Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • राज्‍यातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना तात्‍काळ लागू करा – आमदार सुधाकर अडबाले

    राज्‍यातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना तात्‍काळ लागू करा – आमदार सुधाकर अडबाले

    News34 chandrapur

    चंद्रपूर : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना १०, २०, ३० वर्षाची आश्वासित प्रगती योजना तात्‍काळ लागू करा, अशी मागणी नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार व शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

    राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेंतर्गत १०, २०, ३० वर्षांच्या सेवेनंतर तीन लाभ मिळावे, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून विविध संघटनांमार्फत मागणी होत आहे. मागणीच्या पूर्ततेसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ व इतर अनेक संघटनांनी आंदोलनाद्वारे वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा सुद्धा केलेला आहे. मात्र, अद्यापही सरकारकडून शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बाजूने सकारात्मक पाऊल उचलण्यात आलेले नाही. यामुळे शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीची भावना निर्माण झालेली आहे.

    केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्‍यातील इतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळतो आहे. त्‍याच धर्तीवर शालेय शिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या शासकीय, खासगी अनुदानित, आश्रम शाळा व स्थानिक स्वराज्य संस्थामधील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना १०, २०, ३० वर्षाची आश्वासित प्रगती योजना तात्‍काळ लागू करावी, यासाठी गेल्‍या दोन अधिवेशनात आमदार सुधाकर अडबाले यांचा प्रश्‍नांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे. राज्‍य सरकारने राज्‍यातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची रास्‍त मागणी असलेली १०, २०, ३० वर्षाची आश्वासित प्रगती योजना तात्‍काळ लागू करावी, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार व शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे.

  • चंद्रपुर शहरात अतिक्रमणाविरोधात आरटीओ,पोलीस प्रशासन व मनपाची धडक कारवाई

    चंद्रपुर शहरात अतिक्रमणाविरोधात आरटीओ,पोलीस प्रशासन व मनपाची धडक कारवाई

    News34 chandrapur

    चंद्रपूर  – शहरात रस्त्यावर अतिक्रमण करून वाहने विक्री करणाऱ्यांवर प्रादेशिक परिवहन कार्यालय,पोलीस प्रशासन,वाहतूक पोलीस व चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे संयुक्त कारवाई करण्यात आली असुन नागपूर रोडवर जुनी वाहने विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांची ७ वाहने जप्त करण्यात आली आहेत.

     

    शहरातून नागपुरकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या मार्गावर अतिक्रमण, जुनी चार चाकी दुचाकी वाहने विक्री करण्याची दुकाने अवैधरित्या थाटण्यात येतात. दुकानासमोर पार्किंग करणाऱ्या नागरिकांची वाहने थोड्या वेळापुरती वाहने दुकानासमोर उभी राहतात मात्र विक्री करणाऱ्यांची वाहने पुर्ण वेळ रस्त्यावर उभी राहतात यामुळे या अतिक्रमणांचा वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी होत असल्याचे लक्षात घेऊन ८ ते १० चारचाकी वाहनांवर दंड तर पल्सर,पॅशन – प्रो,अ‍ॅक्टिव्हा अश्या ७ दुचाकी जप्त करण्याची कारवाई आरटीओ मार्फत करण्यात आली असुन जोपर्यंत दंडाचा भरणा होणार नाही तोपर्यंत या वाहनांची विक्री होऊ शकणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

     

    त्याचप्रमाणे फुटपाथवर छोटी हातगाडी,मोठे ठेले उभे करून खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांना २४ तासांच्या आत त्यांचे अतिक्रमण हटविण्याच्या सुचना देण्यात आल्या असुन न हटविल्यास छोटे – मोठे ठेले व त्यांचे साहीत्य जप्त करण्यात येणार आहे. हे विक्रेते येणाऱ्या ग्राहकांना बसण्यास रस्त्यावर खुर्च्या ठेवतात त्यामुळे वाहतुकीस उपलब्ध रस्त्याचे प्रमाण आपसुकच कमी होते त्यामुळे पुढील २४ तासानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

     

    नागपुर रोडवरील जे जुनी चार चाकी व दुचाकी विक्री करणारे स्थायी दुकानदार आहेत त्यांनी आपल्या दुकानासमोर कोणतेही वाहन विक्रीकरिता लावु देऊ नये,वाहन विक्री करावयाची असल्यास विक्रीकरिता स्वतः जागा उपलब्ध करून घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. सदर कारवाई सहायक आयुक्त सचिन माकोडे,वाहतुक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अतिक्रमण निर्मुलन अधिकारी संतोष गर्गेलवार तसेच मनीष शुक्ला,अनिल खोटे, भरत बिरिया, बंडू चहरे, विक्रम महातव,डोमा विजयकर,अमरदीप साखरकर यांनी केली.

     

    चंद्रपूर युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे, चंद्रपूर शहर व महामार्गावरील होत असलेले अतिक्रमणामुळे शहरात अपघाताच्या घटनेत वाढ होत असून त्यावर ठोस पाऊले उचलण्याची गरज प्रशासनाला आहे, कारवाई करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा सहारे यांनी प्रशासनाला दिला होता, युवासेनेच्या इशाऱ्यानंतर प्रशासन कामाला लागले मात्र ही अतिक्रमण हटाव मोहीम किती दिवस चालणार यावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे?

     

  • संविधान दिनाला ओबीसी जनजागृती अभियान

    संविधान दिनाला ओबीसी जनजागृती अभियान

    News34 chandrapur

    चंद्रपूर – राष्ट्रीय ओबीसी महासंघ, ओबीसी संघटना , सर्व जातिय संघटना यांच्या वतीने ओबीसी योद्धा रवींद्र टोंगे यांच्या वेंडली गावातून होणार ओबीसी जनजागृती भेटीगाठी अभियानाची सुरवात 1 नोव्हेंबरला झाली असून, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, बिहार राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने जातनिहाय सर्वे करण्यात यावा, ओबीसी विध्यार्थ्यांना प्रत्येक जिल्ह्यात मुला मुलींना प्रत्येकी एक वसतिगृह सुरू करण्यात यावे व ज्या विध्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही त्यांना आधार योजना लागू करण्यात यावी , न्या. संदीप शिंदे समिती बरखास्त करण्यात यावी आणि अन्य ओबीसीच्या संविधानिक न्याय मागण्या मंजूर करून घेण्यासाठी “भेटीगाठी जनजागृती अभियान” रविवार दिनांक 26 नोव्हेंबर 2023 ला सायंकाळी 7 वाजता पांढरकवडा येथे कार्यक्रम होणार आहे.

     

    कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून ऋषभ राऊत राहणार आहे, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर आहेत तर उदघाटन सुधाकर अडबाले शिक्षक आमदार, प्रमुख पाहुणे सरपंच सुरज तोतडे, बाजार समिती संचालक किशोर मत्ते, ओबीसी योध्दा रवींद्र टोंगे, ओबीसी योध्दा विजय बलकी, प्रेमानंद जोगी, तसेच गावातील उपसरपंच समीर भिवापुरे, पोलीस पाटील सचिन टिपले,डॉ संजय घाटे, रणजित डवरे, अनिल डहाके, डॉ दिलीप कांबळे, ,दिनेश कष्टी ,गणेश आवारी, देवराव सोनपित्तरे,भाऊराव झाडे,देवा पाचभाई, गजानन कष्टी, ग्राम पंचायत सदस्य सदस्य कनय्या तोतडे, मोनिका वाटगुरे, अर्चना गावंडे, अर्चना रोगे, संगीता सोनटक्के,अरुण देऊलकर,एम व्ही पोटे,एस एम मालेकर, मनीषा बोबडे, उपस्थिती राहणार आहेत.

     

    कार्यक्रमला उपस्थित राहण्याचे आवाहन हितेश लोडे, किशोर लोनगाडगे, विजय मत्ते, वासुदेव गोबाले, परशुराम बरडे, वामन काकडे, रामदास काकडे, बापूराव रोगे, हनुमान रोगे, विजय बावणे, शिवाजी सोनटक्के, विजय वैरागडे, हेमराज तुराणकर, अशोक रोगे, बाबुराव कुकुडे, विजय मोहूर्ले, राजू वाटगुरे, राजू खंडाळकर, विजय काकडे , प्रकाश कुकडे विठ्ठल वाटगुरे, आशिष मंदाडे, स्वप्नील मोहूर्ले , दिलीप कावडे, विजय पाचभाई, अरविंद पाचभाई, श्रवण पिपलकर, पंढरी नक्षीने, एकनाथ पाऊनकार, निखिल तोतडे, सहदेव कोल्हे, विलास पाजारे, संदेश गावंडे, सुमित नगराळे, दिनेश मत्ते, मारोती मंदाडे, भास्कर वरारकर, सुभाष ढोले, विठ्ठल बोरपे, कवडू उपासे, गजानन मत्ते, कैलास रोगे, संतोष मोहूर्ले, आतिष टिपले,महादेव रणदिवे,अनिल रोगे, मधुकर पिपलकर, बंडू सोनटक्के, प्रवीण धोटे, सेनाजी हनुमते डोमाजी निखाडे, हरिदास टिपले, प्रकाश टिपले, गुलाब कोल्हे, वारलु मोहूर्ले, विठ्ठल नवघडे, यांनी केले आहे.

  • बाबूपेठवासीयांनो सावधान पुढे वाघ आहे….

    बाबूपेठवासीयांनो सावधान पुढे वाघ आहे….

    News34 chandrapur

    चंद्रपूर – 20 नोव्हेम्बरला शहरातील बाबूपेठ भागात शनी मंदिरात पूजेसाठी गेलेल्या मनोहर वाणी या व्यक्तीला वाघाने ठार केल्याने या भागात वनविभागाने गस्त सुरू केली आहे.

     

    वर्ष 2023 मध्ये आतापर्यंत तब्बल 21 नागरिकांचा बळी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात झाला आहे, चंद्रपूर शहरातील बाबूपेठ भाग हा जंगलालगत असून अनेकदा या मानवी वस्तीत वन्यप्राण्याने शिरकाव केला आहे.

     

    जुनोना जंगल परिसरात दररोज पहाटे असंख्य नागरिक सकाळी फिरायला जातात मात्र आता त्याठिकाणी वाघाचा वावर वाढल्याने वनविभाग सुद्धा सतर्क झाला आहे.

     

    सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना वनविभाग सतर्क करीत असून जपून….पुढे वाघ आहे….अशी सूचना देताना दिसंत आहे, जंगल परिसरात वनविभागाने ट्रॅप कॅमेरे लावले आहे, मात्र जंगल भागात मानवी वावर वाढल्याने त्याठिकाणी मोठी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्याकरिता नागरिकांनी सकाळी फिरायला जाताना बेसावधपणा बाळगू नये.

  • बहिन म्हणजे आईचं दुसरे प्रतिबिंब – आमदार किशोर जोरगेवार

    बहिन म्हणजे आईचं दुसरे प्रतिबिंब – आमदार किशोर जोरगेवार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – यंग चांदा ब्रिगेड संघटना नसुन हा परिवार आहे. या संघटनेचा प्रमुख म्हणून आपल्या बहिणींच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासाठी मी कटिबध्द आहे. दरवर्षी आपण हा कार्यक्रम आयोजित करुन औक्षवंत करता. हा माझ्यासाठी आनंदाचा दिवस असतो. बहिन म्हणजे आईचे दुसरे प्रतिबिंब असुन आपला स्नेहरुपी आर्शिवाद आपण माझ्यावर कायम राहिला आहे. असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

     

    यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमात निवासस्थानी भाऊबिज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला कल्याणी किशोर जोरगेवार, यंग चांदा बिग्रेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, बंगाली समाज महिला शहर प्रमुख सविता दंढारे, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, सायली येरणे, अल्पसंख्यांक विभाग महिला शहर प्रमुख कौसर खान, आशा देशमूख, विमल कातकर, कविता निखारे, निलिमा वनकर, शमा काजी, प्रमीला बावणे, अनिता झाडे, वैशाली मेश्राम, अस्मिता डोणारकर, शाहिन शेख, वैशाली रामटेके, माला पेंदाम, कल्पना शिंदे, वैशाली मद्दीवार, सोनाली आंबेकर, अल्का मेश्राम, चंदा ईटनकर, नंदा पंधरे, माधूरी निवलकर, वंदना हजारे आदींची उपस्थिती होती.

     

    यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, राखी आणि भाऊबीज या कार्यक्रमासाठी आपण दरवर्षी मोठ्या संख्येने येतात. दरवर्षी वाढत असलेली बहिणींची संख्या आनंददायी असली तरी बहिणींप्रती जबाबदारीची जाण करुन देणारी आहे. भाऊ म्हणून कुठे कमी पडणार नाही यासाठी माझे सदैव प्रयत्न राहीले आहे. आमदार म्हणून विकासकामे करत असतांना मला बहिनींचा कधीच विसर पडला नाही. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आपण विविध ठिकाणी विशेष आरोग्य शिबिरे आयोजित केलेत. त्यांचे आरोग्य उत्तम राहिले पाहिजे यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न आपण करणार आहोत.

     

    माझ्या अनेक बहिनी या सर्वसाधारण कुंटुबातील आहे. याची मला जाण आहे. त्यामुळे त्यांचे आर्थिक राहणीमान उंचवावे, त्यांनी स्वत:चा रोजगार उभा करुन स्वाभिमानाने जगावे यासाठी माझे प्रयत्न सुरु आहे. स्वयंरोजगारा संबंधित अनेक महागडे प्रशिक्षण आपण आपल्या भगीनींना निशुल्क उपलब्ध करुन देत आहोत. विविध भागात आपण ब्युटी पार्लर, मेकअप, शिवणकाम, फॅशन डिझायनींग या सारखे प्रशिक्षण शिबिरे आयोजित करत आहोत. जवळपास आपण दोन हजार महिलांना या शिबिराच्या माध्यमातुन प्रशिक्षित केले आहे. यातील अनेक महिलांनी प्रशिक्षीत होउन स्वत:चा रोजगार सुरु आहे. सुरवातीला त्यांना कमी मिळकत मिळत असली तरी त्या आत्मसन्माने जगू लागल्या आहे. परिवाराच्या उदरर्निवाहा मध्ये आर्थिक मदत करुन लागल्या आहे. याचा आनंद असल्याचे यावेळी ते म्हणाले.

     

    पूढे ही आपण गरज तिथे शिबिरे या उपक्रमा अंतर्गत सदर प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.
    या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडच्या महिलांसह मतदार संघातील भगीनींनी आमदार किशोर जोरगेवार यांना औक्षवंत करुन ओवाळनी केली. सर्व भगीनींना आमदार किशोर जोरगेवार यांनीही ओवाळणी स्वरुन भेट वस्तु देत त्यांना भाऊबिज या पवित्र सणाच्या शुभेच्छा दिल्यात. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांसह शेकडो महिलांची उपस्थिती होती.

  • चंद्रपुरातील अतिक्रमण अपघाताला जबाबदार

    चंद्रपुरातील अतिक्रमण अपघाताला जबाबदार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – मागील 2 महिन्यापासून चंद्रपूर शहरात होणारे अपघात चिंतेचा विषय बनला आहे, या कालावधीत तब्बल 12 जणांनी आपला जीव गमावला, या अपघातांची असंख्य कारणे आहे, मात्र शहरातील वेगात वाढणारे अतिक्रमण सुद्धा या अपघाताला तितकेच जबाबदार आहे.

     

     

    यावर चंद्रपूर जिल्हा युवासेनेने गंभीर दखल घेत 8 दिवसांच्या आत प्रियदर्शिनी चौक ते ट्रायस्टार हॉटेल चौक पर्यंत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाचा वेढा काढण्यात यावा अशी मागणी युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी चंद्रपूर मनपा आयुक्त, वाहतूक नियंत्रक शाखा व जिल्हाधिकारी यांना निवेदनामार्फत केली आहे.

     

     

    प्रियदर्शिनी चौक ते हॉटेल ट्रायस्टार चौक मधील रस्त्यावर दुचाकी शोरूम धारकांचे रस्त्यावर वाढत असलेले अतिक्रमण व सोबत वरोरा नाका चौकातील फास्टफूड सेंटर व जिम समोर पार्किंग नसल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नागरिक वाहने उभे करीत अपघाताला आमंत्रण देत आहे.

     

     

    प्रशासनाने 8 दिवसाच्या आत सदर अतिक्रमण काढावे अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करून प्रशासनाची झोप उडविल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असा इशारा युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी दिला आहे.

    यावेळेस युवासेना उपजिल्हाधिकारी रिजवान पठाण शहर अधिकारी,शहाबाज शेख शिवा वजारकर,पराग कूत्तरमारे सुरज रॉय यावेळी यांची उपस्थिती होती

  • सरपंच संघटनेच्या उपोषण आंदोलनाची पालकमंत्री व प्रशासनाने घेतली दखल

    सरपंच संघटनेच्या उपोषण आंदोलनाची पालकमंत्री व प्रशासनाने घेतली दखल

    News34 chandrapur

    चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील अल्ट्राटेक सिमेंट कंपनी विरोधात दत्तक गाव सरपंच संघटनेच्या वतीने 13 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर पर्यंत साखळी पोषण व तीन दिवस अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हा सचिव रत्नाकर चटप, ग्रा.पं.आवाळपूरचे उपसरपंच बाळकृष्ण काकडे यांनी आमरन उपोषण केले. विविध राजकीय पक्ष, संघटना, सामाजिक संस्थांचा पाठिंबा व स्थानिक नागरिकांचा रोष बघता अखेर 18 नोव्हेंबरला रात्री 10 वाजता अल्ट्राटेक सिमेंट कंपनीकडून मिळालेल्या लेखी आश्वासनानंतर उपोषण सुटले. या आंदोलनाची दखल जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली आहे. मागण्यांची पूर्तता करण्याचे निर्देश त्यांनी अल्ट्राटेक प्रशासनाला दिले आहे.

     

    जिल्हाधिकारी डॉ.विनय गौडा, मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराव भोंगडे, कोरपना तहसीलदार व्हटकर, अल्ट्राटेकचे सीएसआर प्रमुख प्रतीक वानखेडे, किरण करमणकर, सरपंच संघटनेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई व दत्तक गावातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत चंद्रपूर येथे नियोजन भवनात नुकतीच बैठक पार पडली. यावेळी दत्तक गाव सरपंच संघटनेच्या वतीने जिल्हा सचिव रत्नाकर चटप यांनी सरपंच संघटनेच्या मागण्यांविषयी चर्चा केली.

     

    अल्ट्राटेक कंपनीने गावासाठी मोठ्या प्रमाणात सीएसआर निधी खर्च करावा, गावातील पांदण रस्त्यासाठी कंपनीच्या डोलामाईट मधून पांदन रस्त्याचे बांधकाम करावे, स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा या प्रमुख मागण्या केल्या. पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी सदर मागण्या रास्त असून त्या पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी, संवर्ग विकास अधिकारी, तहसीलदार व अल्ट्राटेक प्रशासनाला दिले. परिसरातील व दत्तक गावातील आयटीआय, पॉलिटेक्निक, बीई झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व रोजगार, दत्तक गावांमध्ये सुसज्ज क्रिडांगणाचे बांधकाम व प्रदूषण नियंत्रक सयंत्र तात्काळ बसवण्यासह सीएसआर निधी खर्च करत असताना ग्रामपंचायत प्रशासनाला विश्वासात घेवून नियोजन करावे असे कंपणी प्रशासनाला निर्देश दिले.

     

    नियोजन बैठकीला अ.भा.सरपंच संघटनेचे जिल्हा सचिव रत्नाकर चटप, नांदा गावचे उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले, आवाळपूरचे सरपंच प्रियंका दिवे, उपसरपंच बाळकृष्ण काकडे, हिरापूरचे सरपंच सुनीता तुमराम, उपसरपंच अरुण काळे, सांगोळाचे माजी सरपंच सचिन बोंडे, भोयेगावचे सरपंच शालिनी बोंडे, बाखर्डीचे सरपंच अरुण रागीट, नोकरीचे सरपंच संगीता मडावी, पत्रकार रवी बंडीवार प्रामुख्याने उपस्थित होते.

    कंत्राटी कामगारांचे मांडले प्रश्न..

    दत्तक गाव सरपंच संघटनेच्या वतीने यावेळी अल्ट्राटेक सिमेंट कंपनीत काम करणाऱ्या कंत्राटी कामगाराच्या वेतना बाबतचा प्रश्न सरपंच संघटनेने मांडला. 120 रुपये दर दिवसाच्या रोजीत वाढ करावी ही प्रमुख मागणी करण्यात आली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी कामगार कल्याण आयुक्त यांच्या सोबत बैठक बोलावून सदर मुद्द्यांवरती चर्चा केली जाईल, असे शिष्टमंडळाला सांगितले.

  • विद्युत रोहित्र जळाला तर करा हे काम – चंद्रपूर महावितरण

    विद्युत रोहित्र जळाला तर करा हे काम – चंद्रपूर महावितरण

    News34 chandrapur

    चंद्रपूर : ट्रान्सफॉर्मर जळाल्यास अथवा बिघडल्यास त्याजागी लवकरात लवकर दुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार महावितरणने राज्यभर मोहीम सुरू केली आहे. परंतु ट्रान्सफॉर्मर जळाल्यानंतर त्याची माहिती महावितरणकडे प्राप्त होण्यास विलंब लागत असल्याने स्थानिक नागरिकांनी याबाबतची माहिती १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांकावर कळवावी किंवा मंडलस्तरावरील कार्यकारी अभियंत्यास कळवावी असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.

     

    गावातील ट्रान्सफॉर्मर जळाला तर विद्युत पुरवठा खंडित होऊन गावकऱ्यांची गैरसोय होते. जळालेल्या ट्रान्सफॉर्मरच्या जागी दुरूस्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यास विलंब होण्याची समस्या सोडविण्यासाठी महावितरणने सातत्याने प्रयत्न चालविले आहेत. त्यासाठी ट्रान्सफॉर्मर ऑईल तातडीने उपलब्ध करणे, दुरूस्त ट्रान्सफॉर्मरचा साठा तयार करणे असे विविध उपाय केले आहेत. ट्रान्सफॉर्मर बदलणे व दुरुस्त करणे याचा आढावा मुख्यालयस्तरावर दररोज घेण्यात येतो.

     

    या मोहिमेला यश आले असून महावितरणला ट्रान्सफॉर्मर बिघडल्याची माहिती मिळाल्यानंतर कमाल तीन दिवसात ट्रान्सफॉर्मर बदलण्यात येत आहे. तथापि, ट्रान्सफॉर्मर जळाला आहे हेच उशीराने समजले तर प्रत्यक्षात वीजपुरवठा पुन्हा सुरू होण्यास अधिक विलंब लागत असल्याची समस्या जाणवत आहे. यावर मात करण्यासाठी वीजग्राहकांनी महावितरणला मदत करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

     

    महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून ट्रान्सफॉर्मर जळाल्याची तक्रार करण्यासोबतच चंद्रपूर जिल्ह्यातील वीजग्राहकांना चंद्रपूर मंडळ कार्यालयाचे कार्यकारी अभियंता (प्रशासन) यांना ७८७५७६१००८ या क्रमांकावर माहिती देता येईल. तथा याच व्हॉट्स ॲप क्रमांकावर जळालेल्या ट्रान्सफॉर्मरचा फोटो व ठिकाणाचा तपशील कळविता येईल.

     

    जळालेल्या ट्रान्सफॉर्मरच्या जागी दुरुस्त ट्रान्सफॉर्मर बसवून लवकरात लवकर वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्याच्या महावितरणच्या मोहिमेस वीजग्राहकांनी सहकार्य करावे आणि ट्रान्सफॉर्मर बिघडल्याची माहिती द्यावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

  • खेळाडूंनो चंद्रपुरातील शालेय स्पर्धेत मिशन ऑलम्पिक चे ध्येय ठेवा

    खेळाडूंनो चंद्रपुरातील शालेय स्पर्धेत मिशन ऑलम्पिक चे ध्येय ठेवा

    News34 chandrapur

    चंद्रपूर : विसापूर (ता. बल्लारपूर) येथील तालुका क्रीडा संकुलात 27 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा खऱ्या अर्थाने जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरणार आहे आणि या निमित्ताने चंद्रपूरकरांना राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांचा आनंदही घेता येणार आहे. 2036 मध्ये भारतात ऑलिम्पिक स्पर्धा घेण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. त्यामुळे मिशन ऑलिम्पिकच्या निमित्ताने उत्कृष्ट खेळाडू घडविण्याचे उद्दिष्ट ठेवूनच बल्लारपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे नियोजन करावे, असे निर्देश राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. त्याचवेळी या स्पर्धा अतिशय दर्जेदार आणि उत्तम होतील, असा विश्वास क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केला आहे.

    जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन सभागृह येथे क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाचा आढावा घेण्यात आला. यावेळी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजित देओल, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभिषन चवरे, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, वन अकादमीचे संचालक श्रीनिवास रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, हरीश शर्मा, देवराव भोंगळे, राहुल पावडे यांच्यासह विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

     

    ऑलिम्पिकची तयारी करण्यासाठी सरासरी 10 वर्षे लागतात, असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘बल्लारपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातूनच मिशन ऑलिम्पिकची सुरुवात झाली पाहिजे. देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून जवळपास 3 हजार खेळाडू, त्यांचे मार्गदर्शक, पंच, पालक, क्रीडा प्रशिक्षक आदी लोक सहभागी होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या भोजनाची आणि निवासाची उत्तम व्यवस्था व्हायला पाहिजे. या दोन्ही व्यवस्था उत्तम असतील तरच पाहुण्यांचे मन जिंकण्यात यश मिळत असते. त्यामुळे उत्तम आयोजन व नियोजनासाठी अधिकाऱ्यांच्या टीमने सज्ज राहावे आणि कामांचे उत्तम नियोजन करावे, असेही श्री. मुनगंटीवार म्हणाले. यावेळी जेवणाचा दर्जा व भोजनाच्या ठिकाणची स्वच्छता या दोन्हीकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

     

    प्रत्येकाची जबाबदारी

    जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातील एनजीओ, क्रीडा संस्था व विविध खेळांशी संबंधित लोकांच्या टीम निश्चित करून त्यांची यादी तयार करावी. खेळाडूंना क्रीडांगणावर ने-आण करण्यासाठी परिवहन महामंडळाच्या बसेससोबतच शाळांच्या बसेस राखीव ठेवाव्यात. तसेच ऑनकॉल वाहने उपलब्ध ठेवावीत. स्टेडियमच्या रंगरंगोटीवर लक्ष केंद्रित करावे. शालेय विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. या स्पर्धा केवळ क्रीडा विभागाच्या नाही तर आपण सगळे आयोजक आहोत, या भावनेतून प्रत्येक चंद्रपूरकराने स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

    राष्ट्रीय स्पर्धा दर्जेदारच होतील -क्रीडा मंत्री संजय बनसोडे

    चंद्रपूर जिल्ह्यात होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात होत आहे. त्यामुळे येथील स्पर्धा दर्जेदार होणार, यात तिळमात्र शंका नाही, असा विश्वास राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केला.राज्याच्या क्रीडा विभागाकडून या स्पर्धेसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. मिशन ऑलिम्पिक 2036 ची घोषणा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्याची सुरुवात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने चंद्रपुरातून होईल, असेही ते म्हणाले.

     

    पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यात खेळाच्या अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले, ‘तीन वर्षांपासून रखडलेले शिवछत्रपती पुरस्कार व जीवन गौरव पुरस्कारांचे वाटप नुकतेच करण्यात आले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने चांगली कामगिरी केली असून सुवर्ण पदक प्राप्त खेळाडूंना 1 कोटी रुपये, रौप्य पदक प्राप्त खेळाडूंना 75 लक्ष रुपये तर कांस्य पदक प्राप्त खेळाडूंना 50 लक्ष रुपये देण्याचा निर्णय क्रीडा विभागाने घेतला आहे. तसेच पुणे येथे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ तर संभाजीनगर येथे राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ प्रस्तावित आहे. पुणे येथे ऑलिम्पिक भवनाकरीता पहिल्या टप्प्यात 75 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

     

    मेजर ध्यानचंद यांच्या नावाने 29 ऑगस्ट हा क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तर पहिले ऑलिम्पिक पदक विजेते स्व. खाशाबा जाधव यांच्या नावाने आता 15 जानेवारी रोजी महाराष्ट्र क्रीडा दिन साजरा करण्यात येईल,’ असेही त्यांनी सांगितले.

  • पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने त्या कुटुंबांना मिळाली आर्थिक मदत

    पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने त्या कुटुंबांना मिळाली आर्थिक मदत

    News34 chandrapur

    चंद्रपूर : सप्टेंबर महिन्यात बल्लारपूर बायपासवर ट्रक आणि ऑटोरिक्षाच्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना वने व सांस्कृतिक कार्य तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते २० लाख रुपयांच्या धनादेशांचे वितरण करण्यात आले. अपघातानंतर श्री. मुनगंटीवार यांनी पाठपुरावा करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ही मदत मिळवून दिली. त्यामुळे घटनेनंतर अवघ्या दीड महिन्यांच्या आत मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळू शकली आहे.

     

    अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना २० लाख रुपयांच्या धनादेशांचे वितरण करण्यात आले. यावेळी, राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे , कल्पना बगुलकर, महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र खांडेकर, जिल्हाध्यक्ष मधुकर राऊत आदी उपस्थित होते.

     

    27 सप्टेंबर 2023 रोजी बल्लारपूर बायपासवर ट्रक आणि ऑटोरिक्षा यांच्यात भीषण अपघात झाला. यात राजकला मोहुर्ले, इरफान खान (रा. बाबुपेठ, चंद्रपूर), अनुष्का खेरकर (रा. बल्लारपूर) आणि संगिता अनिल चहांदे (रा. साईनगर, गडचिरोली) या चार जणांचा मृत्यू झाला होता. यासंदर्भात श्री. मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि दीड महिन्याच्या कालावधीत चारही मृतांच्या कुटुंबांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये याप्रमाणे एकूण 20 लाख रुपयांची मदत जाहीर झाली. मदत जाहीर झाल्यानंतर काही दिवसांतच धनादेश जारी करण्यात आले आणि सोमवारी पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते मृतांच्या कुटुंबियांना हे धनादेश सुपूर्दही करण्यात आले. कुटुंबातील सदस्य गमावल्याचे दुःख विसरणे शक्य नाही, पण मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून देत श्री. मुनगंटीवार यांनी संकटाच्या काळात दिलासा देण्याचे काम केले आहे, अशी भावना मृतांच्या कुटुंबियांनी व्यक्त केली.

     

    वीस दिवसांच्या आत घोषणा

    श्री. मुनगंटीवार यांच्या निर्देशांनंतर जिल्हा प्रशासनाने 25 ऑक्टोबर 2023 रोजी शासनाकडे अर्थ सहाय्याकरिता प्रस्ताव पाठविला. प्रस्ताव पाठविल्यानंतर ना. मुनगंटीवार यांनी विशेष लक्ष दिले आणि सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर 20 दिवसांच्या आत मुख्यमंत्री सचिवालयाने मृतांच्या कायदेशीर वारसदारांना प्रत्येकी पाच लक्ष रुपये याप्रमाणे चारही कुटुंबांसाठी 20 लक्ष रुपये इतके अर्थसहाय्य मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मंजूर केले..