Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयास औषधांसाठी निधी द्या – ब्रिजभूषण पाझारे

    News34 chandrapur

    चंद्रपूर : चंद्रपूरातील वैद्यकीय महाविद्यालयात महिनाभरापासून औषधांचा साठा संपला आहे. त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. वातावरणामुळे शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या वाढली आहे.

     

    ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्ण, दारिद्र्यरेषेखालील नागरिकांची उपचार घेण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयात गर्दी असते. मात्र, औषधांचा तुटवडा असल्यानं बाहेरून औषधांची खरेदी करावी लागत असल्याने आर्थिक झळ बसत आहे.

     

    गोरगरिबांचा आधार असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयात मागील काही महिन्यापासून औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. येथे अवघड शस्त्रक्रिया, तसेच चांगले उपचार दिले जातात, अशी या वैद्यकीय महाविद्यालयाची ओळख आहे. रुग्णालय अधिक उत्तम बनवण्यासाठी कोट्यवधी रुपयांची निधी शासनाने मंजूर केला आहे. परंतु औषधासाठीचा निधी शासनाने वाढवून दिला नसल्याचे चित्र आहे.

     

    परिणामी रुग्णासाठी लागणारे औषध बाहेरून खरेदी करावे लागत आहेत. तरी याकडे तत्काळ लक्ष वेधून वैद्यकीय महाविद्यालयास औषधांकरिता निधी उपलब्ध करून देण्याकरिता महाराष्ट्र राज्याचे वने सांस्कृतिक कार्य व मत्स्व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा चंद्रपूर महानगरातील शिष्ट मंडळाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

    यावेळी चंद्रपूर जिल्हा महानगराचे महामंत्री श्री ब्रिजभूषण पाझारे, श्री रमेश जी राजुरकर विधानसभा प्रमुख वरोरा भाजयुमो अध्यक्ष श्री. विशाल निंबाळकर, महानगराचे मन की बात प्रमुख श्री. डॉ. दिपक भट्टाचार्य, श्री. पोद्दार, श्री. सतीश तायडे प्रामुख्याने उपस्थित होते.

  • चंद्रपूर जिल्ह्यात क्रूरतेचा कळस

    News34 chandrapur

    चंद्रपूर – मृतावस्थेत असलेल्या एका नवजात अर्भकाला नालीत फेकून दिल्याची हृहद्रावक घटना बुधवारी (1 नोव्हेंबर 2023) ला सायंकाळी चारच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यातील बोडदा गावातील हनुमान मंदिरासमोरील नालीत उघडकीस आली आहे. आढळलेले नवजात अर्भक बालिका असून ती दोन ते तीन दिवसाचे असून गावातील नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

     

    हाती आलेल्या माहितीनुसार, चिमूर तालुक्यातील बोडधा गावात बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास गावातील काही लोकांना हनुमान मंदिरासमोरील सांडपाणी साचलेल्या नालित नवजात अर्भक मृत्तावस्थेत सआढळून आला. या घटनेची माहिती बोडधा गावात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी पाहण्यासाठी एकच गर्दी केली. लगेच भिशी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांची चम्मू घटनास्थळी दाखल झाली. पोलीसांनी नवजात अर्भकाला ताब्यात घेतले असता ते मृत्तावस्थेत होते. ती बालिका असुन पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्या महिलेचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.

     

    अर्भक आढळून आल्यानंतर ती गावातील कुण्यातरी महिलेचे असावे असा संशय आला होता, परंतु गावात कुणीच महिला गर्भवती नसल्याने ते अर्भक अन्य गावातील महिलेचा असावा असा संशय निर्माण केल्या जात आहे.  कुणातरी बाहेरील व्यक्तींनी नवजात अर्भक रात्रीच नालीत आणून आणुन टाकले असावे, अशीही चर्चा आहे. आढळून आलेले अर्भक ही बालिका असल्यामुळे तिला उघड्यावर फेकण्यात आले असावे, अशीही शंका व्यक्त केली आहे आहे.

  • SNDT महिला विद्यापीठात AI तंत्रज्ञानावर व्याख्यान

    News34 chandrapur

    बल्लारपूर – “आर्टिफिशियल इंटेलिजन्स” हे भविष्यातील प्रत्येकाचे स्किल्स राहणार आहे आणि हे स्किल्स भविष्यात अनेक रोजगाराच्या संधी निर्माण करतील. एआय हे तंत्रज्ञान जग काबीज करेल सोबतच तरुणांना आकर्षित करेल असे मत डॉ. गजेंद्र आसुटकर यांनी व्यक्त केले. ते एस.एन.डी.टी.महिला विद्यापीठ मुंबईचे महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल बल्लारपूर येथे आयोजित “आर्टिफिशियल इंटेलिजन्स” या विषयावरील व्याख्यान कार्यक्रमात बोलत होते.

    एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ बल्लारपूर येथे फ्युचर स्किल्स – आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधील संधी या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, या व्याख्यानाला मुख्य वक्ता म्हणून डॉ. गजेंद्र आसुटकर, उपप्राचार्य, प्रियदर्शिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नागपूर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ज्ञानसंकुलचे संचालक डॉ. राजेश इंगोले, प्रमुख उपस्थिती सहायक कुलसचिव डॉ. बाळू दत्तात्रय राठोड आणि समन्वयक वेदानंद अलमस्त उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक वेदानंद अलमस्त  यांनी केले सोबतच आधुनिक काळात मानव आणि तंत्रज्ञान यांच्या संयुक्त कामगिरीने भारत जगात आपले नाव उंचावेल अशी आशा व्यक्त केली.

    कार्यक्रमाचे मुख्य वक्ता म्हणून लाभलेले डॉ. गजेंद्र आसुटकर यांनी एआय बद्दल सर्व विद्यार्थिनींना अवगत केले सोबतच आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा फक्त एक शब्द नसून हा एक बदल आहे. ह्या तंत्रज्ञानामुळे भविष्यात जगाचे रूप बदलणार आहे. येणारे 21 वे शतक हे फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचे आहे असे लक्षात ठेवले जाईल, कारण तेव्हा ह्याचा वापर प्रत्येक क्षेत्रात करून अनेक क्षेत्र विकसित होऊ शकतात. जेव्हापासून मशीनची कल्पना अस्तित्वात आली तेव्हापासून एआयने लोकांच्या जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडला आहे.

     

    आज, मशीन्स तोंडी आदेश समजतात, चित्रे ओळखतात, कार चालवितात, गेम्स खेळतात आणि मानवांच्या कार्यपद्धतीपेक्षा बरेच काही चांगले काम करतात असे मत व्यक्त केले.

    कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत संचालक डॉ. राजेश इंगोले यांनी व्यक्त केले आणि भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून जगात अव्वल राहण्याचे काम कस करता येईल यावर भर देण्याचे आवाहन सुध्दा केले. भविष्यात असे नव-नवीन उपक्रम राबविण्याचे आश्वासन सुध्दा दिले.

     

    कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रा. अश्विनी वाणी, प्रा. खुशबू जोसेफ, प्रा. श्रुतिका राऊत यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. नेहा गिरडकर यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

  • राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा – महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची मागणी

    News34 chandrapur

    चंद्रपूर – राज्यात मराठा आरक्षणाचा वाद पेटला असून आता आंदोलक ओबीसी नेत्यांवर हल्ले करीत आहे, ज्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घेतली त्यांच्या घराची जाळपोळ आंदोलकांनी सुरू केली आहे, मात्र ज्या नेत्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांच्या विरोधात आंदोलक शांत आहे, सध्या मराठा आंदोलन चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचे काम करीत आहे मात्र हे ओबीसी समाज सहन करणार नाही अशी परिस्थिती राहिली तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यपाल बैस यांना केली आहे.

     

    मराठा आरक्षणाबाबत राज्यातील अनेक भागात जाळपोळीच्या घटना घडल्या, तेली समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर व प्रांतिक तैलिक महासभेचे युवा आघाडी अध्यक्ष आमदार संदीप क्षीरसागर, आमदार प्रकाश सोळंके व आमदार प्रकाश बंब यांच्या बंगला व वाहनाची जाळपोळ आंदोलकांनी केली हे अत्यंत चुकीचे आहे.

     

    ज्या जनप्रतिनिधींने मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी भूमिका घेतली त्यांच्या बंगला व वाहनांची जाळपोळ करीत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला, राज्य सरकारने तातडीने हा जीवघेणा हल्ला करणाऱ्यांवर कलम 302 अंतर्गत गुन्हे दाखल करावे अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे.

     

    ओबीसी समाजाने मराठा समाजाला आरक्षण द्यावे याबाबत कसलाही विरोध केला नाही, मात्र त्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात येऊ नये अशी भूमिका सुद्धा यावेळी तेली समाजाने मांडली आहे.

     

    सध्या आंदोलकांनी राज्यात हैदोस घातला असून मागासवर्गीय व अल्पसंख्याक समाजाला टार्गेट करण्याचे काम यांच्यातर्फे सुरू आहे, हे आता थांबवायला हवे, अन्यथा शासनाने योग्य ती सुरक्षा पुरवावी. आंदोलकांची दडपशाही अशीच सुरू राहिली तर संपूर्ण मागासवर्गीय, अल्पसंख्याक समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, राज्यपाल रमेश बैस यांनी प्रभावीपणे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व महासभेचे प्रदेश अध्यक्ष खासदार रामदास तडस यांना निवेदन जिल्हाधिकारी मार्फत देण्यात आले आहे.

     

    निवेदन देताना महासभेचे प्रकाश देवतळे, अजय वैरागडे, निलेश बेलखेडे, राहुल क्षीरसागर, छबु वैरागडे, कल्पना बगुलकर उपस्थित होते.

  • चंद्रपूर जिल्ह्यात वनप्राण्यांच्या हल्ल्यात तब्बल 20 बळी

    News34 chandrapur

    बाेडधा (हळदा)- शेतावर धान कापणी करायला गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना हळदा शेतशिवारातील कंपार्टमेंट ११६८ मध्ये 1 नोव्हेंबरला दुपारी तीन वाजता घडली.सदर घटनेमुळे महिलांमध्ये दहशत निर्माण झाली असुन शेतावर जाऊन धान कसे कापायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

     

    हळदा येथील सायत्राबाई नामदेव कांबळी (वय ६०) ही महिला आज सकाळी दहा वाजता धान कापायला गेली. दुपारी तीनच्या सुमारास शेतामध्ये असलेल्या या महिलेवर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून जागीच ठार केले व डाेक्याचा भाग छिन्नविछिन्न अवस्थेत करून या महिलेला शंभर मीटर अंतरावर असलेल्या कंपार्टमेंट ११६८ मध्ये नेले या महिलेच्या साेबत असलेल्या महिलांनी आरडाओरडा केल्याने सदर महिलेचा मृतदेह तिथेच ठेवुन वाघ पळुन गेला.

     

    सदर घटनेची माहिती गावात हाेताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.सदर घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली माहिती मिळताच दक्षिण वनपरिक्षेत्र अधिकारी आर.डी.शेन्डे,वनक्षेत्रसहाय्यक ए.पी.करंडे घटनास्थळी आपल्या ताफ्यासहित दाखल झाले.तसेच मेंडकी पाेलिस घटनास्थळी दाखल पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी ब्रम्हपुरी येथे नेण्यात आले.

     

    वाघाच्या हल्ल्यात सकाळी गाेऱ्हा जखमी
    बाेडधा येथील प्रल्हाद जयदेव हुलके हा युवक बैल शेतात चारण्यासाठी जात असताना वाघाने बाेडधा शेतशिवारातील वनविभागाच्या राेपवनासमाेरच एका गाेऱ्हावर वाघाने हल्ला करून जखमी केले.

     

    वाघाच्या दहशतीने परिसरातील नागरिक घाबरले असुन शेती करायची कशी , धानपिक कसे कापायचे असा प्रश्न निर्माण झाला असुन तातडीने वनविभागाने या वाघाांचा बंदोबस्त करावा अशी मागणी हाेत आहे.

    वर्ष 2023 मध्ये वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात एकूण 20 बळी गेले आहे ज्यामध्ये 19 वाघाच्या हल्ल्यात तर 1 बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाले आहे.

  • आप पक्षाच्या बॅनरमुळे चंद्रपुरात 4 वर्षांनी गाजला 200 युनिटचा मुद्दा

    News34 chandrapur

    चंद्रपूर: चंद्रपूर शहर महानगर पालिकेची रीतसर परवानगी घेऊनही कर्मचाऱ्यांनी बॅनर काढण्याची कारवाई केली. स्थानिक आमदाराच्या दबावात महानगर पालिका कारवाई केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. या प्रकरणी आम आदमी पक्षाने महानगरपालिका परिसरात ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर स्वतःच दिलेली परवानगी रद्द करीत फलक परवानगीसाठी घेतलेली रक्कम परत करण्याची नामुष्की मानपावर ओढवली आहे.

     

    मागील २०१९ मध्ये अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांनी नागरिकांना २०० युनिट वीज मोफत देण्याची घोषणा केली होती. मतदारांना भूलथापा देऊन विजय मिळविला. मात्र, ४ वर्ष पूर्ण होऊनही ही मागणी पूर्ण झाली नाही. याच घोषणेची आठवण करून देण्यासाठी आम आदमी पक्षाने शहरात २०० युनिट बाबत बॅनर लावले.

     

    त्यासाठी चंद्रपूर शहर महानगर पालिकेची रीतसर परवानगी घेण्यात आली. शुल्कापोटी ८ हजार रुपये भरले. “200 युनिट” हा मुद्दा घेऊन फिल्मी डॉयलॉग बॅनर शहरभर लागले. सोशल मीडिया आणि माध्यमातून ते प्रचंड वायरल झाले. त्यामुळे आमदार किशोर जोरगेवार यांना विजेचा जोरदार झटका बसला. करंट लागल्यागत अवस्था झालेल्या आमदारानी मनपा अधिकाऱ्यांना फोन करून बॅनर काढण्यासाठी दबाव आणला. या बॅनरला महानगरपालिकेने काढून टाकले. या कारवाईवर आम आदमी पक्षाने संताप व्यक्त केला. मनपात जाऊन ठीय्या आंदोलन केले. व काढलेले बॅनर लावायची मागणी लाऊन धरली.

     

    आम आदमी पक्षाच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार म्हणाले की, आमदार किशोर जोरगेवार यांनी 200 युनिट मोफत वीज देण्याची घोषणा केली होती, पण ती अजूनही पूर्ण झालेली नाही. आमदारांनी केवळ भूलथापा दिल्या आहेत. नागरिकांमध्ये या घोषणेमुळे मोठी नाराजी पसरली आहे. चंद्रपूर महानगर पालिकेने आमदाराच्या दबावात परवानगी घेतली असतानाही महानगरपालिकेने आमचे बॅनर काढून टाकले. आम आदमी पक्षाच्या आंदोलनामुळे महानगरपालिकेत तणाव निर्माण झाला होता. पोलीसाना पाचारण करण्यात आले.

    महानगरपालिकेचे अधिकारी आम आदमी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करत होते. या चर्चेअंती महानगरपालिकेने परवानगी रद्द करून रक्कम परत करण्याचा निर्णय घेतला. स्वतःच दिलेली परवानगी रद्द करून रक्कम परत करण्याची नामुष्की मनपावर आली आहे.

     

    यावेळेस आपचे नेते सुनील मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, युवा जिल्हा अध्यक्ष राजू कुडे,संगठन मंत्री भिवराज सोनी,जिला सचिव संतोष दोरखंडे, जिला उपाध्यक्ष योगेश मुऱ्हेकर, शहर अध्यक्ष योगेश गोखरे, संगठन मंत्री,संतोष बोपचे,युवा अध्यक्ष प्रशांत सिदुरकर, शहर उपाध्यक्ष सुनील सद्दभयाजी, सिकंदर सागोरे, ऍड तब्बसूम शेख, दिपक बेरशेट्टीवार, शंकर सरदार, पवनकुमार प्रसाद, महेश नन्नावरे, अश्रफ सय्यद,गणेश आडे इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

  • MIDC कृष्णा फेरो अलाय कंपनीच्या विरोधात कामगारांचे आमरण उपोषण

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मुल – MIDC मरेगाव येथील जी. आर.कृष्णा फेरो अलाय कंपनीमध्ये मागील दोन तीन वर्षापासून काम करणाऱ्या कामगार, ड्रायव्हर,आपरेटर कडून अधिकचे काम करुन घेणे त्याचा मोबदला मागला तर कामावरून काढून टाकण्याची धमकी देणे, पगारात कपात करणे इत्यादी अन्य मागण्या कंपनी प्रशासनाकडून होत नसल्याने संबंधित कामगार यांनी तहसील कार्यालय समोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेऊन तीन कामगार उपोषनाला बसले असून उर्वरित १८ कामगारांनी त्यांना आपला पाठिंबा दर्शविला असून तेही सोबत उपोषणस्थळी बसले आहेत.

     

    कामगारांच्या उपोषणाला मुल शहर युवक काँग्रेसने अध्यक्ष व्यंकटेश पुल्लकवार यांचे नेतृत्वात जाहीर पाठिंबा दिला असून उपोषण मंडपाला कांग्रेस नेते ,सी डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष संतोषशिंह रावत व संचालक श्री. बनसोड, सभापती राकेश रत्नावार, तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, महिला अध्यक्षा रुपाली संतोषवार, शहर अध्यक्ष सुनील शेरकी, तालुका युवक अध्यक्ष पवन निलमवार, महिला अध्यक्षा नलिनी आडपवार ,औद्योगिक सेलचे अध्यक्ष दत्तात्रय समर्थ, माजी नगर सेविका लीनाताई फुलझेले, महिला पदाधिकारी शामला बेलसरे,राधिका बुक्कावार, गणेश गेडाम यांनी भेट देऊन उपोषण कर्त्याशी चर्चा केली. आणि पाठिंम्बा देऊन न्याय मिळून देउ असे आस्वासन दिले आहे.

     

    उपोषण कर्ते कामगार राकेश वाकुडकर ,नितेश घोडे, महेश नेवारे हे आमरण उपोषण करणार असून त्यांना १८ कामगारांनी सोबत पाठिंबा दिला आहे.यामधे संतोष मेश्राम,लवकुष बांग्रे ,अमोल नेवारे ,सुनील बांबोळे, सोमेश्वर सरपते ,मनोज चुदरी ,सागर बेदले, रवी चौखुंडे, बासू कटलावार,आश्विन मडावी,बंडू चंभारे ,सूरज बावनवाडे ,सुदर्शन चौधरी,दशरथ ढोले, मंगेश मोहरले, प्रदीप शेंडे,श्रावण पेंदोर ,सूरज उईके यांनी आपला सहभाग पाठिंबा दर्शविला आहे.

     

    जो पर्यंत आमच्या पूर्ण मागण्या मान्य कंपनी मान्य करणार नाही तोपर्यंत उपोषण सुरु राहणार असा इशारा उपोषण करते कामगार यांनी दिला असून जय भवानी कामगार संघटणेचा पाठिंबा जाहीर केला आहे.

  • चंद्रपुरातील महिलांनी तयार केले दिवाळीचे फराळ

    News34 chandrapur

    चंद्रपूर  – चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे दिनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत दि.३ ते ७ नोव्हेंबर दरम्यान महिला बचत गटांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थांची विक्री व प्रदर्शनी ज्युबली शाळेजवळ असलेल्या कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित केली जाणार आहे.

    सकाळी ११ ते रात्री १० पर्यंत सुरु असणाऱ्या या विक्री व प्रदर्शनीत नागरिकांना स्वस्त दरात मुबलक खाद्य पदार्थ व वस्तु घेता येणार आहे. यात दिवाळी सणानिमित्त महिला बचत गटांनी तयार केलेले चकली, चिवडा, लोणचे, फराळी वस्तूंचा आस्वाद घेता येणार आहे तसेच कापडी बॅग, दिवे, मातीच्या वस्तु अश्या अनेक वस्तुही विक्रीस राहणार आहेत. सदर विक्री व प्रदर्शनी ३ ते ७ नोव्हेंबर पर्यंत असल्याने नागरिकांना भेट देण्यास ५ दिवस मिळणार आहे. तसेच सकाळी ११ ते रात्री १० पर्यंत सुरु असल्याने सर्व वयोगटाच्या व्यक्तींना भेट देता येणार आहे.

    शहरातील नागरिकांनी महिला स्वयंसाह्य बचत गटांनी तयार केलेल्या वस्तुंची खरेदी करून बचत गटातील महिलांना व्यवसाय करण्याकरिता हातभार लावावा तसेच बचतगटांनी तयार केलेल्या चविष्ट व्यंजनांचा आस्वाद घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

  • जरांगे पाटील उपोषण मागे घ्या

    News34 chandrapur

    मुंबई – राज्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून ओबीसी समाजाच्या काही नेत्यांवर, त्यांच्या घरांवर जाळपोळीसह हल्ले झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीचं सह्याद्री अतिथीगृहावर आज (ता. १ नोव्हेंबर) आयोजन केलं होतं. या बैठकीत सर्वानुमते एक ठरावही मंजूर करण्यात आला.

     

    मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे – पाटील एकीकडे आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसले आहेत. तर दुसरीकडे राज्यभर मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं आंदोलन हिंसाचारामुळे चिघळताना दिसतंय. राज्यातील या स्थितीवर तोडगा काढण्याच्या हेतूने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.

     

    या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह इतर पक्षांचे नेते उपस्थित होते. या बैठकीत सर्वानुमते मंजूर झालेल्या ठरावात सध्या राज्यात सुरू असलेल्या हिंसाचाराबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली. अशा घटना अयोग्य असून यामुळे मराठा आंदोलनाची बदनामी होत असल्याचं स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय. त्याचबरोबर राज्यात कायदा – सुव्यवस्था अबाधित ठेवत शांतता राखायला हवी आणि याला मनोज – जरांगे पाटील यांनी सहकार्य करत उपोषण मागे घ्यावं अशीही विनंती करण्यात आली आहे.
    मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

     

    ज्या काही कायदेशीर त्रुटी आहेत त्या काढून मराठा समाजाला आरक्षण देता येईल. राज्य सरकारच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली आहे. यामुळे थोडा संयम बाळगावा आणि सरकारला वेळ द्यावा. सगळ्यांनीच थोडासा संयम बाळगावा, थोडा वेळ सरकारला द्यावा. ज्या कायदेशीर त्रुटी आहेत त्या दूर करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. ही समिती आपला अहवाल लवकरच सादर करणार आहे. असंही या ठरावात नमूद करण्यात आलंय.

     

    दरम्यान, या बैठकीनंतर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
    नेमकं हे आरक्षण कोणत्या धर्तीवर मिळेल आणि कायद्याच्या चौकटीत ते कसं बसेल? मराठ्यांना त्याचा कसा फायदा होईल, हे महत्त्वाचं आहे. ही सर्व एक मोठी प्रक्रिया आहे. यासाठी सरकारला वेळ लागणार आहे. हा वेळ सरकारला हवा आहे. यासाठी मनोज जरांगे – पाटील वेळच देत नाहीये. त्यामुळे सरकारची कुठे ना कुठे अडचण होतेय, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

    तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मराठा आरक्षणाबद्दल सकारात्मक भूमिका मांडली. न्यायालयीन प्रक्रियेद्वारे मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी सर्वतोपरी पावले उचलण्यात येतील तसेच राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून त्रुटी नसलेला, परिपूर्ण डाटा विहित कालावधीत गोळा करण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

  • 8 दिवसात अवजड वाहतूक बंद करा…अन्यथा युवासेनेचा प्रशासनाला इशारा

    News34 chandrapur

    चंद्रपूर – ३१ ऑक्टोबर ला शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप  गिऱ्हे व युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत साहारे यांच्या मार्गदर्शनात युवासेना उपतालुका प्रमुख सुश्मित गौरकार यांनी वांढरी गावात होत असलेली अवजड वाहतूक 8 दिवसात बंद करावी अन्यथा युवासेना तर्फे याविरोधात आंदोलन उभारणार याबाबत जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

     

     वांढरी ते वांढरी फाटा या मार्गाने गजानन कन्स्ट्रक्शन, ग्रेस व इतर कंपनीची अवजड वाहतूक होत असून त्या अवजड वाहतूकीमुळे गावामधे धुळीचे प्रमाण वाढत आहे. त्या धुळ आणि ध्वनी प्रदूषणामुळे स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, हा मार्ग गावातील मुख्य मार्ग असल्यामुळे गावातील शाळाकरी विद्यार्थी शेतकरी गावकरी यांचा जाण्या येण्याचा रहदारी चा मार्ग आहे.

     

    जड वाहतुकी साठी दुसरा पर्यायी मार्ग असून सुद्धा कि. मी. अंतर वाचवून डीझेल वाचविण्यासाठी गजानन कन्स्ट्रक्शन,ग्रेस व इतर कंपन्या ही जड वाहतूक शॉर्टकट वांढरी गाव ते वांढरी फाटा ह्या मार्गाने येणे जाणे करत आहे.  भविष्यात या अवजड वाहतूकीमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून ही सर्व बाब लक्षात घेऊन ही अवजड वाहतूक ८ दिवसात बंद करण्यात यावी, अन्यथा युवासेना तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येणार यात आणखी काही नुकसान झाल्यास सर्वस्व प्रशासन जिम्मेदार राहणार असा इशारा देण्यात आला.

     

    यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख हेमराज भाऊ बावणे,केतन शेरकी,तुषार शेडामे,आकाश पावडे,चेतन कामडी, महेश जुनारकर,आयुष गौरकार उपस्थित होते.