Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • मूल तालुक्यात कांग्रेस औद्योगिक सेल कमिटीचा सामान्य कामगार मेळावा

    मूल तालुक्यात कांग्रेस औद्योगिक सेल कमिटीचा सामान्य कामगार मेळावा

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मुल – दिनांक 15 12 2023 ला मुल येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी औद्योगिक सेल आणि महाराष्ट्र राज्य सामान्य कामगार यांच्याद्वारे कामगार मेळावा घेण्यात आला.

     

    कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून पुणे येथील हायकोर्ट चे वकील श्री.संतोष शिंदे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी औद्योगिक सेलचे अध्यक्ष श्री हेमंत सोनारे चंद्रपूरचे वकील श्री पुरुषोत्तम सातपुते प्रमुख पाहुणे म्हणून श्री विजय नळे सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी रोहित शिंगाडे जिल्हाध्यक्ष चंद्रपूर औद्योगिक सेल श्री संजयजी धुल सामाजिक कार्यकर्ता श्री भूषण मोरे तालुका अध्यक्ष ग्रामीण बल्लारपूर श्री करण कामटे अध्यक्ष शहर बल्लापूर सेल सर्व पाहुण्यांच्या उपस्थित कार्यक्रम घेण्यात आला.

     

    कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्ष औद्योगिक विभागाचे चंद्रपूर शहर अध्यक्ष श्री दत्तात्रय समर्थ यांच्या मार्गदर्शनात करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नलिनी आडपवार मूल शहर महिला काँग्रेस अध्यक्ष तसेच आभार प्रदर्शन शामला बेलसरे मुल महिला काँग्रेस सचिव यांनी केले.

     

    कामगाराचे हक्क आणि त्यांचे कायदे कोणते? याबाबत मोलाची मार्गदर्शन शिंदे यांनी केले तसेच श्री हेमंत सोनारे साहेब यांनी कामगारासाठी नवीन नवीन योजना ची माहिती मिळावी यासाठी मुल येथे प्रशिक्षण ठेवू असे आव्हान केले, कामगार बंधू भगिनी असंख्य संख्येने उपस्थित होते .कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा अध्यक्ष औद्योगिक सेल श्री दत्तात्रय समर्थ, बंडूभाऊ गुरणुले तसेच चंदूभाऊ चटारे, विनोद आंबेडकर, फरजाना शेख यांनी अथक परिश्रम घेतले.

  • चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यातील महत्वपुर्ण रेल्वे समस्यांवर सखोल चर्चा

    चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यातील महत्वपुर्ण रेल्वे समस्यांवर सखोल चर्चा

    News34 chandrapur

    चंद्रपूर/यवतमाळ- चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे समस्या व रेल्वेशी संबंधीत अन्य विषयांवर राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दि. 13 डिसेंबरला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेवून जिल्ह्यातील रेल्वे प्रवाश्यांना रेल्वे सोयी व सुविधांबाबत होत असलेला त्रास व  गैरसोयीबाबत सविस्तर चर्चा केली.

     

    या चर्चेप्रसंगी रेल्वेचे झेडआरयूसीसी सदस्य दामोदर मंत्री, डीआरयूसीसी सदस्य पुनम तिवारी, गौतम यादव प्रभूती उपस्थित होते. या भेटीमध्ये हंसराज अहीर यांनी काजीपेठ पुणे ट्रेन नं. 22151/52 प्रतिदीन सुरू करण्यात यावी, बल्लारशाह वरून मुंबईकरीता दररोज ट्रेन सुरू करावी. नंदीग्राम एक्सप्रेस स्ट्रे नं. 11401/402 ही गाडी आदीलाबादहून व्हाया नांदेड मुंबईला जाते ती आदीलाबाद वरून बल्लारशाहपर्यंत विस्तारीत करण्यात यावी. दक्षिण एक्सप्रेस ट्रेन नं. 12721/22 निजामुद्दीन येथून हैद्राबाद पर्यंत चालविण्यात येत आहे ही गाडी हैद्राबादला 19 तास उभी असते त्यामुळे या गाडीचे सोलापूरपर्यंत विस्तारीकरण केल्यास नागपूर वर्धा, चंद्रपूर, वर्धा, बल्लारशाह, कागजनगर, मंचेरीयल, रामगुंडम, काजीपेठ जाणाऱ्या रेल्वे प्रवाश्यांना चांगली सुविधा होईल असेही अहीर यांनी रेल्वे मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. बल्लारपूर पिटलाईनचे काम पुर्ण झाल्याने चंद्रपूर व विदर्भातील रेल्वे प्रवास्यांना रेल्वेच्या मुबलक सोयी सुविधा उपलब्ध करण्यास रेल्वे प्रशासनास मोठा वाव असल्याचे हंसराज अहीर यांनी चर्चेदरम्यान मंत्र्यांच्या निदर्शनास आणुन दिले.

     

    चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात 4 लाखांहून अधिक बंगाली बांधव वास्तव्यास आहेत. त्यांच्या राज्यात किंवा स्वगृही येणेजाणे करण्यास चंद्रपूर ते हावडा ही थेट गाड नसल्याने या दोन्ही जिल्ह्यातील बांगाली बांधवांना नागपूर किंवा गोंदीया येथून ट्रेन पकडावी लागते त्यामुळे त्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे बंगाली बांधवांकरीता चेन्नई-बिलासपूर ट्रेन नं. 22620 हावडापर्यंत विस्तारीत करण्यात यावी. किंबहूना नांदेड सांतरागाच्छी ट्रेन नं. 12767/68 चंद्रपूर वरून चालविण्यात यावी. किंवा ट्रेन नं. 11447/48 जबलपूर-हावडा ही ट्रेन बल्लारशाह पर्यंत विस्तारीत करून सदर ट्रेनचा धांबा चांदाफोर्ट स्टेशनवर देवून या समाजाला न्याय द्यावा असेही अहीर यांनी रेल्वेमंत्र्यांशी चर्चेवेळी सांगीतले. या भेटीत चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील रेल्वेविषयक अनेक महत्वपुर्ण बाबींवर सविस्तर चर्चा झाली.

     

    केंद्रीय रेल्वे मंत्र्यांसोबतची सदर भेट अत्यंत फलदायी झाली असून रेल्वेमंत्र्यांनी येत्या महिनाभरात या सर्व बाबींवर सकारात्मक निर्णय घेऊ असे अहीर यांना आश्वासीत केले. यावेळी श्री. मौर्या रेल्वे बोर्ड सदस्य तथा कार्यकारी निदेशक कोचिन हे सुध्दा उपस्थित होते. त्यांनीही या न्याय मागण्या संदर्भात सकारात्मक भूमिका मांडत या सर्व मागण्यांच्या पुर्ततेकरीता लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.

  • सर्व धर्म जातींच्या विचाराचा मेळ म्हणजे गोपालकाला – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

    सर्व धर्म जातींच्या विचाराचा मेळ म्हणजे गोपालकाला – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

    News34 chandrapur

    ब्रह्मपुरी – अध्यात्म मार्गाची वाट धरून सत्संगाची शिकवण घेण्यासाठी पवित्र मनाने आपल्या भूत काळातील चुकांची माफी मागून ईश्वराची आराधना करणे व महायज्ञात दृष्ट वृत्तीचे दहन करून मनातील अहंकार, द्वेष भावना याचा नाश करणे हेच भागवत सप्ताहा मागील उदांत हेतू होय.या अध्यात्म सप्ताहाचा समारोप म्हणजे हा सर्व घराघरातील विचारांनी एकत्र येऊन घातलेला मेळ हा गोपालकाला होय. असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. ते ब्रम्हपुरी तालुक्यातील बेटाळा येथे आयोजित श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह निमित्ताने बोलत होते.

     

    या प्रसंगी प्रामुख्याने मंचावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव डॉ. नामदेव कीरसान, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, माजी जि.प.सदस्य डॉ राजेश कांबळे, माजी जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, माजी जि.प.सदस्या स्मिताताई पारधी, महिला काॅंग्रेसच्या शहराध्यक्षा योगिताताई आमले, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष नामदेव लांजेवार, माजी नगरसेवक जगदीश आमले, चौगानचे सरपंच उमेश धोटे, काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते नानाजी तुपट, युवक काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष अमित कन्नाके, सरपंच दौलत ढोंगे, उपसरपंच सोनाली सुर्यवंशी, बाजार समितीचे संचालक ब्रम्हदेव दिघोरे, ग्राम काॅंग्रेस कमेटीचे अध्यक्ष पांडुरंग दिघोरे, अनुसूचित जाती सेलचे जिल्हा सहसचिव डि.के.मेश्राम, संजय मिसार यांसह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

     

     

    यावेळी पुढे बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, अध्यात्म व सत्संगाचा मार्ग हा ईश्वर प्राप्तीचा खरा मार्ग आहे. या भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह निमित्ताने संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण पसरले असून यातून गाव एकोब्याचे दर्शन घडते.असेही ते यावेळी म्हणाले. याप्रसंगी आयोजकांकडून विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

     

    तर गावात स्वच्छता अभियान राबवून गाव नेहमी स्वच्छ ठेवण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा. तसेच गाव हा विश्वाचा नकाशा असुन गावांच्या समृध्ततेवरून देशाची ओळख होत असते. त्यामुळे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थांनी एकत्र येत पुढाकार घ्यावा असे आवाहन तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके यांनी मार्गदर्शनपर भाषणातून केले. यानंतर संपूर्ण ग्राम वासियांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला.आयोजित श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आयोजक कमिटी व संपूर्ण बेटाळा ग्राम वासी यांनी अथक परिश्रम घेतले.

  • चंद्रपुरात रक्तगटावरून कामगार संघटना आमनेसामने

    चंद्रपुरात रक्तगटावरून कामगार संघटना आमनेसामने

    News34 chandrapur

    चंद्रपूर – वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या लालपेठ येथील उपविभागीय कार्यालयात 16 डिसेंबर ला सायंकाळच्या सुमारास कामगार संघटनांनी चांगलाच गोंधळ घातल्याने वेकोली व्यवस्थापनाची चांगलीच भंबेरी उडाली होती.

     

    मागील काही दिवसापासून वेकोलीच्या लालपेठ येथील क्षेत्रीय रुग्णालयात वेकोली कर्मचारी गंभीर आजारावर उपचार घेत आहे, दोन दिवसांपूर्वी त्याच्या शरीरात रक्ताची कमतरता असल्याने डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना रक्ताची व्यवस्था करण्यास सांगितले, त्याबाबत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी नातेवाईकांना O Positive रक्त आणा अशी चिठ्ठी पण दिली मात्र रक्त आणण्यास गेलेल्या नातेवाईकांना ब्लड बँकेतील कर्मचाऱ्यांनी रुग्णाला O नाहीतर A Positive रक्त द्यावे लागेल कारण त्यांचा रक्तगट A POSTITIVE आहे, हे ऐकताच नातेवाईक वेकोली रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर संतापले त्यांनी तात्काळ त्याठिकाणी इंटक कामगार संघटनेला याबाबत माहिती दिली.

     

    संघटनेचे सदस्य त्याठिकाणी दाखल होताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी करू लागले होते, मात्र रुग्णालयातील कर्मचारी दुसऱ्या संघटनेचे असल्याने HMS संघटनेने कर्मचाऱ्यांची बाजू घेणे सुरू केले, आणि कार्यालय परिसरात दोन्ही संघटना एकमेकांविरुद्ध नारेबाजी करू लागले.

     

    शेवटी उपविभागीय वेकोली अधिकाऱ्याला मध्यस्ती करावी लागली, कारवाईचे आश्वासन मिळाले मात्र दुसऱ्या संघटनेणें यावर आक्षेप घेतला आता यावर वेकोली महाव्यवस्थापक काय कारवाई करतात याकडे आता लक्ष लागले आहे, कारण असे प्रकार याआधी सुद्धा घडले आहे.

  • योजनांपासून वंचित राहिलेल्यांना संकल्प यात्रेसोबत जोडा – केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी

    योजनांपासून वंचित राहिलेल्यांना संकल्प यात्रेसोबत जोडा – केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी

    News34 chandrapur

    चंद्रपूर : केंद्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या विकसीत भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून जवळपास 22 योजनांची माहिती नागरिकांच्या घरापर्यंत पोहचविण्यात येत आहे. शासकीय यंत्रणेतील अधिकारी – कर्मचारी लोकांमध्ये जावून याबाबत जनजागृती करीत आहे. त्यामुळे आतापर्यंत विविध योजनांपासून वंचित राहिलेल्या नागरिकांना या यात्रेसोबत जोडा व त्यांना लाभ मिळवून द्या, असे आवाहन केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी केले. तर दूरदृष्यप्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यातील लाभार्थ्यांशी संवाद साधला.

     

    वरोरा तालुक्यातील खेमजई येथे विकसीत भारत संकल्प यात्रेदरम्यान आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी आदी उपस्थित होते.

     

    देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश प्रगतीपथावर मार्गक्रमण करीत आहे, असे सांगून केंद्रीय मंत्री श्री. पुरी म्हणाले, गत 9 वर्षात जे काम झाले आहे, आणि भविष्यात केंद्र सरकार नागरिकांच्या कल्याणासाठी जे काम करणार आहे, अशा बाबींची माहिती या संकल्प यात्रेतून जनतेपर्यंत पोहचविण्यात येत आहे. सोबतच महत्वाच्या विविध शासकीय योजनांचा लाभसुध्दा या माध्यमातून नागरिकांना घरपोच मिळण्यास मदत होत आहे. त्यामुळे या यात्रेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे. योजनांपासून वंचित असलेल्यांना यात सहभागी करावे. विकसीत भारत संकल्प यात्रेअंतर्गत देशभरात 3200 एलईडी व्हॅनद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. आतापर्यंत सदर व्हॅन 65 हजार गावांमध्ये आणि 5 हजार शहरात गेली असून ‘मेरी कहानी, मेरी जुबानी’ अंतर्गत 1 कोटी 80 लक्ष लाभार्थ्यांनी आपले अनुभव कथन केले आहे.

     

    पुढे श्री. पुरी म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात सुरवातीला 102 पेट्रोलपंप होते, आज 131 पेट्रोलपंप आहेत. 2014 मध्ये जिल्ह्यात 3 लक्ष 34 हजार एल.पी.जी गॅस कनेक्शन होते. ती संख्या आज चंद्रपूर जिल्ह्यात 6 लक्ष 32 हजार झाली असून जिल्ह्यातील 34495 कुटुंबांना उज्वला गॅस योजनेचा लाभ देण्यात आला आहे. 2014 मध्ये देशात 14 कोटी नागरिकांकडे गॅस कनेक्शन होते. आता 2023 मध्ये हा आकडा 32 कोटींवर पोहचला आहे. सन 2014 पर्यंत केवळ 1 लक्ष 5 हजार नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळाला होता, तर 2014 पासून 2023 पर्यंत ग्रामीण आणि शहरी मिळून 4 कोटी नागरिकांना आवास योजनेंतर्गत घरकूल देण्यात आले आहे. गत सरकारमध्ये देशातील 18 हजार गावांमध्ये वीज नव्हती तर आज 2023 पर्यंत 6 लक्ष 50 हजार गावांमध्ये विद्युतीकरण झाले आहे. तसेच देशात आजच्या घडीला 50 कोटींपेक्षा जास्त लोकांचे बँकखाते काढण्यात आले आहे. तसेच आज जगात भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आहे, भविष्यात ती तिस-या क्रमांकावर पोहचणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

     

    विकसीत भारत या संकल्पात चंद्रपूरचे मोठे योगदान राहील : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

     

    केंद्र सरकारने नागरिकांच्या कल्याणासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. शेतक-यांच्या खात्यात 6 हजार रुपयांचा थेट लाभ, आयुष्मान भारत अंतर्गत मोफत आरोग्य सेवा आदी योजनांचा यात समावेश आहे. या योजनांपासून कोणीही वंचित राहू नये म्हणून चित्ररथ आल्या दारी येत आहे. गावातील लोकांनी या योजनांचा फायदा घ्यावा. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात विकसीत भारत हा संकल्प आहे. जग बदलविण्यासाठी आपणही संकल्प करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात मिशन शौर्य, मिशन जयकिसान, मिशन ऑलंपिक, अयोध्येच्या राममंदिरासाठी काष्ट, नवीन संसद भवनासाठी चंद्रपूरचे लाकूड अशा अनेक बाबी करण्यात आल्या आहेत. चंद्रपूर हा वाघांचा जिल्हा असल्यामुळे विकसीत भारत या संकल्पात चंद्रपूरचे मोठे योगदान राहील, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

     

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, जिल्ह्यातील 825 ग्रामपंचायतींपैकी आतापर्यंत 273 ग्रामपंचायतींमध्ये विकसीत भारत संकल्प यात्रा गेली आहे. यात एकूण 1 लक्ष 42 हजार 595 नागरिक सहभागी झाले आहेत. यात्रेदरम्यान 17558 कुटुंबाची आरोग्य तपासणी, 2557 जणांची उज्वला गॅस कनेक्शनकरीता नोंदणी, 6300 जणांना आयुष्मान भारतचा लाभ देण्यात आल्याचे जिल्हाधिका-यांनी सांगितले.

     

    सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाला विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • आमदार सुधाकर अडबाले यांच्या लक्षवेधी ने 5 वर्षाचा प्रलंबित प्रश्न सुटला

    आमदार सुधाकर अडबाले यांच्या लक्षवेधी ने 5 वर्षाचा प्रलंबित प्रश्न सुटला

    News34 chandrapur

    चंद्रपूर : महाराष्ट्रातील सैनिक स्कूल चंद्रपूर येथील अनुसूचित जाती – जमाती, विमुक्‍त जाती व भटक्‍या जमातीच्या विद्यार्थ्यांना गेल्या पाच वर्षांपासून शिष्यवृत्ती न मिळाल्याने त्यांच्या शिक्षणात खंड पडला होता. याबाबत आमदार सुधाकर अडबाले यांनी हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाची तातडीने दखल घेत विद्यार्थ्यांना प्रलंबित शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली. याबाबत १५ डिसेंबर २०२३ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्‍याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

     

    सैनिक स्कूल चंद्रपूर येथे महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्‍य पालकांची मुले इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतच्या वर्गात शिक्षण घेत आहे. गेल्या पाच वर्षांपासून शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न मिळाल्‍याने त्‍यांना शाळेत प्रवेश दिला जात नसल्‍याची गंभीर बाब समोर येताच आमदार अडबाले यांनी हिवाळी अधिवेशनात सदर प्रश्‍न उपस्‍थित करून सैनिक स्कूलच्‍या विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती तात्‍काळ मंजूर करण्याची मागणी १२ डिसेंबर २०२३ रोजी सभागृहात केली होती.

     

    महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती – जमाती, विमुक्‍त जाती व भटक्‍या जमातीचे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र असून गेल्या पाच वर्षांपासून सदर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप) मिळालेली नाही. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नसल्याने पालकांनी कर्ज घेऊन मुलांची फी भरत होते. परंतु, आता ते पाल्यांची फी भरू शकत नाही आहे तसेच सैनिक स्कूल चंद्रपूर ही शाळा शासनाच्या कोणत्याही आदेशाला मानत नाही. फी न भरल्यामुळे गेल्या १ ते २ महिन्यांपासून विद्यार्थ्यांना शाळेत बसू दिले जात नाही. विद्यार्थी शाळेत न गेल्याने शिक्षण व इतर ॲक्टिवीटी पासून वंचित आहेत. यामुळे मुलांना व पालकांनाही मानसिकदृष्ट्या खूप त्रास सहन करावा लागत होता.

     

    आमदार सुधाकर अडबाले यांच्या प्रश्नामुळे या गंभीर बाबीकडे शासनाचे लक्ष वेधले गेले. त्यानंतर तातडीने कारवाई होऊन तीन दिवसात सैनिक स्कूल चंद्रपूरमधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे. याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत १५ डिसेंबर २०२३ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. यामुळे सदर विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती मिळेल व पुढेही शिष्यवृत्ती मिळत राहील. या शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत प्रवेश मिळेल आणि त्यांचे पुढील शिक्षण सुरू राहील.

     

    आमदार अडबाले यांच्या प्रश्‍नामुळे हा ५ वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्‍न निकाली निघाल्‍याने विद्यार्थी व पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबत आमदार सुधाकर अडबाले यांचे सैनिकी स्‍कूल चंद्रपूर पालक संघाच्या वतीने आभार मानण्यात आले.

  • चंद्रपुरातील ओबीसी बचाव परिषदेने जिल्ह्यात संभ्रमाची स्थिती

    चंद्रपुरातील ओबीसी बचाव परिषदेने जिल्ह्यात संभ्रमाची स्थिती

    News34 chandrapur

    चंद्रपूर : ओबीसी नेते अशोक जीवतोडे यांनी रविवारी ओबीसी बचाव परिषदेचे आयोजन केले आहे. मात्र, जिल्ह्यातील ओबीसी नेतृत्वामध्ये संभ्रम असून त्यांनी या परिषदेकडे सपशेल पाठ फिरवली आहे. त्यातही अशोक जीवतोडे यांच्या स्वयंघोषित नेतृत्वाबाबत आता सोशल मीडियावर टीका देखील केली जात आहे.

     

    मराठा समाजाला ओबीसीतुन आरक्षण देऊ नये यासाठी रवींद्र टोंगे यांनी आमरण उपोषण केले होते.
    यात जिल्ह्यातील सर्व नेतृत्व एकवटले असताना
    या आंदोलनाकडे अशोक जिवतोडे यांनी सपशेल पाठ फिरवली होती. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमरण उपोषणाला भेट देऊन उपोषणाची सांगता केली. यावेळी आंदोलन यशस्वी होत असल्याचे पाहून अशोक जिवतोडे आंदोलन स्थळी आले. या आंदोलनाची दखल राज्य सरकारने घेतली होती. जिल्ह्यात अनेक ओबीसी लोकप्रतिनिधी आहेत. मात्र अशोक जिवतोडे जिल्ह्याचे एकमेव ओबीसींचे कैवारी असल्याचे बाऊ करत आहेत.

     

    चिमूर येथे आठ दिवस अजित सुकारे आणि अक्षय लांजेवार हे आंदोलन करत होते. मात्र या ओबीसीच्या आंदोलनाला अशोक जिवतोडे यांनी साधी भेट सुद्धा दिली नाही. आता मात्र जिवतोडे स्व केंद्रित ओबीसी बचाव परिषद घेत आहे. त्यामुळे या परिषदेकडे ओबीसी बांधव संशयाने बघत आहेत. अशोक जिवतोडे यांच्या भूमिकेबाबत अनेक ओबीसी नेत्यांनी आता फारकत घ्यायला सुरुवात केली आहे. या परिषदेकडे फारसे कोणी फिरकणार नाहीत केवळ आपल्या हाताखालचे खासगी कार्यकर्ते या दिमतीला राहील अशी शक्यता आहे. जीवतोडे यांनी केवळ स्वतःला मोठे दाखविन्यासाठी हा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा ओबीसी कार्यकर्त्यांमध्ये आहे.

     

    रवीच पाडतोय अशोकला अंधारात

    रवी म्हणजे सूर्याचे काम हे प्रकाश देने आहे. मात्र काही रवी हे अंधारात ठेवण्याचे काम करीत आहे. आपल्या नेतृत्वाला दिशा देण्याचे काम करण्याऐवजी वेगळेच काम सुरू आहे. मात्र दुर्दैवाने नेतृत्वाला देखील आपल्या दिव्याखालचा अंधार दिसून येत नाही आहे. मी सांभाळून घेतो, मॅनेज करतो असे म्हणून हा रवी आपल्याच पोळ्या शेकून घेत आहे. याचा मोठा फटका भविष्यात नेतृत्वाला बसणार आहे.

  • 10 वर्षीय विद्यार्थिनींचा शिक्षकाने केला विनयभंग

    10 वर्षीय विद्यार्थिनींचा शिक्षकाने केला विनयभंग

    News34 chandrapur

    (प्रशांत गेडाम)
    नागभीड : नागभीड तालुक्यातील तळोधी बा. अंतर्गत येत असलेल्या सावरगाव येथील एका शिक्षकाने १० वर्षीय मुलीची छेडछाड केल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडितेसह आई-वडिलांच्या तक्रारीवरून त्या शिक्षकाविरुद्ध भादंवि ३५४ अ, भादंवि सहकलम ८,१० पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

     

    शिक्षकाला गुरूचा दर्जा देण्यात येतो मात्र या नात्याला काळिमा फासणारे काम तळोधी येथील शिक्षकाने केला असल्याचे उघडकीस आले आहे, आरोपी शिक्षकाने 10 वर्षीय विद्यार्थिनींची छेडछाड केली असा आरोप करण्यात आला आहे.

     

    गुन्हा दाखल झाल्यावर शिक्षक हा पसार झाला आहे, पसार शिक्षकाचा शोध पोलिस घेत आहेत. तपास तळोधी बा. ठाणेदार मंगेश भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भास्कर पिसे करीत आहेत. त्या शिक्षकाला निलंबित करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

  • चंद्रपूर शहरात पुन्हा विद्रुपीकरणाचा प्रकार, मनपाची पोलिसात तक्रार

    चंद्रपूर शहरात पुन्हा विद्रुपीकरणाचा प्रकार, मनपाची पोलिसात तक्रार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शहरात विना परवानगी भिंतीपत्रके लावणाऱ्या एक आशा व्यसनमुक्ती केंद्र आरमोरी व रिद्धी बिल्डर्स विरुद्ध महाराष्ट्र विद्रुपीकरण कायदा १९९५ अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिका झोन क्र. १ कार्यालयाद्वारे रामनगर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

     

    शहरातील वरोरा नाका,प्रियदर्शिनी चौक,जिल्हा परिषद समोरील परिसर,जटपुरा गेट तसेच डॉ.आलुरवार हॉस्पीटल परिसरात व्यसनमुक्ती केंद्राची तसेच फ्लॅटची जाहिरात करणारी रिद्धी बिल्डर्सची माहिती असलेली पॉम्पलेट्स व स्टिकर मनपाकडुन पूर्वपरवानगी न घेता लावली असल्याचे सहायक आयुक्त संतोष गर्गेलवार यांना १३ डिसेंबर रोजी पाहणीदरम्यान आढळुन आले.

     

    संबंधितास भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून पत्रके काढण्यास सांगितले असता अद्याप पावेतो भिंतीपत्रके न काढल्याने एक आशा व्यसनमुक्ती केंद्र व रिद्धी बिल्डर्स यांच्यावर महाराष्ट्र विद्रुपीकरण कायदा १९९५ अंतर्गत कलम ३ नुसार फौजदारी गुन्हा नोंद करण्याची कारवाई करण्यात आली आहे. चंद्रपूर महापालिकेच्या वतीने शासकीय निधीद्वारे शहर सुशोभीकरणाची कामे करण्यात आली आहेत.

     

    भिंतीपत्रके,पोस्टर्स,बॅनरबाजीमुळे शहराच्या विद्रुपीकरणासह शहराच्या सौंदर्यात बाधा येते किंबहुना वाहतुकीसही अडथळा निर्माण होत असल्याने याबाबत उच्च न्यायालय आणि राज्य शासनाने आखुन दिलेल्या सुचनांनुसार कारवाई करण्यात येते. त्यानुसार, परवानगीशिवाय पॅम्प्लेट्स, बॅनर्स, होर्डिंग्ज,कापडी फलक लावणा-यांवर आर्थिक दंडासह कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद या धोरणामध्ये करण्यात आली आहे.

  • पोम्भूर्णा क्रीडा संकुल विविध समस्यांनी ग्रस्त

    पोम्भूर्णा क्रीडा संकुल विविध समस्यांनी ग्रस्त

    News34 chandrapur

    पोम्भूर्णा – चंद्रपूर जिल्ह्यातील विसापूर येथे राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे, सोबतच चंद्रपुरातील जिल्हा क्रीडा संकुलासाठी पालकमंत्री मुनगंटीवार यांनी 57 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला मात्र त्यांच्या विधानसभा मतदार संघातील पोम्भूर्णा येथील तालुका क्रीडा संकुल अनेक समस्यांनी ग्रासले आहे, त्या समस्या दूर करा अन्यथाया आंदोलनाचा करणार असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष पवन बंकावार यांनी प्रशासनाला दिला आहे.

     

    ग्रामीण भागातील मुले क्रीडा क्षेत्रात निपुण व्हावे यासाठी पोम्भूर्णा येथे क्रीडा संकुलाचे निर्माण करण्यात आले मात्र देखभाली दुर्लक्ष होत असल्याने त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात मैदानावर येणाऱ्या मुलांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.

     

    मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष पवन बंकावार यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात क्रीडा संकुल असलेल्या समस्येवर लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यामध्ये क्रीडा संकुल सकाळी व सायंकाळी 5 वाजता सुरू करण्यात यावा, लाईट पहाटे 5 वाजता सुरू करण्यात यावे, पूलअप साठी सिंगल बार व डबल बार लावण्यात यावा, रनिंग ट्रक दुरुस्त करावा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, एक केअर टेकर ठेवण्यात यावा अश्या विविध मागण्याचे निवेदन मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष बंकावार यांनी तहसीलदार व तालुका क्रीडा अधिकारी यांना दिले.

     

    प्रशासनाने तात्काळ क्रीडा संकुल असलेल्या समस्या सोडवाव्या अन्यथा मनसे विद्यार्थी सेनेतर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

    निवेदन देतेवेळी पवन बंकावार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष पोंभुर्णा, छत्रपती कस्तुरे, प्रशांत गोंगले, गौरव चंदेल, प्रमोद ढाक, सूरज ढोले, अज्ञान कुरेशी, लोकेश गावरे, स्वप्नील गोरांतवार, रितेश कोटरांगे आदि उपस्थित होते.