Category: राजकारण

महाराष्ट्रातील राजकारण बातम्या (Maharashtra Politics News) आणि राष्ट्रीय स्तरावरील सर्व राजकीय घडामोडींसाठी news34.in हे आपले विश्वसनीय व्यासपीठ आहे. आम्ही तुम्हाला स्थानिक ग्रामपंचायत निवडणुकांपासून ते लोकसभा निवडणुकीपर्यंतच्या प्रत्येक मोठ्या-छोट्या अपडेट्सचे कव्हरेज देतो. राजकीय विश्लेषण, पक्षांची धोरणे, नेत्यांची मते आणि महत्त्वाचे शासकीय निर्णय. कोणत्याही राजकीय बातम्या चुकणार नाहीत याची खात्री बाळगा. राजकारण या क्षेत्रातील विश्वसनीय आणि ताज्या बातम्या मिळवण्यासाठी नियमितपणे भेट द्या.

  • Shiv Sena Thackeray group : चंद्रपूर जिल्हा शिवसेनेत 3 तिघाडा, पदाधिकारी निघाले राजीनामा द्यायला

    Shiv Sena Thackeray group : चंद्रपूर जिल्हा शिवसेनेत 3 तिघाडा, पदाधिकारी निघाले राजीनामा द्यायला

    Shiv Sena Thackeray group 27 जूनला सामना मुखपत्रातून चंद्रपूर जिल्ह्यातील 6 विधानसभा क्षेत्रातील जिल्हाप्रमुखाच्या नियुक्ता जाहीर करण्यात आल्या.

    यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात 2 जिल्हाप्रमुख होते मात्र आता 3 जिल्हाप्रमुख यांची नियुक्ती करण्यात आल्याने 2 जिल्हाप्रमुखानी या विरोधात बंड करीत स्वतः व 100 पदाधिकारी यांचे राजीनामे सोबत घेत थेट मुंबईला रवाना झाले.

    अवश्य वाचा : चंद्रपुरातील या आमदाराच्या कृतीने भारावले शिक्षक

    राज्यात 2 महिन्यानंतर विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे त्यापूर्वी ठाकरे गटातील या नियुक्ती ने चंद्रपुरात खळबळ उडाली आहे.

     

    Shiv Sena Thackeray group जिल्ह्यातील 6 विधानसभेतील वरोरा, चिमूर व ब्रह्मपुरी ची जबाबदारी मुकेश जीवतोडे व चंद्रपूर, बल्लारपूर व राजुऱ्याची जबाबदारी संदीप गिर्हे यांच्यावर आहे, आता नव्या नियुक्ती मध्ये चंद्रपूर व वरोरा विधानसभेची जबाबदारी रवींद्र शिंदे कडे देण्यात आली असून चिमूर-ब्रह्मपुरी मुकेश जीवतोडे व बल्लारपूर व राजुरा विधानसभा संदीप गिर्हे यांच्याकडे आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटल बाबत महत्वाची माहिती 

    याबाबत संदीप गिर्हे यांनी सांगितले की आज सकाळी सदर प्रकार आम्हाला कळला असता आम्ही याबाबत पूर्व विदर्भ सम्पर्क प्रमुख आमदार भास्कर जाधव व सम्पर्क प्रमुख प्रशांत कदम यांच्याशी संपर्क साधत याबाबत विचारणा केली मात्र त्यांनी सांगितले की सदर नियुक्ती आम्हाला विश्वासात न घेता करण्यात आली आहे याबाबत आम्ही पक्षप्रमुख यांच्याशी चर्चा करणार आहे, असे त्यांनी सांगितले.

     

    Shiv Sena Thackeray group गिर्हे म्हणाले की आमचं असं काय चुकलं, आम्ही अनेक वर्षांपासून शिवसैनिक म्हणून काम करीत आहो, कार्यकर्ता ते जिल्हाप्रमुख अशी जबाबदारी आज पाळत आहो, मात्र सदर नियुक्ती ही अन्यायकारक आहे याबाबत आम्ही आमचे राजीनामे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपविणार आहो.

     

    नवे जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांच्याशी सम्पर्क केला असता ते म्हणाले आज पक्षाला संघटन बांधणीची गरज आहे, सध्या विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते, यासाठी आधी आपल्याला पक्ष संघटनेकडे लक्ष देणे गरजेचे आहे, पक्षाने जी जबाबदारी दिली ती एक कार्यकर्ता म्हणून मी पार पाळणार आहो. कोरोना काळात आम्ही नागरिकांची सेवा केली, सहकार क्षेत्र असो की कृषी उत्पन्न बाजार समिती अश्या अनेक निवडणुका आम्ही एकहाती जिंकल्या, त्यामुळे आम्ही पक्षाला याबाबत आमचं काम दाखविले आहे.

  • MP Pratibha Dhanorkar : संविधानाचा जयघोष प्रतिभा धानोरकर यांनी घेतली खासदारकी ची शपथ

    MP Pratibha Dhanorkar : संविधानाचा जयघोष प्रतिभा धानोरकर यांनी घेतली खासदारकी ची शपथ

    MP Pratibha Dhanorkar चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेसह भारतात सर्वच ठिकाणी लोकसभेच्या निवडणूक पार पडून खासदार म्हणून अनेक पक्षाचे नेते  निवडून आले. त्यात कॉग्रेसच्या चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेच्या खासदार म्हणून प्रतिभा धानोरकर निवडून आल्या. त्यांनी आज संसदेच्या नविन इमारतीत आपल्या सदस्य पदाची शपथ घेतली.

    चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार पदी प्रतिभा धानोरकर ह्या भरघोस मतांनी निवडून आल्या. त्यांनी जनतेच्या अनेक कामांना सुरुवात देखील केली. त्यांच्या कार्याची खरी सुरुवात आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजून 13 मिनीटांनी शपथ घेऊन झाली.

    अवश्य वाचा : कांग्रेस नेत्याने चंद्रपूर जिल्ह्यातील पत्रकाराला दिली जीवे मारण्याची धमकी

    MP Pratibha Dhanorkar निवडणूकी दरम्यान देखील संविधान वाचविण्याची शपथ घेणाऱ्या धानोरकर यांनी नविन संसद भवनात नतमस्तक होऊन प्रवेश केला व आपल्या पदाची शपथ घेऊन जह हिंद जय संविधान चा नारा देऊन आपली लढाई हि लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी असेल असे देखील सांगितले. संसद भवनाच्या नविन इमारतीत आज अनेक खासदारांनी आपल्या सदस्य पदाची शपथ घेतली. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी देखील मराठी भाषेतून शपथ घेऊन मराठा भाषेचा सन्मान जागविला.

    अवश्य वाचा : वेकोली मध्ये तुकडेबंदी कायद्याची अवहेलना

    भविष्यात संविधानाच्या रक्षणासाठी संसदेत आज बुलंद करणार असून आपल्या क्षेत्राच्या विकासासाठी सदैव कटिबध्द असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी पुनःश्च एकदा जनतेचे आभार मानून मी माझ्या नव्या राजकीय जीवनाला सुरुवात करीत असल्याचे सांगितले.

  • Minister sudhir mungantiwar : मुनगंटीवार यांना आराम हवा पण टायगर अभि जिंदा है – सुधीर मुनगंटीवार

    Minister sudhir mungantiwar : मुनगंटीवार यांना आराम हवा पण टायगर अभि जिंदा है – सुधीर मुनगंटीवार

    Minister sudhir mungantiwar मोदीजी पंतप्रधान होऊ नयेत यासाठी पाकिस्तानमध्ये लोक प्रार्थना करत होते. भारतातही काही लोक मुस्लीम, आदिवासी बांधवांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होते. काँग्रेसने खोट्या प्रचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. याच खोट्या प्रचाराच्या आधारावर काँग्रेसने देशात काही जागा जिंकल्या.

     

    पण काँग्रेसच्या गेल्या तीन निवडणुकांची बेरीजही २४० होत नाही. उलट जनतेने पुन्हा एकदा देशगौरव पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातील भाजप आणि मित्र पक्षांना पूर्ण बहुमत दिले. मोदी सरकारचा हा विजयी शंखनाद देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आहे, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

    Sudhir mungantiwar bjp
    बल्लारपूर विजयी शंखनाद सभेत मार्गदर्शन करताना पालकमंत्री मुनगंटीवार

    Minister sudhir mungantiwar लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारच्या सलग तिसऱ्या विजयानिमित्त उत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी ना. श्री. मुनगंटीवार बोलत होते. या कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते चंदनसिंग चंदेल, भाजपचे जिल्हाध्यक्ष हरिष शर्मा, भाजप नेते शिवचंद द्विवेदी, काशीनाथ सिंह, रणंजय सिंग, शिवसेना नेते कमलेश शुक्ला, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राकेश सोमाणी, महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस विद्याताई देवाळकर, महिला अध्यक्ष वैशालीताई जोशी, बल्लारपूर नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल वाघ यांच्यासह नीलेश खरबडे, मनीष पांडे, देवेंद्र वाटकर, प्रदेश सदस्य रेणुकाताई दुधे, आशीष देवतळे, राजूभाई दारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

    अवश्य वाचा : कर्नाटक एमटा प्रशासन अखेर नरमले, प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सुटणार

    ‘देशातील जनतेच्या मतदानरुपी आशीर्वादाने जननायक मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. ७.१२ मिनिटांनी पंतप्रधान मोदीजी राष्ट्रपती भवनात शपथ घेण्यासाठी पुढे जात होते तेव्हा मला ताडोबातील वाघाची आठवण आली. एखाद्या वाघाप्रमाणे ते भासत होते. आणि हा सोहळा प्रत्यक्ष अनुभवण्याचे भाग्य मला लाभले,’ अशा भावना ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.

    Minister sudhir mungantiwar ते पुढे म्हणाले, ‘सरकार स्थापन झाल्याबरोबर सर्वांत पहिले आणखी ३ कोटी गरिबांना घरे देण्याचा निर्णय एनडीए सरकारने घेतला. तिकडे काँग्रेसने प्रचारात महिलांना ८ हजार ५०० रुपये खटाखट देण्याच्या घोषणा करून महिलांची फसवणुक केली. काही राज्यांमध्ये काँग्रेसने गॅरंटी कार्ड दिले. सरकार आले नाही तरी, आमचा खासदार निवडून आला तर आम्ही पैसे देऊ असे त्यात म्हटले.

     

    आता उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये जिथे काँग्रेसचे खासदार आले तिथे महिला फॉर्म ( गॅरंटी गार्ड )घेऊन पोहोचत आहेत आणि काँग्रेस नेते गायब आहेत. काँग्रेसचा हा खोटा चेहरा पुन्हा एकदा लोकांच्या पुढे आला’.भाजप सत्तेचे नाही सेवेचे राजकारण करते. त्यामुळे जेव्हा जेव्हा बल्लारपूरच्या जनतेने मला विधानसभेत पाठवले मी सेवेचा उद्देश ठेवला. कधी जात-पात-धर्म बघितला नाही. मदतीसाठी कुणी आला तर त्याचे काम बघितले. आताही नव्या ऊर्जेने कामाला लागणार आहे. गरिबांसाठी घरे, मालकी हक्काचे पट्टे अशा अनेक अपूर्ण विकासकामांना पूर्ण करणार आहे, असा निर्धारही ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

    ‘त्या’ मतदारांचे खूप खूप आभार
    ज्या ४ लाख ५६ हजार मतदारांनी जातीचे राजकारण, आरक्षणाच्या अफवांकडे दुर्लक्ष करून मला मतदान केले त्यांचे मी आभार मानतो. महायुतीच्याही सर्व नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो. कारण आपण एक कुटुंब होऊन लढलो आहोत, अशा भावनाही ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.

    ‘टायगर अभी जिंदा है’

    Minister sudhir mungantiwar निवडणूक जिंकून संसदेत गेलो असतो तर रेल्वे कोचचा कारखाना चंद्रपुरात आणण्याचा संकल्प होता. बल्लारपूर ते मुंबई व पुणे अशी थेट गाडी सुरू करण्याची मागणी करण्याचा संकल्प होता. मूर्ती येथील रखडलेले विमानतळ पूर्ण करण्याचा संकल्प होता. अशा अनेक गोष्टींचा विचार केला होता. पण मुनगंटीवार खूप काम करतात त्यांना थोडी आरामाची गरज आहे, असा विचार जनतेने केला असेल. पण जनतेच्या कामासाठी मला फरक पडत नाही कारण ‘टायगर अभी जिंदा है’, असेही ते म्हणाले.

    ‘मी थकणारा आणि थांबणारा नाही’
    लोकांचे प्रेम आजही कायम आहे. याच प्रेमाची ऊर्जा घेऊन काम करायचे आहे. ही निवडणूक विकासाच्या आधारावर नाही तर जातीच्या आधारावर झाली आहे. ही धोक्याची घंटा आहे. समाजात राजकीय कॅन्सर पसरण्याचे संकेत आहेत. या कॅन्सरचा समूळ नायनाट करून विकास करायचा आहे. पुन्हा एकदा शक्तीने काम सुरू करायचे आहे. मी थकलो नाही आणि थांबलोही नाही. शेवटच्या श्वासापर्यंत जनतेचे काम करायचे आहे, असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

    आरोग्य सुविधा केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन
    विजयी उत्सव सभेपूर्वी बल्लारपूर शहरातील राणी लक्ष्मीबाई वॉर्ड येथे नागरी आरोग्य सुविधा केंद्र इमारतीच्या नूतनीकरणाच्या कामाचे ना. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. हे काम जिल्हा स्तरावरील नगरोत्थान योजनेतून २२ लक्ष रुपये खर्चातून पूर्ण करण्यात आले आहे. तसेच बल्लारपूर नगरपरिषद अग्निशमन विभागाला जिल्हा अग्निशमन योजनेतून मिळालेल्या अग्निशमन वाहनाचेही यावेळी लोकार्पण झाले. हे वाहन अरुंद गल्लीबोळातून जाण्यास सक्षम असल्याने आणीबाणीच्या प्रसंगी उपयुक्त ठरणार आहे.

  • Congress news maharashtra : महायुती सरकारवर कांग्रेसने चंद्रपुरात फेकले चिखल

    Congress news maharashtra : महायुती सरकारवर कांग्रेसने चंद्रपुरात फेकले चिखल

    Congress news maharashtra केंद्र आणि राज्य सरकारने अनेक अन्यायकारक निर्णय घेतले आहेत. नीट परीक्षेतील घोळ, नेटचा पेपर फुट प्रकरण तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी, गोरगरीब विरोधी धोरणाच्या निषेधार्थ चंद्रपूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने चंद्रपूर शहरातील गांधी चौक येथे सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्यास चिखल फासण्यात आले.
    यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, आमदार अभिजित वंजारी,  शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, विनोद दत्तात्रेय, सुभाषसिंग गौर, के. के. सिंग, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर, शहर महिला काँग्रेस अध्यक्ष चंदाताई वैरागडे, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष राजेश अडूर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते घनश्याम मुलचंदानी यांच्यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशन अनुसूचित जाती, महिला आघाडी, अल्पसंख्यांक आघाडी युवक काँग्रेस, कामगार आघाडी यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 
     
    Congress news maharashtra यावेळी बोलताना खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, मागील १० वर्षापासून भाजपा सरकारने राज्यातील औद्योगिक विकासाला खिळ घातली आहे. राज्यातील मोठे उद्योग गुजरातला पाठवले आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ही औद्योगिक विकास पाहिजेतसा झालेले नाही. उलट बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचा आरोप केला. 
     
    आमदार सुभाष धोटे यांनीही शासनावर कडाडून टीका केली. स्पर्धा परीक्षा वेळेवर घेतल्या जात नाहीत. या परीक्षा घेतल्या तर पेपरफुटीचे ग्रहण लागले. निट परिक्षेच्या पेपरफुटी व निकालातील गैरव्यवहारामुळे देशभरातील लाखो विद्याथ्र्याचे भवितव्य सरकारने धोक्यात आणले आहे, असेही धोटे म्हणाले. 
     
    Congress news maharashtra राज्यातील पोलीस भरती चिखलात सुरु आहे. यामुळे उमेदवारांचे नुकसान होत आहे. सरकारी रिक्त पदे भरण्याबाबत सरकार चालढकल करत असल्याने बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झाला आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे. गुन्हेगारी मध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. महिला, मुलींचे दिवसाढवळया रस्त्यावर खून पाडले जात आहेत.
    राज्यातील शेतकरी भयंकर संकटात आहेत पण त्यांना मदत दिली जात नाही. कांदा,कापूस सोयाबीन यासह कोणत्याही शेतमालाला भाव नाही, सरकार एमएसपी देत नाही, असा आरोप यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केला.
  • Smart Electricity Prepaid Meter scheme : स्मार्ट वीज मीटर सक्ती रद्द, श्रेय कुणाचे?

    Smart Electricity Prepaid Meter scheme : स्मार्ट वीज मीटर सक्ती रद्द, श्रेय कुणाचे?

    Smart Electricity Prepaid Meter scheme राज्यात स्मार्ट वीज प्रीपेड मीटर ची सक्ती मोहीम शासनातर्फे राबविणे सुरू होते, 6 हजार 300 रुपयांचा वीज मीटर शासन 12 हजार रुपयांना घेत असल्याची माहिती पुढे आली, विशेष म्हणजे या संपूर्ण बाबी ला वीज नियामक मंडळाचा विरोध होता, मात्र वीज नियामक मंडळाला अंधारात ठेवत शासनाने वीज ग्राहकांवर हा नियम थोपविण्याचे काम केले.

    महत्त्वाचे : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी

    आता जन आंदोलन व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारला स्मार्ट वीज मीटर सक्ती चा निर्णय मागे घ्यावा लागणार, फक्त नागरिकांनी असे समजू नये की हा मीटर लागणार नाही, सध्या औद्योगिक व शासकीय कार्यालयात हा स्मार्ट मीटर लागणार आहे, निवडणुकीनंतर पुन्हा ही मोहीम सुरू होणार.

     

    Smart Electricity Prepaid Meter scheme या मोहीम विरुद्ध चंद्रपुरातून विरोध करण्यात आला, सर्वप्रथम आप चे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी याविरोधात आंदोलन केले, बल्लारपूर येथे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी आंदोलन केले, तर कांग्रेसचे महेश मेंढे यांनी महावितरण ला याबाबत निवेदन दिले.

    अवश्य वाचा : आमदार सुभाष धोटे ऍक्शन मोड वर

    विधानसभा अधिवेशन पूर्वी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले, 15 जून रोजी थेट राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पाठपुरावा करीत शासनाला हा निर्णय मागे घ्यायला लावले, असे वृत्त झळकले.

    स्मार्ट वीज मीटर बाबत संपूर्ण राज्यात आंदोलन झाले मात्र श्रेयवाद चंद्रपुरात सुरू झाला, हे न समजण्यासारखे आहे.

    सर्वप्रथम आपण याबाबत मुनगंटीवार यांचा दावा काय हे जाणून घेऊया…..

    राज्यातील सर्वसामान्य विजग्राहकांची कुठल्याही प्रकारची गौरसोय होऊ नये, ही गोष्ट ध्यानात ठेवूनच राज्य सरकारने प्रत्येक निर्णय घेतला आहे आणि प्रीपेड वीज मीटरच्या संदर्भातही त्याच दृष्टीकोनातून स्मार्ट निर्णय घेण्यात आला आहे, अशी भूमिका राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य तसेच मत्स्यव्यवसाय मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली. प्रीपेड स्मार्ट मीटर संदर्भात घरगुती वीजग्राहकांना दिलासा देण्याच्या उद्देशाने उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी निर्णयाला स्थगिती दिली आहे, असेही ते म्हणाले.

    Smart Electricity Prepaid Meter scheme सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भातील निर्णयासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आभार देखील मानले आहेत. घरगुती विजग्राहकांच्या भावना लक्षात घेत ना. मुनगंटीवार यांनी अलीकडेच उपमुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत स्मार्ट प्रीपेड मीटर संदर्भात चर्चा केली होती. या चर्चेनंतर घेण्यात आलेल्या सकारात्मक निर्णयानंतर सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळाला आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपुरातील कामगाराने दिला आत्मदहनाचा इशारा

    यासंदर्भात माहिती देताना ना. मुनगंटीवार म्हणाले, वीज वितरणाच्या दरम्यान संभावित तोटा (डिस्ट्रिब्युशन लॉस) कमी व्हावा किंवा रोखता यावा या उद्देशाने तसेच वीज वितरण कंपन्यांचे गुणवत्ता व विश्वासार्हतेचे निर्देशांक वाढावे, मानवी चुका कमी व्हाव्यात, जलद ग्राहक सेवा मिळावी तसेच उत्तम सुविधा ग्राहकांना मिळाव्यात या उद्देशाने स्मार्ट मीटरची योजना जुलै २०२० मध्ये केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाकडून तयार करण्यात आली होती. परंतु, स्मार्ट मीटर बसाविण्यासंदर्भात घरगुती ग्राहकांमध्ये असलेला रोष व अस्वस्थता बघून उपमुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केल्याचे केल्याचे ना. मुनगंटीवार यांनी सांगितले.

     

    Smart Electricity Prepaid Meter scheme ‘आता राज्यात ही योजना सरकारी कार्यालयासाठी राबविण्यात येणार आहे. घरगुती वीज वापरासाठी मात्र स्मार्ट मीटर राहणार नाही, यावर स्थगिती देण्यात आली आहे. या निर्णयामुळे घरगुती वीज ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण असून महाराष्ट्र शासनासह ना. सुधीर मुनगंटीवार यांचेही आभार मानले आहेत.

    अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचा दावा काय?

    चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत, राज्यातील वीज ग्राहकांना सरसकट स्मार्ट प्री-पेड वीज मीटर जोडणीची सक्ती रद्द करण्याची मागणी केली होती. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या मागणीवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी या आश्वासनाची पुर्तता करत स्मार्ट प्री-पेड वीज मीटर जोडणीचा निर्णय रद्द केला आहे. त्याबदल आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे.

    Smart Electricity Prepaid Meter scheme     स्मार्ट प्री-पेड वीज मीटर बाबत जनतेमध्ये रोष होता. त्यामुळे जनतेला मान्य नसलेल्या या मीटर जोडणीचा निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेत केली होती. मुंबई मंत्रालय येथे झालेल्या या भेटीत सकारात्मक चर्चा झाली होती. त्याचा परिणाम आज दिसून आला असून सदर मिटर लावण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे.  

    महत्त्वाचे : चंद्रपूर जिल्ह्यातील 24 जिल्हा परिषद शाळेत सेमी इंग्रजी वर्ग सुरू होणार

    वीज ही सामान्य नागरिकांची प्राथमिक गरज आहे आणि सरकारने ती माफक दरात पुरवणे आवश्यक आहे. अनेक राज्यांमध्ये 200 युनिटपर्यंत वीज मोफत दिली जात असताना, महाराष्ट्रात वीज दर इतर राज्यांच्या तुलनेत अधिक आहेत. वीज बिलात समाविष्ट असलेल्या विविध कर आणि शुल्क हे दरवाढीचे प्रमुख घटक आहेत.  शासनाच्या नवीन वीज कर धोरणानुसार सर्व वीज ग्राहकांना स्मार्ट प्री-पेड वीज मीटर जोडण्याची सक्ती करण्यात येत होती. ग्राहकांच्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात स्मार्ट प्री-पेड वीज मीटर लावले जात होते. जुने वीज मीटर पोस्ट-पेड असल्याने ग्राहकांना थकीत बिल भरण्याची मुभा होती, त्यामुळे ते आपल्या सोयीनुसार वीज देयक भरण्यास सक्षम होते. मात्र, स्मार्ट प्री-पेड वीज मीटरमुळे पुरेशा रिचार्ज अभावी वीज पुरवठा खंडित होण्याचा धोका निर्माण झाला होता. यामुळे विशेषतः सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागणार होता.

    Smart Electricity Prepaid Meter scheme    रिचार्ज मीटरमुळे वीज कंपन्यांना फायदा होणार असला तरी ग्राहकांवर निश्चित बोझ्या व त्रास  वाढणार होता. अनेक नागरिकांच्या बँक खात्यात पैसे जमा असतील याची शाश्वती नसते, त्यामुळे त्यांना रिचार्ज प्रक्रियेत अडचणी येण्याची शक्यता होती. तसेच ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या या नव्या मिटरमुळे निर्माण झाली असती. आदी बाबी आमदार किशोर जोरगेवार यांनी उपमुख्यमंत्री यांची भेट घेत त्यांच्या लक्षात आणून दिल्या होत्या. त्यानंतर आता सदर प्री-पेड मिटर लावण्याचा निर्णय सरकारने रद्द करत विज ग्राहकांना दिलासा दिला आहे.

     

    कांग्रेसचे महेश मेंढे यांचा दावा काय?

    चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात वीज ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट वीज मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू असून ही प्रक्रिया रद्द करण्यात यावी यासाठी मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांना निवेदन तर कंत्राटी कामगार संघटनेच्या माध्यमातून तुकूम परिसरातील मीटरची पाहणी केली होती. त्यानंतर जनआंदोलन उभारण्याचे ठरवले असता शासनाने सादर योजनेला स्थगिती दिल्याने वीजग्राहक आणि कंत्राटी कामगारांसाठी दिलासादायक असल्याने सरकारचे व आंदोलनात साथ देणाऱ्याचे मानले मेंढेनी आभार मानले.

    रिचार्ज मीटरमुळे वीज कंपन्यांना फायदा होणार असला तरी ग्राहकांवर निश्चित बोझ्या व त्रास वाढणार आहे. अनेक नागरिकांच्या बँक खात्यात पैसे जमा असतील याची शाश्वती नसते, त्यामुळे त्यांना रिचार्ज प्रक्रियेत अडचणी येऊ शकतात. तसेच ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. या समस्येवर त्वरित तोडगा काढण्यासाठी सरकारने नागरिकांच्या तक्रारी आणि मागण्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. रिचार्ज मीटरच्या फायदे आणि तोटे यांचे निष्पक्ष मूल्यांकन करत, वीज ग्राहकांना सरसकट स्मार्ट प्री-पेड वीज मीटर जोडणी सक्ती रद्द करावी
    यासाठी मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांना निवेदन तर कंत्राटी कामगार संघटनेच्या माध्यमातून तुकूम परिसरातील मीटरची पाहणी केली होती.

     

    Smart Electricity Prepaid Meter scheme
    सदर योजना ‘आता राज्यात ही योजना सरकारी कार्यालयासाठी राबविण्यात येणार आहे. घरगुती वीज वापरासाठी मात्र स्मार्ट मीटर राहणार नाही, यावर स्थगिती देण्यात आली आहे. या निर्णयामुळे घरगुती वीज ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण असून  सरकारचे आभार मेंढे यांनी मानले असून ४ दिवसापासून सुरु केलेल्या जनआंदोलनास इथेच थांबवत असून नागरिकांचा हक्कासाठी सैदव तत्पर राहील असे मानत सर्वांचे आभार महेश मेंढे यांनी मानले आहे.

     

    या दाव्यावर आम आदमी पार्टीने अजूनही श्रेय घेतले नाही कारण त्यांचे आंदोलन हे जिल्हाभर गाजले होते, व नागरिकांनी त्यांनी केलेला विरोध बघितला, सोबत शिवसेना ठाकरे गटाच्या आंदोलनाची अनेकांनी दखल घेतलेली आहे, ज्यांनी याबाबत काही केलं नाही त्यांनी याबाबत श्रेय घेण्याचा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात पुढे आलेला आहे.

  • Resignation of Pratibha Dhanorkar : खासदार प्रतिभा धानोरकर यांचा राजीनामा

    Resignation of Pratibha Dhanorkar : खासदार प्रतिभा धानोरकर यांचा राजीनामा

    Resignation of Pratibha Dhanorkar वरोरा-भद्रावती विधानसभेच्या माध्यमातून जनतेने आमदार म्हणून निवडून दिले. २०१९ ते २०२४ या कालावधीत विधानसभेच्या माध्यमातून जनसामान्यांची संपूर्ण कामे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याचे मत खासदार धानोरकर यांनी व्यक्त केले.  यावेळी विधानसभेच्या अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द करुन विधानसभा सचिवालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले.

    अवश्य वाचा : हवामान विभागाच्या अलर्ट चा अर्थ काय?

    अलिकडेच लोकसभा निवडणूक पार पडून त्यामध्ये चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार पदांची धुरा प्रतिभा धानोरकर यांच्याकडे आली.  खासदार पदी निवडून आल्याने आज विधानसभा अध्यक्षांकडे आमदार पदाचा राजीनामा सुपूर्द केला.  यावेळी अध्यक्षांनी प्रतिभा धानोरकर यांना भावी राजकीय आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन त्यांनी विधानसभेत केलेल्या कार्याबद्दल स्तुतीसुमने उधळली.

    महत्त्वाचे : स्मार्ट वीज मीटर विरोधात आप चे निषेध आंदोलन

    Resignation of Pratibha Dhanorkar याप्रसंगी प्रतिभा धानोरकर यांनी विधानसभेत वेळोवेळी जनतेच्या प्रश्नांवर चर्चेसाठी संधी दिल्याबद्दल अध्यक्षांचे आभार मानले.  तसेच विधानसभा सचिवालयातील सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले व जनतेने ठेवलेल्या विश्वासाबद्दल कायमची ऋणी राहीन व विधानसभेत विविध आयुधांद्वारे जनतेच्या प्रश्नांवर केलेल्या चर्चेच्या अनुभवनातून लोकसभेत नव्या दमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळणार असल्याचे मत याप्रसंगी खा. प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले.

     

    दिवंगत खासदार बाळू धानोरकर व मला विधानसभेचा कालावधी पूर्ण करता आला नाही, पण जनतेच्या आशिर्वादाने आम्हाला खासदार म्हणून जनतेने दिलेली संधी माझ्या आयुष्यासाठी प्रेरणादायी ठरलेली आहे.  या निवडणूकीत जनतेने भरभरुन दिलेले आशिर्वाद मी विकास कार्यात परावर्तित करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मतदेखील यावेळी व्यक्त केले.

    Resignation of Pratibha Dhanorkar भविष्यात देखील जनतेच्या कामांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून  जनतेचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सांगितले.

  • MP Pratibha Dhanorkar : चंद्रपूर लोकसभा क्षेत्राला 60 वर्षांनी मिळाल्या महिला खासदार

    MP Pratibha Dhanorkar : चंद्रपूर लोकसभा क्षेत्राला 60 वर्षांनी मिळाल्या महिला खासदार

    MP Pratibha Dhanorkar चंद्रपूर : 19 एप्रिलला पार पडलेल्या 13 चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी आज 4 जून रोजी चंद्रपूरात पार पडली. 28 व्या फेरी अखेर काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी सुमोर 2 लाख 60 हजार 406 मताधिक्याने आघाडी घेऊन दणदणीत विजय मिळविला आहे. मोठ्या मताधिक्याने राज्याचे वनमंत्री तथा कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे्. अडीच लाखाच्या फरकाने आघाडी घेतल्याने धानोरकर यांनी विजयी जल्लोष साजरा केला. प्रतिभा धानोरकर ह्या चंद्रपूर लोकसभेच्या दुसऱ्या महिला खासदार ठरल्या. 1964 च्या लोकसभा पोटनिवडणुकीत इंदिरा काँग्रेसच्या गोपिकाबाई कन्नमवार ह्या पहिल्या महिला खासदार म्हणून जिंकून आल्या होत्या. 60 वर्षांनी प्रतिभा धानोरकर यांनी हा बहुमान मिळविला.

    अवश्य वाचा : दहावी पास विद्यार्थी होणार इंजिनिअर

    13 चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक 19 एप्रिलला पहिल्या टप्यात पार पडली. त्यामध्ये भाजपाचे सुधीर मुनगंटीवार, काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांचेसह 15 उमेदवार रिंगणात उभे होते. सर्वच उमेदवारांचे भाग्य इव्हिएम मध्ये बंद झाल्यानंतर आज 4 जून ला मशिनबंद झालेले भाग्य उघडण्यात आले. या क्षेत्रात खरी लढत भाजपाचे हेविवेट नेते तथा विद्यमान वनमंत्री सुधीर मुनगंटीवार विरूध्द कॉग्रेसच्या विद्यमान आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या मध्ये होती.

     

    MP Pratibha Dhanorkar मुनगंटीवार यांनी मतमोजणीच्या पूर्वसंध्येला माध्यमांशी बोलताना लाखाच्या फरकाने विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केला होता. परंतु आज हाती आलेले निकाल मुनगंटीवार यांच्यासाठी धक्कादायक ठरले. सकाळी 8 वाजतापासून सुरू झालेल्या मतमोजणीमध्ये पहिल्या फेरीपासून तर 28 व्या फेरीपर्यंत कॉग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनीच आघाडी घेतली. पहिल्या एक दोन फेरीनंतर मुनगंटीवार हे आघाडी घेतील अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना होती. परंतु ती अपेक्षा भंग ठरली. एक दोन नव्हे तर तब्ब्ल 28 व्या फेरी अखेर प्रतिभा धानोरकर यांनी 7 लाख 18 हजार 410 मते मिळविली. तर प्रतिस्पर्धी भाजपाचे सुधीर मुनगंटीवार 4 लाख 58 हजार 004 मते घेतली. तब्बल 2 लाख 60 हजार 406 मतांनी मुनगंटीवारांना मागे टाकले. विशेष म्हणजे प्रतिभा धानोरकर यांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी 28 व्या फेरीपर्यंत कायम ठेवली.

    अवश्य वाचा : स्मार्ट मीटर योजना काय आहे? जाणून घ्या

    MP Pratibha Dhanorkar प्रारंभापासून लोकसभची निवडणूक लढविण्याची इच्छा नव्हती, परंतु पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडली पण त्यांना यामध्ये यश आले नाही. आजच्या लोकसभेच्या निवडणूकीत त्यांना मोठ्या पराभवाला समोरे जावे लागले आहे. वंचितचे राजेश बेले यांना 21 हजार 980 मध्य 28 व्या फेरी अखेर मिळाले. विशेष म्हणजे यावेळीही नोटाचा संख्या वाढली आहे. 2019 मध्ये सुमारे 6 हजार नोटाला पसंती दिली होती. यावेळी त्यामध्ये वाढ होवून 10 हजार 843 वर पोहचला आहे.

     

    सन 2019 मध्ये मोदी लाटेमध्ये काँग्रेसचे बाळू धानोरकर हे महाराष्ट्रात या जागेवर 45 हजाराने एकमेव उमेदवार निवडून आले होते. परंतु काही महिण्यापूर्वीच त्यांचे आजाराने निधन झाले होते. त्यानंतर त्याच जागेवर त्यांच्याचं पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी निवडणूक लढविली. आणि मोठ्या मत्ताधिक्याने विजय मिळविला . विशेष म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांचे प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रपूरात आले. राज्याचे मोठमोठे नेत्यांनी मुनगंटीवार यांचेसाठी प्रचार केला. परंतु यावेळी मोदीची जादू चालली नाही. भाजपाला मोठ्या पराभवाला समोरे जावे लागले.

    सुधीर मुनगंटीवार यांची पराभवाची हट्रिक

    सुधीर मुनगंटीवार यांनी पहिली निवडणूक वर्ष 1989 मध्ये लढविली होती, त्या निवडणुकीत मुनगंटीवार यांना 1 लाख 93 हजार 397 मते मिळाली होती.

    दुसरी निवडणूक वर्ष 1991 मध्ये लढविली, त्यामध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी 1 लाख 23 हजार 122 मते मिळविली मात्र दोन्ही निवडणुकीत मुनगंटीवार यांना कांग्रेसचे नेते शांताराम पोटदुखे यांच्या पुढे पराभव स्वीकारावा लागला.

     

    MP Pratibha Dhanorkar 34 वर्षांनी पुन्हा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्याची संधी मुनगंटीवार यांना मिळाली, आधी मला निवडणूक लढविण्याची इच्छा नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली, मात्र पक्षाने जबाबदारी दिल्यावर त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. 6 विधानसभा क्षेत्रात त्यांनी सभा घेतल्या, इतकेच नव्हे तर खुद्द प्रधानमंत्री मोदी यांनी चंद्रपुरात सभा घेतली, त्यानंतर भाजपचे अनेक दिग्गजांनी मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ सभा घेतली मात्र निवडणुकीत त्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

     

    वर्ष 2019 च्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांचा 44 हजार मतांनी पराभव झाला होता, मात्र यंदा मुनगंटीवार रिंगणात उभे असल्याने लढत अटीतटीची होणार असा विश्वास कार्यकर्त्यांना होता, मात्र त्या लढतीत मुनगंटीवार यांचा विजय होणार, पण तसे काही झाले नाही.

     

    MP Pratibha Dhanorkar वर्ष 2019 ते 2024 च्या निवडणुकीत धानोरकर यांनी 6 पट जास्त मताधिक्य घेतलं आणि विजय प्राप्त केला, विशेष बाब म्हणजे एकही कांग्रेसचा बडा नेता धानोरकर यांच्या प्रचाराला आला नाही त्यानंतर सुद्धा त्यांचा विजय झाला, यंदा जनतेनी ही निवडणूक हातात घेतली होती.

     

    मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया

    मी माझा पराभव नम्रपणे स्वीकारतो, व विजयाबद्दल प्रतिभा धानोरकर यांना शुभेच्छा देतो, जनतेनी विकासाला नाकारलं, आता लोकसभा क्षेत्राच्या विकासाची जबाबदारी धानोरकर यांनी चांगली पार पाडावी अश्या शुभेच्छा त्यांना देतो.

     

  • Chandrapur loksabha election result live : चंद्रपूर लोकसभा निवडणुक निकाल, 2 लाख 50 हजार लीड

    Chandrapur loksabha election result live : चंद्रपूर लोकसभा निवडणुक निकाल, 2 लाख 50 हजार लीड

    Chandrapur loksabha election result live आज 4 जून रोजी सकाळी 8 वाजता पासून देशातील लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली, यामध्ये अनेक उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

    अवश्य वाचा : सुधीर मुनगंटीवार म्हणतात मी जिंकणारचं

    Chandrapur loksabha result live चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा नशीब आजमावत असलेले राज्याचे सांस्कृतिक कार्य तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची थेट व अटीतटीची लढत दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यासोबत होत आहे, तसेच वंचित बहुजन आघाडी कडून राजेश बेले हे पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे.

    अवश्य वाचा : आमदार प्रतिभा धानोरकरांच्या मनात काय?

    चंद्रपूर लोकसभेच्या निवडणूकित 2 विद्यमान आमदार यांच्यात होत असलेल्या लढतीचा निकाल आपण बघणार आहो..

    निकाल अपडेट

    कांग्रेस प्रतिभा धानोरकर 7 लाख 14 हजार 476, भाजप सुधीर मुनगंटीवार 4 लाख 56 हजार 043, वंचित बहुजन आघाडी राजेश बेले 21 हजार 897,  बसपा राजेंद्र रामटेके 9 हजार 133, नोटा 10 हजार 786 कांग्रेसच्या धानोरकर ह्या 2 लाख 58 हजार 433 मतांनी पुढे.

     

  • Chandrapur loksabha result : चंद्रपूर लोकसभा बाबत तो एक्झिट पोल खोटा ठरणार – सुधीर मुनगंटीवार यांचा दावा

    Chandrapur loksabha result : चंद्रपूर लोकसभा बाबत तो एक्झिट पोल खोटा ठरणार – सुधीर मुनगंटीवार यांचा दावा

    Chandrapur loksabha result लोकसभा निकालाला अवघे काही तास शिल्लक असताना चंद्रपूर लोकसभेच्या उमेदवारांचा आज आढावा घेण्यात आला. यादरम्यान विविध प्रसारमाध्यमांचा एक्झिट पोल खोटा ठरणार असा दावा करत, आम्ही या जागेवर निवडणूक जिंकणारच असे म्हटले आहे.

    निवडणूक मी जिंकणार – प्रतिभा धानोरकर यांचा दावा

    एक्झिट पोलमुळे चंद्रपूरची जागा काँग्रेस पुन्हा आपल्याकडे खेचणार असे चित्र तयार झाले. मात्र पालकमंत्री मुनगंटीवार यांनी थेट सांगितले की, चंद्रपूर लोकसभा आम्ही जिंकणार असून देशात आम्ही ४०० पार तर राज्यात ४५ प्लस जाणार असा विश्वास व्यक्त केला.

    आज ३ जूनला लोकसभा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयात नेहमीप्रमाणे जनसंपर्क सुरू होता, त्यांना भेटण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. मतमोजणी प्रतिनिधींना महत्वाच्या सूचना देताना लक्ष ठेवावे असे सांगितले.

    दहावी पास होणार इंजिनिअर : वाचा ही बातमी

    तर काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी वरोरा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांशी संवाद साधला, त्यानंतर सायंकाळी चंद्रपूर जनसंपर्क कार्यालयात मतमोजणी प्रतिनिधींशी बैठक घेत, मतमोजणीवर सर्वांनी बारकाईने लक्ष ठेवावे असे निर्देश दिले.

     

    निकालाच्या दिवशी दोन्हीं पक्षांचे नियोजन काय?

    भाजप महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांनी माहिती दिली की, ४ जूनला लागलेला निकाल हा देशाला कलाटणी देणारा आहे, देशात भाजप सरकार पुन्हा येणार असा विश्वास पावडे यांनी यावेळी व्यक्त केला. यंदाची ही निवडणूक आम्ही जिंकणारचं, निकाल लागल्यावर आम्ही जल्लोष करणार असे नियोजन आम्ही केले आहे.

    तर काँग्रेस महानगर अध्यक्ष रामू तिवारी यांनी याबाबत सांगितले की, भाजपने अंतर्गत सर्व्हे केला असेल तो १०० टक्के फोल ठरणार आहे, ही निवडणूक आम्हीचं जिंकणार आहो.

  • Mla Pratibha Dhanorkar : तर संधीचे सोने करणार – प्रतिभा धानोरकर

    Mla Pratibha Dhanorkar : तर संधीचे सोने करणार – प्रतिभा धानोरकर

    Mla Pratibha Dhanorkar 4 जून लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा दिवस या दिवसाची उत्सुकता विविध पक्षातील कार्यकर्त्यांना लागलेली आहे, निकालापर्वी विविध पक्षातील लोकसभा उमेदवार विजय आपलाच यावर दावा करू लागले आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपूर शहराची या कार्यासाठी झाली निवड

    विदर्भातील चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत राज्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर निवडणुकीच्या रिंगणात होत्या, निकालापूर्वी लोकसभा उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या विजयाचा दावा केलायं.

     

    Mla Pratibha Dhanorkar 4 जून चा निकाल हा देशाच्या दृश्टीने अत्यंत महत्वाचा असून देशाला कलाटणी देणारे ठरणार आहे. मी माझ्या विजयाबद्दल आश्वस्त असून जनतेनी सेवा करण्याची संधी दिल्यास संधी चे सोणे करुन चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या विकासासाठी मी सदैव कटीबध्द राहील.