Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • राज्याची आरोग्य यंत्रणा आयसीयू मध्ये – डॉ. अभिलाषा गावतुरे

    News34 chandrapur

    चंद्रपूर – नांदेड येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात मृत्यूच्या तांडवानंतर शिंदे गटाच्या खासदाराने नांदेड येथील डिन ला टॉयलेट स्वच्छ करायला लावले, त्यांनतर वैद्यकीय क्षेत्रातुन खासदारांचा निषेध नोंदविण्यात आला, खासदारावर गुन्हे दाखल झाले असले तरी रुग्णालयात घडलेल्या मृत्यूच्या तांडवाला डिन जबाबदार कसे? या संपूर्ण घटनेला देश व राज्यातील आरोग्य यंत्रणा जबाबदार आहे, राज्यातील आरोग्य यंत्रणा आयसीयू मध्ये एडमीट झाली आहे, राज्यातील घटनेची जबाबदारी घेत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.

    ठाणे नंतर नांदेड मधील घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, मात्र याला जबाबदार केंद्र व राज्याची आरोग्यव्यवस्था आहे, आजही राज्यातील शासकीय रुग्णालयात अनेक पदे भरल्या गेली नाही, देश व राज्याच्या अर्थ संकल्पात आरोग्य व्यवस्थेवर निधीची तरतुद दिवसेंदिवस कमी होत आहे, आरोग्य यंत्रणेत असणारे प्रशासकीय अधिकारी हे आयएएस असतात मात्र त्यांना आरोग्य व्यवस्थेचे पुरेसे ज्ञान नसते त्यामुळे अश्या घटना राज्यात घडत आहे अशी प्रतिक्रिया बहुजन मेडिकल असोसिएशच्या डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी यावेळी दिली.

     

    चंद्रपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आजही अनेक पदे रिक्त आहे, 190 सफाई कर्मचाऱ्यांपैकी एकही पद भरल्या गेले नाही, 350 परिचारिका पैकी फक्त 97 परिचारिका वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत आहे, प्राध्यापकांचे अनेक पदेही आज रिक्त आहे, चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे शिकाऊ डॉक्टरच्या भरवश्यावर आहे, चंद्रपुरातील आरोग्य व्यवस्थेला लोक प्रतिनिधी पूर्णतः जबाबदार आहे, एकही लोकप्रतिनिधी पालकमंत्री असो की आमदार यांनी मुळीच लक्ष दिलेले नाही, नांदेड, ठाणे जिल्ह्यासारखं मृत्यूचे तांडव चंद्रपुरात घडायची वाट तर हे लोकप्रतिनिधी बघत असावे अशी शक्यता आम्हाला वाटते.
    स्थानिक आमदार हे सत्तेसाठी सुरत ते गुवाहाटी चा प्रवास करतात मात्र रुग्णालयात रुग्णांची काय परिस्थिती आहे हे कधी जाणून घेत नाही.

     

    या सर्व परिस्थिती बाबत बहुजन मेडिकल असोसिएशनचे डॉ. अभिलाषा गावतुरे, डॉ. राकेश गावतुरे व डॉ. राजू ताटेवार यांनी अधिष्ठाता फुलपाटील यांची भेट घेतली व आरोग्य व्यवस्थेची तात्काळ सुधारणा करावी असे निवेदन त्यांना देण्यात आले.

     

    अभिलाषा गावतुरे यांनी पुढे माहिती दिली की शिंदे गटाच्या खासदार हेमंत पाटील यांनी केलेले हे कृत्य क्षमयोग्य नाही, आपली कमतरता लपविण्यासाठी अधिष्ठाता यांना जबाबदार धरणे हे चुकीचे आहे, या घटनेचा बहुजन मेडिकल असोसिएशनने निषेध करीत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे.

     

    पत्रकार परिषदेला बहुजन मेडिकल असोसिएशनचे सदस्य डॉक्टर अभिलाषा गावतुरे, डॉक्टर राजू ताटेवर, डॉक्टर राकेश गावतुरे, डॉक्टर राकेश वनकर, डॉक्टर नम्रता बेंडले, डॉक्टर समृद्धी वासनिक, डॉक्टर जावेद शेख, डॉक्टर स्नेहल खोब्रागडे, डॉक्टर प्रीती उराडे व डॉक्टर समीर कदम उपस्थित होते.

  • चंद्रपूर शहर विद्रुप करण्याचा प्रयत्न

    News34 chandrapur

    चंद्रपूर  –  शहरात विना परवानगी भिंतीपत्रके लावणाऱ्या संबंधिताविरुद्ध महाराष्ट्र विद्रुपीकरण कायदा १९९५ अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिका झोन क्र. १ कार्यालयाद्वारे रामनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

     

    शहरातील आंबेडकर कॉलेज,वरोरा नाका,जनता कॉलेज चौक,मनपा हद्दीतील शासकीय व खाजगी जागा, शहरातील पोस्ट / टेलीफोन पेटी, इलेक्ट्रिक खांब, रस्त्याच्या कडेची झाडे इत्यादींवर मुद्रा लोन योजना,आधार कार्ड लोन, ( ७२१७३१५८७९ ) हा मजकुर असलेले भिंतीपत्रके २५ सप्टेंबर मध्यरात्री शहरात जागोजागी लावले असल्याचे सहायक आयुक्त सचिन माकोडे यांना पाहणीदरम्यान आढळुन आले. संबंधितास भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून पत्रके काढण्यास सांगितले असता अद्याप पावेतो भिंतीपत्रके न काढल्याने संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र विद्रुपीकरण कायदा १९९५ अंतर्गत फौजदारी गुन्हा नोंद करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

     

    चंद्रपूर महापालिकेच्या वतीने विविध स्पर्धांद्वारे शहर सुशोभीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे,विशेषतः उड्डाणपुल,शासकीय इमारती येथे माझी वसुंधरा अंतर्गत वॉल पेंटिंगची कामे करण्यात आली आहेत. रंगरंगोटीद्वारे संपूर्ण शहर सुशोभित झाले असताना भिंतीपत्रके लावून शहर विद्रुप करण्याचा प्रयत्नांविरुद्ध मनपाने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.

     

    भिंतीपत्रके,पोस्टर्स,बॅनरबाजीमुळे शहराच्या विद्रुपीकरणासह शहराच्या सौंदर्यात बाधा येते किंबहुना वाहतुकीसही अडथळा निर्माण होत असल्याने याबाबत उच्च न्यायालय आणि राज्य शासनाने आखुन दिलेल्या सुचनांनुसार कारवाई करण्यात येते. त्यानुसार, परवानगीशिवाय पॅम्प्लेट्स, बॅनर्स, होर्डिंग्ज,कापडी फलक लावणा-यांवर आर्थिक दंडासह कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद या धोरणामध्ये करण्यात आली आहे

  • भाजपाची ओबीसी जागर यात्रा 05 ऑक्टोबर ला चंद्रपूरात

    News34 chandrapur

    चंद्रपूरः- भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात ‘‘ओबीसी जागर यात्रा‘‘ म. गांधी यांच्या जयंतीदिनी दि. 02 ऑक्टोबर 2023 पासून प्रारंभ झाली असून ही यात्रा चंद्रपूर महानगरात दि 05 ऑक्टोबर ला पोहचत आहे.

     

    या यात्रेचे नेतृत्व ओबीसी मोर्चाचे प्रदेश प्रभारी डाॅ आशिष देशमुख व भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते करीत असून या जागर यात्रेत ओबीसी मोर्चाचे प्रमुख पदाधिकारी सर्वश्री डी.डी. सोनटक्के, कमलाकर घटोड, रविंद्र चव्हाण, डाॅ रविंद्र यनुरकर, विनोद तुरक, वैभव लाड, विनोद बेहरे, विजय वासेकर, सौ अर्चना डेहनकर, राजेंद्र डांगे आदि मान्यवर सहभागी असून या यात्रेचे चंद्रपूर आगमनाप्रसंगी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यपालन मंत्री सुधीर मुनगंटीवार यंाचे नेतृत्वात जिल्ह्यातील ओबीसी मोर्चाच्या व भाजपाच्या प्रमुख पदाधिकाÚयांद्वारे स्थानिक विश्रामगृहात जंगी स्वागत करण्यात येणार आहे.

     

    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकतीच अंमलात आणलेली प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, वैद्यकीय शिक्षणामध्ये ओबीसींना 27 टक्के आरक्षण, ओबीसी आयोगाला बहाल केलेला संवैधानिक दर्जा, इतर मागासवर्गीय विद्याथ्र्यांसाठी वसतीगृह, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेली स्वाधार योजना व ओबीसी हिताच्या अनेक योजनांना घेवून ओबीसी बांधवांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने या भाजपा ओबीसी जागर यात्रेचा मुळ उद्देश आहे. भाजपा हाच ओबीसींचा उध्दार व रक्षणकर्ता असल्याने या जागर यात्रेत ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येनी सहभागी होवून आपल्या एकजूटीचा परीचय द्यावा असे आवाहन भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा व महानगर पदाधिकारी यांनी केले आहे.

     

    भाजपाची ही ओबीसी जागर यात्रा चंद्रपूरात पोहचल्यानंतर शहरातील विविध समाजातील मान्यवरांच्या भेटी घेवून प्रमुख पदाधिकारी त्यांचेशी केंद्र व राज्य सरकारच्या योजनांबाबत वार्तालाप करुन सदर जागर यात्रा वरोरा नाका येथील शासकीय विश्रामगृहातून बाईक रॅलीने सकाळी 10.30 वा आंबेडकर काॅलेज-संत कंवलराम चैक-जटपूरा गेट-प्रियदर्शनी चैक-बस स्टॅन्ड-तुकुम मार्गे-महेश भवन येथे विसर्जीत होवून सर्व मान्यवर नेते मंडळी व अतिथींचे प्रमुख उपस्थितीत दु. 12.00 वा होणाऱ्या ओबीसी जागर मेळाव्याला संबोधित करतील.

     

    या मेळाव्यास सर्वश्री विजय राऊत, हरीष शर्मा, खुशाल बोंडे, राहुल पावडे, देवराव भोंगळे , प्रमोद कडू, श्रीमती संध्याताई गुरनुले, अनिल फुलझेले, अंजली ताई घोटेकर, डाॅ मंगेश गुलवाडे, रवी गुरनुले, अल्का आत्राम, रघुवीर अहीर, विशाल निंबाळकर, अविनाश पाल, विनोद शेरकी, प्रकाश बगमारे, विद्याताई देवाळकर, रत्नमाला भोयर, अहेतेशाम अली, अंकुश आगलावे, राजू घरोटे, सुभाष कासनगोट्टुवार, शिलाताई चव्हाण, मायाताई उईके, शितल गुरनुले आदिंची उपस्थिती लाभणार आहे.

     

    तरी ओबीसी घटकातील सर्व बांधवांनी भाजपाच्या सर्व आघाड्यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या मेळाव्याला हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन दिवाकर पुध्दटवार, रवी चहारे, वंदना संतोषवार, विठ्ठल डुकरे, दिनकर सोमलकर, रवी लोणकर, सचीन कोतपल्लीवार, संदीप आगलावे, शशीकांत मस्के, प्रदीप किरमे, शैलेश इंगोले, राम हरणे, मधुकर राऊत, शाम आदमने, मुग्धा खांडे, धनराज कोवे, धम्मप्रकाश भस्मे, अमिन शेख, रुद्रनारायण तिवारी, किरण बुटले, बंडू गहूकर, अरुणा चैधरी, शिला कन्नोजवार, सुदामा यादव, संजय मिसलवार, शाम बोबडे, सचिन संदुरकर, उत्कर्ष नागोसे, सुभाश ढवस आदिंनी केले आहे.

  • हत्ती मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट

    News34 chandrapur

    चंद्रपूर /सिंदेवाही –  चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात मंगळवारी सकाळी चिटकी गावालगत शेतात मृत्तावस्थेत आढळून आलेल्या त्या हत्तीचा मृत्यू विद्युत शॉक लागून झाला.  या बाबतचा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. चिटकी गावातील दोघा बाप लेकाला संशयीत म्हणून ताब्यात घेण्यात आले. अशोक पांडुरंग बोरकर (वय 65), अजय अशोक बोरकर  (वय 29) रा. चिटकी असे संशयिताची नावे आहेत.

     

    मंगळवार सकाळी सिंदेवाही वनपरिक्षेत्र अंतर्गत  उपक्षेत्र तांबेगडी मेंढा येथील नियत क्षेत्र मुरपार बीटा मधील सिंदेवाही तालुक्यांत चिटकी गावालगत शेतात काही नागरीकांना जंगली हत्ती मृत्तावस्थेत आढळून आल. सदर घटनेची माहिती बीट वनरक्षक राठोड यांना देण्यात आली. सिंदेवाहीचे क्षेत्र सहाय्यक हे आपल्या चमू सह घटनास्थळी दाखल झाले. वनपरिक्षेत्राचे विभागाचे अधिकारी आपल्या चमुसह चमु दाखल झाले.

     

    सदर घटनेची खात्री केल्यानंतर घटना स्थळावर मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, मुख्य वनसंरक्षक, उपवनसंरक्षक दिपेश मल्होत्रा, सहायक वनसंरक्षक (प्रादे. व वन्यजीव), एम. बी. चोपडे, सहायक वनसंरक्षक हजारे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, पशुधन विकास अधिकारी सुरपाम, डॉ. शालीनी लोंढे दाखल झाले. वरिष्ठांच्या उपस्थितीत संपूर्ण परिस्थितीची पाहणी केल्यानंतर हत्तीच्या मृत्तदेहाचे निरीक्षण करण्यात आले. यावेळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी हत्तीचा मृत्यू विद्युत प्रवाहाच्या आघाताने झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला.

     

    शेतमालक अशोक पांडुरंग बोरकर व सभोवतालच्या परिसराची झडती घेण्यात आली. यामध्ये प्रकरणात वडिल अशोक पांडुरंग बोरकर व अजय अशोक बोरकर यांचे विरूध्द पी.ओ. आर. क्र. 09130/228231 अन्वये वनगुन्हा नोंदवून दोघे संशयीत बापलेकाला चौकशी करीता ताब्यात घेण्यात आले आहे. दोघांचीही सखोल चौकशी सुरू आहे. या घटनेचा संपूर्ण तपास ब्रम्हपुरीचे सहायक वनसंरक्षक एम. बी. चोपडे करीत आहेत.

    विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी शेत मालकांना आपल्या शेतात विद्युत प्रवाह न सोडण्याचे आवाहन केले होते, अन्यथा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा ड

  • मूल येथे सत्यशोधक परिषद संपन्न

    News34 chandrapur

    चंद्रपूर/मूल – मुल येथे सत्यशोधक समाजाच्या दीडशे व्या स्थापना दिवसानिमित्त भूमिपुत्र ब्रिगेडतर्फे सत्यशोधक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर अभिलाषा गावतुरे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून नंदुरबार इथून आलेले सुप्रसिद्ध व्याख्याते सुरेश झाल्टे हे होते.

     

    कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी गनांमध्ये सत्यशोधक समाज जिल्हा चंद्रपूर चे अध्यक्ष हिराचंद बोरकुटे, माळी मिशन राजकीय समिती प्रमुख महाराष्ट्र राज्य इंजिनिअर वासुदेवराव चौधरी अमरावती, अखिल भारतीय माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सचिन भेदे, प्रसिद्ध साहित्यिक आणि लेखक प्रबर्मानंद मडावी, अखिल भारतीय महिला माळी महासंघाच्या जिल्हाध्यक्ष छायाताई सोनुले, ज्ञानज्योती फाउंडेशन सावलीचे अध्यक्ष दिनकर मोहूर्ले, सद्गुरु डोले, दीपक वाडी, बेंबळ डॉक्टर पद्माकर लेनगुरे, विदर्भ तेली महासंघाचे महासचिव गंगाधर कुंनघाडकर, ओबीसी विचार मंच कैलास चालक इत्यादी मानव मंचावर उपस्थित होते.

     

    कार्यक्रमाचे संचालन एडवोकेट प्रशांत सोनुले प्रस्तावना समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक विजय लोणबुले यांनी केली, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राकेश मोहरले मनीष मोहूरले पाटील वाळके रामदास सोनुले रोहित निकुरे श्रीकांत शेंडे आणि इतर शेकडो कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.

     

    याप्रसंगी बोलताना व्याख्याते सुरेश झाल्टे यांनी महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीच्या उगमापासून त्या शतक चळवळीचा संपूर्ण इतिहास काळाच्या पडद्याआड आणि इतिहासात उल्लेख न केलेल्या सर्वशोधकांचे या चळवळीला योगदान आणि एकूणच फुले शाहूं आंबेडकरी चळवळीचे या देशाच्या आणि समाजाच्या जडणघडणीमध्ये योगदान विशद केले.

     

    हिराचंद बोरकुटे यांनी सांगितले की आजचा ओबीसी समाज जर महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांनी चालला तर त्यांच्या सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक समस्या सहज सुटू शकतात.

     

    डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांनी या कारणासाठी आणि ज्या उद्देशासाठी सत्यशोधक चळवळ उभी केली आणि शूद्र अतिसूद्रांना मनुवादी गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी जो संघर्ष उभा केला तो संघर्ष आजच्या बहुजन समाजाला इथल्या आजच्या भांडवलशाही व्यवस्थेविरुद्ध आणि शासन प्रशासन व्यवस्थेविरुद्ध उभा करण्याची गरज प्रतिपादित केली.

     

    खासकरून शिक्षण क्षेत्राचे झालेले होत असलेले कंत्राटीकरण आणि सरकारी शाळा आणि सरकारी शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न आपण उधळून लावला पाहिजे असे मतही त्यांनी व्यक्त केले.

  • चंद्रपुरात भीषण अपघात, 4 गंभीर जखमी

    News34 chandrapur

    चंद्रपूर – छोटा नागपूर येथील विचोडा समोर 3 ऑक्टोबर ला अवैध मुरुम वाहतूक करणाऱ्या वाहनाने चौघांना उडविले, 4 जणांची प्रकृती सध्या नाजूक आहे.

     

    चंद्रपूर जिल्ह्यात खनिज संपत्तीला लुटणाऱ्यांची संख्या आज मोठ्या प्रमाणात वाढली आहे, छोटा नागपूर परिसरातून अवैध रित्या मुरुमाची तस्करी सुरू आहे, आज या मुरुम तस्करी करणाऱ्या वाहन क्रमांक MH34 AB2444 या वाहनाने चार नागरिकांना उडविले, या अपघातात दोघांचे पाय निकामी झाले तर एकाचे हात व एक गंभीररीत्या जखमी झाले. गंभीर जखमीमध्ये मुलीचा समावेश आहे. अपघात करणारे वाहन हे नितीन नगराळे यांच्या नावावर आहे.

     

    छोटा नागपूर ते विचोडा मार्ग हा पूर्णतः खड्ड्यात गेला आहे, विशेष म्हणजे चंद्रपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कुंभे यांना राज्य शासनाचा उत्कृष्ट अभियंता म्हणून पुरस्कार भेटला आहे.

     

    सदर रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे कंत्राट डोंगरे यांना मिळाले आहे पण अजूनही हा मार्ग खड्ड्यात आहे, आज अवैध मुरूम वाहतुकीमुळे हा प्रकार घडला मात्र प्रशासन या तस्करी वर गप्प आहे.

  • चंद्रपूर जिल्ह्यात हत्तीचा मृत्यू

    News34 chandrapur

    ( प्रशांत गेडाम)
    सिंदेवाही- आज 3 आक्टोंबर मंगळवार सकाळी सिंदेवाही वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या उपक्षेत्र तांबे गडी मेंढा येथील नियत क्षेत्र मुरपार बीटा मधील एका खाजगी शेतात मृता अवस्थेत जंगली हत्ती आढळून आला आहे घटनास्थळी वनपरिक्षेत्राचे विभागाचे अधिकारी वन विभागाचे चमु तसेच पोलीस विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

     

    वर्षभरापूर्वी हत्तीचा कळप चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झाला होता, वनविभाग त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून होता मात्र आज एक हत्ती मृतावस्थेत आढळल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे.

  • चंद्रपुरात शिवसेनेची होऊ द्या चर्चा मोहीम

    News34 chandrapur

    चंद्रपूर – पक्षाच्या वतीने महाराष्ट्रात १ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर २०२३ पर्यंत सर्वसामान्य जनतेला प्रत्यक्ष भेट देवून सर्वसामान्य नागरीक सोबत, होऊ द्या चर्चा ची मोहीम राबविली जात आहे. होऊ द्या चर्चा मोहीम च्या माध्यमातून थेट महाराष्ट्र राज्य शासन यांच्या कडून थेट सर्व सामान्य नागरिकांची कशी फसवणूक होत आहे याबाबत जनतेशी थेट संवाद साधण्याचा शिवसेनेचा प्रयत्न सुरू आहे.

     

    महागाईचे चटके, शासनाकडून पारित होणाऱ्या अनेक योजना यांचा दुजा भाव त्यापासून वंचित असणारा शेतकरी, शेतमुजर, कामगार ,आणि सर्वसामान्य जनता, शेतकऱ्याची आत्महत्या ,शिवस्मारक साठी दिलेले वचन ,कामगार कायद्यात होणारे बदल, महाराष्ट्र बाहेर जाणारे उद्योग ,इंधन वाढ, महागाईने त्रस्त झालेली जनता , खाजगी करन धोरण, अश्या प्रकारे अनेक विषय सदर्भात शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने
    1 ऑक्टोम्बरला सी.एस.टी.पी.एस. मेजर गेट समोर ,दुर्गापूर चंद्रपूर, मित्र नगर चौक,रामनगर ,चंद्रपूर,  पडोली चौक,नागपूर रोड चंद्रपूर येथे होऊ द्या चर्चा या मोहिमेच्या माध्यमातून एका दिवशी तीन सभा घेण्यात आल्या. सभे दरम्यान अनेक नागरिकांनी प्रतिसाद देत केंद्र आणि राज्य सरकार वर अनेक समस्या बाबत चर्चा करण्यात आल्या.

    शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा चंद्रपूर च्या वतीने होऊ द्या चर्चा या कार्यक्रमाला थेट मुंबई येथील शिवसेना उपनेते मनोज जामसुतकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थित माजी नगरसेवक मुंबई महानरपालिका पाटील साहेब, शिवसेना जिल्हा प्रमुख संदिप भाऊ गिऱ्हे यांच्या नेतृत्वात तसेच चंद्रपूर माजी महानगर प्रमुख प्रमोद भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनात युवा सेना महाराष्ट्र राज्य सहसचिव सौ.रोहिणी ताई पाटील, युवासेना जिल्हा प्रमुख विक्रांत भाऊ सहारे, युवा सेना उपजिल्हा प्रमुख सुमित भाऊ अग्रवाल, जिल्हा समन्वयक विनय भाऊ धोबे, युवा सेना शहर प्रमुख शहाबाज शेख, वसीम भाई, ग्रामपंचायत सदस्य राजू भाऊ डोयकावळे, तोसिफ खान, सोनू भाऊ ठाकूर,देवकुमार विश्वकर्मा, अशोक भाऊ चिलखरे, शिवसेना प्रणित कंत्राटी कर्मचारी सेना वीज निर्मिती क्षेत्र अध्यक्ष प्रफुलभाऊ सागोरे, सचिव प्रमोदभाऊ कोलारकर शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटीका उज्वला ताई नलगे,शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख वर्षाताई कोठेकर, माजी जिल्हा संघटीका कुसुमताई उदार,नीलिमा ताई शिरे, शिवसेना पदाधिकारी व अनेक शिवसैनिकांच्या तसेच असंख्य जागृत जनसमुदायाच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला.

  • गांधी जयंती निमित्त इरई बचाव आंदोलनाचा सत्याग्रह

    News34 chandrapur

    चंद्रपूर – 2 ऑक्टोंबर रोजी गांधी जयंती निमित्त इरई नदीचे खोलीकरण व स्वच्छतेच्या मागणीसाठी नागरिकांनी पुन्हा एकदा जल सत्याग्रह केला. भजन दिंडी काढून तसेच गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन करून व इरईच्या पात्रात घोषणा देऊन हा जल सत्याग्रह करण्यात आला.

     

    दुपारी 12 वाजता इरई बचाव जनआंदोलनाचे जनक व वृक्षाई संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कुशाबराव कायरकर तसेच जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या उपस्थितीत दाताळा रोडवरील अग्रसेन भवन समोरून भजन दिंडीची सुरुवात करण्यात आली. यावेळी भूमी कायरकर यांनी दिंडीचे नेतृत्व केले तर जय देशमुख या लहान मुलाने गांधींची वेशभूषा केली.

     

    इरई नदीच्या पात्रात दिंडी पोहोचल्यानंतर दिंडीत सहभागी सर्वांनी नदीपात्राच्या एका भागात स्वच्छता अभियान राबवले. त्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या प्रतिमेचे पूजन करून नदीमध्ये जल सत्याग्रह करण्यात आला. नंतर आंदोलनात सहभागी नागरिकांनी इरईचे खोलीकरण व स्वच्छतेच्या मागणीसाठी घोषणा दिल्या.

     

    जनविकास सेनेचे मनीषा बोबडे व अक्षय येरगुडे निखाडे,प्रतिभा कायरकर,संगिता विधाते,विद्या ठोंबरे, वंदना मोरे,नलिनी कडुकर,वर्षा काळभुत, शिवसेना (उबाठा)च्या कुसुम उध्दार,निलीमा शिरे,अर्चना चामटकर, दिक्षा सातपुते,सुनंदा जोगी,मेघा दखने,सचिन निंबाळकर, महेश काहीलकर,अमूल रामटेके, विठ्ठल भगत,तुकाराम झाडें,सुरेश विधाते,पांडुरंग गावतुरे, अविनाश देव,देवराव बोढे, सुधाकर मत्ते,नगमा पठाण, सुरेश खाडे आप च्या तबसूम,योगेश कुरेकर इत्यादी नागरिक या जन आंदोलनामध्ये सहभागी झाले.

     

    सविस्तर असे की 22 मार्च 2006 रोजी जलदिनानिमित्त इरई नदीच्या पात्रात सत्याग्रह करून इरई बचाव जन आंदोलनाची सुरुवात करण्यात आली होती. या आंदोलनाला 17 वर्षांपेक्षा जास्त काळ लोटलेला आहे.या 17 वर्षात अनेक वेळा स्थानिक नेत्यांनी इरईचे खोलीकरण व स्वच्छतेची आश्वासने दिली. कधी कधी तर खोलीकरणाला थातूर मधून सुरुवात सुद्धा करण्यात आली. परंतु संपूर्ण इरई पात्राचे खोलीकरण करण्याचे आश्वासनाची पूर्तता करण्यास चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना अपयश आले आहे. दुसरीकडे इरई बचाव जन आंदोलनाने आपल्या संघर्षाचे 17 वर्षे पूर्ण करून अठराव्या वर्षात पदार्पण केले.

     

    महाऔष्णिक विज निर्मिती केंद्राच्या राखेमुळे इरईचे पात्र उथळ झाले. त्यामुळे पुराचि धोका वाढला.अनेक घरे निळ्या पुर रेषेच्या आतमध्ये आली.एकीकडे नागरिकांना दरवर्षी पुराचा फटका बसतो, परावर्तित भूखंड असुनही बांधकामाची परवानगी नाकारण्यात येत आहे.तर दुसरीकडे स्थानिक नेते केवळ पोकळ आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करत आहे. लवकरच शहरातील अशा सर्व मुद्द्यांवर जनतेमध्ये जाऊन जनविकास सेनेतर्फे जनजागृती करण्यात येईल.

  • ओबीसी आंदोलनातील नायकाचे जंगी स्वागत

    News34 chandrapur

    चंद्रपूर – ओबीसी विद्यार्थी संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी चंद्रपुरात ओबीसी आंदोलनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.दरम्यान तब्बल 20 दिवस रवींद्र टोंगे यांनी ओबीसींच्या मागण्यांकरिता केलेला अन्नत्याग, ओबीसींच्या भावी पिढी करता सातत्याने लढत राहण्याची तयारी अन्नत्याग आंदोलनाला भेट देणाऱ्या प्रत्येकाला लढण्याची एक नवी जिद्द देत होती.

     

    रवींद्र टोंगे यांचे अन्नत्याग आंदोलन लिंबू पाणी देऊन सोडल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोंगे यांना ‘आता तुम्ही तब्येतीची काळजी घ्या. सलग 20 दिवस उपोषण केल्यामुळे तुमच्या प्रकृतीवर परिणाम झाला आहे. तुम्ही समाजासाठी महत्त्वाचे आहात. तुमच्या मागण्या मान्य झाल्या आहेत. आता प्रकृतीकडे लक्ष द्या. तुम्ही रुग्णालयात उपचार करा’ असा सल्ला दिलानंतर ते चंद्रपूरातील वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सौरभ राजूरकर यांच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा असल्याने आज 2ऑक्टोबर ला त्यांना रुग्णालयातुन सुट्टी देण्यात आल्यानंतर चंद्रपूर लगतच असलेल्या त्यांच्या मूळ गावी वेंडली येथे रवाना केले.

     

    वेंडली या ओबीसी बहुल गावातील एका तरुणाने ओबीसींच्या न्यायिक मागण्यांकरिता तब्बल वीस दिवस अन्नत्याग उपोषण केल्यामुळे गावातील प्रत्येक नागरिक हा गर्वाणवीत झाला होता झाला होता. आज 22 दिवसानंतर रवींद्र गावात आल्याने कुटुंबीय व नागरिकांनीं त्याचे जल्लोषात स्वागत करत त्याचे कौतुक केले.

     

    11 सप्टेंबर 2023 पासून रवींद्र टोंगे यांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू झाल्यानंतर 17 सप्टेंबर ला चंद्रपुरात निघाला ओबीसींनीं महामोर्चा काढून शासनाचे आपल्या मागण्याकडे लक्ष वेधले होते.18 सप्टेंबर आंदोलनस्थळी भेट देत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आंदोलन मागे घेण्याची केली विनंती केली मात्र सरकार सोबत चर्चेचे कोणतेही कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने टोंगे यांनी आंदोलन सूरू ठेवण्याचा निर्धार पालकमंमंत्र्यांना सांगितला. त्यानंतर 19 सप्टेंबर ला टोंगे यांच्या समर्थनार्थ राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाने केली शासन निर्णयाची होळी केली.

     

    20 सप्टेंबर ला ओबीसी विद्याथ्यांच्या न्याय मागण्यासाठी ‘भीक मांगो’सत्याग्रह करण्यात आला.मात्र 22 सप्टेंबर ला रवींद्र टोंगे यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविन्यात आल्यावरही त्यांनी रुग्णालयात सुद्धा अन्नत्याग करत उपोषण सुरूच ठेवले.

     

    पुढे 23 सप्टेंबर ला चंद्रपूर-नागपूर महामार्गावर चक्काजाम, उपोषणस्थळी विजय बल्की व प्रेमानंद जोगी यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू झाल्यावर 24 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने राज्य सरकारची प्रेतयात्रा काढत तीव्र निषेध व्यक्त केला. याची परिनीती पुढे जिल्हाभर 25 सप्टेंबर ला ओबीसी समाजातर्फे जिल्ह्यातील सर्व तालुकास्थळी साखळी उपोषण करण्यात आले. 26सप्टेंबर रोजी विरोधी पक्ष नेते विजय वाडेट्टीवर यांनी उपोषण स्थळाला भेट देत ओबीसी मागण्या जाणून घेतल्या.

     

    28 सप्टेंबर ला राज्य ओबीसी शिष्टमंडळाची सरकारशी सकारात्मक झाल्यावर चर्चा आंदोलन मागे घेण्याचे महासंघाने दिले स्पष्ट संकेत, चंद्रपूर जिल्हा बंद स्थगित करण्यात येऊन 30 सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उपोषणाची सांगता झाल्याचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी जाहीर केले.

    कोण आहेत रवींद्र टोंगे?

    रवींद्र यांचा आधार नोंदणी ऑपरेटर ते आंदोलक असा प्रवास झाला आहे. रवींद्र हे चंद्रपूर तालुक्यातील वेंडली या गावातील आहे. रवींद्रकडे सहा एकर शेतजमीन आहे. त्यांच्या घरी पत्नी, सहा महिन्यांचा मुलगा, आई-वडील व दोन भाऊ असा परिवार आहे. त्यांनी गोंडवाना विद्यापीठाची एम.कॉमची पदवी घेतली. ‘टॅली’ चा सहा महिन्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. आधार नोंदणी चालक म्हणून दोन वर्षे काम केले. खासगी कंपनीच्या माध्यमातून लेखापाल विभागात काम केले.

     

    ग्रामपंचायतीत माहिती प्रवेश चालक म्हणूनही काम केले. 35 वर्षीय या युवकाला पुढे स्वयंरोजगाराच्या माध्यमातून व्यवसायात जायचे आहे. ओबीसींच्या न्याय हक्कासाठी मागे हटणार नाही अशी भावना त्यांच्या अंगी होती. त्यातूनच ते ओबीसी महासंघाशी जुळले. त्या कार्याने वरिष्ठ प्रभावित होऊन मागील आठ वर्षांपासून ते ओबीसी विद्यार्थी संघाचे जिल्हाध्यक्ष आहेत.