Category: राजकारण

महाराष्ट्रातील राजकारण बातम्या (Maharashtra Politics News) आणि राष्ट्रीय स्तरावरील सर्व राजकीय घडामोडींसाठी news34.in हे आपले विश्वसनीय व्यासपीठ आहे. आम्ही तुम्हाला स्थानिक ग्रामपंचायत निवडणुकांपासून ते लोकसभा निवडणुकीपर्यंतच्या प्रत्येक मोठ्या-छोट्या अपडेट्सचे कव्हरेज देतो. राजकीय विश्लेषण, पक्षांची धोरणे, नेत्यांची मते आणि महत्त्वाचे शासकीय निर्णय. कोणत्याही राजकीय बातम्या चुकणार नाहीत याची खात्री बाळगा. राजकारण या क्षेत्रातील विश्वसनीय आणि ताज्या बातम्या मिळवण्यासाठी नियमितपणे भेट द्या.

  • Exclusive sachin pilot : या इंजिनचा फक्त धुव्वा उडतो – सचिन पायलट

    sachin pilot भद्रावती – महायुती सरकार च्या काळात भ्रष्टाचार फोफावला, केंद्र व महाराष्ट्र राज्यातील सरकारला हे डबल इंजिन सरकार म्हणून सांगतात पण डबल इंजिन सरकार कामाचे नसून फक्त धुव्वा उडविण्याचे काम करीत आहे म्हणून महाराष्ट्रात पुन्हा महाविकास आघाडी चे सरकार आणून महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन सचिन पायलट यांनी आज केले.

    अपक्ष महिला उमेदवार यांच्या बॅनर वर फेकले शेण

    Sachin pilot भद्रावती येथील स्वागत सेलिब्रेशन येथे आयोजित महाविकास आघाडीचे उमेदवार प्रविण काकडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत राजस्थान चे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची जाहिर सभा आयोजित करण्यात आली होती.

    सभेदरम्यान आपले मत व्यक्त करताना सचिन पायलट म्हणाले कि, महाराष्ट्र हा देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारे राज्य असून या ठिकाणी धर्म निरपेक्ष सरकार म्हणून महाविकास आघाडीतील प्रत्येक उमेदवाराला निवडणून आणणे हे आपली जबाबदरी आहे.

    वरोरा विधानसभेतील उमेदवार प्रवीण काकडे हे जनसामान्यांचे नेतृत्त्व करणारे उमेदवार म्हणून आपल्या समोर आहे. विकासातील सातत्य व भविष्यातील विधानसभा क्षेत्राच्या विकासाकरीता महाविकास आघाडीने आपल्या समोर योग्य उमेदवारी दिली आहे. तरी आपण यांच्या पाठाशी राहून या विधानसभेत पुन्हा एकदा विक्रम घडवावा असे आवाहन यावेळी सचिन पायलट यांनी केले आहे. Sachin pilot

    महायुती सरकार च्या काळात महिलांवर होणारे अन्याय अत्याचार वाढले असून भ्रष्टाचार देखील फोपावला आहे. राज्यातील अनेक उद्योग दुसऱ्या राज्यात जात आहे. शेतकऱ्यासाठी 3 काळे कायदे केंद्र सरकारने आणले होते त्याविरोधात हजारो शेतकरी दिल्लीत ठाण मांडून बसले होते. त्या आंदोलनात शेकडो शेतकऱ्यांचा जीव गेल्यावर केंद्र सरकारला काळे कायदे परत घ्यावे लागले होते, केंद्र व राज्य सरकारचे डबल इंजिन फक्त धुव्वा फेकण्याचे काम करीत आहे.

    राज्यातील विकासाचे ध्येय ठेवून कार्य करणाऱ्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान करुन सत्ता परिर्वनाच्या लढाईत आपला सहभाग नोंदवावा, असे मत देखील यावेळी सचिन पायलट यांनी केले. यावेळी मंचावर खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार अभिजित वंजारी, यांसह महाविकास आघाडीचे अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

  • House Voting : चंद्रपूर जिल्ह्यात 2080 नागरिकांनी केले मतदान

    House Voting चंद्रपूर : सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येक मत महत्वाचे आहे. कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने 85 वर्षांवरील मतदार आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेल्या मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे.

    House voting याच अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात यंत्रणेने नागरिकांच्या घरी जाऊन मतदान घेतले. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 2080 मतदारांनी गृहमतदान करून समाधान व्यक्त केले. यात 85 वर्षांवरील 1711 मतदारांचा तर 369 दिव्यांग मतदारांचा समावेश आहे.

    अपक्ष उमेदवारांच्या बॅनर वर शेणाचा मारा

    असे आहे विधानसभानिहाय गृहमतदान : राजूरा विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत 85 वर्षांवरील 478 मतदारांनी आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या 53 अशा एकूण 531 मतदारांनी गृहमतदान केले.

    चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात 85 वर्षांवरील 197 आणि दिव्यांग 24 असे एकूण 221 मतदारांनी गृहमतदानात सहभाग घेतला. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात 85 वर्षांवरील 238 आणि दिव्यांग 84 असे एकूण 322 मतदारांनी, ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात 85 वर्षांवरील 251 आणि दिव्यांग 79 असे एकूण 330 मतदारांनी, चिमूर विधानसभा मतदारसंघात 85 वर्षांवरील 265 आणि दिव्यांग 64 असे एकूण 329 मतदारांनी तर वरोरा विधानसभा मतदारसंघात 85 वर्षांवरील 282 आणि दिव्यांग 65 असे एकूण 347 मतदारांनी गृहमतदान केले. House voting

    मतदानाची गोपनीयता : गृह मतदान करतांना मतदान प्रक्रियेची गोपनीयता पाळण्याच्या सुचना भारत निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यानुसार फॉर्म 13 – ए (डिक्लरेशन), फॉर्म 13 – बी (कव्हर ए लिफाफा), फॉर्म 13 – सी (कव्हर बी लिफाफा) आणि फॉर्म 13 – डी (मतदान कसे करायचे याबाबत सुचना) आदी प्रक्रियेबाबत अधिकारी व कर्मचा-यांनी सुरवातीला मतदारांना माहिती दिली. यावेळी घरामध्ये स्थापन केलेल्या मतदान कक्षामध्ये सदर मतदारांनी आपले मत नोंदविले. यावेळी मतदान करतांना कोणताही दुसरा व्यक्ती त्यांच्याजवळपास नव्हता. House Voting

    मतपत्रिका घडी केल्यानंतर सदर मतपत्रिका छोट्या लिफाफामध्ये आणि नंतर मोठ्या लिफाफामध्ये टाकून मतपेटीत जमा करण्यात आली.

  • Abhilasha gaoture campaign : अपक्ष उमेदवार यांच्या बॅनर वर शेणाचा मारा

    Abhilasha gaoture campaign विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहचली असून उमेदवार पायात भिंगरी घालून प्रचार करीत आहे.

    Abhilasha gaoture campaign बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील लढत आता चुरशीची झाली असून या लढती मध्ये अपक्ष उमेदवार डॉ.अभिलाषा गावतुरे यांच्या उमेदवारीने विरोधी पक्ष धास्तावला असून आता खालच्या पातळीचे राजकारण सुरू झाले आहे, गावतुरे यांच्या बॅनर वर शेणाचा मारा केल्याची बाब उघडकीस आली आहे.

    भाजपच्या बॅनर वरून सम्पर्क प्रमुखाचा फोटो गायब

    बल्लारपूर(72) मतदार संघातून डॉ. अभिलाषाताई गावतुरे या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत आहेत.
    डॉ.गावतुरे यांची मतदारसंघामध्ये दिवसेंदिवस लोकप्रियता वाढत असून त्यांना समाजातील सर्व स्तरातून विशेषातः युवा, शेतकरी,शेतमजूर, दलित, आदिवासी, ओबीसी, महिला,डॉक्टर,वकील तथा पुरोगामी विचारवंतांचा जोरदार पाठिंबा मिळत आहे. Abhilasha gaoture campaign

    एक महिला कणखर नेतृत्व म्हणून त्या पुढे येत आहेत. त्यामुळे आपला पराभव होते की काय या धास्तीमुळे त्यांचे विरोधक नीच स्थरावर जाऊन प्रचार करीत आहेत. कुठे त्यांच्या लावलेल्या बॅनरवर शेणफेक करण्यात आली तर कुठे त्यांचे बॅनर फाडून त्यांचा अपमान करण्यात आला.


    असाच महिलांचा अपमान येथील विद्यमान आमदार यांनी लोकसभेच्या प्रचार दरम्यान केला होता व त्यामुळे लोकांनी विशेषातः महिलांनी त्यांना त्यांची जागा दाखविली त्यांचा दारून पराभव झाला.त्यामुळे डॉ. अभिलाषा ताईच्या बॅनरवर जी शेणफेक झालेली, त्यामागे कोण प्रस्थापित आहेत हे आता लपून राहिलेले नाही.


    आणी तसे जर असेल तर अगोदरच एका महिले कडून लोकसभेत एका प्रस्थापिताचा पराभव झाला. यावेळी सुद्धा या प्रस्थापितांचा पराभव एक महिलाच करेल असे बोलले जात आहे.

  • BJP banner controversy : भाजपच्या बॅनर वरून संपर्क प्रमुखाचा फोटो गायब

    BJP banner controversy चंद्रपूर : जिल्ह्यात वरोरा विधानसभा क्षेत्राकडे सध्या नागरिकांचे लक्ष लागले आहे. यामध्ये वरोरा विधानसभा क्षेत्रातून भाजपकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेले आणि भाजप विधानसभा संपर्क प्रमुख असलेल्या डाॅ. रमेश राजूरकर यांचा भाजप उमेदवाराच्या प्रचार बॅनरवर फोटो नसल्याने चर्चांना उधान आले आहे.

    BJP banner controversy विशेष म्हणजे, धनोजे कुणबी चेहरा म्हणून भाजपने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत
    त्यांचा पक्ष प्रवेश करून घेत त्यांच्यावर विविध जबाबदाऱ्या सोपविल्या होत्या.

    16 नोव्हेंबर रोजी राहुल गांधी यांची चिमुरात सभा


    वरोरा विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपने करण देवतळे यांना उमेदवारी दिली आहे. येथून निवडणूक लढविण्यासाठी धनोजे कुणबी समाजात सक्रीय असलेले भाजपचे डाॅ. रमेश राजूरकर इच्छुक होते. मात्र ऐनवेळी त्यांची उमेदवारी नाकारून देवतळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर डाॅ. राजुरकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र ओबीसी आयोगाचे अध्यक्ष माजी मंत्री हंसराज अहीर, सांस्कृतिक तसेच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच वरिष्ठ नेत्यांच्या सांगण्यावरून त्यांनी आपला अर्ज मागे घेतला. BJP banner controversy

    विशेष म्हणजे, २०१९ मध्ये राजुरकर यांनी मनसेकडून विधानसभा निवडणूक लढविली होती. यावेळी त्यांना ३४ हजारांवर मते मिळाली. त्यानंतर भाजपचे लक्ष त्यांच्याकडे गेले आणि विधानसभा क्षेत्रातील कुणबी चेहरा म्हणून त्यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मोठा गाजावाजा करीत पक्ष प्रवेश करण्यात आला. यावेळी त्यांच्यावर विधानसभा संपर्क प्रमुखासह विविध जबाबदाऱ्या देण्यात आले. BJP banner controversy

    वरोरा विधानसभा क्षेत्र धनोजे कुणबी बहुल असल्याने त्याचा फायदा भाजपला झाला. मात्र विधानसभा निवडणुकीत डाॅ. राजुरकर यांना तिकीट नाकारत आता भाजप उमेदवाराच्या प्रचार बॅनरवर साधा फोटोही नसल्याने या विधानसभा क्षेत्रामध्ये चर्चांना उधाण आले आहे.

    उमेदवारी मिळाली नसल्याने राजूरकर नाराज असल्याचे बोलल्या जात आहे. त्यामुळे कुणबी चेहरा असलेल्या राजुरकर यांच्या नाराजीचा कोणाला फायदा होतो आणि कोणाला तोटा याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.


    २०१९ मध्ये ३४ हजारांवर मते

    २०१९ ची विधानसभा निवडणूक झाली यावेळी वरोरा विधानसभा क्षेत्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून डाॅ. रमेश राजूरकर यांनी निवडणूक लढविली होती. यावेळी त्यांना ३४ हजार ८४८ मते मिळाली होती. विशेष म्हणजे, या निवडणुकीनंतर राजुरकर यांच्या घरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट दिली होती.

  • Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज चंद्रपुरात

    nitin gadkari चंद्रपूर – बल्लारपूर व चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार व किशोर जोरगेवार यांच्या प्रचारार्थ 13 नोव्हेंबर 2024 ला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री, विकासपुरूष ना. श्री. नितीन गडकरी यांची जाहीर सभा दुर्गापूर व घुग्गुस जिल्हा चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आली आहे.

    Nitin gadkari देशभर रस्ते आणि पुलांचे जाळे निर्माण करून पायाभूत सुविधांना उभारी देणारे केंद्रीय मंत्री विकासपुरूष ना. श्री. नितीन गडकरी दुर्गापूर येथिल कार्यक्रमाला 13 नोव्हेंबरला उपस्थित राहणार आहे.

    शक्तीनगर दुर्गापूर येथे डब्ल्यूसीएल कॉलनीजवळील गणेश मैदानात सकाळी 11 वाजता तर दुपारी दीड वाजता घुग्घुस येथील बसस्थानकाजवळील लॉयड मेटल परिसरात ना. श्री. नितीन गडकरी नागरिकांशी संवाद साधतील.

    क्रांतिभूमी चिमुरात राहुल गांधी यांची जाहीर सभा

    भाजपा महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार व किशोर जोरगेवार यांच्या निवडणूक प्रचारार्थ आयोजीत केंद्रिय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या जाहीर सभेला जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.

  • Rahul Gandhi Rally : क्रांतिभूमी चिमुरात राहुल गांधी यांची सभा

    Rahul Gandhi Rally विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात आता स्टार प्रचारकांच्या एन्ट्रीने नवी चुरस निर्माण झाली आहे.


    Rahul gandhi rally चंद्रपूर जिल्ह्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेते भाजप खासदार रवि किशन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर कांग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक आता उमेदवारांच्या प्रचारार्थ रणांगणात उतरले आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारू विरुद्ध मोहीम, तब्बल 300 गुन्हे दाखल


    कांग्रेसचे कन्हैया कुमार नंतर आता कांग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांची चिमूर येथे जाहीर सभा होणार आहे.
    16 नोव्हेंबर रोजी चिमूर तालुक्यातील नेरी रोड जवळ कांग्रेस नेते राहुल गांधी यांची सभा आयोजित करण्यात आली आहे.


    20 नोव्हेंबर मतदानाचा दिवस असून त्यापूर्वी कांग्रेस व भाजप पक्षाचे स्टार प्रचारक आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ विविध ठिकाणी दाखल होत आहे.
    12 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चिमूर मध्ये सभा आयोजित करण्यात आली होती.


    पंतप्रधान मोदी यांनी आपल्या मार्गदर्शनात कांग्रेसवर जोरदार टीका केली आता त्या टीकेवर राहुल गांधी काय उत्तर देतात याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष असेल.
    चिमूर विधानसभा क्षेत्रातील कांग्रेसचे उमेदवार सतीश वारजूरकर यावेळी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहे त्यांच्यासमोर भाजपचे बंटी भांगडिया विजयाची हॅट्रिक मारण्याच्या तयारीत आहे. त्यांच्या विजयी रथाला वारजूरकर यंदा जोरदार आव्हान देताना दिसत आहे.

  • Sudhir mungantiwar public meeting : मुनगंटीवार यांच्या प्रचार रॅलीला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

    Sudhir mungantiwar public meeting जिल्ह्याचा समतोल विकास साधताना आरोग्य, शिक्षण, कृषी, सिंचन, क्रीडा, पर्यटन आणि रोजगार आदी क्षेत्राच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. बल्लारपूर मतदारसंघाच्या विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहे. बल्लारपूर तालुक्याची निर्मीती करुन विविध विकासकामे मतदारसंघात पूर्णत्वास आणली.

    Sudhir mungantiwar public meeting बल्लारपूर शहरामध्ये विविध जाती-धर्माचे लोक वास्तव्यास असून सर्व जाती धर्मीयांच्या कल्याणासाठी व प्रगतीसाठी कार्य केले. यापुढेही असाच आशीर्वाद कायम राहील्यास बल्लारपूरचा गौरव वाढविण्यासाठी विकासकामांना चालना देण्यात येईल, अशी ग्वाही ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

    किशोर जोरगेवार यांची प्रचारात आघाडी

    ट्रक असोसिएशन तर्फे आयोजित भव्य रॅलीनंतर जाहिर सभेत त्यांनी नागरिकांसोबत संवाद साधला. यावेळी नागरिकांनी रॅलीचे दमदार स्वागत केले. सर्वसामान्यांच्या व कष्टकऱ्यांच्या सेवेसाठी माता-भगिनींचा आशिर्वाद लाख मोलाचा असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी ना.मुनगंटीवार म्हणाले, ‘बल्लारपूर शहराला ‘मिनी इंडिया’ असे संबोधले जाते. याठिकाणी विविध जाती-धर्माचे लोक वास्तव्यास आहेत. Sudhir mungantiwar public meeting

    अवैध दारु विरुद्ध 300 गुन्हे दाखल

    येथे वास्तव्यास असणारे, मुस्लिम बांधव, उत्तर भारतीय बांधवासाठी काम केले. विकासकामांच्या माध्यमातून मागील अनेक वर्षापासून बल्लारपूर शहराचा गौरव वाढवण्याचे कार्य केले. नागरिकांच्या मागणीनुसार बल्लारपूर तहसीलची निर्मिती आणि यासोबतच एसडीओ कार्यालय उभारले.

    कच्च्या घरात राहणाऱ्या बल्लारपूरातील नागरिकांना येत्या पाच वर्षात घरकुल उपलब्ध करुन देण्यात येणार असून डब्ल्यूसीएलच्या जागेवर जमिनीचे पट्टे देण्याचा निर्णय करण्यात आला आहे. बचत गटाच्या उत्पादित वस्तूंना योग्य बाजारपेठ मिळावी यासाठी चंद्रपूरमध्ये बाजारहाट निर्माण केली जात आहे.’ Sudhir mungantiwar public meeting

    ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ बल्लारपूर येथे  भव्य रॅली:
     बल्लारपूर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ ट्रक असोसिएशन तर्फे ऐतिहासिक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. गोल पुलीया बल्लारपूर येथून सुरु झालेल्या रॅलीमध्ये हजारो नागरिक सहभागी झाले होते.

    बल्लारपूर शहरातील विविध विकास कामे:
     अत्याधुनिक सैनिकी शाळा, एसएनडीटी विद्यापीठाचे उपकेंद्र, नगरपरिषद इमारत, सांस्कृतिक सभागृह, नाट्यगृह, बस स्थानक, सर्वांगसुंदर रेल्वे स्टेशन, शहरातील तसेच अंतर्गत सिमेंट रस्ते, क्रीडा संकुल, विविध ठिकाणचे स्टेडियम, बॉटनिकल गार्डन, पोलीस स्टेशन, ग्रामीण रुग्णालय, पाण्याची व्यवस्था, छठघाट आदी विकास कामे करण्यात आली.


     अत्याधुनिक सैनिकी शाळा, एसएनडीटी विद्यापीठाचे उपकेंद्र, नगरपरिषद इमारत, सांस्कृतिक सभागृह, नाट्यगृह, बस स्थानक, सर्वांगसुंदर रेल्वे स्टेशन, शहरातील तसेच अंतर्गत सिमेंट रस्ते, क्रीडा संकुल, विविध ठिकाणचे स्टेडियम, बॉटनिकल गार्डन, पोलीस स्टेशन, ग्रामीण रुग्णालय, पाण्याची व्यवस्था, छठघाट आदी विकास कामे करण्यात आली.

  • Kishor jorgewar election campaign : किशोर जोरगेवार यांची प्रचारात आघाडी

    Kishor jorgewar election campaign आमदार किशोर जोरगेवार शेकडो कार्यकर्त्यांसह पदयात्रेतून मतदारांपर्यंत पोहोचत असल्याचे आज दिसून आले.

    Kishor jorgewar election campaign बंगाली कॅम्प परिसर आणि कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात त्यांनी पदयात्रा काढत नागरिकांच्या भेटीगाठी घेत पाच वर्षांतील कामांचा आढावा दिला. यावेळी कार्यकर्त्यांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

    चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारू विरुद्ध राज्य उत्पादन शुल्काची मोहीम, 300 गुन्हे दाखल

         प्रचाराचा वेग वाढला आहे. यंदाच्या निवडणुकीत सोशल मीडियाचाही मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. मात्र, आमदार किशोर जोरगेवार यांनी नागरिकांशी प्रत्यक्ष भेटून आपली कामे त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यावर भर दिल्याचे दिसून येत आहे.

    दोन दिवसांपासून सकाळी पदयात्रा आणि संध्याकाळी छोटेखानी बैठका असा नियमित प्रचार कार्यक्रम आमदार किशोर जोरगेवार यांनी आखला असून यातून अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.

    चंद्रपूर शहरातील प्रदूषणात प्रचंड वाढ

         या प्रचारादरम्यान ते मागील पाच वर्षांत केलेली कामे आणि पुढे चंद्रपूरच्या विकासाचे व्हिजन लोकांना पटवून देताना दिसून येत आहेत. त्यांच्या या प्रचाराला नागरिकांचाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. Kishor jorgewar election campaign

    ज्येष्ठ नागरिकांनाही ते आपुलकीने भेटत असून, ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध केलेल्या सोयीसुविधांबाबत त्यांना माहिती देत आहेत. प्रचारादरम्यान बोलताना ते म्हणाले की, मागील पाच वर्षांत आपण चंद्रपूरात विकासकार्य केले आहे. नागरिकांचे आलेले प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचा आपला प्रयत्न राहिला आहे.

         आपण कार्यालयात कर्तव्य सेतु केंद्र सुरू केले असून या केंद्राच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, विधवा, परित्यक्ता यांचे शासकीय योजनांची कागदपत्रे निशुल्क काढून दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

    मागील पाच वर्षांत आपण सतत नागरिकांच्या संपर्कात राहिलो असून, याचा फायदा प्रचारादरम्यान मिळत असल्याचे ते म्हणाले.

  • Shivani Wadettiwar : भाषणादरम्यान शिवानी वडेट्टीवार यांचा संयम सुटला #$%@%#

    Shivani Wadettiwar ब्रह्मपुरी – विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहचला असून सर्व राजकीय पक्षाचे शिलेदार प्रत्येक गावात मते मागताना फिरत आहे.


    Shivani Wadettiwar ब्रह्मपुरी मतदारसंघात विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार हे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहे यावेळी त्यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे.

    बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात मुनगंटीवार यांनी दिला महाविकास आघाडीला धक्का

    शिवानी वडेट्टीवार प्रचार करीत असताना गावातील वीज गेल्याने त्या चक्क शिवीगाळीवर उतरल्या, त्यांनी भर भाषणात महावितरणच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. Shivani Wadettiwar


    ब्रह्मपुरी तालुक्यातील आकापूर गावात सायंकाळी शिवानी वडेट्टीवार ह्या प्रचार करीत असताना अचानक वीज गेली, मोबाईल टॉर्च च्या प्रकाशात त्यांनी आपलं भाषण सुरू ठेवले मात्र त्यांचा संयम सुटला आणि महावितरण च्या अधिकाऱ्यांनी जाणून वीज बंद केला असा आरोप करीत त्या थेट शिवीगाळी करायला लागल्या, राज्याचा विरोधीपक्ष नेता हा पुढचा मुख्यमंत्री असतो हे लक्षात घ्या आमची सत्ता आली तर महावितरण व भाजपला चांगलाच धडा शिकविणार असे वक्तव्य शिवानी वडेट्टीवार यांनी यावेळी केले. Shivani Wadettiwar

    कांग्रेसचे प्रवीण काकडे यांची उमेदवारी रद्द करा

    शिवानी वडेट्टीवार यांच्या भाषणाचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने शिवानी वडेट्टीवार ह्या चांगल्या अडचणीत सापडल्या आहे, सदर व्हायरल व्हिडीओ वर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता काही प्रतिसाद मिळाला नाही.


    राज्याचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार हे ब्रह्मपुरी मतदारसंघातून कांग्रेस पक्षाचे उमेदवार आहे, ब्रह्मपुरी मतदारसंघात ते तिसऱ्यांदा आपलं नशीब आजमवित आहे.
    सध्या विजय वडेट्टीवार हे राज्याचे दौरे करीत असताना त्यांच्या मतदारसंघातील प्रचाराची धुरा त्यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी सांभाळली मात्र प्रचार करीत असताना त्यांचा संयम सुटला.


    विशेष म्हणजे आकापूर गावात मागील 10 वर्षांपासून थ्री फेज लाईन ची मागणी गावकरी करीत आहे, मात्र मागणी पूर्ण झाली नाही, मागील 10 वर्षांपासून वडेट्टीवार हे ब्रह्मपुरी मतदार संघातील आमदार व राज्याचे विरोधीपक्ष नेते आहे हे विशेष.

  • Election Campaign Office : मतदारांशी संवाद आणि प्रचार कार्यालयाचे उदघाटन

    Election Campaign Office प्रत्येक उमेदवार वेगवेगळ्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. यात आमदार किशोर जोरगेवार यांनी छोट्या बैठकींकडे लक्ष केंद्रित केले असून, ते बैठकांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. शहर आणि ग्रामीण भागात या बैठकांचे आयोजन केले जात असून, या बैठकींमधून मागील पाच वर्षांतील कामे सांगितली जात आहेत.

    सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीला दिला जोरदार धक्का

    Election Campaign Office मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे, सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार आणि अपक्ष उमेदवारांनी प्रचाराचा वेग वाढवला आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी मागील आठ दिवसांपासून मतदारसंघात बैठका घेत आपली विकासकामे लोकांपर्यंत पोहोचवण्यास सुरुवात केली आहे. या बैठकींमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांचीही उपस्थिती असते.

      या बैठकीत बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, मागील पाच वर्षांत मोठा निधी आपण मतदारसंघाच्या विकासासाठी खेचून आणला. चंद्रपूरातील शेवटच्या भागात असलेल्या कृष्णा नगर, संजय नगर या भागांतून आपण विकासकामांना सुरुवात केली. दुर्लक्षित राहिलेल्या शहरातील भागांमध्ये विकासासाठी मोठा निधी देण्याचा आपला प्रयत्न राहिला आहे. Election Campaign Office

    पाच वर्षांत अनेक मोठी कामे आपण मार्गी लावू शकलो. ५० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बाबूपेठ उड्डाणपूलाचे काम पूर्ण करण्यात आपल्याला यश आले आहे. धानोरा बॅरेजचा टीपीआर मंजूर करण्यात यश आले असून, त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न सुटणार असल्याचे त्यांनी सांगितले. दीक्षाभूमीच्या विकासासाठी आपण जवळपास ५७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. या निधीतून जागतिक दर्जाचे काम येथे केले जाणार आहे. Election Campaign Office

    वढा तीर्थक्षेत्राचा विकास होणार आहे. आपण ग्रामीण भागाच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून येथील अनेक कामे पूर्ण झाली आहेत, तर काही कामे प्रगतीपथावर असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आमदार किशोर जोरगेवार यांच्या बैठकींना नागरिकांची आणि भाजप कार्यकर्त्यांची गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.

    मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन

    महायुतीचे उमेदवार आमदार किशोर जोरगेवार यांच्या मिलन चौकातील भाजप मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 

    महानगरपालिकेच्या मागील मिलन चौकात आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारार्थ मध्यवर्ती निवडणूक कार्यालय सुरू करण्यात आले आहे. निवडणुकीसंदर्भातील कामे या कार्यालयातून चालणार आहेत. भाजप नेते तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी फित कापून कार्यालयाचे उद्घाटन केले. त्यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.