Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • आता नव्या चंद्रपूरचा होणार विकास

    News34 development
    नागपूर/ चंद्रपूर : चंद्रपूर शहरालगतच्या ‘नवीन चंद्रपूर’ या भागातील प्रलंबित विकासकामांना गती देण्याकरिता या भागातील बसस्थानक, पोलिस स्टेशन, पोस्ट ऑफिस,रस्त्यांची दुरुस्ती, वीजपुरवठा यासारख्या पायाभूत सुविधांचे नियोजन करून त्याच्या अंमलबजावणीची गरज आहे. सर्व सोयीसुविधायुक्त एक आदर्श शहर कसे उभे करता येईल, याकडे जिल्हा प्रशासन व विशेष नियोजन प्राधिकरण असलेल्या महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) विशेषत्वाने लक्ष द्यावे, असे निर्देश वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवार दिले.
    नवीन चंद्रपूर भागात जिल्हा प्रशासन तसेच म्हाडातर्फे करण्यात येत असलेल्या विविध विकासकामांचा तसेच प्रलंबित विषयांचा आढावा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला. त्यांच्या अध्यक्षतेत सेमिनरी हिल्स येथील हरीसिंग नाईक सभागृहात या आढावा बैठक घेण्यात आली.
    बैठकीला म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा,चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त विपीन पालिवाल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, म्हाडाचे मुख्य अधिकारी महेशकुमार मेघपाळे, मुख्य अभियंता शिवकुमार आडे यांच्यासह चंद्रपूर जिल्ह्यातील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
    नवीन चंद्रपूर भागात होणाऱ्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात यावी. दरमहा या समितीने विकासकामांचा आढावा घ्यावा. चंद्रपूर शहरालगत असलेल्या या भागात एक चांगल्या दर्जाचे सांस्कृतिक सभागृह, ॲम्फीथिएटर, ई-लायब्ररीचे (अभ्यासिका) नियोजन करीत आराखडा तयार करण्यात यावा. भूसंपादनाच्या प्रलंबित कामांना गती द्यावी. चंदीगढसारखे एक सुनियोजित व चांगल्या दर्जाचे शहर कसे उभे करता येईल, याकडे कार्यान्वयन यंत्रणेने लक्ष देण्याची गरज असल्याचे ना. मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

    ‘म्हाडा’ने पाणी कर कमी करावा

    महानगरपालिकेच्या तुलनेत म्हाडातर्फे आकारण्यात येणारा पाणी कर हा जास्त आहे. दरमहा 400 रुपये पाणीकर हा म्हाडातर्फे आकारण्यात येतो. वर्षाला हा कर 4800 रुपयांपर्यंत जातो. महानगरपालिकेच्या तुलनेत हा कर जास्त आहे. त्यामुळे म्हाडाने पाणी कर कमी करावा, अशी सुचनाही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी म्हाडा अधिका-यांना बैठकी दरम्यान केली.

    म्हाडातर्फे प्रेझेंटेशन

    महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) हे नवीन चंद्रपूरसाठीचे विशेष नियोजन प्राधिकरण आहे. म्हाडातर्फे यावेळी या भागात सुरू असलेली विविध प्रकारची कामे व नियोजन याविषयीचे सादरीकरण ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या समोर करण्यात आले. यातून विकासकामांची स्थिती आणि प्रगती दोन्हींची माहिती देण्यात आली.
  • शांतता समिती बैठकीत स्थानिक पत्रकारांचा विसर

    News34chandrapur रमेश निषाद

    बल्लारपूर – आगामी सण, सोहळा, उत्सव निमित्त शांतता समितीची बैठक बल्लारपूर पोलिस ठाण्यात शुक्रवार दि.०१ सप्टेंबर रोजी संपन्न झाली.

     

    नियमाप्रमाणे या बैठकीत शहरातील व्यापारी,सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि पत्रकारांचा समावेश असतो. मात्र,यंदाच्या या शांतता समितीच्या बैठकीत
    शहरातील व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांची उपस्थिती होती. कॅमेरा, लॅपटॉप, मोबाईल व असंख्य वस्तूंचा खजिना, खरेदी करा अमेझॉन वरून

     

    मात्र,यंदा प्रथमच या बैठकीत पत्रकारांना डावलण्यात आले. सन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण असणाऱ्या या बैठकीत स्थानिक पत्रकारांना डावल्यामुळे उपस्थित मंडळीही काही वेळासाठी अचंबित झाली.

    डावण्याच नेमक कारण काय? हे बैठकीत उपस्थित असणाऱ्या अनेकांना पडला आहे.
    वेळ प्रसंगी प्रशासनाला जाब विचाराने आणि गरज पडल्यास प्रशासनाला धारेवर धरून न्याय मिळवून देणाऱ्या पत्रकारानाचं या बैठकीत डावलने हा विसर असावा कि जाणीवपूर्वक केलेली कृती असा प्रश्न सध्या शहरात वर्तविला जात आहे.

  • रक्षाबंधनासाठी जात असताना धावत्या दुचाकीवर चक्कर आली आणि घडलं दुर्दैवी

    News34

    सिंदेवाही – रक्षा बंधनाच्या दुसऱ्या दिवशी भावाला राखी बांधण्यासाठी निघालेल्या बहिणीचा 1 सप्टेंबर ला अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला, अपघातात मृतक महिलेची 6 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे.

    1 सप्टेंबर ला 34 वर्षीय लवकेश रेचनकर, त्याची पत्नी 29 वर्षीय मीनाक्षी रेचनकर व मुलगी 6 वर्षीय मनस्वी हे आज दुपारच्या सुमारास सावली तालुक्यातील पाथरी चक येथे जात होते.

    रक्षा बंधनाला भावाकडे राखी बांधायला मीनाक्षी गेली नसल्याने आज त्या कुटुंबासहित निघाल्या होत्या मात्र सिंदेवाही पासून 3 किलोमीटर अंतरावरील मेंढा माल येथुन जात असताना लवकेश यांना धावत्या दुचाकीवर चक्कर आली आणि दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने कुटुंबसहित सर्व रस्त्यावर आदळले.

     

    या अपघातात मीनाक्षी रेचनकर यांचा जागीच मृत्यू झाला तर 6 वर्षीय मनस्वी गंभीर जखमी झाली, सिंदेवाही पोलिसांनी तात्काळ मनस्वी व लवकेश यांना रुग्णालयात दाखल केले, मनस्वी ची प्रकृती गंभीर असल्याने तिला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

    सिंदेवाही पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पीआय तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदेवाही पोलिस करीत आहेत.

  • 8 महिन्यात 310 नागरिकांना मोफत वकील

    News 34

    चंद्रपूर : न्यायालयाची पायरी चढू नये, असा सल्ला बऱ्याच वेळा दिला जातो. परंतु आपल्या अधिकारांसाठी आपल्याला न्यायालयात जावे लागते किंवा फौजदारी प्रकरणात समाविष्ट असल्यास उपस्थित राहावे लागते. आर्थिक दुर्बल घटकातील व्यक्तीने दाद मागण्यासाठी न्यायालयाची पायरी चढणे परवडणारे नसते. अशा दुर्बल घटकांसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर धावून येते. निर्धारित पात्रता व निकष पूर्ण करणाऱ्या व्यक्तींना प्राधिकरणामार्फत मोफत वकील दिला जातो. पैसे नाहीत म्हणून कोणीही न्यायापासून वंचित राहू नये, हा मोफत विधी सेवा योजनेचा उद्देश आहे.

    मोफत वकील मिळण्यासाठी पात्र घटक :

    महिला व 18 वर्ष वयापर्यंतची बालके, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरीक, कारागृहात किंवा पोलिसांच्या ताब्यात असलेले आरोपी, 3 लाख रुपयापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेला व्यक्ती, मानवी तस्करी, शोषण व वेठबिगारीचे बळी ठरलेले व्यक्ती, औद्योगिक कामगार, मनोरुग्ण व दिव्यांग व्यक्ती, पूर,भूकंप इत्यादी नैसर्गिक आपत्ती व जातीय हिंसा पिडीत व्यक्ती आदी घटक मोफत वकील मिळण्यासाठी पात्र आहेत.

    मोफत वकील मिळण्यासाठी या ठिकाणी करा अर्ज :

    सुविधेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र नागरिकांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर येथील कार्यालयात तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील तालुका न्यायालयात असलेल्या तालुका विधी सेवा समितीकडे अर्ज करावा.

    लोक अभिरक्षक कार्यालयाची निर्मिती :

    फौजदारी प्रकरणात असलेले न्यायालयीन बंदी यांच्यासाठी मोफत विधी सहाय्य दिले जाते. वरील सुविधा मिळण्यासाठी अर्ज आल्यास लोक अभिरक्षक कार्यालयात कार्यरत असलेल्या पाच तज्ञ वकिलामार्फत मोफत विधी सहाय्य दिले जाते. सदर कार्यालय दि. 13 मार्च 2023 पासून जिल्ह्यात मुख्यालयासाठी कार्यरत आहे.

    8 महिन्यात 310 नागरिकांना मोफत वकील :

    जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूरमार्फत माहे जानेवारी ते माहे ऑगस्ट 2023 या आठ महिन्याच्या कालावधीमध्ये जिल्ह्यातील एकूण 310 नागरीकांना मोफत विधी सहाय्य पुरविण्यात आले, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी यांनी कळविले आहे.

     

  • धक्कादायक चक्क मुख्याध्यापकानेचं चोरले शाळेतील संगणक

    News34

    चंद्रपूर :- वरोरा तालुक्यातील बोर्डा या गावांतील जिल्हापरिषद प्राथमिक शाळेतून संगणक चोरी व शा.पो.आ योजनेचे कॅश बुक गहाळ केल्याने सेवानिवृत्त मुख्याध्यापक गौतम गेडाम यांच्यावर फौजदारी कारवाई करून त्यांच्याकडून पैसे वसूल करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे यांच्या नेत्रुत्वात गटशिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

    दरम्यान गटशिक्षणाधिकारी यांनी तीन नोटीस देऊनही सेवानिवृत्त गेडाम यांनी संगणक जमा केले नसल्याने त्याच्या पेंशन मधून पैसे कपात करण्याचा निर्णय घेण्यात यावा अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे.

    जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोर्डा येथील सेवानिवृत्त गेडाम यांनी दिनांक 16/06/2022 ला शाळेचा प्रभार देण्यासंदर्भात मारोतराव रायपुरे केंद्र प्रमुख, वरोरा यांनी शाळेला भेट दिली असता रजिस्टर नंबर 33, पान क्र. 75 वरील नोंदीनुसार दिनांक 26/01/2020 ला गट ग्रामपंचायत, बोर्ड ने शाळेला कंपनीचे संगणक दिलेले आहे. त्या संगणकाची नोंद माल पुस्तकात घेतली आहे, परंतु मून मॅडम यांच्याकडे प्रभार देताना यादीत संगणकाची नोंद सेवानिवृत्त मुख्याध्यापक गौतम गेडाम यांनी घेतली नाही व संगणक सुपूर्दही केलेले नाही. तसेच शालेय पोषण आहार योजनेचे कॅश बुक रजिस्टर शाळेत उपलब्ध नाही.

    दरम्यान या संदर्भात जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांच्याकडे चौकशी अहवाल गटशिक्षणाधिकारी यानी पाठविला आहे, परंतु या संदर्भात कुठलाही निर्णय घेतला नसल्याने शाळेच्या संगणकाची चोरी करणाऱ्या मुख्याध्यापकांना जिल्हा परिषद पाठीशी घालत आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे आज शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की चक्क मुख्याध्यापकांनी शाळेचे संगणक शाळेतून चोरून न्यावे ही बाब अत्यंत गंभीर असून शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी आहे.

     

    करिता सेवानिवृत्त मुख्याध्यापक गौतम गेडाम यांनी संगणक व शा.पो.आ योजनेचे कॅश बुक गहाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर त्वरीत फौजदारी कारवाई करावी व त्यांच्या पेंशन मधून संगणकाची किमंत वसूल करावी व त्यातून शाळेला संगणक देण्यात यावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे.

     

    यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजु कुकडे. मनसे जिल्हा सचिव किशोर मडगुलवार, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे. मनसे वरोरा तालुका उपाध्यक्ष प्रशांत बदकी. मनविसे तालुका उपाध्यक्ष प्रवीण शेवते, देवा येरणे, प्रतीक मुडे, सूरज मानकर, संतोष नागपूरे, मनविसे तालुका उपाध्यक्ष मयूर खंगार शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष बबलू परचाके इत्यादींची उपस्थिती होती.

  • चंद्रपुरात होणार 5 कोटीचे अद्ययावत वातानुकूलित बॅडमिंटन हॉल

    News34

    चंद्रपूर  : खेळाडूंना उत्तमोत्तम सुविधा मिळाव्या आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळून चंद्रपूर जिल्ह्याची मान अभिमानाने उंच करावी, यासाठी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार कायम प्रयत्नशील असतात. याच प्रयत्नांचा भाग म्हणून आता चंद्रपुरात सर्व सोयीसुविधायुक्त असा वातानुकूलित बॅडमिंटन हॉल उभारण्यासाठी पालकमंत्री मुनगंटीवार यांनी ५ कोटी ३९ लक्ष रुपये मंजूर केले आहेत.

    नागपूरच्या विभागीय क्रीडा संकुलानंतर विभागातील दुसरा वातानुकुलित बॅडमिंटन हॉल चंद्रपुरात होणार आहे. ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांतून ऑक्टोबर महिन्यात चंद्रपूर येथे सिनीयर राज्यस्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप आयोजित करण्यात येणार आहे.

    ही स्पर्धा प्रथमच चंद्रपुरात होणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने संपूर्ण राज्यातून बॅडमिंटनचे खेळाडू चंद्रपूर येथे स्पर्धेत सहभागी होणार आहेत. त्यामुळे अद्ययावत बॅडमिंटन हॉलचा आराखडा तयार करून हॉलमध्ये वातानुकूलित यंत्रणा बसविणे, प्रकाशझोताची व्यवस्था करणे, आसन व्यवस्था, अद्यावत प्रसाधने, वुडन फ्लोरिंग, वोवाकोट सिंथेटिक, सोलर सिस्टिम, एकॉस्टिक सिस्टीम, पब्लिक एड्रेस सिस्टीम, ड्रिंकिंग वॉटर सिस्टीम इत्यादी सुविधेचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

    खेळाडूंमध्ये आनंद

    बॅडमिंटन हॉलसाठी क्रीडांगण विकास योजनेतून ५ कोटी ३९ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. बॅडमिंटन हॉलचे काम दर्जेदार करण्याच्या सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी क्रीडा विभागाला दिल्या आहेत. भविष्यात याठिकाणी बॅडमिंटनसह विविध क्रीडाप्रकार खेळले जाणार असल्याने खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

    जलतरण तलाव लवकरच

    यापूर्वी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथील जिल्हा क्रीडा संकुलात जलतरण तलावासाठी नाविण्यपूर्ण योजनेतून १ कोटी ५० लक्ष रुपये मंजूर केले आहेत. त्याचे काम प्रगतीपथावर आहे. तर जिल्हा क्रीडा संकूल येथे सिंथेटिक ट्रॅकसाठी १२ कोटी रुपये आणि वॉकिंग ट्रॅकसाठी ५१ लक्ष रुपये उपलब्ध करून दिले आहेत.

  • चंद्रपूर जिल्ह्यात Right To Education नियमाचा भंग

    News34

    चंद्रपुर – जिल्हातील राजुरा ,पोंभुर्णा ,मुल ,चंद्रपुर या तालुक्यातील गोलकर समाजातील ईयत्ता पहिली ते पाचवीतील विद्यार्थांच्या गुरुनानक पब्लिक स्कुल बल्लारपुर येथील व्यवस्थापनाने शासकिय अनुदान मिळणार असल्याचे सांगुण मुलांचे शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र T.C. गोळा केल्या आणि आपल्या शाळेत प्रवेश दिला.

     

    मात्र दोन महिण्यानंतर प्रत्येक पालकांना फोन करुन ,कोणतीही पुर्वकल्पना न देता ,आता शासनाकडुन कोणतेही अनुदान मिळणार नसल्याचे कारण सांगुन TC घेऊन जाण्यास सांगीतले. हे सर्व नियमबाह्य असुन RTE नुसार 25 जागा एस.सी./एस.टि./एन.टि. करीता राखीव ठेवण्याचे शासनाचे निर्देश आहे.त्या निर्देशाचा भंग करुन मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन पालकांची पिळवणूक करीत आहे.

     

    तेव्हा या 25 विद्यार्थांचे शैक्षणिक भवितव्य वाया जाऊ नये म्हणुन गुरुनानक पब्लिक स्कुल बल्लारपुर चे मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन यांच्यावर ऊचीत कार्यवाही करुन विद्यार्थांना न्याय द्यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा चंद्रपुर जिल्हाध्यक्ष विलास खोंड ,जिल्हाकार्यवाह दिलीप मॕकलवार ,शहर कार्यवाह वसंत वडस्कर ,काॕन्व्हेंट विभाग प्रमुख विवेक आंबेकर ,नागपुर विभाग ऊपाध्यक्ष मधुकर मुप्पीडवार , झोडे सर यांनी सदर मागणीचे निवेदन शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना दिले आहे.

     

    तसेच या संबंधीचे निवेदन जिल्हाधिकारी ,मुख्य कार्यकारी अधिकारी ,शिक्षण ऊपसंचालक नागपुर आणि नागो गाणार माजी शिक्षक आमदार यांना दिले आहे.

  • ताडोबा अभयारण्याच्या Online Booking बाबत न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

    News 34

    Tadoba jungle safari

     सर्व पर्यटक व निसर्गप्रेमींसाठी चांगली बातमी!

    चंद्रपूर येथील प्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या ऑनलाइन बुकिंगला चंद्रपूर जिल्हा न्यायालयाने नुकतीच परवानगी दिली आहे. हा केवळ ताडोबा व्यवस्थापनासाठीच नाही तर रिसॉर्ट मालक, टूर ऑपरेटर, जिप्सी चालक, मार्गदर्शक आणि स्थानिक व्यावसायिकांसाठीही मोठा दिलासा आहे.

    ऑनलाइन बुकिंगला मंजुरी मिळाल्याने ताडोबा व्यवस्थापन आता आगामी सणासुदीच्या हंगामासाठी सज्ज होऊ शकेल. दिवाळी, ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या बुकिंगचा मार्ग मोकळा झाला आहे, ज्यामुळे तुम्हाला या भव्य व्याघ्र प्रकल्पाच्या सफारीचे नियोजन आणि सुरक्षितता आधीच करता येईल.

    कायदेशीर लढाईचा खडतर प्रवास

    ताडोबा व्यवस्थापनासाठी हा प्रवास सोपा नव्हता. आर्थिक गैरव्यवहारामुळे त्यांना वाइल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन्स या बुकिंग एजन्सीसोबतचा त्यांचा करार रद्द करावा लागला. एजन्सीवर वनविभागाने 12 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला होता, त्यामुळे कायदेशीर लढाई सुरू झाली होती.

    ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या करारातील अटी आणि त्यामध्ये बुकिंग करण्याचे अधिकार यावरून सुरू असलेला वाद अखेर चंद्रपूर न्यायालयात पोहोचला. 2026 पर्यंत करार वैध असूनही ताडोबा व्यवस्थापनाने त्यांचा करार अचानक संपुष्टात आणल्याचा दावा एजन्सीने केला आहे. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत ताडोबाच्या बुकिंग प्रक्रियेला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला होता.

    ऑनलाइन बुकिंग चा मार्ग मोकळा झाला

    मात्र, काही दिवसांच्या अनिश्चिततेनंतर चंद्रपूर जिल्हा न्यायालयाने गुरुवारी (३१ ऑगस्ट) स्थगिती उठवली आणि ताडोबाला पुन्हा एकदा सफारी बुकिंगसाठी परवानगी दिली. या बातमीने चिंतेत असलेले ताडोबा व्यवस्थापन, रिसॉर्ट मालक, टूर ऑपरेटर, जिप्सी चालक, मार्गदर्शक आणि स्थानिक व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेवटी, पर्यटक आनंदित होऊ शकतात कारण ते लवकरच त्यांची सफारी ऑनलाइन बुक करू शकतील.

    येत्या 4 ते 5 दिवसांत ताडोबाची अधिकृत बुकिंग साइट सुरू होईल हे जाहीर करताना ताडोबा प्रशासनाला आनंद होत आहे. आता पर्यटकांना एका बटणाच्या क्लिकवर सफारी बुक करण्याची सुविधा मिळेल.

    तयार व्हा वाघाच्या जंगल सफारीसाठी

    तर, तुमची कॅलेंडर चिन्हांकित करा आणि ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात अविस्मरणीय वन्यजीव साहस सुरू करण्यासाठी सज्ज व्हा. बुकिंग साइटच्या अधिकृत लाँचसाठी संपर्कात रहा आणि या मंत्रमुग्ध करणाऱ्या अभयारण्यात तुमचे स्थान सुरक्षित करणार्‍यांपैकी प्रथम व्हा!

  • 2 रुपयात पाणी देणाऱ्या RO चे वीजबिल 26 हजार

    News34

    गुरू गुरनुले

    मूल : शुध्द व थंड पिण्याचे पाणी पुरवठा करणारे आर. ओ. केंद्र सात दिवसांपासून बंद असल्याने ग्राम पंचायतीच्या नळांद्वारे पुरवठा होणा-या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. त्यामूळे जनतेला आरोग्याची भिती वाटत असल्याने बंद असलेले आर.ओ.केंद्र सुरू करावे. अशी मागणी चिरोलीवासीयांनी केली आहे.

     

    आरोग्याच्या दृष्टीने जनतेला अत्यल्प दरात शुध्द व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून तालुक्यातील चिरोली येथे राईट वाॅटर सोल्युशन इंडीया प्रा.लि. ने जलशुध्दीकरण केंद्र (आर.ओ.) सुरू केले. 2 रूपयात 20 लिटर पाणी जनतेला पुरवठा करणारे आर.ओ.केंद्र सुरू केल्याने चिरोलीवासीय सार्वजनिक नळांद्वारे पुरवठा होणा-या पाण्यापेक्षा आर.ओ.केंद्राद्वारे उपलब्ध होणारा पाणी पिण्यासाठी मोठया प्रमाणांत वापरत होते. जनतेला आर.ओ.केंद्रामधून शुध्द आणि थंड पाणी पिण्यासाठी उपलब्ध होवू लागल्याने आरोग्याच्या चिंतेपासून चिरोलीवासीय बिनधास्त होते.

     

    दरम्यान मागील सात दिवसांपासून येथील आर.ओ.केंद्र बंद असल्याने चिरोलीवासीय शुध्द आणि थंड पिण्याच्या पाण्यापासून वंचित असल्याने त्यांना आरोग्याची चिंता वाटू लागली आहे. पिण्याच्या पाण्यामूळे आरोग्य बिघडू नये म्हणून आर.ओ.केंद्र तातडीने सुरू करावे. म्हणून ग्रामस्थांची मागणी आहे. ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेवून ग्राम पंचायतीनेही आर.ओ.केंद्राचे संचलन करणा-या राईट वाॅटर सोल्युशन इंडिया कंपनी व्यवस्थापनाला आर.ओ.केंद्र सुरू करण्याची विनंती केली. परंतू आजपर्यंत आर.ओ.केंद्र सुरू झालेले नाही.

     

    बंद असलेल्या आरोग्य केंद्राचे संचलन करणा-या कंपनीच्या अंकुश मालवीय यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी दर दोन महिण्याला येणारे 300 ते 400 रूपयाचे विज बील यावेळेस तब्बल 26 हजार रूपये आले. बिलाच्या रक्कमेत मोठया प्रमाणांत तफावत असल्याने याबाबत विज वितरण कंपनी आणि ग्राम पंचायतीला कळवुन विज बिलात सुधारणा करून देण्याची विनंती केली. परंतू अजून पर्यंत विज वितरण कंपनीने विज बिलात सुधारणा करून दिलेली नाही. उलट एकुण बिलाच्या रक्कमेमधून किमान अर्धी रक्कम भरावी. असा आग्रह धरला आहे.

     

    आर.ओ.केंद्रामधून पाणी पुरवठा करण्यापोटी मिळणा-या रक्कमेपेक्षा विज बिलाची रक्कम तिप्पटीची आहे. त्यामूळे विज बिला बाबत तडजोड होईपर्यंत आर.ओ.केंद्र सुरू करता येणार नाही. असे मालवीय यांनी सांगीतले. त्यामूळे चिरोलीवासीयांची शुध्द आणि थंड पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस अडचणीची होत असून ग्रामस्थांची अडचण सोडविण्यास ग्राम पंचायतीने पुढाकार घ्यावा. अशी अपेक्षा वर्तविल्या जात आहे.

  • त्या कामगारांना हंसराज अहिर मुळे मिळाले प्रलंबित वेतन

    News34

    चंद्रपूर – केपीसीएल च्या बरांज कोलमाईन्स मध्ये कार्यरत कामगारांचे 6 महिन्याचे प्रलंबित वेतन मिळवून दिल्याबद्दल या कामगारांनी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांचा दि. 31 ऑगस्ट रोजी भद्रावती येथील आशीर्वाद मंगल कार्यालयात सन्मान करीत त्यांचे आभार मानले.

    हंसराज अहीर यांनी KPCL (coal Mine) च्या बराज मोकासा येथे कार्यरत असलेल्या या मागासवर्गीय कामगारांना तात्काळ प्रलंबित वेतन देण्याचे निर्देश नागपूर आयुक्त कार्यालय येथे दि. 24 जुलै, 2023 रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या सुनावणी दरम्यान केपीसीएल चे प्रबंध संचालकांना दिले होते. याची दखल घेत केपीसीएल प्रबंधनाने अविलंब कार्यवाही करीत या 21 कामगारांचे थकीत वेतन अदा केल्याने या सर्व कामगारांनी कृतज्ञता व्यक्त करीत हंसराज अहीर यांचा सन्मान करुन त्यांच्या सहकार्याप्रती आभार व्यक्त केला.

    भद्रावती येथील आशीर्वाद मंगल कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमास भाजप नेते रमेश राजुरकर, अशोक हजारे, विजय वानखेडे, प्रशांत डाखरे, संजय वासेकर, नरेंद्र जीवतोडे, रामा मत्ते, श्यामबाबु महाजन, अविनाश सिंध्दमशेट्टीवार, प्रदीप मांडवकर, आदिंची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना हंसराज अहीर यांनी उपस्थितांना आश्वस्त करीत मागासवर्गीय कामगार, प्रकल्पग्रस्त व अन्य नागरिकांच्या न्याय हक्कासाठी आपण लढत राहु, ही शेवटची लढाई नसुन या पुढेही अनेक क्षेत्रातील प्रकल्पग्रस्त व कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपली कटीबध्दता व्यक्त केली. या प्रकल्पग्रस्त कामगारांमध्ये बराज, तांडा, मानोरा, पिरबोडी, कोंडा, केसुर्ली व अन्य गावातील कामगार व प्रकल्पग्रस्त बहुसंख्येने उपस्थित होते.

    बरांज मोकासा येथे भेट देवून अहीरांनी ऐकल्या प्रकल्पग्रस्तांच्या व्यथा

    सदरील कार्यक्रमानंतर हंसराज अहीर यांनी बरांज मोकासा या गावास भेट देवून येथील नागरिक व प्रकल्पग्रस्तांशी विविध विषयांवर चर्चा केली यावेळी प्रकल्पग्रस्तांनी त्यांना आपल्या अडचणी सांगितल्या. ज्यात नोकरी ऐवजी अनुदान, अवार्ड नुसार मोबदला, वाढीव प्रकल्पग्रस्त कुटूंबांना मोबदला तसेच बरांज व अन्य प्रभावित गावांच्या पुनर्वसनाबाबत नागरिकांनी त्यांचेशी विस्तृत चर्चा केली. या सर्वांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन हंसराज अहीर यांनी यावेळी दिले.