Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • चंद्रपूर जिल्हा महिला कांग्रेसचा सत्याग्रह मार्च

    News34 chandrapur

    चंद्रपूर: केंद्रातील मोदी सरकारने 33%आरक्षण विधेयक लागू केले पण ते कधी पासून लागू होईल याची काही शाश्वती नाही. तसेच महिला खेळाडू अनेक महिने आंदोलन करत असतांना मोदी सरकारने त्याची दखल घेतली नाही, मणिपूर मध्ये १५० दिवस महिलांवर अत्याचार सुरू असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी शांत होते. या सर्व गोष्टींचा निषेध करण्यासाठी मा.गांधी जयंती साप्ताहाचे औचित्य साधून अखिल भारतीय महिला काँग्रेस च्या अध्यक्ष नेटा डीसुजा यांच्या निर्देशानुसार तसेच महिला काँग्रेस च्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांच्या सूचनेनुसार चंद्रपूर महिला काँग्रेस ग्रामीण च्या वतीने घुगस इथे सत्याग्रह मार्च करण्यात आला.

     

    महिला काँग्रेस च्या जिल्हाध्यक्ष नम्रता आचार्य- ठेमस्कर यांच्या नेतृवात हा सत्याग्रह मार्च काढण्यात आला. यावेळी घुगूस काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष राजू रेड्डी यांची प्रमुख उपस्थिती होती.
    घुगूस काँग्रेस कमिटीचे कार्यालय ते गांधी चौक पर्यंत हा सत्याग्रह मार्च शांततेत कोणत्याही घोषणा न देता काढण्यात आला.

     

    गांधी चौक येथे या सत्याग्रह मार्च चा समारोप झाला. यावेळी बोलतांना नम्रता आचार्य- ठेमस्कर यांनी महिला आरक्षण हे केंद्र सरकारने दिलेले गाजर आहे अशी टीका केली. त्याच सोबत मणिपूर जळत असतांना तसेच महिला खेळाडू आंदोलन करत असतांना मात्र हे मोदी सरकार का गप्प बसले होते यांच्या महिला मंत्री का गप्प बसल्या होत्या. असा सवाल यावेळी ठेमस्कर यांनी केला. पण मोदी सरकारच्या या भूल थापांना या देशातील महिला भुलणार नाही. त्या मुळे येणाऱ्या निवडणुकात या देशातील महिला मोदी सरकारला धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही असा इशारा देखील ठेमस्कर यांनी यावेळी दिला. तसेच शहर अध्यक्ष राजू रेड्डी यांनी मोदी सरकार महिला विरोधी आहे, त्यांनी महिलांसाठी सुरू केलेल्या सगळ्या योजना अयशस्वी झाल्या आहेत, त्यामुळेच मोदी सरकारने हे महिला विधेयक आणलं अशी सडेतोड टिका केली.

     

    या सत्याग्रह मार्च मध्ये चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस चंद्रपूर तालुका अध्यक्ष शितल कातकर, घुगूस शहर महिला काँग्रेस च्या अध्यक्ष संगीता बोबडे, उपाध्यक्ष यास्मिन सय्यद, महासचिव पद्ममा त्रिवेणी, महासचिव पुष्पा नक्षणे, सचिव मंगला बुरांडे, सचिव दुर्गा पाटील, सचिव माला माणिकपुरी, सचिव श्रुती कांबळे, अनुसूचित विभागाच्या महिला शहर अध्यक्ष दीप्ती सोनटक्के, सरस्वती कोवे, सुजाता सोनटक्के, पूनम कांबळे, अनवर सय्यद,सोशल मिडिया चे शहर अध्यक्ष रोशन दंतलवार, अलीम शेख, विशाल मादर, रोहित डाकुर, अरविंद चहांदे, सुनील पाटील यांच्या सह बहुसंख्य महिला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

  • चंद्रपूर जिल्ह्यात विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या 129 नागरिकांचा मृत्यू

    News34 chandrapur

    चंद्रपूर : जानेवारी ते ऑगस्ट 2023 या कालावधीत जिल्ह्यात एकूण 534 अपघातांची नोंद झाली असून 233 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. जिल्ह्यात झालेल्या एकूण अपघातांपैकी फक्त दुचाकीच्या अपघातांची संख्या 275 आहे. यात 129 जण मृत्युमुखी पडले आहे. दुचाकीवर हेल्मेट घातले असते तर कदाचित मृत्युचा आकडा कमी होऊ शकला असता. त्यामुळे दुचाकीस्वारांनो, स्वत:च्या व कुटुंबाच्या सुरक्षेसाठी कृपाकरून हेल्मेट घाला, असे कळकळीचे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले.

     

    जिल्हाधिकारी कार्यालयात रस्ता सुरक्षा समितीचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, सहाय्यक जिल्हाधिकारी मुरूगानंथम एम., अतिरिक्त पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, सा.बा. विभागाचे अधिक्षक अभियंता अरुण गाडेगोणे, कार्यकारी अभियंता सुनील कुंभे, मुकेश टांगले, उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक श्री. जिचकार, वाहतूक निरीक्षक प्रवणीकुमार पाटील, राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रक स्मिता सुतावणे, शिक्षणाधिकारी (माध्य.) कल्पना चव्हाण आदी उपस्थित होते.

     

    दुचाकीने वाहतूक करतेवेळी हेल्मेट घालणे अतिशय महत्वाचे आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, त्यामुळे आपण स्वत: तर सुरक्षित राहतोच, मात्र आपले कुटुंबसुध्दा सुरक्षित राहू शकते. अपघात टाळण्यासाठी जिल्ह्यातील मुख्य रस्त्यांची सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस विभाग आणि उप-प्रादेशिक परिवहन विभागाने संयुक्त पाहणी करावी. तसेच त्रृटी किंवा उणिवा असल्यास तत्परतेने त्या पूर्ण कराव्यात. जेणेकरून वाहतूक करतांना नागरिकांना त्रास होणार नाही. रस्त्यावर वारंवार खड्डे पडणार नाही, याबाबत कामाचे योग्य नियोजन करावे. खड्डे पडत असलेल्या रस्त्यांची दर्जेदार आणि कायमस्वरूपी दुरूस्ती करणे आवश्यक आहे.

     

    जिल्ह्यातील टोल नाक्यावर तिनही विभागांनी संयुक्त पाहणी करून वाहतुकीचे नियम, रस्त्याची वेगमर्यादाबाबतचे फलक, सुरक्षित वाहतुकीबाबत दृकश्राव्य माध्यमातील ऐकू येणा-या सुचना आदींची तपासणी करावी. जिल्ह्यात किंवा शहरात ज्या ठिकाणी सिग्नल व्यवस्था आहे, त्या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग अतिशय सुस्पष्ट दिसली पाहिजे. जिल्ह्यात निश्चित करण्यात आलेले ब्लॅकस्पॉट व संभाव्य ब्लॅकस्पॉट ठिकाणांना पोलिस, सार्वजनिक बांधकाम आणि उप-प्रादेशिक परिवहन विभागाने भेट द्यावी. अपघात टाळण्यासाठी ब्लॅकस्पॉटवर काय उपाययोजना करण्यात येत आहे, त्याचा अहवाल पुढील बैठकीत सादर करावा, अशा सुचनाही जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या.

     

    सादरीकरण करतांना उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी सांगितले की, सन 2021 मध्ये जिल्ह्यात एकूण 718 अपघात झाले होते. त्या तुलनेत सन 2022 मध्ये अपघातांची संख्या 474 होती. चालू वर्षी 2023 मध्ये मात्र पहिल्या 8 महिन्यात अपघातांची संख्या 534 पर्यंत पोहचली आहे.

     

    यावेळी जिल्ह्यातील नवीन ब्लॅकस्पॉट, पोलिस आणि परिवहन विभागाने केलेली कार्यवाही, आवश्यकता असलेल्या रस्त्यावर गतिरोधक लावणे, रस्ता सुरक्षा अभियान व त्यावरील उपाययोजनेसाठी लागणा-या खर्चास मान्यता देणे, रस्त्यावरील जड वाहने हटवून नो-पार्किंग झोन घोषित करणे आदींबाबत चर्चा करण्यात आली.

  • दारूच्या नशेत झिंगाट असलेले शिक्षक जेव्हा शाळेत येतात

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मुल – मुल तालुक्यातील मौजा जूनासुरला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सेवेत असणारा शिक्षक जी एन. कुळमेथे हा शिक्षक चक्क दारू ढोसून कर्तव्यावर आला असल्याचे प्रत्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीला आढळून आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शाळेत उपस्थित नव्हते. असे भेट देनाऱ्यानी सांगितले.

     

    याबाबतची माहिती मुल पंच्यायत समितीचे गट विकास अधिकारी यांना मोबाईल वर देण्यात आली असून दारूच्या नशेत असणाऱ्या शिक्षकाला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून ज्ञान दानाचे कार्य करणारा शिक्षक लहान विद्यार्थ्यांना काय घडवणार आणि विद्यार्थी सुद्धा अशा शिक्षकाकडून कोणत्या ज्ञानाची अपेक्षा करणार अशी चर्चा गावकऱ्यांमध्ये केली जात असून पोलिस व प्रशासन काय कारवाई करते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

     

    याबाबत गट विकास अधिकारी यांनी केंद्र प्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी यांना चौकशी करीता पाठविले असून चौकशी अहवाल प्राप्त होताच प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असे सांगितले.

  • महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळावर अरुण तिखे यांची निवड

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मुल – वनविभागात उत्कृष्ठ काम करुन भगवान पूर येथे तीन गावांचे पुनर्वसन करण्यास पुढाकार घेऊन महाराष्ट्र शासनाने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, यांचेकडून एकदा व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचेहस्ते दुसरा पुरस्कार प्राप्त करणारे वन अधीकारी,सामाजिक क्षेत्रात रोटरी क्लब चंद्रपूरचे अध्यक्ष, माळी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष, राजपत्रित अधिकारी संघटनेचे अध्यक्ष, क्रांती ज्योती नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक, कुशल प्रशासक ,ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वन्यप्राणी संरक्षण समिती सदस्य म्हणून सेवा देणारे होतकरू अधिकारी, शांत संयमी,निगर्वी, सर्वांना सोबत घेऊन चालणारे सेवाभावी व मनमिळाऊ वृत्तीचे सामाजिक चळवळीचे मार्गदर्शक अरुण नारायण तीखे यांची राज्याचे वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतीच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ नियामक मंडळाच्या कार्यकारी समितीवर नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.

     

    श्री.अरुण तीखे यांचे नियुक्तीबाबत माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, अविनाश ठाकरे, सरचिटणीस नाना साहेब कांडलकर, प्रदेश महिला आघाडी अध्यक्ष सध्याताई गुरनुले, राज्य उपाध्यक्ष प्राचार्य डॉ.एन.एस. कोकोडे, विभागीय अध्यक्ष चंद्रकांत बोरकर, जिल्हाध्यक्ष डॉ.संजय घाटे, प्रा. रामभाऊ महाडोरे, निलेश खरबडे, रवी गुरनुले, विभागीय महासचिव गुरु गुरनूले, तालुका अध्यक्ष राकेश ठाकरे, गुरुदास चौधरी यांचेसह राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय तालुका स्तरीय महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले असून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे जाहीर आभार मानले आहे.

  • खासदार पाटील माफी मागा, चंद्रपुरात डॉक्टर्स संघटनांचे निषेध आंदोलन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथील अधिष्ठाता यांना खासदार हेमंत पाटील यांनी टॉयलेट स्वच्छ करायला लावल्याने राज्यात पाटील यांचा डॉक्टरांनी काळी फित लावत निषेध नोंदवीला.

    नांदेड शासकीय वैद्यकीय रुग्णालयात मृत्यूच्या तांडवानंतर खासदार हेमंत पाटील यांनी डिन एस.आर. वाकोडे यांना टॉयलेट्स ची स्वच्छता करायला लावली, यावेळी पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी व्हिडीओ बनवीत व्हायरल सुद्धा केला.

     

    या घटनेमुळे डॉक्टर संघटनांनी खासदार पाटील विरोधात एल्गार पुकारत त्यांचा निषेध केला.
    चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेच्या वतीने काळी फित लावत पाटील यांचा निषेध नोंदवला.

     

    निवासी, शिकाऊ डॉक्टर्स व विविध संघटनेच्या डॉक्टरांनी खासदार पाटील यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी यावेळी केली आहे, खासदार असलेल्या लोकप्रतिनिधींचे हे कृत्य संघटना खपवून घेणार नाही अशी माहिती डॉक्टर संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.
    यावेळी संघटनेच्या अध्यक्ष डॉ. तेजस्विनी चौधरी, रोहित होरे, प्रशांत मगदूम, ऋतुजा गांगुर्डे आदींची उपस्थिती होती.

  • डॉक्टरांची पदे कधी भरणार? कांग्रेस आक्रमक

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मुल – शासनाचे आरोग्य सेवेकडे दुर्लक्ष होत असून रुग्णांचे बेहाल होत आहेत. आजच्या स्थितीत एका दिवशी हिवताप व विषमज्वर असे 890 रुग्ण उपचारासाठी दाखल होत असल्याने रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची व कर्मचाऱ्यांची संख्या आवश्यकतेनुसार अपुरी असल्याचे दिसून येत आहे.

     

    यामधे मंजूर पदे ४८ भरलेली पदे ३२ कंत्राटी ५ असून १३ पदे रिक्त असल्याचे प्रत्यक्ष दिसून आले. मुल तालुक्यात सर्वाधिक गावांची संख्या लक्षात घेता उपजिल्हा मंजूर केले. परंतु उपजिल्हा रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच जात असल्याने रुग्णांवर विविध आजारांवर उपचार करणारे डॉक्टर पुरेसे नाहीत. तालुक्यात मोठे उपजिल्हा रुग्णालय असून देखील आय.सी. यु.ची सोय नाही. त्यामुळे भरती केल्यानंतर लगेच त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी त्यांना रेफर केल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत.

     

    औषधांचा साठा पुरेसा नाही तसेच रुग्णालयात बेसिक मेडीसिन नाही. जे इंजेक्शन उपलब्ध आहेत ते पुअर कंडीशनचे असल्याने रुग्णांना तात्काळ फायदा होत नाही. आक्सिजन सुविधा बरोबर नाही. ती गरजेनुसार वेळेवर उपलब्ध केल्या जाते. एटीबायटिक नाही. सोनोग्राफी सेवा असून हप्त्यात फक्त दोनच दिवस तपासणी होत आहे.

     

    कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांची वेतन अडले

    पहिलेच कंत्राटी डाक्टर कर्मचारी यांची संख्या कमी असून मागील चार महिन्यापासून वेतन दिल्या जात नसल्याचे कंत्राटी कर्मचाऱ्यांची दमशक झाली आहे. याबाबत मुल तालुका कांग्रेस,महिला कांग्रेस,युवक काँग्रेस,शहर कांग्रेस वतीने आरोग्य सेवेबाबत लेखी पत्र देऊन अपुरे कर्मचारी त्वरित भरण्यात यावे. औषधांचा साठा पुरेसा उपलब्ध करावे. आय सी.यु. युनिट नियमित ठेवण्यात यावे. उपजिल्हा रुग्णालयात अत्यावश्यक सोई तात्काळ करावे.

     

    शक्यतोवर चंद्रपूरला रेफर करणे टाळावे. रुग्णांवर इथेच उपचार करुन त्यांचे समाधान करावे. नियमित एक्सरे टेक्निशियन ठेवावे. इत्यादी मागण्या बाबत चंद्रपूर येथील शल्य सिकित्सक डॉ.महादेव चिंचोळे यांना तात्काळ बोलावून निवेदन देण्यात आले. याप्रसंगी जिल्हा रुग्णालय येथील डॉ.रामटेके, डॉ कन्नाके, वैद्यकीय अधीक्षक डॉ. लाडे.उपअधीक्षक डॉ.प्रफुल लांडेकर , बालरोग तज्ञ डॉ.मेंढे उपस्थित होते.

     

    समस्यांचे व मागण्यांचे निवेदन देताना कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश रत्नावार, तालुका कांग्रेस अध्यक्ष गुरु गुरनुले, शहर अध्यक्ष सुनील शेरकी,महिला तालुका अध्यक्षा रुपाली संतोषवार,माजी नगर सेविका लीना फुलझेले, युवक अध्यक्ष पवन निलमवार,शहर अध्यक्ष व्यंकटेश पुल्लकवार,महिला शहर अध्यक्ष नलिनी आडपवार, बंडू गुरनुले, सुरेश फुलझेले, सरचिटणीस संदीप मोहबे, आशिष रामटेके यांचे उपस्थितीत निवेदन देण्यात आले.

     

    ग्रामीण आरोग्य सेवा कोलमडली

    ग्रामीण विभागातील जिल्हा परिषदे अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधेच्या बाबतीत प्राथमिक आरोग्य केंद्र ,उपकेंद्र अपुरे कर्मचारी असल्याच्या असंख्य तक्रारी प्राप्त झाल्या असून तालुक्यातील आरोग्यसेवा निकामी झाल्याने चित्र दिसून येत आहे.

     

    ग्रामीण भागातही बाहेरून औषधी आणायला सांगतात. मौजा बेंबाल प्राथमिक आरोग्य केंद्राची काही दिवसापूर्वी गावाच्या दृष्टीने ग्रामीण आरोग्य सेवेसाठी नवीन वास्तू उभारण्यात आली.गेल्या सहा दिवसापूर्वी सायंकाळी ६ वाजता बेंबाड प्राथमिक आरोग्य केंद्रात डीलव्हरीची केस नेली असता तिथे एकही डाक्टर, नर्स ,कर्मचारी उपलब्ध नाही. याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी यांचेकडे तेथील सरपंच चांगदेव केमेकर यांनी संपर्क साधून माहिती दिली असताना सुद्धा त्या महिलेवर उपचार होऊ शकला नाही ही वस्तूस्थिती नाकारता येत नाही. त्यामुळे ग्रामीण आरोग्य सेवाही आक्सिजनवर राबविली जात आहे.

  • चंद्रपुर मनपात अनुभवाचे खोटे प्रमाणपत्र, मनपाने केली पोलिसात तक्रार

    News34 chandrapur

    चंद्रपूर –  मनपा आरोग्य विभागात झालेल्या कंत्राटी भरतीदरम्यान अनुभवाचे खोटे प्रमाणपत्र सादर करून दिशाभूल व फसवणुक केल्याबद्दल दोन उमेदवारांविरुद्ध महानगरपालिकेद्वारे सिटी पोलीस स्टेशन गांधी चौक येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

     

    जुन महिन्यात मनपा आरोग्य विभागातर्फे एएनएम या पदासाठी कंत्राटी तत्वावर १८ पदे भरण्यासंबंधी जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. यात अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.पात्र होण्यास इतर कागदपत्रांसोबतच अनुभव प्रमाणपत्र सुद्धा मागविण्यात आले होते. यात शितल सिद्धार्थ मेश्राम यांनी सीएचएल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर यांचे तर प्रगती शंकर ढोले यांनी सिम्स हॉस्पिटल,बजाज नगर नागपुर येथे काम केले असल्याबाबत अनुभव प्रमाणपत्र सादर केले.

     

    मात्र मनपाद्वारे सदर कागदपत्रांची वैधता तपासण्यास या हॉस्पिटल्सला संपर्क केले असता सदर नावाच्या उमेदवाराने येथे काम केले नसल्याचा अहवाल प्राप्त झाला. नौकरी मिळविण्यास अनुभवाचे खोटे प्रमाणपत्र सादर करून चंद्रपूर महानगरपालिकेची दिशाभूल व फसवणुक केल्याने आरोग्य विभागामार्फत सिटी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

     

    रिक्त पदांची अथवा कंत्राटी पदांची भरती दरम्यान कुठल्याही प्रकारचे खोटे कागदपत्रे सादर करून उमेदवारांनी आपल्या भविष्याचे नुकसान न करून घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

  • चंद्रपूर जिल्ह्यात 15 ऑक्टोम्बर पर्यंत जिल्हाधिकारी यांचा हा आदेश लागू

    News34 chandrapur

    चंद्रपूर : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दि. 1 ते 15 ऑक्टोबर 2023 पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1)(3) नुसार जमावबंदी आदेश लागू केले आहे.

     

    या आदेशान्वये संबंधित अधिकारी यांच्या पूर्व परवानगीशिवाय सभा, मोर्चा, उत्सव व मिरवणुका काढता येणार नाही. पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर किंवा चावडीवर जमा होणार नाहीत किंवा कोणतेही कार्यक्रम आयोजित करणार नाहीत. जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या व्यक्ती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही ठिकाणी अथवा कोणत्याही व्यक्तीस, शस्त्रे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, रिव्हॉल्व्हर, सुरे, काट्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करता येईल, अशी इतर कोणतीही वस्तू, कोणताही क्षार, द्रव्ये पदार्थ, दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ जवळ बाळगता येणार नाही.

     

    दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे, व्यक्तीच्या आकृत्या, प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे, तसेच यामुळे सभ्यता आणि नीतिमत्ता यास धोका पोहोचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल असे किंवा आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे, त्याचा जनतेत प्रसार करणे इत्यादीस प्रतिबंध करण्यात आला आहे.

     

    सदर आदेश 1 ते 15 ऑक्टोबर 2023 पर्यंत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्राकरीता लागू राहील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विनय गौडा यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद आहे.

  • चंद्रपूर जिल्ह्यातील 2 पोलीस अधीक्षकांचा आदेश कागदावरचं

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील रस्त्यावर खासगी बसेसच्या होणाऱ्या अतिक्रमनावर तत्कालीन पोलीस अधीक्षक राजीव जैन व संदीप दिवाण यांनी चाप बसविला होता, मात्र त्यांचा कार्यकाळ समाप्त झाल्यावर तो आदेश फक्त कागदावर राहिला.

    शहरातील मुख्य मार्गावर मागील अनेक महिन्यापासून खासगी बसेसचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे, चंद्रपूर – नागपूर मार्गावरील विश्रामगृह, सार्वजनिक बांधकाम विभाग व न्यायाधीशांच्या शासकीय निवासासमोर खासगी बसेसने जबरदस्तीने अतिक्रमण केले आहे.

     

    वर्ष 2014 मध्ये पोलीस अधीक्षक राजीव जैन यांनी चंद्रपूर शहरातील सपना टाकीज चौक ते हॉटेल राज ‘समोरून बस स्टॅन्ड, सावरकर चौक मार्गे मुल गडचिरोली कडे जाणाऱ्या व मुल गडचिरोली कडून सावरकर चौक ते प्रीयदर्शनी चौक मार्गे सपना टॉकीज चौक चंद्रपूर येथे प्रवासी घेऊन येणाऱ्या सर्व खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या प्रवासी बसेस सावरकर चौकाच्या अलीकडे सुरक्षीत खाजगी ठिकाणाहून प्रवासी घेऊन मोटार वाहन अधिनियमांचे काटोकोरपणे पालन करून प्रवासी वाहतुक करतील असा आदेश काढला होता.

     

    त्यानंतर प्रियदर्शनी चौक ते वरोरा नाका चौक मार्गे नागपूर कडे जाणाऱ्या व नागपूर रोड कडून प्रवासी घेऊन सावरकर चौक मार्गे येणाऱ्या सर्व खाजगी ट्रॅव्हल्स बस कंपनीच्या प्रवासी बसेस जुना वरोरा नाका चौकाचे अलीकडेच सुरक्षीत खाजगी ठिकाणाहून प्रवासी घेऊन मोटार वाहन अधिनियमाचे कठोर पालन करून प्रवासी वाहतुक करतील.

     

    चंद्रपूर शहरातील खाजगी बसेस ट्रॅव्हल्स प्रवासी वाहतुकीस सावरकर चौकाने प्रीयदर्शनी चौक ते जुना वरोरा नाका चौक ह्या परिसरात पुर्णतः प्रवेश बंदी करण्याचा आदेश पारित करण्यात आला होता.

     

    मात्र दोन्ही पोलीस अधीक्षकांचा कार्यकाळ समाप्त झाल्यावर त्यांचा आदेश हा कागदावर राहिला, पोलीस अधीक्षकांच्या आदेशाला धुडकवित असंख्य खासगी बसेसने प्रियदर्शिनी चौक ते वरोरा नाका चौक मार्गावर अतिक्रमण केले आहे.

     

    विशेष म्हणजे वाहतूक नियंत्रक शाखेसमोरील रस्ता हा खासगी बसचा स्टॅण्ड बनला आहे, अविरत उभ्या असलेल्या या मार्गावरील खासगी बसेसमुळे भविष्यात मोठी दुर्घटना नाकारता येत नाही, दुर्घटना होण्याआधी प्रशासनाने जनतेच्याया जीवाशी खेळू नये अशी मागणी अन्न व औषध प्रशासन व चंद्रपूर जिल्ह्याचे सम्पर्क मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडे राष्ट्रवादी कांग्रेसचे महानगर अध्यक्ष राजीव कक्कड यांनी केली आहे.

     

    जनतेला त्रास होऊ नये, त्यांची गैरसोय होवू नये व अपघातासारखे प्रकार घडून जिवीत हानी किंवा वित्तहानी होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ह्या संदर्भात पोलीस, वाहतूक व पटीवाहन या तिन्ही विभागाची जिल्हा अधिकारी कार्यालय बैठक बोलावून मार्गदर्शन करावे. अशी मागणी कक्कड यांनी केली आहे.

     

  • राज्याच्या मुख्य सचिवांनी घेतला शासकीय रुग्णालयाचा आढावा

    News34 chandrapur

    मुंबई – राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सध्या मृत्यूचे तांडव सुरू आहे, अनेकानी सरकारच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, विविध रुग्णालयात होत असणाऱ्या मृत्यूबाबत वृत्ताबाबत राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी आढावा घेत तात्काळ उपाययोजना करण्याचे संबंधित विभागाला निर्देश दिले आहे.

     

    सौनिक यांनी घेतलेल्या आढाव्यात नांदेड, छत्रपती संभाजीनगर व नागपुरातील शासकीय रुग्णालयात होणाऱ्या मृत्यूबाबत आकडेवारी घेतली आहे.

    3 जिल्ह्यात दररोज व महिन्याकाठी किती मृत्यू होतात व का याबाबत सविस्तर माहिती घेतली आहे.

     

    नागपूर मेयो आणि मेडिकल रुग्णालय मिळून
    मासिक मृत्यू: 532
    प्रतिदिन सरासरी: 17

    नांदेड रुग्णालय
    मासिक मृत्यू: 401
    प्रतिदिन सरासरी: 13

    छत्रपती संभाजीनगर रुग्णालय
    मासिक मृत्यू: 426
    प्रतिदिन सरासरी: 14

    ही प्रतिदिन सरासरी आहे. नागपूरचे उदाहरण घ्यायचे तर कधी 17 पेक्षा कमी असतात, तर 17 पेक्षा अधिक सुद्धा असतात.

    खाजगी रुग्णालयात येणारे रुग्ण हे क्रिटिकल अवस्थेत येतात.
    सुट्ट्यांच्या काळात (जशा नुकत्याच 5 दिवस सुट्ट्या आल्या) त्यात प्रामुख्याने सरकारी रुग्णालयाकडे ओढा अधिक असतो.