Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • चंद्रपूर जिल्ह्यात व्हिडीओ गेम पार्लर ने घेतला युवकाचा बळी

    News34 chandrapur

    चंद्रपूर – News34 च्या बातमीनंतर जिल्ह्यातील नियमबाह्य व्हिडीओ गेम पार्लर वर प्रशासनाने फास आवळण्याचे काम सुरू केले आहे, मात्र आजही या जुगाराला युवक बळी पडत आहे, वरोरा येथे व्हिडीओ गेम खेळून पैसे हरलेल्या युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

    25 सप्टेंबरला रविवारी दुपारी 12 वाजता 34 वर्षीय नीरज मेश्राम यांनी कमाईचे पैसे व्हिडीओ गेम पार्लर मध्ये जाऊन हरला, त्याला पार्लर मध्ये आधीपासून गेम खेळण्याचा छंद होता, या छंदाने त्याच्यावर बँकेचे कर्ज सुद्धा झाले होते, आपण गेम खेळून काही पैसे जिंकू व बँकेचे कर्ज फेडु अशी भावना नीरज च्या मनात होती मात्र तो पैसे हरला आणि नैराश्यापोटी त्याने रेल्वेखाली उडी मारत आत्महत्या केली.

     

    आझाद वार्डात राहणारा नीरज हा रत्नमाला चौकात मुरमुरे व चणे फुटाणे विकायचा, काही पैसे मिळाले को तो सरळ व्हिडीओ गेम पार्लर मध्ये जायचा, यामध्ये त्याने अनेकदा पैसे सुद्धा हरले, दुचाकी वाहन घेण्यासाठी त्याने बँकेतून कर्ज काढले होते, मात्र ते पैसे सुद्धा नीरज व्हिडीओ गेम पार्लर मध्ये हरला.

    आता बँकेचे कर्ज कसे फेडणार ही बाब त्याला खटकू लागली, यामुळे तो मानसिक तणावात गेला आणि रविवारी रेल्वेखाली उडी घेऊन नीरज ने आत्महत्या केली. नीरज च्या पत्नीने व्हिडीओ गेम पार्लर च्या नावाखाली सुरू असलेल्या जुगारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

     

    जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी व्हिडीओ गेम पार्लर चे परवाने तपासण्याची मोहीम सुरू केली आहे, मात्र आधीच परवाने नूतनीकरण नसल्याने या तपासणी नंतर कारवाई काय होणार यावर सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

     

    अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या ह्या जुगाराने अनेकांचे संसार उध्वस्त केले आहे, विशेष म्हणजे काही गेम पार्लर चालकांनी व्हिडीओ गेम खेळल्यानंतर पैसे न दिल्याने अनेकांच्या मालमत्ता हिसकावल्या आहे, नागरिकांना मूर्ख बनवून अनेक गेम पार्लर संचालकांनी कोट्यवधी रुपयांची माया जमविली आहे.

     

    जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी ज्या नागरिकांच्या मालमत्ता जप्त झाल्या आहे त्यांनी पुढे यायची विनंती केल्यास असंख्य नागरिक जिल्हाधिकारी यांच्यापुढे हजर होतील.

  • मोबाईलवरून भांडण झाले आणि त्याने केलं असं भयावह

    News34 chandrapur

    गुरू गुरनुले

    मूल : कौटुंबिक वादामधुन रागाच्या भरात एका युवकाने तलावात उडी घेवुन जीवन संपविल्याची घटना मूल शहरात घडली. गुलाब मारोती मंकीवार असे मृतकाचे नांव आहे.

     

    सावली तालुक्यातील चारगांव येथील रहीवाशी गुलाब मारोती मंकीवार (२८) हा मागील काही महीण्यांपासुन मूल येथील साईश्रध्दा रेस्टारंट येथे कामावर होता. नेहमी प्रमाणे दुपारी १२.३० वा. चे दरम्यान गुलाब जेवनासाठी म्हणुन कामावरून घरी आला. सवयीप्रमाणे गुलाब दारू पिवुन घरी आल्यानंतर त्याने पत्नीला मोबाईल मागीतला. गुलाबने यापुर्वी दोनदा मोबाईल नेवुन विकले असल्याने पत्नीने त्याला मोबाईल देण्यास विरोध केला. यावरून दोघांमध्ये भांडण झाले.

     

    भांडणाचे रूपांतर हातघाईवर आले. यावेळी मृतक गुलाबची आई, सासु आणि सासरे उपस्थित होते. पती पत्नीचा वादात त्यांनी मध्यस्थी करून गुलाबला समजावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान त्याला राग अनावर झाल्याने तो घरून धावत येवुन स्थानिक बस स्थानका लगतच्या तलावात उडी मारली.

     

    युवकाने तलावात उडी मारल्याचे समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश बंसोड यांनी सहका-यांसह घटनास्थळ गाठले. भोई समाजातील काही मंडळीच्या सहकार्याने तलावात शोध घेतल्यानंतर तब्बल दोन तासानंतर गुलाबचे पार्थीव गळाला लागले. शव विच्छेदना नंतर गुलाबचे पार्थीव त्याच्या कुटूंबियाचे स्वाधीन करण्यात आले.मृतकाला चार वर्षाची मुलगी आहे.

  • खोट्या बातम्या पसरवून आमची दिशाभूल करू नये

    News34 chandrapur

    भद्रावती : तालुक्यातील अरबिंदो रियल्टी ॲण्ड इंफ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमीटेड कंपनीने आपल्या टाकळी – जेना – बेलोरा उत्तर व दक्षिण कोळसा खाणीत उत्खननाचे काम सुरू करण्यापुर्वी प्रकल्पग्रस्तांना बाजारभावापेक्षा अधिक आर्थिक मोबदला देण्याची घोषणा केल्याचे वृत्तपत्रात छापून आले. मात्र भुसंपादनाच्या मोबदल्या संदर्भात प्रकल्पग्रस्तांसोबत कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नसून खोट्या बातम्या पसरवून कंपनीकडून आमची दिशाभूल करण्याचा प्रकार सुरू असल्याचे मत सहा ग्रामपंचायतींच्या प्रकल्पग्रस्त नागरिकांनी संयुक्त पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे. सोबतच संघर्ष समिती एकमताने ठरवेल तोच भुसंपादनाचा दर कायम राहिल तोपर्यंत कंपनीला कोणतेही काम सुरू करू देणार नाही असा ईशाराही प्रकल्पग्रस्तांनी दिला. रविवारी दुपारी बेलोरा गावातील पटांगणावर सहा ग्रामपंचायतीतील प्रकल्पग्रस्त नागरिकांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त नागरिक उपस्थित होते.

     

    अरबिंदो कंपनी व्यवस्थापनाकडून बेलोरा गावातील प्रकल्पग्रस्तांना एकरी २२ लाख रूपये व नोकरी देणार असल्याची माहिती वृत्तपत्रातून मिळाली. मात्र भुसंपादनाकरिता उपविभागीय कार्यालय वरोरा तसेच तहसिल कार्यालय भद्रावती येथे वेळोवेळी घेण्यात आलेल्या बैठकांमध्ये भुसंपादनाबद्दल कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नसून १८ सप्टेंबर रोजी तहसिल कार्यालय भद्रावती येथे तहसीलदार व उपविभागीय अधिकारी वरोरा यांनी घेतलेली बैठक ही बेकायदेशीर असून कंपनी व प्रशासनाकडून गावकऱ्यांवर दबाव आणला जात असल्याचे मत यावेळी प्रकल्पग्रस्तांकडून व्यक्त करण्यात आले.

     

    कंपनीने प्रकल्पग्रस्तांना प्रती एकर ५० लाख रूपये तसेच एका सातबारा वर एक नोकरी व ज्याला शेती नाही त्यांना घराच्या आधारे नोकरी द्यावी. पुनर्वसन हे चंद्रपूर नागपूर महामार्गालगत करण्यात यावे. कंपनीने पुनर्वसन संघर्ष समितीसोबत चर्चा करून निर्णय घ्यावेत अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. कंपनीने हेतूपुरस्पर खोट्या बातम्या प्रसारित करून गावकऱ्यांची दिशाभूल करू नये. अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहिल असा ईशाराही यावेळी देण्यात आला. अजूनपर्यंत भूसंपादनाचा प्रश्न सुटला नाही. मात्र कंपनी खड्ड्यांमधून पाणी काढण्याची (डीवॉटरिंग)ची परवानगी मागत आहे. पाणी काढल्यानंतर कंपनी कोळसा काढून विकणार असून हा कंपनीचा नियोजनबद्ध कार्यक्रम असून मागण्या मान्य झाल्याशिवाय कंपनीला कोणतेही काम करू देणार नसल्याचे प्रकल्पग्रस्तांनी सांगितले.

     

    पत्रकार परिषदेत बेलोरा येथील सरपंच तथा संघर्ष समितीच्या अध्यक्ष संगीता देहारकर, जेना येथील सरपंच प्रभा बोढाले, पानवडाळा येथील सरपंच तथा अखिल भारतीय सरपंच परिषद भद्रावती तालुकाचे अध्यक्ष प्रदिप महाकुलकर, जेना येथील उपसरपंच बंडू आसुटकर, किलोनी येथील माजी सरपंच अजीत फाळके, ग्रा.पं टाकळी बेलोराचे प्रवीण देऊरकर, विठ्ठल पुनवटकर, प्रवीण ठोंबरे व भद्रावती तालुक्यातील टाकळी, जेना, पानवडाळा, कढोली, कान्सा, डोंगरगाव या सहा ग्रामपंचायतीतील प्रकल्पग्रस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • चंद्रपुरात राज्य सरकारची प्रेतयात्रा

    News34 chandrapur

    चंद्रपूर – ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये, व इतर मागण्या घेऊन रवींद्र टोंगे या युवकाने 11 सप्टेंबर पासून उपोषण सुरू केले. टोंगेची हृदयगती, रक्तदाब आणि साखरेची पातळी खालावल्याने त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे.दिनांक 22 सप्टेंबर उपोषण स्थळी विजयराव बलकी व प्रेमानंद जोगी यांनी अन्नत्याग करत उपोषण सूरू केले.असे असताना राज्य शासनाने अद्याप यावर कुठलाही ठोस निर्णय जाहीर केला नाही किंवा आश्वासन दिले नाही. त्यामुळे हे आंदोलन आणखी तीव्र करण्याकरिता आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी दिला आहे.

     

    चौदा दिवसांनंतरही राज्य शासनाने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे ओबीसी समाजातर्फे सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा ऍड. दत्ता हजारे, ऍड. पुरुषोत्तम सातपुते,नंदू नागरकर, राजू बनकर यांनी तिरडी काढून केंद्रीय ओबीसी आयोग अध्यक्ष हंसराज अहिर, राज्याचे वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व आमदार किशोर जोरगेवर यांच्या निवासस्थानावर राज्य सरकारची प्रतिकात्मक तिरडी काढण्यात आली.

     

    पोलिसांनी शिक्षक मतदारसंघाचे आमदार सुधाकर अडबाले सहीत, दिनेश चोखारे,बबनराव फंड ,अनिल धानोरकर,रवींद्र शिंदे, सतीश भिवगडे, राजेश नायडू,पप्पू देशमुख,कुणाल चहारे, महेश खंगार,प्राअनिल शिंदे, निलेश बेलखेडे, अनिल डहाके, राहूल चौधरी,गणेश आवारी ,पांडुरंग टोंगे,राजेश बेले,सचिन निंबाळकर, रंजित डवरे ,गोपाल अमृतकर, डॉ. किशोर जेणेकर, धनराज आस्वले, विलास माथणकर, सुनील वाढई, भालचंद्र दानव,पारस पिंपळकर, मनीष बोबडे,गोमती पाचभाई,मायताई ठावरी, कुसुम उदार,विद्याताई वडस्कार, मंजुषा मालेकर, देवा पाचभाई,गणेश झाडे,योगेश बोबडे, अक्षय येरगुडे, विनोद निब्रड,बाळा पिंपळशेंडे,अशोक उपरे, भाऊराव झाडे, भाविक येरगुडे,राहुल भोयर सहीत अनेक ओबीसी कार्यकर्त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले.

     

    या प्रतिकान्मक तिरडी नंतर प्रा सूर्यकांत खनके व सतीश मालेकर यांनी मुंडण करवून घेत राज्य सरकार चा जाहीर निषेध व्यक्त केला. कोड -२५ सप्टेंबरला सर्व तालुकास्थळी साखळी उपोषण आंदोलन व ३० सप्टेंबरला चंद्रपूर जिल्हा बंद करण्याचा निर्णय राष्ट्रिय ओबीसी महासंघ , ओबीसी संघटनांनी व सर्व जातीय संघटना यांनी घेतला आहे.

  • शेतकऱ्यांचे अश्रु पुसण्यासाठी सरसावले सुधीर मुनगंटीवार

    News34 chandrapur

    चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे हातची पिके निसटलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रु पुसण्यासाठी व त्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार सरसावले आहेत. यासंदर्भात त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर चंद्रपुरात प्रथमच हा रोग आढळून आल्याने एक विशेष पॅकेज चंद्रपूर जिल्ह्यासाठी जाहीर करावा अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना केलेली आहे.

     

    चंद्रपूर जिल्ह्यातील ६७.७६६ हेक्टरवर सोयाबीनची लागवड होते. वरोरा, भद्रावती, चिमुर, राजुरा, कोरपना, गोंडपिपरी, पोंभुर्णा या तालुक्यांमध्ये हे पीक घेतले जाते. या पिकावर ऑगस्टच्या सुमारास पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला. कृषी विभागाने प्रयत्न करून या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी मोहिमही हाती घेतली. परंतु १५ ते १८ सप्टेंबरच्या आसपास अचानक सोयाबीनचे पिक काळवंडले. पावसाचा खंड, वाढलेले उष्णतामान आणि रोगाचा प्रादुर्भाव यामुळे हे घडल्याचे कृषी तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

     

    चंद्रपूर जिल्ह्यातील ही परिस्थिती कळताच ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी राजुरा तालुक्यातील खामोना,पांढरपौनी,हरदोणा ( खु.) येथील शेतशिवरात सोयाबीन पिकावरील रोगामुळे नुकसानग्रस्त भागांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. त्यावेळी त्यांनाही पिकांवर मळकुज, खोडकुज व रायझोक्टोनिया एरीयल ब्लॉईट या रोगांचा प्रादुर्भाव आढळला. या रोगामुळे दोनच दिवसात सोयाबीनचे पीक पिवळे पडले होते. या पाहणीच्या वेळी जिल्हा कृषी अधिकारी शंकर तोटावार, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदार सुदर्शन निमकर, सुनिल उरकुडे, अजय राठोड, अरुण मस्की, हरीदास झाडे, वामन तुरानकर, दिलीप गिरसावळे, कृषी सहाय्यक डांगे हे उपस्थित होते.

     

    एकूण हवामान व रोगांच्या प्रादुर्भावामुळे ना. श्री. मुनगंटीवार यांना अनेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव व डोळ्याच्या कडा पाणावलेल्या दिसल्या. त्यामुळे त्यांनी तातडीने यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना पत्राद्वारे नुकसाभरपाईची मिळण्यासाठी साद घातली. कृषिमंत्री धनंजयजी मुंडे यांनाही पत्र पाठविले . मृदा संतुलनात मोठा बिघाड निर्माण झाला आहे. हे संतुलन पुन्हा निर्माण करण्याचे मोठे आव्हान यंत्रणेपुढे आहे. सोयाबीनवर तीन प्रकारचे रोग सध्या आहेत. यासंदर्भात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संशोधकांना बोलावून या रोगांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात येणार असल्याचे यावेळी ना. श्री. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. पीक नुकसानीसंदर्भात आपण जिल्हाधिकाऱ्यांनाही सूचना केल्या आहेत. नुकसान भरपाईचा प्रस्ताव तयार करताना तो पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बाजुने असला पाहिजे, शेतकऱ्यांच्या फायद्याचा असला पाहिजे अशा सूचना प्रशासनाला दिल्याचेही ना. श्री. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

     

    याबाबत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची चंद्रपूर जिल्ह्यातील परिस्थिती दयनीय झाल्याचे त्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे यांच्या निदर्शनास आणुन दिले. नैसर्गिक आपत्ती व रोगांचा प्रादुर्भाव यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या संकटाच्या मालिकेत सापडला आहे. त्यातून शेतकऱ्यांना बाहेर काढणे नितांत गरजेचे असल्याचे नमूद करीत ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे नुकसान भरपाईसाठी विशेष पॅकेज जाहीर करण्याची आग्रही मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या मागील हरभरा पिकाचेही गारपिटीमुळे नुकसान झाले होते याशिवाय ५० हजार रुपये नियमित कर्ज भरणाऱ्यांपैकी काहींच्या खात्यात तांत्रीक कारणाने रक्कम जमा झाली नव्हती, ती रक्कम जमा करण्याबाबतही ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री व कृषिमंत्री यांचे लक्ष वेधले.

  • 28 सप्टेंबरला चंद्रपुरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

    News34 chandrapur

    चंद्रपूर : शहरात सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जनाचा कार्यक्रम दि. 28 सप्टेंबर 2023 रोजी पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येत आहे.

     

    मुंबई पोलीस अधिनियम-1951 च्या कलम 33 (1)(ब) नुसार सार्वजनिक ठिकाणाची रहदारी व सुव्यवस्था राखण्यासाठी व करावयाच्या नियमनासाठी शहरामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जनाच्या कार्यक्रमाच्या रहदारीला अडथळा होऊन जनतेला त्रास होवू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणुन चंद्रपूर शहरातील मुख्य मिरवणुकीचा मार्ग दि. 28 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजेपासुन ते दि. 29 सप्टेंबर रोजीचे पहाटे 6 वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी सर्व प्रकारच्या वाहनांची रहदारी वळविण्यात येत आहे, असे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी कळविले आहे.

     

    गणेश विसर्जन मुख्य मिरवणुक सोहळा पार पडेपर्यंत प्रियदर्शनी चौक ते जटपुरा गेट-कस्तुरबा चौक मार्गे गांधी चौक ते जटपुरा गेट मार्गे, रामनगर रोड मार्गे संत केवलराम चौक-इरई नदी (दाताळा पुल) हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांना बंद करण्यात येत आहे.  नागपूर रोडने येऊन बल्लारशा किंवा मुलकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने ही प्रियदर्शनी चौकाकडे जाण्यास बंदी करून सर्व प्रकारची वाहने ही वरोरा नाका उड्डानपूल-सावरकर चौक ते बंगाली कॅम्प, मुल किंवा बल्लारशाकडे जातील.

     

    मुल किंवा बल्लारशाकडुन नागपूरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने ही बंगाली कॅम्प -सावरकर चौक, वरोरा नाका नवीन उड्डाणपुल मार्गे नागपूरकडे जातील. नागपूरकडुन शहरामध्ये जाणारी सर्व वाहने (जड वाहने वगळून) छोटा नागपुर मार्गे दाताळा चौक-देवाळा गांव-चोराळा टी पॉइंटवरून बिनबा गेट किंवा पठाणपुरा गेट मधुन शहरात प्रवेश करतील. चंद्रपुर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील रहीवाशांनी नागपुर, वणी, घुग्घुस व गडचांदुरकडे जाण्याकरीता रहमत नगर, नगीनाबाग व इतर परीसरातुन जाण्यासाठी बिनबा गेट-चोराळा-दाताळा आदी मार्गाचा अवलंब करावा.  बल्लारशा व मुलकडुन येणा-या सर्व वाहनांना (जड वाहने वगळून) शहरामध्ये जायचे असल्यास बसस्टँड-एलआयसी ऑफीस- बगड खिडकी मार्गे किंवा जुनोना चौकातुन शहरामध्ये किंवा प्रसन्ना पेट्रोल पॅम्पकडुन बाबुपेठ मार्गे शहरात फक्त अंचलेश्वर गेटपर्यंत प्रवेश करता येईल.

    या ठिकाणी असेल नो पार्किंग व ‘नो हॉकर्स झोन’:

    गणेश विसर्जन मुख्य मिरवणुक सोहळ्यादरम्यान “नो पार्किंग झोन” व ‘नो हॉकर्स झोन’ करण्यात आले आहे.

    यामध्ये, जटपुरा गेट ते कस्तुरबा चौकपर्यंत, जटपुरा गेट ते रामनगर रोड मार्गे दाताळा पुलपर्यंत, जटपुरा गेट ते प्रियदर्शनी चौकपर्यंत, कस्तुरबा चौक ते गांधी चौक ते जटपुरा गेटपर्यंत, कस्तुरबा चौक ते अंचलेश्वर गेटपर्यंत, गांधी चौक ते मिलन चौक ते जोड़ देऊळपर्यंत, कस्तुरबा चौक ते जेल रोड चौक पर्यंत, दस्तगीर चौक ते मिलन चौक,  मिलन चौक ते बजाज पॉलीटेक्नीक कॉलेज, पोटदुखे यांच्या घरापासुन ते श्री टॉकीज पर्यंत, हिंदी सिटी हायस्कुल ते रघुवंशी कॉम्प्लेक्सपर्यंत, मौलाना आझाद चौक ते जयंत टॉकीजपर्यंत, छोटा बाजार चौक ते पाताळेश्वर मंदीरपर्यंत “नो पार्किंग झोन” व ‘नो हॉकर्स झोन’ घोषित करण्यात आल्याने मिरवणुक व वाहतुक मार्गावर नागरीकांनी, व्यवसायिकांनी तसेच गणेश विसर्जन भक्तांनी कोणत्याही प्रकारची वाहने पार्किंग किंवा उभी करू नये.

     

    मुख्य मिरवणुक मार्गावर राहणाऱ्या रहीवाशांना स्वतःच्या पार्कीगकरीता जागा नसल्यास त्यांना आपली वाहने जुबली हायस्कुलचे पटांगण, महानगरपालीकेच्या बाजुला असलेली पार्किंग या ठिकाणी उभी करता येतील. परंतु मिरवणुक संपल्यानंतरच ती वाहने तेथुन काढता येतील. त्याचप्रमाणे, चंद्रपुर शहरात मोठ्या प्रमाणात साजरा होणारा गणपती विसर्जन सोहळा पाहण्यासाठी शहरातील व इतर ग्रामीण भागातून नागरीक येत असतात. दरम्यान शहरात वाहतुक कोंडी होवु नये म्हणुन नागरीकांना पार्किंग झोन उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

    चंद्रपूर शहरातील व इतर ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरीकांसाठी उपलब्ध पार्किंग झोन :

    चांदा क्लब ग्राउंड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, वरोरा नाका, सेंट मायकल हायस्कुल, नगीनाबाग सिंधी पंचायत भवन, संत केवलराम चौकजवळ रामनगर, व्यायाम शाळा ग्राउंड, पठानपुरा चौक, डी. एड. कॉलेज ग्राउंड बाबुपेठ, महाकाली मंदीर ग्राउंड, चंद्रपुर ही ठिकाणे दि. 28 सप्टेंबर 2023 चे सकाळी 6 वाजेपासुन ते दि. 29 सप्टेंबरचे सकाळी 6 वाजेपर्यंत नागरीकांसाठी पार्किंग स्थळे म्हणुन घोषीत करण्यात येत आहेत. नागरीकांनी आपली वाहने शहरात न आणता दिलेल्या पार्किंग स्थळी पार्क करावीत. जनतेने विसर्जनादरम्यान वाहतूक व्यवस्थेचे पालन करून शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी केले आहे.

  • चंद्रपुरात ओबीसी संघटना झाल्या आक्रमक

    News34 chandrapur

    चंद्रपूर : ओबीसी प्रवर्गातुन मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये या मागणीसाठी रवींद्र टोंगे हा युवक मागील बारा दिवसांपासून आमरण उपोषणाला बसला असताना याची राज्य शासनाने अद्याप ठोस अशी दखल घेतलेली नाही. त्यामुळे या आंदोलनाचे पुढचे पाऊल म्हणून ओबीसी समाजाच्या वतीने आज चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी काही वेळासाठी नागपूर-चंद्रपूर वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांच्यासह अनेक ओबीसी कार्यकर्त्यांना अटक केली. Fight for obc reservation

     

    मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देवू नये, यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी 11 सप्टेंबरपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले.

     

    मात्र काल बाराव्या दिवशी त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. त्यांची हृदयगती, रक्तदाब आणि शुगर पातळी खालावल्याने त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे. असे असताना राज्य शासनाने अद्याप यावर कुठलाही ठोस निर्णय जाहीर केला नाही किंवा आश्वासन दिले नाही. त्यामुळे हे आंदोलन आणखी तीव्र करण्याकरिता आज ओबीसी समाजाने चंद्रपूर-नागपूर महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले.

     

    आंदोलनात शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सचिव सचिन राजुरकर, बबनराव फंड होते. बैठकीला दिनेश चोखारे, नंदू नागरकर, प्रा. अनिल डहाके, निलेश बेलखेडे यांची उपस्थिती होती. जनता महाविद्यालय चौकात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडून आंदोलन सुरू केले. काही वेळ वाहतूक
    खोळंबली होती. मात्र यानंतर पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेणे सुरू केले.

    24 सप्टेंबरला शासन, लोकप्रतिनिधींची प्रेतयात्रा

    २४ सप्टेंबरला आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून प्रेतयात्रा काढण्यात येईल. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यंमत्री, बहुजन कल्याणमंत्री यांच्या प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली जाईल. त्यानंतर केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्या घरावर ओबीसी कार्यकर्ते ठिय्या देतील. २५ सप्टेंबरला चंद्रपूर जिल्ह्यातीस सर्व तालुकास्तरावर लाक्षणिक आंदोलन केले जाईल. ३० सप्टेंबरला चंद्रपूर जिल्हा बंद ठेवण्यात येणार आहे.

  • चंद्रपूर जिल्ह्यातील 4 अग्रगण्य डिजिटल News ची महायुती

    News34 chandrapur

    चंद्रपूर – जिल्ह्यात सध्या अनेक डिजिटल न्युज कार्यरत आहे मात्र जिल्ह्यातील इतिहासात प्रथमच 4 अग्रगण्य डिजिटल न्युज ने एकत्र येत एक नवा उपक्रम हाती घेतला आहे.

    सध्या राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात News क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या News34, Dig News, Mh24x7 व Parthshar Samachar यांनी एकत्र येत श्री गणेश विसर्जन शोभयात्रेचे थेट प्रक्षेपण करण्याचे ठरविले.

     

    विशेष बाब म्हणजे आपल्याला एकावेळी 4 Youtube चॅनेल वर ही शोभायात्रा बघता येणार आहे, यासाठी चारही news channel संचालकांनी उच्च तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

     

    थेट प्रक्षेपण मध्ये कसलाही केबल लावण्यात येणार नाही, या थेट प्रक्षेपणात सर्व काही आपल्या मोबाईल वर दिसणार आहे, श्री गणेश विसर्जन शोभयात्रेची संपूर्ण माहिती, प्रशासनाची मुलाखत आपल्याला एका क्लिक वर दिसणार आहे.

     

    या उपक्रमाला शहरातील प्रतिष्ठित नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांनी या तंत्रज्ञानाच्या नव्या उपक्रमाला आपल्या शुभेच्छा दिल्या आहे.

    4 डिजिटल news च्या या तंत्रज्ञानाने चंद्रपुरातील गणपती जगभरातील दर्शकांना थेट दिसणार आहे.

     

  • चंद्रपूर जिल्ह्यात असं काय घडलं? पोलीस अधीक्षकांना करावं लागलं हे आवाहन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – वन्यजीव व प्राण्यांच्या हैदोसाने शेतकऱ्यांच्या पिकांची नासधूस केल्या जाते त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते, त्यासाठी शेतकरी ताराच कुंपण करीत त्यामध्ये जिवंत विद्युत प्रवाह सोडतात ज्यामुळे अनेक नागरिकांनी आपला जीव गमावला आहे मात्र आता तशी चूक कराल तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे आवाहन पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी केले आहे.

     

    चंद्रपूर जिल्ह्या वन निसर्गाने वेढलेला जिल्हा आहे, अनेक वन्यप्राणी या निसर्गात वास्तव्यास आहे मात्र अनेकदा शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करण्यासाठी हे प्राणी शेतात जात पिकांची नासाडी करतात.

    या वन्य प्राण्यापासून पिकांचे संरक्षण व्हावे यासाठी शेतकरी शेतात जिवंत विद्युत प्रवाह सोडतात ज्यामुळे वर्ष 2022 ते ऑगस्ट 2023 पर्यंत तब्बल 13 नागरिकांनी आपला जीव गमावला आहे, सदर 12 प्रकरणात शेत मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, विशेष म्हणजे काही प्रकरणात स्वतः शेतमालकाला आपला जीव गमवावा लागला आहे.

     

    याकरिता शेत मालकांनी शेतात जिवंत विजेचा प्रवाह सोडु नये जर असे केल्यास या प्रकरणात भारतीय दंड संहिता कलम 304 सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊ शकतो, या गुन्ह्यात आजन्म कारावासाची शिक्षा होऊ शकते, त्याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील शेत मालकांनी असा प्रकार करू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी केले आहे.

  • चंद्रपूर मनसे वाहतूक सेनेचा जिल्हाध्यक्ष कोण?

    News34 chandrapur

    चंद्रपूर : मनसेच्या प्रदेश नेतृत्वाने दोन वर्षांपूर्वीच पदावरून उचलबांगडी केल्यानंतरही भरत गुप्ता हे जिल्हाध्यक्ष पदाचा गैरवापर करीत स्वत:ला जिल्हाध्यक्ष म्हणून मिरवित आहे. पक्षनेतृत्वाने चंद्रपुरात वाहतूक सेनेच्या नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मनसे वाहतूक सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदाशी भरत गुप्ता यांचा आता कोणताही संबंध नसून ते केवळ मनसेचे कार्यकर्ते आहेत. ते कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहेत, असा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष मनदीप रोडे, राहुल बालमवार यांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केला.

     

    भरत गुप्ता यापूर्वी मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष होते. दोन वर्षांपूर्वी वाहतूक सेनेची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करून त्यांना पदमुक्त करण्यात आले. यानंतरही ते जिल्हाध्यक्ष पदाचा वापर करीत होते. दोन महिन्यापूर्वी प्रदेश नेतृत्वावाने वाहतूक सेनेचे नवे पदाधिकारी जाहीर केले. यानुसार चंद्रपूर, बल्लारपूर आणि राजुरा या तीन विधानसभा क्षेत्रासाठी जिल्हा संघटक म्हणून महेश वासलवार यांची तर वरोरा, ब्रह्मपुरी आणि चिमूर या तीन मतदार संघाची जबाबदारी उमेश तिवारी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

     

    मात्र, भरत गुप्ता समाजमाध्यमे तसेच होर्डिंग्जवर स्वत:चा उल्लेख मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष असा करीत असल्याने पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, गुप्ता केवळ मनसेचे कार्यकर्ते आहेत. ते जिल्ह्यात कोणत्याही पदावर नाही, असे बालमवार आणि रोडे यांनी स्पष्ट केले.

     

    यानंतरही त्यांच्याकडून अनधिकृतपणे पदाचा गैरवापर होत राहिल्यास वरिष्ठांकडे तक्रार करू अशी माहिती अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला महेश वासलवार, उमेश तिवारी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.