CMPL Soil Excavation Company : आंदोलनाची दखल नाही, कामगाराने दिला आत्मदहनाचा इशारा

Indefinite strike movement

CMPL Soil Excavation Company CMPL माती उत्खनन या कंपनीतील कार्यरत स्थानिक कामगारांना कंपनीचे काम संपल्याचे सर्व कामगारांना पत्र पाठवून कामावरून डावलण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला आहे. कारण सदर कंपनीचे दुसरे काम हे राजुरा विधानसभा क्षेत्र सास्ती इथे सुरु आहे.
कंपनीने स्थानिक कामगारांना कामावरून कमी केल्यास त्यांच्यावर तसेच त्याच्या परिवारावर उपासमारीची वेळ येणार. स्थानिक कामगारांना कामावरून न काढता सास्ती येथे स्थलांतर करण्यात यावे.

अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यातील 24 जिल्हा परिषद शाळेत आता सेमी इंग्लिश अभ्यासक्रम

याकरिता अनैशा वाहन चालक कामगार संघटना चे संस्थापक अध्यक्ष सुरज उपरे तसेच सामजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्या नेतृत्वात राजुरा तहसील कार्यालयासमोर दिनांक 10 जून 2024 रोज सोमवार ला बहुजनांच्या महापुरुषांना अभिवादन करून बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.

 

CMPL Soil Excavation Company बेमुदत धरणे आंदोलनात आंदोलनकर्ते आकाश ताकसांडे, ऋषी चौधरी, अजय इग्रपवार, साई कुमार मोगलीवार, राकेश चेनमेंवार, श्रीकांत जलावार, पांडुरंग मंगाम, आशिष पझारे,या वेळेस माणिक संजीव, दशरथ कोंडावार,मिथुन कांबळे,राहुल राठोड,विशाल सल्लम, संकेत भादिकर, शंकर काळे,प्रवीण जेल्लेल, प्रवीण चेनवेंनवार,उपस्थित होते.

महत्त्वाचे : हे कोर्स कराल तर मिळणार लाखोंचे पॅकेज

आंदोलनाचा पाचवा दिवस
दिनांक 14/06/2024 आंदोलन सतत चालू असताना सुधा आतापर्यंत शासन प्रशासनाने तसेच सदर कंपनीने कसल्याही प्रकारची दखल न घेतल्या कारणाने आंदोलनकर्ता आकाश ताकसांडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *