Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • गोंडपीपरीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाची राज्यात चर्चा

    गोंडपीपरीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाची राज्यात चर्चा

    News34 chandrapur

    चंद्रपूर : ज्या जन्मदात्यांनी कठीण परिश्रम घेऊन मुलांना वाढवले. त्यांना काय हवं, काय नको याचे लाड पुरवले. त्यांना योग्य शिक्षण दिले आणि त्याच शिक्षणाच्या भरवशावर दोन्ही मुले शासकीय सेवेत लागली. मात्र जेव्हा वयोवृद्ध पालकांचा सांभाळ करण्याची वेळ आली तेव्हा मात्र या निष्ठुर मुलांनी पाठ फिरवली. हे प्रकरण उपविभागीय अधिकारी यांच्या पर्यंत पोचले आणि त्यांनी या मुलांना दणका दिला. या दोन्ही मुलांना आपल्या आईवडीलांचा निर्वाह खर्च उचलण्याचा आदेश त्यांनी दिला आहे.

    मेघराज माधव पिंपळशेंडे (७१) आणि त्यांच्या पत्नी हे पोंभुर्णा येथे राहतात. त्यांची दोन मुले आहेत. सत्यपाल पिंपळशेंडे आणि सचिन पिंपळशेंडे अशी त्यांची नावे आहेत. हे दोघेही शासकीय सेवेत रुजू आहेत. या वयात या वयोवृद्ध दाम्पत्याची विसावा घेण्याची नातवंडांसोबत मज्जा करण्याची वेळ. मात्र, यांपैकी दोन्ही मुलांनी त्यांच्या कुठल्याही अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत. उलट त्यांना पालकच नको आहेत. त्यांनी आपल्या पालकांचा सांभाळ करण्यास स्पष्ट नकार दिला.

     

    पिंपळ शेंडे या वयोवृद्ध दांपत्याकडे उदरनिर्वाहाचे कुठलेही साधन नाही. यापूर्वीची जी संपत्ती त्यांच्याकडे होती त्यांची वाटणी देखील त्यांनी मुलांमध्ये केली. त्याच्यामुळे उदरनिर्वाह कसा करायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता. अखेर हतबल झालेल्या दांपत्याने उपविभागीय कार्यालयात दाद मागितली. त्यांनी आई- वडिलांचे व ज्येष्ठ नागरिक निर्वाह व कल्याण अधिनियमानुसार निर्वाह भत्ता मिळण्याबाबत गोंडपिपरी- पोंभुर्णाचे उपविभागीय अधिकारी बालाजी शेवाळे यांच्याकडे मुलगा सत्यपाल पिंपळशेंडे, सचिन पिंपळशेंडे यांच्याविरोधात अर्ज दाखल केला. त्यांची ही दोन्ही मुले शासकीय नोकरीवर असून, सांभाळ करत नसल्याने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे मेघराज यांनी धाव घेतली.

     

    उपविभागीय अधिकारी बालाजी शेवाळे यांनी याची गंभीर दखल घेतली. तक्रारीवरून त्यांनी सर्व कागदपत्रांची तपासणी केली. चौकशीअंती उपविभागीय अधिकारी बालाजी शेवाळे यांनी दोन्ही मुलांना ज्येष्ठ आई- वडिलांना प्रत्येकी पाच हजार रुपये प्रतिमाह निर्वाह भत्ता देण्याचा आदेश पारित केला. त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून, नोकरदार मुलांनाही चांगलीच चपराक बसली आहे.

     

    पीडित पालकांना पूढे येण्याचे आवाहन

    उपविभागीय अधिकारी या पदाची सूत्रे हातीच घेताच बालाजी शेवाळे यांनी अनेक उपक्रम राबवले. आपल्या परिसरात चाललेल्या वाळूच्या तस्करीवर आळा घालण्यासाठी देखील त्यांनी आदेश काढला होता. अशा पद्धतीची वाळूची तस्करी होत असल्यास केवळ दंडच नव्हे तर फौजदारी कारवाई करण्याचे देखील त्यांनी निर्देश दिले होते. त्यामुळे या परिसरातील वाळू तस्करी चाप बसला. हे प्रकरण आले असता त्यांनी याची तात्काळ दखल घेत योग्य निर्णय दिला आणि पीडित पालकांना न्याय मिळवून दिला. सोबतच त्यांनी आवाहन देखील केले आहे अशा पालकांचा सांभाळ करण्यास मुलं नकार देत असल्यास त्याने उपविभागीय कार्यालयात दाद मागण्याचे आवाहन देखील शेवाळे यांनी केले आहे

     

    नियम काय सांगतो

    आई- वडिलांचे व ज्येष्ठ नागरिक यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी जर मूळ नकार देत असतील तर
    निर्वाह व कल्याण अधिनियम २००७ कलम ५ पोट कलम (१) नुसार निर्वाह भत्ता मिळण्यासंदर्भात उपविभागीय कार्यालयात दाद मागता येते. यात तथ्य आढळल्यास अर्जदाराला प्रतिमाह भत्ता देण्याचा आदेश दिला जातो. तसेच आदेशाचे पालन न केल्यास एक महिन्याच्या कारावासाची तरतूद कायद्यात आहे.

  • चंद्रपुरातील “कैलास” ने जिल्ह्यातील “पर्वतावर” सुरू केला कोंबडा बाजार

    चंद्रपुरातील “कैलास” ने जिल्ह्यातील “पर्वतावर” सुरू केला कोंबडा बाजार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – जिल्ह्यातील अवैध धंदे आजही छुप्या पध्दतीने सर्रासपणे सुरू आहे, सुगंधित तंबाखू, सट्टा, कोळसा चोरी असो मात्र आता चंद्रपुरातील “कैलास” ने चक्क जिल्ह्यातील “पर्वतावर” कोंबडा बाजार सुरू केल्याची खमंग चर्चा सुरू झाली आहे.

     

    2 वर्षांपूर्वी चंद्रपुरात तब्बल 8 ते 9 कोंबडा बाजार सुरू होते, यामध्ये जुगाराचे खेळ सर्रास बघायला मिळत असे, मात्र पत्रकारांच्या सतत वृत्ताने पोलिसांना ते कोंबडा बाजार बंद करावे लागले होते, मात्र आता चंद्रपुरातील ” सट्टा किंग” “कैलास” ने थेट जिवती येथील पर्वत गाठत कोंबडा बाजार सुरू केला.

     

    कुठे भरतो जुगारांचा मेळा?

     

    चंद्रपूर जिल्ह्यातील पर्वतांच्या रांगा असलेलं तेलंगणा व महाराष्ट्र सीमेला जोडणारे जिवती तालुक्यातील मौजा भारी समोर बाबापूर याठिकाणी हा बाजार भरतो.

     

    याठिकाणी जायचं कसं?

     

    राजुरा वरून वाकडी गावी आलं की उजव्या दिशेवरून सरळ 8 किलोमीटर अंतर गाठून भारी येथे जायचं, त्याठिकाणी कैलास आपल्या माणसांसोबत आपलं स्वागत करण्यास उत्सुक असतो.

     

    कोण आहे कैलास?

     

    चंद्रपूर शहरात राहणारा कैलास मागील अनेक वर्षांपासून सट्टा पट्टी चालवितो, पोलिसांना याबाबत जाणीव आहे, 2 वर्षांपूर्वी त्याने दुर्गापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठा पेंडाल टाकत सट्टा व जुगार सुरू केला होता, मात्र News34 च्या बातमीनंतर त्याचा जुगार दुर्गापुरातून हटला, आता त्याने थेट जिवती तालुक्यात महाराष्ट्र व तेलंगणा सीमेवर कोंबडा बाजार सुरू केला आहे, कारण सीमेच्या पलीकडील नागरिक मोठ्या प्रमाणात जुगार खेळण्यासाठी त्याठिकाणी येत असतात.

     

    आधी सोशल क्लब च्या नावाने रमी क्लब तर सुरूच झाले आहे आता त्यामध्ये कोंबडा बाजाराने भर दिल्याने जुगार प्रेमींना चांगली पर्वणी मिळाली आहे.

     

    आपल्या कोंबडा बाजारात जायचं असेल तर आठवड्यातून बुधवार, शुक्रवार व रविवार हे 3 दिवसात जावे, बाकी उर्वरित दिवस “कैलास” ने सुट्ट्या घोषित केल्या आहे, कैलास सोबत चंद्रपूर व तेलंगणा येथील काही पार्टनर सोबत असल्याची माहिती आहे.

  • अमृत अर्धवट योजनेचं करायचं काय?

    अमृत अर्धवट योजनेचं करायचं काय?

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शहरातील डॉ. अंबेडकर, इंदिरानगर, भानापेठ, जलनगर, अपेक्षा नगर या प्रभागात अमृत योजनेचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. या प्रभागातील नागरिकांना पाण्यासाठी महागडे टँकर आणावे लागत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने महानगरपालिकेला तीन महिन्यात योजनेचे काम पूर्ण करण्याचा अल्टीमेटम दिला आहे. अन्यथा प्रभागातील नागरिकांना घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आम आदमी पार्टीने दिला आहे.

     

    आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्या नेतृत्वाखाली आज महानगरपालिकेत निवेदन देण्यात आले. यावेळी युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, महानगर संघटन मंत्री संतोष बोपचे, महानगर महासचिव तबससूम शेख, महानगर सह संघटन मंत्री सिकंदर सागोरे, महानगर ओबीसी आघाडी अध्यक्ष प्रशांत धानोरकर, महानगर कोषाध्यक्ष स्वप्नील घाघरगुंडे, मंगला मुके, बबन काळे, योगेश्वर काळे, श्याम रहांगडाले, विजू आत्राम, चंद्रसेन पटले, विवेक दापेवार, लीला शेंडे, नागसेन लाभाने इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

     

    निवेदनात म्हटले आहे की, अमृत योजनेचे काम 2023 च्या ऑक्टोबर महिन्यात पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, अद्यापही काम पूर्ण झालेले नाही. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

     

    निवेदनात मागणी करण्यात आली आहे की, तीन महिन्यात योजनेचे काम पूर्ण करण्यात यावे. ज्या ठिकाणी पाईप लाईन दिलेली आहे अशा सर्व ठिकाणी तात्काळ पाणीपुरवठा सुरळीत करावा. अन्यथा प्रभागातील नागरिकांना घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल.

  • वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा – बीआरएस नेते भूषण फुसे

    वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा – बीआरएस नेते भूषण फुसे

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी BRS पक्षाचे नेते भूषण फुसे यांच्या नेतृत्वात 12 डिसेंबर ला जिवती ते विधानभवन नागपूर ला बैलबंडी मोर्चा काढण्यात येणार आहे, याबाबत 8 डिसेंम्बर ला आयोजित पत्रकार परिषदेत फुसे यांनी सविस्तर माहिती दिली.

     

    चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी आज अडचणीत आला आहे, आज असंख्य समस्यांना शेतकरी सामोरे जात आहे, मात्र त्यांना न्याय देण्याऐवजी शासन त्यांच्यावर अन्याय करीत आहे, या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व सरकारला जागे करण्यासाठी भूषण फुसे BRS पक्षाच्या माध्यमातून हा मोर्चा काढत आहे.

     

    शेतकऱ्यांच्या मागण्या काय?

     

    चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट शेतजमिनीचे पट्टे देण्यात यावे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचे पॅकेज तात्काळ घोषित करून देण्यात यावे, कर्ज माफ करीत सातबारा कोरा करावा, शेतीच्या पिकांचे नुकसान करणाऱ्या रान डुक्करांची नसबंदी करण्यात यावी, धुमाकूळ घालणाऱ्या वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा, स्थानिक भूमिपुत्र बेरोजगारांना उद्योगधंद्यात रोजगार देण्यात यावा, चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्यात यावे, प्रकल्पग्रस्तांना न्याय द्यावा, राजुरा व गोंडपीपरी तालुक्यात सुरू असलेले जुगाराचा अड्डे बंद करावे अश्या विविध मागण्यांसाठी बैलबंडी मोर्चा जिवती तालुक्यातून थेट विधानभवनावर 16 डिसेंम्बरला धडकणार आहे.

     

    मोर्च्यांचे नियोजन काय?

     

    12 डिसेंम्बरला सकाळी 9 वाजता शेतकरी आपल्या बैलबंडी सह जिवती येथून प्रारंभ करतील त्यानंतर गडचांदूर, राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर, भद्रावती, वरोरा, खांबाडा, जाम, बुट्टीबोरी नंतर 16 डिसेंबर ला मोर्चा विधानभवनावर धडकणार.

     

    वनमंत्र्यांनी राजीनामा द्यावा – भूषण फुसे

     

    माननीय नागपूर उच्च न्यायालयाने रानटी डुक्कर मारण्याच्या जीआर विरुद्ध निकाल दिला. या निकाला विरुद्ध वनमंत्री साहेब सर्वोच्च न्यायालयात का नाही गेले.

    रान डुकरांमुळे उभ्या शेतीचे नुकसान होत आहे, याबद्दल वनमंत्री काही ठोस भूमिका का घेत नाही? जिल्ह्यातील वाघांची संख्या वाढत आहे त्याला नियंत्रण करण्यात व वन प्राण्यांचे नियोजन करण्यात वनमंत्री अपयशी ठरले आहेत. देशाचे पंतप्रधान जर आफ्रिकेतून चिता आणू शकतात तर चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांचे स्थलांतरण व पुनर्वसन का होऊ शकत नाही. जिल्ह्यातील निर्दोष, निष्पा शेतकऱ्यांचा, गुराख्यांचा व नागरिकांचा जीव जातोय याबद्दल काहीच वाटत नाही का? वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे सर्व प्रश्न हाताळण्यास अपयशी ठरल्याने त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भूषण फुसे यांनी केली आहे.

  • गोंडपीपरी तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला वनविभागाने केले जेरबंद

    गोंडपीपरी तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला वनविभागाने केले जेरबंद

    News34 chandrapur

    गोंडपीपरी – गोंडपिपरी तालुक्यातील वेजगावात मागील सात दिवसांपासून दहशत माजविणाऱ्या बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले असून आज पहाटे त्याला सापळा लाऊन पकडल्याची माहिती आहे.

     

    गेल्या आठवड्याभरापासून बिबट्याने गावात येत गावातील शेतकऱ्यांचे पाळीव जनावरांना आपले भक्ष करण्याचा सपाटा लावला होता..यामुळे गावातील नागरिक चांगलेच भयभीत होते.

     

    यामुळे भीतीपोटी शेतात जाणे सुद्धा बंद केले. मात्र, वनविभागाने घटनेची गंभीरता लक्षात घेता रात्रीची गस्त वाढवीत बिबट्याच्या गावात ये-जा करण्याच्या मार्गावर ट्रॅप कॅमेरा व पिंजरा लावण्यात आला होता आणि शेवटी आज पहाटे बिबट्याला पकडण्यात यश आले असून गावकऱ्यांनी सुटकेचा नी:श्वास सोडला.

    मात्र वेजगावं हा गाव जंगलालगत असल्यामुळे या घटनेत अधिक वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे..

  • हिवाळी अधिवेशन 2023 दरम्यान ‘एक दिवस एक आंदोलन’ दुसऱ्या दिवशी किल्ला संवर्धनाच्या मागण्यासाठी

    हिवाळी अधिवेशन 2023 दरम्यान ‘एक दिवस एक आंदोलन’ दुसऱ्या दिवशी किल्ला संवर्धनाच्या मागण्यासाठी

    News34 chandrapur

    चंद्रपूर : मागील अनेक वर्षात इको-प्रो च्या वेळोवेळी करण्यात आलेले आंदोलन व अद्याप प्रलंबित असलेल्या चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील मागण्या संदर्भात आंदोलन/सत्याग्रह करीत शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच जनसामान्यांचे समर्थन मिळविण्यासाठी आणि व्यापक जनजागृती व्हावी #हिवाळीअधिवेशन2023 #एकदिवसएकआंदोलन अश्या पद्धतीने संपूर्ण अधिवेशन काळात लक्षवेधी आंदोलनाची शृंखला सुरू करण्यात आलेली आहे.

     

    या शृंखलेतील दुसऱ्या दिवशी, आज सकाळी 7:30 ते 10:00 दरम्यान प्रतिकात्मक आंदोलन करीत किल्ला संवर्धन विषयक मागण्याकडे शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी इको-प्रोच्या कार्यकर्त्यांनी किल्ला भिंतीवर बसून बैठा सत्याग्रह केला. यावेळी इको-प्रो तर्फे सुरू असलेले किल्ला पर्यटन-हेरिटेज वॉक मार्गातील अडथळे दूर करीत पर्यटकांना सुरक्षित जाता यावे म्हणून परकोट भिंतीची दोन ठिकाणी दुरुस्ती त्वरित करावी, किल्ला भिंत व पुरातत्व विभागाने नव्याने बांधलेली संरक्षण भिंतिचे बांधकाम पूर्ण करण्यास त्या दरम्यानचे अतिक्रमण मुक्त करण्यास पंतप्रधान/मुख्यमंत्री आवास योजनेत घरे देण्यात यावे, किल्ला परकोट पासून शंभर मीटर पर्यंत बांधकामाची अट असली तरी बांधकाम होत असून यावर कुठलेही नियंत्रण नाही, नाहक नागरिकांना बांधकाम करताना त्रास होत आहे, यामुळे ऐतिहासिक स्मारक विषयी नकारात्मक भावना निर्माण होत असते, त्यावर उपाय म्हणून ही किल्ला परकोट भिंतीपासून बांधकाम ची 100 मीटर अट रद्द करून 3 ते 5 मीटर करण्याच्या मागण्या करण्यात आल्या.

     

    हिवाळी अधिवेशन दरम्यान इको-प्रो कडून करण्यात येत असलेली आंदोलन/सत्याग्रह पुढील काळात व्यापक व तीव्र असे आंदोलन करण्याचे नियोजीत आहे. आणि महत्वाचे म्हणजे संस्थेचे “आपला वारसा आपणच जपुया” या मुख्य उद्देशपुर्ती करिता असून आपला नैसर्गिक वारसा (जल, जंगल, जमीन, नदी, तलाव, वन्यजीव) व ऐतिहासिक वारसा (गड, किल्ले, मंदिरे, स्मारक व समाध्या) यासोबत शेतकरी, गावकरी, सर्वसामान्य नागरिक यांचे हिताचे प्रश्न करिता इको-प्रो चा लढा सुरू असून प्रत्येकांनी स्वतःची लढाई स्वतः लढावी, त्यांना प्रेरणा, स्फूर्ती मिळावी म्हणून सातत्यपूर्ण संयमाने लढे सुरू ठेवले पाहिजे म्हणून इको-प्रो चा लोकजागृतीकरिता लोकलढा सुरू आहे.

     

    चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक गोंडकालीन वारसा असलेला चांदागड किल्ला-परकोट जे इको-प्रो ने सतत 1020 दिवस स्वच्छता करीत किल्ला पर्यटन-हेरिटेज वॉक सुरू करीत स्थानिक पर्यटनाला एक दिशा दिली आहे. मात्र पुरातत्व विभाग व राज्य शासन कडून तसेच जिल्हा प्रशासन कडून स्थानिक पर्यटन विकास करिता अद्याप हवे तसे लक्ष दिले गेलेले नाही. एखादी संस्था जेव्हा निस्वार्थ भावनेतून व लोकसहभागातून काही करीत असेल तर त्यास आवश्यक ते सहकार्य करणे गरजेचे ठरते. या सात वर्षाच्या सातत्यपूर्ण कार्यात सतत पाठपुरावा करीत असलेल्या मागण्या संदर्भात आज किल्ला भिंतीवर बसून ‘बैठा सत्याग्रह’ तर श्रमदान करीत स्वच्छता सत्याग्रह करण्यात आले.

     

    या आंदोलनावेळी इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे, पुरातत्व विभाग प्रमुख रवींद्र गुरनुले यांच्या नेतृत्वात अब्दुल जावेद, अभय अमृतकर, ओमजी वर्मा, जयेश बैनलवार, सुनील पाटील, मनीष गावंडे, आकाश घोडमारे, राजू काहिलकर, कुणाल देवगिरकर, विजयहेडाऊ, स्वप्नील मेश्राम, सचिन धोतरे, प्रकाश निर्वाण, भूषण, चंदू आदी संस्थेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

  • Preventive Cardiologist तज्ज्ञ डॉ. सरबेरे यांच्या संशोधनाची जागतिक तज्ञांकडून दखल

    Preventive Cardiologist तज्ज्ञ डॉ. सरबेरे यांच्या संशोधनाची जागतिक तज्ञांकडून दखल

    News34 chandrapur

    चंद्रपूर : येथील Preventive Cardiologist तज्ञ डॉ. लक्ष्मीनारायण सरबेरे यांनी हृदयरोगावर आयुर्वेद उपचार पद्धती सक्षम असल्याचा संशोधनपर अहवाल यांनी सादर केला असून, दुबई येथे आयोजित तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत या संशोधनाची दखल घेतल्याची माहिती त्यांनी स्वत: चंद्रपुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

     

    ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत दुबई येथे जागतिक हृदय परिषद पार पडली. या परिषदेत डॉ. सरबेरे यांनी सादर केेलेला आयुर्वेदाने हृदयरोग बरा होऊ शकतो आणि विनाशस्त्रक्रिया उच्च गुणवत्तापूर्ण जीवन जगू शकतो, या आशयाचा अहवाल आपण सादर केला होता, असे डॉ. सरबेरे यांनी सांगितले.

     

    हा अहवाल संपूर्ण जगातील हृदयरुग्णांना आशेचा किरण दाखविणारा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. भारतात हृदयरोगाचे वाढते प्रमाण आणि हृदयरोगामुळे होणारे मृत्यू दर रोखण्यासाठी आयुर्वेद उपचार पद्धती अत्यंत उपयोगी सिद्ध होत असल्याचे त्यानी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेला माधवबागच्या संचालिका  डॉ. प्रीती सरबेरे यांच्यासह माधवबागचे सामाजिक आरोग्य अधिकारी संजय ठेकाळे उपस्थित होते.

  • चंद्रपुरात पसरली धुक्याची चादर

    चंद्रपुरात पसरली धुक्याची चादर

    News34 chandrapur

    चंद्रपूर – पहाटेपासून आज चंद्रपूर जिल्ह्यात धुक्याची चादर पसरली आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे वातावरणात बदल पाहायला मिळत आहे. ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस तर आज सकाळी मोठ्या प्रमाणात धुके पडले आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना अडचण निर्माण होत असून तापमानात घट झाली आहे.

    सकाळी बाहेर फिरायला पडलेले नागरिक सुद्धा आजचे वातावरण बघून संभ्रमात पडले, कधी पाऊस तर कधी पावसात थंडी असे बदल नागरिक आता रोज बघत आहे, मात्र अचानक घर, मार्ग, उद्यान हे आज धुक्याच्या चादरेखाली लपल्याने आता नेमका वातावरणात काय बदल होणार याबाबत नागरिकांची आज चर्चा रंगली होती.

     

    यावर चंद्रपुरातील पर्यावरण तज्ञ सुरेश चोपणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली…

     

    अवकाळी पाऊस व वातावरणात झालेला बदल यामुळे चंद्रपुरात धुक्याची चादर पसरली, हवेतील बाष्प मोठ्या प्रमाणात असल्याने आज चंद्रपुरात हा बदल झाला असून हे चित्र पुन्हा 2 दिवस दिसणार.

    सध्या दक्षिण भारतात वादळी पाऊस वाढल्याने राज्यात थंडीचे प्रमाण वाढण्याचे हे संकेत आहे अशी प्रतिक्रिया पर्यावरण तज्ञ सुरेश चोपणे यांनी news34 सोबत बोलताना दिली.

  • चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा गुड गव्हर्नन्स पुरस्काराने होणार सन्मान

    चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा गुड गव्हर्नन्स पुरस्काराने होणार सन्मान

    News34 chandrapur

    चंद्रपूर – दि सीएसआर जर्नलच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा सीएसआर जर्नल एक्सलन्स अवॉर्ड राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना प्रदान केला जाणार आहे. या पुरस्काराचे हे सहावे वर्ष आहे. ना. सुधीर मुनगंटीवार यांना ‘दि सीएसआर जर्नल चॅम्पीयन ऑफ गुड गव्हर्नन्स’ हा पुरस्कार सुशासन (सर्वोत्तम प्रशासन) राखण्यात यशस्वी ठरत असल्याबद्दल दिला जात आहे.

     

    मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज येथे येत्या शनिवार, दि. 9 डिसेंबरला देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री. मुनगंटीवार यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. प्रशासनाला विश्वासात घेऊन प्रत्येक शासकीय योजना, अभियान आणि उपक्रमांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचविण्यात श्री. मुनगंटीवार यांचा विशेष हातखंडा आहे. राज्य सरकारची कल्याणकारी योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यापासून ते गरजूंना शासनाकडून न्याय मिळवून देईपर्यंत प्रत्येक बाबतीत ते सातत्याने पाठपुरावा करीत असतात. त्यामुळेच दि सीएसआर जर्नलच्या वतीने उत्तम प्रशासनासाठी दिल्या जाणाऱ्या विशेष पुरस्कारासाठी श्री. मुनगंटीवार यांची निवड करण्यात आली आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. प्रसिद्ध कवी कुमार विश्वास, क्रिकेटपटू युवराज सिंह आणि मिथाली राज, अभिनेत्री भूमी पेडणेकर आदींना या विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

     

    महाराष्ट्राच्या वन,सांस्कृतिक आणि मत्स्यव्यवसाय या तीनही खात्यांचा माध्यमातून ना.सुधीर मुनगंटीवार यांनी ऐतिहासिक अन् धडाडीचे निर्णय घेतले आहे . मग अफजलखानाच्या कबरीचे अतिक्रमण हटविणे असो वाघनखे आणण्याचा केलेला लंडन येथील सामंजस्य करार,रायगडावर भव्यदिव्य केलेला शिवराज्यभिषेक सोहळा तसेच‘हॅलो’ऐवजी ‘वंदे मातरम्’, आपल्या देशातील संसदेला आणि अयोध्येतील श्रीराम मंदिराला चंद्रपूर – गडचिरोली जिल्ह्यातून काष्ठ पाठविण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार,’जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताला राज्यगिताचा दर्जा आणि आता घेण्यात येणाऱ्या तालुकास्तरावर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा अश्या निर्णयामुळे ना. सुधीर मुनगंटीवार हे चॅम्पीयन ऑफ गुड गव्हर्नन्स या पुढाकाराचे खरे मानकरी ठरतात अशी भावना व्यक्त होत आहे.

     

    चंद्रपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

    चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना यापूर्वीही अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. आता आणखी एका प्रतिष्ठेच्या पुरस्काराची भर पडल्यामुळे चंद्रपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे, अशी ऊत्स्फूर्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

    कर्तृत्वाचा गौरव

    ना. श्री. मुनगंटीवार यांना 1999 मध्ये महाराष्ट्र विधानसभेचे सर्वश्रेष्ठ वक्ता म्हणून गौरविण्यात आले होते. यासोबतच दि नॅशनल फेडरेशन ऑफ द ब्लाईंडचा मेमोरियल अवॉर्ड आफ्टरनून व्हॉईसच्या वतीने बेस्ट परफॉर्मिंग पॉलिटिशियन, लोकमत आणि ज्युनियर चेंबर इंटरनॅशनलच्या वतीने ‘मॅन अॉफ द इयर’,महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रातील प्रगतीसाठी इंडिया टूडे सारख्या प्रतिष्ठीत समूहाने दोन वेळा पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. मॅग्ना प्रकाशन संस्था व होथूर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘सोसायटी एक्सलेन्स’ दिव्यांगांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल लेफ्टनंट जी. एल. नर्डेकर स्मृती पुरस्कार, वृक्षलागवडीच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल छाया दीक्षित फाउंडेशन चा विशेष पुरस्कार ,सामाजिक व राजकीय क्षेत्रातील दीर्घ सेवेसाठी कर्मवीर मा. सा. कन्नमवार स्मृती पुरस्कार, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज द्वारा व्यापार मित्र पुरस्कार अशा विशेष पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

  • ओबीसी समाजाच्या न्यायिक मागण्यांसाठी दोघांचे अन्नत्याग आंदोलन सुरू

    ओबीसी समाजाच्या न्यायिक मागण्यांसाठी दोघांचे अन्नत्याग आंदोलन सुरू

    News34 chandrapur

    चिमूर – ओबीसींच्या न्याय मागण्या अद्यापही मान्य न झाल्याने राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने चिमूर क्रांतीभूमीतून 7 दिसेंबर पासून राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे चिमूर तालुका अध्यक्ष अक्षय लांजेवार व अजित सुकारे यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू झाले आहे.

     

    चंद्रपूर येथे ओबीसींच्या मागन्यासाठी रविंद्र टोंगे. विजय बल्की आणि प्रेमानंद जोगी यांनी 11 सप्टेंबर पासून आंदोलन सुरू केले होते. दरम्यान ओबीसींच्या शिष्टमंडलासोबत शासनाच्या झालेल्या चर्चेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 सप्टेंबरला चंद्रपुरात येऊन अन्नत्याग आंदोलन आश्वासन देऊन सोडविले होते. परंतु ओबीसींच्या न्याय मागण्या अद्यापही मान्य झाल्या नाही. त्यामुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने चिमूर क्रांतीभूमीतून 7 डिसेंबर पासून राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे तालुका अध्यक्ष अक्षय लांजेवार व अजित सुकारे यांचे आंदोलन सुरू झाले आहे.

     

    चिमूर नगरीचे आराध्य दैवत श्रीहरी बालाजी महाराज यांचे दर्शन घेऊन रलीच्या माध्यमातून अन्नत्याग आंदोलक अक्षय लांजेवार व अजित सुकारे यांना तहसील कार्यालयच्या बाजूला उपोषण मंडपात उपोषणाला बसविण्यात आले.

     

    यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय महासचिव सचिन राजूरकर, राज्य उपाध्यक्ष डॉ सतीश वारजूकर, ओबीसी कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शाम लेडे, राष्ट्रिय ओबीसी प्रदेश कार्याध्यक्ष दिनेश चोखारे, दिनेश कष्टी. माधव डूकरे, अशोक सोनटकके, मारोती अतकरें, चिमूर चे तालुकाध्यक्ष उपस्थित होते