Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • दिव्यांग मॉडेल विराली मोदी प्रकरणी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला

    News34 chandrapur

    मुंबई – 16 ऑक्टोबर ला विवाह नोंदणी कार्यालयात गेलेल्या दिव्यांग मॉडेल विराली दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी पर्याय नसल्याने विवाहात विघ्न निर्माण झाले होते, मात्र विराली ने ट्विट करीत उपमुख्यमंत्री फडणवीस यांना याबाबत तक्रार दिली, फडणवीसांच्या एका कॉल ने प्रशासन हादरले, व नम्रपणे विराली ची माफी मागत भविष्यात असा त्रास होऊ नये असे आश्वासन सुद्धा दिले. त्यानंतर फडणवीसांनी आपला शब्द पाळत त्या प्रकरणात एका अधिकाऱ्यांचे निलंबन केले.

     

    16 ऑक्टोबर ला मुंबई येथील खार स्थित विवाह नोंदणी कार्यालयात मॉडेल विराली मोदी व्हिल चेअर वर पोहचल्या, मात्र नोंदणी कार्यालय दुसऱ्या मजल्यावर असल्याने कार्यालयात जाण्यासाठी कसलाही पर्याय नव्हता, कार्यालयातील विवाह नोंदणी अधिकारी अरुण घोडेकर यांना या समस्येबाबत अवगत केले, व सही घेण्यासाठी आपण खाली यावे अशी विनंती केली, मात्र निष्ठुर मनाच्या अधिकाऱ्यांनी खाली येणे टाळल्याने विराली च्या विवाहात अडचण निर्माण झाली.

     

    त्यावेळी विराली ने X वर ट्विट करीत उपमुख्यमंत्री फडणवीस यांना विवाहात होत असलेल्या समस्येबाबत तक्रार केली, जनप्रतिनिधीं व्यस्त जीवनात कसा तत्पर असतो याचं उदाहरण फडणवीस यांनी देत तात्काळ विराली च्या ट्विट वर उत्तर देत त्यांची माफी मागितली व आपली समस्या दूर करू असे आश्वासन दिले.

     

    त्यांनतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या कॉल ने विवाह नोंदणी कार्यालय हादरले व तात्काळ विराली ची समस्या दूर करीत त्यांचा विवाह पार पाडला, विवाह झाल्यावर विराली ने लग्नाचे फोटो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्विट द्वारे पाठवीत त्यांचे आभार मानले.

     

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विराली चे अभिनंदन करीत आपल्याला जो त्रास झाला त्याबद्दल माफी मागत भविष्यात कुणासोबत असा प्रसंग घडणार नाही असा शब्द देत मी स्वतः याप्रकरणी लक्ष घालेल असे आश्वाशीत केले.

    उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आपला शब्द पाळत विवाह नोंदणी अधिकारी अरुण घोडेकर याला निलंबित केले. हळवा व नागरिकांच्या समस्येची जाणीव करणाऱ्या फडणवीस यांनी उत्तम लोकप्रतिनिधी कसा असावा असे उदाहरण समाजापुढे दिले आहे, फडणवीस यांच्या भावनिक व नागरिकांच्या समस्येची जाणीव असलेल्या या कार्याने समाजमाध्यमातून फडणवीस यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.

  • चंद्रपुर जिल्ह्यातील शेतकरी मरतोय, प्रशासन कुठंय?

    News34 chandrapur

    चंद्रपूर –  आर सी सी पी एल सिमेंट कंपनीच्या मनमानी कारभाराविरुद्ध व विविध मागण्यासाठी कोरपना तालुक्यातील परसोडा येथील प्रकल्पग्रस्त नेमीचंद काटकर यांनी दिनांक १६ ऑक्टोबर पासून अन्नत्याग बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

    या उपोषणाला दहा दिवस उलटून ही प्रकल्पग्रस्तांच्या रास्त मागण्या अद्याप ही पूर्ण झाल्या नाही.त्यामुळे प्रकल्पग्रस्तात असंतोषाचे वातावरण असून उपोषणकर्त्याची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे.

    RCCPL सिमेंट कंपनीकडून लिजं क्षेत्रातील संपूर्ण ७५६.१४ हेक्टर जमीन सरसकट भूसंपादित करावी, प्रकल्पग्रस्तांना प्रती एकर पन्नास लाख रुपये व एक सातबारा एक नोकरी द्यावी , परसोडा गावाच्या मुख्य रस्त्यावरून होणारी अवजड वाहतूक बंद करण्यात यावी, दलाला मार्फत करण्यात येणारी खरेदी त्वरित थांबवण्यात यावी,

     

    परसोडा व कोठोडा बु या दोन्ही ग्रामपंचायतीच्या नव्याने एनओसी घेण्यात याव्या, कंपनी परिसरातील स्थानिकांना रोजगार देण्यात यावा, परसोडा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची कंपनी वाहतुकीमुळे झालेली दुरवस्था लक्षात घेता रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, पेसा क्षेत्रातील पायमल्ली करणारे कंपनी अधिकारी व जबाबदार प्रशासन यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, ग्रामपंचायतच्या सूचित करण्यात आलेल्या विषयाच कंपनीने काटेकोरपणे पालन करावे या मागण्या कंपनी व प्रशासनाकडे प्रकल्पग्रस्तांनी केल्या आहे. या उपोषणाला आतापर्यंत विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे.

  • बाबूपेठ येथील पुरातन विहिरीत आढळला युवकाचा मृतदेह

    News34 chandrapur

    चंद्रपूर – मागील 2 दिवसापासून बेपत्ता असलेल्या युवकाचा बाबूपेठ येथील पुरातन विहिरीत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली.

    शहरातील बाबूपेठ मधील डॉ. आंबेडकर नगर, माता चौक येथे राहणारा 24 वर्षीय आकाश पाल असे त्या मृत युवकाचे नाव आहे. आकाश बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा दिली होती.

     

    बाबूपेठ भागातील सोनामाता मंदिर जवळ पुरातन काळातील विहीर आहे, मात्र त्या विहीरिला सुरक्षा जाळी नसल्याने हा प्रकार घडला, ही घटना प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे उदाहरण असल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी केला आहे.

     

    आकाश याचा तोल गेल्याने तो विहिरीत पडला असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, पोलीस व मनपा प्रशासनाने आकाश चा मृतदेह बाहेर काढला.

     

    यापूर्वी सुद्धा या पुरातन विहिरीत असे प्रकार घडलेले आहे, प्रशासनाने या विहिरीवर तात्काळ सुरक्षा जाळी लावण्याचे काम करावे अन्यथा भविष्यात अश्या घटना निश्चित वाढणार, पाल कुटुंबाने कमविता मुलगा गमावल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

    प्रशासनाने आकाश च्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी राजू कुडे यांनी केली आहे. सदर घटनेचा पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.

  • चंद्रपुरात रावण दहनाला विरोध

    News34 chandrapur

    चंद्रपूर – विजयादशमीच्या दिवशी मंगळवारी चंद्रपूर तालुक्यातील घुग्घुस येथे सकाळी साडेनऊच्या सुमारास आदिवासी समाजबांधवांनी केलेल्या विरोधानंतरही रात्री सव्वानऊच्या सुमारास बहादे प्लॉट येथे रावणदहन पार पडले. तब्बल दहा ते अकरा तास पोलिस ठाण्यात ठेवलेल्या आदिवासी बांधव महिला पुरूषांना पोलिसांनी रात्री सोडले. पोलिस स्टेशन पासून तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यापर्यंत पैदल मार्च काढून या घटनेचा निषेध करण्यात आला.
    मंगळवारी चंद्रपूर तालुक्यातील घुग्घूस शहरात बहादे प्लॉटमध्ये विजयादशमीचा उत्सव आयोजित करण्यात आला होता. याकरीता रावणाची प्रतिकात्मक प्रतिमा सकाळी तयार करण्यात येत होती.

    घुग्घूस शहरातील आदिवासी बांधवांनी त्या ठिकाणी येऊन रावण दहनास प्रचंड विरोध केला. रावण हे आदिवासी समाजाचे दैवत आहेत. त्यांचे दहन करण्यता येत असल्याने आदिवासी समाज बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. त्यामुळे रावणदहन करू नये अशी आदिवासी समाजाने भूमिका घेतली. तसेच शासन, प्रशासन, नगर परिषद, पोलिस स्टेशन व मंत्री महोदयांना निवेदन देऊन रावणदहनला परवानगी देण्यात येवू नये अशी मगाणी करण्यात आली होती. सकाळी आदिवासी बांधवांनी रावणदहनाला विरोध करीत घुग्गुस शहरात निषेध मोर्चा काढला. दिवसभरतणावपूर्ण स्थिती निर्माण होऊ नये याकरीता घुग्घूस पोलिसांनी घटनास्थळी येऊन शंभरावर आदिवासी बांधव, मुलामुलींना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले. त्यांची भोजनाची व्यवस्था पोलिस ठाण्यात करण्यातच आली होती. शहरात तणावपूर्ण स्थिती निर्माण होऊ नये दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करून चोख पोलिस बंदोस्त ठेवला होता.

     

    आदिवासी बांधवांच्या विरोधानंतर घुग्घूस येथील रावणदहन होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दिवसभर आदिवासी बांधव पोलिस ठाण्यात स्थानबध्द असल्याने रावणदहन विरोधाचे वातावरण शांत झाले होते. त्यामुळे सायंकाळी रावणदहनाची बहादे प्लॉटवर तयारी करण्यात आली. बहादे प्लॉटवर रावणाची प्रतिमा उभी करण्यात आली. सायंकाळ पासून त्या ठिकाणी नागरिकांची गर्दी झाली. पोलिस बंदोबस्तात रात्री सव्वानऊच्या सुमारास बहादे प्लॉटवर उभारण्यात आलेल्या प्रतिकात्मक रावणाचे दहन करण्यात आले. दिवसभर पोलिस ठाण्यात ठेवलेलया शंभरावर आदिवासी महिला पुरूषांना रात्री सोडण्यात आले.

     

    महिलांना आठच्या तर नऊच्या सुमारास पुरूषांना सोडण्यात आले. त्यांची दिवसभरात भोजनाची व्यवस्था पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. आदिवासी बांधवांना दहा ते अकरातासांनी रात्री सोडल्यानंतर पोलिस स्टेशनपासून तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यापर्यंत त्यांनी पैदल मार्च काढला. या ठिकाणी एका छोटेखानी सभेची आयोजन करून शासन प्रशासन यांच्या विषयी संताप व्यक्त करीत रावणदहनाच्या घटनेचा निषेध केला.

    यावेळी आदिवासी बांधवांनी, रावणदहन होऊ नये तसेच ही प्रथा बंद व्हावी याकरीता आदिवासी बांधवांनी शासन प्रशासन नगर पालिका, पोलिस स्टेशन तसेच घुग्घूस दशहरा उत्सव समितीला लेखी निवेदन देऊन रावणदहन करू नये तसेच प्रशसान परवागनी देऊ नये अशी मागणी केली होती.

     

    रावण हे आदिवासी समाजाचे दैवत असल्याने आमच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. गावात तंटे भांडण होण्याची शक्यता असते. त्यामुळे रावणदहनाला परवानगी देऊ नये ही आमची मागणी आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. शांतता व सुव्यवस्था ठेवण्याकरीता आम्हाला दिवभर पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले. त्यामध्ये लहानमुलेही होती. आमच्या विरोधानंतरही झालेल्या रावणदहन घटनेचा निषेध व्यक्त करीत रावणदहन प्रथा बंद करावी अशी मागणी आदिवासी बांधवांनी यावेळी केली.

  • एका कॉल वर विद्यार्थ्यांची समस्या सुटली

    News34 chandrapur

    चंद्रपूर – बाबासाहेब आंबेडकर टेक्नीकल युनिवर्सिटी (BATU) अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर येथील तृतीय वर्षाचे संगणक तसेच मायनिंग च्या ८०च्या वर विद्यार्थ्यांचे २०२२ मध्ये झालेल्या रिमेडियल परिक्षेचा निकाल एक वर्ष लोटूनहि न लागल्यामुळे या युनिवर्सिटी च्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांचे या वर्षीचे म्हणजेच २०२३ चे शेक्षणिक नुकसान होणार अशी परिस्थिती निर्माण झालेली होती.

     

    यावेळी महाविद्यालयानी सुद्धा आपल्या परिने वारंवार ईमेलद्वारे व काॅल करून यासंदर्भात या युनिवर्सिटी च्या परिक्षा विभागाला विचारना करून सुद्धा उडवा उडविची उत्तरे त्यांच्या मार्फत दिली जात होती यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वार्षिक नुकसानाच्या भितीचे वातावरण तयार झाल्याने त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या युवासेना विभागीय सचिव तसेच सिनेट सदस्य निलेश बेलखेडे यांच्या कडे धाव घेऊन या संदर्भात निवेदन देऊन मदत मागितली.

     

    प्रा निलेश बेलखेडे यांनी लगेच विभागीय कार्यालयात संपर्क करून या संदर्भात ४-५दिवसात निर्णय होऊन निकाल जाहिर करावे हि विनंती वजा ठनकाऊन सांगितले अन्यथा नागपुर विभागीय कार्यालयात येऊन विषय मार्गी लावल्या जाईल असे सांगताच विभागीय अधिकारी कुलकर्णी यांच्या मार्फत लवकरच निकाल लावून विद्यार्थ्यांचे समाधान करणार असे आश्वासीत केले व निलेश बेलखेडे यांनी दिलेल्या विद्यापिठाला कालावधीतचं ५दिवसातचं या संबंधी चे निकाल जाहीर झाले व सर्व विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. प्रा निलेश बेलखेडे यांच्या प्रयत्नामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान वाचले यावर विद्यार्थ्यांनी आनंद व समाधान व्यक्त करून निलेश बेलखेडे यांचे आभार मानले.

  • चंद्रपुरात ऑटोरिक्षा चालकांना गणवेशाचे वितरण

    News34 chandrapur

    चंद्रपूर-ऑटोरिक्षा व्यवसायातून कुटूंबियांचा उदरनिर्वाह करण्यापुरते किंवा प्रवाशांची सेवा एवढेच सिमीत कर्तव्य पार न पडता चंद्रपूर जिल्हा ऑटो चालक-मालक संघटनेतील ऑटोचालकांनी सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यातून आपल्या कर्तव्याला न्याय देण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे.

     

    एक जबाबदार नागरिक म्हणुन समाजाच्या हितासाठी त्यांचेही योगदान फार मोलाचे असल्याने ऑटोरिक्षा व्यवसायिंनी व्यवसायाबरोबरच सामाजिक हितासाठी त्यांचेही योगदान फार मोलाचे असल्याने ऑटोरिक्षा व्यवसायिंनी व्यवसायाबरोबरच सामाजिक ऋणाची परतफेड करण्यास सदैव कार्यरत राहावे असे विचार राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केले.

     

    वियजादशमीच्या शुभमुहूर्तावर हंसराज अहीर यांनी दि. 24 ऑक्टोंबर रोजी आपल्या निवासस्थानी ऑटो चालक बांधवाना गणवेश वितरीत केले त्या प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजु घरोटे, भाजपा ओबीसी मोर्चाचे महानगर अध्यक्ष विनोद शेरकी, दामोधर मंत्री, ‘श्यामल अहिर, तेजस चौधरी, अजय अहीर , हर्षवर्धन अहीर, आदित्यवर्धन अहीर, ऑटो चालक-मालक संघटनेेच संस्थापक राजेंद्र खांडेकर, जिल्हाध्यक्ष मधुकर राऊत, सचिव सुनिल धंदरे, जिल्हा संघटक सुनिल चन्ने, रवी आंबटकर, जनार्धन गुंजकर, अरविंद उमरे, अंकुश कौरासे, रमेश वझे, किशोर वाटेकर, वासुदेव कुबडे, मंगेश चवरे, महेश ढेकरे, विश्वास वैद्य, अब्दुल रहीम, विजय मडावी, सुनिल देऊळकर, गजान बाबर, वामन टोंगे, नासीर शेख, प्रदिप वरभे, शरद मेश्राम, युनुस शेख, शाकीर शेख, महादेव शेंडे यांचेसह आदींची उपस्थिती होती.

     

    ऑटोरिक्षा हा व्यवसाय असला तरी हे क्षेत्र एकप्रकारे सेवेचे साधन आहे. समाजात अनेक ऑटो चालकांनी आपल्या सहृदयतेच्या वेळोवेळी परिचय दिला आहे. रंजल्या गांजल्यांना, वृध्दांना सेवा दिली आहे. अनेकांना मानवतेचे दर्शन घडविले आहे. हा धर्म त्यांनी मानत आपल्या सेवेला समाजाभिमुखतेची जोड द्यावी असे आवाहन अहीर यांनी केले.

     

    ऑटोरिक्षा चालकांच्या अडचणी त्यांचे प्रश्न त्यांच्या समोरील समस्या सोडविण्यासाठी आपण त्यांच्या पाठीशी कायम उभे राहु अशी भावनाही अहीर यांनी याप्रसंगी व्यक्त केली. विश्वास हा ऑटो व्यवसायींसाठी अलंकार असून तो ग्राहकांच्या नजरेतून ढळु न देण्याची काळजी ऑटो व्यवसायी बांधवांनी घ्यावी असेही ते म्हणाले.
    यावेळी हंसराज अहीर यांनी शहरातील ऑटोरिक्षा चालक बांधवांना गणवेशाचे वितरण केले त्यांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या.

  • चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा जिल्ह्यातील कृषिपंपांना दिवसा १२ तास वीज पुरवठ्यासाठी सुधीर मुनगंटीवार सरसावले

    News34 chandrapur

    चंद्रपूर : चंद्रपूर गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्याला कृषी पंपांना दोन महिन्यांसाठी दिवसाचे १२ तास वीज पुरवठा देण्यात यावा, या मागणीसाठी राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार पुढे सरसावले आहेत.

     

    विदर्भातील या तीन जिल्ह्यांना दोन महिन्यांसाठी सलग वीजपुरवठा प्राप्त व्हावा यासाठी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे आग्रही मागणी केली. कृषी पंपाना सध्या नियमित विजेची गरज आहे. आता शेतात धान उभा आहे आणि बाकी पिकांना ही पाण्याची गरज आहे. रात्रीच्या वेळी वन्यप्राणी यांचा वावर असल्याने शेतकऱ्यांना शेतात जायला शेतकऱ्यांना अडचण निर्माण होते. याशिवाय उत्सवाचे दिवस आहे.

     

    गडचिरोली हा नक्षल प्रभावी जिल्हा असल्याने शेतीसाठी व उत्सवाच्या काळात या जिल्ह्याला सुरळीत वीज पुरवठा होणे गरजेचे आहे ही बाब ना. श्री. मुनगंटीवार यांनी ऊर्जा मंत्रांच्या लक्षात आणून दिली. चंद्रपूर आणि वर्धा हे दोन्ही जिल्हे विदर्भातील महत्त्वाचे जिल्हे आहेत. या दोन्ही जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना पिकाच्या दृष्टीने व नागरिकांना उत्सवाच्या काळात सुरळीत वीज पुरवठा होणे, गरजेचे असल्याची बाब या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी अधोरेखित केली.

     

    दोन महिने या तीनही जिल्ह्यांना दिवसा १२ तास वीज पुरवठा झाला पाहिजे, अशी आग्रही मागणी ना. श्री. मुनगंटीवार यांनी ऊर्जामंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या या मागणीला ऊर्जामंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. विदर्भातील या तीन जिल्ह्यांना सुरळीत वीज पुरवठा कसा करता येईल, या संदर्भात लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी दिली.

  • ज्येष्ठ पत्रकार प्रमोद चूंचूवार यांना मातृशोक

    News34 chandrapur

    चंद्रपूर -ज्येष्ठ पत्रकार प्रमोद चूंचूवार यांच्या मातोश्री श्रीमती लीलाबाई गामाजी चूंचूवार यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले. गेली ६ वर्षे त्यांनी कर्करोगाशी झुंज दिली.

    त्यांच्या पश्चात प्रशांत, विनोद, दै. पुढारी मुंबईचे राजकीय संपादक प्रमोद आणि गणेश ही मुले, सूना नातवंडे आणि बराच आप्त परिवार आहे.

    बुधवारी, २५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता चंद्रपूर, (ता.जि. .चंद्रपूर) येथे त्यांची अंत्ययात्रा त्यांचे राहते निवासस्थान- द्वारा जी पी चूंचूवार यांचे घर, डॉ ताटेवार यांच्या रूग्णालयासमोर, ताडोबा रोड,तुकुम, चंद्रपूर
    येथून निघेल. त्यांच्या पार्थिवावर शांतिधाम स्मशानभूमी बिनबा गेट जवळ चंद्रपूर येथे अंतिम संस्कार केले जाणार आहेत.

  • विजयादशमीला चंद्रपुरात हत्या

    News34 chandrapur

    चंद्रपूर – विजयादशमीला चंद्रपुरातील नगीनाबाग मध्ये पत्नीने पतीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली. रामनगर पोलिसांनी हत्याकांडात 3 आरोपीना अटक केली आहे.

    नगिना बाग प्रभागात राहणारे 52 वर्षीय नीलकंठ चौधरी असे मृतकाचे नाव आहे, आरोपी मध्ये मृतकाची पत्नी, मुलगी व मेव्हण्याचा समावेश आहे.

     

    विजयादशमी ला सकाळी 8 वाजता मंगला चौधरी यांना भेटण्यासाठी त्यांचा भाऊ विलास लटारु शेंडे रा. सुशी दाबगाव तालुका मूल वरून आला होता, घरी आल्यावर नीलकंठ चौधरी यांनी विलास ला अश्लील शब्दात शिवीगाळी करीत भांडण सुरू केले, वाद वाढत गेला, वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.

    त्यावेळी मुलगी शिल्पा ने लोखंडी रॉड व मंगला यांनी बांबू ने नीलकंठ यांच्या डोक्यावर वार केला, ही नेहमीची कटकट आहे, याला मारून टाका असे उदगार विलास ने काढले असता नीलकंठ चा जबर मारहाणीत मृत्यू झाला.

     

    याबाबत रामनगर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली.

    यावेळी तपास अधिकारी स्वप्नील गोपाले यांनी माहिती दिली की मृतक नीलकंठ मजुरीचे काम करायचा, त्याला दारूचे व्यसन असल्याने तो नेहमी कुटुंबासोबत भांडण व पत्नी मंगला ला मारहाण करायचा, पत्नी कडील नातेवाईक घरी आले की त्यांना नीलकंठ हाकलून लावायचा, या नित्याच्या त्रासाला कंटाळून पत्नी, मुलगी व मेव्हण्याने नीलकंठ ची हत्या केली.

    याबाबत तिघांवर कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली असून पुढील तपास रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील गोपाले करीत आहे.

  • नागरिकांचा पाठलाग करणाऱ्या त्या वाघिणीला वनविभागाने केले जेरबंद

    News34 chandrapur

    चंद्रपूर/गडचिरोली – 19 ऑक्टोबर ला शेतात काम करणाऱ्या महिलेला वाघिणीने हल्ला करीत ठार केले होते, त्यांनतर सदर परिसरात वाघिणीचा वावर होता, वनविभागाच्या चमूने वाघिणीला डार्ट करीत जेरबंद केल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

     

    19 ऑक्टोम्बरला आरमोरी येथील काळागोटा शेतात 76 वर्षीय ताराबाई धोडरे काम करीत असताना दबा धरून बसलेल्या वाघिणीने ताराबाई वर हल्ला करीत ठार केले.

     

    त्या घटनेनंतर परिसरात वाघिणीची दहशत कायम होती, रामाळा-वैरागड या मार्गावर आवागमन करणाऱ्या नागरिकांचा ती वाघीण पाठलाग करीत असल्याच्या अनेक तक्रारी वनविभागाला प्राप्त झाल्या होत्या, त्यामुळे तो मार्गच वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. वनविभाग त्या वाघिणीवर लक्ष ठेवून होता.

     

    T13 या वाघिणीमुळे आवागमन करणाऱ्या नागरिकांना सोबत भविष्यात मानव वन्यजीव संघर्षाच्या वाढू नये यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्या परवानगीने वनविभागाने आरमोरी वनपरिक्षेत्र मुल्लूर चक गावातील झुडपी जंगलात 23 ऑक्टोबर ला डॉ. रविकांत खोब्रागडे, पशुवैद्यकीय अधिकारी, ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प चंद्रपूर, TATR चे शूटर अजय मराठे व RRT सदस्य यांनी वाघिणीला डार्ट करीत बेशुद्ध करून वाघिणीला जेरबंद केले.

     

    जेरबंद करण्यात आलेल्या वाघिणीची वैद्यकीय चाचणी केल्यावर तिला बाळासाहेब ठाकरे, आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय, गोरेवाडा नागपूर येथे पाठविण्यात आले आहे.

     

    सदरची यशस्वी कारवाई वनसंरक्षक रमेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, संदीप भारती, पवनकुमार जोंगा यांच्या उपस्थितीत RRT गडचिरोलीचे दीपक टेम्भूर्णे, योगेश लाकडे, गुरुनानक ढोरे, वसीम शेख, विकास ताजणे, प्रफुल वाडगुरे, निकेश शेंद्र, मनन शेख यांनी केली.