Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • आरोग्य शिबिराचा हजारो नागरिकांनी घेतला लाभ

    News34

    गुरू गुरनुले

    मूल – शासनाची आरोग्य सेवा पूर्णतः कोलमडली असून तालुक्याच्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय असून देखील अत्यावश्यक डॉक्टर व नर्स, तंत्रज्ञ कर्मचारी यांची भरती होत नसल्याने रुग्णालयात गेलेल्या रुग्णाला व गोरगरीब जनतेला आरोग्य सेवेचा लाभ मिळत नाही.

    उलट रेफर टू चंद्रपूर असेच सांगण्यात येते म्हणून एकाच छताखाली असंख्य रुग्णाला लाभ मिळावे यासाठी मा. दुर्गा मंदिर सेवा समिती मुल व दत्तमेघे शिक्षण संशोधन संस्था संचलित आचार्य विनोबा भावे रुग्णालय सावंगी मेघे यांचे मार्फतिने व तालुका काँग्रेस कमिटीच्या सहकार्याने आणि मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन मुल व सावली केमिस्ट अँड ड्रॅगीस्थ्ठ यांचे मदतीने भव्य मोफत आरोग्य तपासणी, रक्तगट तपासणी मोफत औषध वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले.

    Santosh rawat
    संतोष रावत यांची शिबिरात उपस्थिती

    जनकल्याणकारी सामान्य जनतेच्या दारी या उदात्त हेतूने रूग्णसेवा हिच खरी ईश्वरसेवा आहे,असे मत शिबिर उद्घघाटन प्रसंगी मार्गदर्शन करतांना चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष, माजी जी.प.अध्यक्ष, श्री मॉं दुर्गा मंदिर सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी व्यक्त केले. शिबिरामध्ये जवळपास तीन हजार सातशे च्या वर रूग्णांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला.तसेच त्यांना मोफत औषधी वितरण करण्यात आले.

    शिबिरामध्ये जनरल फिजीशियन,बालरोग तज्ज्ञ, नेत्ररोग,दंतरोग,स्त्री रोग, नाक, कान, घसातज्ज्ञ, अस्थिरोग,मानसोपचार,त्वचारोग आणि सर्जरी तज्ज्ञ उपस्थित होते.यावेळी ब्लड प्रेशर , ईसीजी ,मेमोग्राफी, ब्लड शुगर,सर्व प्रकारच्या रक्त चाचण्या,गर्भवती माता व स्तनदा मातांची तपासणी, लसीकरण,सिकल सेल चाचणी,बाहय रूग्ण सेवा, त्वचा आजार तपासणी इत्यादी सुविधा रूग्णांना देण्यात आल्या.

    शिबिरा मध्ये विधानसभा विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेटटीवार यांनी तयार केलेले फिरते रूग्णालय व कॅन्सर निदान केंद्र रूग्णांच्या सेवेकरिता उपलब्ध करण्यात आले होते.शिबिरास्थळी प्रमुख आयोजक संतोषसिंह रावत शिबिराकडे लक्ष देत होते. शिबिरात शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष बाबासाहेब वासाडे,सचिव अॅड.अनिल वैरागडे यांनी भेट दिली. शिबिराला मूल,सावली तालुक्यातील तसेच परिसरातील जवळपास तीन हजार सातशेच्या वर रूग्णांनी सेवेचा लाभ घेतला. याशिवाय क्यानसर ग्रस्त 126, रक्तगट 180, व असंख्य जनरल आरोग्य तपासणी करण्यासाठी सावंगी मेघे डॉ .अभ्युदय मेघे, डॉ.निखिलेश नाकतोडे, संयोजक मुरलीधर उमाटे, अभिषेक टिकले, डॉ.अजय कौशिक,सचिन ठाकरे, सचिन आगलावे,शिबिर यशस्वी करण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. थेरे यांचे अधिंनस्थ आशा. वर्कर, देवणील नर्सिंग कालेजचे विद्यार्थिनी, उपजिल्हा रुग्णालय, नगर परिषद प्रशासन, स्थानिक जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे सर्व डॉक्टर मंडळी, स्थानिक प्याथालाजिस्ठ, यांनी अथक परिश्रम घेतले.

    शिबिराच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार, संयोजक संजय पडोळे, काँग्रेस तालुका अध्यक्ष गुरु गुरूनूले, माजी सभापती, संचालक घनश्याम येनुरकर, राजू पाटील मारकवार, उपसभापती राजेंद्र कन्नमवार, शहर अध्यक्ष सुनिल शेरकी, राज्य सरचिटणीस गुरूदास चौधरी, संचालक संदिप कारमवार, बंडू गुरनुले, कैलाश चलाख, शांताराम कामडे, महिला अध्यक्ष रुपाली संतोषवार, माजी नगर सेविका ललिता फुलझेले, किशोर घडसे, राहुल मुरकुटे, शहर अध्यक्ष नलिनी आडपवार सचिव शामला बेलसरे, राधिका बुक्कावार, दीपक वाढई,प्रशांत उराडे, सरपंच केमेकर, युवक अध्यक्ष पवन नीलमवार, हिमानी वाकुडकर, धीरज गोहणें,दशरथ वाकुडकर, सुमित आरेकर, श्याम पुठ्ठावार, रुपल रावत, राजेश रावत, लहू कडस्कर, स्वागत वणकर, सुनील मंगर, चतुर मोहुरले, राजेंद्र वाढई, सुरेश फुलझेले, लोमेश नागपुरे, संदीप मोहबे,विष्णू सादमवार,विवेक मुत्यलवार, औषधी वितरण धनंजय चींतावार, किशोर गोगुलवार, टोंगे, उमेश चेपूरवार, नितीन राजा, संतोष रावत मित्र परिवार सदस्य, यांनी मेहनत घेतली. यांचेसह तालुका,शहर,ग्रामिण कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी,प्रमुख कार्यकर्ते तसेच तालुका महिला कॉग्रेंस कमेटीच्या पदाधिकारी दुर्गा मंदिर समिती सदस्यांनी व योग नृत्य परिवार सदस्यांनी, कार्यकर्तींनी अथक परिश्रम घेतले.

  • संविधानाची अंमलबजावणी करणाऱ्यांना संसदेत पाठवा – ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे

    News34

     

    चंद्रपूर : दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या नावाने अभ्यासिका सुरू करण्यात आली. निश्चितच हा अभिनंदनीय उपक्रम आहे. या अभ्यासिकेमुळे अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याची सुविधा होणार आहे. अभ्यासिका ही संविधान वाचन करणारे केंद्र आहे. मागील काही वर्षांत संविधान धोक्यात आल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संविधान वाचवायचे असेल, तर संविधानाची अंमलबजावणी करणारे संसेदत पाठवावे लागेल, असे प्रतिपादन दिल्ली येथील ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांनी केले.

    शहरातील भिवापूर वॉर्डात जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गणपर्व चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून दिवंगत खासदार बाळू धानोरकर अभ्यासिकेची निर्मिती करण्यात आली आहे. या अभ्यासिकेचा उद्घाटन सोहळा शनिवारी (ता. १९) दुपारी ४ वाजता स्थानिक भिवापूर वॅार्डातील साई मंदिरात पार पडला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.

    अध्यक्षस्थानी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, उद्घाटक म्हणून आमदार प्रतिभा धानोरकर, तर प्रमुख अतिथी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा आमदार सुभाष धोटे, आमदार किशोर जोरगेवार, आमदार सुधाकर अडबाले, माजी आमदार देवराव भांडेकर, भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, शिवसेनेचे (उबाठा) जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे, लोकजागृती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध वनकर यांची उपस्थिती असणार आहे.

    संसदेत देशभरातील अनेक खासदार येतात. यातील अनेक खासदारांशी माझा जवळचा संबंध आला आहे. बहुतांश खासदार आपल्या क्षेत्रातील प्रश्नसुद्धा उपस्थित करीत नाही. आपल्या मतदार संघाचा विकास व्हावा, रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या, उद्योग उभारले जावे, अशी अपेक्षा ठेवून काम करणारे खासदार बोटावर मोजता येईल एवढे असतात. त्यात चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचा अग्रक्रमाने समावेश होतो. पहिल्यांदा निवडून आलेल्या बाळू धानोरकर यांना आपल्या क्षेत्रासाठी झटताना मी स्वता जवळून बघितले असल्याच्या अनेक आठवणी वानखेडे यांनी यावेळी सांगितल्या.

    विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी, युपीएससी, एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विदर्भातील विद्यार्थ्यांचा टक्का खूप कमी होता. त्यात पश्चिम महाराष्ट्र आघाडीवर होता. मात्र, मागील काही वर्षांत विदर्भाची टक्केवारी वाढली आहे. त्यासाठी अशाप्रकारच्या अभ्यासिका कारणीभूत ठरल्या आहेत. खासदार बाळू धानोरकर यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या अभ्यासिकेमुळे भिवापूर प्रभागातील बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे सांगितले.

    आमदार प्रतिभा धानोरकर यांनी, खासदार बाळू धानोरकर यांचे सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय असे काम आहे. प्रत्येक घरातील मुलगा-मुलगी शिकली पाहिजे, असे ते नेहमी म्हणायचे. आपल्या लोकसभा क्षेत्रात अभ्यासिका सुरू करण्याचे त्यांचे स्वप्न होते. हाच विषय गोपाल अमृतकर, गोविल मेहरकुरे यांनी खासदार साहेबांसमोर ठेवला. त्यानंतर जागा बघण्याचे ठरले. मात्र, नियतीला मान्य नव्हते. आणि खासदार साहेब आपल्यातून निघून गेले. मात्र, आज या अभ्यासिकेच्या माध्यमातून त्यांच्या स्वप्नपूर्तीची मुहूर्तमेढ रोवल्या जात असल्याचे सांगितले.

    आमदार किशोर जोरगेवार यांनी, चंद्रपूर विधानसभा मतदार संघात अभ्यासिका माझ्या माध्यमातून सुरू करण्यात येत आहेत. यासुद्धा अभ्यासिकेला आता पुस्तके उपलब्ध करून दिले आहेत. भविष्यात २५ लाख रुपयांचा निधीसुद्धा उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.

    आमदार सुधाकर अडबाले यांनी, चंद्रपूर शहरात आणि जिल्ह्यातील मोठ्या शहरांमध्ये अभ्यासिका सुरू आहेत. परंतु, डिजिटल अभ्यासिकांची संख्या कमी आहे. त्यामुळे भविष्यात ही अभ्यासिका डिजिटल करण्यासाठी मदत करणार असल्याचे सांगितले. प्रास्ताविक गोपाल अमृतकर यांनी केले. संचालन आरती दाचेवार यांनी, तर आभार गोविल मेहरकुरे यांनी मानले. कार्यक्रमाला शहरातील गणमान्य नागरिक, विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

    कोटकरांचे सभागृह अन् अमृतकर, मेहरकुरेंचा पुढाकार

    चंद्रपूर शहरातील अभ्यासिकामध्ये भिवापूर वॉर्डातील विद्यार्थीसुद्धा स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी जातात. मात्र, येथील विद्यार्थ्यांना वॉर्डातच अभ्यासिकेची सोय उपलब्ध करून देण्याचा विचार गोविल मेहरकुरे यांच्या मनात आला. त्यानंतर मेहरकुरे यांनी हा प्रस्ताव गोपाल अमृतकर, अशोक कोटकर यांच्याकडे ठेवला. विद्यार्थी हिताचा विषय असल्याने कोटकर यांनी सभागृह उपलब्ध करून देण्याचे मान्य केले. यानंतर अमृतकर, मेहरकुरे यांनी अवघ्या १५ दिवसांत शहरातील काही दानशुरांच्या मदतीने अभ्यासिका उभी केली. यामुळे या त्रिमूर्तींचे वॉर्डातील नागरिकांकडून अभिनंदन केले जात आहे.

  • चंद्रपूर जिल्हा मनसेचा चौकशी समितीला घेराव

    News34

    चंद्रपूर – जिल्ह्यातील शासकीय महाविद्यालय रुग्णालयात कार्यरत असलेल्या परिचारिकेचा कर्तव्य बजावत असताना झालेल्या मृत्यूने शासकीय रुग्णालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. अतिशय महत्वपूर्ण असणाऱ्या आरोग्य व्यवस्थेत डॉक्टर उपलब्ध नसल्याने व उपचाराअभावी मृत्यू झाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रोष व्यक्त करीत, सदर प्रकरणाची चौकशी सुरु असलेल्या समितीच्या बैठीकित प्रवेश करीत उपस्थित समितीला पदावर बसण्याचा नैतिक अधिकार नसून पदाचे राजीनामे देण्याची मागणी यावेळी केली. व बाहेरील स्वतंत्र उच्चस्तरीय समिती गठीत करून चौकशी करण्याची मागणी यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी केली.

    या घटनेमुळे सामान्य नागरिकांनि या सरकारवर व व्यवस्थेवर विश्वास ठेवावा तरी कसा, असा प्रश्न आता सामान्याना पडला आहे. या मृत्यूस सर्वस्वी जवाबदार डॉक्टर आहेत असा आरोप तेथील सर्व परिचरिकेंनी करत काम बंद आंदोलन केले. यावरून तेथे काम करणाऱ्यांकडे डॉक्टर दुर्लक्ष करत आहेत तर सामान्य नागरिकांचा उपचार वाऱ्यावर असल्याचे सिद्ध होते.

    यावेळी मनसे तर्फे वर्षभरा आधी दिलेल्या निवेदनात औषध बाहेरून विकत घ्यावे लागते, घाणीचे साम्राज्य, रुग्णालयात सोनोग्राफी सारख्या अतिशय महत्वाच्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध राहत नाही त्यामुळे रुग्णांना एक दोन महिन्याची सोनोग्राफीची तारीख देण्यात येते यावर तक्रार केली होती परंतु तेही परिस्थिती जैसे थे असल्याचे यावेळी चौकशी समितीच्या निदर्शनात आणून देण्यात आले. तसेच सीआर्म ऑर्थो मशीन बंद आहे, येथील कार्यरत डॉक्टर्स स्वतः रुग्णालयात उपस्थित न राहता मेडिकल इंटर्न कडून रुग्णांची तपासणी करत असल्याने एखादी अनुचित घटना घडू शकते ह्या सर्व विषयांना घेऊन मनसे तर्फे प्रभारी अधिष्ठाता डॉ. उईके यांना घेराव करीत वरील प्रश्न उपस्थित करण्यात आले.

    सदर बैठकीत यंत्रणा पुरविण्यात सरकारचा हलगर्जी पणा, डॉक्टर, परिचारिकाचा अभाव व त्यांची रखडलेली भरती यामुळे हे सर्व प्रकार घडत असल्याचा समितीचा एकंदरीत सुर असल्याने शासनाची आरोग्य विभागा बद्दलची उदासीनता या साठी कारणीभूत असल्याचे चित्र स्पष्ट होते, औषधांचा पुरवठा शासनाकडून होत नाही ही शरमेची बाब आहे असा आरोप यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी केला.

    यावेळी विधी विभागाच्या जिल्हाध्यक्ष मंजुषा लेडांगे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासालवार, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष आनंद बावणे, जिल्हासचिव किशोर मडगुलवार तालुकाअध्यक्ष प्रकाश नागरकर, ग्रामपंचायत सदस्य विवेक धोटे, शहरसंघटक मनोज तांबेकर, मनविसे शहर उपाध्यक्ष सुयोग धणवलकर, राकेश पराडकर, मयूर मदणकर, तुषार येरमे, कार्तिक खंगार, बाळु शेवते व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

  • जंगल सफारीसाठी जगप्रसिद्ध असलेल्या ताडोब्याची 12 कोटींने फसवणूक

    News34

    चंद्रपूर :- वाघाच्या जंगल सफारीसाठी जगप्रसिध्द असलेल्या ताडोबा अभयारण्याला 2 भावंडांनी 12 कोटींचा चुना लावल्याची माहिती उघड झाली आहे, याप्रकरणी विभागीय वन अधिकारी सचिन शिंदे यांनी रामनगर पोलिसात 2 भावंडाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

    देश व जगातील लाखो पर्यटकांना ताडोबा अभयारण्याची भुरळ पडली आहे, जंगल सफारीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक ऑनलाइन बुकिंग करीत जंगल सफारी करतात मात्र आता ह्या ऑनलाइन बुकिंगच्या माध्यमातून ताडोबा प्रशासनाला तब्बल 12 कोटी 15 लाख 50 हजार 831 रुपयांचा 2 भावंडांनी चुना लावल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

    चंद्रपूर वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन चे प्रमुख अभिषेक ठाकूर व रोहित ठाकूर या दोन भावंडावर फसवणुकीचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.

    चंद्रपूर वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन व कार्यकारी संचालक ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प यामध्ये करार झाला होता, ऑनलाइन जंगल सफारी बुकिंग चे काम सदर कंपणीद्वारे केल्या जात होते.
    काही दिवसांपूर्वी ठाकूर भावंडांच्या my tadoba वेबसाईटवर बंदी आणत शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जंगल सफारी होणार असे ताडोबा प्रशासनाने जाहीर केले होते, मात्र ठाकूर भावंडांनी न्यायालयात दाद मागत प्रशासनाच्या निर्णयावर स्टे आणला हे विशेष, सदर प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ट आहे.

    3 वर्षात कंपणीद्वारे तब्बल 22 कोटी 80 लाख 67 हजार 749 रुपये ताडोबा प्रशासनाला देणे होते, त्यामधून ठाकूर भावंडांनी ताडोबा प्रशासनाला 10 कोटी 65 लाख 16 हजार 918 रुपये दिले मात्र उर्वरित 12 कोटी रुपये दिले नाही.

    सर्व्हिस लेवल एग्रीमेंट अंतर्गत ताडोबा व ठाकूर भावंडांमध्ये करार झाला होता मात्र त्यांनी करारनाम्यातील अटी व शर्तीचे उल्लंघन केले होते, ताडोबा प्रशासनाने वर्ष वर्ष 20-2021, 21-2022, 22-2023 व 23-2024 या वर्षाचे ऑडिट केले त्यामध्ये तब्बल 12 कोटी रुपयांची तफावत आढळली, याबाबत दोन्ही भावंडाना उर्वरित रकमेची विचारणा करण्यात आली मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने, सचिन शिंदे यांनी शासकीय रकमेची अपहार केल्या प्रकरणी कलम 420 अंतर्गत दोन्ही भावंडावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

    याबाबत ताडोबा व्याघ्रप्रकल्पाचे कार्यकारी संचालक जितेंद्र रामगावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की मागील 3 वर्षात याबाबत ऑडिट केल्यावर सदर तफावत पुढे आली, त्या रकमेबाबत विचारणा केली असता आम्हाला उडवाउडवीची उत्तरे मिळाली, दोन्ही भावंडांनी मिळून शासनाच्या रकमेचा अपहार केला हे निष्पन्न झाल्याने आम्ही गुन्हा दाखल केला आहे, आता हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वळते होण्याची शक्यता आहे, शासनाचे पैसे परत न मिळाल्यास त्यांची मालमत्ता कायद्यानुसार जप्त करण्यात येईल.

    मागील 3 वर्षात कोट्यवधी रकमेचा अपहार हा ताडोबा प्रशासनातील एकाही अधिकाऱ्यांच्या लक्षात का आला नाही? ताडोबा प्रशासनाची इतकी मोठी यंत्रणा असताना सुद्धा हा अपहार झाला कसा? हे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे.
    विशेष बाब म्हणजे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या गृह जिल्ह्यात इतका मोठा घोळ बाहेर आल्याने ते या प्रकरणावर काय करणार याकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

  • अवैद्य दारू विक्रेत्यांवर त्वरित कारवाई करा

    News34

    गुरू गुरनुले

    मुल – अवैद्य दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याच्या मागणीकरीता, पिपरी दिक्षीत येथील ग्रामस्थांनी आज पोलिस स्टेशनवर धडक दिल्याने, प्रशासनात खळबळ माजली.

    मागील अनेक वर्षापासून तालुक्यात अवैद्य दारू विक्री केली जात असल्यांने, महिलांमद्ये संताप व्यक्त केला जात आहे. या अवैदय दारूमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत असून, लहान मुलेही दारूच्या आहारी जात आहे. यामधे शाळा कॉलेजच्या तरुण पिढीचा समावेश आहे. मूल येथून मोठ्या प्रमाणावर दारू किंग कडून अवैद्य दारू पुरवठा केला जात असून, यामुळे गावात असंतोष निर्माण झाला आहे.

    गावातील शांतता सुव्यवस्था देखील भंग झालेली आहे. अशा दारू विक्रेत्यांवर तात्काळ कारवाई करावी या मागणीकरीता पिप्री दीक्षित येथील गावकर्यांनी आज सरपंचाचे सहीचे निवेदनासह पोलिस स्टेशनवर धडक दिली. अवैद्य दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी महिलांचा एल्गार आणून तहसिलदार मुल यांनाही निवेदन दिले. आवैद्य दारू विक्रेत्यांवर कारवाई झाली नाही तर विष घेवून आत्महत्या करू असा इशारा महिलांनी दिला आहे.

    दरम्यान अवैद्य दारू विक्रीमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाल्यांचा गावकर्यांनी आरोप करीत, एका कुटूंबातील व्यक्तीने घरचे सोने गहाण ठेवून पूर्ण पैसे दारूत उडविले, आता शेती करायलाही पैसे नसल्यांने ही महिला आत्महत्येचा विचार करीत असल्यांचे गावकर्यांनी पत्रकारांशी बोलतांना आपबिती सांगीतली.

  • कृषी क्षेत्रात जिल्हा पायोनियर व्हावा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    News34

    चंद्रपूर : देशाची लोकसंख्या वेगाने वाढत असून या वाढणाऱ्या लोकसंख्येमध्ये नागरिकांचे पोट भरण्याची क्षमता कोणत्याही उद्योगात नसून फक्त कृषी, मत्स्यसंवर्धन व वने या तीन क्षेत्रातच आहे. मत्स्यसंवर्धनात जिल्हा मॉडेल करण्यासाठी प्रयत्न केल्या जात आहे. मत्स्यव्यवसाय वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला असून मिशन जयकिसानच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उत्पादकता वाढावी. कृषी क्षेत्रात जिल्हा पायोनियर व्हावा, यादृष्टीने गतीने कार्य केल्या जात असल्याचे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केले.

    कृषी भवन येथे आयोजित जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, आत्माच्या प्रकल्प संचालक प्रीती हिरळकर, कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, उपविभागीय कृषी अधिकारी नंदकुमार घोडमारे, तालुका कृषी अधिकारी भास्कर गायकवाड, राहुल पावडे, अंजली घोटेकर, राखी कंचर्लावार,डॉ.मंगेश गुलवाडे, नामदेव डाहूले, कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी, जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी बांधव तसेच महिला बचत गटाच्या महिला आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

    पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी आवश्यक पोषणमूल्ये रानभाजीतून मिळत असते. बदलत्या आहाराचा प्रमुख पर्याय म्हणून रानभाज्यांकडे बघण्याची नितांत आवश्यकता आहे. दैनंदिन आहारात रानभाज्यांचा समावेश व्हावा तसेच नव्या पिढीला रानभाज्याची ओळख व्हावी, रानभाज्यांचे आहारातील महत्व पटवून देण्यासाठी रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

    जिल्ह्यात खाद्यपदार्थांच्या परंपरा आहेत. मात्र, हळूहळू पिझ्झा, बर्गर व इतर गोष्टींमुळे ह्या पंरपरा लुप्त व्हायला लागल्या आहेत. एकेकाळी आरोग्य संवर्धनाचे काम आजीच्या बटव्यातील भाजीतून व्हायचे. नवीन पिढीला रानभाज्यांचे आरोग्यासाठी असलेले महत्व व त्यांचे गुणधर्म माहिती नसल्याने जे खाद्य आरोग्यास अपायकारक असून देखील त्यांच्या मोहात पडली असल्याचे ते म्हणाले.

    महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर देशात विश्वगौरव प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात शेतकरी व शेती यामध्ये वेगाने काम होत आहे. जिल्ह्यात दूध उत्पादन वाढविण्यासाठी मदर डेअरीसोबत बैठक घेण्यात येत आहे. शेतकरी आणि शेती सुखी आणि संपन्न करावयाची असल्यास विकेल तेच पिकवावे. शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा अतिशय उत्तम उपयोग करण्याची आवश्यकता आहे. यासाठी जिल्ह्यात सोमनाथ येथे अप्रतिम असे कृषी महाविद्यालय सुरू करण्यात येत असून अजयपूर येथे पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञान देणारे प्रशिक्षण केंद्र उभे राहत आहे.

    पालकमंत्री श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले, मिलेट्सचे (तृणधान्याचे) महत्त्व विश्वगौरव नरेंद्र मोदीजींनी जगाला पटवून दिले. या वर्षात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरा केल्या जात आहे. याचा खरा पायोनियर हा भारत देश आहे.

    शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आहेत. केंद्र सरकार थेट शेतकऱ्यांना 6 हजार रुपये देते तर राज्यातील साधारणतः 1 कोटी 10 लक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात केंद्र सरकारचे 6 हजार रुपये येतात. आता राज्यानेही 6 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय 1 रुपयात पिक विमा देण्यात येत असून एक रुपयात पिक विमा देणारे महाराष्ट्र हे देशातील एकमात्र राज्य असल्याचेही ते म्हणाले.

    शहराची लोकसंख्या ही मोठी आहे. मात्र, या महोत्सवासाठी येणाऱ्यांची संख्या कमी आहे. बदलत्या स्वरूपात रानभाजी महोत्सवाची माहिती, व्हिडिओ किंवा क्युआर कोडच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्य करण्याच्या सूचना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना केल्या. शरीर आणि मनाचे उत्तम आरोग्य घडविणारा पदार्थ म्हणजे रानभाजी. त्यादृष्टीने, कृषी अधिकाऱ्यांनी या रानभाज्यांच्या प्रचारासाठी उत्तम नियोजन करावे. रानभाजीपासून तयार होणाऱ्या पदार्थांच्या स्पर्धा आयोजित कराव्यात. जेणेकरून, बचत गटातील महिलांना व गृहिणींना चविष्ट भाज्या कशा करता येईल ? तसेच रानभाज्यांचा उपयोग कशा पद्धतीने करावा याची माहिती मिळेल. यासाठी नागपूरमधील प्रसिद्ध आहारतज्ञ, मास्टरशेफ यांना रानभाजी महोत्सवात निमंत्रित करावे.

    मिशन जयकिसानच्या माध्यमातून जिल्हा शेतीच्या क्षेत्रात वेगाने पुढे जाण्याच्या दृष्टीने कार्य करण्यात येत आहे. कृषी अधिकाऱ्यांनी कल्पकतेच्या जोरावर मिशन जयकिसानच्या माध्यमातून महिला बचत गटामार्फत उत्पादित वस्तू व विक्री करण्यासाठी विक्री केंद्र, भाजीपाला विक्रीकरीता वातानुकूलित वाहने, कीडरोगावर सल्ला तसेच शेतकऱ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यासाठी सभागृह करण्यासाठी प्रयत्न करावेत. यावेळी पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी रानभाज्यांची सविस्तर माहिती जाणून घेतली व कृषी विभागाने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.

    प्रास्ताविकेत बोलतांना, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार म्हणाले, शासनाने 9 ऑगस्टपासून रानभाजी महोत्सव आयोजित करण्याच्या सूचना दिल्या. त्याअनुषंगाने, या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जीवनात आरोग्य हा महत्त्वाचा विषय आहे. आरोग्य सुदृढ राखण्यासाठी आहारात रानभाज्यांचे महत्त्व आहे.

    शहरी भागातील नागरिकांना या रानभाज्यांची माहिती व्हावी तसेच त्यांच्या आहारात या रानभाज्यांचा समावेश व्हावा व महत्त्व वाढावे यानिमित्ताने 9 ते 15 ऑगस्ट पर्यंतच्या कालावधीत तालुकास्तरावर रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आले असल्याचे ते म्हणाले.

    पालकमंत्र्यांच्या हस्ते रानभाजी माहिती पुस्तिकेचे विमोचन:
    रानात आढळणाऱ्या भाज्या पौष्टिक असून त्यांचे औषधी गुणधर्म आहे. अशा भाज्यांची माहिती व ती बनविण्याची पद्धती पुस्तिकेत संकलित करण्यात आली असून या पुस्तिकेचे विमोचन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.

    पीकस्पर्धा विजेते शेतकरी व प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेतील उद्योजकांचा सत्कार:
    खरीप हंगाम 2022-23 भात पीक स्पर्धेत हेमंत शेंदरे, किशोर हटवादे व किशोर बारेकर या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यासोबतच, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेतील दयानंद तावाडे (राजुरा), बेबीताई सलाम (कोरपना) व शुभांगी मिलमिले (आम्बोरा) यांना सन्मानित करण्यात आले. त्यासोबतच, जिल्हा कृषी महोत्सव आयोजनाकरीता उत्कृष्ट सूचना दिल्याबाबत सय्यद आबिद अली, महेश कोलावार व किशोर उपरे यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

    गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना धनादेश वितरण:
    सोनी लक्ष्मण कुंभरे (चंद्रपूर), बंडू काशिनाथ पिपरे (बल्लारपूर) व मनोहर पांडुरंग खिरटकर (वरोरा) अपघातग्रस्तांच्या वारसदारांना पालकमंत्र्यांच्या हस्ते 2 लक्ष रुपयाचे धनादेश वितरित करण्यात आले.

    विविध स्टॉलला भेट व पाहणी:
    रानभाजी महोत्सवाच्या निमित्याने महिला बचत गटामार्फत विविध प्रकारच्या विक्रीस ठेवण्यात आलेल्या रानभाज्या तसेच पौष्टीक तृणधान्यापासून बनविण्यात आलेले पदार्थाचे स्टॉल कृषी भवन परीसरात लावण्यात आले होते. या स्टॉलला पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भेट देत पाहणी केली.

  • आमदार किशोर जोरगेवार यांच्या समोर झाला अपघात आणि….

    News34

    चंद्रपूर – 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन देशात उत्साहात साजरा करण्यात येतो, मात्र या दिवशी चंद्रपूर – चीचपल्ली मार्गावर दुचाकी वाहनाचा अपघात झाला, ऐनवेळी आमदार किशोर जोरगेवार त्या मार्गाने येत असताना त्यांनी तात्काळ जखमींना कार्यकर्त्यांच्या वाहनात टाकत रुग्णालयात दाखल केले.

    स्वातंत्र्य दिनाचे कार्यक्रम आटोपत आमदार जोरगेवार व यंग चांदा ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते मार्कंडा येथे दर्शनाला गेले होते.

    सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास आमदार किशोर जोरगेवार परत येत असताना चीचपल्ली मार्गावर दुचाकी वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली, नागरिकांची गर्दी बघून आमदार जोरगेवार यांनी आपले वाहन थांबविले व कार्यकर्त्यांना निर्देश देत तात्काळ जखमींना आपल्या वाहनात बसवीत रुग्णालयात नेण्याचे निर्देश दिले.

    मिळालेल्या माहितीनुसार त्या दुचाकी वाहनांवर आजी-आजोबा व 2 नातू प्रवास करीत होते, दुचाकी वाहनावरून नियंत्रण सुटल्याने वाहन सरळ नाल्यात जाऊन कोसळले.
    या अपघातात एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे, जखमींना रुग्णालयात दाखल केल्यावर आमदार किशोर जोरगेवार रुग्णालयात दाखल झाले त्यांनी डॉक्टरांना जखमींच्या उपचाराकडे विशेष लक्ष देण्याची विनंती केली.

    यंग चांदा ब्रिगेडचे पंकज गुप्ता, करणसिंह बैस व राशीद हुसेन यांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले म्हणून त्यांना योग्यवेळी उपचार मिळाला.

    आमदार जोरगेवार यांनी ऐनवेळी जखमी नागरिकांच्या मदतीला धावल्याने त्यांच्या माणुसकीचे दर्शन चंद्रपूर वासीयांना दिसले.

  • News34 सुरू करण्याची ही होती संकल्पना

    News34

    चंद्रपूर – 15 ऑगस्ट 2018 ला चंद्रपूर शहरातून सुरू झालेलं News34 पोर्टल आज 5 वर्षाचं झालं, अनेक अडचणींचा सामना करीत News34 ने अविरत वाचकांना रोजच्या घडणाऱ्या घडामोडीबद्दल अचूक माहिती पोहचवली.

    हे news पोर्टल सुरू झालं कस यामागील काय कहाणी आहे हे आज आम्ही आपल्याला सविस्तर सांगणार आहोत.

    चंद्रपूर शहर असो की ग्रामीण भाग आज असंख्य पत्रकार विविध वृत्तपत्रात कार्य करीत आहे, पण आयुष्यात अशी वेळ येते की आपली महत्वाची बातमी वगळण्याचं काम वरिष्ठ करीत असतात.

    आपण न्याय देण्याचा उद्देशाने बातम्या लिहतो पण जेव्हा ती बातमी प्रकाशीत होत नाही त्यावेळी कुठेतरी आपलं मन दुखतं.

    ही गोष्ट आहे चंद्रपुरातील 5 मित्रांची प्रकाश, अमित, राजेश, अभिषेक व राकेश यांची, हे पाचही मित्र वेगवेगळ्या माध्यमात काम करतात.

    या 5 मित्रांनी मिळून आपण एक बातम्यांची वेबसाईट सुरू करूया अशी संकल्पना आपसात मांडली, मग याला खर्च किती येणार? नाव काय असणार? दररोज अपडेट कसे व कोण करणार याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

    वर्ष 2018 तो काळ, सर्वांनी जुळवाजुळव करीत पैसे जमविले, मग नाव ठरलं, नाव ठरविण्यासाठी तब्बल 1 महिना लागला हे विशेष.

    News34 नावाची वेबसाईट तयार झाली, आधी अमरावती येथील डेव्हलपर ने या कामात मदत केली, 15 ऑगस्ट 2018 ला पत्रकार संघाच्या ध्वजारोहण कार्यक्रमाची पहिली बातमी या वेबसाईटवर प्रकाशित झाली.

    हळूहळू वाचक संख्या वाढत गेली, चंद्रपूर शहर व ग्रामीण भागातील प्रत्येक अपडेट माहिती वेबसाईटवर प्रकाशित व्हायला लागली, मात्र काही प्रस्थापती पत्रकार News34 ची थट्टा करू लागले होते, काय हे व्हाट्सअप ग्रुप वर लिंक टाकता? असे म्हणत ते हिनवू लागले. मात्र आहे तेच पत्रकार लिंक शेअर करताना दिसत आहे.

    मात्र त्या टीकेला अपडेट बातमी सहित प्रकाशित करण्याचं काम थांबलं नाही, वर्ष 2019 चा काळ आला, वेबसाईट ची होस्टिंग रिन्यू करण्याची वेळ आली, पैश्याची कमतरता मग काय करायचं? 5 पैकी 4 मित्र आपल्या कामात गुंतले.

    कसतरी जुळवाजुळव करून news34 सुरू झालचं, मात्र कालांतराने सदर जबाबदारी 5 पैकी एकावर आली, 2 वर्षे अविरत बातमी प्रकाशित करण्याचं काम सुरूच राहिले, मात्र कालांतराने अमरावती मधील डेव्हलपर कडून वेबसाईट काढण्यात आली, दुसऱ्याकडे वेबसाईट शिफ्ट करण्याची वेळ आली मात्र त्या काळात पैश्याची समस्या निर्माण झाली.

    पण एका जवळच्या मित्राने आपली आर्थिक परिस्थिती कमकुवत असताना सुद्धा पैश्याची मदत केली.

    News34 ची लोकप्रियता वाढली, हजारो वाचक दररोज news34 वेबसाईटला भेट देऊ लागले.

    आधी हजारो, लाखो आणि नंतर कोट्यवधी वाचक संख्येचा आकडा गाठला, News34 ची लोकप्रियता वाढत असताना काही प्रस्थापित पत्रकारांनी News34 वर खंडणी चे आरोप केले, मात्र आरोप करणारे तोंडघशी पडले. त्या पत्रकाराने स्वतःच्या प्रसिद्धीसाठी News34 ची बदनामी केली हे निष्पन्न झाले होते.

    News34 ने अनेक जनसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडत समस्या निराकरण करण्याचे काम केले, इतकेच नव्हे तर विधानसभा अधिवेशनात News34 च्या बातमीची चर्चा सुद्धा झाली होती, त्यानंतर त्या समस्येचे तात्काळ निराकरणही करण्यात आले.

    वर्ष 2022 ते 2023 ला चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचा डिजिटल माध्यमातील प्रथम पुरस्कार News34 ला मिळाला, 6 जानेवारी 2023 पत्रकार दिनाला मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते News34 चा सन्मान झाला.

    आज 5 पैकी एकचं News34 ची सर्व सूत्रे सांभाळत आहे, मात्र महत्वाच्या बातम्या प्रादेशिक व राष्ट्रीय पातळीवर प्रकाशित होत नसल्याने News34 चा सूर्योदय झाला होता.

    आज वाचकांचे आवडते लोकप्रिय News पोर्टल म्हणजे 34 आपल्या 6व्या वर्षात पदार्पण करीत आहे.
    5 मित्रांची संकल्पना आज कोट्यवधी वाचक वर्गापर्यंत पोहचली हे मात्र खरे.

  • राज्याची दैनावस्था हे सरकारचे अपयश – विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार

    News34

    चंद्रपूर – राज्यात फोडाफोडीच्या राजकारणातून सत्ता स्थापन करून जनतेचा विश्वासघात करणारे सत्ता काबीज करताच जनतेला वाऱ्यावर सोडून दिले. राज्यात आज महागाई, बेरोजगारी, महापुरुषांचा अवमान, शेतकरी आत्महत्या अशा ज्वलंत समस्या उभ्या ठाकल्या असताना सरकार मात्र सत्तेच्या मदमस्तीत गुरफटून आहे.

    सरकारच्या अशा बेजबाबदार वागण्यामुळेच राज्याची दैनावस्था झालेली असून हे सरकारचे स्पेशल अपयश आहे .पक्षश्रेष्ठींनी मला विरोधी पक्षनेते पदी नेमून जी संधी दिली यातून जनसेवेकरिता सर्वतोपरी प्रामाणिक प्रयत्न करणार असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले ते सावली तालुक्यातील व्याहाड (खुर्द) येथे आयोजित भव्य नागरी सत्कार समारंभात सत्कारमूर्ती म्हणून बोलत होते.

    विरोधी पक्ष नेते पदी नियुक्ती झाल्यानंतर माजी मंत्री तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांचा स्थानिक मतदार संघातील व्याहाड (खुर्द) येथे प्रथम आगमना प्रित्यर्थ भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्रामुख्याने नागपूर शिक्षक मतदार संघ आमदार सुधाकर अडबाले, माजी आ. डॉ .नामदेवराव उसेंडी, डॉ. नामदेव कीरसान, धनराज मुंगले,माजी जि प. उपाध्यक्ष संदीप गड्डमवार, माजी जि प. सभापती दिनेश चीटनूरवार, रोहित बोम्मावार, नरेशजी सुरमवार, राजेश सिद्धम, नितीन गोहने, रमाकांत लोधे ,स्वप्निल कावळे, सौ लता लाकडे, संदीप पुण्यपवार, उषाताई भोयर, सीमा सहारे, कवडूजी कुंदावार, विजय कोरेवार, राजू रेड्डी, निखिल सुरमवार, व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, महिला आघाडीच्या पदाधिकारी ,युवक काँग्रेसचे पदाधिकारी, तसेच अन्य मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
    यावेळी व्याहाड (खुर्द) येथे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे आगमन होताच जेसीबीच्या साह्याने पुष्पवृष्टी करून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यानंतर मंचावरील उपस्थित मान्यवरांनी विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या कर्तुत्वान व दमदार नेतृत्वाची गाथा उपस्थितांसमोर मांडली. आपल्या मनोगतात बोलताना विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार म्हणाले की, जनतेने मला सदैव प्रेम दिले. तसेच आशीर्वादाच्या रूपातून एक सामान्य कार्यकर्ता ते राज्याचा विरोधी पक्ष नेता पदापर्यंत पोहोचविले.
    आज करण्यात आलेला हा बहुमान सत्कार जीवनातील एक अविस्मरणीय क्षण राहील असेही ते यावेळी म्हणाले. सध्या राज्याच्या राजकीय स्थितीत संपूर्ण कलुशीतता आलेली असून कालपर्यंत विरोध करणारे आज सत्तेत मिसळून गुणगान गात आहे. महाराष्ट्रातील थोर महात्म्यांचा तसेच राष्ट्रपितांचा अवमान करणाऱ्यांना सरकारकडून मुभा मिळत असून राज्यात अनेक ज्वलंत समस्या उभ्या ठाकल्या  आहेत. राज्यातील जनता ही त्रस्त झाली असताना घटलेला विकासदर, वाढलेली महागाई शेतकऱ्यांची हाल अपेष्टा यावर तोडगा काढण्यात सरकार स्पेशल अपयशी ठरत आहे.
    देश वाचवायचा असेल तर काँग्रेस एकमेव पर्याय असून महाविकास आघाडीच्या समर्थनात मैदानात उतरा असे आवाहन करत जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही देखील दिली. व्याहाड (खुर्द) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निखिल सुरमवार व सहकाऱ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाची स्तुती करत हा जीवनातील अविस्मरणीय सत्कार असल्याचेही विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले. आयोजित कार्यक्रमास सावली  तालुक्यातील हजारोंच्या कार्यकर्ते उपस्थित होते.
  • त्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा – सुनीता पाटील

    News34

    चंद्रपूर – वरोरा शहरात पोलिसांनी अल्पवयीन मुलीला देहव्यापारात ढकलत तिच्याकडून देहविक्री चा व्यापाराचे मोठे नेटवर्क उघडकीस आणत त्या प्रकरणात अनेकांना अटक केली. Viral videos

    मात्र वरोरा तालुक्यातील काही तथाकथित नेत्यांनी त्या पीडित अल्पवयीन मुलींची भेट घेत तिच्यासोबत आक्षेपार्ह विचारणा करीत व्हिडीओ बनविला ते तितक्यावरचं थांबले नाही तर त्यांनी तो व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल केला, त्यामुळे पीडित मुलीची ओळख त्यांनीं पटवून दिली. Sex racket

    अत्याचार पीडित कोणत्याही प्रकरणात पीडितेची ओळख बाहेर आणणे हा मोठा गुन्हा आहे असे असताना सुद्धा मेश्राम व जीवतोडे यांनी हे कृत्य केले त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी त्यांना कठोर शिक्षा व्हावी अश्या मागणीचे निवेदन आम आदमी पक्षाच्या चंद्रपूर महिला अध्यक्ष एड. सुनीता पाटील यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांना केली आहे.

    त्या व्हायरल व्हिडीओ मध्ये मेश्राम हे तिला आक्षेपार्ह विचारणा करीत जणू त्या अल्पवयीन मुलीची खिल्ली उडवीत आहे असे दिसत होते, अश्या विकृत मानसिकतेच्या तथाकथित नेत्यांवर कठोर कारवाई व्हावी जेणेकरून पुन्हा कुणी असे कृत्य करणार नाही अशी मागणी चंद्रपूर महिला अध्यक्ष सुनीता पाटील, महिला उपाध्यक्ष जासमिन शेख, महिला पदाधिकारी राणी जैन, लक्ष्मण पाटील व अजय आंबेकर यांनी केली आहे.

    वरोरा प्रमाणे चंद्रपूर शहरात सुद्धा असे सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती सुनीता पाटील यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांना दिली आहे.