Category: क्रीडा

क्रीडा (Sports) जगतातील प्रत्येक ब्रेकिंग न्यूज आणि सविस्तर अपडेट्स वाचा news34.in वर. क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, आणि स्थानिक स्तरावरील सर्व खेळांचे निकाल, सामन्यांचे विश्लेषण आणि खेळाडूंच्या मुलाखती येथे त्वरित उपलब्ध होतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील महत्त्वाच्या घडामोडींचे कव्हरेज आम्ही देतो. क्रीडा बातम्या (Krida Batmya) आणि रोमांचक माहितीसाठी नियमितपणे भेट द्या.

  • गोंडपीपरी तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला वनविभागाने केले जेरबंद

    गोंडपीपरी तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला वनविभागाने केले जेरबंद

    News34 chandrapur

    गोंडपीपरी – गोंडपिपरी तालुक्यातील वेजगावात मागील सात दिवसांपासून दहशत माजविणाऱ्या बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले असून आज पहाटे त्याला सापळा लाऊन पकडल्याची माहिती आहे.

     

    गेल्या आठवड्याभरापासून बिबट्याने गावात येत गावातील शेतकऱ्यांचे पाळीव जनावरांना आपले भक्ष करण्याचा सपाटा लावला होता..यामुळे गावातील नागरिक चांगलेच भयभीत होते.

     

    यामुळे भीतीपोटी शेतात जाणे सुद्धा बंद केले. मात्र, वनविभागाने घटनेची गंभीरता लक्षात घेता रात्रीची गस्त वाढवीत बिबट्याच्या गावात ये-जा करण्याच्या मार्गावर ट्रॅप कॅमेरा व पिंजरा लावण्यात आला होता आणि शेवटी आज पहाटे बिबट्याला पकडण्यात यश आले असून गावकऱ्यांनी सुटकेचा नी:श्वास सोडला.

    मात्र वेजगावं हा गाव जंगलालगत असल्यामुळे या घटनेत अधिक वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे..

  • हिवाळी अधिवेशन 2023 दरम्यान ‘एक दिवस एक आंदोलन’ दुसऱ्या दिवशी किल्ला संवर्धनाच्या मागण्यासाठी

    हिवाळी अधिवेशन 2023 दरम्यान ‘एक दिवस एक आंदोलन’ दुसऱ्या दिवशी किल्ला संवर्धनाच्या मागण्यासाठी

    News34 chandrapur

    चंद्रपूर : मागील अनेक वर्षात इको-प्रो च्या वेळोवेळी करण्यात आलेले आंदोलन व अद्याप प्रलंबित असलेल्या चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील मागण्या संदर्भात आंदोलन/सत्याग्रह करीत शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच जनसामान्यांचे समर्थन मिळविण्यासाठी आणि व्यापक जनजागृती व्हावी #हिवाळीअधिवेशन2023 #एकदिवसएकआंदोलन अश्या पद्धतीने संपूर्ण अधिवेशन काळात लक्षवेधी आंदोलनाची शृंखला सुरू करण्यात आलेली आहे.

     

    या शृंखलेतील दुसऱ्या दिवशी, आज सकाळी 7:30 ते 10:00 दरम्यान प्रतिकात्मक आंदोलन करीत किल्ला संवर्धन विषयक मागण्याकडे शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी इको-प्रोच्या कार्यकर्त्यांनी किल्ला भिंतीवर बसून बैठा सत्याग्रह केला. यावेळी इको-प्रो तर्फे सुरू असलेले किल्ला पर्यटन-हेरिटेज वॉक मार्गातील अडथळे दूर करीत पर्यटकांना सुरक्षित जाता यावे म्हणून परकोट भिंतीची दोन ठिकाणी दुरुस्ती त्वरित करावी, किल्ला भिंत व पुरातत्व विभागाने नव्याने बांधलेली संरक्षण भिंतिचे बांधकाम पूर्ण करण्यास त्या दरम्यानचे अतिक्रमण मुक्त करण्यास पंतप्रधान/मुख्यमंत्री आवास योजनेत घरे देण्यात यावे, किल्ला परकोट पासून शंभर मीटर पर्यंत बांधकामाची अट असली तरी बांधकाम होत असून यावर कुठलेही नियंत्रण नाही, नाहक नागरिकांना बांधकाम करताना त्रास होत आहे, यामुळे ऐतिहासिक स्मारक विषयी नकारात्मक भावना निर्माण होत असते, त्यावर उपाय म्हणून ही किल्ला परकोट भिंतीपासून बांधकाम ची 100 मीटर अट रद्द करून 3 ते 5 मीटर करण्याच्या मागण्या करण्यात आल्या.

     

    हिवाळी अधिवेशन दरम्यान इको-प्रो कडून करण्यात येत असलेली आंदोलन/सत्याग्रह पुढील काळात व्यापक व तीव्र असे आंदोलन करण्याचे नियोजीत आहे. आणि महत्वाचे म्हणजे संस्थेचे “आपला वारसा आपणच जपुया” या मुख्य उद्देशपुर्ती करिता असून आपला नैसर्गिक वारसा (जल, जंगल, जमीन, नदी, तलाव, वन्यजीव) व ऐतिहासिक वारसा (गड, किल्ले, मंदिरे, स्मारक व समाध्या) यासोबत शेतकरी, गावकरी, सर्वसामान्य नागरिक यांचे हिताचे प्रश्न करिता इको-प्रो चा लढा सुरू असून प्रत्येकांनी स्वतःची लढाई स्वतः लढावी, त्यांना प्रेरणा, स्फूर्ती मिळावी म्हणून सातत्यपूर्ण संयमाने लढे सुरू ठेवले पाहिजे म्हणून इको-प्रो चा लोकजागृतीकरिता लोकलढा सुरू आहे.

     

    चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक गोंडकालीन वारसा असलेला चांदागड किल्ला-परकोट जे इको-प्रो ने सतत 1020 दिवस स्वच्छता करीत किल्ला पर्यटन-हेरिटेज वॉक सुरू करीत स्थानिक पर्यटनाला एक दिशा दिली आहे. मात्र पुरातत्व विभाग व राज्य शासन कडून तसेच जिल्हा प्रशासन कडून स्थानिक पर्यटन विकास करिता अद्याप हवे तसे लक्ष दिले गेलेले नाही. एखादी संस्था जेव्हा निस्वार्थ भावनेतून व लोकसहभागातून काही करीत असेल तर त्यास आवश्यक ते सहकार्य करणे गरजेचे ठरते. या सात वर्षाच्या सातत्यपूर्ण कार्यात सतत पाठपुरावा करीत असलेल्या मागण्या संदर्भात आज किल्ला भिंतीवर बसून ‘बैठा सत्याग्रह’ तर श्रमदान करीत स्वच्छता सत्याग्रह करण्यात आले.

     

    या आंदोलनावेळी इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे, पुरातत्व विभाग प्रमुख रवींद्र गुरनुले यांच्या नेतृत्वात अब्दुल जावेद, अभय अमृतकर, ओमजी वर्मा, जयेश बैनलवार, सुनील पाटील, मनीष गावंडे, आकाश घोडमारे, राजू काहिलकर, कुणाल देवगिरकर, विजयहेडाऊ, स्वप्नील मेश्राम, सचिन धोतरे, प्रकाश निर्वाण, भूषण, चंदू आदी संस्थेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

  • Preventive Cardiologist तज्ज्ञ डॉ. सरबेरे यांच्या संशोधनाची जागतिक तज्ञांकडून दखल

    Preventive Cardiologist तज्ज्ञ डॉ. सरबेरे यांच्या संशोधनाची जागतिक तज्ञांकडून दखल

    News34 chandrapur

    चंद्रपूर : येथील Preventive Cardiologist तज्ञ डॉ. लक्ष्मीनारायण सरबेरे यांनी हृदयरोगावर आयुर्वेद उपचार पद्धती सक्षम असल्याचा संशोधनपर अहवाल यांनी सादर केला असून, दुबई येथे आयोजित तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत या संशोधनाची दखल घेतल्याची माहिती त्यांनी स्वत: चंद्रपुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

     

    ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत दुबई येथे जागतिक हृदय परिषद पार पडली. या परिषदेत डॉ. सरबेरे यांनी सादर केेलेला आयुर्वेदाने हृदयरोग बरा होऊ शकतो आणि विनाशस्त्रक्रिया उच्च गुणवत्तापूर्ण जीवन जगू शकतो, या आशयाचा अहवाल आपण सादर केला होता, असे डॉ. सरबेरे यांनी सांगितले.

     

    हा अहवाल संपूर्ण जगातील हृदयरुग्णांना आशेचा किरण दाखविणारा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. भारतात हृदयरोगाचे वाढते प्रमाण आणि हृदयरोगामुळे होणारे मृत्यू दर रोखण्यासाठी आयुर्वेद उपचार पद्धती अत्यंत उपयोगी सिद्ध होत असल्याचे त्यानी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेला माधवबागच्या संचालिका  डॉ. प्रीती सरबेरे यांच्यासह माधवबागचे सामाजिक आरोग्य अधिकारी संजय ठेकाळे उपस्थित होते.

  • चंद्रपुरात पसरली धुक्याची चादर

    चंद्रपुरात पसरली धुक्याची चादर

    News34 chandrapur

    चंद्रपूर – पहाटेपासून आज चंद्रपूर जिल्ह्यात धुक्याची चादर पसरली आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे वातावरणात बदल पाहायला मिळत आहे. ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस तर आज सकाळी मोठ्या प्रमाणात धुके पडले आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना अडचण निर्माण होत असून तापमानात घट झाली आहे.

    सकाळी बाहेर फिरायला पडलेले नागरिक सुद्धा आजचे वातावरण बघून संभ्रमात पडले, कधी पाऊस तर कधी पावसात थंडी असे बदल नागरिक आता रोज बघत आहे, मात्र अचानक घर, मार्ग, उद्यान हे आज धुक्याच्या चादरेखाली लपल्याने आता नेमका वातावरणात काय बदल होणार याबाबत नागरिकांची आज चर्चा रंगली होती.

     

    यावर चंद्रपुरातील पर्यावरण तज्ञ सुरेश चोपणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली…

     

    अवकाळी पाऊस व वातावरणात झालेला बदल यामुळे चंद्रपुरात धुक्याची चादर पसरली, हवेतील बाष्प मोठ्या प्रमाणात असल्याने आज चंद्रपुरात हा बदल झाला असून हे चित्र पुन्हा 2 दिवस दिसणार.

    सध्या दक्षिण भारतात वादळी पाऊस वाढल्याने राज्यात थंडीचे प्रमाण वाढण्याचे हे संकेत आहे अशी प्रतिक्रिया पर्यावरण तज्ञ सुरेश चोपणे यांनी news34 सोबत बोलताना दिली.

  • चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा गुड गव्हर्नन्स पुरस्काराने होणार सन्मान

    चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा गुड गव्हर्नन्स पुरस्काराने होणार सन्मान

    News34 chandrapur

    चंद्रपूर – दि सीएसआर जर्नलच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा सीएसआर जर्नल एक्सलन्स अवॉर्ड राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना प्रदान केला जाणार आहे. या पुरस्काराचे हे सहावे वर्ष आहे. ना. सुधीर मुनगंटीवार यांना ‘दि सीएसआर जर्नल चॅम्पीयन ऑफ गुड गव्हर्नन्स’ हा पुरस्कार सुशासन (सर्वोत्तम प्रशासन) राखण्यात यशस्वी ठरत असल्याबद्दल दिला जात आहे.

     

    मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज येथे येत्या शनिवार, दि. 9 डिसेंबरला देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री. मुनगंटीवार यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. प्रशासनाला विश्वासात घेऊन प्रत्येक शासकीय योजना, अभियान आणि उपक्रमांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचविण्यात श्री. मुनगंटीवार यांचा विशेष हातखंडा आहे. राज्य सरकारची कल्याणकारी योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यापासून ते गरजूंना शासनाकडून न्याय मिळवून देईपर्यंत प्रत्येक बाबतीत ते सातत्याने पाठपुरावा करीत असतात. त्यामुळेच दि सीएसआर जर्नलच्या वतीने उत्तम प्रशासनासाठी दिल्या जाणाऱ्या विशेष पुरस्कारासाठी श्री. मुनगंटीवार यांची निवड करण्यात आली आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. प्रसिद्ध कवी कुमार विश्वास, क्रिकेटपटू युवराज सिंह आणि मिथाली राज, अभिनेत्री भूमी पेडणेकर आदींना या विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

     

    महाराष्ट्राच्या वन,सांस्कृतिक आणि मत्स्यव्यवसाय या तीनही खात्यांचा माध्यमातून ना.सुधीर मुनगंटीवार यांनी ऐतिहासिक अन् धडाडीचे निर्णय घेतले आहे . मग अफजलखानाच्या कबरीचे अतिक्रमण हटविणे असो वाघनखे आणण्याचा केलेला लंडन येथील सामंजस्य करार,रायगडावर भव्यदिव्य केलेला शिवराज्यभिषेक सोहळा तसेच‘हॅलो’ऐवजी ‘वंदे मातरम्’, आपल्या देशातील संसदेला आणि अयोध्येतील श्रीराम मंदिराला चंद्रपूर – गडचिरोली जिल्ह्यातून काष्ठ पाठविण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार,’जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताला राज्यगिताचा दर्जा आणि आता घेण्यात येणाऱ्या तालुकास्तरावर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा अश्या निर्णयामुळे ना. सुधीर मुनगंटीवार हे चॅम्पीयन ऑफ गुड गव्हर्नन्स या पुढाकाराचे खरे मानकरी ठरतात अशी भावना व्यक्त होत आहे.

     

    चंद्रपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

    चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना यापूर्वीही अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. आता आणखी एका प्रतिष्ठेच्या पुरस्काराची भर पडल्यामुळे चंद्रपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे, अशी ऊत्स्फूर्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

    कर्तृत्वाचा गौरव

    ना. श्री. मुनगंटीवार यांना 1999 मध्ये महाराष्ट्र विधानसभेचे सर्वश्रेष्ठ वक्ता म्हणून गौरविण्यात आले होते. यासोबतच दि नॅशनल फेडरेशन ऑफ द ब्लाईंडचा मेमोरियल अवॉर्ड आफ्टरनून व्हॉईसच्या वतीने बेस्ट परफॉर्मिंग पॉलिटिशियन, लोकमत आणि ज्युनियर चेंबर इंटरनॅशनलच्या वतीने ‘मॅन अॉफ द इयर’,महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रातील प्रगतीसाठी इंडिया टूडे सारख्या प्रतिष्ठीत समूहाने दोन वेळा पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. मॅग्ना प्रकाशन संस्था व होथूर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘सोसायटी एक्सलेन्स’ दिव्यांगांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल लेफ्टनंट जी. एल. नर्डेकर स्मृती पुरस्कार, वृक्षलागवडीच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल छाया दीक्षित फाउंडेशन चा विशेष पुरस्कार ,सामाजिक व राजकीय क्षेत्रातील दीर्घ सेवेसाठी कर्मवीर मा. सा. कन्नमवार स्मृती पुरस्कार, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज द्वारा व्यापार मित्र पुरस्कार अशा विशेष पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

  • एसएनडीटी महिला विद्यापीठ, बल्लारपूर कॅम्पस येथे “सी- प्रोग्रामिंग” या विषयावर व्याख्यान संपन्न

    एसएनडीटी महिला विद्यापीठ, बल्लारपूर कॅम्पस येथे “सी- प्रोग्रामिंग” या विषयावर व्याख्यान संपन्न

    News34 chandrapur

    चंद्रपूर/बल्लारपूर – एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ मुंबईचे महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल, बल्लारपूर येथे दिनांक ६ डिसेंबर रोजी बीसीए च्या विद्यार्थिनी  करिता “सी- प्रोग्रामिंग” या विषयावर सेमिनार आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते. बोलतांना त्यांनी संगणक कौशल्यावर आजच्या विद्यार्थ्यांनी फोकस करावा सोबतच संगणक कौशल्य ही काळाची गरज असल्याचे विषद केले.

    यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बल्लारपूर आवारचे संचालक डॉ. राजेश इंगोले उपस्थित होते. प्रमुख वक्ता म्हणून स्व. डॉ. सचिदानंद मुनगंटीवार रात्रपाळी महाविद्यालय, चंद्रपूर चे प्रभारी प्राचार्य संतोष शिंदे उपस्थित होते. यावेळी समन्वयक वेदानंद अलमस्त आणि संगणक विभागाच्या प्रमुख सहाय्यक प्राध्यापिका नेहा गिरडकर उपस्थित होते.

     

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक वेदानंद अलमस्त यांनी व्यक्त केले,  सोबतच विद्यार्थिनिना संगणक कौशल्य याबाबत महत्व पटवून दिले. प्रमुख वक्ता म्हणून लाभलेले प्राध्यापक संतोष शिंदे यांनी संगणक कौशल्यासोबतच सी –प्रोग्रामिंग याबाबत विद्यार्थिनिना मार्गदर्शन केले. यात त्यांनी सी –प्रोग्रामिंगची गरज आणि आधुनिक काळात होणारे बदल यावर यावर आपले मत व्यक्त केले.

     

    कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत संचालक डॉ. राजेश इंगोले यांनी व्यक्त केले तसेच  भविष्यात संगणक कौशल्य तंत्रज्ञानाचा वापर करून जगात अव्वल राहण्याचे काम कसे करता येईल यावर भर देण्याचे आवाहन सुध्दा केले आणि  भविष्यात असे नव-नवीन उपक्रम वेळोवेळी राबविण्याचे आश्वासन सुध्दा दिले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापिका शितल बिल्लोरे तसेच आभार प्रदर्शन सहाय्यक प्राध्यापिका नेहा गिरडकर यांनी केले.

  • चंद्रपूरमधील ऐतिहासिक रामाळा तलावाच्या संवर्धनासाठी इको-प्रोचे आंदोलन

    चंद्रपूरमधील ऐतिहासिक रामाळा तलावाच्या संवर्धनासाठी इको-प्रोचे आंदोलन

    News34 chandrapur

    चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक गोंडकालीन रामाळा तलावाच्या संवर्धनासाठी इको-प्रोने हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने रोज ‘एक दिवस एक आंदोलन’ आंदोलनाची साखळीची सुरुवात केली. या आंदोलनाच्या पहिल्या दिवशी, इको-प्रोच्या सदस्यांनी रामाळा तलावाच्या काठावर निदर्शने आंदोलन करत एसटीपी बांधकामाला तातडीने सुरुवात करण्याची मागणी केली आहे.

     

    इको-प्रोचे बंडू धोतरे यांनी सांगितले की, रामाळा तलाव शहराच्या मध्यभागी असून तो शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. मात्र, या तलावात मच्छीनाला आणि जलनगरमधून येणारे सांडपाणी सोडले जात आहे. यामुळे तलाव प्रदूषित होत आहे. तलावात वाढणारी इकॉर्नीया, भुजलाचे प्रदूषण, तलावाच्या लगतच्या जलस्त्रोत प्रदूषित होणे, तलावाच्या घाण पाण्याची दुर्गधी यासारख्या समस्या निर्माण होत आहेत. रामाळा तलावाच्या इको-प्रोच्या सत्याग्रह-आंदोलन नंतर जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आश्वासन नंतर फक्त खोलीकरण झाले, मात्र सांडपाणी मुक्त करण्यास ‘एसटीपी’ बांधकाम प्रस्ताव मात्र प्रलंबित आहे.

     

    इको-प्रोने या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी यापूर्वीही अनेक आंदोलने केली आहेत. मात्र, प्रशासनाने या समस्यांवर खोलकरण वगळता कोणतीही ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे इको-प्रोने हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने ‘एक दिवस एक आंदोलन’ आंदोलनाची साखळीची सुरुवात केली आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून इको-प्रो प्रशासनाकडे रामाळा तलावाच्या संवर्धनासाठी आवश्यक ती पावले उचलायला सांगणार आहे.

     

    आंदोलनात सहभागी झालेल्या इको-प्रोच्या कार्यकर्त्यांनी ‘एसटीपी चे बांधकाम, रिटेंनीग वॉल चे बांधकाम त्वरीत पुर्ण करा’, ‘वाचवा वाचवा ऐतिहासीक रामाळा तलाव वाचवा’, ‘मुक्त करा मुक्त करा रामाळा तलाव प्रदुषणमुक्त करा’ अशा घोषणा दिल्या.

     

    इको-प्रोने या आंदोलनाच्या निमित्ताने विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद अध्यक्ष, मुख्यमंत्री, पालकमंत्री, आमदार, जिल्हाधिकारी यांना निवेदन पाठविन्यात येणार आहे. या निवेदनात त्यांनी रामाळा तलावाच्या संवर्धनासाठी एसटीपी बांधकामाला तातडीने सुरुवात करण्याची मागणी केली आहे. या मागण्याबाबत लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही इको-प्रोने दिला आहे.

     

    या आंदोलनात इको-प्रोचे बंडू धोतरे, नितीन रामटेके, अब्दुल जावेद, रवी गुरनुले, कुणाल देवगिरकर, जयेश बैनलवार, सुनील पाटील, मनीष गावंडे, प्रमोद देवांगण, आकाश घोडमारे, राजू काहिलकर, स्वप्नील मेश्राम, सचिन धोतरे, मनीषा जैस्वाल, खुशबू जैस्वाल, प्रगती मार्कंडवार, प्रकाश निर्वाण, अतुल इंगोले, संदीप इंगोले, सुबोध संगमवार, शुभम खोब्रागडे, विशाल किन्नाके आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

     

    हिवाळी अधिवेशन निमित्त विधानसभा अध्यक्ष, विधानपरिषद अध्यक्ष, मुख्यमंत्री व पर्यावरणमंत्री यांचेकडे इको-प्रोची राज्यव्यापी मागणी केली आहे.

    “चंद्रपूरसह राज्यातील अन्य अनेक शहरातील तलावांची सुध्दा हीच अवस्था असल्याने ही सर्व तलावे प्रदुषणमुक्त, सांडपाणीमुक्त करीत त्याचे पर्यावरणीयदृष्टया महत्व जाणुन संवर्धन करणेकरीता ‘महाराष्ट्र शहरी तलाव सांडपाणी-प्रदुषणमुक्त योजना’ राबविणे काळाची गरज आहे. राज्यातील शहरा-शहरातील हा तलावाच्या स्वरूपातील नैसर्गीक व ऐतीहासीक वारसा नष्ट होण्यापासुन वाचविण्यासाठी शासनाचा मोठा उपक्रम ठरू शकेल. या संदर्भात राज्य शाशनाने अभियान राबवित दर्लक्षित व नष्ट होऊ पाहणारे तलावांना नवसंजीवणी देण्यात यावे” बंडू धोतरे, अध्यक्ष इको-प्रो चंद्रपूर

  • आग लागली तर अग्निरोधक कसे वापरणार?

    आग लागली तर अग्निरोधक कसे वापरणार?

    News34 chandrapur

    गडचांदूर – अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ कंपनी तर्फे सामाजिक दायित्वांच्या कार्याद्वारे विविध उपक्रम राबविले जातात त्याचाच एक भाग म्हणून 6 डिसेम्बर रोजी घरगुती आग सुरक्षा मार्गदर्शन कार्यक्रम महात्मा गांधी जुनिअर कॉलेज गडचांदूर येथे राबविण्यात आला.

     

    या कार्यक्रमात आग कशी लागू शकते, लागल्यास त्या पासून काय हानी होऊ शकते व त्यावरती आपण काय उपाययोजना करू शकतो हे प्रात्यक्षिका द्वारे माणिकगड सिमेंट वर्क्सच्या विभागाने शाळेतील एकूण 700 विध्यार्थी आणि शिक्षकांना समजवून सांगितले.

     

    प्रात्यक्षिकात आग लागल्यावर अग्निरोधक कसे वापरावे हे विध्यार्थी व शिक्षक वर्ग याना समजवून सांगितले,  कार्यक्रमा दरम्यान मुलांना याबाबत प्रश्न विचारण्यात आले आणि विध्यार्थ्यांना पुरस्कृत सुद्धा करण्यात आले.

     

    यावेळी प्राचार्य चिताडे मॅडम यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की हा उपक्रम अतिशय उपयुक्त असून या पासून आम्हाला व विध्यार्थ्यांना घरगुती आग व सुरक्षे बद्दल मोलाचे मार्गदर्शन मिळाले. सर्व शिक्षक वर्गानी या कार्यक्रमांची मनसोक्त प्रशंसा केली व असे उपक्रम पुन्हा पुन्हा राबवावे अशी विनंती सुद्धा केली.

     

    या कार्यक्रमा प्रसंगी प्राचार्य ,स्मिता चिताडे मॅडम, उप प्राचार्य माहुरे सर तसेच माणिकगढ संघ आणि शाळेतील शिक्षक व विध्यार्थी वर्ग उपस्थित होते.

  • चंद्रपूर महानगरपालिकेत ‘फाऊंटेन घोटाळा’

    चंद्रपूर महानगरपालिकेत ‘फाऊंटेन घोटाळा’

    News34 chandrapur

    चंद्रपूर : चंद्रपूर शहराच्या जटपूरा प्रभागातील प्रियदर्शनी चौक, हिंदुस्तान लालपेट प्रभागातील कामगार चौक, तुकुम प्रभागातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, शास्त्रीनगर प्रभागातील एसटी वर्कशॉप जवळील शहीद भगतसिंग चौक,भानापेठ प्रभागातील रामाळा तलाव या ठिकाणी फाउंटेन उभारणी व बांधकामाच्या कामा करिता 17 फेब्रुवारी 2023 रोजी चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे एक निविदा प्रसिद्ध करण्यात आली. एकूण जवळपास सव्वादोन कोटी रुपये अंदाजपत्रकीय किंमत असलेल्या या निविदा प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी दिनांक 6 डिसेंबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केला. मर्जीतल्या कंत्राटदाराला काम देण्यासाठी आयुक्त बिपिन पालीवाल यांनी या निविदा प्रक्रियेत अनेक नियम पायदळी तुडवले, अंदाजपत्रकामध्ये चार-चार पटीने कामाची किंमत वाढवून अवास्तव दर टाकले तसेच निविदा प्रक्रियेत अपात्र ठरणाऱ्या मर्जीतील कंत्राटदाराला पात्र केले व पात्र असलेल्या इतर कंत्राटदारांना हेतू पुरस्कार अपात्र ठरविल्याचा आरोप माजी नगरसेवक देशमुख यांनी केलेला आहे. या संपूर्ण घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करून आयुक्त बिपिन पालीवाल यांचे विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी जनविकास सेनने केली. याबाबत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा जनविकास सेनेने दिलेला आहे.

     

    असा झाला घोटाळा…

     

    नागपूर येथील प्रशांत मद्दीवार यांच्या एजन्सीला फाउंटेन उभारणी व बांधकामाचे काम देण्यासाठी नियमांना बगल देण्यात आल्याचा आरोप देशमुख यांनी केलेला आहे.
    प्रशांत मद्दीवार या एजन्सीकडे पुरेसा अनुभव नसल्यामुळे निविदा प्रक्रियेत जाणीवपूर्वक ‘जॉईंट व्हेंचर’ ची तरतूद करण्यात आली.
    प्रशांत मद्दीवार या एजन्सीने दिल्ली येथील ‘एक्वारियस टेक्नॉलॉजी’ या एजन्सी सोबत जॉईन वेंचर चे पत्र सादर केले.

    मात्र याच निविदा प्रक्रियेत ‘एक्वारस टेक्नॉलॉजी’ या एजन्सीने एम एस भांडारकर व अंकुश गोडबोले यांच्या एजन्सी सोबत सुद्धा जॉईन्ट वेंचरचे पत्र दिले. एका निविदा प्रक्रियेमध्ये एखाद्या एजन्सीला एकाच कंत्राटदारासोबत जॉईंट वेंचर करता येते. त्यामुळे एक्वारस टेक्नॉलॉजी सोबत जॉईन वेंचर करणाऱ्या तीनही एजन्सीला अपात्र ठरविणे गरजेचे होते. परंतु तसे करण्यात आले नाही.

     

    निविदा प्रक्रियेत पात्र ठरण्यासाठी शासकीय, निमशासकीय कार्यालय किंवा महामंडळामध्ये निविदेतील कामाच्या किमतीच्या 80% चे एक काम किंवा 50% चे दोन काम किंवा 40% ची तीन कामे पूर्ण केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. प्रशांत मद्दीवार या एजन्सीने काम पूर्ण केल्याचे पत्र सादर केले नाही. केवळ चार लक्ष रुपयांचे कार्यादेश जोडले. निविदा प्रक्रियेत कार्यादेश ग्राह्य धरण्यात येत नाही. काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देणे आवश्यक असते. प्रशांत मद्दीवार या एजन्सीकडे पुरेशा किमतीचे काम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र नसतानाही या एजन्सीला पात्र ठरवून प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी वेळ देण्यात आला.

     

    या निविदा प्रक्रियेतील चार कामे प्रशांत मद्दीवार या एजन्सीला अंदाजपत्रकीय किमतीपेक्षा केवळ 0. 91 टक्के कमी दराने मंजूर करण्यात आले. प्रियदर्शनी चौक ,कामगार चौक व एसटी वर्कशॉप येथिल कामांची काही देयके सुद्धा अदा केली आहे. आयुक्त बिपिन पालीवाल यांनी अशा प्रकारे कंत्राटदाराशी संगनमत करून शासकीय निधीची अफरातफर केल्याने त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी देशमुख यांनी केलेली आहे.

     

    कामाच्या प्रत्यक्ष किमतीपेक्षा अंदाजपत्रकात लाखो रुपयांची वाढ

     

    निविदा प्रक्रिया प्रसिद्ध करताना शेड्युल बी या प्रपत्रा मध्ये कामाचे सविस्तर दर दर्शवून त्याची बेरीज केली जाते. ही बेरीज म्हणजेच या कामाची एकूण अंदाजपत्रकीय किंमत असते.
    अंदाजपत्रकीय किंमत ‘बिल ऑफ कोटेशन’ म्हणजेच बीओक्यू या प्रपत्रा मध्ये दर्शविण्यात येते. कंत्राटदार मध्ये दर टाकून निविदा प्रक्रियेत भाग घेतात.
    शेड्युल बी मध्ये कामाची एकूण किंमत व बीयुकीमध्ये टाकलेली किंमत एकच असणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र या निविदा प्रक्रियेत शेड्युल बी पेक्षा लाखो रुपयांनी अधिक किंमत बीओक्यू मध्ये टाकण्यात आली. अंदाजपत्रकामध्ये अशा प्रकारे लाखो रुपये वाढवून कंत्राटदाराला लाभ पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला.

     

    पात्र ठरणाऱ्या चांगल्या कंपन्यांना अपात्र केले

     

    या निविदा प्रक्रियेत भाग घेणारी अहमदाबाद येथील क्लासिक फाऊंटेन व लखनऊ येथील त्रिवी फाउंटेन या एमएसएमई या वर्गात मोडणाऱ्या कंपन्या आहेत. अशा कंपन्यांना प्राधान्य देण्याचे सरकारचे धोरण आहे. या कंपन्यांना अनामत रक्कम मधून सूट सुद्धा देण्यात येते. या दोन्ही एजन्सीज कडे करोडो रुपयांची कामे करण्याचा अनुभव आहे. तसेच या दोन्ही एजन्सी स्वतः फाउंटेन तयार करणाऱ्या कंपन्या आहेत. मात्र या दोन्ही एजन्सीला निविदा प्रक्रियेत अपात्र ठरविण्यात आले.शरद काळे या नागपूरच्या एजन्सीला सुद्धा अशाच प्रकारे अपात्र केले. अपात्र ठरवताना कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार या एजन्सीज सोबत केला नाही. एकतर्फी कारवाई करण्यात आली. आपल्या मर्जीतील प्रशांत मद्दीवार व स्वयंभू या एजन्सीला लाभ पोहोचवण्यासाठी आयुक्त बिपिन पालीवाल यांनी सर्व नियम पायदळी तुडवले.

  • सरकारच्या चहापानावर बहिष्कार; महाविकास आघाडीची भूमिका

    सरकारच्या चहापानावर बहिष्कार; महाविकास आघाडीची भूमिका

    News34 chandrapur

    नागपूर  :-राज्यावर दुष्काळ, पाणीटंचाई व अवकाळीचे संकट उभे ठाकले असून शेतकऱ्यांच्या डोळयात अश्रु आहेत. अशा वेळी शेतकऱ्यांची झोप उडाली असताना सरकार मात्र सुस्त आहे.  शेतकऱ्यांची ही दुर्देवी परिस्थिती असताना सरकारने चहापानाचा कार्यक्रम टाळायला हवा होत.  हा कार्यक्रम टाळला असता तर शासन  शेतकऱ्यांबरोबर असल्याचा दिलासा राज्यातील शेतकरी, शेतमजूर यांना मिळाला असता. दुर्देवाने सरकारने शेतकऱ्याप्रती ही संवेदनशीलता दाखवली नाही. पण संपूर्ण राज्यातील शेतकरी दुष्काळ, पाणीटंचाई व अवकाळीचे चटके भोगत असताना आम्ही चहापान कार्यक्रमास उपस्थित राहणे हा संकटात होरपळत असलेल्या शेतकऱ्याप्रती द्रोह ठरेल. त्यामुळे चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची भूमीका महाविकास आघाडी सरकारने घेतली आहे. असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
    आज नागपूर येथील रविभवन येथे अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत श्री. वडेट्टीवार बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आमदार बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जयंत पाटील, आमदार अनिल देशमुख, शिवसेनेचे आमदार सुनिल प्रभू, शेकापचे जयंत पाटील, आमदार राजेश राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.
    श्री. वडेट्टीवार म्हणाले की, राज्यावरील वाढलेले कर्ज, शेतकऱ्यांची दैन्यावस्था, शेती क्षेत्राची दुरावस्था, शासकीय रुग्णालयात  मृत्यूतांडव, राज्यातील पाणीटंचाई परिस्थीती, स्मारकांची स्थिती, आरक्षणाबाबतची असंवेदनशीलता, अल्पसंख्यांकाबाबत नकारात्मक दृष्टीकोन, कंत्राटी भरती व बेरोजगारीमुळे युवकांमधील  वाढता  रोष,  कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे, सरकारची प्रसिध्दीची हाव, स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक, अंतर्गत सत्ता स्पर्धेचे दुष्परीणाम, विदर्भातील कापूस, धान उत्पादक शेतकऱ्यांवरील संकट, अशा अनेक समस्या असताना सरकार चहापान कार्यक्रम करत आहे. यावरून सरकारचा संवेदनशिलपणा हरविल्याचे दिसून येते.
    छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्राची ओळख दंगलग्रस्त महाराष्ट्र अशी ओळख या महायुती सरकारने केली. पुरोगामी महाराष्ट्रात सर्वात जास्त दंगली झाल्या. महाराष्ट्रात २०२२ मध्ये दंगलीच्या तब्बल ८ हजार २१८ प्रकरणांची नोंद झाली आहे. ही त्या वर्षातल्या देशातील सर्वाधिक नोंद असल्याची केंद्रीय गृहमंत्रालयाच्या माहिती आहे. महायुती  सरकार आल्यावर राज्यात दंगली, बलात्काराच्या घटनेत वाढ झाली. संत्रा नगरी असलेल्या नागपूरची ओळख आता चोरांची राजधानी अशी झाली आहे. जर महाराष्ट्राची ही ओळख होत असेल तर या राज्यात  गुंतवणूक कशी येणार? उद्योग कसे येणार? असा सवाल श्री. वडेट्टीवार यांनी केला.
    श्री. वडेट्टीवार म्हणाले, महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या झाल्याची माहिती एनसीआरबीच्या अहवालात समोर आली आहे. गरीबी, बेरोजगारीमुळे जगणं असह्य झाल्याने अनेकांनी आत्महत्या केल्याचं अहवालात म्हटलं आहे. महाराष्ट्रात एका वर्षात 22,746 आत्महत्या झाल्याची नोंद आहे. कर्जबाजारीपणाच्या विळख्यात अडकून आणि दिवाळखोरीमुळे आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. शेती क्षेत्रात दर तासाला एकापेक्षा जास्त शेतकरी आणि शेतमजूर आत्महत्या करतात. याला म्हणतात दिव्याखाली अंधार. NCRB आकडेवारी नुसार २०२२ वर्षात राज्यात सगळ्यात जास्त नागपूर मध्ये २ हजार ५०३ चोरीच्या घटना झाल्या आहेत. महायुती सरकार आल्यावर महाराष्ट्र राज्याच्या प्रतिमेला काळीमा फासला आहे.
    नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा अहवालानुसा महाराष्ट्र खुनाच्या घटनेत तिसरा, बलात्कारात चौथ्या क्रमांकावर, सायबर गुन्ह्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. मराठवाड्यात बीडमध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या. सर्वाधिक दुष्काळ. तरीही शासन आपल्या दारी कार्यक्रमात प्रचंड उधळपट्टी. ही उधळपट्टी म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर तिखट-मीठच सरकारने चोळले. उधळपट्टी ऐवजी शेतकऱ्यांना सरकारने मदत करावी, असेही श्री. वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
    श्री. वडेट्टीवार म्हणाले, राज्यातील प्रत्येक माणसाच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा वाढला असुन सरकारच्या उधळपट्टीमुळे राज्याची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. शासनाचे आरोग्य व्यवस्थेकडे होणारे दुर्लक्ष हे महाराष्ट्र सारख्या प्रगत राज्याला भूषणावह नाही हे खेदाने म्हणावे लागते. महाराष्ट्र हे फुले, शाहु, आंबेडकरांच्या पुरोगामी  विचाराचा वारसा जपणारे  राज्य असून या सरकारने मात्र जाती जाती मध्ये संघर्ष निर्माण करण्याचे काम सुरु केले आहे. मराठा व ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत बोटचेपेपणाची भूमिका घेतल्याचे दिसते. त्यामुळे मराठा व ओबीसी समाजामध्ये सरकार बद्दल प्रचंड रोष आहे.
    जनतेचे प्रश्न सरकारला सोडवता न आल्याने सरकारी तिजोरीतून आपली पाठ थोपठून घेण्याचा प्रयत्न शासन आपल्या दारी या योजनेद्वारे सुरु आहे. यामध्ये राज्य सरकार जनतेची कामे न करता जाहिरातबाजीवर भर देत आहे. “शासन आपल्या दारी” योजनेचा फोलपणा दिसून येत आहे. आपल्या सरकारची कामगिरी खोटी असून प्रसिध्दी मात्र मोठी आहे. राज्य सरकारमधील अंतर्गत मतभेद, मंत्र्याची विसंगत  विधाने, एकमेकांवर होणारी कुरघोडी, अंतर्गत सत्तास्पर्धा व हेवेदाव्यांमुळे प्रशासनाचे तीन  तेरा वाजले आहेत.  एकंदरीतच फुले, शाहु, आंबेडकरांच्या विचारांना काळिमा फासण्याचे काम आपल्या सरकार मार्फत केले जात आहे. चोर-चोर भाऊ-भाऊ सरकारची तिजोरी लुटून खाऊ, अशी या सरकारची अवस्था असल्याचा हल्लाबोल श्री. वडेट्टीवार यांनी केला आहे.