Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • त्या 86 कामगारांना कामावर परत घ्या अन्यथा Cstps बंद पाडू – संदीप गिर्हे

    News34

    चंद्रपूर – राज्यात औद्योगिक जिल्हा म्हणून चंद्रपूरची ओळख आहे मात्र या जिल्हयात कामगारांवर सतत अन्याय होत आहे, अशीच एक बाब चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात उघडकीस आली आहे, वर्षभरापूर्वी मोठा गाजावाजा करीत कोळशाची वाहतूक सुलभ व्हावी यासाठी 5 किलोमीटर कन्व्हेअर बेल्ट प्रणाली प्रकल्प सुरू करण्यात आला होता.

     

    मात्र हा बेल्ट वर्षभरात पूर्णतः फाटला, याचा फटका त्या बेल्ट प्रणाली मध्ये काम करणाऱ्या 86 कंत्राटी कामगारांना बसला, त्या सर्वांना न कळविता कामावरून काढून टाकण्यात आले, त्यांना कामावर परत घ्या अन्यथा 8 दिवसात चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राची वाहतूक व प्रवेश पूर्णतः बंद करणार असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी दिला आहे.

     

    तब्बल 180 कोटी रुपये खर्च करून CHP विभागाद्वारे पाईप कन्व्हेअर बेल्ट प्रणाली प्रकल्प सुरू करण्यात आला होता, कोळशाची वाहतूक सुरळीत व जलद व्हावी व प्रदूषणाचा त्रास कमी व्हावा यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला, सदर दुरूस्ती करनाचे 16 कोटी रुपयांचे कंत्राट थायसन ग्रुप इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ने भावना एनर्जी ला पेटी कंत्राट दिले.

     

    ह्या प्रकल्पामुळे अनेकांची शेती गेली त्यामधील वीज केंद्राने 86 भटाळी, पद्मापूर व स्थानिक नागरिकांना कामावर घेतले, मात्र वर्षभरात ह्या बेल्ट मध्ये मोठा बिघाड आला, कन्व्हेअर बेल्ट प्रणाली बंद करण्यात आली व कोळसा वाहतुकीचे कंत्राट दुसऱ्या कंपनीला देण्यात आल्याने कन्व्हेअर बेल्ट प्रणाली मध्ये काम करणारे 86 कामगार बेरोजगार झाले.

     

    16 मार्च 2023 ला औष्णिक वीज केंद्राने कामगारांना कसलीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी केले, मागील 5 ते 6 महिन्यापासून कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न भेळसावत असून त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे.

     

    कामगारांच्या बिकट प्रश्नावर शिवसेना ठाकरे गटाने आमरण उपोषण आंदोलन केले, 3 दिवसांनी आंदोलनाची दखल घेत वीज केंद्राने सदर कामगारांना लवकर कामावर समाविष्ट करू असे आश्वासन दिले मात्र महिना लोटला तरी त्या कामगारांना आजपर्यंत कामावर समाविष्ट करण्यात आले नाही.

     

    कन्व्हेअर बेल्ट चे काम सुरू करण्यासाठी मुंबई कार्यालयात मंजुरी मिळण्यासाठी प्रतीक्षेत आहे अशी पळवाट अधिकारी वर्ग करीत आहे.

     

    मात्र शिवसेनेने याबाबत माहिती काढली असता कन्व्हेअर बेल्ट प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव स्थानिक वीज केंद्राने वरिष्ठांना पाठविला नाही, कोळसा वाहतुकीचे कंत्राट संपुष्टात यायची अधिकारी वर्ग जाणूनबुजून वाट बघत आहे असा आरोप संदीप गिर्हे यांनी केला आहे.

     

    8 दिवसांच्या आत 86 कामगारांवर वीज केंद्राने कामावर समाविष्ट केले नाही तर संपूर्ण वीज केंद्राच्या आत वाहतूक असो की कामगार कुणालाही प्रवेश करू देणार नाही याची संपूर्ण जबाबदारी वीज केंद्राची राहणार असा शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी दिला आहे.

     

    याबाबत जर शिवसेनेच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर 2300 मेगावाट वीज निर्मिती प्रकल्प पुढे शिवसेना आंदोलन करणार, आंदोलन दरम्यान आम्ही एकाही कामगार व वाहतुकीला कंपनीच्या आत जाऊ देणार नाही – संदीप गिर्हे

    मुख्य अभियंता कुमारवार म्हणतात की..

    चंद्रपुर औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता कुमारवार यांनी या संदर्भात दिव्य मराठी सोबत बोलताना माहिती दिली की पुढील 8 ते 10 दिवसात कन्व्हेअर बेल्ट चे काम सुरू होणार असून त्यानंतर त्या 86 कामगारांना कामावर रुजू करणार आहोत, याबाबत मुंबई येथील वरिष्ठ पातळीवर सूचना देण्यात आल्या आहे. त्या कामगारांवर अन्याय होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ.

  • मराठ्यांचा सरसकट ओबीसी मध्ये समावेश करू नका – अशोक जीवतोडे

    News34 maratha reservation

    चंद्रपूर : मराठ्यांचा सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश करू नये, असे ठाम मत ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी व्यक्त केले आहे. Bolt ear Buds वर 73 टक्क्यांची सूट आजच खरेदी करा…. amazon

    सध्या राज्यात विशेषतः मराठवाड्यात ओबीसी समाजात मराठा समाजाचा समावेश करून आरक्षण देण्याबाबत चर्चा सुरू आहे.

     

    मात्र निजामशाहीतील रेकॉर्ड तपासून कुणबी निकष पूर्ण करणाऱ्या कुणबी समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा विरोध नाही, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी ह्यांना याअगोदर पण ओबीसी म्हणून प्रमाणपत्र मिळतच होते, त्याला आमचा विरोध नाहीच, मात्र सरसकट सर्व मराठ्यांचा समावेश ओबीसी प्रवर्गात करण्यास राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा विरोध आहे.

     

    प्रसंगी रस्त्यावर उतरावे लागले त्यासाठी आमची तयारी आहे, असे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले. यात कुणीही राजकारण आणू नये असे देखील डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले, व हीच भूमिका राष्ट्रीय ओबीसी महासंघाची आहे.

  • चंद्रपुरात पुन्हा Yellow Mosaic Virus ची एन्ट्री

    News34

    चंद्रपूर : जिल्ह्यात यावर्षी 66 हजार 931 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची लागवड करण्यात आली आहे. सोयाबीन हे एक महत्वाचे पीक आहे, त्यामुळे त्याचे किड व रोगाचे वेळीच योग्य व्यवस्थापन सुध्दा करणे गरजेचे आहे. मागील वर्षी पिवळा मोझँक व्हायरस रोगामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले होते. Smart watch घ्यायची, बघा अगदी माफक दरातील बोट कंपनीची smart watch

     

    सोयाबीन पिकामध्ये पिवळा मोझँक व्हायरस / हिरवा मोझँक व्हायरस हा रोग प्रामुख्याने फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत विषाणुजन्य रोगाची लागण होते. म्हणजे फुले लागल्यानंतर दिसून येतो व मोठ्या प्रमाणावर नुकसान करतो. अंदाजित 30-90 टक्के उत्पादनात नुकसान या रोगामुळे होऊ शकते, तसेच उशीरा येणारे वाण किंवा लवचीक पान असलेल्या वाणामध्ये हा रोग जास्त प्रमाणात दिसून येतो. (शक्यतो जिल्हयात केडीएस-726 या वाणावर या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसुन येत आहे)

     

    निरीक्षण व क्षेत्रीय भेट :

     

                जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही येथील शास्त्रज्ञ डॉ. विनोद नागदेवते, वरोराचे उपविभागीय कृषी अधिकारी तथा तालुका कृषि अधिकारी  सुशांत लव्हटे, मंडळ कृषि अधिकारी प्रगती चव्हाण, कृषि पर्यवेक्षक किशोर डोंगरकार व श्री गणेश ईढोळे यांनी वरोरा तालुक्यांतील शेगांव (बु.) येथील शेतकरी रविंद्र हरी साखरकर, मौजा मोखाळा येथील प्रशांत खिरटकर व बबलू खिरटकर यांच्या शेतातील वाण केडीएस-726, फुले संगम, फुले दुर्वा, पिडीकेवि-अंबा या वाणांची पाहणी करून सोयाबिन पिकावरील किड व पिवळा मोझॅकबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनतर खेमजई येथील शेतकरी चंद्रहास मोरे यांच्या शेतातील सोयाबीन पिकवाण केडीएस-726 ची पाहणी करून व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केले.

     

    शेतकरी रविंद्र हरी साखरकर यांच्या शेतामध्ये सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅकचा प्रादुर्भाव आढळून आला असून सदर प्रादुर्भाव एक ते दोन झाडांवर असते. वेळीच शेतकऱ्यांना प्रादुर्भाव झालेली झाडे मुळापासून उपटून जमिनीमध्ये गाडुन टाकण्याच्या सूचना यापूर्वीच कृषि सहायक यांनी दिल्या होत्या. परंतू, शेतकऱ्यांनी झाडे उपटून न टाकल्यामुळे पिवळा मोझॅक शेतात पसरण्यास सुरूवात झाली आहे.

     

     असे करा व्यवस्थापन :

     

    शेतात पिवळा मोझॅक रोगाची लागण दिसताच रोगग्रस्त झाडे समूळ उपटून खड्यात पुरुन किंवा जाळून नष्ट करावीत. पिवळा मोझॅक या रोगाचा प्रसार पांढरी माशीद्वारे होत असल्याने या किडीच्या व्यवस्थापनाचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्यावर गेल्यास कीटकनाशके Thiamethoxam 12.6 टक्के + Lambda Cyhalothrin 9.5 टक्के ZC. 15 ml प्रति पंप किंवा Imidachloprid + beta-cyfluthrin 25 ml प्रतिपंप किंवा Indoxacarb + Acetamipride 15 ml किंवा Chlorantraniliprole + Lambdacyhlothrin 10 ml प्रति पंप किंवा Emametin benzoate + Novaluron 30 ml प्रतिपंप याप्रमाणे वरीलपैकी कोणतेही एक कीटकनाशक फवारणी साठी वापरावे. तसेच आपले पिक जोमदार व सशक्त असेल तर या रोगाचा प्रादुर्भाव कमी असतो,त्यामुळे पिकात हवा खेळती राहील व पीक सशक्त राहील याकडे लक्ष द्यावे. तसेच 12 इंच x 10 इंच आकाराचे हेक्टरी 10 ते 15 पिवळे चिकट सापळे लावावेत.  

     

    छायाचित्रात दर्शविण्यात आलेल्या सोयाबीन पिवळा मोझॅकग्रस्त झाडाचे सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी निरीक्षण करुन अशाप्रकारची झाडे आढळुन आल्यास तात्काळ उपटुन जमीनीत गाडुन टाकावित. जेणेकरुन, या रोगाचा प्रसार होणार नाही. या रोगाचा प्रसार पांढ-या माशीद्वारे अल्प कालावधीत मोठया प्रमाणावर व झपाट्याने होतो, त्यामुळे वेळीच खबरदारी घेणे आवश्यक आहे.

     

    शेतकरी बांधवानी शेतामध्ये सर्वेक्षण करून सोयाबीन पिकावर पिवळा मोझँक व्हायरस / हिरवा मोझँक व्हायरसचा प्रादुर्भाव नियंत्रीत करण्यासाठी वरील उपाययोजना कराव्यात, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.

  • सार्वजनिक गणेश मंडळांसाठी उत्कृष्ट गणेशोत्सव स्पर्धा

    News34 chandrapur

    चंद्रपूर : राज्य शासनाने, 19 सप्टेंबर 2023 पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने सांस्कृतिक कार्य विभागाकडून सदर स्पर्धा पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त सार्वजनिक गणेश मंडळांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

     

    पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूरक सजावट, ध्वनीप्रदुषण रहित वातावरण, सामाजिक सलोखा व देखावे, स्वातंत्र चळवळ किंवा शिवराज्यभिषेकाच्या 350 वर्षानिमित्त सजावट व देखावा, सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्य, वैद्यकीय कार्य, सांस्कृतिक स्पर्धा व कार्यक्रम अन्य क्रीडास्पर्धा आदी कार्याचा गौरव व्हावा, तसेच समाजाभिमुख उपक्रम अधिकाधिक घडावेत, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा 2023 आयोजित करण्यात आली आहे.

     

    या स्पर्धेसाठी मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या जिल्ह्यांतून प्रत्येकी 3 व अन्य जिल्ह्यांतून प्रत्येकी एक या प्रमाणे उत्कृष्ट 44 गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यात येईल. या 44 गणेशोत्सव मंडळांमधून राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास पाच लाख रुपयांचे, द्वितीय क्रमांकास अडीच लाख रुपयांचे, तर तृतीय क्रमांकास एक लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. उर्वरित 41 गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 25 हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येईल.

     

    उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे वेळापत्रक

     

    उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गणेश मंडळांना 15 सप्टेंबर 2023 पर्यंत स्पर्धेत अर्ज करता येईल. mahotsav.plda.@gmail.com या ई – मेलवर गणेशमंडळांनी अर्ज करावा. पु. ल. देशपांडे कला अकादमी तर्फे ई-मेलवर प्राप्त अर्ज संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाला 18 सप्टेंबरपर्यंत परीक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येईल.

     

    19 ते 28 सप्टेंबर दरम्यान जिल्हास्तरीय समितीचे सदस्य स्पर्धेत सहभागी गणेशोत्सव मंडळांचे प्रत्यक्ष भेटी देऊन परीक्षण करतील. व्हिडिओग्राफी आणि कागदपत्रे तपासून अभिप्रायासह गुणांकन करतील. जिल्हास्तरीय समिती जिल्ह्यातून एका उत्कृष्ट गणेश मंडळाची शिफारस 1 ऑक्टोबरपर्यंत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीला करेल. राज्यस्तरीय समिती राज्यातील उत्कृष्ट 3 गणेश मंडळाची शिफारस अकादमीला करेल. त्यानुसार कला अकादमी विजेत्या मंडळांची घोषणा करेल व 12 ऑक्टोबरला विजेत्या गणेश मंडळांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

     

    राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या 4 जुलै 2023 रोजीच्या शासन निर्णयात स्पर्धेचा तपशील, स्पर्धा निवडीचे निकष नमूद केले आहेत. तसेच अर्जही उपलब्ध करून देण्यात आला आहे. अर्जाच्या या नमुन्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु. ल. देशपांडे, महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई- मेल 15 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करावा. या स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी सहभाग नोंदवावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

  • चंद्रपूर परिमंडळात वीजबिल थकबाकी 488 कोटी 26 लाख

    News34 mseb

    चंद्रपूर – जुलै २०२२ ते ऑगस्ट २०२३ या कालावधीमध्ये चंद्रपूर परिमंडळातील चंद्रपूर व गडचिरोली ज्ल्हियातीतील तब्बल ४८ हजार ६१५ थकबाकीदारांना बत्ती गुल होण्याचा झटका बसला. यात ३४ हजार ८६६ तात्पुरत्या स्वरुपात तर १३ हजार ७४९ थकबाकीदार ग्राहकांचा कायमस्वरुपी वीजपुरवठा थकबाकीसाठी ख्ंडीत करण्यात आला.

     

    जुलै व ऑगस्ट २०२३ या दोनच महिण्यात ३ हजार १०३ थकबाकीदारांचा वीजपुरवठा ख्ंडीत करण्यात आला. वीजेशिवाय राहता न आल्यामुळे १७ हजार ५८८ ग्राहकांना पूणर्जोडणी शुल्क भरणा करुन वीजपुरवठा लगेच सुरळीत करुन घेतला. चंद्रपूर जिल्हयातील २९ हजार ३७१ तर गडचिरोली जिल्हयातील १९ हजार २४४ ग्राहकांचा वीजपुरवठा ख्ंडीत करण्याची कारवाई करण्यात आली.

     

    महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयातील घरगुती, वाणिज्यिक, औदयोगिक, सरकारी कार्यालये, सार्वजनिक पाणिपुरवठा योजना ईत्यादिंची थकबाकी ४८८ कोटी २६ लाखाच्या घरात पोहेाचल्याने थकबाकीदारांविरोधात वसुली व वीजपुरवठा खंडीत करण्याची मोहिम राबविण्यात येत असून महावितरणची आर्थिक स्थिती समजून घेवून ग्राहकांनी थकबाकी भरून महावितरण या आपल्याच कंपनीला सहकार्य करावे असे कळकळीचे आवाहन मुख्य अभियंता श्री.सुनिल देशपांडे यांनी केले आहे.

     

    चंद्रपूर परिमंडळात चालू वर्षातील व मागील वर्षाच्या एकंदरीत मागणीपैकी घरगुती ग्राहकांकडुन २० कोटी २१ लाख येणे आहे, तर वाणिज्यिक गाहकांकडुन ५ कोटी ३० लाख येणे आहे,औदयोगिक ग्राहकांकडुन ३ कोटी २८ लाख थकबाकी वसुली येणे आहे, ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा योजनांकडून ३ कोटी ३३ लाख येणे आहे.

    जिल्हानिहाय थकबाकी

    चंद्रपूर जिल्हा – घरगुती ग्राहकांकडुन १४ कोटी ५६ लाख येणे आहे, तर वाणिज्यिक गाहकांकडुन ४ कोटी ४९ लाख येणे आहे,औदयोगिक ग्राहकांकडुन २ कोटी २५ लाख थकबाकी वसुली येणे आहे, ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा योजनांकडून २ कोटी ९६ लाख येणे आहे.

     

    गडचिरोली जिल्हा -घरगुती ग्राहकांकडुन ५ कोटी ६५ लाख येणे आहे, तर वाणिज्यिक गाहकांकडुन ८१ लाख येणे आहे,औदयोगिक ग्राहकांकडुन १ कोटी ३ लाख थकबाकी वसुली येणे आहे, ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा योजनांकडून ३८ लाख येणे आहेत.

     

    नोटीशीची मुदतही संपल्यामुळे घरगुती ग्राहकांसोबतच आता पाणीपुरवठा योजना, थकबाकीत असलेले सरकारी कार्यालये, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था व तत्सम थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात येत आहे. त्यामुळे वर्षभरात या सर्व वर्गवारीतील थकबाकीदार ग्राहकांविरोधात सातत्याने वीजपुरवठा ख्ंडीत करण्याची मोहिम सुरु करण्यात आली आहे.

    महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग यांनी ३१ मार्च २०२३ नुसार दिलेल्या आदेशान्वये १ ऑगस्ट २०२३ पासून महावितरणच्या रोखीत वीजबिल भरण्याच्या कमाल रकमेवर मर्यादा आहे. महावितरणचे सर्व ग्राहक (लघुदाब कृषी वर्गवारी सोडून) यांना दरमहा कमाल मर्यादेत केवळ ५ हजार रुपयांपर्यंतचे वीजबील भरता येणार आहे. तसेच लघुदाब कृषी वर्गवारीतील ग्राहकांना वीजबिल रोखीत भरण्यासाठीची दरमहा कमाल मर्यादा १० हजार एवढी राहणार आहे.

     

    महावितरणच्या वतीने वीजग्राहकांना www.mahadiscom.in या संकेतस्थळावर तसेच महावितरणच्या मोबाईल ॲपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पध्दतीने विनामर्यादा वीजदेयकाचा भरणा करता येवू शकतो. या प्रणालीची कार्यपध्दती महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या पध्दतीत ग्राहक वीजदेयकाचा भरणा क्रेडिट/डेबिटकार्ड, नेटबँकींग व युपीआय इत्यादी इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत करू शकतो. तसेच भारत बिल पेमेंट (BBPS) मार्फत देखील वीज बिल भरणा करता येऊ शकतो.

     

    या व्यतिरिक्त महावितरणने रु.५,०००/- पेक्षा जास्त बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना RTGS/NEFT द्वारे देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी लागणारी आवश्यक ग्राहक निहाय बँकेच्या माहितीचा तपशिल वीजबिलावर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. क्रेडिट कार्ड वगळता इतर सर्व पध्दतीने वीजबिल भरणा निशुल्क आहे. तसेच ऑनलाईन पध्दतीने देयकाचा भरणा केल्यास बिल रकमेच्या ०.२५ टक्के (जास्तीत जास्त रु. ५००/-) इतकी सवलत देखील देण्यात आलेली आहे.

    दिवसेंदिवस वीजेचा वापर वाढतच आहे व महावितरणच्या अस्तित्वासाठी ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक युनिटची वसुली अत्यावश्यक असून वसुल केलेल्या पैशातूनच वीजखरेदी करून महावितरण ग्राहकांप्रति जबाबदारी पार पाडत वीजखरेदी करून वीजपुरवठा करीत आहे ही वस्तुस्थिती आहे. वीजबिल वुसलीतून प्राप्त पैशामधून ८५ टक्के रककम वीजखरेदीवर केली जाते.

     

    महावितरण प्रथम वीजपुरवठा करते व नंतर वीजबिल देते. या उलट अनेक सेवासांठी आधी पैसे व नंतर सेवा असे असते. तरी पण वीजकंपनीच्या अभियंता कर्मचारी वर्गास मारहान, अपमान सहन करून ग्राहकांनी वेळेत वीजबिल भरणा अपेक्षित असतांना वसुलीसाठी त्यांच्या दारी जावे लागत आहे. वीजग्राहकांना २४ तास वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरण वीज निर्मिती कंपण्याकडून वीजखरेदी करते व वसुल झालेल्या पैशातूनच वीज खरेदी करत असते.

     

    वीज निर्मिती कंपन्या कोळसा, नैसर्गिक तेल वीजनिर्मितीसाठी खरेदी करतात व त्यापण कोळसा व तेल कंपण्यांना पैसे देणे लागतात. परंतु वसुलीच झाली नाही तर हे चक्र पूर्णपणे कोलमडणार आहे .

  • धक्कादायक चंद्रपुरात 2 वाघांच्या बछड्याचा मृत्यू

    News34

    चंद्रपूर – जिल्ह्यातील बल्लारपूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या कळमना उपक्षेत्रात वन कर्मचारी गस्तीवर असताना 2 वाघांचे बछडे त्यांना मृतावस्थेत आढळले व एका बछड्याला वनविभागाने रेस्क्यू केले.

     

    7 सप्टेंबरला वन कर्मचारी कळमना उपक्षेत्रातील वनखंड क्रमांक 572 मध्ये एक वाघाचा अशक्त बछडा आढळला, त्यानंतर परिसरात शोध मोहीम राबविली असता 2 वाघांचे बछडे मृतावस्थेत आढळले.

     

    अशक्त वाघाला वनविभागाने रेस्क्यू करीत त्याला वन्यजीव उपचार केंद्र ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात आणले आहे, सदर बछडा हा मादी असून त्याचे वय अंदाजे 5 महिने आहे.

     

    मृत वाघांचे बछडे ताब्यात घेत शवं विच्छेदन करीता पाठविण्यात आले असून अहवाल प्राप्त झाल्यावर त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत नेमकी माहिती मिळेल.

     

    वन विभागानुसार सदर बछडे हे वाघिणीसोबत असल्याची माहिती आहे, मात्र वाघीण शिकार करण्यासाठी गेली असल्याने हे बछडे भरकटले असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, सध्या वनविभाग वाघिणीचा शोध घेत आहे.

     

    सदर प्रकरणाचा तपास श्वेता बोड्डू उपवनसंरक्षक मध्य चांदा, शेख तौसिफ शेख हैदर सहायक वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली नरेश भोवरे वनपरिक्षेत्र अधिकारी बल्लारपूर करीत आहे.

  • चंद्रपुरात ओबीसी संघटनांची महापंचायत

    News34

    चंद्रपूर – सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा वाद पेटला आहे, मराठा समाजाला ओबीसी समाजातून कुणबी प्रमाणपत्र द्वारे आरक्षण देण्याचा डाव सुरू आहे, त्याला हाणून पाडण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ तर्फे चंद्रपूर शहरात ओबीसी महापंचायतीचे आयोजन करण्यात आले आहे.

     

    मराठा समाजाला जर कुणबी प्रमाणपत्र दिल्यास सर्व ओबीसी जाती संघटनेवर त्याचा परिणाम पडण्याची शक्यता आहे, याकरिता मराठा समाजाला आरक्षणाला ओबीसी समाजाचा विरोध नाही, मराठा समाजाला आरक्षण द्यावे पण ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता त्यांना सरकारने आरक्षण बहाल करावे अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने यापूर्वी केली होती.

     

    मात्र सरकार त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी हालचाल करीत आहे त्यामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का पोहचू शकतो, यावर आता ओबीसी समाजाने जागृत व्हावे यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे चंद्रपूर शहरात 8 सप्टेंबरला सरदार पटेल महाविद्यालय जवळील IMA हॉल मध्ये ओबीसी महापंचायतीचे आयोजन सायंकाळी 4 वाजता करण्यात आले आहे.

     

    या महापंचायतीमध्ये ओबीसी समाजातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन सचिन राजूरकर महासचिव राष्ट्रीय ओबीसी महासंघ व ओबीसी संघटना व सर्व जातीय संघटनांनी केले आहे.

  • मूल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची वर्षभरात उचलबांगडी

    News34 गुरू गुरनुले

    मुल – नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर न.प. निवडणुका लांबणीवर गेल्याने न.प. वर प्रशासकीय राजवट आली. प्रशासकीय अधिकारी म्हणून मुल येथील उपविभागीय अधिकारी यांचेकडे न.प. चा कार्यभार आला मागील दिनांक ३० आगाष्ट २०२२ पर्यंत प्रशासकीय राजवट होती नंतर १/९/२०२२ रोजी मूल नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून अजय पाटणकर यांनी पदभार स्वीकारला आणि १ वर्ष ४ दिवसातच पाटणकर यांची रहिमतपूर जिल्हा सातारा येथे प्रशासकीय कारणास्तव मुख्याधिकारी याच रिक्त जागेवर असलेल्या जागेवर तातडीने बदली करण्यात आली आहे.

     

    स्थानिक लोकप्रतिनिधी कार्यरत नसतांना सगळा भार सांभाळण्याची जबाबदारी मुख्याधिकारी अजय पाटणकर यांचेवर येताच नियुक्त पदाधिकारी नसल्याने त्यांनी प्रशासकीय कार्यभार फक्त एक वर्ष ४ दिवस पूर्ण केला.

     

    पाटणकर यांचा कार्यकाळात नगरातील बरीच कामे पार पाडली. नगरातील सामाजिक संस्थांना सहकार्य केले. कार्यालयीन अंतर्गत भानगडी व्यवस्थित रित्या हाताळल्या अतिशय शांत संयमी आलेल्या नागरिकांचे तक्रारी समजून घेऊन जनतेचा समाधान करीत असत.

     

    कार्यभार परिणामकारक राहिला नसला तरीही तो अविश्वसनीयही नव्हता. हीच त्यांची जमेची बाजू म्हणावी लागेल. कर्मचारी वर्गाला विश्वासाने सांभाळून नेणारा अधिकारी म्हणून आपली जबाबदारी त्यांनी पार पाडली अशी कर्मचाऱ्यांत चर्चा केली जात आहे.
    पाटणकर यांच्या रिक्त जागेवर कुणाची वर्णी लागते हा नगरांत आणि नगरवासीयांत चर्चेचा विषय राहणार आहे.

     

    मूल नगरपरिषदेच्या आजवरच्या इतिहासात पूर्णकालीन मुख्याधिकारी फार क्वचितच मिळाला आहे, ही परंपरा अजूनही किती काळ सुरुच राहणार आहे सांगता येत नाही. परंतु प्रभारीं पदाच्या भरवशावर मुल नगर परिषदेचा गाडा गाडा हाकणे एवढेही सोपे नाही? अशा प्रतिक्रिया नगरात केल्या जात आहे.

     

    यापूर्वीही काही पूर्ण कालीन मुख्याधिकारी इथे आले असून उत्तम अधिकारी म्हणून विकास कामे करण्याचे प्रयत्न केले परंतु स्थानिक पदाधिकाऱ्यांना असे करणे पचनी पडले नाही. त्यामुळे अल्पावधीतच आल्या पावली परत जावे लागले असा इतिहास राहिला आहे.

  • चंद्रपुरात आज रंगणार दहीहंडी स्पर्धेचा थरार

    News34 dahi handi 2023

    चंद्रपूर – जन्माष्टमी चा सण आज देशभरात उत्साहात साजरा करण्यात येत आहे, या उत्साहाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी चंद्रपुरात शिवसेना ठाकरे गटातर्फे भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

     

    चंद्रपूर शहरात प्रथमच शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन केल्याने जिल्ह्यातील गोविंदा यांना यामध्ये सहभागी होण्याची संधी चालून आली आहे.

     

    7 सप्टेंबर ला रामनगर सिंधी पंचायत मैदानावर सायंकाळी 5 वाजता या स्पर्धेचा रोमांचक थरार नागरिकांना बघायला मिळणार आहे, सोबतच गोविंदाच्या चमुला रोख 1 लक्ष रुपयांचे बक्षीस सुद्धा शिवसेनेतर्फे जाहीर करण्यात आले आहे.

     

    गोविंदा पथकाची दहीहंडी फोडण्याची चुरस बघण्यासाठी असंख्य नागरिकांनी उपस्थित राहून जन्माष्टमी चा उत्साह द्विगुणित करण्याचे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी केले आहे.

  • चंद्रपूर जिल्हा शांतता समितीमध्ये पत्रकारांची एंट्री

    News34

    चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हास्तरीय शांतता समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीवर जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये पत्रकार प्रशांत विघ्नेश्वर आणि श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मजहर अली यांचा समावेश आहे.

    या समितीचे सदस्य म्हणून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, सर्व आमदार, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा, शिक्षण, समाजकल्याण, जिल्हा पत्रकार संघाचे प्रतिनिधी, जिल्हा साहित्य संघाचे प्रतिनिधी, जिल्हा विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी आणि जिल्हा महिला संघटनेचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे.

    या समितीचे मुख्य कार्य म्हणजे जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखणे. यासाठी समिती वेळोवेळी बैठका घेऊन कायदेशीर मार्गाने आवश्यक उपाययोजना करेल.

    पत्रकार प्रशांत विघ्नेश्वर हे जिल्ह्यातील एक प्रतिष्ठित पत्रकार आहेत. ते चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचे उपाध्यक्ष आहेत. मजहर अली हे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत.
    या नियुक्तीमुळे जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.