Category: ग्रामीण वार्ता

ग्रामीण वार्ता (Gramin Varta) विभागात वाचा news34.in वर चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बातम्या आणि घडामोडी. शेतकरी योजना, ग्रामपंचायत राजकारण, स्थानिक विकास प्रकल्प, कृषी आणि ग्रामीण जीवनाशी संबंधित सर्व महत्त्वाचे अपडेट्स येथे उपलब्ध आहेत. चंद्रपूर ग्रामीण भागातील समस्या, यशोगाथा आणि सकारात्मक बदलांना आम्ही प्राधान्य देतो. ग्रामीण भागातील विश्वासार्ह माहितीसाठी नियमित भेट द्या.

  • विश्वजीत देशपांडेवर गुन्हा दाखल करा ; महात्मा फुले समता परीषदेची मागणी

    News34

    गुरू गुरनुले
    मुल – राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगनरावजी भुजबळ यांच्यावर हल्ला करणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस देऊ, अशी घोषणा करणाऱ्या विश्वजीत देशपांडेवर कठोर कारवाई करत गुन्हा दाखल करून तातडीने अटक करा अशी मागणी महात्मा फुले समता परीषद वर्धा यांचे वतीने पोलीस मुख्यालयाचे पोलीस अधिक्षक यांना निवेदन दिले.

    राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते ,महात्मा फुले समता परीषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगनरावजी भुजबळ यांच्यावर हल्ला करणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस देऊ, अशी घोषणा परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी केली आहे.

    भुजबळ साहेब हे अ.भा.महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष असून पुरोगामी विचारसरणीची चळवळ घेऊन महाराष्ट्रात काम करीत आहे. आदरणीय भुजबळ साहेब राज्याचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असून मा.मंत्री महोदय आहेत. त्यांच्यावर हल्ला करण्यास प्रवृत्त करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या नराधमावर गुन्हा दाखल करून तातडीने अटक करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे.

    मुल पोलिस निरीक्षक सुमित परतेकी यांना निवेदन देताना अ.भा.महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा.विजय लोनबले, माजी जी.प.सदस्य बहुजनांचे मार्गदर्शक सल्लागार प्रा.रामभाऊ महाडोरे, महिला कार्याध्यक्ष शशिकला गावतुरे, माळी महासंघाचे विभागीय महासचिव तथा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गुरु गुरनुले, माळी महासंघाचे प्रा.सुधीर नागोशे शहर अध्यक्ष राकेश मोहुर्ल, सरपंच कालिदास खोब्रागडे, उपसरपंच योगेश लेनगुरे, माजी सरपंच अनिल शेंडे, जिल्हा सचिव ईश्वर लोनबले, कैलास चलाख,युवा आघाडीचे रोहित निकुरे, परशुराम शेंडे, प्रा.प्रभू धोटे, प्रा.नीरज चन्ने, पुरुषोत्तम कुंनघाडकर,विनोद आंबटकर, विजय काटकर,चक्रधर घोंगडे,दुशंत महाडोरे,श्रीकृष्ण शेंडे,मनीष मोहरले,दिलीप वार्जुकर,भाऊजी लेंनगूरे, महिला पदाधिकारी सीमा लोनबले,उषा चुदरी,दर्शना नीकुरे, देवराव ढवस्, दलीत जंनबंधू, आदी समता परिषदेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

  • चंद्रपुरातील या रस्त्यावरील खड्ड्यात नागरिकांनी लावले बेशरमाचे झाड

    News34

    चंद्रपूर – येथून जवळच असलेल्या महाकाली नगरी क्र.२ गेल्या पाच वर्षांत तयार झालेल्या वस्तीत असलेल्या मुख्य रस्त्यांची अवस्था फारच वाईट असून जागोजागी पाणी साचलेले आहेत. खराब रस्त्यामुळे आणि विजेअभावी रात्रौला अनेकांचे अपघात होत आहे.

    महाकालीनगरी ही देवाडा चोराळा आणि हिंगनाळा या गट ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत असून या ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यांनी या नगरीतील अव्यवस्थेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे.‌

    भुरट्या चोरांनी सुध्दा येथील लोकांच्या सबमर्शिबल मोटार पंप चो-या करणे सुरु केले आहे. गेल्या तीन वर्षापासून या महाकाली नगरीतील लोक अनेक समस्यांचा सामना करीत आहे. पावसांमध्ये जागोजागी पाणी साचत असून दुचाकी आणि चार चाकी वाहने चालवणे कठीण होत चाललेले आहे.

    या समस्या कडे येथील सामाजिक कार्यकर्त्या निशाताई धोंगडे यांनी लक्ष वेधले असून ग्रामपंचायतीला अनेकदा निवेदने सुद्धा दिले परंतु ग्रामपंचायतीने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेले आहे.

    शेवटी नाईलाजाने येथील निशाताई धोंगडे आणि गावातील नागरिकांनी ज्या ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलेले आहे, त्या ठिकाणी बेशरमच्या झाडांचे वृक्षारोपण करून ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीच्या निषेध केलेला आहे. तसेच येथील समस्या सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी आग्रहाची मागणी त्यांनी केलेली आहे.

  • बाइक दुर्घटना में 1 युवक की मौत 1 गंभीर घायल

    News34 accident

    बल्लारपुर (रमेश निषाद)

    👉 बल्लारपुर उपक्षेत्रीय प्रबंधक कार्यालय व कॉलरी दवाखाना के सामने रविवार कि रात करीब एक बजे गाय को बचाने के चलते हुई दुर्घटना में तीन घायलों में से एक कि मौत होने की पुष्टि नागपुर के मेडिटेशन अस्पताल के डॉक्टर ने की है।

    परिजन मृतक राजशेखर पेरका का मृतदेह लेकर नागपुर से बल्लारपुर पहुंच गए है, बताया जाता है कि मृतक को दो तीन महीनों में वेकोली की नौकरी लगनेवाली थी छोटा भाई कलकत्ता में कोयला माइन में फोरमैन है, तीसरा छोटा भाई ने भी मायनिंग किया हुआ है उसे भी नौकरी लगने वाली है, पेरका परिवार का काफी संघर्षमय जीवन रहा यह हादसा पूरे परिवार के लिए बहोत बड़ा सदमा बताया जा रहा है।  क्योंकि घर के बड़े बेटे की जान गई है, मृतक की लाश सरदार पटेल वार्ड में पहुंचने से परिसर में मातम सा छा गया है ।

    👉 दूसरा गंभीर वेकोली कामगार प्रशांत अाकुला को चंद्रपुर के मेहरा हॉस्पिटल में सुधार नहीं होता देख डॉक्टर ने हैदराबाद के यशोदा हॉस्पिटल के लिए रेफर किया है, उसकी भी हालत काफी नाजुक बताई जा रही है। वेकोली परिसर में खड़े ट्रक व सड़क पर बैठे जानवरों पर कार्यवाही करने की जरूरत है समय रहते बल्लारपुर नगर परिषद के मुख्याधिकारी व प्रशासक विशाल वाघ ने जानवरों व उनके मालिकों पर कार्यवाही की होती तो शायद आज राजशेखर पेरका की जान बचाई जा सकती थी ।

    आखिर नगर प्रशासन की उदासीनता के चलते युवक कि जान गई है, उसी प्रकार बल्लारपुर उपक्षेत्रीय अधिकारी व क्षेत्रीय सुरक्षा अधिकारी से सड़क पर खड़े कोयला भरे व खाली ट्रकों को हटाने की मांग नागरीको द्वारा कि जा रही है ताकि दुबारा ऐसी घटनाओं की पुनरावृत्ति ना हो ।

  • ड्युटी संपली रेल्वे थांबली, महिलांचा आक्रमकपणा बघून रेल्वे प्रशासन नरमले

    News34

    चंद्रपूर – मागील काही दिवसांपासून गोंदिया-बल्लारपूर रेल्वे मार्गावर चालणाऱ्या ट्रेन 23 ऑगस्ट पर्यंत तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहे, मात्र गोंदिया वरून सायंकाळी 6 वाजता सुटणारी बल्लारपूर जाणारी एकमेव रेल्वे सुरू आहे, ही रेल्वे रात्री 10.30 वाजता चांदा फोर्ट रेल्वे स्टेशनवर पोहचते मात्र 20 ऑगस्टला ही रेल्वे तब्बल साडेतीन तास उशिरा पोहचली.

    सायंकाळी गोंदिया वरून सुटणारी ही रेल्वे मूल स्टेशनवर रात्री 12 वाजता दाखल झाली, मात्र तिथून ती रेल्वे पुढे सरकत नव्हती, याबाबत मोटरमन ला प्रवाश्यानी विचारणा केली असता त्याने सांगितले की माझी ड्युटी 11 वाजता संपली आहे, मला लेखी आदेश मिळाल्याशिवाय मी रेल्वे पुढे नेऊ शकत नाही.

    यावर प्रवाश्यानी आक्षेप घेत स्टेशन मास्टर ला जाब विचारणा केली, मात्र त्यांनी आधी काही प्रतिसाद दिला नाही, महिला प्रवासी यावर स्टेशन मास्टर वर चिडल्या आमच्या सोबत काही प्रवासी आहे, त्यांची प्रकृती बरोबर नाही, जर प्रवाश्यांना काही झालं तर त्याला जबाबदार कोण असे खडेबोल महिलांनी स्टेशन मास्टर ला सुनाविले.

    दीड तासाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर स्टेशन मास्टर ने वरिष्ठांना विचारणा करीत मोटरमन ला लेखी आदेश देत रेल्वे पुढे न्यायला सांगितली, त्यानंतर सदर रेल्वे ही रात्री 2 वाजता चांदा फोर्ट ला पोहचली, रेल्वे प्रबंधनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका प्रवाश्याना बसल्याचे चित्र यावेळी दिसून आले.

  • आरोग्य शिबिराचा हजारो नागरिकांनी घेतला लाभ

    News34

    गुरू गुरनुले

    मूल – शासनाची आरोग्य सेवा पूर्णतः कोलमडली असून तालुक्याच्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय असून देखील अत्यावश्यक डॉक्टर व नर्स, तंत्रज्ञ कर्मचारी यांची भरती होत नसल्याने रुग्णालयात गेलेल्या रुग्णाला व गोरगरीब जनतेला आरोग्य सेवेचा लाभ मिळत नाही.

    उलट रेफर टू चंद्रपूर असेच सांगण्यात येते म्हणून एकाच छताखाली असंख्य रुग्णाला लाभ मिळावे यासाठी मा. दुर्गा मंदिर सेवा समिती मुल व दत्तमेघे शिक्षण संशोधन संस्था संचलित आचार्य विनोबा भावे रुग्णालय सावंगी मेघे यांचे मार्फतिने व तालुका काँग्रेस कमिटीच्या सहकार्याने आणि मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन मुल व सावली केमिस्ट अँड ड्रॅगीस्थ्ठ यांचे मदतीने भव्य मोफत आरोग्य तपासणी, रक्तगट तपासणी मोफत औषध वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले.

    Santosh rawat
    संतोष रावत यांची शिबिरात उपस्थिती

    जनकल्याणकारी सामान्य जनतेच्या दारी या उदात्त हेतूने रूग्णसेवा हिच खरी ईश्वरसेवा आहे,असे मत शिबिर उद्घघाटन प्रसंगी मार्गदर्शन करतांना चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष, माजी जी.प.अध्यक्ष, श्री मॉं दुर्गा मंदिर सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी व्यक्त केले. शिबिरामध्ये जवळपास तीन हजार सातशे च्या वर रूग्णांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला.तसेच त्यांना मोफत औषधी वितरण करण्यात आले.

    शिबिरामध्ये जनरल फिजीशियन,बालरोग तज्ज्ञ, नेत्ररोग,दंतरोग,स्त्री रोग, नाक, कान, घसातज्ज्ञ, अस्थिरोग,मानसोपचार,त्वचारोग आणि सर्जरी तज्ज्ञ उपस्थित होते.यावेळी ब्लड प्रेशर , ईसीजी ,मेमोग्राफी, ब्लड शुगर,सर्व प्रकारच्या रक्त चाचण्या,गर्भवती माता व स्तनदा मातांची तपासणी, लसीकरण,सिकल सेल चाचणी,बाहय रूग्ण सेवा, त्वचा आजार तपासणी इत्यादी सुविधा रूग्णांना देण्यात आल्या.

    शिबिरा मध्ये विधानसभा विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेटटीवार यांनी तयार केलेले फिरते रूग्णालय व कॅन्सर निदान केंद्र रूग्णांच्या सेवेकरिता उपलब्ध करण्यात आले होते.शिबिरास्थळी प्रमुख आयोजक संतोषसिंह रावत शिबिराकडे लक्ष देत होते. शिबिरात शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष बाबासाहेब वासाडे,सचिव अॅड.अनिल वैरागडे यांनी भेट दिली. शिबिराला मूल,सावली तालुक्यातील तसेच परिसरातील जवळपास तीन हजार सातशेच्या वर रूग्णांनी सेवेचा लाभ घेतला. याशिवाय क्यानसर ग्रस्त 126, रक्तगट 180, व असंख्य जनरल आरोग्य तपासणी करण्यासाठी सावंगी मेघे डॉ .अभ्युदय मेघे, डॉ.निखिलेश नाकतोडे, संयोजक मुरलीधर उमाटे, अभिषेक टिकले, डॉ.अजय कौशिक,सचिन ठाकरे, सचिन आगलावे,शिबिर यशस्वी करण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. थेरे यांचे अधिंनस्थ आशा. वर्कर, देवणील नर्सिंग कालेजचे विद्यार्थिनी, उपजिल्हा रुग्णालय, नगर परिषद प्रशासन, स्थानिक जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे सर्व डॉक्टर मंडळी, स्थानिक प्याथालाजिस्ठ, यांनी अथक परिश्रम घेतले.

    शिबिराच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार, संयोजक संजय पडोळे, काँग्रेस तालुका अध्यक्ष गुरु गुरूनूले, माजी सभापती, संचालक घनश्याम येनुरकर, राजू पाटील मारकवार, उपसभापती राजेंद्र कन्नमवार, शहर अध्यक्ष सुनिल शेरकी, राज्य सरचिटणीस गुरूदास चौधरी, संचालक संदिप कारमवार, बंडू गुरनुले, कैलाश चलाख, शांताराम कामडे, महिला अध्यक्ष रुपाली संतोषवार, माजी नगर सेविका ललिता फुलझेले, किशोर घडसे, राहुल मुरकुटे, शहर अध्यक्ष नलिनी आडपवार सचिव शामला बेलसरे, राधिका बुक्कावार, दीपक वाढई,प्रशांत उराडे, सरपंच केमेकर, युवक अध्यक्ष पवन नीलमवार, हिमानी वाकुडकर, धीरज गोहणें,दशरथ वाकुडकर, सुमित आरेकर, श्याम पुठ्ठावार, रुपल रावत, राजेश रावत, लहू कडस्कर, स्वागत वणकर, सुनील मंगर, चतुर मोहुरले, राजेंद्र वाढई, सुरेश फुलझेले, लोमेश नागपुरे, संदीप मोहबे,विष्णू सादमवार,विवेक मुत्यलवार, औषधी वितरण धनंजय चींतावार, किशोर गोगुलवार, टोंगे, उमेश चेपूरवार, नितीन राजा, संतोष रावत मित्र परिवार सदस्य, यांनी मेहनत घेतली. यांचेसह तालुका,शहर,ग्रामिण कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी,प्रमुख कार्यकर्ते तसेच तालुका महिला कॉग्रेंस कमेटीच्या पदाधिकारी दुर्गा मंदिर समिती सदस्यांनी व योग नृत्य परिवार सदस्यांनी, कार्यकर्तींनी अथक परिश्रम घेतले.

  • राजगड मध्ये वाघाची भिती

    News34

    गुरू गुरनुले

    मूल :- तालुक्यातील राजगड येथे वाघाची भिती निर्माण झाली आहे.येथील डोंगरावर काही गावक-यांना सोमवारी वाघ आढळून आला.याची माहिती वनविभागाला देण्यात आली. वाघाला ट्रप करण्यासाठी डोंगरावर कॅमेरे लावण्यात आले आहे. दरम्यान, वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी येथील उपसरपंच चंदू पाटिल मारकवार यांनी केली आहे.

    राजगड येथील सुनिल गेडाम हा युवक पायथ्याशी असलेल्या डोंगरावर काटवल तोडण्यासाठी डोंगरावर चढला. त्याच्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला चढविला. मात्र त्याच्या हातात काठी असल्याने त्याने वाघाचा हल्ला परतवून लावला. ही माहिती चंदू पाटिल मारकवार यांना माहित होताच त्यांनी वनविभागाला कळविले.सावली वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल झाली.त्यांना वाघाचे पर्गमार्क आढळून आले. त्यांनी वाघाला शोधण्यासाठी मोहीम राबविली.तसेच डोंगरावर कॅमेरे लावले आहेत. बोरचांदली ते चांदापूर रस्ता ओंलाडून वाघाने राजगडच्या शेतशिवारातून डोंगरावर चढला असावा असा अंदाज बाधण्यात येत आहे.

    दरम्यान,या घटनेने राजगड आणि आजूबाजूच्या गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात खरीप शेतीचा हंगाम सुरू आहे.सर्वत्र धान पिकाची रोवणी सुरू आहे.यासाठी शेतक-यांना आणि शेतमजूरांना शेतात जावे लागते.त्यामुळे शेतक-यांमध्येही दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाच्या दहशतीमुळे खरीप हंगाम धोक्यात येवू शकतो.त्यामुळे वाघाच्या बंदोबस्तासाठी वनविभागाने तात्काळ पावले उचलावी अशी मागणी चंदू पाटिल मारकवार यांनी केली आहे.

    शासनाने ग्रामपंचायतला ड्रोन कॅमेरे पुरवावे

    मूल तालुक्यात वाघासह इतर वन्यप्राण्यांचा मोठा संचार आहे.जंगलातील प्राणी गावा शेजारी येवू लागल्याने गावक-यांमध्ये आणि शेतक-यांमध्ये मोठे भितीचे वातावरण आहे.दिवसेंदिवस मानव आणि वन्यप्राणी संघर्ष शिगेला पोहचत आहे. ग्रामिण भागातील मुख्य व्यवसाय शेती हा आहे. उदरनिर्वाहाचे साधन शेती असल्याने शेतक-यांना शेती शिवाय पर्याय नाही. वाघाच्या दहशतीमुळे शेतीच धोक्यात सापडली तर जगायचे कसे?ही विवंचना तालुक्यातील शेतक-यांना आहे. जंगलातील वाघ वाचवा पण गावाशेजारी येणा-या वाघांचा बंदोबस्त करा.

    गावकरी आणि शेतक-यांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीला ड्रोन कॅमेरे पुरवावे अशी मागणी राजगडचे उपसरपंच चंदू पाटिल मारकवार यांनी केली आहे. ड्रोन कॅमे-याच्या माध्यमातून गावाशेजारी येणा-या वन्यप्राण्यांवर लक्ष ठेवण्यासाठी मदत होईल.अशी अपेक्षा चंदू पाटिल मारकवार यांनी व्यक्त केली आहे. तसेच वनविभागाकडे मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे.गावात घटना घडल्यास एकच बीट वनरक्षक दाखल होतो. एकाच वनरक्षका कडे सात सात गावाचा डोलारा असल्याने घटनेला तात्काळ न्याय देण्यास उशिर होतो.त्यामुळे वनविभागातील रिक्त पदे सुदधा शासनाने भरावी अशी मागणी चंदू पाटिल मारकवार यांनी केली आहे.

  • बल्लारपूर में गाय को बचाने के चक्कर मे हुआ भीषण हादसा

    Accident in ballarpur

    News34

    बल्लारपुर (रमेश निषाद)

    👉 आज रात करीब एक बजे बल्लारपुर कॉलरी परिसर के सरदार पटेल वार्ड निवासी राजशेखर पेरका बाइक से दुर्घटनाग्रस्त होने पर गंभीर घायल होने पर जिंदगी से जंग नागपुर के मेडिटेशन दवाखाने में लड़ रहा है वहां डॉक्टरों ने ब्रेन डेड बताया है वहीं दूसरा वेकोली कामगार प्रशांत आकुला चंद्रपुर के मेहरा हॉस्पिटल में भर्ती किया गया तीसरा शिवा नामक युवक को मामूली चोट बताई जा रही है ।

    👉 रविवार की रात करीब एक बजे राजशेखर पेरका को सरदार पटेल वार्ड में स्थित घर छोड़ने जाने के दौरान कॉलरी दवाखाने के पास अंधेरे में गाय का झुंड बैठा था जिससे बचने व बचाने के चक्कर में बाइक डिवाइडर से टकराई जिससे दोनों के सिर पर गंभीर चोटें आई है तीसरा मामूली घायल हुआ है । बल्लारपुर शहर में आए दिन जानवरों के कारण दुर्घटना हो रही है नागरीको की मांग को बल्लारपुर नगर परिषद मुख्याधिकारी व प्रशासक विशाल वाघ के अनदेखा करने से और कितनी होंगी दुर्घटनाएं ?, कितनों के जान गवाना का हो रहा इंतजार ? जनता कर रही सवाल।

    👉 आवश्यकता है कि खुले घूमनेवाले जानवरों के मालिकों पर उचित कार्यवाही की जाए जानवरों को पकड़कर गौशाला में रखने का प्रबंध किया जाए कॉल री के तिलक वार्ड, भगत सिंग वार्ड, सरदार पटेल वार्ड ,गणपति वार्ड, पंडित दीनदयाल वार्ड, मौलाना आजाद वार्ड, रविन्द्र नगर वार्ड के कारवां रोड पर, संतोषी माता वार्ड, पुराना बस स्टैण्ड,में मुख्य मार्ग पर, नगर परिषद चौक , कलामंदीर आदि पूरे शहर में जानवर खुले घूमते देखे जाते है जिन्हे पकड़कर उचित कार्यवाही करने की मांग नागरीको द्वारा की जा रही है ।

  • अज्ञात वाहनाची धडक आणि बिबट्या ठार

    News34

    Leopard die

    नागभीड – वन्यप्राणी पाण्याच्या व शिकारी साठी इकडे तिकडे भरकटत असतात मात्र त्यांची ही भ्रमंती जीवावर बेतते, अशीच एक घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली, रस्त्यावरून जात असताना बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक देत ठार केले, धडक देताच त्या चालकाने वाहनसाहित पळ काढला.

    रविवारी सायंकाळी नागपूर-नागभीड मार्गावर सायंकाळच्या सुमारास रस्त्यावरून जाणाऱ्या बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिली, धडक इतकी जोरदार होती की बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. हा बिबट 2 वर्षाचा होता अशी माहिती RFO हजारे यांनी दिली

    नागभीड वन परिक्षेत्र अधिकारी एस बी हजारे, वनरक्षक सी एस कुठे व त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलवण्यात आला.

  • चंद्रपूर जिल्ह्यात तांदूळ तस्करीच्या परराज्यीय टोळीचा पर्दाफाश

    News34

    चंद्रपूर/शेगाव – चंद्रपूर जिल्ह्याची सीमा अनेक राज्यांना जोडण्याचे काम करते, त्यामुळे विविध वस्तूंची तस्करी सुद्धा दुसऱ्या राज्याची सीमा जवळ असल्याने तस्कराना सोपे जाते.
    मागील काही महिन्यांपासून चंद्रपूर जिल्ह्यात शासकीय तांदळाची तस्करी केल्या जात आहे, पोलिसांच्या सतर्कतेमुळे 17 ऑगस्टला रात्री तांदूळ तस्करी करणाऱ्या वाहनाला पकडण्यात आले.

    जिल्ह्यातील शेगाव बु. पोलिसांना तांदळाची तस्करी करणारे वाहन चिमूर मार्गे छत्तीसगड राज्यात जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती, पोलिसांनी रात्री च्या वेळी बंदोबस्त लावला असता त्यावेळी ट्रक क्रमांक CG 08 AC 4500 संशयास्पद वाटले असता पोलिसांनी वाहन थांबविले

    ट्रक ची तपासणी केली असता त्यामध्ये 31 टन तांदूळचे आढळून आले, पोलिसांनी वाहन चालक माणिकराव रामाजी कोचे वय 63 ला विचारणा केली असता त्याने स्वतःला कासारवाडी जिल्हा दुर्ग छत्तीसगढ येथील निवासी असल्याची माहिती दिली.
    हा तांदूळ कुठला व कुठं जात आहे याबाबत माहिती विचारली असता वाहनचालक कोचे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

    पोलीस निरीक्षक अविनाश मेश्राम यांना संशय आला असता त्यांनी मालकाला बोलवा असे वाहनचालकला सांगितले मात्र मालक आला नाही, सदर तांदूळ हा शासकीय गोदाम किंवा कंट्रोल चा असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली, त्यांनी अन्न व पुरवठा निरीक्षक वरोरा यांना पाचारण करीत अहवाल मागितला, अहवाल आल्यावर सदर तांदूळ हा शासकीय असल्याची बाब उघडकीस आली.

    पोलिसांनी वाहन चालक व मालक यांच्यावर इसि ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केला, सदर माल वरोरा तालुक्यातील माढेली येथील गोदामातील असल्याची माहिती मिळाली असून त्या गोदामाला सील करण्यात आले आहे, याआधी सुद्धा शासकीय तांदळाची तस्करी करण्यात आली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

    चंद्रपूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे 31 टन तांदूळ किंमत अंदाजे 6 लाख वाहनांची किंमत 25 असा एकूण 31 लाखांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे.
    याआधी किती वेळा तांदूळ तस्करी करण्यात आली, हा तांदूळ नेमका कुठून आला याबाबत पोलीस तपास करीत आहे. आरोपी हा राजकीय पार्श्वभूमी असल्याची माहिती आहे.

    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक जनबंधू मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव चिमूर यांच्या मार्गदर्शनात पोलिस स्टेशन शेगाव बू चे ठाणेदार अविनाश मेश्राम, पीएसआय सुरजुसे, एसआय पडोळे, हेड कॉन्स्टेबल मेश्राम, मदन येरने, पोलीस अंमलमदार निषाद राकेश , प्रफुल कांबळे यांनी केली.

  • अवैद्य दारू विक्रेत्यांवर त्वरित कारवाई करा

    News34

    गुरू गुरनुले

    मुल – अवैद्य दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याच्या मागणीकरीता, पिपरी दिक्षीत येथील ग्रामस्थांनी आज पोलिस स्टेशनवर धडक दिल्याने, प्रशासनात खळबळ माजली.

    मागील अनेक वर्षापासून तालुक्यात अवैद्य दारू विक्री केली जात असल्यांने, महिलांमद्ये संताप व्यक्त केला जात आहे. या अवैदय दारूमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत असून, लहान मुलेही दारूच्या आहारी जात आहे. यामधे शाळा कॉलेजच्या तरुण पिढीचा समावेश आहे. मूल येथून मोठ्या प्रमाणावर दारू किंग कडून अवैद्य दारू पुरवठा केला जात असून, यामुळे गावात असंतोष निर्माण झाला आहे.

    गावातील शांतता सुव्यवस्था देखील भंग झालेली आहे. अशा दारू विक्रेत्यांवर तात्काळ कारवाई करावी या मागणीकरीता पिप्री दीक्षित येथील गावकर्यांनी आज सरपंचाचे सहीचे निवेदनासह पोलिस स्टेशनवर धडक दिली. अवैद्य दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी महिलांचा एल्गार आणून तहसिलदार मुल यांनाही निवेदन दिले. आवैद्य दारू विक्रेत्यांवर कारवाई झाली नाही तर विष घेवून आत्महत्या करू असा इशारा महिलांनी दिला आहे.

    दरम्यान अवैद्य दारू विक्रीमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाल्यांचा गावकर्यांनी आरोप करीत, एका कुटूंबातील व्यक्तीने घरचे सोने गहाण ठेवून पूर्ण पैसे दारूत उडविले, आता शेती करायलाही पैसे नसल्यांने ही महिला आत्महत्येचा विचार करीत असल्यांचे गावकर्यांनी पत्रकारांशी बोलतांना आपबिती सांगीतली.