Category: राजकारण

महाराष्ट्रातील राजकारण बातम्या (Maharashtra Politics News) आणि राष्ट्रीय स्तरावरील सर्व राजकीय घडामोडींसाठी news34.in हे आपले विश्वसनीय व्यासपीठ आहे. आम्ही तुम्हाला स्थानिक ग्रामपंचायत निवडणुकांपासून ते लोकसभा निवडणुकीपर्यंतच्या प्रत्येक मोठ्या-छोट्या अपडेट्सचे कव्हरेज देतो. राजकीय विश्लेषण, पक्षांची धोरणे, नेत्यांची मते आणि महत्त्वाचे शासकीय निर्णय. कोणत्याही राजकीय बातम्या चुकणार नाहीत याची खात्री बाळगा. राजकारण या क्षेत्रातील विश्वसनीय आणि ताज्या बातम्या मिळवण्यासाठी नियमितपणे भेट द्या.

  • Mega Job Fair : शिवसेनेचा भव्य रोजगार मेळावा

    Mega Job Fair : शिवसेनेचा भव्य रोजगार मेळावा

    mega job fair : राज्यात वाढत असलेली बेरोजगारी आता चिंतेचा विषय बनला आहे, 100 नोकरी जिथे असेल त्याठिकाणी लाखो बेरोजगारांचे अर्ज येतात, गुणवत्ता आणि पात्रता असून सुद्धा योग्य उमेदवाराला नोकरी मिळत नसल्याने बेरोजगारांची संख्या वाढत आहे.

    अवश्य वाचा : 29 गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगाराला चंद्रपूर पोलिसांनी दिली चपराक, कारागृहात केले स्थानबद्ध


    Mega job fair चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा हीच अवस्था आहे, मात्र आता ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांच्या हाती रोजगाराची मशाल देण्याचं काम शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे हे आपल्या माध्यमातून करीत आहे.
    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 28 जुलै रोजी सकाळी 9.30 वाजतापासून नवभारत विद्यालय मूल येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.


    विशेष बाब म्हणजे आयोजित मेळाव्यात देशातील 50 पेक्षा अधिक कंपन्या सहभागी होणार आहे, शिक्षित व कुशल तरुण-तरुणींना या माध्यमातून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.
    आयोजित मेळाव्यात 5 हजार पेक्षा अधिक पदांसाठी थेट मुलाखती घेतल्या जाणार असून पात्र उमेदवारांना थेट नियुक्ती पत्र सुद्धा दिल्या जाणार आहे.
    शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी सदर रोजगार मेळाव्यातून युवाशक्तीचे हात सक्षम करण्याचा प्रयत्न करीत आहे.
    आयोजित रोजगार मेळाव्यात शिक्षित बेरोजगार युवकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन संदीप गिर्हे यांनी केले आहे.

  • Chandrapur News Today : दोन विभागामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

    Chandrapur News Today : दोन विभागामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

    Chandrapur news today मागील आठवड्यात बेंबाळच्या पाणीपुरवठा विभागाची वीज कापले गेल्याचे उदाहरण ताजे असताना आता विसापुर गावातील पाणीपुरवठा विभागाची विज कापल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहे. पावसाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणावर साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव असतो ज्यात ताप, सर्दी, हगवन, उलटी व कॅालरा या सारख्या साथीच्या रोगाने मोठ्या प्रमाणावर लहान मुले मृत्यमुखी पडतात. साथीचे रोग मुख्यतः दुषीत पाणी पिल्यामुळे होत असून पावसाळ्याच्या दिवसात याचा धोका मोठ्या प्रमानावर संभवतो.

    Chandrapur news today गोरगरीब जनतेच्या आरोग्याची हेळसांड होऊ नये या करिता आरोग्याच्या समस्यांची उत्तमजान असलेल्या डॅाक्टर अभिलाषाताई गावतुरे यांनी बेंबाळ येथे विज पुरवठा खंडीत केलेला प्रश्न उचलून धरत पाणीपुरवठा विभाग व विद्युत महावितरण विभाग यांचे समन्वय घडवून बेंबाळ येथील पाणीपुरवठा सुरळीत केला होता.त्यावेळी पिण्याचे शुध्दपाणी पुरवठा करणे ही शासनाची जबाबदारी असून याकडे दुर्लक्ष केल्या मुळे मोठ्या प्रमाणावर साथीच्या रोगांचा प्रर्दुभाव होऊन सामान्य जनतेचे आरोग्य धोक्यात येऊ शकते यामुळे शासनाने पाणीपुरवठ्या कडे विशेष लक्ष देऊन सामान्य जनतेला निदान पावसाळ्याच्या दिवसात तरी शुध्द पिण्याचे पाणी मिळेल या कडे विशेष लक्ष देण्याची विनंती केली होती. परंतु काल विसापुर गावातील पाणीपुरवठा विभागाची विज विद्यत महावितरण विभागाने कापल्याने सामान्य जनतेला पावसाळ्यातील रोगराई च्या दिवसात शुध्दपाणी पुरवठा करण्यास शासन गंभीर नसल्याचे दिसुन येत आहे.

    अवश्य वाचा : पहिल्या भाषणात खासदार धानोरकर यांनी गाजवली संसद

    सरकारच्या दोन वेगवेगळ्या विभागात समन्वय नाही काय आणि वारंवार प्रशासन आपली जबाबदारी झटकून नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी पिण्यापासून का वंचित ठेवत आहे असा संतप्त सवाल प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर अभिलाषा ताई गावतुरे यांनी केला असून शासना ने ही बाब गंभीरते ने घेऊन विसापुर गावातील पाणीपुरवठा सुरळीत करावा व पावसाळ्याच्या दिवसात कोणत्या ही गावचा पाणीपुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता घ्यावी अन्यथा पिण्याच्या शुध्दपाणी साठी जिल्हाभर तीव्र आंदोलन उभारले जाईल असा गर्भींत इशार डॅाक्टर अभिलाषाताई गावतुरे यांनी दिला आहे.

    महत्त्वाचे : 2 देशी कट्टे व चाकूने त्या युवकावर केला गोळीबार


    प्रशासनाच्या दिरंगाईचा आणि नाकर्तेपणाचा भुर्दंड सामान्य जनतेने आपले आरोग्य व जीव धोक्यात टाकून का भरावा हा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.आधीच मुसळधार पाऊसामुळे आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत होऊन सामान्य जनता हैराण झाली आहे तर दुसरी कडे अतीवृष्टी मुळे मोठ्या प्रमाणावर शेतपिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. अश्यास्थितीत पावसाच्या अस्मानी संकटाने शेतकरी व सामान्य जनतेचे कंबरडे मोडले असतांना शासनाच्या पाणीपुरवठा विभाग व विज महावितरण विभाग याच्यातील समन्वयाच्या अभावाने विज कपाती सारखे तुघलकी निर्णय घेऊन शासन सामान्य जनतेचे आरोग्य धोक्यात आनत असल्याचे दिसुन येत आहे. शासनाने ऐकीकडे विसापुर गावातील बॅाटनिक्ल गार्डन मध्ये रोशनाई करिता मोठ्या प्रमाणावर अनावश्यक लाईट्स लावून आवश्यकता नसतांना लाखो रूपयाची उधळपट्टी करत आहे तर दुसरी कडे विसापुर गावातील सामान्य जनते करिता पाणीपुरवठा करणाऱ्या विभागाची विज कपात करून सामान्य जनतेचे आरोग्या धोक्यात आणत आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी या सारख्या मुलभूत समस्ये कडे शासन दुर्लक्ष करून विकासाच्या नावा खाली श्रीमंताच्या चैनी करिता गार्डन व वास्तूनिर्माण करण्यात व्यस्त असल्याची जोरदार चर्चा परिसरातील नागरिकांन मध्ये रंगली आहे.

  • Pratibha dhanorkar speech : शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर खासदार धानोरकर यांनी संसद गाजवली

    Pratibha dhanorkar speech : शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर खासदार धानोरकर यांनी संसद गाजवली

    Pratibha dhanorkar speech लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाला 22 जुलै पासून सुरुवात झाली असून लोकसभेत पहिल्यांदाच चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रातून बहूमतांनी निवडून गेलेल्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार ला जाब विचारुन आपल्या पहिल्या भाषणाला सुरुवात केली.

    अवश्य वाचा :शेतकऱ्यांच्या मदतीला धावले शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे

    Pratibha dhanorkar speech वरोरा विधानसभेच्या आमदार पदाच्या काळात विविध आयुधांचा वापर करुन मतदार संघातील विविध प्रश्न मार्गी लावणाऱ्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभेत शून्य तासात शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर धरले. खासदार धानोरकर म्हणाल्या कि, 2014 मध्ये उत्पन्न दुप्पट करुन देण्याचे वचन मोदी सरकार ने दिले. पण हे सरकार संपुर्ण अपयशी ठरले असून शेतकरी कुटूंबांची परिस्थिती भयावह असल्याचे देखील मत यावेळी व्यक्त केले.

    बघा संपूर्ण भाषण

    मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात चंद्रपूर जिल्हîात 444 तर यवतमाळ जिल्हîात 1641 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. चंद्रपूर जिल्हîातील 444 शेतकऱ्यांपैकी 122 तर यवतमाळ जिल्हîातील 1641 पैकी 819 शेतकरी अपात्र ठरल्याचे आज सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. हे सरकार पोकळ घोषणा करणारे असून फक्त आपल्या उद्योग मित्रांच्या पाठिशी असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांप्रती असणारी उदासिनता दुर करुन शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापासून परावृत्त करावे अशी मागणी देखील खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सभागृहात केली. 

  • Union Budget 2024 : राज्याला ठेंगा व जून्या घोषणांना फोडणी

    Union Budget 2024 : राज्याला ठेंगा व जून्या घोषणांना फोडणी

    Union budget 2024 महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या लाडक्या महायुतीचे सरकार असताना महाराष्ट्राला पर्यायाने महायुतीला अर्थसंकल्पात ठेंगा दाखविला आहे. त्यामुळे केंद्र सरकार महाराष्ट्र द्वेष्टे असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. देशात सर्वाधिक कर महाराष्ट्रातून जात असताना महाराष्ट्राला या अर्थसंकल्पातून भरीव असे काहीच मिळाले नाही. काँग्रेसच्या न्याय पत्राची उचलेगिरी अर्थसंकल्प दिसून आली आहे. अशा शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर सडकून टिका केली आहे.

    Union budget श्री. वडेट्टीवार म्हणाले की, केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी विशेष कोणतीही तरतूद केली नाही. महाराष्ट्रातील कापूस, संत्रा, धान, कांदा, सोयाबिन, दूध उत्पादक शेतकऱ्यांचा केंद्र सरकारला विसर पडल्याचे आता लपून राहिले नाही. त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्प शेतकरी विरोधी असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. त्यामुळे केंद्राचे गोडवे गाणाऱ्या महायुतीने महाराष्ट्रासाठी काय आणले याचा हिशेब जनतेला द्यावा. विकास कामाच्या नावाखाली दिल्लीच्या चकरा मारणाऱ्या एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी केंद्रीय नेतृत्वाशी निधीबाबत चर्चा केल्या की तिथे जाऊन राजकीय फायद्याची गणितं मांडली असा प्रश्न या अर्थसंकल्पामुळे पडतो. त्यामुळे महायुती सरकार महाराष्ट्राचा स्वाभिमान कितीवेळा तुडविणार याचा जाब जनताच विचारेल.

    चंद्रपुरात भीषण अपघात

    लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने न्यायपत्रात बेरोजगार तरूणांसाठी पहली नोकरी पक्की ही योजना आणली होती. या योजनेनुसार इंटर्नशिप देण्याचं आश्वासन आम्ही दिले होते. आज केंद्रीय अर्थमंत्र्यांनी हीच घोषणा केली आहे. एकीकडे विरोधकांवर रेवडी संस्कृती म्हणून टीका करायची आणि दुसरीकडे मात्र त्यांच्या योजनांची उचलेगिरी या अर्थसंकल्पात केली आहे. केंद्र सरकारला मतांसाठी आणि टॅक्ससाठी महाराष्ट्राची आठवण होते. परंतु महाराष्ट्राला निधी देताना केंद्र सरकार हात आखडता घेते.

    केंद्र सरकार अस्थिर आहे. बिहारच्या जेडीयु आणि आंध्रच्या टीडीपी पक्षाच्या टेकूवर केंद्र सरकार उभे असल्याने बिहार आणि आंध्र प्रदेशवर निधीची खैरात केली आहे. देशातील सर्व राज्यांना न्याय देण्याची वृत्ती या सरकारची नाही. राजकीय फायदा असणाऱ्या राज्यातच निधी देणारं हे सरकार आहे. त्यामुळे आज सादर झालेला अर्थसंकल्प भारतासाठी नाही ठराविक राज्यासाठी आहे अशी टीका देखील श्री. वडेट्टीवार यांनी केली आहे.

    आजचा बजेट म्हणजे जुन्या घोषणांना नविन फोडणी – खासदार प्रतिभा धानोरकर

    संपूर्ण देशाचे लक्ष आजच्या अर्थसंकल्पाकडे लागून होते पंरतू आजचा बजेट हा जुन्या घोषणांना नविन फोडणी असल्याचे खासदार धानोरकर यांनी सांगितले. रोजगाराच्या नावाखाली प्रशिक्षण देणारे असून यामूळे बेरोजगारांची थट्टा होणार आहे. महिला, शेतकरी यांच्याकरीता कोणत्याही मोठ्या योजना नसल्याची खंत देखील खासदार धानोरकर यांनी व्यक्त केली. आजचा अर्थसंकल्प हा सामान्यांना निराश करणारा आहे. असे मत यावेळी खासदार धानोरकर यांनी सांगितले.

  • Transgender scheme : तृतीयपंथीयांसाठी एखादी योजना आणा – मनसेची मागणी

    Transgender scheme : तृतीयपंथीयांसाठी एखादी योजना आणा – मनसेची मागणी

    Transgender scheme संपूर्ण राज्यभर माझी लाडकी बहीण, माझा लाडका भाऊ योजना सरकार राबवित असून योजनेची चर्चा सर्वत्र सुरू आहे. यासाठी महिला व बेरोजगार तरुणांची लगबग ग्रामीण व शहरी भागात दिसत आहे. परंतु समाजातील दुर्लक्षित असलेले आर्थिक दुर्बल व वंचित घटक असलेल्या तृतीयपंथीयांना कोणत्याही योजना नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपूर तर्फे माझी लाडकी बहिण योजनेसारखी योजना तृतीयपंथीयासाठी ही राबवावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांनमार्फत मुख्यमंत्र्यांना मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी केली.

    अवश्य वाचा : मदत छोटीशी मी आपल्या सदैव पाठीशी – प्रतिभा धानोरकर


    Transgender scheme तसेच तृतीयपंथीयासाठी सरकार तर्फे राबविण्यात येणारी कल्याणकारी योजनेचा लाभ देखील पोहचत नसून यासाठी शेवटच्या घटकापर्यंत पोहचत नसून याच्या उपाययोजनेसाठी अंमलबजावणी करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.


    यावेळी व्यापारी सेनेचे जिल्हाध्यक्ष महेश शास्त्रकार, रोजगार व स्वयंरोजगार सेनेचे जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर, जील्हासाचिव किशोर मडगुलवार, तालुका अध्यक्ष प्रकाश नागरकर, मनवीसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, ग्रामपंचायत सदस्य विवेक धोटे, महिला सेना शहरअध्यक्ष वर्षा भोमले, कामगार सेनेचे अक्षय चौधरी, मनविसचे करन नायर, सुयोग धनवलकर, मयूर मदनकर, निकी यादव, अनुप माथणकर, शुभम वांढरे व संबोधन संस्थेचे अधक्ष राज कचोरे उपस्थित होते.

  • Lok Sabha Monsoon Session : चंद्रपूर जिल्ह्यातील विविध समस्यांबाबत रक्षामंत्री सिंह यांच्यासोबत चर्चा

    Lok Sabha Monsoon Session : चंद्रपूर जिल्ह्यातील विविध समस्यांबाबत रक्षामंत्री सिंह यांच्यासोबत चर्चा

    Lok Sabha Monsoon Session आज पासून लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील रक्षा विभागाच्या विविध समस्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज दिल्ली येथे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी रक्षा मंत्री राजनाथ सिंह यांच्या समवेत भेट घेऊन समस्या निकाली काढण्याची विनंती केली. यावेळी मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत समस्या लवकरच निकाली काढणार असल्याचे मान्य केले.

    अवश्य वाचा : पूर ओसरला, चंद्रपुरातील हा मार्ग सुरू

    Lok sabha monsoon session चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे असलेल्या आयुध निर्माणीतील 22 अनुकंपा धारकांना तात्काळ सेवेत सामावून घ्यावे तसेच आयुध निर्माणीतील अनुकंपा धारकांचा प्रश्न त्वरित निकाली काढावा. त्यासोबच बल्लारपूर रोड वरील सैनिकी शाळेत चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना 10 टक्के जागा राखीव ठेवण्यासंदर्भात आज दिल्ली येथे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी रक्षा मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी वरील विषयासंदर्भात निवेदन देऊन वरील समस्यांसंदर्भात त्वरीत निर्णय घेण्याची विनंती केली. मा. रक्षा मंत्री यांनी वरील विषयासंदर्भात संबंधीत अधिकाऱ्यांशी चर्चा करुन सदर विषय लवकरच निकाली काढणार असल्याचे सांगितले.

  • Legislative Council of maharashtra : शासनाची फसवणूक करणाऱ्या शिक्षणाधिकारी चव्हाण यांना निलंबित करा – आमदार सुधाकर अडबाले

    Legislative Council of maharashtra : शासनाची फसवणूक करणाऱ्या शिक्षणाधिकारी चव्हाण यांना निलंबित करा – आमदार सुधाकर अडबाले

    Legislative Council of maharashtra चंद्रपूरच्या तत्कालीन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती कल्पना चव्हाण यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या अनियमिततेची झालेल्या चौकशीवर त्यांना तात्काळ निलंबित करावे व त्यांच्या संपत्तीची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून केली. आठवडाभरात त्यांचा खुलासा प्राप्त होताच निलंबित करू, असे स्पष्ट उत्तर सभागृहात शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले.
    चंद्रपूरच्या माध्यमिक शिक्षण विभागात श्रीमती कल्पना चव्हाण तीन वर्षांपूर्वी रुजू झाल्या. त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील अनेक कार्यरत / सेवानिवृत्त मुख्याध्यापक, शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची प्रकरणे प्रलंबित ठेवली जात होती. त्यावर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयाची चौकशी करण्यात यावी, अशी तक्रार आयुक्त (शिक्षण) पूणे यांच्याकडे केली होती. त्यांच्या तक्रारीवर शिक्षण उपसंचालक नागपूर यांच्या तपासणी पथकाने शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयाची केलेल्या तपासणीत वरिष्ठ / निवड श्रेणी, वैद्यकीय प्रकरणे, सेवानिवृत्ती प्रकरणे व इतर अनेक प्रकरणे प्रलंबित ठेवणे, त्यांचे कार्यालयीन कामकाजावर व अधिनस्त कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसणे, कामकाजात दप्तर दिरंगाई करणे, लोकसेवा हमी कायद्यांतर्गत चुकीचा अहवाल सादर करणे, आदी बाबी चौकशीत आढळून आल्या. त्यानंतर श्रीमती चव्हाण यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 च्या नियम 10 अन्वये आयुक्त (शिक्षण) पुणे यांनी दोषी ठरविले.
    मात्र, पुढे त्यांच्यावर कारवाई होत नव्हती. यावर मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार अडबाले यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करून शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना तात्काळ निलंबित करावे व त्यांच्या संपत्तीची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी सभागृहात केली.
    Legislative Council of maharashtra
    तत्कालीन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कल्पना चव्हाण यांना स्पष्टीकरण देण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटिशीला उत्तर मिळाल्यानंतर आठवडाभरात निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे, असे उत्तर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले.

    आमदार सुधाकर अडबाले यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नामुळे शिक्षण विभागातील प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

    जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना तत्कालीन शिक्षणाधिकारी यांच्यामुळे झालेला मनस्ताप बघता चंद्रपूरच्या तत्‍कालिन शिक्षणाधिकारी (माध्य.) यांच्यावर कारवाई पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा सुरूच राहील, असे आमदार सुधाकर अडबाले यांनी सांगितले.

  • Ballarpur Vidhan Sabha Congress : बल्लारपूर विधानसभा उमेदवारी साठी कांग्रेस पक्षात रस्सीखेच सुरू

    Ballarpur Vidhan Sabha Congress : बल्लारपूर विधानसभा उमेदवारी साठी कांग्रेस पक्षात रस्सीखेच सुरू

    Ballarpur Vidhan Sabha Congress चंद्रपुर काँग्रेस जिल्हाध्यक्षांना डावलून संतोष रावत यांचे कार्यकर्ते गडचिरोलीच्या काँग्रेस नेत्याला हाताशी धरून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे मुल बल्लारपुर विधानसभेच्या तिकिटासाठी फिल्डिंग लावत आहे. 7 जुलै 2024 रोजी मुल च्या संतोष रावत गटाने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली.

    अवश्य वाचा : चंद्रपूर विधानसभा लढण्यासाठी कांग्रेसला मिळाला उमेदवार

    लोकसभेच्या ऐतिहासीक विजयामध्ये या विधानसभेत घेतलेल्या लक्षणीय मताधीक्या ने विधानसभेच्या तिकिटासाठी मूल बल्लारपूर क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर रस्सीखेच चालू असताना संतोष रावत गटातील कार्यकर्त्यानी जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांना डावलुन गडचिरोलीच्या एका काँग्रेस नेत्याला हाताशी धरून नाना पटोले यांची भेट घेतली हा जिल्हाभरामध्ये आता चर्चेचा विषय झालेला आहे.

     

    Ballarpur Vidhan Sabha Congress नुकत्याच झालेल्या पोंर्भुणा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष पदाच्या निवडीवरून संतोष रावत गट आणि जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांच्यामध्ये बराच कलगीतुरा रंगलेला आहे.

    तालुका अध्यक्षाच्या निवडीनंतर मोठ्या प्रमाणामध्ये तालुक्यामधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी वासुदेव पाल यांच्या नावाला उघडपणे विरोध करत पत्रकार परिषद घेउन सामुहीक राजीनामे देण्याची धमकी देत जिल्हा कांग्रेस कमेटीला जेरीस आनले होते.

    या गटातटाच्या राजकारणाच्या बाबतीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आधीही कडक भूमिका घेत पदाधीकारी यांना सहा वर्षा करिता निलंबित केले आहे. त्यामुळे आता ते काय भूमिका घेतात याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

    सध्या तरी बल्लारपूर विधानसभा साठी कांग्रेस पक्षात डझनभर नेते इच्छुक असले तरी याबाबत पक्ष श्रेष्ठी निर्णय घेणार.

     

    यावर कांग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की अनेकजण उमेदवारीसाठी इच्छुक आहे, जो-तो आपल्या परीने उमेदवारी मिळावी यासाठी फिल्डिंग लावत आहे, कोण-कुणाला भेटलं याने मला काही एक फरक पडत नाही, मात्र उमेदवारांचे नाव मला द्यायचे आहे, जो खरा दावेदार आहे त्याला उमेदवारी नक्की मिळेल. उमेदवारी देण्याचा जो काही निर्णय असेल ते पक्षश्रेष्ठीं घेणार.

  • Chandrapur vidhansabha candidate : चंद्रपूर विधानसभा क्षेत्रासाठी कांग्रेसला मिळाला उमेदवार?

    Chandrapur vidhansabha candidate : चंद्रपूर विधानसभा क्षेत्रासाठी कांग्रेसला मिळाला उमेदवार?

    Chandrapur vidhansabha candidate
    मुंबई: लोकसभेतील अभुतपुर्व यशानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीने विधानसभेच्या निवडणूकीवर लक्ष केंद्रीत केले असून पक्ष वाढीसाठी प्रयत्न कले जाणार आहे. काँग्रेस पक्षात विविध स्तरातून पक्ष प्रवेश होत असून आज दि. 08 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र प्रदेश च्या टिळक भवन येथील कार्यालयात सेवा निवृत्त पोलिस अधिकारी श्री. सुधाकर अंभोरे व व्यावसायिक श्री. राहुल तायडे यांचा पक्ष प्रवेश संपन्न झाला.

    अवश्य वाचा : बल्लारपूर गोळीबार प्रकरणात व्यापारी एकटवले

    लोकसभेतील अभूतपूर्व यशानंतर अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात विविध स्तरातून पक्ष प्रवेश होत असून आज दि. 08 जुलै रोजी दादर स्थित महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी कार्यालयात सेवानिवृत्त पोलिस अधिकारी श्री. सुधाकर अंभोरे तसेच चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेत उल्लेखनिय कार्य करणारे व्यावसायिक श्री. राहुल तायडे यांचा पक्ष प्रवेश श्री. नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस यांच्या हस्ते संपन्न झाला.

     

    Chandrapur vidhansabha candidate यावेळी चंद्रपूर लोकसभेच्या खासदार प्रतिभा धानोरकर, राजुरा विधानसभेचे आमदार तथा चंद्रपूर जिल्हा कॉग्रेस कमेटीचे अध्यक्ष श्री. सुभाष धोटे प्रामुख्याने उपस्थित होते. या पक्ष प्रवेशानंतर बोलतांना खासदार धानोरकर म्हणाल्या कि काँग्रेस पक्ष हा धर्मनिरपेक्ष पक्ष असून सर्व समावेशक आहे. श्री.अंभोरे यांच्या पक्ष प्रवेशाने पक्ष आणखी मजबूत होणार असून त्यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी आमदार सुभाष धोटे म्हणाले कि श्री. सुधाकर अंभोरे यांनी कॉग्रेस पक्षाच्या मजबूतीकरीता कार्य करावे व पक्ष प्रवेशाबद्दल सुधाकर अंभोरे व राहुल तायडे यांना शुभेच्छा दिल्या.

    अवश्य वाचा : ग्रामीण भागात अडीच कोटीच्या वाचनालयाचे लोकार्पण

    या पक्ष प्रवेशावेळी माजी आमदार वामनराव कासावार, यवतमाळ जिल्हा बॅकेचे माजी अध्यक्ष टिकाराम कोंगरे, यवतमाळ कॉग्रेस कमेटीचे सरचिटणीस संजय खाडे, कॉंग्रेस नेते नानाभाऊ गावंडे, चंद्रपूर जिल्हा अल्पसंख्याक काँग्रेस कमेटीचे माजी अध्यक्ष सोहेल रजा, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, प्रविण काकडे, हेंमत कांबळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

  • CM Eknath Shinde calling : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अम्मा ला दिलं आमंत्रण

    CM Eknath Shinde calling : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अम्मा ला दिलं आमंत्रण

    Cm eknath shinde calling आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री गंगुबाई उर्फ अम्मा यांच्या वतीने “अम्मा का टिफिन” उपक्रम राबविला जात आहे. सदर उपक्रमाची दखल राज्यपातळीवर घेतली गेली असून, या उपक्रमाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अम्माशी संवाद साधत उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अम्माच्या या सेवाभावी उपक्रमाबद्दल डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने नव दुर्गा पुरस्काराने अम्माचा सत्कार केला जाणार असून या सत्कार सोहळ्याचे आमंत्रण मुख्यमंत्री यांनी अम्माला दिले आहे.  

    अवश्य वाचा : साहेब, चंद्रपूर जिल्ह्यातील गुन्हेगारीकडे लक्ष द्या – खासदार धानोरकर यांची गृहमंत्री फडणवीस यांना मागणी

      आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपूरात सुरू असलेल्या “अम्मा का टिफिन” उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री जयंत पाठील, सिनेमा दिग्दर्शक नागराज मंजुळे, युकेचे जनरल सेक्रेटरी  जॉन एम निकेल यांच्यासह अनेक सामाजिक संस्थांनी या उपक्रमाला भेट देऊन कौतुक केले आहे.

    Cm eknath shinde calling सदर उपक्रमांतर्गत अत्यंत गरजू व्यक्तींना दररोज जेवणाचा टिफिन घरपोच पोहोचविला जातो. विशेष म्हणजे, आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थानी सदर टिफिन तयार केला जातो. त्यानंतर गरजूंच्या घरी पोहोचविला जातो. आज या उपक्रमाला तीन वर्षे पूर्ण झाली असून या सेवेत एकदाही खंड पडलेला नाही, हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे. या उपक्रमाच्या नियोजनबद्धतेचे अनेकांकडून कौतुक करण्यात आले आहे.

    महत्त्वाचे : 10 वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅब

    महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या एकनाथ शिंदे यांनी अम्माशी दूरध्वनीवरून संपर्क साधत आशीर्वाद घेतला होता. तसेच यावेळी त्यांनी “अम्मा का टिफिन” उपक्रमाबद्दलही माहिती जाणून घेतली होती. त्यानंतर आज रविवारी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून अम्माशी संवाद साधत मुंबई येण्याचे आमंत्रण दिले आहे. सोबतच डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने अम्माचा सत्कार केला जाणार असल्याचे जाहीर करत अम्माला निमंत्रण दिले आहे. 

     

    सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि विकासात्मक उपक्रमांद्वारे समाजाच्या गरजू घटकांची सेवा करण्याचे काम डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने केले जात आहे. सोबतच समाजात उत्तम काम करणाऱ्या महिलांचा सत्कारही या फाउंडेशनच्या वतीने केला जातो. यंदा सदर पुरस्कार गंगुबाई उर्फ अम्मा यांना घोषित करण्यात आला असून अम्माला नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

     

    Cm eknath shinde calling सेवाभावी उपक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रोत्साहन देत असतात. आमच्या उपक्रमाची मुख्यमंत्री यांनी दखल घेतली ही आमच्या “अम्मा का टिफिन” टीमसाठी गौरवाची बाब आहे. यामुळे आमचा उत्साह वाढला असून पुढे हे काम आणखी गतीने करत गरजूंना त्यांच्या हक्काची भाकर देण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळाले असल्याची प्रतिक्रिया अम्मा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बोलल्यानंतर दिली आहे.