमणाराम बेणाराम चौधरी, 40 वर्षीय नम्रता चिमणराम चौधरी, 15 वर्षीय भावेश चिमणाराम चौधरी व 13 वर्षीय सचिन चिमणाराम चौधरी असे नाव आहे.

    पहाटे 5 वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागली, दुकानाच्या माळावर चौधरी कुटुंब राहत होते, हार्डवेअर दुकानात ऑइल पेंट मोठ्या प्रमाणात असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. पेंटच्या आगीने दुकानात मोठ्या प्रमाणात धूर निघायला लागल्याने चौघांचा गुदमरून मृत्यू झाला, सदर चौधरी कुटुंब हे राजस्थान राज्यातील होते, पुण्यात सचिन हार्डवेअर चे दुकान हे कुटुंब चालवीत होते.

  • राखी बांधायची कधी? जाणून घ्या योग्य वेळ

    News34 raksha bandhan

    चंद्रपूर – आज दिनदर्शिकेत नारळी पौर्णिमा, रक्षा बंधन नमूद आहे मात्र राखी कधी बांधायची हा पेच मुहूर्तामुळे अडकल्याने राखी बांधायची की नाही? हा प्रश्न बहिणीसमोर पडला आहे.

    यंदा 30 व 31 ऑगस्टला रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे, पौर्णिमा तिथी ही दोन दिवस असल्याने 30 ऑगस्ट पासून सकाळी 11 तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 31 ऑगस्टला सकाळी 7.37 पर्यंत असल्याने राखी बांधण्याचे 2 मुहूर्त असणार आहे.

    राखी कधी बांधायची?

     

    30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट या दोन्ही दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. यासोबतच रक्षाबंधनाला पौर्णिमेचा योगायोग देखील आहे, जो खूप खास मानला जातो. 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10.59 वाजल्यापासून पौर्णिमा सुरू होते आणि 31 ऑगस्ट सकाळी 7:05 वाजता पौर्णिमा संपते, त्यामुळे या दरम्यानचा वेळ हा राखी बांधण्यासाठी योग्य आहे.

    परंतु 30 ऑगस्टला रात्री 9.02 वाजेपर्यंत भद्राकाळ असल्याने त्यानंतर रक्षाबंधन साजरं केलं जावू शकतं. 31 ऑगस्ट रोजी सकाळी 7.05 मिनिटांपर्यंत भावाला राखी बांधता येईल. पण बरेच जण मानतात की, बहिणीचं भावावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिवस असतो, त्यामुळे अशा दिवशी मुहूर्ताचा सोस कशाला बाळगायचा. त्यामुळे जे लोक मुहूर्ताची परवा बाळगत नाही, ते 30 ऑगस्टला कोणत्याही वेळी भावाला राखी बांधू शकतात.

  • पितृछत्र हरपलं आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाने दिला मदतीचा हात

    News34

    Shivsena thackeray group

     

    भद्रावती : शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा -भद्रावती विधानसभाप्रमुख तथा स्व.श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट चंद्रपूरचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र शिंदे यांनी ट्रस्टच्या स्व. सिंधूताई सपकाळ शैक्षणिक दत्तक योजनेअंतर्गत तालुक्यातील चंदनखेडा येथील कोरोना संक्रमण कालावधीत पितृछत्र हरपलेल्या तीन भावंडाना मदतीचा हात देत शैक्षणिक कार्यासाठी दत्तक घेतले. या तीघांनाही ट्रस्टद्वारे शैक्षणिक साहित्याचे नुकतेच वितरीण करण्यात आले.

    या प्रसंगी ट्रस्टचे संस्थापक  अध्यक्ष रविंद्र शिंदे, ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष  प्रा .धनराज  आस्वले आणि ट्रस्टच्या  विश्वस्त तथा जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुषमा शिंदे उपस्थित होत्या.
    चंदनखेडा येथील माणिक बागेसर यांचे कोरोना संक्रमण कालावधीत निधन झाले. घरचा कर्ता पुरुष अचानक निघुन गेल्याने माणिक बागेसर यांची पत्नी सुजाता, दोन मुल प्रशिक आणि आरोहण आणि मुलगी आकांशा यांच्या समोर दुःखाचा डोंगर उभा झाला.

    सुजाता बागेसर यांच्या पुढे मुला – मुलींच्या शिक्षणाची समस्या निर्माण झाली. चंदनखेडा येथील युवा सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल हनवते यांच्या मार्फत स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे  चॅरीटेबल ट्रस्ट चंद्रपूरचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र शिंदे यांचा सोबत संपर्क साधण्यात आला. विठ्ठल हनवते यांनी सुजाता बागेसर आणि त्यांच्या तीन मुला – मुलींची शैक्षणिक अडचण ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र शिंदे यांच्या कानावर टाकली.

    रविंद्र शिंदे यांनी तीनही भावंडाना ट्रस्टच्या स्व. सिंधूताई सपकाळ शैक्षणिक दत्तक योजनेअंतर्गत दत्तक घेवून त्यांचा शैक्षणिक कार्याचे दायित्व स्विकारले. या दायित्वानुसार तीघांनाही शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

    प्रशिक हा आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा येथे अकरावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी  आहे, आरोहण हा दहाव्या तर आकांशा ही सातव्या इयत्तेत चंदनखेडा नेहरु विद्यालयात  शिक्षण घेत आहेत.