Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • होवू द्या चर्चा उपक्रमाला जनतेचा जोरदार  प्रतिसाद

    News34 chandrapur

    भद्रावती : तालुक्यात शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे उपनेते तथा मुंबईचे माजी नगरसेवक  चंद्रपुर लोकसभा क्षेत्राचे निरीक्षक मनोज जामसुतकर आणि मुंबईचे माजी नगरसेवक सुर्यकांत पाटील  यांच्या मार्गदर्शनात  ७५-वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात ‘ होवू द्या चर्चा ! ’ उपक्रम राबविण्यात येत आहे.

     

    या उपक्रमाला जनतेचा ठिकठिकाणी जोरदार  प्रतिसाद मिळत आहे. काल  दि. १ ऑक्टोंबर रोजी कोंढा -घोडपेठ जि.प . क्षेत्रात घोडपेठ व मोहबाळा येथे तसेच नंदोरी -कोकेवाडा जि.प. क्षेत्रात नंदोरी ( बु. ) व सागरा येथे  सदर उपक्रम आयोजित करण्यात आला. सदर उपक्रम वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रामध्ये 1 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर पर्यंत राबविण्यात येणार आहे.

    ७५-वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र  प्रमुख  रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या “होवू द्या चर्चा !” उपक्रमात जिल्हा महीला आघाडी प्रमुख नर्मदा दत्ता बोरेकर, उपजिल्हाप्रमुख भास्कर ताजने, वरोरा-भद्रावती विधानसभा समन्वयक वैभव डाहाने, विधानसभा सघंटक मगेश भोयर, तालुकाप्रमुख नरेंद्र पढाल , उपजिल्हा सघंटीका माया नारळे ,तालुका महीला सघंटीका अश्लेषा जिवतोडे-भोयर , युवासेना तालुका अधिकारी राहुल मालेकर आणि विभाग प्रमुख सिध्दू पेटकर यांच्यासह फार मोठया संख्येत  शिवसैनिक भद्रावती तालुक्यात ‘ होऊ द्या चर्चा  !’ उपक्रमाची जनेतला माहीती देत जनसंवाद साधत आहे.

  • माझ्या मुलाला शोधून द्या, चंद्रपूर शहर पोलिसांना आईची आर्त हाक

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शहरातील बाबा नगर बाबूपेठ भागात राहणाऱ्या 25 वर्षीय प्रजेश खंडाळे हा मुलगा 22 सप्टेंबरपासून घरी आला नाही, याबाबत आई भाविका यांनी शहर पोलिसात तक्रार नोंदविली, मात्र 8 दिवस उलटल्यावर सुद्धा प्रजेश चा पत्ता लागला नाही, प्रजेश च्या आईने मुलाचा घातपात झाला असल्याची शंका व्यक्त केली आहे.

     प्रकरण काय?

    भाविका खंडाळे या 22 सप्टेंबरला सकाळच्या सुमारास कामावर निघून गेल्या होत्या, रात्री घरी परतल्यावर त्यांचा मोठा मुलगा प्रजेश त्यांना दिसला नाही, भाविका यांनी 23 वर्षीय लहान मुलगा राजदीप याला विचारले असता दादा घरी आला नाही असे त्याने सांगितले.
    आईने शेजारी व आजूबाजूला प्रजेश चा शोध घेतला मात्र तो कुठेही आढळून आला नाही, आई ती आईचं मुलगा येण्याची ती वाट बघू लागली.
    24 सप्टेंबरला प्रजेश ने आईच्या मोबाईल वर कॉल केला आई मी मुंबई ला आलो आहे, माझ्यासोबत घराजवळील योगेश व इतर 6 मुले आहे, यावर आईने म्हटले की बाळा काळजी घे? तू कशाला तिथे गेला कसलं काम आहे? यावर तो काही बोलला नाही, मला रोज फोन कर असे म्हटल्यावर प्रजेश ने हो म्हणत कॉल कट केला, मात्र त्या दिवसानंतर प्रजेश ने आई सोबत सम्पर्क साधला नाही, विशेष म्हणजे प्रजेश कडे मोबाईल नसल्याने त्याने दुसऱ्या कुणाच्या मोबाईल वरून आईला सम्पर्क केला होता.
    आई भाविका यांना मुलाची काळजी वाटू लागली, प्रजेश ने मी योगेश गेडाम सोबत बाहेरगावी असल्याची बाब आईला सांगितली असल्याने ती 27 सप्टेंबरला शेजारी असलेल्या योगेश गेडाम यांच्या घरी गेली, योगेश हा चंद्रपुरात आला होता, मात्र त्याने याबाबत प्रजेश च्या कुटुंबियांना माहिती दिली नाही.
    भाविका यांनी योगेश ला विचारणा केली की प्रजेश आला नाही काय? प्रजेश तर 25 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता नागपूर रेल्वे स्थानकावर उतरला तो आपल्या नातेवाईकांकडे जातो असे म्हणाला.
    त्यानंतर भाविका यांनी नागपुरातील नातेवाईकांना सम्पर्क केला असता प्रजेश कुणाकडेच गेला नसल्याची माहिती मिळाली.

    तपासात काय निष्पन्न?

    भाविका खंडाळे यांनी मुलगा घरी आला नाही म्हणून शहर पोलिसात तक्रार देत 22 ते 27 सप्टेंबर दरम्यान काय घडलं, याबाबत सविस्तर माहिती पोलिसांना दिली.
    चंद्रपूर शहर पोलिसांनी योगेश गेडाम यांना चौकशीसाठी बोलाविले, त्याने प्रजेश हा नागपूरला उतरला असल्याची माहिती पोलिसांना दिली. ज्या मोबाईल वरून प्रजेश ने आईला सम्पर्क केला त्या मोबाईल क्रमांकाचे लोकेशन मुंबई होते, 25 सप्टेंबरला प्रजेश नागपूर रेल्वे स्थानकावर उतरला काय? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.
    योगेश ने प्रजेश च्या घरी न सांगता त्याला बाहेरगावी कशासाठी नेले होते? योगेश घरी परतला तेव्हा त्याने प्रजेश च्या आईला याबाबत माहिती का दिली नाही? योगेश ने जे बयान पोलिसांना दिले तीच खरी माहिती आहे काय? त्याच्या माहितीवर पोलिसांनी क्रॉसचेक केलंय का? प्रजेश सोबत गेलेले इतर मूल कोण? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहे, याबाबत पोलिसांशी सम्पर्क केला असता ते म्हणतात तपास सुरुच आहे.
    मागील आठवडाभरापासून प्रजेश ची आई योगेश ला मुलांबाबत विचारत आहे, मात्र तिला समाधानकारक उत्तर योगेश कडून मिळत नसल्याने ती न्यायासाठी चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या पायऱ्या चढत आहे, भाविका खंडाळे यांना पोलिसांकडून न्याय हवा? पोलीस न्याय देतील काय? प्रजेश चे काही बरे वाईट तर झाले नाही? अशी शंका आई भाविका यांच्या मनात निर्माण होत आहे.
    प्रजेश जवळ खर्च करायला पैसे नाही, त्याच्या अंगावर जे कपडे आहे तेच त्याच्याजवळ आहे, तो काय करीत असेल? काय जेवण करीत असेल असे शब्द प्रजेश ची आई पुटपुटत असते.
    वडिलांचे छत्र हरविलेल्या मुलांना मोठं केलं व आज अशी परिस्थिती भाविका खंडाळे यांच्यापुढे उभी झाली, मुलगा आज येणार उद्या येणार अशी आस आईच्या नजरेसमोर आहे.
    दरवर्षी हजारो लाखो महिला व पुरुष बेपत्ता होतात मात्र काही जणांचा शोध लागतो, आजही लाखो नागरिक पोलिसांच्या रेकॉर्डवर हरविल्याची नोंद आहे, मात्र त्यांना कुणी शोधणारा नाही, माझ्या मुलाला शोधून द्या अशी आर्त हाक एक आई पोलिसांना करीत आहे.
  • पत्रकार हाच खरा समाजाचा चौकीदार – आमदार प्रतिभा धानोरकर

    News34 chandrapur

    चंद्रपूर : “महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. इथला पत्रकार सत्य आणि न्यायाचे रक्षण करण्याचे काम करीत आहे. पत्रकारांनी संघटित होऊन समाजातील समस्यांवर आवाज उठवावा. पत्रकार हे समाजाचा खरा चौकीदार आहे, असे प्रतिपादन आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केले.

     

    आज मूल येथे व्हाईस ऑफ मीडिया तर्फे दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांना समर्पित चंद्रपूर – गडचिरोली जिल्ह्यातील पत्रकारांची एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या.

     

    कार्यशाळेत व्हॉइस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, शेतकरी नेते रवींद्र तुपकर, काँग्रेस नेते विनोद दत्तात्रेय, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा संध्याताई गुरनुले, ज्येष्ठ पत्रकार सुनील कुहीकर, जेष्ठ पत्रकार आनंद आंबेकर, विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक, जिल्हाध्यक्ष संजय पडोळे यांची उपस्थिती होती.

     

    धानोरकर म्हणाल्या, “संघटना असल्याशिवाय मागण्या पूर्ण होत नाहीत. व्हॉइस ऑफ मीडिया ही एक मजबूत संघटना आहे. ही संघटना गावागावात पोहोचली आहे. पत्रकारांनी या संघटनेचा लाभ घ्यावा.” पत्रकार हे समाजाचे आधारस्तंभ आहेत. ते समाजातील विविध घटकांना एकत्र आणून नव्या विचारांचा प्रसार करतात. तसेच, ते समाजातील गैरव्यवहारांना उघडकीस आणून न्याय मिळवून देतात.

     

    कार्यशाळेत पत्रकारितेच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यात आली. पत्रकारांना त्यांच्या हक्कांबाबत माहिती देण्यात आली. तसेच, त्यांना पत्रकारितेतील आव्हानांना तोंड देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेत चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील पत्रकारांनी सहभाग घेतला.

  • शिक्षण बचाव समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी चंद्रपुरात होणार भव्य आंदोलन

    News34 chandrapur

    चंद्रपूर : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी, सरकारने बाह्ययंत्रणेमार्फत सुरू केलेली पदभरती रद्द करावी, ‘दत्तक शाळा योजना’ रद्द करावी यासह इतर मागण्यांना घेऊन शिक्षण बचाव समितीच्या वतीने शुक्रवार, दिनांक ६ ऑक्टोंबर २०२३ रोजी दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे / निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे.

     

    राज्य सरकारने बाह्ययंत्रणेमार्फत सुरू केलेली पदभरती व शासकीय शाळा खासगी संस्था / कंपन्यांना देण्याचा डाव आखला आहे. देशाचं भवितव्य घडविणाऱ्या शिक्षण क्षेत्रात सरकारने केलेल्या खासगीकरणाचा हा डाव हाणून पाडण्यासाठी जनआंदोलन उभारणे आवश्यक आहे. या आंदोलनाबाबत नियोजन सभा नुकतीच मातोश्री विद्यालय, तुकुम चंद्रपूर येथे पार पडली.

     

    “आरक्षण अप्रत्यक्षरित्या संपविण्याचा घाट केंद्र व राज्य सरकारने आखला आहे” तो हाणून पाडण्यासाठी उभारण्यात येत असलेले जनआंदोलन एक लोक चळवळ व्हावी, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. शिक्षण हे सरकारची जबाबदारी असताना सरकार दत्तक शाळा योजना राबवित आहे. यामुळे भविष्यात सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होईल, यामुळे आपण सुजाण नागरिक म्हणून जागरूक राहणे आवश्यक असल्याचे मत आमदार सुधाकर अडबाले यांनी व्यक्त केले.

     

    सभेच्या अध्यक्षस्थानी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले तर प्रमुख अतिथी म्हणून शोभाताई पोटदुखे, गजाननराव गावंडे, जगदीश जुनघरी, नंदू नागरकर, सुरेश पचारे, मनदीप रोडे, पप्पू देशमुख, प्रा. दिलीप चौधरी, बळीराज धोटे, गंगाधर वैद्य, प्रा. निलेश बेलखेडे, दीपक जेऊरकर, प्राचार्य नरेंद्र बोबडे, हरीश ससनकर, रामराव हरडे, महादेव पिंपळकर, नागेश सुखदेवे, कोटेवार, वाढई, आसुटकर, बिजवे, नामदेव मोरे आदी मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सभेला जिल्ह्यातील शैक्षणिक, सामाजिक, राजकीय संघटनांचे पदाधिकारी, सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेकांनी आपले मत व्यक्त करीत सरकारने घेतलेल्या निर्णयाचा प्रखर विरोध केला.

     

    २ ते ५ ऑक्टोंबरदरम्यान आंदोलनातील मागण्यांचे निवेदन आपआपल्या संस्था/ संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांना पाठवावे. त्यानंतर सर्वांनी ६ ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या धरणे / निदर्शने आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार सुधाकर अडबाले, डॉ. अनिल शिंदे, प्राचार्य सूर्यकांत खनके व विविध संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

  • चंद्रपूर जिल्ह्यातील या मार्गावर आला रानहल्ल्या आणि….

    News34 chandrapur

    (प्रशांत गेडाम)
    सिंदेंवाही – नेहमी व्याघ्र दर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या सिंदेवाही तालुक्यातील आलेसुर – पेंढरी ह्या जंगलव्याप्त चिमूर मुख्य मार्गावर रान हल्ल्याने प्रवासी नागरीकांना दर्शन दिले.

    जवळपास १५ मिनिटे दहशत युक्त वातावरणात ये- जा करणाऱ्यां प्रवासी नागरिकांनी अवाढव्य मोठ्या असलेल्या रानहल्या ला पाहीले त्यामुळे १५ मिनिटे पेंढरी – चिमूर मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतुक ठप्प झाली होती.

     

    चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक मार्गावर जंगली जनावरांसाठी अंडर पास ची व्यवस्था नसल्याने अनेक जनावरे रस्त्याने येजा करतात त्यामुळे आजपर्यंत अनेक जनावरांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे.

  • भाऊ निघाले लंडनला

    News34 chandrapur

    मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा कोथळा वाघनखांनी बाहेर काढला हे आपण लहानपणापासून शिकलो आहोत; ऐकत आलो आहोत. ती वाघनखे ३५० व्या राज्याभिषेक वर्षात शिवप्रेमींच्या दर्शनाला भारतात आणण्याच्या दृष्टीने करार करण्यास लंडन येथे जाताना खूप अभिमान वाटतो आहे, असे भावोद्गार राज्याचे सांस्कृतिक कार्य, वन आणि मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी काढले.

     

    लंडन येथे रवाना होण्यापूर्वी मुंबई विमानतळ मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर ना. मुनगंटीवार कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. आमदार पराग अळवणी, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते ओमप्रकाश चव्हाण, अमोल जाधव, विनीत गोरे, स्थानिक नगरसेविका यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

     

    ना. मुनगंटीवार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर पोहोचताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या, ढोल ताशांचा गजर आणि लेझिम पथकाने परिसर दणाणून सोडला. यावेळी ना. सुधीर मुनगंटीवार यांनी ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि श्री. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहीती देत हे सरकार छत्रपती शिवाजी महाराज यांना अपेक्षित रयतेचे राज्य महाराष्ट्राला देण्याचा संकल्प करुन काम करीत असल्याचे स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे, आमची प्रेरणा आहे त्यांच्या विचारसरणीला धरून केंद्रात श्री. नरेंद्र मोदी आणि राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार काम करीत आहे हे स्पष्ट केले.

     

    छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि आता त्यांनी वापरलेल्या वाघनखांबाबत शंका उपस्थित करणे दुर्दैवी असून; जेव्हा ब्रिटेनशी प्रत्यक्ष करार करण्याची वेळ आली त्याच वेळी केवळ जनतेच्या मनांत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
    आमदार पराग अळवणी यांनीही मनोगत व्यक्त करुन ना. सुधीर मुनगंटीवार यांना शुभेच्छा दिल्या.

     

    छत्रपती शिवाजी महाराज यांची युद्धकालीन शस्त्र असलेली ही वाघनखे ब्रिटनच्या विक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियम मधून भारतात परत आणण्याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी ना. श्री सुधीर मुनगंटीवार रवाना झाले आहेत.

     

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष प्रारंभ होताच ही वाघनखे भारतात परत आणण्याचा संकल्प सांस्कृतिक कार्य मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता. यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. श्री अजित पवार यांच्या नेतृत्वात केंद्र शासन तसेच आंतराष्ट्रीय पातळीवर ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

     

    १५ एप्रिल २०२३ रोजी मुंबई येथे ब्रिटेन चे पश्चिम भारत उप उच्चायुक्त अँलेन गँमेल यांच्यासह ब्रिटन च्या राजकीय व द्विपक्षीय संबंध उपप्रमुख श्रीमती इमोगेन स्टोन यांच्यासोबत बैठक घेवून महाराष्ट्र शासनाने व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाशी पत्रव्यवहार सुरू केला होता.
    मंगळवारी 3 ऑक्टोबर रोजी व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियम येथे भेट देऊन या संग्रहालयाचे संचालक श्री ट्रायस्टम हंट यांच्यासोबत त्यांची बैठक होईल व करारावर स्वक्षऱ्या होतील.

  • माजी मंत्री शिवाजीराव मोघे विरोधात पोलिसात तक्रार

    News34 chandrapur

    वरोरा – कांग्रेस पक्षाच्या आदिवासी सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी माना समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने माना समाजाच्या वतीने मोघे यांच्या विरुद्ध निषेध मोर्चा काढण्यात आला.

     

    नागपुरात आदिवासी क्षेत्रबंधन मुक्ती दिवस कार्यक्रमात शिवाजी मोघे यांनी माना समाजाबद्दल म्हटले की आमची सरकार आली तर हाय पावर कमिशन नेमत त्यामध्ये चुकीने ज्या जाती समाविष्ट झाल्या आहे, त्यामध्ये माना जमात आहे, त्याला बाहेर काढा असे चुकीचे वक्तव्य मोघे यांनी केले होते.

    विशेष म्हणजे त्या कार्यक्रमात माजी मंत्री राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व माजी आमदार नामदेव उसेंडीउपस्थित होते, या दोन्ही कांग्रेस नेत्यांच्या विधानसभा क्षेत्रात माना समाज मोठ्या प्रमाणात असून सुद्धा त्यांनी त्यावेळी मोघे यांनी चुकीचे वक्तव्य केले याबाबत साधी नाराजी सुद्धा व्यक्त केली नाही.

     

    मोघे यांचा विविध ठिकाणी विरोध सुरू आहे, चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे 1 ऑक्टोबरला मोघे विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला, मोर्च्यात माना समाजाचे नागरिक, महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित झाले होते.

     

    यावेळी आदिवासी माना समाज विद्यार्थी युवा संघटन महाराष्ट्र, आदिम माना जमात मंडळ व माना जमात विकास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्च्यात उपस्थित समाजातील नागरिकांना मार्गदर्शन केले.

     

    भविष्यात माना जमातीबद्दल असे वक्तव्य केल्यास लोकशाही मार्गाने विरोध केल्या जाणार असा इशारा यावेळी देण्यात आला, उपस्थित माना समाज बांधवांनी वरोरा पोलीस स्टेशनला शिवाजी मोघे व राहुल गांगुर्डे विरोधात तक्रार दाखल केली.

     

    याप्रसंगी प्रकाश झाडे, विनोद खडसान, निखिल राणे, पियुष गजबे यांनी तहसीलदार यांच्या मार्फत महामहिम यांना निवेदन देण्यात आले.

  • गरिबी निर्मूलन समितीच्या नागपूर विभाग महिला अध्यक्षपदी सविता वझे यांची नियुक्ती

    News34 chandrapur

    चंद्रपूर – देशात दरवर्षी गोर-गरीब नागरिकांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे, आजही कोट्यवधी गोर-गरीब आपल्या अधिकारापासून वंचित आहे, त्यांना आपल्या अधिकारांची जाणीव करून गरिबी रेषेच्या वर आणण्याचे काम अखिल भारतीय गरीबी निर्मूलन समिती करीत आहे.

     

    अखिल भारतीय गरिबी निर्मूलन समिती हा कोणत्याही राजकीय पक्षांचा भाग नसून गरिबांच्या पाठीशी उभे राहून त्यांचा आत्मविश्वास व पाठबळ वाढविणारी कार्य करणारी सामाजिक संस्था आहे.

     

    या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लालासाहेब गायकवाड यांनी नागपूर विभागाच्या महिला अध्यक्षपदी चंद्रपूरच्या सविता वझे यांची नियुक्ती केली आहे.

    सविता वझे या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर राहून कार्य करीत आहे, त्यांच्या कार्याची दखल घेत गरीबी निर्मूलन समितीने त्यांना महत्वाचं पद देत त्यांचा सन्मान केला आहे.

    वझे यांच्या नियुक्तीनंतर त्यांना समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भविष्यातील वाटचालिबाबत शुभेच्छा दिल्या आहे.

  • पोलीस स्टेशन परिसरात स्वच्छता ही सेवा मोहीम

    News34 chandrapur

    विरुर स्टेशन – विरुर स्टेशन पोलिसांतर्फे 1 ऑक्टोबरला 1 तारीख 1 तास स्वच्छतेसाठी मोहीम राबविण्यात आली.

     

    राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर हा दिवस “स्वच्छ भारत दिवस” म्हणून साजरा केला जातो. यावर्षी “स्वच्छ भारत दिवस २०२३” च्या निमित्ताने १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत “स्वच्छता ही सेवा” हा उपक्रम स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व शहरी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असून १ ऑक्टोबर २०२३ रोजी देशभरात व्यापक स्वरूपात “एक तारीख- एक तास” स्वच्छतेसाठी श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्याचे केंद्र शासनाचे निर्देश होते.

     

    शासनाच्या निर्देशानुसार विरुर स्टेशन येथील पोलीस स्टेशन परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली, आयोजित स्वच्छता मोहिमेत गावातील नागरिक व गणेश मंडळातील सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

     

    सहायक पोलिस निरीक्षक जयप्रकाश निर्मल यांच्या एका हाकेवर गावकऱ्यांनी साद दिली, पोलीस स्टेशन परिसरात सकाळी नागरिकांनी श्रमदान केले.

     

    आयोजित स्वच्छता ही सेवा मोहिमेला यशस्वी करण्यासाठी सपोनी जयप्रकाश निर्मल, पोउपनी अजय मडावी, पोहवा अफसर पठाण, पोहवा मल्लया नरगेवार,
    पो अ विजय तलांडे, प्रमोद मिलमिले, पो अ प्रवीण जुनघरे,  शांतता समिती सदस्य अजितसिंग ज्ञानसिंग टाक, अविनाश प्रभाकर रामटेके, अजय प्रकाश रेड्डी, प्रदीप भिमराव पाला, अनिल बंडू आलम, शाहू रामटेके, गजानन ढवस, शंकर झाडे, मंडळाचे सदस्य, मनोज जीवतोडे अध्यक्ष, दिलीप दोरखंडे उपाध्यक्ष, रविकांत, जीवतोडे सदस्य, अक्षय सोनपिपरे सदस्य, स्वप्निल मोरे सदस्य आदींनी सहभाग दर्शविला.

  • सिंदेवाही पोलिसांनी चंद्रपुरातील वाहनचालकाला केली अटक

    News34 chandrapur

    (प्रशांत गेडाम)
    सिंदेवाही : सिंदेवाही शहरापासून जवळच असलेल्या नवीन विरव्हा येथील अपघातात राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

     

    सिंदेवाही पोलिसांनी अखेर 12 तासात अज्ञात वाहनाचा शोध लावून त्या दोघांचा जीव घेणारे चंद्रपूर येथील अज्ञात वाहन सेंट्रो कार सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे जमा केली आहे.

     

    सिंदेवाही तालुक्यातील अपघातात नवीन विरव्हा येथील राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दादाजी शिवराम सावसाकडे वय 65 वर्ष, उदालक केशव हजारे वय 50 वर्ष रा.सरडपार चक यांचा अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी तात्काळ मदतीस वाहनाने ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे दाखल केले.

     

    अपघातातील धडक दिलेल्या अज्ञात वाहनाचा शोध पोलिसांनी तात्काळ घेणे सुरू केले. अखेर 12 तासात पोलिसांनी त्या अपघातातील वाहनाचा कसून शोध घेतला असता MH 34 AA 7437 या क्रमांकाची हुंडाई सेंट्रो कंपनीची कार चंद्रपूर येथे मिळाली आहे. हुंडाई सेंट्रो कंपनीची कार सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आली आहे. वाहनाचे चालक आरोपी गजेंद्र गोमकर वय 35 रा. चंद्रपूर यांना ताब्यात घेतले आहे.

     

    अपघातानंतर पोलिसांनी तपास करीत असताना विविध ठिकाणी लावून असलेले कॅमेरे व नियोजन करून कार चा शोध लावण्यात यशस्वी कामगिरी केली असून सिंदेवाही पोलीस स्टेशन चे चव्हाण पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनात, सागर महल्ले उप निरीक्षक, पोलीस देवानंद सोनुले, अरविंद मेश्राम, दादाजी रामटेके, मातेरे, जांभुळे, होमगार्ड कोकुलवार पोलीस कर्मचारी पुढील तपास करीत आहे.