Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • सुट्टीच्या दिवशी महावीतरणची ही सेवा सुरू राहणार

    News34 chandrapur

    चंद्रपूर / वीजबिल भरण्यास ग्राहकांना गैरसोईचे होऊ नये यासाठी सुट्टीच्या दिवशीही 30 सप्टेंबर व 1ऑक्टोबर या सुट्टीच्या दिवशीही जिल्ह्यातील सर्व वीजबिल भरणा केंद्रे सुरु ठेवण्यात आली आहेत. One plus कंपनीचे इअर बड्स फक्त 2 हजार रुपयात

     

    सोबतच वीजबिलांचा भरणा करण्यासाठी महावितरणद्वारा ग्राहकांना पर्यावरणपुरक ऑनलाईन पेमेंट, मोबाईल अॅप, गुगल पे,पेटीएम या यासारख्या ग्राहकाभिमुख सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून नियीमत ग्राहकांचा प्रतिसादही या सुविधांना चांगल्या प्रकारे लाभत आहे. iPhone 14 फक्त 62 हजार रुपयात त्वरा करा..

    ऑनलाईन पर्यांयाद्वारे वीजबिलांचा वीजदेयक भरल्यास वेळ व श्रमाची बचत होईलच सोबतच ०.२५ % डिजीटल पेमेंट सुट पण मिळेल. वीजग्राहकांनी घरबसल्या महावितरणची वेबसाईट, मोबाईल एप किंवा इतर ऑनलाईन पर्यांयाद्वारे वीजबिलांचा भरणा करून महावितरणची आर्थिक स्थिती समजून घेवून वीजबिल भरून महावितरण कंपनीला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

  • ओबीसी संघटनांची राज्याच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सोबत आज महत्वाची बैठक

    News34 chandrapur

    चंद्रपूर – मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात येऊ नये, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची व्यवस्था करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी चंद्रपुरात मागील 19 दिवसांपासून रविंद्र टोंगे, विजय बलकी व आजपासून प्रेमानंद जोगी हे आमरण उपोषणाला बसले आहे, तब्बल 19 दिवसांनी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात ओबीसी शिष्टमंडळाची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे.

     

    ओबीसी समाजाच्या विविध मागणीबाबत या बैठकीत चर्चा करण्यात येणार असून सदर बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुख्य सचिव महाराष्ट्र, ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी सचिन राजूरकर, दिनेश चोखारे, डॉ. संजय घाटे, पुरुषोत्तम सातपुते, अनिल डहाके, मनीषा बोबडे, बबलू कटरे, सूर्यकांत खनके, अनिल शिंदे हे उपस्थित राहणार आहे.

     

    मलबार हिल मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात 29 सप्टेंबर ला दुपारी 2 वाजता आयोजित या बैठकीत ओबीसी संघटनांच्या विविध मागण्यांवर काय चर्चा व तोडगा निघणार यावर सर्व ओबीसी संघटनांचे लक्ष लागले आहे.

  • चंद्रपुरातील हा जुगार कायमस्वरूपी बंद करा

    News34 chandrapur

    चंद्रपूर – जिल्ह्यात जोमात सुरू असलेल्या नियमबाह्य व्हिडीओ गेम पार्लर बाबत News34 ने बातमी प्रसारित केल्यावर प्रशासनाने कारवाईचा धडाका सुरू केला मात्र ठोस कारवाई अजूनही झाली नाही.

     

    विशेष बाब म्हणजे वर्ष 2022 पासून व्हिडीओ गेम पार्लर चे परवाने नूतनीकरण करण्यात आले नसल्याने आजही हे पार्लर सुरू आहे.

     

    आता या नियमबाह्य जुगाराची तक्रार थेट राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना करण्यात आली आहे, राष्ट्रवादी कांग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रियदर्शन इंगळे यांनी व्हिडीओ गेम पार्लर च्या नावाखाली सुरू असलेला जुगार कायमस्वरूपी बंद करावा अशी मागणी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली आहे, इंगळे यांनी तक्रारीची प्रत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कार्यालयाला पाठवली आहे.

     

    इंगळे यांनी निवेदनात म्हटले आहे की पूर्णतः सेट केलेल्या मशिनद्वारे पैसे लावण्यात येतात मात्र खेळणारा पैसे कधी जिंकत नाही, उलट तो पैसे हरतो, यामुळे अनेकांचे घरे उध्वस्त झाली आहे, काही युवकांनी या व्हिडीओ गेम पार्लर मुळे आत्महत्या केल्याच्या घटना सुद्धा घडल्या आहे.

     

    प्रत्येक वेळी जिल्हा प्रशासनातील अधिकारी मार्फत पार्लर च्या परवाना नुसार काही नियमांचा भंग तर होत नाही याबाबत तपासणी करण्याचा अधिकार आहे मात्र आजपर्यंत अशी तपासणी मोहीम राबविण्यात आली नाही.

     

    पोलीस प्रशासनाने कारवाई केल्यावर जिल्हाधिकारी यांनी तपासणी मोहीम राबवा असे आदेश दिले, त्यानंतर पार्लर धारकांची बैठक घेत नियमबाह्य व्हिडीओ गेम पार्लरवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले, मात्र ज्यांनी नियमांचा भंग केला ते सुद्धा त्या बैठकीत उपस्थित होते तर मग जिल्हाधिकारी कारवाईचा इशारा कुणाला देत होते? यामध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.

     

    प्रियदर्शन इंगळे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना चंद्रपुरातील व्हिडीओ गेम पार्लर कायमस्वरूपी बंद करावे अशी मागणी केल्याने पार्लर संचालकांचे धाबे दणाणले आहे.

     

    हरणाऱ्या व्यक्ती कडून पार्लर चालकांनी अनेकांचे दागिने व मालमत्ता गहाण ठेवल्याची सुद्धा माहिती इंगळे यांनी निवेदनामार्फत दिली आहे.

    अश्या जुगारावर कायमस्वरूपी बंदी घालावी अन्यथा भविष्यात अनेकांचे घरे उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही अशी मागणी इंगळे यांनी केली आहे.

  • कृषी महाविद्यालय मुल अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची बैठक संपन्न

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मुल – कृषी महाविद्यालय मुल द्वारा आयोजित डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची नववी बैठक दिनांक २० सप्टेंबर २०१३ रोजी येसगाव ता. मुल येथे संपन्न झाली. या प्रसंगी कृषी महाविद्यालय, मुलचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. एस. टेकाळे, शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्षमा विजय गुरनुले, शेतकरी बांधव तसेच कृषी महाविद्यालय, मुल येथील विषयतज्ञ मंडळी उपस्थित होती. या बैठकीत मुख्यत्वे ‘ खरीप पिकावरील किडी व रोगांची ओळख व योग्य नियोजन या विषयावर चर्चा करण्यात आली.

     

    याप्रसंगी किटकशास्त्रज्ञ डॉ. अर्चना बोरकर यांनी धानपिकावर खोडकिडीचे व तुडतुडे या किडींच्या व्यवस्थापनाबद्दल सविस्तर माहिती दिली. धान पिकाची प्रत्यक्ष पाहणी करून पाने गुंडाळणारी अळी व तुडतुडे प्रभावित झाडांवर त्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य उपाय सुचवले. तसेच किटकनाशकांचा अति वापर टाळावा व जैविक कीटकनाशकांचा वापर करावा असे सांगितले. डॉ. प्रविणा दरडे, वनस्पती रोगशास्त्रज्ञ यांनी कापूस, तूर आणि धान पिकावरील रोगांची ओळख कशी करावी व त्यांचे नियोजन कसे करावे या बद्दल सविस्तर माहिती पटवून दिली.

     

    कापूस, तूर आणि धान या पिकात रोग प्रसार होऊ नये म्हणून काय उपाययोजना कराव्या या बद्दल मार्गदर्शन केले. धान पिकाची प्रत्यक्ष पाहणी करून जीवाणूजन्य कहा करपा रोगाचे लक्षण दिसून आले व त्यावर डॉ. बरडे ह्यांनी उपाययोजना सुचविल्या. वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. दिनेश नवलकर यांनी शेतकन्यांनी विचारलेल्या प्रश्नानुसार प्रामुख्याने धान पिकात सद्यस्थितीत खर्गे पडत आहेत. त्याच्या नियोजनासाठी शेतकन्यांनी आपल्या शेतात दर दोन वर्षांनी डिसेंबर महिन्यामध्ये नांगरणी करावी म्हणजे खर्गे पडणार नाही असे सांगितले.

     

    कापसाच्या भारपोस उत्पादनासाठी नत्र, स्फुरद, पालाश आणि मॉग्नेशियम सल्फेट चा योग्य वेळी योग्य प्रमाणात वापर करावा असे सुचविले तसेच तूर आणि धान पिकातील अन्नद्रव्य कमतरतेवर सुद्धा उपाय सुचविले. कृषीविद्या शास्त्रज्ञ डॉ. विजय राऊत यांनी धान पिक सध्या दाने भरण्याच्या अवस्थेमध्ये असल्यामुळे योग्य पद्धतीने पाण्याचे नियोजन करावे सोबत तण नियंत्रण सुद्धा करावे याविषयी सविस्तर माहिती दिली. उद्यानविद्या शास्त्रश डॉ. स्वप्नील देशमुख यांनी शास्त्रीय पद्धतीने कांदा लागवड कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती दिली.

     

    तसेच फुलपीक लागवडीचे फायदे, फुलांच्या विविध जाती व त्यांची लागवडीची पद्धत याबद्दल माहिती दिली. सदर कार्यक्रमास एकुण २४ शेतकरी व शास्त्रज्ञ उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. विजय राऊत यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

  • चंद्रपूर गणेश विसर्जन सोहळ्यात दादागिरी

    News34 chandrapur

    चंद्रपूर – दरवर्षी उत्साहात पार पडणाऱ्या गणेशोत्सव विसर्जन सोहळ्याला यंदा गालबोट लावण्याचे काम करीत पोलीस उपनिरीक्षकाने सामान्य माणसाला बदडण्याचे काम केले आहे.

     

    हा प्रकार शहरातील प्रियदर्शिनी चौकात घडला, गणेशोत्सव विसर्जन सोहळ्याला लाखो नागरिक आपली उपस्थिती दर्शवितात त्यामुळे फेरीवाले सुद्धा पोटाची खळगी भरण्यासाठी आपली दुकाने लावतात.

     

    प्रियदर्शिनी चौकात चप्पल विक्रेत्याने आपली दुकान लावली मात्र त्यावेळी बंदोबस्तात असलेले रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शिवराज जाधव यांनी आपल्या खाकीचा जोर दाखवीत त्या चप्पल विक्रेत्याला दुकान तात्काळ बंद करण्यास सांगितले.

     

    दुकान विक्रेत्याने जाधव यांना विनवणी केली मात्र त्यांनी त्यांची विनवणी फेटाळून लावली, इतक्यात त्यांचे ओळखीचे व नात्यातील पत्रकार यांना कॉल लावला असता आपण थोडे साहेबांशी बोला म्हणत जाधव यांच्याकडे मोबाईल दिला, यावर जाधव हे चवताळले व कोण तो पत्रकार म्हणत त्याला आणा माझ्यापुढे असे म्हणत अश्लील शब्दात शिवीगाळी करीत चप्पल विक्रेता व त्याच्या मुलाला मारहाण करणे सुरू केले.

     

    आता पोलीस सरळ पत्रकारांना ही बदडण्याची भाषा करू लागले आहे, पोलीस उपनिरीक्षक जाधव यांचा इतिहास पूर्णतः वादग्रस्त आहे, मात्र त्यांनी दरवर्षी उत्साहात पार पडणाऱ्या गणेश विसर्जन सोहळ्याला गालबोट लावण्याचे काम करीत सामान्य नागरिकांवर खाकी ची दबंग गिरी दाखविण्याचे काम केले आहे.

     

    जिल्ह्यात व शहरात गुन्हेगारी वाढत आहे, त्यावर हे महाशय गंभीर नसतात मात्र विनाकारण कुणावरही वर्दीचा धाक दाखविण्यात मागे पडत नाही, सदरक्षणाय खलनिग्रहनाय या पोलीस विभागाच्या ब्रीद वाक्याचा अपमान हे पोलीस अधिकारी करू लागले आहे.

     

    विशेष म्हणजे जाधव हे आधी ब्रह्मपुरी, कोरपना, वाहतूक शाखा व त्यानंतर कंट्रोलमध्ये सेवा दिली मात्र त्यांचं कुठेही जमलं नाही अखेरीस ते रामनगर पोलीस स्टेशनमध्ये रुजू झाले पण आता त्यांनी हा प्रताप केला, जाधव साहेब नागरिकांना आया-बहिणीच्या शिव्या देऊन काय भेटणार आहे?

  • शासकीय महाविद्यालयातील रुग्णालयात डाॅक्टरांना मिळणार पोलिस सुरक्षा

    News34 chandrapur

    चंद्रपूर – रुग्णालयात रुग्णाच्या नातलगांनी डॉक्टराला मारहाण केल्याच्या निषेधार्थ शिकाऊ डॉक्टरांनी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आंदोलन सुरु केले होते. दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी आंदोलनकर्त्या डॉक्टरांची भेट घेत त्यांना रुग्णालयात अधिक पोलिस सुरक्षा देण्यात येणार असल्याचे सांगीतले आहे.

     

    यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्या मध्यस्ती नंतर डॉक्टरांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे. तर वेतन अदा न झाल्याने डॉक्टरांच्या दुस-या संघटनेने सुरु केलेले आंदोलन सुरुच आहे. याबाबतही वरिष्ट पातळीवर चर्चा करणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

     

    काल बुधवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन आंदोलनकरत असलेल्या डॉक्टरांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. नंतर लगेच त्यांनी रुग्णालय आणि पोलिस प्रशासन यांच्या अधिका-यांची बैठक घेत डॉक्टरांना सुरक्षा देण्याच्या सूचना केल्यात. या बैठकीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलींद फुलपाटील, वैद्यकीय अधिक्षक डॉ. निवृत्ती जिवने, उप वैद्यकीय अधिक्षक भुषण नैताम, प्रा. डॉ मिलींद कांबळे, प्रा. डॉ प्रशांत उईक, शहर पोलिस ठाण्याचे पालिस निरिक्षक राजपूत आदींची उपस्थिती होती.

     

    जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिकाऊ डॉक्टराला रुग्णांच्या नातलगांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

     

    पोलिसांनीही या प्रकरणी कार्यवाही केली आहे. मात्र या घटणेच्या विरोधात जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णालय परिसरात आंदोलन सुरु केले होते. याचा परिणाम आरोग्य सेवेवर दिसुन आला होता. याची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाउन डॉक्टरांशी चर्चा केली. येथे पुर्ण वेळ सहाय्य पोलिस दर्जाचा अधिकारी तैणात ठेवण्यात यावा, ओपीडी मध्ये दोन पोलिसांची तैनाती ठेवण्यात यावी डॉक्टरांना सुरक्षा देण्यात यावी अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी पोलिस प्रशासनाला केल्या आहे.

     

    तसेच यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंग परदेशी यांच्याशी दूरध्वनी वरुन चर्चा करत त्यांना संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आहे. त्यांनतर डाॅक्टरांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे. त्यामुळे आरोग्य सेवा पुन्हा सुरळीत झाली आहे.

  • चंद्रपुरात ऑटोवर ट्रक झाला पलटी, तिघांचा जागीच मृत्यू

    News34 chandrapur

    चंद्रपूर : बल्लारपूर – चंद्रपूर बायपास मार्गावर ट्रक एका ऑटो वर पलटला असता झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. तर तीन जखमी आहे. ही दुर्देवी घटना रात्री ७.३० वाजताच्या सुमारास घडली.

     

    मृतक मध्ये संगीता चाहांदे (५६, रा. गडचिरोली), अनुषका खेरकर (२२, र. बल्लारपूर), ऑटोचालक इरफान खान (वय ४९, बाबुपेठ) यांचा समावेश आहे.

     

    शहरातील अष्टभुजा मंदिराजवळील गोंदिया कडे जाणाऱ्या मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलावर सायंकाळी ७.३० वाजताच्या दरम्यान भिषण अपघात झाला असुन भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच ३४ एम १८१७ च्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला. नेमक्या त्याच वेळी शेजारून जाणारा एक ऑटो क्रमांक एम एच ३४ एम ८०६४ हा ट्रक खाली चिरडला गेल्याने ऑटोतील तीन प्रवाशी जागीच ठार झाले तर तिन लोकांना गंभीर दुखापत झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे.

     

    अपघाताची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असुन जखमी प्रवाशांना उपाचाराठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. बातमी लिहेपर्यंत पोलीस कार्यवाही सुरू आहे. जखमीमध्ये राजकला मोहूर्ले (वय ३४, रा. बाबुपेठ), गीता शेंडे (वय ५०, रा. तुकुम), दशरथ बोबडे (वय ५०, रा. वणी) यांचा समावेश आहे. घटनास्थळ गाठुन पीएसआय हिवसे यांनी पंचनामा केला.

  • नियमबाह्य व्हिडिओ गेम पार्लरवर सक्त कारवाई करणार – जिल्हाधिकारी विनय गौडा

    News34 chandrapur

    चंद्रपूर : News34 च्या बातमी नंतर जिल्ह्यातील व्हिडीओ गेम पार्लर वर प्रशासनाने कारवाईचा धडाका सुरू केला, मात्र त्यानंतर सुद्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात व्हिडीओ गेम पार्लर सुरू आहे.

     

    जिल्ह्यातील व्हिडिओ गेम पार्लर व कार्ड क्लब पार्लरबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यासोबतच परवानाधारकांकडून परवान्यातील अटी व शर्तीचे भंग होत असल्याचे देखील निदर्शनास आले आहे. याबाबत नियमबाह्य व्हिडिओ गेम पार्लर व कार्ड क्लब पार्लरवर सक्त कारवाई करणार असल्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आज दिले.

     

    जिल्ह्यातील व्हिडिओ गेम पार्लर व कार्ड क्लब परवानाधारकांची बैठक आयोजित करण्यात आली होती याप्रसंगी ते बोलत होते.

     

    यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन)दगडू कुंभार, बल्लारपूरच्या उपविभागीय अधिकारी स्नेहल रहाटे, मुलचे उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, नायब तहसीलदार गीता उत्तरवार, विधी अधिकारी राजेश दुबे तसेच व्हिडिओ गेम पार्लर व कार्ड क्लब परवानाधारक उपस्थित होते.

     

    जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, व्हिडिओ गेम पार्लरबाबत प्रशासनाला अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यासोबतच वरोरा येथे व्हिडिओ गेम खेळून पैसे हरल्याने एका युवकाने आत्महत्या केली, ही जिल्ह्यासाठी चांगली बाब नाही. व्हिडिओ गेम पार्लर परवानाधारकांनी परवान्यातील अटी व शर्तीनुसारच गेम पार्लर चालवावे. सदर पार्लरमध्ये जुगार खेळता कामा नये. तसे आढळून आल्यास नियमानुसार सक्त कारवाई केल्या जाईल, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी उपस्थित व्हिडिओ गेम पार्लर व कार्ड क्लब परवानाधारकांना दिले.

     

    तसेच काही व्हिडीओ गेम पार्लरमध्ये जुगार खेळल्या जात असल्याच्या तक्रारी देखील प्राप्त झाल्या असून संयुक्त पथकामार्फत तपासणी केल्या जाणार आहे. तपासणीअंती आढळुन आल्यास दोषींवर कार्रवाई करणार असल्याचे निर्देश बैठकीत दिले.

    जिल्हाधिकारी गौडा यांनी निर्देश दिले असले तरी बैठकीत उपस्थित असलेले पार्लर धारक यांचे परवाने नूतनीकरण झाले का? याबाबत आधी जिल्हाधिकारी यांनी माहिती घ्यावी, नियमांचे उल्लंघन कुणी केलं, ज्यांच्याकडे परवाने बाबत तपासणी मोहीम करण्याचे अधिकार आहे त्यांनी किती वेळा व्हिडीओ गेम पार्लर धारकांकडे जात तपासणी मोहीम राबविली काय?

  • विदर्भात आम आदमी पक्षाची झाडू यात्रा

    News34 chandrapur

    चंद्रपूर – आम आदमी पक्षाच्या वतीने विदर्भातील सर्व जिल्ह्यात दिनांक २ ऑक्टोबर २०२३ गांधी जयंती पासून ११ ऑक्टोबर २०२३पर्यत झाडू यात्रा” आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेचे उद्दिष्ट विदर्भातील सर्वसामान्य जनतेला पार्टीच्या धोरणांशी जोडणे आणि आगामी निवडणुकीसाठी तयारी करणे आहे. या यात्रेचे प्रारंभिक ठिकाण वर्धा जिल्ह्यातील गांधी आश्रम आहे. येथून रॅलीला सुरू होईल आणि 1830 किलोमिटर प्रवास करून चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे यात्रेचा समारोप होईल. या यात्रेमध्ये प्रत्येक जिल्ह्यात मोठी सभा आयोजित केली जाईल.

     

    या सभांमध्ये आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी गोपाल ईटालीया, महाराष्ट्र संघठन सचिव भूषण ढाकुलकर तसेच दिल्लीचे नेते आणि विदर्भ तसेच जिल्ह्यातील आपचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित राहतील, अशी माहिती आम आदमी पक्षाचे नेते सुनिल देवराव मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार व महानगर अध्यक्ष योगेश गोखरे यांनी प्रेस च्या माध्यमातून दिली.

     

    त्यांनी सांगितले की,चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आम आदमी पक्ष तळागाळात पोहोचविने करीता ही यात्रा वरोरा,भद्रावती सुरज शहा घुघुस अमीत बोरकर चंद्रपूर योगेश गोखरे बल्लारपूर रवि पप्पुलवार कोरपना, गडचा्ंदुर,राजुरा सुरज ठाकरे यांचे नेतृत्वात होईल व त्यानुसार आम आदमी पार्टी ने तयारी सुरू केली आहे.

     

    आपचे कार्यकर्ते यात्रा यशस्वी करन्याकरीता प्रयत्न करीत आहे.
    शहरात रेली व सभा घेण्यात येईल . त्यामुळे सर्वसामान्य जनतेत एक आत्मविश्वास निर्माण होईल. आम आदमी पक्षाच्या या यात्रेमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारणात नवीन चळवळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

     

    या माध्यमांतून सर्वसामान्यांचे संविधानिक हक्कांसाठी लढा, मुलाच्या शिक्षणासाठी त्याच्या उज्वल भविष्यासाठी नियोजन, नागरिकांना दिल्लीसारख्या आधुनिक वैद्यकीय व शैक्षणिक सुविधा देणे, शेत मालाला भाव, तरुणांना रोजगार, शेतकऱ्यांना २४ तास वीपुरवठा, शेतकरी सुरक्षा जंगली जनावरे बंदोबस्त, प्रत्येक शेताला पांधन रस्ते, वीज, पाणी आदी मुद्दे यातून मांडण्यात येतील.

     

    आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी सांगितले की, ही यात्रा विदर्भातील जनतेला एकत्र आणण्याचा आणि त्यांना एक नवीन दिशा देण्याचा एक प्रयत्न आहे.

    या यात्रेमध्ये सर्वसामान्य जनतेने आपला सहभाग नोंदवावा व जनतेच्या हितासाठी काम करना-या
    पार्टी ला सहकार्य करावे असे आवाहन आम आदमी पार्टी तर्फे प्रेस च्या माध्यमातून करन्यात आले.

  • चंद्रपुरात Dj चा आवाज किती? जिल्हाधिकारी गौडा यांच्या आदेशात काय?

    News34 chandrapur

    चंद्रपूर : केंद्र शासनाच्या ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम 2017 अन्वये तसेच ध्वनी प्रदूषण(नियमन व नियंत्रण) नियम, 2000 च्या नियम 5(3)नुसार, ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धक यांचा श्रोतगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागाखेरीज इतर ठिकाणी, ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी 6 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत वापर करण्यासाठी, संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याकरीता सन-2023 मधील 10 सवलतीचे दिवस निश्चित करण्यात आले आहे.

     

    त्यापैकी 5 दिवस राखीव ठेवण्यात आले आहे. निश्चित करण्यात आलेल्या 10 दिवसांपैकी 3 दिवस गणेश उत्सवाकरीता (अनंत चतुर्दशी हा दिवस धरून) निश्चित करण्यात आले आहे.

     

    गणेश उत्सवा करीता ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरासाठी यापूर्वी निश्चित अनंत चतुर्दशी दि. 28 सप्टेंबर हा सवलतीचा दिवस व उर्वरित दि. 27 व 29 सप्टेंबर 2023 हे दोन दिवस निश्चित करण्यात आले आहे.

     

    निश्चित करण्यात आलेल्या सवलतीच्या दिवशी सक्षम प्राधिका-याकडून परवानगी घेऊनच त्यांनी ठरवून दिलेल्या अटी व शर्ती प्रमाणेच ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धकाचा वापर करता येईल, असे जिल्हा दंडाधिकारी विनय गौडा यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद आहे.