Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • 23 ऑक्टोम्बरला कांग्रेसचा भव्य आक्रोश मोर्चा

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    चंद्रपूर/मूल – वाघाच्या दहशतीने शेतकरी त्रस्त झाला असून रानटी डुकराच्या व वन्य प्राण्यांच्या हैदोसाने शेती नष्ट होत आहे. वर्तमान स्थितीत शेती कोणी करणार नाही. व धान उत्पादक असूनही तांदूळ विकत घेण्याची पाळी शेतकऱ्यांवर आल्याशिवाय राहणार नाही. अशा अनेक मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात्व चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे तथा सीडीसीसी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्या मार्गदर्शनात २३/१०/२०२३ रोज सोंमवारला भव्य शेतकरी मोर्चाचे आयोजन केलेले आहे.

     

    तरी तालुक्यातील सर्व जंगल लगत शेतकरी- शेतमजूर, अनुसूचित जाती जमाती व इतर पारंपरिक वननिवाशी शेतकरी,नजुल जमीन पट्टेधारक, बेरोजगार युवक युवती तसेच राज्य सरकार व केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे होणार्या अन्यायाविरुद्ध समस्त मुल तालुक्यातील नागरिकांनी सदर मोर्चात सहभागी व्हावे. असे आव्हान तालुका कांग्रेस कमिटीच्या वतीने केले आहे.

    प्रमुख मागण्या

    🔸वाघाने व इतर हिंस्र प्राण्यांनी ठार केल्यास ५० लाख रुपये देण्यात यावे.
    🔸शेतीची नुकसान करणार्या रानटी डुकरांचा बंदोबस्त करावा तसेच मारण्यासाठी परवानगी देण्यात यावी.
    🔸 प्राण्यांपासून शेतीची नुकसान झाल्यास तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी.
    🔸 अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवाशी जबरान जोत शेतकरी यांना पट्टे देण्यात यावे.
    🔸नजुलच्या जागेवर घरे बांधलेल्या कुटुंबाला स्थायी पट्टे देण्यात यावे.
    🔸जंगलालगत असलेल्या शेतीभोवताल तारेचे कुंपण करण्यात यावे.
    🔸वाढती बेरोजगारी कमी करण्यासाठी सुशिक्षित बेरोजगारांसाठी स्थायी नौकरी देण्यात यावी.
    या सर्व मुलभूत मागण्यांना घेऊन दिनांक २३/१०/२०२३ रोज सोमवारला सकाळी ११.०० वाजता कॄषि उत्पन्न बाजार समिती मुल या आवारापासून ते उपविभागीय अधिकारी व तहसिल कार्यालय मुल यांचे कार्यालयापर्यंत भव्य मोर्चाचे आयोजन केलेले आहे तरी जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहण्याचे करावे असे कांग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

  • चंद्रपुरातील सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलां-मुलींना शिक्षणासाठी 5 टक्के आरक्षण व शिष्यवृत्ती मिळणार

    News34 chandrapur

    चंद्रपूर: स्वच्छता हीच सेवा असून सफाई कर्मचारी स्वच्छतेचे काम करून देशाची मोठी सेवा करीत आहेत. शहर स्वच्छ ठेवण्यामध्ये सफाई कर्मचाऱ्यांची भूमिका ही सर्वात महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे निर्देश राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ. पी.पी.वावा यांनी दिले.

     

    नियोजन भवन येथे जिल्ह्यातील सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध विषयांवर आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, वनअकादमीच्या अपर संचालक मनीषा भिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, नगर प्रशासन अधिकारी अजितकुमार डोके, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, शिक्षणाधिकारी (माध्य.) कल्पना चव्हाण, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक भास्कर सोनारकर यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

     

    डॉ. पी.पी.वावा म्हणाले, सर्वप्रथम येथील सफाई कर्मचाऱ्यांच्या असलेल्या समस्यांचे निराकरण प्राधान्याने करावे. स्थायी अथवा  कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना ओळखपत्र उपलब्ध करून द्यावे. त्यांचा ब्लड ग्रुप, इन्शुरन्स सुविधा, पीएफसह मासिक वेतन प्रमाणपत्र द्यावे. या कर्मचाऱ्यांना उत्तम आरोग्य सुविधा पुरवाव्यात तसेच आरोग्य तपासणीचे कॅम्प आयोजित करावे. आयुष्मान भारत योजनेचा लाभ द्यावा. कर्मचाऱ्यांचे किमान वेतन, कोर्ट व प्रलंबित प्रकरणांमध्ये त्वरित कार्यवाही करावी. येथील सफाई कर्मचाऱ्यांना वास्तव्यास राहण्यासाठी अजूनही पक्के घर नाही. त्यासाठी आवश्यकतेनुसार प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे उपलब्ध करून द्यावी.

     

    ते पुढे म्हणाले, येथील सफाई कर्मचाऱ्यांच्या जात प्रमाणपत्राबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. हा त्यांचा परंपरागत व्यवसाय असल्याने त्यांना जात प्रमाणपत्र  देण्याचे नियोजन करावे. रोजगार व स्वयंरोजगारासाठी बँकेमार्फत कर्ज सुविधा उपलब्ध करून द्यावी. सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलां-मुलींना शिक्षणासाठी 5 टक्के आरक्षण तसेच शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येईल. तसेच  शासनाच्या विविध विभागाच्या वतीने सफाई कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या स्वयंरोजगाराच्या व प्रशिक्षणाच्या योजनांचा लाभ मिळवून देत त्यांना मुख्य प्रवाहात आणावे, असेही ते म्हणाले.

     

    यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असून त्यांना लागणारी कागदपत्रे, त्याच्या घरांचा प्रश्न देखील सोडविण्यात येईल, असे डाॅ. वावा यांना आश्वासित केले. यावेळी सफाई कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या समस्या सदस्यांसमोर मांडल्या. या समस्यांचे निराकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  • चंद्रपूर मनसे चे माजी जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार यांचं निधन

    News34 chandrapur

    दुःखद बातमी

    चंद्रपूर – चंद्रपूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष व मनसे राज्य उपाध्यक्ष दिलीप रामेडवार यांचं 22 ऑक्टोबर ला दीर्घ आजाराने निधन झाले.

     

    राजकारणात अनेक वर्षे कार्यरत दिलीप रामेडवार यांनी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी अनेक वर्षे संघर्ष करीत न्याय दिला, मध्यंतरी त्यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांनी राजकारणातून विश्रांती घेतली होती. मागील अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते.

     

    22 ऑक्टोबर ला विठ्ठल मंदिर वॉर्ड येथील राहत्या घरी त्यांनी अंतिम श्वास घेतला, दिलीप रामेडवार हे 61 वर्षाचे होते, त्यांच्या जाण्याने मनसे पक्षाची फार मोठी हानी झाली आहे.

  • चंद्रपूर महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निराकरण होणार

    News34 chandrapur

    चंद्रपूर: राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग नवी दिल्लीचे सदस्य मा.डॉ.पी.पी. वावा यांच्या अध्यक्षतेखाली २१ ऑक्टोबर रोजी चंद्रपूर महानगरपालिका राणी हिराई सभागृह येथे सफाई कर्मचारी यांच्या विविध विषयांवर आढावा बैठक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी सफाई कर्मचाऱ्यांनी त्यांच्या समस्या मांडल्या. या समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन डॉ.वावा यांनी दिले.

    या बैठकीस डॉ.वावा यांच्यासह मनपा आयुक्त श्री. विपीन पालीवाल, जिल्हा प्रशासन अधिकारी श्री. अजितकुमार डोके, सर्व नगर परिषद यांचे मुख्याधिकारी, उपायुक्त श्री.अशोक गराटे, उपायुक्त श्री. मंगेश खवले, शहर अभियंता श्री.अनिल घुमडे तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थीत होते.

    दरम्यान, मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांनी डॉ. वावा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
    बैठकीत डॉ.वावा यांनी सफाई कर्मचाऱ्यांचे कामाचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, सफाई कर्मचारी हे शहराचे रक्षक आहेत. त्यांचे काम अतिशय महत्वाचे आहे. त्यांना सन्मानाने वागवले पाहिजे.

    यावेळी डॉ. वावा यांनी सांगितले की, समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाईल. विविध योजना राबवून मुख्य प्रवाहात आणले जाईल.
    बैठकीमुळे सफाई कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले आहे.

  • चंद्रपुरातील CGHS वेलनेस सेंटरला 1 वर्ष पूर्ण

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर शहरात केंद्रीय कर्मचारी व सेवानिवृत्तांकरीता वेलनेस सेंटरला मंजुरी मिळाली यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व तत्कालीन तसेच विद्यमान केंद्रीय आरोग्य मंत्री स्तरावरुन सहकार्य लाभले मात्र या दरम्यान अनेक अडचणी उद्भवल्यानंतरही अखेरीस हे CGHS वेलनेस सेंटर रुग्णसेवेत रुजू होवून आज वर्षपूर्ती वर्धापन सोहळा साजरा होत आहे ही आनंदाची बाब असून या सेंटरच्या माध्यमातून रुग्णांना प्रभावी सेवा मिळण्याकरीता अडचणी दूर करुन विविध सेवा उपलब्ध करण्याकरीता प्रयत्न करण्याचे आश्वासन राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले.

     

    चंद्रपूरातील रेल्वेस्थानक परिसरात गतवर्षी ऑक्टोंबर 2022 मध्ये प्रारंभ झालेल्या या वेलनेस सेंटर च्या प्रथम वर्धापन सोहळ्यानिमित्त दि. 21 ऑक्टोंबर रोजी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन हंसराज अहीर मार्गदर्शन करीत होते. या कार्यक्रमास CGHS च्या अतिरिक्त संचालक डॉ. विजया मोटघरे, चंद्रपूरच्या CGHS इनचार्ज डॉ. ममता आदेवार, जॉइंट सेक्रेटरी सुरेश डोरले, माजी न.प. उपाध्यक्ष अनिल फुलझेले, भाजपा जिल्हा महामंत्री रविंद्र गुरनूले, पेन्शनर असोसिएशनचे सचिव सुरेश धानोरकर आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

     

    यावेळी बोलतांना हंसराज अहीर यांनी चंद्रपूरातील या CGHS वेलनेस सेंटर स्थापनेतील अडचणीबाबत माहिती देत बिल्डिंग व स्टाफ नियुक्ती पर्यंतच्या पाठपुराव्याबाबत केलेल्या प्रयत्नांची माहिती उपस्थितांना दिली. या वेलनेस सेंटरमधून उपचार करणाऱ्या केंद्रीय कर्मचारी व सेवानिवृत्त बांधवांना प्रभावी उपचार मिळण्याकरीता ज्या काही अडचणी उद्भवल्या आहेत. त्या सोडविण्याकरीता निश्चितपणे प्रयत्न करु असे आश्वस्त दिले. खाजगी डॉक्टर्सच्या सेवा उपलब्ध होण्यासाठी तसेच औषधांची कमतरता भासणार नाही याबाबतही आपण लक्ष घालू असे अहीर यांनी उपस्थितांना सांगितले.

     

    यावेळी डॉ. विजया मोटघरे यांनी CGHS वेलनेस सेंटर व्दारा केलेल्या मागण्यांबाबत वरीष्ठ स्तरावर पाठपुरावा करुन आरोग्य सेवेत उद्भवणाऱ्या अडचणी दुर करण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगितले. यावेळी डॉ. ममता आदेवार, सुरेश डोरले यांनीही वर्धापन प्रसंगी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पेन्शनर्स असोसिएशनचे सचिव सुरेश धानोरकर यांनी केले. या कार्यक्रमास CGHS चे अंशुमन जावडेकर, सिंह तसेच मनोहर साळवे शंकरराव गुडेल्लीवार, वासुदेवराव आसकर, रामानंद सिंह, सुनिल कोंकमवार, विजय खापने व अन्य मान्यवर उपस्थित होते.

  • 151 कलावंताच्या गायन व नृत्यातून चंद्रपूरकरांना घडले ईश्वराच्या विविध रुपाचे दर्शन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – श्री माता महाकाली महोत्सवाच्या दुस-या दिवशी रात्री आठ वाजता सारेगामा फेम निरंजन बोबडे यांचा गायन व नृत्य कार्यक्रम भक्तीमय वातावरणात पार पडला. यावेळी त्यांच्या 151 कलावतांनी सादर केलेल्या नृत्यातून चंद्रपूरकरांना ईश्वराच्या विविध रुपाचे दर्शन घडले.

     

    महोत्सवाच्या दुस-या दिवशी महाआरती आणि भजनाने महोत्सवला सुरवात झाली. त्यानंतर विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रम पार पडलेत. तर आज तिस-या दिवशी दुपारी 10 वाजता ग्रामगीता महिलोन्नती या विषयावर बाल किर्तनकार साक्षी अवतरे यांनी कीर्तन सादर केले. तर 11 वाजता प्रतिमा स्वरुप देवता या विषयावर स्तंभ लेखिका मुर्तीशास्त्र अभ्यासिका डॉ. रमा गोळवळकर यांचा व्याख्यान कार्यक्रम पार पडला. दुपारी 12. 30 वाजता विठ्ठल दिंडी तसेच चिंगारी हु मै या पथनाट्याचे सादरीकरण एकता बंडावार व त्यांच्या समुहाने सादर केले. दुपारी 2 वाजता लोकजागृती नाट्य मंचाच्या वतीने गोंडवाना के महायोध्दा शहीद विर बाबूराव शेडमाके यांच्या जीवनावर नाटक प्रस्तृत करण्यात आले. यावेळी शहीद विर बाबुराव शेडमाके यांचा शुर इतिहास दर्शविण्यात आला.

     

    तर काल शुक्रवारी कार्यक्रमाच्या दुस-या दिवशी सारेगामा फेम निरंजन बोबडे यांच्या समुहाने महोत्सवात भक्तीची रंगत भरली. त्यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सायंकाळी आठ वाजता त्यांच्या कार्यक्रमाला नृत्य सादरीकरणाने सुरवात झाली. त्यांच्या 151 कलावतांच्या समुहाने विविध धार्मिक नृत्य सादर करत भक्तीमय वातावरण निर्माण केले. यावेळी निरंजन बोबडे व त्यांच्या समुहाचे श्री महाकाली माता समितीचे अध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार आणि इतर पदाधिका-यांनी महाकाली मातेची मुर्ती भेट देत स्वागत केले.

     

    निरंजन बोबडे यांच्या कार्यक्रमामुळे महोत्सवात माता महाकालीच्या भक्तीचा जागर झाला असून त्यांनी सादर केलेल्या नृत्यातून ईश्वराच्या विविध रुपाचे दर्शन चंद्रपूकरांना घडले असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. यावेळी मातेच्या भक्तांना पालखीचे दर्शन घेता यावे यासाठी मातेची पालखी कार्यक्रम पंडालात फिरविण्यात आली. हजारो नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. सुमेधा श्रीरामे, सरोज चांदेकर, एकता पित्तुलवार, अर्चना चौधरी, मृणालिनी खाडीलकर, जगदीश नंदुरकर आदींनी या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली.

     

    उद्याचे कार्यक्रम..

    सकाळी 9 वाजता महाआरती आणि भजनाने महोत्सवाची सुरवात होणार आहे. सकाळी 11 वाजता महिला व उद्योजकता या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात येणार आहे. दुपारी 1 वाजता अॅड वर्षा जामदार या महिलांसाठी कायदेविषय मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी 2 वाजता लखमापूर हनुमान मंदिरतर्फे सुंदरकांड करण्यात येणार आहे. 5 वाजता माता महाकालीची आरती होईल, सांयकाळी 6 वाजता लाखो युवकांचे प्रेरणास्थान महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते युवा किर्तनकार सोपान दादा कनेरकर यांच्या किर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर रात्री 8 वाजता जगप्रसिध्द गायिका अनुराधा पौडवाल यांचा भक्तीमय संगीत कार्यक्रम पार पडणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा मातेच्या भक्तांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहत लाभ घ्यावा असे आवाहण श्री महाकाली माता समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

  • चंद्रपुर शहरात दुचाकीवर खोडकर मुलांची मस्ती आणि घडला भीषण अपघात

    News34 chandrapur

    चंद्रपूर – नवरात्र निमित्त विविध ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते, शुक्रवारी रात्री महाप्रसादाचा लाभ घेऊन घरी परतताना पिता-पुत्राचा भीषण अपघात झाला, या अपघातात 8 वर्षीय मुलगा ठार झाला असून वडिलांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे.

     

    दोन दुचाकींच्या अमोरासमोर झालेल्या धडकेत सात वर्षीय बालक ठार झाला असून त्याचे वडिल आणि अन्य एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना चंद्रपूर-जुनोना मार्गावरील साई मंदिराजवळ शुक्रवारी रात्री ११.१५ वाजताच्या सुमारास घडला. विहान मनोज बोरकर असे मृतक बालकाचे नाव आहे. तर मनोज भाऊराव बोरकर आणि शिवान निशिकांत येनुरकर हे दोघे जखमी झाले आहे.

    मनोज बोरकर हे सात वर्षीय मुलगा विहानला दुचाकीवर बसवून घराकडे दुचाकीने जात होते. तर विरुद्ध दिशेने शिवान येनुरकर रा. मराठा चौक बाबूपेठ हा युवक दुचाकी क्रमांक एमएच ३४/बीडब्लू ३३८१ ने येत होता. या दोन्ही दुचाकींची साईमंदिराजवळ जोरदार धडक झाली. यात 8 वर्षीय बालक विहान बोरकर हा दुचाकीवरून उसळून डांबरी रस्त्यावर पडल्याने गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. तर वडिल मनोज बोरकर गंभीर जखमी झाले आहे. शिवान येनुरकर यालाही गंभीर दुखापत झाली असून, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रामनगर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून गुन्ह्याची नोंद केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कोकोडे करीत आहेत

    मनोज बोरकर हे बाबूपेठ येथे भाड्याच्या घरात राहत होते, काही खोडकर मुलांच्या दुचाकीवरील मस्तीने पिता पुत्राचा भीषण अपघात घडल्याने 8 वर्षीय विहान ला आपला जीव गमवावा लागला, चंद्रपुर शहरात अल्पवयीन मूल अतिवर्दळीच्या मार्गावरून फिल्मी स्टाईल ने दुचाकी अतिवेगात चालवितात, मात्र यावर वाहतूक विभाग काही ठोस कारवाई करीत नाही.

  • शहीद पोलिसांचे बलिदान राष्ट्र कधीच विसरणार नाही – सीईओ विवेक जॉन्सन

    News34 chandrapur

    चंद्रपूर : नागरिकांचे तसेच देशाचे रक्षण करताना वीरगती प्राप्त झालेल्या शहीद पोलिसांचे बलिदान राष्ट्र कधीच विसरणार नाही, असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी व्यक्त केले.

     

    पोलीस स्मृतिदिनानिमित्त जिल्हा पोलीस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात शहीद पोलिसांना श्रद्धांजली अर्पण करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, सहाय्यक पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपअधीक्षक (गृह) राधिका फडके, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार, रवींद्र जाधव, पोलीस निरीक्षक विजय राठोड, राजेश मुळे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी व इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

     

    यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन म्हणाले, कर्तव्यावर असताना आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शहीद पोलिसांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी पोलीस शहीद दिन पाळला जातो. लडाखच्या बर्फाच्छादित प्रदेशात 21 ऑक्टोबर 1959 रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) जवान सीमेवर गस्त घालत असताना चिनी सैन्याने त्यांच्यावर हल्ला केला होता. या 10 पोलीस शहीद झाले. तेव्हापासून राज्यात आणि देशात वर्षभरात शहीद झालेल्या पोलिसांना 21 ऑक्टोबर रोजी अभिवादन करण्यात येते, असे त्यांनी सांगितले.

     

    यावेळी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी पोलीस मुख्यालयात असलेल्या हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. तसेच यावेळी पोलिसांनी बंदुकीच्या गोळ्या हवेत झाडत शहिदांना मानवंदना दिली. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या शहीद परिवारातील कुटुंबीयांसोबत मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन आणि जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी संवाद साधत त्यांची आस्थेने विचारपूस केली.

  • प्रशासन नरमले तरीही आदिवासी समाजाचे ठिय्या आंदोलन सुरुचं

    News34 chandrapur

    चंद्रपूर/पोम्भूर्णा – पोंभूर्णा येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी इको पार्क येथील आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे पुतळे व झेंडा हटविल्यावरून मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचे रुपांतर कार्यालयाचे तोडफोड होण्यापर्यंत गेल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. आंदोलनकर्त्यांनी पोलिस अधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्याने सध्या हे प्रकरण तापले आहे.

     

    सध्या आंदोलनस्थळाला पोलीस छावणीचे रूप आले असून जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमधून अधिकारी व कर्मचारी पोम्भूर्णा येथे दाखल झाले आहे.

     

    सध्या वनविभाग, महसूल व पोलीस विभागाने आंदोलकांची भेट घेऊन समजविण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलकांनी प्रशासनाला वेठीस धरून ठेवले आहे.

     

    याबाबत वनविभागाच्या उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की आम्ही 2 दिवसांपूर्वी आंदोलकांशी चर्चा केली, त्यांच्या सर्व मागण्या सुद्धा मान्य केल्या परंतु आंदोलकांच्या मागण्या शासन नियमानुसार पूर्ण कराव्या लागणार याबाबत सर्वाना याची माहिती दिली मात्र आंदोलक मागे हटायला तयार नाही.

     

    20 ऑक्टोबर ला आदिवासी समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले, उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे यांच्यासोबत धक्काबुक्की करण्यात आली, एसडीओ व होमगार्ड ला सुद्धा यामध्ये किरकोळ दुखापत झाली असल्याची माहिती आहे, सध्या उपविभागीय पोलीस अधिकारी इंगळे यांना नागपुरातील अर्नेजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

     

    आदिवासी आंदोलनाच्या हिंसक वळणानंतर सुद्धा पोलीस प्रशासन कमालीचे संयम दाखवीत आहे, आंदोलनस्थळी पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त लावला असून सध्या प्रशासनाने आदिवासी बांधवांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे.

     

  • चंद्रपुर जिल्ह्यात पहिल्यांदाचं आढळला भला मोठा अजगर

    News34 chandrapur

    चंद्रपूर : मूल तालुक्यातील चांदापूर येथील शेतशिवारात १४ फुट लांबीचा अजगर साप आढळून आला.अजगर १४ फुट लांब व २६ किलो वजनाचा होता. आतापर्यंत सापडलेला हा सर्वात मोठा अजगर आहे.

     

    चांदापूर येथील नागरिकांनी संजीवन पर्यावरण संस्थेच्या सदस्यांना संपर्क करून माहीती दिली. संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य दिनेश खेवले आणि सर्पमित्र तन्मयसिंह झिरे यांनी चांदापूर येथे जाऊन शेतशिवारातील झाडावरून १४ फुट लांब व २६ किलो वजनाच्या अजगर सापाला अलगद पकडले. आतापर्यंत सापडलेला हा सर्वात मोठा अजगर आहे. याआधी तेरा फुट लांबीचा अजगर याच परिसरात झिरे यांनी पकडला आहे. अजगराची वनविभागा मध्ये नोंद करण्यात आली. त्यानंतर बफर क्षेत्रातील डोनी च्या जंगलात सुरक्षित ठिकाणी त्याला सोडण्यात आले.

     

    अजगर सापाला सोडतांना वनरक्षक सूधीर ठाकुर, वनरक्षक पवन कुळमेथे, वनरक्षक खोब्रागडे, संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य तन्मयसिंह झिरे, दिनेश खेवले, अंकुश वाणी, प्रतीक लेनगुरे व शक्कीर जेंगठे उपस्थित होते.