Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 12 जणांचा मृत्यू

    News34 chandrapur

    बुलढाणा – सैलानी बाबा यांचे दर्शन घेऊन परत निघालेल्या भाविकांचा शनिवारी मध्यरात्री समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला या अपघातात तब्बल 12 जणांचा जागीच मृत्यू झाला. समृद्धी महामार्गावरील वर्ष 2023 मधील दुसरा भीषण अपघात आहे.

    कशी घडली घटना?

    नाशिक जिल्ह्यातील काही भाविक बुलढाणा येथे सैलानी बाबांच्या दर्शनासाठी गेले होते, दर्शन झाल्यावर नाशिक कडे परत जात असताना वैजापूर जांबरगाव शिवारातील टोल नाक्याजवळ उभ्या ट्रक ला भाविकांच्या गाडीने धडक दिली, धडक इतकी जोरदार होती की 12 भाविकांचा जागीच मृत्यू झाला.

     

    स्थानिक नागरिक धावले मदतीला

     

    अपघाताची माहिती मिळाल्यावर स्थानिक नागरिकांनी मदतकार्य चालविले, अपघातात भाविकांचे टेम्पो ट्रॅव्हलर वाहन हे पूर्णतः चक्काचूर झाले, वैजापूर पोलिसांना अपघाताची माहिती मिळाली असता तात्काळ घटनास्थळी 5 ते 6 अंबुलन्स दाखल झाले, 20 प्रवासी जखमी झाले असून काहींना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

    या अपघातात जखमी व मृत प्रवासी हे नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी गावातील निवासी आहे.

    वैजापूर जवळ असलेल्या समृद्धी महामार्गावरील जांबर गाव टोलनाक्यावर उभ्या ट्रक ला भाविकांच्या गाडीने धडक दिली, मृतांमध्ये 4 महिन्याचा बालकाचा सुद्धा समावेश आहे.

     

    अपघातांचे कारण समोर

    स्थानिक नागरिकांनी सांगितले की शनिवारी रात्री RTO ने समृद्धी महामार्गावर ट्रक अडविला, ट्रक बाजूला घेत असताना हा अपघात झाला, धडक इतकी भीषण होती की अपघाताचा आवाज परिसरातील गावात दणाणला.

  • चंद्रपुरात वाॅक फाॅर फ्रिडम

    News34 chandrapur

    चंद्रपूर : मानवी तस्करी हा विषय संपूर्ण जगामधे अतिशय गंभीर होत चालला आहे. या विषयाकडे सामान्य नागरिकांच लक्ष जावं , त्यांनीही सजग व्हावं या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर व व्हिजन रेस्क्यू यांच्या संयुक्त विद्यमाने वाॅक फाॅर फ्रिडम चे आयोजन करण्यात आले होते.

     

    यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश समृद्धी भिष्म, जिल्हा विधीसेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी, तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रशांत काळे, प्रभारी मुख्य न्यायदंडाधिकारी प्रवीण कुलकर्णी, चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अभय पाचपोर आणि सचिव आशिष धर्मपुरीवार, व्हिजन रेस्क्यू संस्थेचे प्रतिनिधी भुषण तोंडरे , वाॅक फाॅर फ्रिडम चंद्रपूर जिल्हा समन्वयक शाम हेडाऊ आदिंची उपस्थिती होती.
    वाॅक फाॅर फ्रिडम मधे चंद्रपूर शहरातील सर्व महाविद्यालयाचे विद्यार्थी व प्राध्यापक वृंद, जिल्हा व सत्र न्यायालयाचे कर्मचारी , जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाचे कर्मचारी,चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य , ईको – प्रो चे बंडू धोत्रे, विद्यार्थी संघटना आदिंचा समावेश होता.

     

    यावेळी बोलतांना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश समृद्धी भिष्म यांनी, मानवी तस्करी हा अतिशय गंभीर विषय असून याबाबत आपण सगळ्यांनी जागरुक रहायला हवं, सजग रहायला हवं व आवश्यक तिथे लगेच समोर येत संबंधित विभागाला तक्रार करायला हवी यासाठीच हा वाॅक फाॅर फ्रिडम आपण घेत आहोत, असे मत व्यक्त केले. तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव सुमित जोशी यांनी प्रास्ताविकातून मानवी तस्करी या विषयाची सविस्तर माहिती देत कार्यक्रमाच्या आयोजनामागची भुमिका विषद केली.

     

    तत्पूर्वी श्रीमती भिष्म यांनी झेंडा दाखवून वाॅक फाॅर फ्रिडमला स्थानिक गांधी चौक येथून सुरुवात केली. सदर रैली जटपूरा गेटला वळसा घालून कस्तुरबा रोड मार्गे परत गांधी चौक येथे वाॅक फाॅर फ्रिडमची सांगता करण्यात आली.

     

    या कार्यक्रमाचे संचालन शाम हेडाऊ यांनी तर आभार व्हिजन रेस्क्यूचे भुषण तोंडरे यांनी मानले.
    कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी धनंजय साखरकर, देवानंद साखरकर, शैलेश दिंडवार, चिन्मय भागवत , पियुष बनकर, आदित्य गचकेश्वर, ओंकार सायंकार, तन्मय बनकर , ओंकार बक्षी आदिंनी अथक परिश्रम घेतले.

  • चंद्रपूर जिल्ह्यातील विरुर पोलिसांवर गंभीर आरोप

    News34 chandrapur

    चंद्रपूर : पोलीस ठाण्यातील विविध गुन्ह्यात साक्षीदार असलेल्या आणि पोलिसांना वेळोवळी मदत करणाऱ्या साक्षीदाराला गावातील काही गुंडाकडून जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याने तसेच पोलीस ठाण्यात खोटे गुन्हे दाखल करून त्रास देण्यात येत असल्याने गाव सोडण्याची वेळ आली आहे. अरुण झाडे विरूर स्टे. असे या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, पोलीसही गुंडाच्या सांगण्यावरून खोटे गुन्ह दाखल करीत असल्याचा आरोप अरुण झाडे यांनी चंद्रपूर येथे श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.

     

    श्रावणकुमार ओरगंटी, राजरेड्डी गोगुलवार, राधा सतीश ओरगंटी यांनी काही महिन्यांपूर्वी त्यांच्याविरोधात दारूविक्रीची पोलिसात तक्रार केल्याचा संशय घेऊन वाद घालत मारहाण केल्याची तक्रार झाडे यांनी पोलिसांनी केली होती. या तक्रारीवरून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

     

    यानंतर वारंवार मला दमदाटी आणि धमक्या दिल्या जात आहे. याबाबत आपण विरूर पोलीस ठाण्यात अनेकदा तक्रारी केल्या आहेत. परंतु, पोलीस मलाच दमदाटी करून तक्रार घेत नाही. त्यामुळे गुंडांची हिमत वाढत आहे. यानंतर गुड्डू शेख यांनी रेती तस्करीची तक्रार केली म्हणून जिवे मारण्याची धमकी देत आहे. याबाबतची तक्रारही पोलीस ठाण्यात करण्यात आली. पंरतु, पोलिसांनी तक्रार घेतली नाही. गावातील दारूतस्कर, रेतीतस्करांना बळ देण्याचे काम स्थानिक ठाणेदार करीत असून गुंडांमुळे गाव सोडावे लागल्याने जगण्याचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप झाडे यांनी केला आहे.

     

    ४ जुलै २०२३ रोजी काही दारूविक्रेत्यांनी चिरंजिव चिलका याला दारू पाजून मला मारण्यासाठी पाठविले. जगतसिंग यांच्या हॉटेलात बसून असताना चिलका यांने शिवीगाळ केली. पंरतु, मी पोलिसांना फोनवर माहिती दिल्यानंतर पोलीस आले. यांनतर पोलीस ठाण्यात गेलो. यावेळी पोलीस ठाण्यात गुड्डू शेख, राजरेड्डी गोगुलवार यांनी पोलिसांसमोर झाडाला बांधून मारण्याची धमकी देत होते. पंरतु, ठाणेदारांनी कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप अरुण आबाजी झाडे यांनी केला आहे.

     

    मला वारंवार धमकी देणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी अरुण झाडे यांनी केली आहे

  • चंद्रपूर राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष प्रगतीचा आढावा

    News34 chandrapur

    चंद्रपूर :- महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धर्मराव बाबा आत्राम यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यकारणी पदाधिकाऱ्यांची भेट घेत आढावा घेतला. यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटने बांधणी बाबत झालेल्या प्रगतीचा आढावा सादर करीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तालुक्यातील समस्या व विकास कामांबाबत आणलेल्ले निवेदने मंत्री महोदयांना देत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश द्यावे किवा बैठक लावावी अशी मागणी केली.

     

    जिल्ह्यातील कोळसा खाणीतील कामगार व प्रकल्पग्रस्त, वन्यप्राण्यांमुळे होत असलेले शेतकऱ्यांचे नुकसान, जिवती तालुक्यातील वन कायद्यामुळे विकास कामावर झालेला परिणाम, आदिवासी व मागासवर्गीय समाजातील घरकुल बांधकाम रखडल्या बाबत, ग्रामीण भागातील रस्ते व इतर रखडलेल्या विकास कामाबद्दलचे निवेदने मंत्रिमहोदयानी स्विकारत स्थानिक प्रश्न जिल्हास्तरावर सोडवू व इतर प्रश्नांसंदर्भात उपमुख्यमंत्री मा.अजित दादा पवार यांच्याकडे बैठक घेऊन योग्य तो मार्ग काढण्यात येईल अशी हमी दिली.

     

    यावेळी काही पदाधिकार्यांच्या नामदार आत्राम यांच्या हस्ते नियुक्त्या करण्यात आल्या. चंद्रपूर, मुल व घुग्गुस येथील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे राहणार असुन पक्षातर्फे ताकत देण्याचे काम करण्यात येईल अशी ग्वाही धर्मराव आत्राम यांनी उपस्थितांना दिली. गोंदिया जिल्हयाच्या पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे मा. धर्मराव आत्राम यांचा सत्कार करण्यात आला.

     

    यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, प्रदेश सहसचिव आबीदजी अली, शहर अध्यक्ष राजीव कक्कड, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष राकेश सोमानी, वरोरा विधानसभा अध्यक्ष विलास नेरकर, चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष सुजित उपरे, नगरसेवक महेंद्रसिंह चंदेल, चंद्रपूर तालुका अध्यक्ष श्रीनिवास गोसकुल्ला, मुल तालुका अध्यक्ष मंगेश पोटवार, राजुरा तालुका अध्यक्ष संतोष देरकर, वरोरा तालुका अध्यक्ष रवी भोयर, कार्याध्यक्ष तणवीर शेख, भद्रावती शहर अध्यक्ष गितेश सातपुते, हर्षवर्धन पिपरे, रकीब शेख, रवि डिकोंडा, आकाश येसणकर, चंद्रकांत कुंभारे, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष नौशाद शेख उपस्थित होते.

     

    तसेच पदाधिकारी पंचायत समिती सदस्य पंकज ढेंगारे, तिमोती बंडावार, माजी सरपंच अमोल ठाकरे, माजी नगरसेवक कुतुबुद्दीन सिटी, दिपक तुरारे, रोशन फुलझेले, समीर शेख, अनुकूल खन्नाडे, अंकित ढेंगारे, किसन झाडे, सुजित कावळे, महेंद्र बाग, योहान इरगुराला, गणेश तामटकर, प्रदीप लांडगे, संजय खेवले, भोजराज शर्मा, प्रशांत झांबरे, नितीन घुबडे, सौरभ घोरपडे, ईश्वर बट्टे, रणजित ठाकूर, पियुष चांदेकर, अमर गोमासे, रोशन ढवळे, मनोज सोनी, राहुल देवतळे, पंकज जाधव, सिहल नगराळे, पवन बंडीवार, राजकुमार खोब्रागडे, सनी शर्मा, निलेश टोंगे, आसिफ शेख, राहुल भगत यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

  • मराठा नंतर आता ओबीसी समाज आक्रमक

    News34 chandrapur

    चंद्रपूर – ओबीसींचे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या २० दिवसापासून मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात येऊ नये, राज्यामध्ये बिहारच्या धर्तीवर जातनिहाय सर्वे करण्यात यावा, तसेच प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह सुरू करण्यात यावे, स्वाधार योजना सुरू करण्यात यावी, या व इतर 22 मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेतृत्वात सुरू असलेल आंदोलनाची 30सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सांगता करण्यात आले.

     

    मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर (दिनांक 29 सप्टेंबर )ला राज्यातील ओबीसी नेत्यांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये ओबीसींच्या सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन राज्य शासनाने दिले. तसेच या मागण्यांवर लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचे आश्वासन सुद्धा राज्य सरकारने दिले.

     

    उपोषण सोडायला आलेले उपमुख्यमंत्री यांनी पुढील तीन दिवसात या सर्व मंजूर मागण्यांचे इतिवृत्त प्रकाशित करू असे बोलले. परंतु अजून पर्यत इतिवृत्त दिलेले नाही म्हणून आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्याच्या तसेच ओबीसी योध्दा रवींद्र टोंगे, विजय बलकी व प्रेमानंद जोगी यांचा नागरी सत्कार कार्यक्रम ठरविण्यातच्या दृष्टीकोनातून रविवार दिनांक 15 ऑक्टोबर 2023 ला दुपारी 1 वाजता मातोश्री सभागृह , तुकुम येथे बैठकीचे आयोजन केले आहे उपस्थित राहण्याचे आवाहन सचिन राजूरकर, महासचिव राष्ट्रिय ओबीसी महासंघ यांनी केले आहे.

  • चंद्रपूर चाईल्ड लाईनचे कौतुकास्पद कार्य

    News34 chandrapur

    चंद्रपूर : बल्लारपूर,रेल्वे पोलीस दलास बल्लारपूर येथे दि. 8 ऑक्टोबर रोजी केरळमधील हरविलेला बालक मिळाला. रेल्वे पोलीस दलाने चाईल्ड हेल्पलाईनला सदर बालकाची माहिती दिली. चाईल्ड हेल्पलाईन टिमने रेल्वे स्टेशन स्टेशन, बल्लारपूर येथे भेट देत बालकांची संपूर्ण माहिती जाणून घेतली. व बालकाची माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी व बालकल्याण समितीला दिली. तसेच समितीच्या आदेशान्वये, सदर बालकास शासकीय बालगृह येथे ठेवण्यात आले.

     

    बालकल्याण समितीने बालकाच्या पालकांशी संपर्क साधला. चंद्रपूर येथे बालक असल्याचे सांगून पालकांना बोलावून घेतले व या केसबाबत बालकल्याण समितीशी चर्चा केली. दि. 10 ऑक्टोबर रोजी बालकाच्या पालकांना बालकल्याण समितीसमोर उपस्थित करण्यात आले. समितीने सर्व कागदपत्रांची तपासणी करुन सदर बालकाला पालकांच्या ताब्यात दिले.

     

    सदर प्रकरणात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दिपक बानाईत, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा क्षमा बासरकर, सदस्या ज्योत्स्ना मोहितकर, अमृता वाघ, वनिता घुमे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर त्यासोबतच, चाईल्ड हेल्पलाईनचे प्रकल्प समन्वयक अभिषेक मोहुर्ले, प्रदीप वैरागडे यांच्यासह चाईल्ड हेल्पलाईन टिमने बालकाला त्याच्या पालकास मिळवून देण्यासाठी महत्वाची भुमिका पार पाडली.

  • भारत राष्ट्र समितीचे जनआक्रोश आंदोलन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हात नव्याने एन्ट्री मारलेल्या भारत राष्ट्र समितीचा आंदोलनाने प्रस्थापित पक्षांच्या भुवया उंचावल्या आहेत. सामान्य जनतेचा ओढा भारत राष्ट्र समितीकडे वडल्याचे चित्र जीवती मध्ये दिसून आलं.जीवती तालुक्यातील प्रश्नांना घेऊन बीआरएसने जनआक्रोश मोर्चा काढला. भारत राष्ट्र समितीचे नेते भूषण फुसे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. मोर्च्यात हजारो नागरिकांनी सहभाग घेतला होता. अब की बार, किसान सरकार या घोषणानी जिवती शहर दुमदुमल होत.

     

    तेलंगणा राज्याला विकासाच्या उंच शिखरावर घेऊन गेलेल्या के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रातील राजकारणात पाय पसरवायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात झालेल्या त्यांच्या सभेला तुफान गर्दी एकवटली होती. राज्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्व असलेल्या जिल्ह्यात त्यांच्या सभा पार पडल्या होत्या.मोठ्या संख्येने बीआरएस कडे जनता वढली असल्याचे चित्र राज्यात दिसून येत आहे.दुसरीकडे राज्याचा शेवटचा टोकावर असलेल्या जीवती शहरात ” अब की बार, किसान सरकार ” हा नारा गुंजला.

     

    महाराष्ट्राचा शेवटचा टोकावर असलेल्या चंद्रपूर जिल्हातील जिवती तालुक्याची निर्मिती 21 वर्षांपूर्वी झाली खरी मात्र अद्यापही विकासाचा मुख्य प्रवाहात तालुका आलेला नाही. मागासलेपणाची चादर ओढून हा तालुका उभा आहे. अनेक गावात मूलभूत सुविधांच्याही अभाव आहे. तालुक्यात धड रस्ते नाहीत, आरोग्य सुविधा नाहीत.पिण्याचा पाण्यासाठी येथे सारखी वनवन करावी लागते.इथली शिक्षण व्यवस्था पार कोडमलेली आहे. शेत जमिनीचे पट्टे द्या, ही येथील जनतेची मुख्य मागणी आहे. तालुक्यातील जमिनीचे अद्याप फेरफार झालेले नाही.

     

    अश्या विविध प्रश्नांना घेऊन भारत राष्ट्र समितीने जनआक्रोश मोर्चा काढला.भारत राष्ट्र समितीचे नेते भूषण फुसे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला.मोर्च्यात हजारो नागरिकांनी सहभाग घेतला.तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट शेत जमिनीचे पट्टे देण्यात यावे,शेत जमीनीचे फेरफार त्वरीत सुरू करावे, सिंचनाचे प्रकल्प,युवकांना रोजगार उपलब्ध करूण देण्यात यावा, अश्या मागण्या यावेळी लावून धरण्यात आल्या होत्या.

     

    या मोर्च्यात सविता वझे, ज्योती नळे, अनुसूर्या नूती, राकेश चीलकुलवार, बालाजी कारले, अजय साकीनाला, आशिष नामवाड, लखन अडबाले, महेंद्र ठाकूर, सनी रेड्डी, सुभाष हजारे, सुभाष राठोड, सुबोध चिकटे, इस्लाम शेख, विजय राठोड, बालाजी आत्राम, गणेश शेंबडे, संघर्ष पडवेकर, नामदेव कोडापे यांनी सहभाग घेतला. तालुक्यातील खडकी रायपूर, लांबोरी ,महाराज गुडा ,पाटण, शेणगाव ,आंबेजरी, कुंबेजरी ,लेंडीगुडा, भारी ,धाबा, भूरीरऐसपूर, पल्लेजरी, टेकामांडवा, अर्जुना धोंडी सह अनेक गावातील हजारो नागरिक सहभागी झाले होते.

  • मूल येथे धान खरेदीसाठी नोंदणी केंद्राला मंजुरी

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मुल – खरीप हंगाम धान 2023-2024 मधिल उत्पादीत धान लवकरच काढणीला सुरूवात होणार आहे. नविन हंगामातील धानाला बाजारपेठेत शासकीय हमीभाव दरापेक्षा कमी दराने खरेदी होत असल्यामूळे शेतकऱ्यांना आर्थीक भुर्दंड होत असते. करिता शासकीय हमीभाव केंद्रावर धान विक्री केल्यास सदर धान शासकीय हमीभाव दराने त्यांची विक्री होवून शेतकऱ्यांना आर्थीक फायदा होवू शकते यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती मुल येथे खरेदी केंद्र सुरु करण्यास मंजुरी द्यावी अशी मागणी सभापती राकेश रत्नावार यांनी केली होती.
    या मागणीची गंभीर दखल राज्याचे विरोधी पक्ष नेते ना.विजय वडेट्टीवार यांनी तात्काळ दखल घेऊन जिल्हा मार्केटिंग अधिकारी चंद्रपूर यांचे कडून दिनांक १३/१०/२०२३ रोजी पत्र क्रमांक ६५५/२०२३-२४ नुसार मंजुरी प्रदान केली आहे.

     

    आजमीतीस शासकीय हमीभाव केंद्रावर विक्रीची नोंदणी सुरू होणार असून तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केल्या जात आहे. यावर्षी शासकीय हमीभाव दराने खरेदी होणार असून धान विक्रीची नोंदणी सुरू केली जाणार आहे. जेव्हा धान काढणीची वेळ येईल तेव्हा नोंदणी करावी की, शेतीचे कामे करावे. तसेच, नोंदणी केंद्रावर शेतकऱ्यांला स्वत: उपस्थिती राहावे लागनार आहे.

     

    मूल तालूका हा धान उत्पादक तालूका म्हणून प्रसिध्द असून धानाचे मोठया प्रमाणात उत्पादन होत असते. त्यामूळे, शेतकऱ्यांकडील शासकीय हमीभाव दराने खरेदी करण्याकरिता नोंदणीची प्रक्रिया तात्काळ सुरू होणार असून शेतकऱ्यांच्या हिताची मागणी ना.विजयभाऊ वड्डेट्टीवार,विरोधी पक्ष नेता,विधानसभा तथा माजी मंत्री, यांनी तात्काळ मंजुरी मिळून दिल्याबद्दल बाजार समिती पदाधिकारी व तालुक्यातील शेतकऱ्यांनी ना.विजय वडेट्टीवार यांचे जाहीर आभार मानले आहे.

     

    मंजुरी पत्र देताना विरोधी पक्ष नेते ना.विजय वडेट्टीवार, सी.डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष संतोष सिंह रावत, सभापती राकेश रत्नावार,उपसभापती राजेंद्र कन्नमवार, माजी सभापती तथा तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष व संचालक घनश्याम येनुरकर, संचालक अखिल गांगरेड्डीवर,राहुल मुरकुटे, सरपंच चांगदेव केमेकार ,युवक काँग्रेस अध्यक्ष पवन नीलमवर्,खरेदी विक्री सोसायटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम भुरसे, संचालक हसन वाढई,विनोद कामडी आदी कांग्रेस पदाधिकारी व संचालक उपस्थित होते.

  • ढोल ताशांच्या गजरात नामदार सुधीर मुनगंटीवार यांचे स्वागत

    News34 chandrapur

    नागपूर : अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची वापरलेली वाघनखं लंडनहून भारतात आणण्याच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करून राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर-वर्धा पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे उपराजधानीत ढोल-ताशांच्या गजरात भव्यदिव्य स्वागत करण्यात आले. चंद्रपूर, वर्धा, नागपुरातील भाजप कार्यकर्ते व शिवभक्तांच्या गर्दीने यावेळी नागपूर विमानतळाचा परिसर फुलुन गेला होता.

     

    विमानतळावर जमलेल्या कार्यकर्त्यांनी यावेळी ना. श्री. मुनगंटीवार यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, पेशवेकालीन टोपी, शाल-श्रीफळ आदी वस्तू भेट देत त्यांचा सत्कार केला. आनंदी कार्यकर्त्यांनी व शिवभक्तांनी ना. श्री. मुनगंटीवार यांना पेढे भरवत जल्लोष साजरा केला. यावेळी आमदार पंकज भोयर ,आश्विनी जिचकार, भाजपा प्रदेश सचिव राजेश बकाने,वर्धा भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, बंटी (जीतेंद्र) कुकुडे भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष नागपूर, विष्णू चांदे महानगर संघटन मंत्री नागपूर,बादल राऊत भाजयुमो महानगर जिल्हाध्यक्ष नागपूर,चंद्रपूरच्या माजी महापौर राखी कंचर्लावार, माजी भाजपा महानगर अध्यक्ष चंद्रपूर डॉ.मंगेश गुलवाडे,निलेश किटे, सुभाष कासनगोटूवार,ब्रीजभूषण पाझारे, जयंत कावळे, राजू मुक्कावार,सचिन बोगावार, स्वप्नील कलुरवार आदींनी स्वागत केले.

     

    यावेळी बोलताना ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं आणण्यासाठी सामंजस्य करार करण्यासाठी व येत्या काळात भारतात आणण्याचे सौभाग्य आपल्याला प्राप्त झाले. त्यामुळे आपण स्वत:ला अत्यंत भाग्यवान मानतो. वाघनखांसह महाराजांची जगदंबा तलवार आणि लंडनच्या संग्रहालयातील महाराष्ट्राच्या वारसाची साक्ष देणाऱ्या इतर वस्तुही लवकरच भारतात येण्याकरीता आपण पूर्ण प्रयत्न करू असा विश्वासही ना. श्री. मुनगंटीवार यांनी ठामपणे व्यक्त केला.

     

    लंडन आणि जपानचा दौरा आटोपल्यानंतर आपण भारतात परतलो त्यावेळी आपले भव्यदिव्य स्वागत करण्यात आले. शिवभक्तांच्या या प्रेम आणि आपुलकीने आपण भारावलो आहोत. हा क्षण आपण आयुष्यात कधीही विसरू शकत नाही, असे ना. श्री. मुनगंटीवार यांनी नमूद केले.

     

    भारत-पाक सिमेवर महाराजांचा पुतळा उभारणार

    आम्ही पुणेकर या संस्थेने श्रीनगरातील कुपवारा जिल्ह्यात भारत-पाकिस्तान सिमेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे. महाराष्ट्र शासन त्यांना यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. सिमेवर हा पुतळा उभारण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पाकिस्तानला हा पुतळा पाहुनच धडकी भरेल, असे ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी ठामपणे नमूद केले.

  • महावितरणचे आवाहन उत्सव साजरा करा, पण जरा सांभाळून

    News34 chandrapur

    चंद्रपूर – नवरात्रोत्सवाची मोठ्या प्रमाणात तयारी सुरू झाली आहे. उत्सव साजरा करा, पण जरा सांभाळून! विजेपुढे चूकीला माफी नाही. आत्मविश्वास किंवा नजर अंदाजाने झालेली एखादी छोटीसी चुकही आपल्या उत्सवावर वीरजन घालू शकते. सजगता हिच सुरक्षा आहे. त्यामुळे सुरक्षेला प्राधान्य देत अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

    मंडप आणि संच मांडणी

    सुरक्षेला प्राधान्य देत मंडपाची रोषणाईसाठी विद्युत व्यवस्था व संच मांडणी ही अधिकृत विद्युत कंत्राटदारांकडूनच करून घेणे आवश्यक आहे.

     

    दुर्गोत्सव मंडपातील वीजयंत्रणेचे अर्थिंग सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी. मंडळाच्या अंतर्गत वायरचे इन्सूलेशन खराब झाल्यास अशा वायर्समधून मंडपाच्या लोखंडी पत्र्यांमध्ये किंवा ओल्या वस्तुंमध्ये विद्युत प्रवाह येऊ शकतो. हा प्रकार टाळण्यासाठी वायर्सचे जोड काढून टाकावेत किंवा जोड द्यायचा असल्यास योग्य क्षमतेच्या इन्सुलेशन टेपने जोड देण्यात तसेच स्वीचबोर्डच्यामागे प्लायवूड किंवा लाकडी फळी लावल्याची खात्री करून घ्यावी.

    सुरक्षित अंतर राखावे

    महावितरणच्या यंत्रणेकडून उत्सव काळात ग्राहकांना सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठा होण्यासाठी पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. दुर्गोत्सव मंडळांनी मंडप टाकतांना वितरण रोहित्रे ( ट्रान्सफॉर्मर), विद्युत खांबास ताण दिलेली तार भूमिगत वाहिनीचे फिडर पिलर यापासून सुरक्षित अंतर राखणे आवश्यक आहे.

     

    भक्तांनी व मंडळ कार्यकर्त्यांनी विद्युत खांब, रोहित्रे, फिटर पिलर इत्यादी वर चढू नये, मिरवणूकीत लोखंडी / धातूच्या रॉडच्या झेंड्याचा वाहनात किंवा वाहनाच्या टपावरील कार्यकर्त्यांचा विद्युत वाहिन्यांना स्पर्श होणार नाही, याची काळजी घ्यावी.

    घरगुती दराने वीज पुरवठा

    ■ उत्सवासाठी घरगुती दरानेच वीज पुरवठा होणार असल्याने अधीकृत जोडणी घ्यावी. दुर्गोत्सव मंडळांनी अनधिकृत विजेचा वापर केल्यास भारतीय विद्युत कायदा २००३ नुसार कारवाई करण्यात येणार आहे.
    स्वतंत्र न्युट्रल घेणे गरजेचे

    ■ उत्सवादरम्यान वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे अत्यावश्यक आहे. काही कारणास्तव वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरु केल्यास एकाच न्यूट्रलमुळे जनरेटरमधील वीजप्रवाह लघुदाब वीजवाहिनीमध्ये प्रवाहित होतो व त्यातून जीवघेण्या अपघाताची शक्यता निर्माण होते.

    झेंडे फिरवताना काळजी घ्या…

    ■ मूर्ती स्थापनेच्या दिवशी तसेच विसर्जनाच्या दिवशी मिरवणूकीत झेंडे फिरवताना काळजी घ्यायला हवी. उत्साहाच्या भरात झेंड्याचा स्पर्श विद्युत तारांना होणार नाही याची काळजी घ्यावी. बऱ्याचदा लोखंडी किंवा मेटल रॉड लावलेला असतो. या रॉडमधून विजेचा धक्का बसण्याचा मोठा धोका आहे. त्यामुळे लाकडी काठी बसवावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.