Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • शेतकऱ्यांना भविष्यात सेंद्रिय शेतीच वरदान ठरणार आहे – व्हिवा मार्ट संजय येगारे

    शेतकऱ्यांना भविष्यात सेंद्रिय शेतीच वरदान ठरणार आहे – व्हिवा मार्ट संजय येगारे

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मुल – आजच्या प्रगतशील यांत्रिक युगामध्ये प्रत्येक क्षेत्रात प्रगती झाली व पुढेही होत राहील.परंतु मानवाचा अन्नदाता, पालनकर्ता असणारा शेतकरी अनेक वर्षापासून धडपडतो याच कारण आणूनही कृषी क्षेत्राची प्रगती झाली नाही. पूर्वीपेक्षा शेती तोट्यात चालली आहे. म्हणून शेतकरी आत्महत्या वाढल्या. यासाठीच नॅनो टेक्नॉलॉजी एक अभिनव प्रयोग विवा मार्ट इंडिया प्रायव्हेट ली. च्या माध्यमातून विकसित केला असून विषमुक्त शेती – रोगमुक्त भारत ही संकल्पना शेतकऱ्यांना अतिशय उपयुक्त ठरेल व शेतीचे सोबतच मानवाचे आरोग्य दीर्घकाळ टिकेल.

     

    यासाठी आपल्या मुल नगरात प्रथमच किसान सेंद्रिय शेती दुकान खास शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आला असून विषमुक्त जीवन,रोगमुक्त जीवन जगायचे असेल तर रासायनिक शेती सोडून सेंद्रिय शेती करावे विष मुक्त शेती,रोग मुक्त भारत करावे असे अमूल्य मार्गदर्शन व्हिवा मार्ट शेती माहिती तंत्रज्ञ संजय येगारे परभणी यांनी केले.

     

    मुल येथील प्रगतशील अनुभवी उत्कृष्ठ शेतकरी श्री.भगवान ढोरे यांनी सर्वात प्रथम मुल येथे ताडाळा रोड येथे किसान सेंद्रिय शेती दुकान सुरु केले असून याचे उद्घघाटन मुल तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार गुरु गुरनूले यांचे शुभहस्ते करण्यात आले. उद्घघाटन प्रसंगी पूर्वीच्या पालेभाज्या ,भाजीपाला आणि धान्य शेणखताच्या आधारावर पौष्टिक ताकदपूर्न होते परंतु आता अनेक रोगांना निमंत्रण देणारे धान्य व भाजीपाला खात आहोत.म्हणून आपले आयुष्य कमी झाले. करीता यापुढे रासायनिक खतांचा वापर न करता १०० टक्के ऑर्गनिक असलेला प्रोडक्ट वीवा किसान डेव्हलपरचा वापर करा असे शेतकऱ्यांना सांगितले.

     

    याप्रसंगी विदर्भ प्रमुख प्रतीक्षा कुंभारे, अजय आंबटकर, नंदकिशोर भांडेकर, माजी नगराध्यक्ष अरविंद बोकारे, डेव्हिड खोब्रागडे, गंगाधर बुटले, प्रगत शेतकरी गजावंत निकोडे, कैलास डोंगरे,बबन निमगडे,विनोद कुळमेथे, सुरेश लाडसे, सचिन तोडसाम, अजय चावके, यांचेसह अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन मंगेश भांडेकर यांनी केले.

  • भावी अधिकाऱ्यांना महाराष्ट्रात बस सेवा मोफत द्या – आमदार प्रतिभा धानोरकर

    भावी अधिकाऱ्यांना महाराष्ट्रात बस सेवा मोफत द्या – आमदार प्रतिभा धानोरकर

    News34 chandrapur

    चंद्रपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधुन राज्य शासनाने 75 हजार पदभरतीची प्रक्रिया सुरु करण्याचे घोषित केले होते. शासनाने परीक्षा शुल्कात देखील वाढ केली आहे. ग्रामीण भागातून मोठ्या शहरात जाण्याकरिता अधिकच्या आर्थिक भुर्दंड भावी अधिकाऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे सरळ सेवा परीक्षेसाठी मोठ्या शहरात तरुणांना जाण्याठी मोफत बस सेवा देण्याची लोकहितकारी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनातून केली.

     

    या निवेदनात आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या की, सरळ सेवा परीक्षेसाठी राज्यातील अनेक तरुण मोठ्या शहरात जातात. या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी मोठ्या मेहनतीची आवश्यकता असते. मात्र, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या तरुणांना या परीक्षेसाठी जाण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. त्यामुळे या तरुणांना मोफत बस सेवा देण्याची मागणी त्यांनी केली.

     

    या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी असेही म्हटले की, महाराष्ट्रात कुठेही परीक्षा देण्याकरिता बस प्रवास मोफत करावा. यामुळे आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या तरुणांना मोठा दिलासा मिळेल. आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची ही मागणी स्वागतार्ह आहे. या मागणीमुळे महाराष्ट्रातील अनेक तरुणांना मोठा फायदा होईल.

  • चंद्रपूर पोलिसांना या चोराने दिले आव्हान

    चंद्रपूर पोलिसांना या चोराने दिले आव्हान

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर शहरात मोबाईल हिसकविण्याच्या घटनेत आता दिवसेंदिवस वाढ होत असून कधी चालता बोलता तर कधी वाहनावरून जात असताना मोबाईल हिसकविण्याच्या घटना वाढत आहे, मात्र 10 डिसेंबर ला निवांत बसलेल्या एका व्यक्तीचा मोबाईल हिसकविण्यात आला, या घटनेमुळे चोराने थेट चंद्रपूर पोलिसांना आव्हान केले असे चित्र निर्माण झाले आहे.

     

    चंद्रपूर शहरातील मुख्य बस स्थानक समोरील महसूल भवन च्या खाली राकेश गोविंदवार हे रात्री 8 वाजताच्या सुमारास निवांत बसून मोबाईल वर मॅसेज चेक करीत होते, तितक्यात त्यांच्या मागे चेहऱ्याला दुपट्टा बांधलेला व्यक्ती उभा राहिला आणि संधी मिळताच गोविंदवार यांच्या हातातील मोबाईल हिसकावित तिथून पळ काढला, त्याला पकडण्याचा प्रयत्न झाला मात्र चोरांचा वेग जास्त असल्याने तो कुणाच्या हाती लागला नाही.

     

    हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे, जिल्हा न्यायालय, मुख्य बस स्थानक, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील गजबजलेल्या महसूल भवन येथे घडलेला हा प्रकार म्हणजे चोराने थेट पोलिसांना आव्हान दिल्यासारखं आहे, नागरिकांनो आपला मोबाईल आता व्यवस्थित सांभाळून ठेवा अन्यथा हा चोर तुमचा मोबाईल हिसकावीत पळ काढणार.

  • महिला कुस्ती पट्टूंच्या थरारक डावपेचांनी ब्रह्मपुरीकर मंत्रमुग्ध

    महिला कुस्ती पट्टूंच्या थरारक डावपेचांनी ब्रह्मपुरीकर मंत्रमुग्ध

    News34 chandrapur

    ब्रह्मपुरी – राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांच्या वाढदिवसाच्या शुभ पर्वावर विजय वडेट्टीवार मित्र परिवार ब्रह्मपुरी व तालुका कुस्तीगीर संघ ब्रह्मपुरी यांचे संयुक्त विद्यमाने ब्रह्मपुरी येथे दुसरी किताब महाराष्ट्र केसरी महिला कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचा दर्शनीय उद्घाटन सोहळा थाटात पार पडला. यात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून 600 हून महिला कुस्ती पटूंनी विद्यानगरी ब्रह्मपुरी गाठत आयोजित महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सहभाग नोंदविला. तीन दिवसीय आयोजित स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी एकूण 224 महासंग्राम चांगलाच रंगला. यात सहभागी स्पर्धकांनी आपला अनुभव व संपूर्ण ताकदीनिशी सामन्यात रंगत आणली. कुस्तीपटूंच्या विविध डावपेचांचा थरार उपस्थित दर्शकांनी अनुभवला. व ब्रह्मपुरीकर नागरिक मंत्रमुग्ध झाले.

     

    सकाळपासूनच आयोजकांमार्फत नियोजित वेळापत्रकानुसार कुस्ती सामन्यांच्या लढती वयोगटांनुसार घेण्यात आल्या. यात 50 किलो गटातील लढती मध्ये गौरी पाटील कोल्हापूर (विजयी)विरूद्ध इशा धोंगडे बुलढाणा, इशिता मनोहरे नागपूर(विजयी) विरूद्ध सोनी राठोड धुळे, अमृता यादव मुंबई (विजयी) विरूद्ध प्रियदर्शनी अमरावती, दुर्गा शिरसाट, संभाजीनगर (विजयी) विरूद्ध सायली यादव रत्नागिरी, नंदिनी साळुंके कोल्हापूर(विजयी) विरुद्ध प्रणाली झंजाडे भंडारा,
    ज्ञानेश्वरी पुणे (विजयी) विरुध्द प्राची सावंत सातारा
    भारतीय टेकाडे अकोला(विजयी) विरूद्ध स्नेहल पवार धाराशिव, मनीषा सेतार ठाणे (विजयी)विरूद्ध माया जाधव नाशिक

    53 किलो गटातील लढती 

    आदिती शिंदे पुणे(विजयी) विरूद्ध पल्लवी बांगळी सांगली, साक्षी इंगळे पुणे (विजयी) विरुध्द सोनाली गिरगे संभाजी नगर, रशिका राणे कल्याण(विजयी) विरूध्द स्वाती धावडे रत्नागिरी, स्वाती शिंदे कोल्हापूर (विजयी)विरुद्ध सोनम वाकडे ठाणे, किर्ती गुडघे धुळे(विजयी) विरूद्ध हैसा शिवरे ठाणे, पुनम गाडे अहमदनगर(विजयी) विरूध्द वृषाली खंडेराव बुलढाणा
    रुतुजा पवार सातारा(विजयी ) विरूद्ध अमृता भाकरे ठाणे

    55 किलो गटातील लढती 

    साक्षी शिंदे धुळे(विजयी) विरूद्ध सुरभी पाटील रायगड
    धनश्री फंड(विजयी) विरुध्द नेहा चौगुले कोल्हापूर
    साक्षी कारू नागपूर(विजयी) विरूद्ध आचल वाघमारे अमरावती, पल्लवी सुपनर सोलापूर (विजयी)विरूद्ध जयंती शाम नागपूर, स्मिता पाटील कोल्हापूर(विजयी) विरूद्ध ऐश्वर्या सणस ठाणे, प्रतिक्षा खोडकर पुणे(विजयी) विरुध्द दिक्षा तायडे पुणे बुलढाणा
    धनश्री चौधरी संभाजीनगर (विजयी)विरूद्ध उज्वला पाटेन यवतमाळ, तुलसी पाखरे वाशिम (विजयी)विरूद्ध करिश्मा चौधरी मुंबई
    57 किलो वजनगट
    अश्विनी अग्रजे बीड(विजयी) विरूद्ध प्रेरणा अकोडकर अकोला, तनू जाधव चंद्रपूर (विजयी)विरूद्ध अंकिता कोळेकर सोलापूर, सिमरण कोरी मुंबई(विजयी) विरुद्ध उर्जिता मेटके वाशिम, अलिशा कांबळी कोल्हापूर(विजयी) विरुद्ध निलम शिरसाट नाशिक,
     सेजल पाटील रायगड(विजयी) विरूद्ध प्रियंका कंची
    असे विविध वयोगटातील महिला कुस्तीपटूंचे सामने पार पडले.
    सकाळपासूनच महिला कुस्तीपटूंचे सामने बघण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. विद्यानगरी ब्रह्मपुरी शहराला सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक व क्रीडा असा चौहेरी वारसा लाभला असून तत्पूर्वी राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी विविध स्पर्धा, सांस्कृतिक महोत्सव, क्रीडा स्पर्धा, मार्गदर्शन शिबिरे ,आरोग्य शिबिरे, आणि अनेक सामाजिक कार्याचे आयोजन करत एक सच्चा जनसेवक व मनकवडा लोकप्रतिनिधी ते सहृदय नेता अशी ख्याती मतदारसंघासह संपूर्ण राज्यात मिळवली आहे.
    कुस्ती स्पर्धेत दिग्गज महिला कुस्तीपटूंचा सहभाग
    नगर जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर भाग्यश्री फंड, नाशिक येथील राष्ट्रीय ब्रांझ पदक विजेती सोनाली मंडलिक, सांगली येथील पहीली महाराष्ट्र महिला केसरी कुस्ती विजेती प्रतिक्षा बागडी, राष्ट्रीय पदक विजेती अमृता पुजारी (कोल्हापूर), रौप्यपदक विजेती संजना बागडे, खेलो इंडीया रौप्यपदक विजेती वैष्णवी कुश्यापा ह्या प्रमुख महिला पहिलवान महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत आपले कसब पणाला लावणार आहेत. तसेच इतर गटांमध्ये शिवछत्रपती पुरस्कार विजेती स्वाती शिंदे सुध्दा खेळणार आहे.
    सबज्युनिअर गटात 40 किलो ते 73 किलो पर्यंतचे वजन गटात
    92 लढती झाल्या.
    सिनीअर गटात 50 ते 72 किलो  व महिला महाराष्ट्र केसरी गटात 65 ते 76 किलो वजन गटात
    132 लढती झाल्या.
    आयोजित स्पर्धेत बंकट यादव स्पर्धा प्रमुख तांत्रिक समिती, पंचप्रमुख नवनाथ ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पंच या स्पर्धेत न्यायदानाचे काम करत आहेत.
  • जम्मू-कश्मिरविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत – हंसराज अहीर

    जम्मू-कश्मिरविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत – हंसराज अहीर

    News34 chandrapur

    चंद्रपूर/यवतमाळ- मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने जम्मू-कश्मिरला विशेष दर्जा बहाल करणारे अस्थायी 370 कलम सन 2019 मध्ये संसदेची मंजुरी प्राप्त करून हटविले होते. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरूध्द न्यायालयात दाद मागीतली होती.

     

    या प्रकरणात माननिय सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारचा हा निर्णय संविधानिक ठरवित ऐतिहासिक निर्णय दिल्याने राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी या निर्णयाचे स्वागत करून या निर्णया मुळे यापुढे जम्मू कश्मिर राज्यात लोकशाहीची पुनर्स्थापना होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

     

    अस्थायी 370 कलम हटविणे हा सरकारचा निर्णय वैध असल्याचा निवाडा 5 न्यायमुर्तींच्या खंडपीठाने देतांनाच यामुळे भारत सरकारशी जम्मू कश्मिर जुळल्यामुळे हे राज्य मजबुतीने उभे राहील असेही निरिक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले आहे. जम्मू कश्मिरला राज्याचा दर्जा बहाल करून येथे 30 सप्टेंबर 2024 पर्यंत निवडणुका घेण्याचे निर्देश माननिय न्यायालयाने दिल्याने या राज्यात लोकशाही बळकट व चिरंतन होईल असेही हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.

  • चंद्रपुरातील सव्वादोन कोटींच्या फाउंटेन निविदा घोटाळ्याची एसीबीकडे तक्रार

    चंद्रपुरातील सव्वादोन कोटींच्या फाउंटेन निविदा घोटाळ्याची एसीबीकडे तक्रार

    News34 chandrapur

    चंद्रपूर : प्रियदर्शनी चौक,कामगार चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, एसटी वर्कशॉपजवळील शहीद भगतसिंग चौक आणि रामाळा तलावातील फाउंटेन उभारणी व बांधकामाच्या सव्वादोन कोटींच्या निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याची बाब जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी उजेळात आणल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान सोमवारी त्यांनी या घोटाळ्याची तक्रार जिल्हाधिकारी, नगरविकास विभाग तसेच एसीबीकडे केली असल्याने आता या घोटाळ्यातील मोठे मासे गळाला लागणार आहेत.

     

    पाच फाउंटेन उभारणीसाठी मनपाने १७ फेब्रुवारी रोजी निविदा प्रसिद्ध केली होती. नागपूर येथील प्रशांत मद्दीवार यांच्या एजन्सीकडे फाउंटेन उभारणी व बांधकामाचे काम दिले. या एजन्सीकडे पुरेसा अनुभव नसल्याने जाणीवपूर्वक प्रशांत मद्दीवार या एजन्सीसाठी सोयीच्या अटी-शर्ती निविदेत टाकण्यात आल्या. जॉइंट व्हेंचरची तरतूद केली. निविदा प्रक्रियेत पात्र ठरण्यासाठी शासकीय, निमशासकीय कार्यालय किंवा महामंडळामध्ये निविदेतील कामाच्या किमतीच्या ८० टक्के काम किंवा ५० टक्के दोन काम किंवा ४० टक्के तीन कामे पूर्ण केल्याचा अनुभव असणे आवश्यक असतानाही मनपा आयुक्त विपीन पालिवाल यांनी नियम पायदळी तुडवले. केंद्रीय दक्षता आयोगाच्या निर्देशाचे सरसकट उल्लंघन केले.

     

    काम पूर्ण केल्याचे अनुभव प्रमाणपत्र नसतानाही प्रशांत मद्दीवार या कंत्राटदाराला पात्र ठरवले. चार-चार पटीने कामाची किंमत वाढवून ,अवास्तव दर टाकून तसेच पात्र असलेल्या कंत्राटदाराला टाळून मर्जीतील कंत्राटदारला काम देऊन आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप या प्रकरणात झालेला आहे. याबाबत संपूर्ण कागदपत्रासह जनविकास सेनेचे जिल्हाध्यक्ष पप्पु देशमुख यांनी जिल्हाधिकारी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव तसेच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक यांच्याकडे तक्रार केली. मनपाचे आयुक्त बिपिन पालीवाल व या घोटाळ्याशी संबंधित इतर अधिकारी यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे आता कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

     

    मनपाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना वठणीवर आणणार

     

    चंद्रपूर शहरातील नागरिक धुळीच्या प्रदूषणाने त्रस्त आहेत. या धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत निधी प्राप्त झाला.या निधीतून अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला. प्रदूषणाने त्रस्त नागरिकांना दिलासा देण्याच्या हेतूने शुद्ध हवेसाठी किंवा धूळ नियंत्रणाच्या दृष्टीने इतर आवश्यक उपाययोजना न करता केवळ मर्जीतील कंत्राटदारासाठी फवारे लावण्यात आले. चंद्रपूर महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संपत्तीचा शोध घेणे आम्ही सुरू केले आहे.त्यांना वठणीवर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हा जनविकास सेनेचा इशारा आहे.

  • चिमुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे रस्ता रोको आंदोलन

    चिमुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे रस्ता रोको आंदोलन

    News34 chandrapur

    चिमूर – राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा चिमूरचया वतीने अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा टप्पा ७ डिसेंबर पासून सुरू झाला असून अन्नत्याग आंदोलनासोबत साखळी उपोषण सुरू केले असून थाळी बजाव आंदोलन, भीक मांगो आंदोलन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आले. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी चिमूर येथे रास्ता रोको करण्यात आला. पोलिसांनी आंदोलकांना पोलिसांनी स्थानबद्ध केले.

     

    राष्ट्रीय ओबीसी महासंघ चंद्रपूर च्या वतीने विद्यार्थी महासंघ जिल्हाध्यक्ष रविंद्र टोगे यांनी अन्नत्याग उपोषण केले होते. आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई येथे आंदोलनातील मागण्या संदर्भात बैटक घेऊन मागण्या मान्य करणार असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 सप्टेंबरला चंद्रपूर येथे येऊन आश्वासन देत उपोष्ण मागे घेण्याची विनंती केली.

     

    दोन महिन्याचा कालावधी होऊन सुधा आश्वासनाची पूर्तता न झाल्याने चिमूर येथे अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू केला असून राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे तालुका अध्यक्ष अक्षय लांजेवार व ओबीसी युवा कार्यकरते अजित सुकारे यांनी 7 डिसेंबर पासून अन्नत्याग उपोषण सुरू केले. अन्नत्याग उपोष्णसोबत 8 सप्टेंबर पासून साखळी उपोषण सुरू केले. तरी सुधा शासन दखल घेत नसल्याने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी थाळी बजाव आंदोलन, भीक मांगो आंदोलन राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा चिमूरचया वतीने करण्यात आले.

     

    आज दिनांक 11 डिसेंबर रोजी तहसील कार्यालय चिमूर समोर रास्ता रोखो आंदोलन करून चिमूर – वरोरा राष्ट्रीय महामार्ग बंद केला. चिमूर पोलिसांनी आंदोलकांना स्थानबद्ध केले. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आंदोलन तीव्र होत असून लवकरात लवकर शासनानी दखल घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला.

  • उभ्या ट्रक ला दुचाकीची धडक, घुग्घुस येथील एकाचा मृत्यू

    उभ्या ट्रक ला दुचाकीची धडक, घुग्घुस येथील एकाचा मृत्यू

    News34 chandrapur

    चंद्रपूर/घुग्घुस – घुग्घुस शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या पुरट गावाजवळ 10 डिसेंबर च्या रात्री रस्त्याच्या मधोमध उभे असलेल्या ट्रक ला मागून दुचाकीने धडक दिली, या धडकेत दुचाकी चालक जागीच ठार झाला.

     

    31 वर्षीय विजय श्रवण साहू रा. घुग्घुस निवासी असे मृतक दुचाकी चालकाचे नाव आहे, तो ट्रक चालक असल्याची माहिती आहे, कामावरून तो वणी येथून आपल्या घरी घुग्घुस येथे परत येत होता.

     

    रात्री 10 वाजताच्या सुमारास दुचाकी वाहन क्रमांक MH34BC5144 ने विजय आपल्या गावी कामावरून परत येत होता, पुरट गावाजवळ रस्त्याच्या मध्ये शाह कोल कंपनीचा ट्रक क्रमांक MH34AB6710 बिघाड झाल्याने उभा होता, मात्र ट्रक ला मागे लाईट नसल्याने विजय ला रस्त्याच्या मध्ये उभा असलेला ट्रक दिसला नाही त्यामुळे त्याची दुचाकी सरळ ट्रक मध्ये घुसली.

     

    या धडकेत विजय चा जागीच मृत्यू झाला, अपघात झाल्यावर विजय चा मृतदेह ट्रक च्या मागील बाजूस पडला होता, सकाळच्या सुमारास नागरिक बाहेर फिरायला निघाले असता त्यांना विजय चा मृतदेह आढळून आल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली, पहाटे 4 वाजता पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह उचलत पंचनामा केला.

     

    चारचाकी वाहन असो की ट्रक याला साधा बोल्ट नसला की RTO विभाग तात्काळ चालान मारत मात्र सध्या अवजड वाहने व नियम भंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई ही नाममात्र होत आहे, शाह कोल कंपनीचा ट्रक मध्ये बिघाड झाल्याने वाहन चालकाने ट्रक रस्त्याच्या मध्ये उभा केला, त्या ट्रक ला इंडिकेटर, टेल लाईट नव्हते जर हे लाईट ट्रक ला असते तर हा अपघात घडला नसता.

  • जटपुरा गेट वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी इको-प्रोचे “झोपा काढा सत्याग्रह”

    जटपुरा गेट वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी इको-प्रोचे “झोपा काढा सत्याग्रह”

    News34 chandrapur

    चंद्रपूर : शहरात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. जटपुरा गेट परिसरात तर वाहतुकीच्या कोंडीमुळे वाहनधारक तसेच पादचाऱ्यानाही त्रास सहन करावा लागतो. येथील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करावी या मागणीला घेऊन सोमवारी इको- प्रोच्या सदस्यांनी ‘झोपा काढा सत्याग्रह’ करीत शासन-प्रशासन व जनप्रतिनिधीचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केले आहे.

     

    शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. त्या तुलनेमध्ये अरुंद रस्ते आहे. विशेष म्हणजे, जटपुरा गेटपरिसरात वाहतुकीची कोंडी होते. यात वाहनधारकांना प्रदूषणाचाही मारा सहन करावा लागतो. यामुळे अनेकांना आजार होत आहे. या कोंडीमुळे अनेकवेळा रुग्णवाहिकाही अडकत असल्याने रुग्णाचा जीव धोक्यात येते. अनेकवेळा वाहन समोर जाण्याची कोणतीही शास्वती नसते. अधिक काळ वाहनांची गर्दीमुळे निघणारा धुरामुळे वाहनधारकांचा जीव गुदमरत असतो, त्यामुळे येथील समस्या कायमस्वरुपी सोडवावी, अशी मागणी करीत इको- प्रोच्या सदस्यांनी गांधीगिरी करीत आज “झोपा काढा सत्याग्रह” केले. यानंतर मा. जिल्हाधिकारी यांचे माध्यमाने विधान मंडळ अध्यक्ष, विधानपरिषद अध्यक्ष, मुख्यमंत्री यांना तर पालकमंत्री, आमदार, जिल्हाधिकारी, आयुक्त यांना निवेदने देण्यात येणार आहे.

     

    जटपूरा गेटवर इको-प्रोच्या सदस्यांनी यापूर्वी सुद्धा वेगवेगळे आंदोलन केले असून, अनेकदा पाठपुरावा केलेला आहे, यासोबतच अनेक संस्था संघटना यांनी वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे. अनेक वर्षापासून जटपुरागेटच्या वाहतूक समस्या सोडविण्यास पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी आहे. परंतु आजपर्यंत यात कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. हिवाळी अधिवेशन निमित्त इको-प्रो तर्फे सुरू असलेल्या एक दिवस एक आंदोलन श्रूंखलेमध्ये आज तिसऱ्या दिवशी केलेल्या प्रतिकात्मक “झोपा काढा सत्याग्रह” निमित्ताने येत्या काळात या मागणी करिता तीव्र आंदोलन करण्याचा सुद्धा इशारा इको प्रो तर्फे देण्यात आले आहे.

     

     

    इको-प्रोच्या वतीने अध्यक्ष बंडू धोतरे यांच्या नेतृत्वात सदर सत्याग्रह करण्यात आले या ‘झोपा काढा सत्याग्रह’ मध्ये नितीन रामटेके, अब्दुल जावेद, ओमजी, वर्मा, अनिल अडगुरवार, कुणाल देवगिरकर, राजू काहिलकर, स्वप्नील मेश्राम, सचिन धोतरे, आकाश घोडमारे, सूरज कावळे, भूषण ढवळे, खुशबू जैस्वाल, नेत्रदीपा चिंचोलकर, रोहित तळवेकर आदी उपस्थित होते.

  • चंद्रपुरातील नगीनाबाग प्रभागात सिमेंट रस्त्यावर भ्रष्टाचाराचा भूकंप

    चंद्रपुरातील नगीनाबाग प्रभागात सिमेंट रस्त्यावर भ्रष्टाचाराचा भूकंप

    News34 chandrapur

    चंद्रपूर: चंद्रपूर शहरातील नगीना बाग प्रभागातील स्वावलंबी नगर मधील गुलमोहर कॉलनी परिसरात तीन वर्षांपूर्वी सिमेंट रस्ता बांधण्यात आला होता. मात्र, तीन वर्षांतच या रस्त्याला मोठे मोठे भेगा पडले आहेत. स्थानिक नागरिकांनी याबाबत आम आदमी पक्षाला तक्रार केली. त्यानंतर आम आदमी पक्षाने रस्त्याचा प्रत्यक्ष पाहणी करून त्याचा खुलासा केला आहे.

     

    या रस्त्याला मोठे मोठे भेगा पडल्या आहेत. या भेगांमुळे रस्ता खराब झाला आहे. तसेच, या भेगांमुळे रस्त्यावरून वाहन चालवणे धोकादायक झाले आहे. या रस्त्याला मोठ्या प्रमाणात कमिशन खोरी व भ्रष्टाचार झाल्याचे प्रथमदर्शनी पहिल्यास लक्षात येते.

     

    या प्रभागातील भाजपाचे स्थानिक माजी नगरसेवक व सभापती माजी उपमहापौर राहुल पावडे यांचा मतदारसंघ आहे. या रस्त्याच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.

     

    आम आदमी पक्षाने या रस्त्याला घेऊन आपल्या सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केला आहे. या व्हिडिओत आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी या रस्त्याला भ्रष्टाचाराचे प्रतीक म्हटले आहे. त्यांनी या रस्त्यासाठी माजी नगरसेवक तथा मनपा इंजिनियर यांना जबाबदार धरले आहे.

     

    या प्रकरणी आम आदमी पक्षाने कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. या वेळेस आम आदमी पक्षाचे नेते सुनिल मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, महानगर अध्यक्ष योगेश गोखारे,चंद्रपूर युवा अध्यक्ष संतोष बोपचे,सह संगठन मंत्री सिकंदर सागोरे,सहसचिव सुधिर पाटील, कोषाध्यक्ष स्वप्नील घागरगुंडे, उपाध्यक्ष सुनिल सदभय्या,जितेंद्र कुमार भाटिया सोबत परिसरातील नागरिक महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.