Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • वरोरा येथील श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी ई- अभ्यासिकेचे लोकार्पण

    News34

     

    चंद्रपूर : शिक्षण हे केवळ पुस्तकी नव्हे तर संस्कारी असावे. आपण समाजाचे कोणीतरी लागतो, या भावनेतून संस्कारी शिक्षण घेऊन ऋण फेडणारा विद्यार्थी या अभ्यासिकेतून घडावा, अशी अपेक्षा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

    वरोरा येथील श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी अभ्यासिकेचे लोकार्पण करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे,भाजपा तालुका अध्यक्ष डॉ भगवान गायकवाड,माजी नगराध्यक्ष एहतेशाम अली,श्रीमती जोगी,वरोरा विधानसभा प्रभारी रमेश राजुरकर,नगरपालिकेचे मुख्याधिकारी गजानन भोयर,अभिजित मोटघरे,सूरज पूनवटकर, बाबासाहेब भागडे,आकाश वानखेडे,अमित गुंडावार,ओम मांडवकर, अमित चवले,सुरेश महाजन,सागर वझे,आकाश भागडे आदी उपस्थित होते.

    श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी ई- अभ्यासिकेचे लोकार्पण झाले असे सुरुवातीला घोषित करून पालकमंत्री श्री मुनगंटीवार म्हणाले, नगरपालिकेने अतिशय चांगले नियोजन करून ही अभ्यासिका उभी केली आहे. रस्ता, पूल या भौतिक सुविधेच्या गोष्टी थोड्या उशिरा तयार झाल्या तरी जास्त फरक पडत नाही, मात्र देशाचे भविष्य घडविणारे विद्यार्थी जेथे तयार होतात, अशा शैक्षणिक सुविधा त्वरित उभ्या करणे आवश्यक आहे. इतर देशात आर्थिक संपन्नता, भौतिक संसाधने आदी गोष्टी मुबलक प्रमाणात असल्या, तरी तेथील जीवन हे सुखी- संपन्नच राहील, याची शाश्वती नाही. मात्र आपला देश, आपला समाज हा कुटुंबवत्सल आहे. हेच संस्कार आपल्याला सुरुवातीपासून मिळाले आहेत. त्यामुळे आजच्या विद्यार्थ्यांना अशा संस्कारी शिक्षणाची गरज आहे. शेवटी देशाच्या गुणसंपन्नतेवरच आनंदाचा इंडेक्स ठरत असतो.

    पुढे पालकमंत्री म्हणाले, चंद्रपूर हा वाघांचा जिल्हा आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांनी शिक्षणात वाघासारखाच पराक्रम करावा. राज्याचा मंत्री व या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून चंद्रपूर, बल्लारशा, पोंभुर्णा येथे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय सुरू करण्यात आले आहे. आपण निर्माण केलेल्या वास्तूमधून प्रशासकीय अधिकारी घडतात, याचा आपल्याला मनापासून आनंद आहे. विद्यार्थ्यांनो, खूप मोठे होऊन या शहराचे तसेच या जिल्ह्याचे नाव रोशन करा, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

    शैक्षणिक सोयी सुविधांना प्राधान्य : आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात जिल्ह्यात एकूण 205 विकास कामे करण्यात आली आहे. जिल्ह्यात शैक्षणिक सोयीसुविधांना विशेष प्राधान्य असून बाबा आमटे अत्याधुनिक अभ्यासिका तयार करण्यात आली आहे.

    बल्लारपूर तयार करण्यात आलेल्या सैनिक शाळेतून भविष्यात देशासाठी लष्करी अधिकारी तयार होतील. बल्लारशा येथे सुषमा स्वराज कौशल्य विकास केंद्र, चंद्रपूर – बल्लारपूर मार्गावर 50 एकर मध्ये 560 कोटी रुपये खर्च करून एस. एन. डी. टी. विद्यापीठाचे उपकेंद्र, चंद्रपुरात गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र, कृषी महाविद्यालय, चंद्रपूर येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अशा नवनवीन गोष्टी पूर्णत्वास येत आहे. एवढेच नाही तर जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी विशेष लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. आज येथे घेतलेलं प्रण शपथ हा केवळ कार्यक्रम नाही, तर आपल्या हातून उत्तोमत्तम कार्य घडावे, त्यासाठी हा संकल्प करण्यात आला आहे, असे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

    यावेळी वरोरा येथील शहीद योगेश डाहूले यांची वीरमाता पार्वताबाई आणि वीरपिता वसंतराव डाहूले यांचा ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तत्पूर्वी अभ्यासिकेच्या परिसरात ना.मुनगंटीवार यांनी वृक्षारोपण करून श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

    प्रास्ताविकात मुख्याधिकारी गजानन भोयर म्हणाले, या ई – अभ्यासिकेसाठी पालकमंत्री यांनी खनिज विकास निधी अंतर्गत 3 कोटी 66 लक्ष रुपये मंजूर केले. या अभ्यासिकेमध्ये 30 संगणक, पेंटिंग कक्ष, प्रतिक्षालय, ग्रंथालय स्टोअर रूम आदी उपलब्ध करून देण्यात आले आहे. कार्यक्रमाचे संचालन प्रा. नरेश खुळे यांनी केले. यावेळी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष माजी नगरसेवक विविध संघटनांचे पदाधिकारी नागरिक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

  • सिध्दबली ईस्पातच्या पूर्व कामगारांना रोजगार व थकीत वेतन तातडीने निर्गमित करा – हंसराज अहीर

    News34

    चंद्रपूऱ- सिध्दबली ईस्पात लिमी. कंपनी, आरसीसीपीएल (परसोडा लाईमस्टोन) विसापूर प्रस्तावीत कोळसा खाण आदी विषयाशी निगडीत विविध प्रश्नांबाबत राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाद्वारे दि. 25 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली.

    राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., अतिरिक्त पोलिस अधिक्षक रिना जनबंधू, पोलिस निरीक्षक पडोली शिवाजी कदम, तहसीलदार विजय पवार, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्नील राठोड, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे बिपीन भंडारे, यु.बी. भडूले, एमआयडीसी चे श्रीकांत जोरावर, गोपाल भिराख, राजु घरोटे, विनोद खेवले, विजय आगरे, अॅड. प्रशांत घरोटे, यांची प्रमुख उपस्थिती होती.

    या बैठकीत सिध्दबली ईस्पात कंपनीमध्ये अन्य मागासवर्गीय तसेच व इतर प्रवर्गातील कार्यरत पूर्व कामगारांना पूर्ववत रोजगार देवून त्यांचे थकीत वेतन तातडीने अदा करण्याची निर्देश हंसराज अहीर यांनी यावेळी दिले. सिध्दबली कंपनी बंद झाल्यापासुन पुर्ववत सुरू झाल्यापर्यंतच्या कालावधीतील अर्ध्या वर्षातील (अडीच वर्ष) वेतन कामगारांना देण्यात यावे अशी सुचना केली.

    या कंपनीमध्ये 4 कामगारांचा अपघातात मृत्यू झाला होता. त्या पिडीत कुटूंबियांना कंपनी अधिनियमानुसार नुकसान भरपाईपोटी आर्थिक साह्य त्वरीत अदा करण्यात यावेत असेही निर्देश दिले.
    आरसीसीपीएल कंपनीद्वारा परसोडा लीज क्षेत्रातील जमिनीचे LARR ॲक्ट 2015 नुसार अधिग्रहण करण्याकरीता नोटीफीकेशन काढण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनास दिले.

    राज्यशासनाचे नोकरीविषयक धोरण 80:20 असतांना या कंपनीमध्ये स्थानिकांना शासनाच्या अनुपातात रोजगार उपलब्ध केला गेलेला नाही. उलट परप्रांतीयांना झुकते माप देवून कंपनीमध्ये प्राधान्य दिले गेले असल्याच्या तक्रारी असुन ही बाब स्पष्ट झाली आहे.
    शासनाच्या 80:20 या धोरणाचे अनुपालन होत आहे किंवा नाही याची स्थापित समितीच्या माध्यमातून सखोल चौकशी करण्याची सुचना राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली.

    तसेच या कंपनीमध्ये अनेक कामगारांचा दुर्घटनेमुळे बळी गेला असल्याने व काही कामगाराचा संशयास्पद मृत्यू झाला असल्याने या सर्व प्रकरणाची गांभिर्याने चैकशी करून या चैकशीचा सविस्तर अहवाल आयोगाकडे निर्धारित अवधीमध्ये सादर करण्याचे निर्देशही हंसराज अहीर यांनी प्रशासनाला दिले. या बैठकीस उत्तम आमडे, मुन्ना कुशवाह, रमेश सोनटक्के, सत्यपाल खेवले, प्रदिप वासाडे, आदींची उपस्थिती होती.

  • कामगार आयुक्तांनी दिले पाणीपुरवठा कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आदेश

    News34

    चंद्रपूर – जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत काम करत असलेल्या 200 पेक्षा जास्त संख्या असलेल्या कामगारांचा किमान वेतनासाठी आणि कामगारांच्या सुरक्षेसाठी असलेल्या लढा अनेक वर्षापासून सुरू आहे.

    पण काही महिन्यापासून डॉ अभिलाषा गावतूरे व भूमिपुत्र कामगार विंग यांनी जातीने लक्ष देत कामगारांच्या समस्या लवकरात लवकर सुटाव्या म्हणून शासनाकडे तसेच सहाय्यक आयुक्त कामगार विभाग यांच्याकडे कामगारांच्या महत्त्वाच्या प्रश्नांचा पाठपुरावा करीत आहेत व त्या कामगारांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करीत आहेत आणि त्याची फलश्रुती म्हणून आज सहाय्यक कामगार आयुक्त, चंद्रपूर तसेच कामगार, ठेकेदार व जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक कामगार भावनात झाली आणि या बैठकीत कामगारांचे थकीत वेतन तीन दिवसाच्या आत देण्यात यावे, कामगारांना किमान वेतन मिळावे, कामगारांचे हजेरीपट बनवावे, तसेच त्यांना ओळखपत्र मिळावें ,काम करताना त्यांच्या सुरक्षिततेची सगळी काळजी घेण्यात यावी तसेच सुरक्षा किट मिळावी या मागण्या सहाय्यक कामगार आयुक्त व व सर्वांनी लावून धरली.

    या बैठकीला भूमिपुत्र ब्रिगेड कामगार विग च्यावतीने राजेंद्रजी फूलझेले तसेच जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे श्रद्धा जयस्वाल सहाय्यक अभियंता , विलास भंडारी शाखा अभियंता , स्नेहा रॉय सहाय्यक अभियंता श्रेणी2 तसेच कंत्राटदार सुनील मोरे अविनाश मरते अंकुश वर्गनटीवार, तृप्ती चुनारकर तसेच ग्रामीण कामगार पाणीपुरवठा योजनेतील सर्व कामगार उपस्थित होते. दिलेल्या आदेशाची पूर्तता लवकरात लवकर करण्यात यावी असे सहाय्यक कामगार आयुक्त कडून बजावण्यात आले .अन्यथा जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यावर व कंत्राटदरांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी ताकीद सहाय्यक आयुक्त यांच्याकडून देण्यात आली.

  • पहिल्यांदाच तयार होणार चंद्रपूर जिल्ह्याचे मराठी गॅझेटिअर

    News34

     

    चंद्रपूर : ‘गॅझेटिअर’ (दर्शनिका) हे कोणत्याही जिल्ह्यासाठी मौल्यवान व संदर्भमुल्य आधारीत अत्यंत उपयुक्त असा ग्रंथ असतो. ब्रिटीश काळात 1909 मध्ये जिल्ह्याच्या गॅझेटिअरची इंग्रजी आवृत्ती प्रकाशित करण्यात आली होती. तर स्वातंत्र्यानंतर 1973 मध्ये याच ग्रंथाची सुधारीत आवृत्ती प्रकाशित झाली. आता मात्र पहिल्यांदाच राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रोत्साहनामुळे व प्रधान सचिव विकास खारगे यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याचे गॅझेटिअर मराठी भाषेत प्रकाशित होणार आहे. सदर गॅझेटिअर अंतिमरीत्या प्रकाशित करण्यापूर्वी नागरिकांच्या अवलोकनार्थ तसेच योग्य सुचना व अभिप्राय नोंदविण्याकरीता जिल्हाधिकारी कार्यालयात एक महिना उपलब्ध असणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी पत्रकार परिषदेत दिली.

    Amazon वर लेटेस्ट मोबाईल खरेदी करण्याची सुवर्णसंधी

    चंद्रपूर जिल्ह्याचे मराठीतील गॅझेटिअर हे दोन खंडात आणि जवळपास 1400 पानांचे राहणार आहे. यात जिल्ह्याचे प्राकृतिक स्वरूप, भुस्वरुप, नद्या, वनसंपदा, स्थळांची भौगोलिक माहिती, लोकांच्या चालीरीती, राजघराण्यांचा इतिहास, आर्थिक व्यवस्था, महसूल प्रशासन, भूगोल, इतिहास, लोकप्रशासन, सिंचन, व्यापार, उद्योग, बँकींग सुविधा, वाहतूक व दळणवळण, प्राचीन अवशेष, ऐतिहासिक वारसा आणि पुरातत्वीय महत्वाची स्थळे आदी तपशील यात अंतर्भूत आहे. विशेष म्हणजे गॅझेटिअर ग्रंथाच्या पारंपरिक मूळ संकल्पनेव्यतिरिक्त जिल्ह्यातील सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात नव्याने झालेल्या संशोधनाचा व त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या बदलांचा सर्वंकष आढावा घेऊन हे गॅझेटिअर तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती गॅझेटिअर मंडळाचे कार्यकारी संपादक व सचिव डॉ. दिलीप बलसेकर यांनी दिली.

    जिल्हाधिकारी कार्यालयात 25 ऑगस्ट ते 25 सप्टेंबर पर्यंत कार्यालयीन दिवस व कार्यालयीन वेळेत सदर गॅझेटिअर नागरिकांच्या अवलोकनार्थ उपलब्ध राहील. गॅझेटिअर पाहून नागरिकांना याबाबत योग्य सुचना व अभिप्राय नोंदवायचा असेल तर रजिस्टरमध्ये तशी नोंद करावी. योग्य अभिप्राय व सुचनांचा सकारात्मक विचार करण्यात येणार आहे.

    पत्रकार परिषदेला जिल्हाधिक-यांसह गॅझेटिअर संपादक मंडळाचे सदस्य अशोक सिंह ठाकूर, कार्यकारी संपादक व सचिव डॉ. दिलीप बलसेकर आणि उपसंपादक प्र.रा. गवळी उपस्थित होते.

     

  • आई मी येतो म्हणत तो घरून निघाला पण….

    News34

    चंद्रपूर – शहरातील महाकाली वार्डात राहणाऱ्या 40 वर्षीय रिना राजपूत यांचा 17 वर्षीय मुलगा अथर्व राजपूत हा 10 ऑगस्टला घरून निघाला मात्र तो आजपावेतो घरी परतला नसल्याने त्याबाबत शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदविण्यात आली आहे.

    10 ऑगस्टला सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास अथर्व हा बागला चौकात जातो असा म्हणून घरून बाहेर पडला, मात्र तो परत आला नाही, अथर्व च्या कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला असता तो कुठेही आढळून न आल्याने 24 ऑगस्टला चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत फिर्याद नोंदविण्यात आली आहे.

    अथर्व चे वर्णन पुढीलप्रमाणे आहे….

    रंग निमगोरा, उंची चार फूट पाच इंच, चेहरा लांबट, अंगात निळ्या रंगाचा टी-शर्ट कळ्या रंगाचा फुल पॅन्ट, असा आहे, अथर्व हा मतिमंद आहे. रिना राजपूत यांच्या रिपोर्ट वरून पो.स्टे. चंद्रपूर शहर येथे अपराध क्रमांक 555/23 आ कलम 363 भादवी गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर मुलाचा आपले परिसरात शोध करून मिळून आल्यास पो.स्टे. चंद्रपूर शहर येथे कळवावे.

    संपर्क क्रमांक पो उप. नी.विजय मुके पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर मोबाईल नंबर 99 23 40 10 65

  • चंद्रपूर जिल्ह्यात 31 ऑगस्टपर्यंत जमावबंदी

    News34

     

    चंद्रपूर : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दि. 16 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2023 पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1) (3) नुसार जमावबंदी आदेश लागू केले आहे.

    या आदेशान्वये संबंधित अधिकारी यांच्या पूर्व परवानगीशिवाय सभा, मोर्चा, उत्सव व मिरवणुका काढता येणार नाही. पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर किंवा चावडीवर जमा होणार नाहीत किंवा कोणतेही कार्यक्रम आयोजित करणार नाहीत.

    जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या व्यक्ती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही ठिकाणी अथवा कोणत्याही व्यक्तीस, शस्त्रे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, रिव्हॉल्व्हर, सुरे, काट्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करता येईल, अशी इतर कोणतीही वस्तू, कोणताही क्षार, द्रव्ये पदार्थ, दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ जवळ बाळगता येणार नाही. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे, व्यक्तीच्या आकृत्या, प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे, तसेच यामुळे सभ्यता आणि नीतिमत्ता यास धोका पोहोचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल असे किंवा आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे, त्याचा जनतेत प्रसार करणे इत्यादीस प्रतिबंध करण्यात आला आहे.

    सदर आदेश 16 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2023 पर्यंत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्राकरीता लागू राहील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद आहे.

     

  • आम आदमी पक्षाच्या आंदोलनासमोर प्रशासन नरमले

    News34

     

    चंद्रपूर : येथील चांदा पब्लिक स्कूलमध्ये गत शैक्षणिक सत्रात दहावीत 84% गुणांसह उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी तनिष्का अनंत बलवीर हिला फी न भरल्याने शाळा सोडल्याचा दाखला देण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे तिच्या पुढील शिक्षणासाठी अडचण निर्माण झाली होती.

    या विरोधात आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार यांनी स्वतःचे कपडे काढत अर्धनग्न आंदोलन शाळेच्या परिसरात सुरू केले . व आप च्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची संख्या वाढत गेली व आंदोलन तीव्र होत रात्री १० वाजे पर्यंत शाळा परिसरात सुरू होते. त्याची दखल तात्काळ जिल्हाधिकारी यांनी घेतली व त्यांनी तात्काळ दुसऱ्या दिवशी सुनावणी करण्याचे आदेश दिले व शिक्षणाधिकारी यांच्याशी झालेल्या बैठकीत पीडित तनिष्का अनंत बलवीर या मुलीला न्याय मिळाला.

    चंद्रपूर येथील चांदा पब्लिकमध्ये ही मुलगी केजी 1 पासून शिकत आहे.अगोदर आई व २०१६ ला तिचे वडील मृत्यू झाली तेव्हा पासून ती काका कडे आहे . शाळेने परिस्थिती बघता फी लागणार नाही आम्ही जबाबदारी घेऊ असे २०१६ मध्ये सांगितले होते पण अचानक १० वी पास होताच शाळेने 70 हजार रुपये शुल्क भरण्याचा हट्ट शाळा प्रशासनाने केला.
    अनाथ विद्यार्थिनी असूनही ७० हजार रुपये शुल्क भरण्याचा शाळेने तगादा लावला होता.

    धक्कादायक म्हणजे, शाळेने शुल्काबाबत कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही. अशा स्थितीत तनिष्का आणि तिच्या पालनकर्ता काकांना हा आर्थिक भार ऐनवेळी सोसावा लागला असता. ती अनाथ असल्याने फी घेणार नाही, असे चांदा पब्लिक शाळा व्यवस्थापनाने सांगितले होते. मात्र, आता दुसऱ्या शाळेत पुढील प्रवेशासाठी तिला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र देण्यास नकार दिला.मुलीने हवालदील होऊन आम आदमी पार्टी कडे न्याय मिळवून देण्याची मागणी केली.

    या विरोधात आम आदमी पार्टीच्या माध्यमातून शाळेत आंदोलन करण्यात आले. यात प्रसार माध्यमांनी विषय जनतेसमोर आणला या आंदोलनात आप पार्टीचे ज्येष्ठ नेते सुनील देवराव मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली.

    आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी शिक्षणाधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधून यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी देखील केली. आम आदमी पक्षाने कठोर भूमिका घेत तनिष्काला न्याय देण्याची मागणी करीत रात्रीपर्यंत आंदोलन सुरू ठेवले होते. त्यानंतर शाळा व्यवस्थापनाने आपला हेका मागे घेत टीसी देण्यास तयारी दर्शविली.

    अनाथ मुलीला न्याय मिळवून दिल्यामुळे सर्व स्तरातून आम आदमी पार्टी चे आभार व्यक्त करन्यात येत आहे यावेळी शहर अध्यक्ष योगेश गोखरे, शहर सचिव राजु कुडे, युवा अध्यक्ष संतोष बोपचे, सुनिल सदभया, सुधीर पाटील,पवन कुमार प्रसाद,संतोष दोरखंडे ,मधुकर साखरकर , ऍड तब्बसुम शेख, भिमराव मेंढे,भिवराज सोनी, रवी पुप्पलवार,ज्योती बाबरे,पवन कुमार प्रसाद, सूरज शाह,सुमित हस्तक,जितेंद्र भाटिया, दिपक बेरशेर्ट्टीवार, सागर कांबळे,अफझल अली तथा ईतर अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

  • ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं निधन

    Seema deo passed away

    News34

    चंद्रपूर – मराठी व हिंदी चित्रपट जगतातील जेष्ठ अभिनेत्री सीमा रमेश देव यांचं वयाच्या 81 व्या वर्षी निधन झालं. त्या दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्या पत्नी होत्या. Seema deo

    सीमा देव या काही वर्षपासून अल्झायमर ने ग्रस्त होत्या, आज गुरुवारी सकाळी त्यांनी मुंबई मधील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला, त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.

    त्यांच्या पश्चात अजिंक्य, अभिनय, सुना नातवंडे असा परिवार आहे.

    [amazon shopping]

    सीमा देव यांच्या पार्थिवावर आज दुपारी 4.30 वाजता शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

    २०१३ मध्ये रमेश देव आणि सीमा देव यांनी लग्नाचा पन्नासावा वाढदिवस साजरा केला होता. गेल्या वर्षी रमेश देव यांचं निधन झालं. त्यानंतर आज सीमा देव यांचं दीर्घ आजाराने निधन झालं.

  • नाना पटोले यांच्या स्वीय सहायकाला अटक?

    News34

    Nana patole personal assistant

    नागपूर – काय म्हणता? कसे आहात? मी कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचा स्वीय सहायक आहे, असे म्हणत एकाने तब्बल 2 वर्षे हॉटेलमध्ये फुकटच्या जेवणावर ताव मारला.

    मात्र हॉटेल चालकाने पैसे मागितल्यावर या तोतया पीए ने चालकांवर चाकूने हल्ला केला त्यानंतर पोलिसांनी या पीए ला अटक केली, चौकशी मध्ये तो नाना पटोले यांचा तोतया पीए असल्याचे निष्पन्न झाले.

    विज्ञानाच्या आधुनिक युगात फसवणुकीचे प्रकारात आजही वाढ होत आहे, नवीन टेक्नॉलॉजी आली असली तरी सुद्धा मानवी बुद्धी समोर ती काहीच नसते.

    असाच एक प्रकार नागपुरात घडला 33 वर्षीय ललित अग्निहोत्री या तोतया पीए ला पोलिसांनी अटक केली आहे.

    अग्निहोत्री यांनी नाना पटोले यांचा पीए असल्याची खोटी बतावणी करीत

    बसस्थानक पुढे असलेले दुर्गाप्रसाद पांडे यांचे हॉटेल अंबिका व ब्रिज इन हॉटेल आहे, अग्निहोत्री यांनी मागील 2 वर्षांपासून पांडे यांना कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचा स्वीय सहायक असल्याची बतावणी करीत फुकटच्या जेवणावर ताव मारत होता, अग्निहोत्री यांची उधारी 50 हजार रुपये झाल्यावर पांडे यांनी पैश्याची मागणी केली मात्र त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

    पांडे यांना अग्निहोत्री वर संशय आला होता, 2 वर्षांपासून अग्निहोत्री यांनी आपल्या मित्रांना सुद्धा पांडे यांच्या हॉटेलमध्ये पार्टी दिली होती, पांडे यांनी पैश्याची विचारणा केली असता दोघात वाद झाला अग्निहोत्री यांनी पांडे वर चाकूने हल्ला केला.

    हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी वाद सोडविला व अग्निहोत्री यांना पोलीस येई पर्यंत पकडून ठेवले, पोलीस पोहचताच चौकशीमध्ये तो तोतया पीए असल्याचे निष्पन्न झाले.

     

  • रेल्वे पूल कोसळला 17 मजुरांचा मृत्यू

    Mizoram incident

    मिझोरम – मिझोरम मध्ये बुधवारी बांधकाम सुरू असलेला रेल्वे पूल कोसळल्याने 17 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. ज्यावेळी हा पूल कोसळला त्यावेळी 35 ते 40 मजूर पुलावर काम करीत होते.

    मिझोरम ची राजधानी आयझोल पासून तब्बल 21 किलोमीटर अंतरावर असलेल्या सैरांग मध्ये सकाळी 10 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.

    बैराबी ते सैरांग ला जोडणाऱ्या कुरुंग नदीवर हा रेल्वे पूल बांधण्याचे काम सुरू होते, त्यावेळी 35 ते 40 मजूर त्या पुलावर काम करीत होते, सध्या प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे.