Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • तुम्ही दोघांनी मनपा निवडणूक लढावी, जनता डिपॉझिट जप्त करेल – अनिल देशमुख

    तुम्ही दोघांनी मनपा निवडणूक लढावी, जनता डिपॉझिट जप्त करेल – अनिल देशमुख

    News34 chandrapur

    चंद्रपूर – सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर असलेले माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांनी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर व राजीव कक्कड यांना जोरदार टोला लगावत चंद्रपूर मनपा निवडणूक लढावी अशी विनंती केली, निवडणुकीत उभे झाल्यास जनता तुमचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही असे ही आव्हान यावेळी देशमुख यांनी केले.

     

    शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी कांग्रेसच्या मेळाव्यात उपस्थित झालेले माजी गृहमंत्री व आमदार अनिल देशमुख यांनी अजित पवार गटावर जोरदार हल्ला केला, मेळाव्यानंतर पत्रकार परिषदेत चंद्रपुरातील 2 पदाधिकारी हे अजित पवार गटात गेले असून त्याचा आपल्या पक्षावर परिणाम पडला का या प्रश्नावर अनिल देशमुख यांनी दोन्ही पदाधिकारी नितीन भटारकर व राजीव कक्कड यांच्यावर मिश्किल टोला लगावत दोघांनी स्वतः मनपा निवडणुकीच्या मैदानात उभे रहावं, जनता तुमचं डिपॉझिट जमा केल्याशिवाय राहणार नाही, असे न झाल्यास मी जे बोललो ते खोटं असं समजावे.

     

    राष्ट्रवादी कांग्रेस पक्षातून अजित पवारांनी काढता पाय घेत वेगळा गट स्थापन करून ते शिंदे-भाजप सरकारमध्ये गेले, त्यानंतर चंद्रपुरातील युवक कांग्रेसचे अध्यक्ष नितीन भटारकर व शहर अध्यक्ष राजीव कक्कड यांनी अजित पवार गटाला पाठिंबा देत त्यामध्ये सामील झाले होते.

     

    अनिल देशमुख यांच्या आव्हानाला उत्तर देत अजित पवार गटाचे राष्ट्रवादी कांग्रेस जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी उत्तर देत म्हटलं आहे की, अनिल देशमुख हे जेष्ठ नेते आहे त्यांचा आम्ही आदर करतो, आम्ही जर निष्क्रिय असतो तर पक्षातील 90 टक्के कार्यकर्त्यांचा आम्हाला पाठिंबा नसता, आपण राज्याचे जरी नेते असले तर स्वतःच्या विधानसभा मतदार संघातील नगर परिषदेवर राष्ट्रवादी कांग्रेसचा झेंडा फडकविण्यास अयशस्वी का ठरले? त्याचं कधी चिंतन केलं का? विशेष म्हणजे मंत्री असताना सुद्धा कधी नागपूर जिल्हा परिषद व नगर परिषदेवर ते अयशस्वी का ठरले याबाबत त्यांनी आधी विचार करावा.

     

    आम्ही मनपा निवडणूक लढावी असा त्यांचा आग्रह आहे, याआधी त्यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रात लक्ष द्यावे चंद्रपुरातील राजकारण सांभाळायला आम्ही सक्षम आहो.

  • शासनाने धान खरेदी नोंदणीची मुदत ३१ डिसेंबर पर्यंत वाढवली

    शासनाने धान खरेदी नोंदणीची मुदत ३१ डिसेंबर पर्यंत वाढवली

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मुल:- शासकीय आधारभूत धान खरेदी नोंदणीची मुदत शासनाने ३० नोव्हेंबर पर्यंतच दिलेली होती. ती मुदत ३१ डिसेंबर पर्यंत वाढवण्याची मागणी मूल कृषी उत्पन्न बाजार समितीची सभापती राकेश रत्नावार यांनी जोर धरून लावली होती. त्यांनी शासनाला निवेदन देऊन सदर मागणी मागताच शासनाने शासकीय आधारभूत धान खरेदी नोंदणीची मुदत ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वाढवली.

     

    एकीकडे शेतकऱ्यांवर आकस्मिक अवकाळी पावसामुळे धान कापणी खोळंबली. काही शेतकऱ्यांचे धान कापून ठेवल्यामुळे पाण्यात भिजून खराब झाले. अशातच ओल्या झालेल्या धान्याला कमी भाव मिळेल व व्यापारी ते धान खरेदी करणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले होते.

     

    अवकाळी पावसामुळे ओले धानाचे पीक वाचवण्याचा प्रयत्न करीत असल्याने शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येऊन नोंदणी करण्यासाठी वेळ मिळत नव्हता. शेतकऱ्यांची ही अडचण समजून राकेश रत्नावार यांनी शासकीय आधारभूत धान नोंदणीची तारीख वाढवण्याबाबत निवेदन दिले होते तसेच मागणी जोर धरून लावली होती. याचा विचार करून शासनाने ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत शासकीय आधारभूत धान खरेदी नोंदणीची मुदतवाढ दिलेली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी वेळेत नोंदणी करावी असे आवाहन राकेश रत्नावर यांनी केले आहे.

  • कोट्यवधी रुपयांचा घोळ करणाऱ्यांची मालमत्ता लिलावात काढा

    कोट्यवधी रुपयांचा घोळ करणाऱ्यांची मालमत्ता लिलावात काढा

    News34 chandrapur

    चिमूर – अफरातफर करणाऱ्या व्यक्तीची जप्त केलेल्या मालमत्तेचा त्वरित लिलाव करून खातेदारांची रक्कम परत करण्यासंदर्भात अन्याय निवारण समितीचे वतीने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना निवेदन देण्यात आले.

     

    राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था चिमूर येथे पतसंस्थेचे उपाध्यक्ष अरुण मेहरकुरे. व्यवस्थापक मारोती पेंदोर, लिपिक अमोल मेहरकुरे. दैनिक संकलक अतुल मेहरकुरे यांनी करोडो रुपयांची अफरातफर केली होती. यासंदर्भात वारंवार तक्रार करूनही अफरातफर करणारे व्यक्तीवर कुठलीच कारवाई होत नव्हती. अखेर कर्मचारी व खातेदार यांनी अन्याय निवारण समितीचे माध्यमातून साखळी उपोषण सुरू केल्याने आंदोलनाची दखल घेत आरोपींना अटक करून त्यांची मालमत्ता जप्त केली.

     

    पण ती लिलावात न काढल्यामुळे खातेदारांचे ठेवी परत करता येत नसल्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संस्थेचे प्रशासक रा.सू. लांडगे संस्थेचे कर्मचारी व अन्याय निवारण समितीचे सर्व सदस्य यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन संस्थेमध्ये अफरांतफर करणाऱ्या व्यक्तीची जप्त करण्यात आलेली मालमत्ता त्वरित लिलावात काढून खातेदारांची देणे असलेली रक्कम त्वरित मिळावी या करिता निवेदन देण्यात आले.

  • चंद्रपूर शहरातील बायपास रस्ता तातडीने करा : दिनेश दादापाटील चोखारे

    चंद्रपूर शहरातील बायपास रस्ता तातडीने करा : दिनेश दादापाटील चोखारे

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर हे एक प्रमुख औद्योगिक शहर आहे. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बायपास काढण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता. परंतु, प्रकल्प अद्यापही प्रलंबित आहे. बायपास रस्ता झाल्यास शहरातील वाहतूक कोंडी कमी होणार होती. हा प्रश्न निकाली काढण्यात यावा. या मागणीसाठी भूमिपुत्र संघटनेचे संयोजक दिनेश दादापाटील चोखारे यांच्या नेतृत्वाखाली 1 डिसेंबर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

     

    चंद्रपूर शहराच्या मध्यभागातून राष्ट्रीय महामार्ग जातो. या महामार्गावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. यामुळे शहराच्या मध्यभागी वाहतूक कोंडी होत असते. या कोंडीमुळे वाहनचालकांना अनेक तास थांबावे लागतात. यामुळे नागरिकांना आर्थिक आणि मानसिक त्रास होत आहे. जडवाहतूक शहरातून होत असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे अनेकांचा जीव सुद्धा गमावला गेला आहे.

     

    अनेकांना दुखापत सुद्धा झाली आहे. ही रहदारी बायपास मार्गे झाल्यास शहरातून वाहतूक करताना इतरांना अडचण जाणार नाही. चंद्रपूर शहराच्या बाहेरून बायपास काढण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता. परंतु, अद्यापही या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. बायपास रस्ता झाल्यास शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होणार नाही. तसेच, शहराची वाहतूक व्यवस्था सुव्यवस्थित होईल. चंद्रपूर शहराच्या बायपास प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करण्यासंदर्भात आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणी या धरणे आंदोलनातून करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.

     

    यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती विजय बल्की, बाजार समितीचे संचालक अजय बलकी, पंचायत समिती चे माजी सभापती रोशन पाचारे, ओबिसी नेते सचिन राजुरकर, बल्लारपूर तालुका अध्यक्ष गोविंदा उपरे, हासिम कासिम खान, साखरवाहीचे सरपच नागेश बोंडे,सुरज तोतडे सरपंच ,पांढरकवडा, प्रेमानंद जोगी, आदिवासी नेते कृष्णाजी मासराम, पंचायत समिती माजी उपसभापती मनोज आत्राम,पांढरकवडा सरपंच सुरज तोतडे, बाजार समितीचे संचालक गणेश आवारी, पवन अगदारी, भटालीचे सरपंच किसन उपरे,माजी उपसरपंच संजय टिपले , रंगराव पवार, धंनजय राजुरकर, राहुल शेंडे, ईश्वर आखरे, हितेश लोंढे, गोविंदा बल्की, साचीन शेरकी, रोशन रामटेके, विवेक खुटेमाटे, नंदू टाँगे, जगन्नाथ चटप, जावेद कुरेशी, राजू कांबळे, निळकंठराव बल्की, सिद्धार्थ कवाडे, लक्ष्मण मांढरे, अझहर खान, आदिसह शेकडो भूमिपुत्र उपस्थीत होते.

     

    धरणे आंदोलनात बोलताना दिनेश दादापाटील चोखारे म्हणाले, “चंद्रपूर शहरातील वाहतूक कोंडी हा एक गंभीर प्रश्न आहे. या प्रश्नाचे तातडीने निराकरण करणे आवश्यक आहे. बायपास रस्ता झाल्यास हा प्रश्न निकाली लागेल. त्यामुळे बायपास प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करावी. अशी मागणी करत मागण्या पुर्ण न झाल्यास 15 जानेवारी 2024 रोजी उपोषण करण्याचा इशारा यावेळी दिला आहे.
    यावेळी उपस्थित नेत्यांनीही बायपास प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली.

  • अवजड वाहतुकीविरोधात शिवसेनेचे रस्ता रोको आंदोलन

    अवजड वाहतुकीविरोधात शिवसेनेचे रस्ता रोको आंदोलन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर तालुक्यातील वांढरी गावातून होणारी अवजड वाहतूक बंद करण्यात यावी यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात व युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांतभाऊ साहारे यांच्या नेतृत्वात शिवसेना तालुकाप्रमुख विकास विरुटकर, शिवसेना महिला जिल्हा प्रमुख उज्वला नलगे,युवासेना उप जिल्हाप्रमुख हेमराज बावणे, युवासेना उपतालुका प्रमुख सुश्मित गौरकार, युवासेना तालुका समन्वयक ज्ञानेश्वर लोनगाडगे,चेतन कामडी शाखा प्रमुख चींचाला यांच्या नेतृत्वात व प्रमुख उपस्थितत वांढरी गावात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

     

    वांढरी गावातून अनेक कंपन्यांची अवजड वाहतूक सुरू आहे.या जड वाहनांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही या वाहतुकीमुळे वाहन धुळीचे प्रमाण वाढत आहे स्थानिक नागरिकांना वाहक त्रास सहन करावा लागत आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांना या संबधित वारंवार निवेदन दिले परंतु प्रशासन याकडे दुर्लक्ष केले या करिता शिवसेना युवासेना तर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आणि या नंतर सुध्दा ही जडवाहतुक बंद झाली नाही तर समोर आम्ही यापेक्षा तीव्र आंदोलन करू असेही यावेळी सांगण्यात आले.

     

    यावेळी सज्जन सातपुते नागाळा उपसरपंच, रिझवान पठाण,शबाझ शेक,शिवा वाझरकर,अमित पिंपलकर, आकाश पावडे,केतन शरकी, तुषार शेडामे,कपिल शेरकी, चेतन पावडे,शुभम घागर्गुंडे,वर्षा पाल, पुनम तुरांकर ,माधुरी पावडे ,वेणू पोलोज्वार, साधना बहादे, तनेबाई बरडे, अशा पिपरे,सुमन पीपरे,जिजाबाई रेचंकर, माया केडझर,बायाबई शेदमे, सुरेखा पिंपलकर, भारती तूरकर, कलावती काळे,माया ढाकणे, छाया तोडासे, पापिता ढाकणे,सुनीता देशकर, तानी पलधर, भावना देशकर, सुवरणा आसूटकर,अर्चना खंदरकर, राजांना देशकर, सुनीता इंगळे,कल्याणी घुगुल,ताई कांबळे,कल्पना येलमुले, शकुन समस्त गावकरी मोठया संख्येने सहभागी झाले.

  • चंद्रपूर जिल्हा न्यायालयाच्या इमारतीचा होणार विस्तार

    चंद्रपूर जिल्हा न्यायालयाच्या इमारतीचा होणार विस्तार

    News34 chandrapur

    चंद्रपूर : एखादा विषय हाती घेतला की तो पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करण्यात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा हातखंडा आहे. त्यांच्या या खास कार्यशैलीची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे आणि यंदा विधी क्षेत्रच त्याचे साक्षीदार ठरले आहे. श्री. मुनगंटीवार यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूर येथील जिल्हा न्यायालयाच्या नवीन विस्तारीत सात मजली इमारत बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. या कामासाठी राज्य शासनाने 60 कोटी 76 लक्ष रुपये मंजूर केले आहेत. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळेच 2017 पासून प्रलंबित असलेला विषय आता मार्गी लागला आहे.

     

     

    जिल्हा न्यायालयाच्या नवीन विस्तारीत इमारतीचा प्रस्ताव चंद्रपूरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी शासनाला पाठवला होता. त्याआधारे महाराष्ट्र आणि गोवा बार काऊंन्सिलचे अध्यक्ष ॲड. पारिजात पांडे, चंद्रपूर जिल्हा बार असोसीएशनचे अध्यक्ष ॲड. अभय पाचपोर, सचिव ॲड. आशिष धर्मपुरीवार, उपाध्यक्ष ॲड. राजेश ठाकूर यांनी ना. सुधीर मुनगंटीवार यांना या विषयात लक्ष घालण्याची मागणी केली होती. चंद्रपूरच्या विधि क्षेत्रातील गरज लक्षात घेऊन पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी शासनस्तरावर या विषयाचा पाठपुरावा केला. जिल्ह्यातील न्यायदान प्रक्रिया अधिक गतीमान होण्यात इमारतीचा अडसर ठरू नये, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यामुळे शासनाने 29 नोव्हेंबर 2023 रोजी चंद्रपूर येथील नवीन विस्तारीत न्यायालयीन इमारतीच्या बांधकामासाठी 60 कोटी 76 लक्ष रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे सात वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुद्दा आता निकाली निघाला आहे. पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी प्राधान्याने या विषयाकडे लक्ष दिल्याबद्दल चंद्रपुरातील विधी वर्तुळातून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

     

    12 कोर्ट हॉल आणि अद्ययावत यंत्रणा :

    चंद्रपूर जिल्हा न्यायालयाच्या नवीन विस्तारित इमारतीमध्ये एकूण 12 कोर्ट हॉल असणार आहेत. याठिकाणी अद्ययावत यंत्रणा आणि अत्याधुनिक सुविधांचा मेळ बघायला मिळणार आहे. अंतर्गत आणि बाह्य विद्युतीकरण, पाणीपुरवठा व मलनिःसारण, अग्नीशमन यंत्रणा, सुसज्ज वाहनतळ, वातानुकुलित यंत्रणा, वाढीव क्षमता असलेले उद्वाहन (लिफ्ट), सीसीटीव्ही, पॉवर बॅकअप आदींची तरतूद कामांतर्गत करण्यात आली आहे. न्यायदान करणारी यंत्रणा आणि न्याय मागण्यासाठी येणारा सर्वसामान्य माणूस यांची मुलभूत सोयीसुविधांच्या बाबतीत गैरसोय होणार नाही, सोबतच नवोदीत अभिवक्त्यासाठी आसनाच्या व्यवस्थेची पूर्ण काळजी बांधकामादरम्यान घेतली जाणार आहे.

  • चंद्रपुरात पुढच्या सहा महिन्यांत कॅन्सर हॉस्पिटल येणार लोकांच्या सेवेत

    चंद्रपुरात पुढच्या सहा महिन्यांत कॅन्सर हॉस्पिटल येणार लोकांच्या सेवेत

    News34 chandrapur

    चंद्रपूर : गेल्या अडीच वर्षांपासून रखडलेल्या चंद्रपूर कॅन्सर केअर हॉस्पीटलच्या कामाला राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे गती मिळाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कॅन्सर पीडितांना मोठा दिलासा मिळाला आहे. ऑक्टोबर 2022 पर्यंत या हॉस्पीटलचे केवळ 30 टक्के काम झाले होते. मात्र गेल्या एक वर्षात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हॉस्पिटलच्या उभारणीकरिता घेतलेल्या नियमित बैठका आणि, शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे आता हॉस्पीटलचे 87 टक्के काम पूर्ण झाले आहे. येत्या सहा महिन्यांमध्ये कॅन्सर हॉस्पिटल लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे.

     

    जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी मुंबईवरून दूरदृष्यप्रणालीद्वारे वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, तर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी विनय गौडा, जी.सी. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, टाटा कॅन्सर हॉस्पीटलचे डॉ. कैलाश शर्मा व त्यांची टीम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुलपाटील, सहाय्यक अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांची उपस्थिती होती.

     

    चंद्रपूर येथे कॅन्सर हॉस्पीटलच्या निर्मितीसाठी चंद्रपूर कॅन्सर केअर फाऊंडेशनची स्थापन करण्यात आली आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘27 जून 2019 ला या हॉस्पीटलच्या बांधकामाचे वर्कऑर्डर देण्यात आले. मात्र अडीच वर्षे या रुग्णालयाचे काम पूर्णपणे थंडबस्त्यात पडले. गेल्या वर्षीपासून या कामाला गती देण्यात आली असून एका वर्षात 30 टक्क्यांवरील बांधकाम आज 87 टक्क्यांपर्यंत पोहचले आहे. कॅन्सर हॉस्पीटल येत्या सहा महिन्यात सुसज्ज इमारत आणि अत्याधुनिक उपकरणांसह सज्ज होऊन कॅन्सर पीडितांना उपचाराकरीता उपलब्ध करावा अशा सूचना श्री. मुनगंटीवार यांनी दिल्या. यावेळी कॅन्सर फाऊंडेशनच्या संचालकांनी कॅन्सर हॉस्पिटल येत्या सहा महिन्यात सुरू करण्याचे आश्वासन दिले.

     

    हॉस्पिटलच्या गुणवत्तेत तडजोड नको’

    कॅन्सर हॉस्पीटलचे बांधकाम, उपकरणांची उपलब्धता, आवश्यक मनुष्यबळ, त्यांचे वेतन आदींसाठी गॅप फंडींगचा विषय तात्काळ मार्गी लावा. तसेच हॉस्पीटलच्या गुणवत्तेमध्ये कुठलीही तडजोड करू नये. याबाबत जिल्हाधिकारी यांनी दर पंधरा दिवसांत कामाचा आढावा घ्यावा. जिल्ह्यातील कॅन्सर पीडित रुग्णांना दिलासा देण्यासाठी या कामात आता प्राधान्याने पुढे जाण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिले.

     

    आरोग्य तपासणीच्या माध्यमातून होणार कॅन्सरचे निदान

    मोठ्या प्रमाणात कॅन्सर रुग्णांची वाढ ही अतिशय गंभीर बाब आहे. जिल्ह्यातील प्रदुषण हा सुध्दा एक घटक त्यासाठी कारणीभूत राहू शकतो. तसेच ब्रेस्ट कॅन्सर, मुखाचा कॅन्सर, गर्भाशय आणि गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आदी प्रकार आज मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची तपासणी करून कॅन्सरचे निदान करण्यासाठी टाटा ट्रस्टच्या वतीने फिरत्या बसच्या माध्यमातून रुग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार आहे.

     

    सुसज्ज व अत्याधुनिक उपकरणांसह निर्मिती

    चंद्रपूर येथे 2 लक्ष 35 हजार चौरस फूट जागेवर 140 खाटांचे चंद्रपूर कॅन्सर केअर हॉस्पीटलचे बांधकाम होत असून हॉस्पिटलची मुख्य इमारत ग्राऊंड फ्लोअर अधिक चार मजले, रेडीएशन ब्लॉक ग्राऊंड फ्लोअर अधिक एक मजला, युटीलिटी ब्लॉक ग्राऊंड फ्लोअर अधिक एक मजला अशी राहणार आहे. याशिवाय रेडीएशन, किमोथेरपीकरीता अत्याधुनिक उपकरणांची उपलब्धता करण्यात येणार आहे. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित मनुष्यबळ आदी बाबींची पूर्तता करण्यात येणार आहे.

  • चंद्रपुरात कामगार कायद्याची पायमल्ली, शिवसेना करणार आंदोलन

    चंद्रपुरात कामगार कायद्याची पायमल्ली, शिवसेना करणार आंदोलन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो, जिल्ह्यात विविध उद्योगांचे जाळे पसरले आहे, मात्र अनेक उद्योगात स्थानिक कामगार नसल्याने जिल्ह्यात बेरोजगारांची संख्या वाढत चालली आहे.

     

    वेकोली चंद्रपूर क्षेत्रातील भटाळी येथे ओव्हरबर्डन काढण्याच्या कामाचं कंत्राट दक्षिण भारतातील कावेरी कंपनीला मिळाले आहे, मात्र या कंपनीने बाहेरून कामगार आणल्याने स्थानिक कामगारांना काम देण्यास कावेरी प्रबंधन टाळाटाळ करीत आहे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी कंपनी प्रशासनाला स्थानिक कामगारांना कामावर घ्या असे सुचविले मात्र त्यांच्या या मागणीवर कंपनीने दुर्लक्ष केले.

     

    कावेरी कंपनीच्या विरोधात 11 डिसेंबर 2023 ला कावेरी कंपनी विरुद्ध शिवसेना आंदोलन करणार आहे.

    परप्रांतीय कामगारांना कावेरी कंपनीने कामावर घेतले, मात्र त्यांचं कसल्याही प्रकारचे पोलीस व्हेरिफिकेशन, कामगारांची नोंदणी, उत्खनन साठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांची नोंदणी करण्यात आली नसून ते बेकायदेशीर पणे वेकोलीच्या क्षेत्रात चालत आहे.

     

    या सर्व बेकायदेशीर कृत्याचा विरोध व स्थानिक कामगारांवर अन्याय करणाऱ्या कावेरी कंपनी विरुद्ध शिवसेनेने आंदोलनाचे हत्यार उपसले असून 11 डिसेंबर ला कंपनी प्रबंधन विरुद्ध तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे, आंदोलनाबाबत संबंधित विभागाला निवेदने देण्यात आली आहे.

     

    सदर आंदोलन शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वाखाली होणार असून या आंदोलनात शिवसेना, युवासेना आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

  • हा रस्ता माझ्या बापाचा, चंद्रपुरात आनंद मेळा धारकाची मुजोरी

    हा रस्ता माझ्या बापाचा, चंद्रपुरात आनंद मेळा धारकाची मुजोरी

    News34 chandrapur

    चंद्रपूर – लहान मुले व नागरिकांच्या मनोरंजनासाठी चंद्रपूर शहरातील चांदा क्लब मैदानावर नुकतंच आनंद मेळा सुरू झाला आहे, मात्र या मेळा धारकाने सार्वजनिक मार्गावर अतिक्रमण केल्याने नागरिकांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.

     

    नोव्हेंबर महिन्यापासून चंद्रपूर शहरातील चांदा क्लब मैदानावर आनंद मेळा सुरू झाला, मात्र या मेळा धारकांनी आपली मुजोरी सुरू करीत चंद्रपूर-नागपूर मार्गावर अतिक्रमण केले आहे, विशेष बाब म्हणजे वाहतूक व चंद्रपूर पोलिसांचे बॅरिकेट्स चा वापर अतिक्रमणसाठी केला.

     

    चांदा क्लब मैदानाच्या आत सुरू असलेल्या या मेळ्यात येणारे नागरिक आत वाहन पार्क करतात मात्र मैदानाच्या बाहेर नागरिकांनी आपली वाहने पार्क करू नये यासाठी वाहतूक पोलिसांचे बॅरिकेट्स चा वापर करून चंद्रपूर-नागपूर मार्गावरील तब्बल 100 मीटर वर दोरीच्या साहाय्याने मेळा धारकाने अतिक्रमण केले आहे.

     

    वाहन पार्क न करू दिल्याने अनेक नागरिकांसोबत मेळा धारकाचे अनेकदा भांडण सुद्धा झाले आहे, मात्र आमचं कुणी काही बिघडवू शकत नाही अशी मुजोर भूमिका मेळा धारकाने घेतली आहे.

    चंद्रपूर-नागपूर मार्गावर आधीच अतिक्रमणामुळे अनेक अपघात घडले असताना वाहतूक पोलिसांच्या नाकावर टिच्चून मेळा धारक आपली मुजोरी करत असल्याने हा रस्ता माझ्या बापाचा आहे असे दर्शवित आहे.

     

    शहरात पुन्हा अपघाताला आमंत्रण देणाऱ्या मुजोर आनंद मेळा धारकावर पोलीस व वाहतूक पोलीस प्रशासन कारवाई करणार काय? की मेळा धारकाच्या मुजोरीला प्रशासन आशीर्वाद देणार? वाहतूक पोलिसांनी मेळा धारकाला चंद्रपूर-नागपूर मार्गावर अतिक्रमण करण्याची रीतसर परवानगी दिली आहे काय? प्रशासन त्या अतिक्रमण धारकाला पाठीशी घालत आहे काय? असे अनेक प्रहन यावेळी उपस्थित झाले आहे.

  • चांदाफोर्ट ते गोंदिया रेल्वेमार्गावर आतापर्यंत 8 वाघांचा मृत्यू

    चांदाफोर्ट ते गोंदिया रेल्वेमार्गावर आतापर्यंत 8 वाघांचा मृत्यू

    News34 chandrapur

    चंद्रपूर :  चांदा फोर्ट ते गोंदिया रेल्वे मार्ग हा वन्यजीवांसाठी धोकादायक ठरत आहे. 2 दिवसांपूर्वी रेल्वेच्या धडकेत एका तीन महिन्यांच्या वाघाच्या बछड्याचा मृत्यू झाल्याने हा मुद्दा पून्हा एकदा चर्चेला आला आहे.2008 ते 2023 पर्यंत एकूण 6 वाघांचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाला.त्यामुळे याबाबत उपाययोजना करण्यासाठी वनविभागाने रेल्वे विभागाकडे वन्यप्राण्यांच्या मृत्यूचा अहवाल पाठविला असून वन्यजीव रक्षणाससाठी उपाययोजना सुचविल्या आहेत.याबाबत रेल्वे प्रशासनाने अनुकूलता दाखविल्याने येत्या काळात रेल्वेच्या धडकेने होणारे वन्यजीव मृत्यू थांबण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

     

    चंद्रपूर जिल्हा हा घनदाट जंगलाने वेढलेला आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक जंगल असलेला हा जिल्हा आहे. चंद्रपूरच्या बाबपेठला चांदा फोर्ट रेल्वे स्टेशन आहे. येथून नागभीड ते गोंदिया रेल्वे मार्ग आहे. हा मार्ग चंद्रपूर, मूल, सिंदेवाही, नागभीड तालुक्याला जोडतो. या रेल्वे मार्गाच्या दुतर्फा घनदाट जंगल आहे. येथून वन्यजीवांचा मुक्तसंचार आहे. वाघ, बिबट, हरण, रानगवा, रानडुक्कर आदी वन्यजीवांचा यात समावेश आहे. रेल्वे मार्ग ओलांडत असताना अनेकदा रेल्वेच्या धडकेत वन्यजीवांचा मृत्यू होतो, हा एक गंभीर विषय आहे.

    पाच वर्षांत 6 वाघ 2 बिबट्यांचा मृत्यू
    ============

    2018 पासून 2023 पर्यंत चंद्रपूर येथील रेल्वे मार्गावरील अपघातात तब्बल 6 वाघ आणि 2 बिबट्यांचा मृत्यू झाला. यात चंद्रपूर वनवृतातील 3 तर वन विकास महामंडळाच्या क्षेत्रातील 3 वाघांचा समावेश आहे.नोव्हेंबर 2018 मध्ये लोहाराच्या जंगलात रस्ता ओलांडत असताना तब्बल तीन वाघांच्या बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर वाघीण देखील जखमी झाली. यानंतर 10 ऑगस्ट 2022 ला राजुरा तालुक्यातील चनाखा येथे रेल्वेच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू झाला, 21 ऑक्टोबर 2022 ला राजुरा तालुक्यातील चूनाळा मार्गावर अपघातात वाघाचा मृत्यू झाला, 27 नोव्हेंबर 2023 ला नागभीड बाळापूर रेल्वे मार्गावर एक तीन महिन्याच्या वाघाचा मृत्यू झाला. तर 8 ऑक्टोबर 2019 मध्ये सावली चिखली मार्गावर एका बिबट्याचा मृत्यू झाला तर 7 मार्च 2023 ला जीवंत विद्युत तारांच्या संपर्कात आल्याने बिबट्याचा मृत्यू झाला होता.

     

    वनविभागाने सुचविल्या उपाययोजना
    =============
    वन्यजीवांच्या सुरक्षित संचारासाठी वनविभागाने काही पर्यायी सूचना दिल्या आहेत. ज्या ठिकाणी खुरटे जंगल आहे त्या रेल्वे रुळाच्या बाजूने सुरक्षा जाळी, लावण्यात यावे, प्राण्यांना येण्याजाण्यासाठी भूमिगत मार्ग काढण्यात यावे, रेल्वे रुळाच्या बाजूला निर्माण झालेले खड्डे बुजविण्यात यावे जेणेकरून तिथे पाणी पिण्यासाठी वन्यजीव फिरकणार नाही, वळणरस्त्यावर रेल्वेची गती कमी करणे आदी उपाय योजना सुचविल्या आहेत.

     

    रेल्वे विभागाने केले दुर्लक्ष
    =============
    2018 मध्ये वनविकास महामंडळाच्या क्षेत्रातील वाघाच्या तीन बछड्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर वनविभाग आणि रेल्वे विभागाची संयुक्त बैठक झाली. यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या सर्व उपाययोजना सांगितल्या मात्र तेव्हा रेल्वे विभागाने याकडे दुर्लक्ष केले.

     

    आता रेल्वे विभाग सकारात्मक
    ===============
    मंगळवारी सकाळी एका वाघाच्या बछड्याचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याचे समोर आले. यानंतर चंद्रपूर वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क केला असून रेल्वे मार्गावर झालेल्या अपघातात किती वाघ आणि बिबट्यांचा मृत्यू झाला याचा अहवाल देण्यात आला. याबाबत आता रेल्वे विभाग सकारात्मक असून वरीष्ठ पातळीवर लवकरच याबाबत तोडगा निघण्याची शक्यता आहे.