Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • चंद्रपुरात मिटकरीला अटक

    News34 chandrapur

    चंद्रपूर/मूल – शेत जमीन दुसऱ्या व्यक्तीच्या नावे करण्यासाठी दुय्यम निबंधकाने अर्जदाराला 15 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली, 12 ऑक्टोबर ला तडजोडीअंती 10 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने दुय्यम निबंधकाला रंगेहात अटक केली. Bribe

     

    मूल तालुक्यातील मौजा मारोडा येथे राहणारे तक्रारदार हे स्वतः दस्तलेखनाचे काम करतात, तक्रारदार यांच्याकडे त्यांचे पक्षकार यांची शेती दुसऱ्याच्या नावावर करायची होती त्या संबंधीचे दस्त नोंदणीचे काम करीत पुढील कामाकरिता सदर कागदपत्रे दुय्यम निबंधक कार्यालय मूल येथील दुय्यम निबंधक श्रेणी 1 अधिकारी 44 वर्षीय श्रीमती वैशाली मिटकरी यांच्याकडे जाऊन दस्त तपासणी व शेत जमिनीचे मूल्यांकन काढत दस्तांची मुद्रांक व नोंदणी फी बाबत विचारणा केली असता सदर कामासाठी फी व्यतिरिक्त 15 हजार रुपयांची मागणी मिटकरी यांनी केली. Acb trap

     

    तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत चंद्रपूर लाचलुचपत विभागात तक्रार दिली, तक्रारीची पडताळणी केल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 12 ऑक्टोबर ला सापळा रचला.

     

    तडजोडीअंती 10 हजार रुपये स्वीकारण्याची तयारी वैशाली मिटकरी यांनी दर्शविली, दुय्यम निबंधक कार्यालय मूल येथे 10 हजार रुपये पंचासमक्ष स्वीकारताना वैशाली मिटकरी यांना रंगेहात अटक करण्यात आली.

     

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक राहुल माकनिकर, अप्पर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे, पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील, पोलीस कर्मचारी हिवराज नेवारे, वैभव गाडगे, अमोल सिडाम, पुष्पा काचोळे यांनी केली.

  • चंद्रपूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने कलम 36 लागू

    News34 chandrapur

    चंद्रपूर  : जिल्ह्यात 15 व 16 ऑक्टोबर रोजी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन, तसेच दि. 15 ते 27 ऑक्टोबर 2023 पर्यंत नवरात्रोत्सव (दसरा,रावणदहन/पुजापाठ, कोजागिरी, धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन) तसेच दि. 21 ऑक्टोबर 2023 रोजी क्रांतीवीर बाबूराव पुलेश्वर शेडमाके यांचा पुण्यतिथी कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून दि. 15 ऑक्टोबरच्या रात्री 12 वाजतापासून ते 29 ऑक्टोबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंतच्या कालावधीत महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 36 लागू करण्यात येत आहे.

     

    या कालावधीत सार्वजनिक शांततेला व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये, तसेच सार्वजनिक ठिकाणी वागणुकीबाबत, वाद्य वाजविण्याबाबत,सभेचे आयोजन व मिरवणूक काढण्याबाबत, त्याठिकाणी रस्ते निश्चित करण्याबाबत, लाऊड स्पीकर वापरण्याबाबत योग्य निर्बंध व निर्देश देण्याचे अधिकार चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांना प्रदान करण्यात येत आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी कळविले आहे.

     

    हे आहेत पोलिस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांचे अधिकार

    मिरवणूक व सभेच्या ठिकाणी त्यातील लोकांच्या वागणुकीबाबत योग्य निर्देश देण्याचे अधिकार, मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारित करणे तसेच धार्मिक पूजास्थानाच्या जवळ लोकांच्या वागणुकीस निर्बंध घालण्याचे अधिकार, मिरवणुकीस बाधा होणार नाही याबाबतचे आदेश तसेच धार्मिक पूजास्थळी लोकांच्या वागणुकीवर निर्बंध घालण्याचे अधिकार, सार्वजनिक रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजवणे, गाणी गाणे, ढोल ताशे वाजविणे आदी निर्बंध घालण्याचे अधिकार, रस्ते व इतर सर्व सार्वजनिक ठिकाणी सुव्यवस्था ठेवण्यासाठी निर्देश देण्याचे अधिकार, सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर लाऊड स्पीकर वाजविण्यावर निर्बंध तसेच मर्यादा घालण्याचे अधिकार, तसेच कलम 33, 35,37 ते 40,42,43 व 45 मुंबई पोलिस अधिनियमान्वये काढण्यात आलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे व सूचना देण्याचे अधिकार प्रदान करण्यात येत आहे.

     

    सदर आदेश लागू असतांना सभा, मिरवणुकीत वाद्य वाजवणे, लाऊड स्पीकर वाजविणे, मिरवणुकीत नारे लावणे, मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारित करण्यासाठी संबंधित ठाणे अंमलदार यांची परवानगी घ्यावी. सर्व बाबतीत पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच त्यांच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचे सर्व पोलिस अधिकारी यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करावे. सदर आदेश दि. 15 ऑक्टोबरचे रात्री 12 वाजेपासुन ते दि. 29 ऑक्टोबर 2023 च्या रात्री 12 वाजेपर्यंत अंमलात राहील,असे पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद आहे.

  • चंद्रपुर नवरात्री महोत्सवात डीजे वाजणार काय?

    News34 chandrapur

    चंद्रपूर : केंद्र शासनाच्या ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) सुधारीत नियम 2017 अन्वये तसेच ध्वनी प्रदूषण(नियमन व नियंत्रण) नियम, 2000 च्या नियम 5(3)नुसार, ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धक यांचा श्रोतगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागाखेरीज इतर ठिकाणी, ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी 6 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत वापर करण्यासाठी, संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याकरीता सन-2023 मधील 10 सवलतीचे दिवस निश्चित करण्यात आले आहे. त्यापैकी 5 दिवस राखीव ठेवण्यात आले आहे. निश्चित करण्यात आलेल्या 10 दिवसांपैकी अष्टमी दि. 22 ते 23 ऑक्टोबर 2023 हे 2 दिवस नवरात्र उत्सवाकरीता निश्चित करण्यात आले आहे.

     

    तसेच, आमदार किशोर जोरगेवार यांनी नवरात्रोत्सवात माता महाकाली महोत्सवाकरीता पंचमी, षष्टी व सप्तमी दि. 19 ते 21 ऑक्टोबर 2023 या कालावधीत सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वाजविण्यास सवलत मिळण्याकरीता विंनती केली आहे. त्याअनुषंगाने, नवरात्र उत्सवादरम्यान श्री. माता महाकाली महोत्सवाकरीता ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी, राखीव ठेवण्यात आलेल्या 5 दिवसापैकी 1 दिवस दि. 19 ऑक्टोबर रोजी पंचमी निमित्त सवलतीचा दिवस म्हणून निश्चित करण्यात येत आहे.

     

    निश्चित करण्यात आलेल्या सवलतीच्या दिवशी सक्षम प्राधिका-यांकडून परवानगी घेऊनच त्यांनी ठरवून दिलेल्या अटी व शर्ती प्रमाणेच ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धकाचा वापर करता येईल, असे जिल्हा दंडाधिकारी विनय गौडा यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद आहे.

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाकाली महोत्सवाचे टिझर लाँच

    News34 chandrapur

    चंद्रपूर – राज्याचे मूख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चंद्रपूरात आयोजित श्री माता महकाली महोत्सवाच्या पहिल्या टिझरची लाँचींग करण्यात आली आहे. काल मुबंई येथे मुख्यमंत्री यांनी सदर टीझरची लाँचींग केली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांची उपस्थिती होती.

     

    माता महाकाली महोत्सवाची जय्यत तयारी चंद्रपूरात सुरु आहे. 19 ऑक्टोबर पासून महोत्सवाला सुरवात होणार आहे. यासाठी विविध नामांकित कलाकार चंद्रपूरात येणार असून या दरम्यान सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कायक्रमांचे आयोजन नियोजित करण्यात आले आहे. मागच्या वर्षी पार पडलेल्या श्री महाकाली महोत्सवला नागरिकांचा मिळालेला सहभाग लक्षात घेता यंदाचेही महोत्सव भव्य होणार असल्याचा अंदाज वर्तविल्या जात आहे.

     

    दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथील वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री माता महाकाली महोत्सवच्या पहिल्या टिझरची लाँचिंग करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महोत्सवाबाबत आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून माहिती जाणून घेतली आहे.

     

    सदर टिझरमध्ये यंदाच्या महाकाली महोत्सवातील आर्कषण दर्शविण्यात आले आहे. विशेष म्हणजे यापुर्वी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेत त्यांना श्री माता महाकाली महोत्सवाची निमंत्रण पत्रिका दिली आहे. यावेळी त्यांनी माता महाकालीच्या दर्शनासाठी महोत्सवा दरम्यान चंद्रपूरात येणार असल्याचे म्हटले आहे.

  • चंद्रपुरातील 2 लाख रुपयांची मॉर्निंग वॉक

    News34 chandrapur

    चंद्रपूर – आजच्या धावपळीच्या युगात आरोग्य ठीक रहावे यासाठी नागरिक योगा व सकाळी बाहेर फिरायला जातात मात्र सकाळी बाहेर फिरायला जाणे किती महागात पडू शकते याचे जिवंत उदाहरण चंद्रपुर शहरातील जटपुरा गेट येथे घडले आहे.

     

    6 ऑक्टोबर ला जटपुरा गेट परिसरातील विश्व भारती हॉटेलच्या मागे राहणारे संजय गोडे हे पहाटे नेहमी फिरायला बाहेर जातात, 6 ऑक्टोबर रोजी पहाटे 4 वाजताच्या सुमारास संजय गोडे हे घरातील दाराची कडी बाहेरून लावत फिरायला गेले होते, त्यावेळी त्यांची पत्नी वर्षा गोडे ह्या आत झोपून होत्या, या संधीचा फायदा घेत अज्ञाताने गोडे यांच्या घरी प्रवेश करीत हॉल मध्ये असलेली सोन्याच्या दागिन्यांची बॅग पळविली, त्या बॅग मध्ये तब्बल 2 लाख 14 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने होते.

     

    संजय गोडे जेव्हा घरी परतले त्यावेळी त्यांना ती बॅग कुठेही आढळून आली नाही, या प्रकरणी फिर्यादी वर्षा गोडे यांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली.

     

    चंद्रपूर शहरात घरफोडीच्या घटनांना आळा बसावा यासाठी पोलीस अधीक्षक परदेशी यांनी सदर प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केले, पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी पथक नेमत प्रकरणाचा तपास सुरू केला.

     

    घरफोडी प्रकरणाचा कौशल्यपूर्ण तपास करीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रेकॉर्डवरील गुन्हेगार 23 वर्षीय उमाकांत उर्फ गोलू सुनील उदासी याला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने गोडे यांच्या घरातील बॅग पळविली असल्याचे कबूल केले.

     

    चोरी केलेल्या मालाबद्दल विचारणा केली असता सदर मुद्देमाल आरोपी उमाकांत उदासी यांच्या घरून जप्त करण्यात आला, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकूण 1 लाख 97 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

     

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोलीस कर्मचारी संजय आतकुलवार, गोपाल आतकुलवार, नितीन रायपुरे, अपर्णा मानकर यांनी केली, प्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.

  • चंद्रपूर जिल्हा महिला कांग्रेसचा विस्तार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस च्या विस्तारित कार्यकारीणी ची आढावा बैठक ११ ऑक्टोबर ला स्थानीक श्रमिक पत्रकार भवनात आयोजित करण्यात आली होती. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने महिला संघटन मजबूत करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले.

     

    चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या अध्यक्षांकडून यावेळी महिला काँग्रेस कडून सुरू असलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला. या बैठकिला चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुभाष धोटे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

     

    यावेळी आमदार सुभाष धोटे यांनी, महिला शक्ती मोठी असून येणाऱ्या निवडणुकांमध्ये महिला निर्णायक भूमिका पार पडणार आहे.असे प्रतिपादन केले. त्याच सोबत महिला शक्ती मोठी आहे.त्याचाच उपयोग भाजप सरकार घेत असून महिलांची दिशाभूल करत आहे. महिलांच्या साठी 33% आरक्षण विधेयक मोदी सरकारने पारित केले पण ते कधीपासून लागू होईल या बाबत अनिश्चितता आहे. महागाई, महिलांच्या वरील अत्याचार खूप वाढले आहे. त्यामुळे महिलांनी संघटन करून सामान्य महिलांमध्ये याबाबत जागरूकता केली पाहिजे असे आवाहन देखील सुभाष धोटे यांनी यावेळी केले.

     

    जिल्हाध्यक्ष नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी उपस्थित सर्व महिलांना नव्याने कमिटया स्थापन करा. प्रत्येक तालुक्यात जितक्या ग्रामपंचायती असतील तितक्या गाव कमिटया स्थापन करून “गाव तिथे काँग्रेस” हे अभियान सुरू करा असे आवाहन केले. तालुक्यातील सर्व बूथ वर महिलांच्या बूथ कमीटया स्थापन करून “मेरा बूथ सबसे अच्छा” ही स्पर्धा पदाधिकाऱ्यांनी आपसात निर्माण केली पाहिजे, तेव्हाच महिला संघटन मजबूत होईल असे प्रतिपादन केले.

     

    या आढावा बैठकीत नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देखील प्रदान करण्यात आले. या आढावा बैठकीला जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

  • शरद पवार गटातील राष्ट्रवादी युवक कॉग्रेस जिल्हाध्यक्ष राकेश सोमानी अजीत दादा गटात

    News34 chandrapur

    चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात दिनांक ०८ ऑक्टोंबर ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा सभेच्या निमित्ताने राष्ट्रीय सचिव राजेंद्रजी जैन यांनी जिल्ह्यातील पक्ष बांधणी व कार्याचा आढावा घेण्यासाठी श्रमिक पत्रकार भवन येथे जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.

     

    यामध्ये तालुका व विधानसभा निहायपदाधिकाऱ्यांची नियुक्तीपत्र देऊन पक्षाच्या कार्याला गती देण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने कार्याला हातभार लावीत पक्ष बांधणीचे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावा हे मार्गदर्शन केले.

     

    या जिल्हा आढावा बैठकीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राकेश सोमानी यांनी उपस्थिती दर्शवीत खासदार प्रफुल पटेल व अजित दादा पवार यांच्या नेतृत्वात जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांचेंशी समन्वय साधत पक्षाच्या कार्यक्रमाला गती देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार अशी ग्वाही दिली.

     

    राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करीत असताना जिल्ह्यातील सर्व तालुक्या मध्ये जाऊन युवक संघटना बांधणी केली. आता त्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह आजपासुन अजित दादा यांच्या नेतृत्वात काम करण्याचे जाहीर केले. यामुळे सर्वच पदाधिकारी आम्हच्या सोबत आहे हे ओरड करणाऱ्यां शरद पवार गटातील नेत्यांची थोडक्यात पंचाईत झाली.

     

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या झालेल्या सभेला प्रदेश सहसचिव आबीद अली, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, चंद्रपूर शहर अध्यक्ष राजीव कक्कड, युवक अध्यक्ष राकेश सोमानी, विद्यार्थी अध्यक्ष सुजित उपरे, सुनील काळे, विलास नेरकर, महेंद्र चंडेल, शरद जोगी, अविनाश राऊत, अरविंद रेवतकर यांचेसह मोठ्या संख्येंने जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

  • कामगारांनो संप मागे घ्या – आयुक्त पालिवाल यांचे आवाहन

    News34 chandrapur

    चंद्रपूर : कचरा संकलन आणि वाहतुक या कामांवर काम करणारे कामगार 6 ऑक्टोबरपासून संपावर गेले आहेत. यामुळे सणासुदीच्या काळात चंद्रपूर शहरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. कचरा संकलनाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची पाळी येण्याची शक्यता आहे. आपल्या कुटुंबाचे भविष्य बघता कामगारांनी हे संप मागे घ्यावे, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले.

    कचरा संकलन करणाऱ्या कामगारांनी पुकारलेला संप मागे घेण्यात यावा, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने त्यांच्या मागण्या मान्य केल्याबाबत चे पत्र दिले आहे. त्यांच्या मागण्यांमध्ये जुन्या वेतन आश्वासनांचे पालन करणे, 30 मजुरांना पुन्हा नोकरीवर घेणे आणि वेतन चिट्ण्या नियमित देणे यांचा समावेश आहे.
    १०/१०/२०२३ रोजी उपायुक्त यांचे कक्षात सकारात्मक चर्चा झाली आहे.

     

    झालेल्या चर्चेनुसार संदर्भ पत्राच्या अनुषंगाने खालील मागण्या मान्य करण्यात येत आहे. १) जुने कंत्राटदार सेंटर फॉर डेव्हलपमेन्ट कम्युनिकेशन, जयपुर ब्रान्च नागपूर याप्रमाणे वेतन तात्काळ प्रभावाने लागू करून पुढील काळाकरीता देण्यात येईल. जुन्या वेतन आश्वासनांचे पालन करून कामगारांना नवीन वेतन देण्यात येईल. 30 मजुरांना पुन्हा नोकरीवर घेण्यात येईल आणि वेतन चिट्ण्या नियमित देण्यात येतील, असे देखील मान्य करण्याचे आश्वासन देण्यात येत आहे.
    कामगारांनी संप मागे घेऊन 12 ऑक्टोबरपासून नियमित कचरा संकलन सुरू करावे, असे आवाहन मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांनी केले आहे.

     

    मागील 6 दिवसापासून सुरू असलेल्या कामगारांच्या कामबंद आंदोलनातील महत्वाची मागणी म्हणजे कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्यात यावे, मनपा दालनात अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत सदर मागणी पूर्ण करण्यात आली आहे.

     

    सुरू असलेला संप कामगार परत घेणार या याविषयी श्री संत गाडगेबाबा असंघटित कामगार संघटनेचे अध्यक्ष रतन गायकवाड यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

  • कंत्राटीकरण व खाजगीकरण शासन निर्णय बाबत शासनाच्या विरोधात जनआक्रोश मोर्चा

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मुल –  महाराष्ट्र सरकारने शिक्षण विभाग, महसूल विभाग, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद व पंचायत समिती विभाग आदी ठिकाणी शासकीय पदभरती कंत्राटी पद्धतीने भरतीचा काढलेला जी.आर. रद्द करण्यात यावा,
    दि.6 सप्टेंबर 2023 रोजी कंत्राटी तत्वावर नौकरी भरती संदर्भात काढलेला शासन जी.आर तात्काळ रद् करावे,राज्यातील 62,000 सरकारी शाळांचे होणारे खाजगीकरण पूर्णपणे रदद् करावे, 20पटसंख्येच्या आतील जि.प.शाळा बंद करण्याचा निर्णय रदद् करावे, बेरोजगारांना 5000 रूपये प्रति महिना बेरोजगारी भत्ता देण्यात यावे,सर्व समुदायाची जातनिहाय जगनणना तात्काळ करण्यात यावी,शेतक-यांच्या शेतमालाला हमीभाव देण्यात यावे.

     

    या सर्व मागण्यांकरिता गुजरी चैाक ते तहसिल कार्यालय मूल बुधवार दिनांक 11 आॅक्टोबर 2023
    विनीत तथा आयोजक कंत्राटीकरण व खाजगाीकरण विरोधी जन आक्रोश समिती,मूल तालूका यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला. तहसिलदार डाॅ.रविंन्द्र होळी तहसील कार्यालय मूल मार्फत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये निवेदन देण्यात आले. मुल शहरातील तसेच तालुक्यातील जनता, सामाजिक संघटना,विद्यार्थी, युवक व युवती, प्रतिष्ठीत व्यक्ती, शिक्षक राजकीय कार्यकर्ते पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, पत्रकार मंडळी,ज्येष्ठ नागरीक, असंख्य महिला,नागरीक यांनी बहूसंख्येने मोर्चात सहभागी झाले होते.

     

    मुख्य रस्त्यावरून शासनाच्या विरोधात नारे देत आलेला मोर्चा तहसीलदार डॉ.होळी यांना निवेदन देण्यात आल्या असून आमच्या मागण्या त्वरित पूर्ण करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

  • राज्यात सुरू झालेली लेक लाडकी योजना काय आहे?

    News34 chandrapur

    चंद्रपूर – राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे तत्कालीन अर्थमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेक लाडकी योजनेची घोषणा केली होती, आता ती योजना प्रत्यक्षात लागू करण्यात आली आहे, सदर योजना लागू केल्याबद्दल भाजप महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांनी महायुती सरकारचे आभार मानले आहे.

    काय आहे लेक लाडकी योजना?

    राज्यात मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे, बालविवाह रोखणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे या सर्वसमावेशक महिला सशक्तीकरणाच्या हेतूने सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार १ एप्रिल २०२३ पासून पुढे जन्मलेल्या मुलींना सरकार लखपती करणार आहे.

     

    एका कुटुंबात एक मुलगी असो किंवा दोन मुली जन्माला येवो.. त्या दोघींनाही हा लाभ मिळणार आहे. मुलगी जन्मल्यानंतर ५ हजार रु., पहिलीला गेली की ६ हजार रु., सहावीला गेली की ७ हजार रु. अकरावीला गेली की ८ हजार रु. आणि १८ वर्षांची झाली की ७५ हजार रु. असा लाभ मिळत या पद्धतीने एकूण १ लाख १ हजार रु. मिळवत आपल्या राज्यातल्या या लाडक्या लेकी लखपती होणार आहेत.

     

    मार्च २०२३ अर्थसंकल्पिय भाषणात तत्कालीन अर्थमंत्री आमचे नेते-राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी या ‘लेक लाडकी योजनेची’ घोषणा केली होती.. आणि आता ही योजना अंमलात येतेय.

    यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सर्वांचे चित्रा वाघ यांनी अभिनंदन केले आहे.