Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • व्हिडीओ गेम पार्लर बाबत धक्कादायक माहिती

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या नियमबाह्य व्हिडीओ गेम पार्लर बाबत News34 वर बातमी प्रकाशित होताच पोलीस व जिल्हा प्रशासन खळबळून जागे होताच कारवाईचा धडाका सुरू झाला.

     

    आता या व्हिडीओ गेम पार्लर ची जिल्हा प्रशासनाने परवाना तपासणी मोहीम सुरू केली आहे.
    मात्र आधीच परवाने नूतनीकरण करण्यात आले नसल्याने प्रशासनाच्या मोहिमेचा अर्थ काय? असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला आहे.

     

     

    या पार्लर बाबत News34 ला धक्कादायक माहिती मिळाली आहे, शहरातील काही व्हिडीओ गेम पार्लर मध्ये पोकर च्या मशीन लावण्यात आल्या होत्या, विशेष म्हणजे पोकर च्या मशीन फक्त केसिनो मध्ये लावण्यात येतात.

    पोकर मशीन म्हणजे काय?

    मोठ्या केसिनो मध्ये लावण्यात येणाऱ्या जुगाराच्या मशीनला पोकर म्हणतात याचा दुसरा अर्थ हा डाकू होतो, म्हणजेच खेळणाऱ्यांच्या खिश्यावर दरोडा टाकण्याचे काम या मशीन द्वारे केल्या जाते.

    वर्ष 2022 डिसेंम्बर पासून जिल्ह्यातील व्हिडीओ गेम पार्लर संचालकांच्या परवान्यांचे अद्यापही नूतनीकरण करण्यात आले नाही, मात्र पार्लर संचालक प्रशासनाला आमचं काम हे नियमाप्रमाणे असल्याचे ओरबाडून सांगत आहे.

    जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत सुरू करण्यात आलेल्या तपासणी मोहिमेबाबत अद्यापही जिल्हाधिकारी यांचं ते पत्र पोलीस निरीक्षकांना प्राप्त झाले नाही.

    शासनाने सुरू केलेल्या मोहिमेआधी खिसा खाली करणाऱ्या या मशीन पार्लर चालक तर्फे मशीन काढण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

    गेम पार्लर बाबत बातमी नंतर अनेकांनी आपण या पार्लर मध्ये जाऊन पैश्याचा जुगार खेळत पैसे हरल्याची खंत व्यक्त केली आहे.

     

    विशेष म्हणजे अनेक युवकांनी गेम च्या नावावर पोकर म्हणजे पैश्याचा जुगार खेळला, पार्लर चालकांनी मशीन सेट करीत अनेकांची फसवणूक केली अशी माहिती सुद्धा News34 च्या हाती लागली आहे.

    विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात वर्ष 2002 पासून व्हिडीओ गेम पार्लर बाबत जी अधिसूचना काढण्यात आली होती, त्यानंतर आजपर्यंत त्या अधिसूचनेत काही सुधारणा झाली नाही.

     

    जिल्हाधिकारी गौडा यांनी आधी व्हिडीओ गेम पार्लर ला सील मारून तपासणीचे आदेश द्यायला हवे होते मात्र तसे काही झाले नाही, जर असे झाले असते तर व्हिडीओ गेम पार्लर संचालक सेटिंग केलेली मशीन काढू शकले नसते.

    राज्याच्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जुगार बाबत कायदे कठोर करणार असल्याची घोषणा असली तरी चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य व्हिडीओ गेम पार्लर सुरू आहे, बल्लारपूर पोलीस व्हिडीओ पार्लर च्या नावाखाली सुरू असलेल्या या जुगार अड्ड्यावर धाड मारण्याचे धाडस करणार काय?

    नुकत्याच वर्ष 2023 मध्ये जून महिन्यात खापरखेडा पोलिसांनी व्हिडीओ गेम पार्लर मध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाडी मारल्या होत्या, या धाडीत तब्बल 88 मशीन सहित तब्बल 26 जणांना अटक करीत 17 लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता, मात्र चंद्रपुरात अशी कारवाई कुठे होताना दिसत नाही.

    पोलीस व जिल्हा प्रशासन नियमबाह्य व्हिडीओ गेम पार्लर वर कारवाई करीत नसल्याने पार्लर चालकांच्या हिंमती वाढल्या आहे.

  • युरिया खताची चढ्या दराने विक्री, कांग्रेसने केली कारवाईची मागणी

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मुल:- तालुक्यातील शेतकऱ्यांना कृत्रिमरित्या युरिया खताचा तुटवडा करून चढ्या दराने खते विकणाऱ्या कृषी केंद्रावर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली.युरिया खताचा प्रचंड तुटवडा पडलेला असून शेतकऱ्यांना ज्यादा दरात युरिया खत घ्यावे लागत आहे.

     

    कृषी केंद्राचे व्यापारी जास्त नफा कमवण्याच्या उद्देशाने युरिया खताचा स्टॉक करून जास्त नफा मिळणाऱ्या ईतर कंपनीच्या खताचा ज्यादा भावाने शेतकऱ्यांना विकत आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांची सर्रास लूट होत असून युरिया खतासाठी शेतकऱ्यांना इकडे तिकडे भटकावे लागत आहे. ऐनवेळी हंगामातच खताची नितांत आवश्यकता असतानाच शेतकऱ्यांना हेतू परस्पर लुटल्या जाते.

     

    युरिया या खताचा तुटवडा दाखवून शेतकऱ्यांना नेहमी त्रास दिल्या जातो याबाबत प्रशासकीय स्तरावरून याची गंभीर दखल घेऊन युरिया खताचा पुरवठा शेतकऱ्यांना तात्काळ करण्यात यावा व जे कृषी केंद्र चढ्या दराने शेतकऱ्यांची लूट करत असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीला घेऊन काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले.

     

    निवेदन देताना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गुरु गुरनूले, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष पवन निलमवार, काँग्रेसचे युवा नेते प्रशांत उराडे, माजी सरपंच जालिंदर बांगरे, धनराज रामटेके आकाश दहिवले, दामोदर लेनगुरे, संदीप मस्के तथा काँग्रेसच्या अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

  • रस्त्याच्या बाजूने जात असताना अज्ञात वाहनाने उडविले

    News34 chandrapur प्रशांत गेडाम

    (प्रशांत गेडाम)
    सिंदेवाही : दोघांना एका भरधाव अज्ञात वाहनाने चिरडले. या भीषण अपघातात दोघांचाही मृत्यू झाला. ही घटना सिंदेवाही- मूल मार्गावर सिंदेवाहीपासून सुमारे १० कि.मी. अंतरावरील नवीन विरव्हा येथे सोमवारी रात्री ७:३० वाजताच्या सुमारास घडली.

     

    दादाजी शिवराम सावसाकडे (वय ६५) व उदालक केशव हजारे (५०) दोघेही रा. सरडपार चक (नवीन विरव्हा) ता. सिंदेवाही अशी मृतकांची नावे आहेत.

    सरडपार (नवीन विरव्हा) येथील दादाजी आणि उदालक हे दोघेही आपल्या वैयक्तिक कामानिमित्त सिंदेवाही- मूल मार्गावरील विरव्हा गावातील बसथांब्या जवळ आले.

     

    रस्त्याच्या बाजूने चालत असताना अचानक भरधाव आलेल्या वाहनाने दोघांनाही जोरदार धडक दिली. यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन गंभीर जखमी झाले. दोघेही रस्त्यावर पडून असताना सिंदेवाही पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी वाहनातून दोघांनाही सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात पोहोचविले. मात्र, डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. पोलिस अज्ञात वाहनाचा शोध घेत आहे. सिंदेवाही प्रभारी पोलिस निरीक्षक चव्हाण यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे.

  • हिंगणघाट जळीत कांडाची 3 वर्षांनी पुन्हा चर्चा

    News34 chandrapur

    वर्धा – हिंगणघाट येथील तरूणीच जळीत हत्याकांड प्रकरण तीन वर्षांनी पुन्हा चर्चेत आले आहे, महाविकास आघाडीच्या काळात घडलेलं जळीत कांडातील पीडित कुटुंबाला मदतीच्या नावावर निव्वळ आश्वासन देण्यात आले होते, मात्र महायुतीचे सरकार आल्यावर त्यांनी पीडित कुटुंबाला आर्थिक मदत व पीडितेच्या भावाला शासकीय नोकरीत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, याबाबत भाजप प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी माहिती दिली आहे.

    ३ फेब्रुवारी, २०२० रोजी वर्धा येथे एका नराधमाने महाराष्ट्राच्या लेकीला पेट्रोल टाकून जिवंत जाळले होते. ८ दिवस मृत्यूशी दिलेली झुंज अपयशी ठरल्याने 10 फेब्रुवारीला निर्भयाचा मृत्यू झाला होता.

    ही घटना वर्धा निर्भया प्रकरण व हिंगणघाट जळीत प्रकरण म्हणून ओळखले गेले. याच घटनेमुळे शक्तीकायदयाचे सुतोवाच झाले होते. संपूर्ण महाराष्ट्रात या प्रकरणामुळे आक्रोश निर्माण झाला होता.

    संपूर्ण गाव आरोपीला शिक्षा होत नाही तोवर अंत्यसंस्कार करायला तयार नव्हते. सरकारने जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पिडित अंकिता पिसुड्डेच्या परिवाराला आर्थिक मदत व तिच्या लहान भावाला सरकारी नोकरीत सामावून घ्यायचे लेखी आश्वासन दिले होते.

    मात्र उध्दव ठाकरे आणि मविआ त्यांच्या सोयी आणि सवयीप्रमाणे दिलेला एकही शब्द पाळला नाही, २.५ वर्ष कसलीही काहीही मदत केली नाही अशी टीका चित्रा वाघ यांनी यावेळी केली.

     

    महाविकास आघाडीच्या काळात झालेल्या जळीतकांडाचा महाविकास आघाडीलाच विसर पडला होता, अखेर महायुतीच्या सरकारकडून
    पिडीत कुटुंबियांच दुख सावरण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

     

    अडीच वर्ष सत्तेत असनार ठाकरे सरकारने फक्त घोषणाबाजीच केली होती प्रत्यक्ष मदत मात्र शुन्य, अखेर पिडीत कुटूंबियांच्या मदतीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सकारात्मक पाऊल पुढे करीत पिडीत कुटूंबियाला जाहिर मदतीचा धनादेश सुपूर्द केला.

    तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमूख यांच्याकडून नुसतीच घोषणाबाजी करण्यात आली होती मात्र प्रत्यक्षात मदत ही महायुती सरकारने केली.

     

    मात्र दिनांक २५ सप्टेबर, २०२३ रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मात्र सदर निर्भयाच्या पिडित कुटुंबाला देवगिरी येथे बोलवून घेऊन आर्थिक मदतीचा धनादेश दिला. निर्भयाच्या भावाला सरकारी सेवेत सामावून घेण्यासाठी सकारात्मकता दाखवली

    निर्भया ही महाराष्ट्राची लेक होती ह्याची जाणीव संवेदनशील नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांना आहे म्हणून शब्द उध्दव ठाकरे आणि मविआ सरकारने दिलेला असला तरी तो पूर्ण देवेंद्र फडणवीस यांनी केला.

    म्हणून आमचे नेते देवेंद्र फडणवीस आणि आमच्या पक्षाचा आम्हाला अभिमान आहे असे चित्राताई वाघ म्हणाल्या.

    निर्भया सारख्या घटनांची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होऊ नये म्हणून सरकार आणि पोलीस प्रशासन कार्यरत आहे हा देखील विश्वास त्यांनी महाराष्ट्राला दिला.

  • रामाला तलावात युवकाने मारली उडी

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शहरातील ऐतिहासिक रामाला तलाव येथे आज मंगळवार 26 सप्टेंबरला 35 वर्षीय युवकाने तलावात उडी घेत आत्महत्या केली.

     

    धीरज श्रीकांत देवांग असे मृत युवकाचे नाव आहे, युवक दुर्गापुरातील सेंट मायकल शाळेच्या मागे राहत असल्याची माहिती आहे, सकाळच्या सुमारास युवकाने रामाला तलावात उडी घेतली, यामध्ये त्या युवकाचा मृत्यू झाला.

     

    पोलिसांना याबाबत माहिती मिळताच धीरज चा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे, त्याने आत्महत्या का केली यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.

  • बल्लारपूर पेपर मिल समोर कामगाराचा मृतदेह ठेवत आंदोलन

    News34 chandrapur रमेश निषाद

    बल्लारपूर – 14 सप्टेंबर बल्लारपूर पेपर मिल मध्ये कार्यरत कामगार 43 वर्षीय दिगंबर महाजन केमिकल च्या टाकीत पडल्याने होरपळले. तब्बल 10 दिवसांनी उपचारादरम्यान महाजन यांचा नागपुरात मृत्यू झाला.

     

    महाजन यांच्या कुटुंबातील एकाला नोकरी व 40 लाख रुपयांची अथक मदत करण्याची मागणी कामगार व नागरिकांनी केली आहे, या मागणीसाठी आज 25 सप्टेंबर पासून सायंकाळपासून नागरिकांनी महाजन यांचा मृतदेह गेट पुढे ठेवत आंदोलन सुरू केले आहे.

    सध्या आंदोलन सुरू असून पोलिसांचा तगडा बंदोबस्त त्याठिकाणी लावण्यात आला आहे.

  • चंद्रपूर नागपूर मार्गावर वाढतंय अतिक्रमनाचे जाळं

    News34 chandrapur

    चंद्रपूर – दिवसेंदिवस चंद्रपूर शहराचा विस्तार वाढत असून नागरिकांच्या मूलभूत सोयी काही प्रमाणात अपुऱ्या पडत आहे. सोबतच शहरात अतिक्रमण सुद्धा झपाट्याने वाढत आहे.

     

    चंद्रपूर शहरातील गोल बाजार ते जटपुरा गेट परिसर असो की वरोरा नाका चौक ते बापट नगर याठिकाणी आज मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे.

     

    काही दिवसांपूर्वी चंद्रपूर ते नागपूर महामार्गावर शिक्षिकेचा रस्ते अपघातात बळी गेला होता, कारण रस्त्यावर चारचाकी वाहनांची नेहमीच वर्दळ व काही दुकान चालकांनी रस्त्यावर केलेलं अतिक्रमण त्या अपघाताला कारणीभूत होते.

     

    त्या अपघातानंतर सुद्धा चंद्रपूर मनपा प्रशासनाने रस्त्यावर असलेल्या अतिक्रमनावर काही ठोस कारवाई केली नाही, विशेषतः चंद्रपूर नागपूर मार्ग हा अनेक दुकान चालकांनी आपल्या दुकानाच्या हद्दीत घेतला आहे.

    या मार्गावरील अतिक्रमण मनपा प्रशासनाने तात्काळ हटवून चंद्रपूर नागपूर महामार्ग मोकळा करून भविष्यात होणाऱ्या अपघाताला टाळण्याचे काम करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

  • त्या कुटुंबाला संतोष रावत यांनी केली आर्थिक मदत

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मूल – शेतामध्ये पाणी पाहण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर दबा धरुन बसलेल्या वाघाने जागीच ठार केल्याची घटना शुक्रवारी सकाही सात वाजता दरम्यान मूल तालुक्यातील मौजा ताडाळा तुकूम, जुना सोमनाथ परिसरातील शेतशिवारात घडली. सुर्यभाव टिकले वय 55 वर्षे रा. चिचाळा हे आपल्या शेतात काम करीत असताना वाघाने हल्ला करून ठार केले.

    शेतकरी हा कुटुंबाचा आधार असतो.तोच गेला तर संपूर्ण कुटुंबच निराधार होतो ही दुर्दैवी घटना घडली.त्यांच्या मागे पत्नी कमलाबाई टिकले, मुले ईश्वर व रुपेश असा परिवार आहे.

     

    मूल तालुक्यातील यापूर्वीही चिचाळा येथे वाघानेच एका दिवशी दोघांचा बळी घेतल्याची घटना ताजीच आहे. शेतकरी सुर्यभान टिकले यांनी यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी काँग्रेसचे नेते सी.डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष संतोष सिंह रावत हे मृतकाच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन करुन स्वतःहा कडून दहा हजार रुपयाची आर्थिक मदत दिली.

     

    याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश रत्नावार, उपसभापती राजेंद्र कन्नमवार, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गुरु गुरनुले, माजी संचालक डॉ.पद्माकर लेनगुरे, आदर्श खरेदी विक्री सहकारी सोसायटीचे सभापती पुरुषोत्तम भुरसे, तेजराज ठेमस्कर, बालाजी निकूरे, चालदेव मांदाडे, बबलू गांडलेवार, मुन्ना मडावी, सूरज इतकेलवार, ग्रा. प सदश जनार्दन आत्राम, कृष्णाजी टिकले, सुभाष मंकीवार, अनुप लेंनगूरे, श्रीनिवास टिकले, उपसरपंच सूरज चलाख, पोलिस पाटील दुर्गे, माजी उपसरपंच यशवंत चलाख, पवन बलगेलवार आदी ग्रामस्थ उपस्थित होते. वाघाने शेतकऱ्यावर झडप घेवुन एफ.डी.सी.एम. ५२२ कक्षात त्याच्याच शेतात त्याचा घोट घेतल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

     

    याबाबत संतोष सिंह रावत यांनी कुटुंबियांसमोर वनविभागाचे अधिकारी सहाय्यक वनसंरक्षक आदेश शेडगे यांना मोबाईल वर बोलून वनविभागाकडून तात्काळ पूर्ण आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली. तसेच वन्य प्राणी वाघ,रानटी डुकरे शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान करीत असल्याने त्याचाही बंदोबस्त करावा.व वणाला तारेचे कुंपण करावे अशी मागणी देखील याप्रसंगी केली.

  • बल्लारपुर पोलिसांचा रूट मार्च

    News34 chandrapur रमेश निषाद

    बल्लारपुर रमेश निषाद

    दिनांक 23 सितंबर रोजी पोलीस स्टेशन बल्लारपूर येथील गणेश विसर्जन ईद-ए-मिलाद सन उत्सव दरम्यान सार्वजनिक शांतता राहावी कसलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता सकाळी 11:35 वाजता पासून पोलीस स्टेशन बल्लारपूर येथील अधिकारी कर्मचारी होमगार्ड एसआरपीएफ प्लाटून यांचे सह पोलीस स्टेशन बल्लारपूर ते आंबेडकर पुतळा, जुना बस स्टॉप, गोर्शिया मझिद .डॉ रजनी हजारे हॉस्पिटल, नवीन बस स्टॉप, गणपती वार्ड ,गोल पुलिया, विसर्जन घाट व विसर्जन रोड नी जामा मस्जिद ,मदिना मझीद, सात नल पोलीस चौकी पर्यंत रोड मार्च करण्यात आला.

     

    रोड मार्चमध्ये पोलीस स्टेशन बल्लारशा येथील पो नी पाटिल, सपोणी रासकर पोउपनी शाह, सलीम शेख, नैताम मॅडम, ४४ कर्मचारी 4 महिला तसेच होमगार्ड 29, 6महिला होमगार्ड एस आर पी एफ प्लाटून चे ए1 अधिकारी psi दाबेराव 22 कर्मचारी असे रोड मार्च मध्ये हजर होते.

     

    सदरचा रोड मार्ग हा एक वाजता पोलीस चौकी वस्ती विभाग येथे विसर्जन करण्यात आला सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना पाण्याची व्यवस्था करण्यात आली यावेळी सर्वत्र शांतता राहिली.

  • पीक पेऱ्यानुसार शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करावे

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मुल – दि 24/9/23 रोज रविवारला मुल तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्था मुल ची आमसभा संपन्न झाली, सभेचे अध्यक्ष संदीप कारमवार उपाध्यक्ष अरविंद बोरुले संचालक राकेशभाऊ रत्नावार रवि कामडी विवेक मुत्यलवार मनोज मुत्यलवार ,भोजराज गोवर्धन, सौ. चंदा कामडी तर शेतकरी सभासद राहुल मुरकुटे देवानंद गेडाम व ईतर शेतकरी उपस्थित होते.

     

    सचिव संजय बद्दलवार यांनी विषय पञीकेनुसार सभेला सुरवात केली. सर्व विषयांवर साधक बाधक चर्चा करुन विषय मंजूर करण्यात आले. अध्यक्ष यांनी वेळेवर च्या विषयांवर तालुक्यात सध्या धानासह कापुस/ सोयाबीन/ मका/ मीरची व ईतर पिकांची पेरणी चे प्रमाण वाढले असल्याने जिल्हा मध्यवर्ती बँक चंद्रपुर यांनी शेतकऱ्यांच्या पिक पे-यानुसार शेतकऱ्यांना त्या पिक नुसारच कर्ज मंजुर करावे.

     

    असा विनंती ठराव सर्वानुमते पारीत करण्यात आला, नंतर संस्थेचे अध्यक्ष संदीप कारमवार यांनी संस्थेची प्रगती, वाटचाल वसुली व पुढील संकल्प आणि योजना दुकानगाळे व गोदाम बांधकाम करणे व संस्थेचे औषध व खत विक्री केंद्र सुरु करुन शेतकरी सभासदांच्या हितासाठी संस्था अत्यावश्यक निर्णय घेऊन विकास करेल असे मनोगत उपस्थित सभासदांना अवगत करुन दीले. अनेक सभासदांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात सभा पार पडली.