चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी कांग्रेसचे सर्व पदाधिकारी अजित पवार गटात जाणार

News34 politics

चंद्रपूर – राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटातून बाहेर पडत अजित पवार यांनी भाजप व शिंदे गटासोबत हातमिळवणी करीत सत्तेत सहभागी झाले, अजित पवार यांच्या निर्णयाने अनेक बडे नेते शरद पवार गटाला रामराम करीत निघून गेले.

अजित पवार गटाने चंद्रपुर जिल्ह्यात जोरदार मुसंडी मारली असून राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर, चंद्रपूर शहर राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष राजीव कक्कड सहित शहर राष्ट्रवादी कांग्रेसचे पदाधिकारी, चंद्रपूर जिल्ह्यातील 12 तालुक्यातील पदाधिकारी नगरसेवक व कार्यकर्त्यांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

मागील अनेक वर्षांपासून चंद्रपूर राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात कुजबुज सुरू होती, अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडली व भाजप-सेना सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले, त्यामुळे जिल्ह्यातील समस्यांचे निराकरण होणार तरी कसे याबाबत अनेक पदाधिकारी चिंतेत होते, व मागील अनेक वर्षांपासून चंद्रपूर राष्ट्रवादी कांग्रेस च्या जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे राजेंद्र वैद्य यांच्याकडे असल्याने नव्या नेतृत्वाला संधी मिळत नव्हती म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी कांग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

यासाठी सर्व पदाधिकारी, तालुकाप्रमुख व कार्यकर्ते अजित पवार गटाच्याया बैठकीसाठी नागपूरला रवाना झाले आहे.

मोठ्या संख्येतून चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी कांग्रेसचे पदाधिकारी अजित पवार गटात जात असल्याने शरद पवार गटाला हा मोठा हादरा मानला जात आहे, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आता चंद्रपुरातील राष्ट्रवादी कांग्रेसला नवसंजीवनी देणार काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *