Category: ग्रामीण वार्ता

ग्रामीण वार्ता (Gramin Varta) विभागात वाचा news34.in वर चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बातम्या आणि घडामोडी. शेतकरी योजना, ग्रामपंचायत राजकारण, स्थानिक विकास प्रकल्प, कृषी आणि ग्रामीण जीवनाशी संबंधित सर्व महत्त्वाचे अपडेट्स येथे उपलब्ध आहेत. चंद्रपूर ग्रामीण भागातील समस्या, यशोगाथा आणि सकारात्मक बदलांना आम्ही प्राधान्य देतो. ग्रामीण भागातील विश्वासार्ह माहितीसाठी नियमित भेट द्या.

  • Majhi ladki bahin : कांग्रेसने बहिणींना कायम उपेक्षित ठेवले – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    Majhi ladki bahin : कांग्रेसने बहिणींना कायम उपेक्षित ठेवले – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    Majhi ladki bahin शेवटच्या घटकाला न्याय देण्यासाठी राज्यसरकार कायम आग्रही आहे. त्यामुळे इथे सातत्याने जनतेच्या कल्याणाच्या दृष्टीने प्रत्येक निर्णय घेतला जातो. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ देखील याच विचारातून जन्माला आली आहे. या योजनेतून बहिणींना १५०० रुपये महिना मिळणार आहे. ‘माझी लाडकी बहीण’ ही केवळ एक योजना नसून महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याची लढाई आहे,’ असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

     

    Majhi ladki bahin बल्लारपूर येथील पेपरमिल रोडवरील नाट्यगृहात आयोजित भाजपा महिला मोर्च्या आयोजित बूथ सशक्तिकरण अभियान कार्यक्रमात ना. श्री. मुनगंटीवार यांनी महिलांसोबत संवाद साधला. या कार्यक्रमाला चंदन सिंग चंदेल माजी अध्यक्ष वनविकास महामंडळ, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा,बल्लारपूर महिला मोर्चा अध्यक्ष वैशाली जोशी, महामंत्री कांताताई ढोके, वर्षाताई सुंचुवार, आरतीताई आक्केवार , संध्याताई मिश्रा, मनीष पांडे, शिवचंद द्विवेदी, समीर केणे, राजू दारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

    अवश्य वाचा : आमदार सुधाकर अडबाले यांनी वेधले सरकारचे लक्ष

    Majhi ladki bahin यावेळी महिला बुथ प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. बुथ मजबुत करण्याचा संकल्प करायचा आहे. खोटे बोलून निवडणूक जिंकणाऱ्यांनी वीष पसरविले आहे. ते वीष समाजातून बाहेर काढायचे आहे, असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले. ‘पक्षात महिलांचे संघटन प्रत्येक प्रभागात मजबूत करायचे आहे. बहुतांश महिला गरीब कुटुंबातून आलेल्या आहेत. त्यांच्या समस्या समजून घ्यायच्या आहेत. त्यांच्या कुटुंबाची काळजी घेणे पक्षाची जबाबदारी आहे. बल्लारपूरमध्ये प्रत्येक गरीब कुटुंबापर्यंत सरकारच्या योजना पोहोचविण्याचा संकल्प करायचा आहे. गरिबांसोबत पूर्ण शक्तीने उभे राहणाऱ्या संघटनेचा आदर्श निर्माण करा,’ असे आवाहन ना. श्री. मुनगंटीवार यांनी महिलांना केले.

    महत्त्वाचे : मोकाट जनावर मालकांवर आता होणार फौजदारी कारवाई

    ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून बहिणींच्या खात्यात थेट रक्कम जाणार आहेत. यातून त्या मुलांसाठी, कुटुंबासाठी खर्च करणार आहेत. हा पैसा पुन्हा मार्केटमध्येच येणार आहे. ही राज्याच्या प्रगतीचे आर्थिक चक्र अधिक वेगवान करणारी प्रक्रिया ठरणार आहे,’ असेही ते म्हणाले. गरीब कुटुंबांमध्ये मुलांच्या शिक्षणासाठी सर्वांत मोठी अडचण पैशांची असते. पैसा कमी असेल तर शिक्षणात मुलांना पहिले प्राधान्य दिले जाते. मुलींचा विचार नंतर होतो. पण आता कोणत्याही जातीच्या मुलींना इंजिनियर, डॉक्टर व्हायचे असेल तर शंभर टक्के शुल्क सरकार भरणार आहे. त्यातही पुढे जाऊन सरकारने सुशिक्षित मुला-मुलींसाठी १० हजार कोटींची योजना तयार केली. यात मुला-मुलींना १० हजार रुपये विद्या वेतन दिले जाईल, अशी माहितीही ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिली.

    ‘अपप्रचाराकडे दुर्लक्ष करा’

    काही लोक योजनेला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. योजना बंद होईल असा अपप्रचार करीत आहेत. पण त्याकडे दुर्लक्ष करा. मध्य प्रदेशात ही योजना यशस्वी झाल्यानंतर आपण निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेशात १ हजार रुपये दिले जात आहेत, मात्र महाराष्ट्र सरकार १५०० रुपये देणार आहे. काँग्रेस टीका करीत आहे, पण त्यांनी तर बहिणींना कायम उपेक्षित ठेवले, असा टोलाही ना. श्री. मुनगंटीवार यांनी लगावला.

    ‘सामाजिक योजनेच्या नजरेतून बघा’

    ‘या योजनेकडे केवळ सरकारी योजना म्हणून नव्हे तर मानवतावादी, सामाजिक योजना म्हणून बघा. महिला मोर्चाने त्याच दृष्टीने नियोजन करावे आणि महिलांना मदत करावी. आपला जिल्हा अग्रेसर राहिला पाहिजे. बँकेत खाते उघडण्यात अडचण येत असेल तर महिला मोर्चाने कॅम्प लावून मदत करा ,’ असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

  • Chandrapur district grain shop : नव्या रास्त भाव दुकानासाठी अर्ज आमंत्रित

    Chandrapur district grain shop : नव्या रास्त भाव दुकानासाठी अर्ज आमंत्रित

    Chandrapur district grain shop चंद्रपूर, बल्लारपुर, राजुरा, कोरपना, जिवती, गोंडपिपरी, सावली, सिंदेवाही, नागभीड, ब्रम्हपुरी, चिमुर, वरोरा, व भद्रावती ही तालुके व चंद्रपूर (शहर)अंतर्गत गावे/ वार्डाकरिता एकूण 107 नवीन रास्त भाव दुकानाच्या परवाकरीता 4 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपूर मनपा करणार फौजदारी कारवाई

    Chandrapur district grain shop जाहीरनामा प्रसिध्द झालेल्या गावातील/ क्षेत्रातील इच्छुक पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था) /नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट/ नोंदणीकृत सहकारी संस्था/महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम या कायद्याच्या अंतर्गत नोंदणी झालेल्या संस्था/महिला स्वयंसहाय्यता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था यांच्याकडून विहीत नमुन्यातील अर्ज संबंधित तहसिलदार/ अन्नधान्य वितरण अधिकारी यांचे कार्यालयात 5 जुलै ते 4 ऑगस्ट 2024 या कालावधीत शासकीय कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत (सुट्टीचे दिवस वगळून ) उपलब्ध होतील.

    महिला बचत गटाला मिळणार प्राधान्य

    नवीन रास्त भाव /स्वस्त धान्य दुकानाकरिता आवेदन अर्ज शुल्क पाच रुपये  राहील. परिपूर्ण भरलेले अर्ज 4 ऑगस्ट पर्यंत शासकीय कामकाजाचे दिवशी संबंधित तहसिलदार/ अन्नधान्य वितरण अधिकारी यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेत (सुट्टीचे दिवस वगळून) स्वीकृत केले जातील. जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आलेल्या गावाचे/ वार्डांची नाव, तालुक्यांतील जाहीरनाम्यांची संख्या, अर्ज करण्याच्या अटी व शर्ती इत्यादि सर्व माहिती संबंधित तहसिलदार, प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास विभाग चंद्रपूर, जिल्हा समन्वयक, महिला आर्थिक विकास महामंडळ चंद्रपूर, प्रकल्प संचालक, ग्रामीण विकास यंत्रणा चंद्रपूर, संबंधित नगरपालिका/ महानगरपालिका/ ग्रामपंचायतीचे नोटिस बोर्डवर तसेच www.chanda.nic.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्याचे जिल्हा  पुरवठा अधिकारी अजय चरडे यांनी कळविले आहे.

  • Chandrapur news : नैराश्यात गेल्यावर त्याने उचलले टोकाचे पाऊल

    Chandrapur news : नैराश्यात गेल्यावर त्याने उचलले टोकाचे पाऊल

    Chandrapur news मूल : स्थानिक चंद्रपूर मार्गावरील यश मेडीकल स्टोअर्सचे प्रौप्रायटर सौरभ यशवंत मरसकोल्हे (32) याने राहत्या घरी गळफास लावून जीवन संपविल्याची घटना सकाळी ११ वा. चे दरम्यान मूल मध्ये घडली.

    https://ads.timesdiginews.com/2024/07/shootout-at-chandrapur-raghuvanshi-complex/

    काही दिवसांपासून सौरभ हा कावीळने ग्रस्त असल्याने सकाळी तो औषध घेण्यासाठी घरा बाहेर पडला . स्थानिक नातेवाईक आणि काही मित्रमंडळीशी भेटून घरी परतल्या नंतर कुटूंबातील सर्व मंडळी कामात व्यस्त असल्याची त्याने संधी साधली. सौरभ मरसकोल्हे वरच्या माळयावरील स्वतःच्या बेडरूमध्यें गेला आणि पंख्याला गळफास लावून जीवन संपविले.

     

    Chandrapur news घटनेच्या काही वेळानंतर आई जेवणा करीता बोलाविण्यास गेली असता, सौरभच्या बेडरूमचे दार आतुन बंद होते. आईने त्याला आवाज मारला परंतू प्रतिसाद न मिळाल्याने तीने खिडकीमधून आत पाहीले तेव्हा सौरभ पंख्याला गळफास लावून जीवन संपविल्याचे दिसून आले.

    अवश्य वाचा : चंद्रपुरात रेल्वे पोलिसांची धडक कारवाई

    वडील व नातेवाईकांनी लागलीच दार तोडुन खोलीमध्ये प्रवेश केला. गळफास काढुन सौरभला उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. परंतु डाँक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. मृतक सौरभ हा मागील काही वर्षापासून मेडीकल स्टोअर्स चालवित होता. सोबतचे अनेक वर्ग मित्र नोकरीला लागल,े लहान भाऊ सहायक वन संरक्षक असून बहिण डाॅक्टर आहे. परंतू बि.ई. पर्यंत शिक्षण घेवूनही आपल्याला नौकरी लागत नसल्याची खंत मृतक सौरभ नेहमी व्यक्त करीत असायचा. याच नैराश्यामधून सौरभने जीवन संपविले असावे. अशी शंका व्यक्त करण्यांत येत आहे.

     

    Chandrapur news मृतक सौरभ हा येथील निवृत्त मुख्याध्यापक यशवंत मरसकोल्हे यांचा ज्येष्ठ चिरंजीव होता. तीन वर्षापूर्वी सौरभचे लग्न झाले होते. त्याचे पश्चात पत्नी, वडील, आई, भाऊ बहिण असा मोठा परिवार आहे. सौरभच्या अकाली जाण्याने नातेवाईक आणि मित्र परिवारात हळहळ व्यक्त करण्यांत येत आहे.

  • Agriculture and Environment Day : वि.तू.नागपुरे जयंती कृषी व पर्यावरण दिनाने साजरी

    Agriculture and Environment Day : वि.तू.नागपुरे जयंती कृषी व पर्यावरण दिनाने साजरी

    Agriculture and Environment Day मुल – वी.तू.नागपुरेजी एक लोकसेवक होते. ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व शेतकऱ्यांचा विकास हाच ध्येय ठेऊन कार्य केले असे विचार संस्थेचे अध्यक्ष व समारंभाचे अध्यक्ष एड.बाबासाहेब वासाडे यांनी व्यक्त केले. स्व. वि.तू.नागपुरे सामाजिक कार्य व सेवा प्रतिष्ठान मुल तर्फे कर्मवीर महाविद्यालयात १ जुलै २०२४ रोजी सकाळी ११-०० वाजता. स्व.वी.तू.नागपुरे जयंती व कृषी पर्यावरण दीन समारोहाचे आयोजन प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.

    अवश्य वाचा : लायटर वरून पत्नीवर प्राणघातक हल्ला

    कार्यक्रमाचे उद्घाटक शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ.राममोहन बोकारे यांनीही नागपुरे जींच्या जीवन कार्याचा उल्लेख केला. प्रमुख अतिथी संस्थेचे सचिव एड.अनिल वैरागडे, सदस्य श्री. पुल्लकवार, माजी प्राचार्य ते.क.कापगते, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिता वाळके, डॉ .राम दांडेकर,प्राचार्य अशोक झाडे, प्रा.किसान वासाडे, प्राचार्य बोलीवार,आदी मान्यवर उपस्थित होते.

    महत्त्वाचे : लाडकी बहीण योजनेसाठी आजपासून अर्ज सुरू

    Agriculture and Environment Day मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या समारोहात तालुक्यातील उत्कृष्ठ शेतकरी म्हणून भीमराव गेडाम यांचा सन्मान, तसेच तालुक्यातील आदर्श शिक्षक म्हणून जी.प. शिक्षक केळझर दयाराम भाकरे, महेश उमरे यांचा सन्मान केला. तसेच संस्थेमधून दीर्घ सेवा देऊन सेवानिवृत्त झालेले शिक्षक प्रा.धनंजय चुदरी, सुषमा रंगारी, ऋषी मुंड्रे, रमेश डांगरे,निता कारगिर्वार, उंदिरवाडे यांचाही संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

     

    सोबतच गुणवंत विद्यार्थ्यंचा गौरव, निवृत्त शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. तरी या समारोहाला गुणवंत विद्यार्थी,२० वी मद्ये हितेश गावतुरे, कुणाल सतीश खोब्रागडे, अनुष्का थावरी, उन्नती शेंडे, प्रतीक्षा ठाकरे, तुषार खेडेकर,संस्कृती मुपिडवार, नैना बोरकर, तेजस्वी ठाकरे, अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव चींन्ह व गौरवपत्र देऊन गौरव करण्यात आला.

     

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव ऍड.अनिल वैरागडे यांनी केले. संचालन. डॉ.प्रा.गणपत आगलावे यांनी केले. कार्यक्रमाला स्व.नागपुरेजी यांचे शुभचिंतक, शेतकरी बांधव, संस्थेचे संचालक, पदाधिकारी, सर्वप्राचार्य, मुख्याध्यापक,शिक्षक,कर्मचारी उपस्थित होते. स्व. वी.तू.नागपुरे सामाजिक कार्य व सेवा प्रतिष्ठानच्या निमंत्रक प्राचार्य डॉ.अनिता वाळके यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

  • Chandrapur breaking news : आरतीची हत्या करण्यासाठी समाधान ने ऑनलाइन मागवला चाकू

    Chandrapur breaking news : आरतीची हत्या करण्यासाठी समाधान ने ऑनलाइन मागवला चाकू

    Chandrapur breaking news 26 जून रोजी जगप्रसिद्ध आनंदवन येथे आरती चंद्रवंशी या तरुणीची हत्या धारदार शस्त्राने करण्यात आली होती, या घटनेनंतर पोलीस व आनंदवन प्रशासन चांगलेच हादरले होते.

    दुसऱ्या दिवशी वरोरा पोलिसांनी एका युवकाला अटक केली, सदर हत्या प्रेम प्रकरणातून झाली असल्याचे निष्पन्न झाले, आरोपी समाधान कोळी व आरती दोघांचे प्रेमप्रकरण होते, मात्र आरती हिने लग्नाला नकार दिला तेव्हापासून समाधान असमाधानी झाला.

    Chandrapur breaking news त्याने बदला घेण्याचे ठरविले, मार्च महिन्यात त्याने फ्लिपकार्ट वरून ऑनलाइन चाकू मागविला, चाकू आला, समाधान हा संधी शोधत होता, अखेर 26 जून ला ती संधी चालून आली.

    आरती चे आई-वडील सेवाग्राम ला गेले, घरी कुणी नसल्याची चाहूल लागल्यावर समाधान आरती च्या घरी गेला, दोघात लग्नावरून भांडण झाले, आरती चे दुसऱ्या युवकासोबत प्रेम प्रकरण सुरू असल्याची माहिती समाधान ला मिळाली होती.

    अवश्य वाचा : समाधान च्या आत्महत्येपूर्वी नेमकं काय घडलं?

    Chandrapur breaking news समाधान ने आरती वर अत्याचार करीत तिच्यावर चाकूने वार केले, या हल्ल्यात आरती चा मृत्यू झाला, आरतीचे आई-वडील घरी आले तेव्हा सदर प्रकार उघडकीस आला, पोलिसांना याबाबत माहिती दिली, तपास सुरू केल्यावर दुसऱ्या दिवशी आरोपी समाधान ला अटक करण्यात आली.

    आरोपी समाधान ला न्यायालयाने 7 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली, मात्र 30 जून रोजी जोड्याच्या लेस ने समाधान ने पोलीस कोठडीमधील बाथरूम मध्ये गळफास घेत आत्महत्या केली.

    Chandrapur breaking news समाधान तर गेला मात्र त्याने वरोरा पोलिसांना चांगलेच गोत्यात आणले, पोलीस अधीक्षक वरोरा येथे पोहचले तपास सुरू झाला, आरोपीच्या आत्महत्येप्रकरणी चूक कुणाची यावर सखोल चौकशी झाली.

    https://ads.timesdiginews.com/2024/06/chandrapur-shocking-news-police-case/

    पोलीस अधीक्षकांनी तात्काळ तिघांना निलंबित केले अशी माहिती पुढे आली असून यामध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे अशी माहिती पुढे आली आहे.

    प्रेमात धोका मिळाल्याने समाधान कोळी यांनी बलात्कार, हत्या व नंतर आत्महत्या असे गंभीर गुन्हे केले, सध्या पुढील तपास CID कडे वर्ग करण्यात आला आहे.

  • Chandrapur Police News : हत्येच्या आरोपीमुळे वरोरा पोलीस आली गोत्यात

    Chandrapur Police News : हत्येच्या आरोपीमुळे वरोरा पोलीस आली गोत्यात

    Chandrapur police news चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील आनंदवन येथिल 25 वर्षीय तरुणीच्या खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या समाधान माळी (25) या आरोपीची पोलीस कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 30 जून ला सकाळी 8.30 वाजता घडली.

    वरोरा पोलीस स्टेशनच्या लॉकअप मध्येच आज सकाळी 8:30 च्या दरम्यान बुटाच्या लेस ने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

    अवश्य वाचा : आईने लहान बाळाला पाजले विष

    Chandrapur police news आरोपी समाधान माळी ला 4 जुलै पर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली होती.

    आरती चंद्रवंशी या तरुणीचा 26 जूनला बुधवारी घरात शिरून आरोपीने खून केला होता.
    प्रेमप्रकरणातील अविश्वासातून हा खून करण्यात आला होता. खुनाच्या आरोपाखाली पोलिसांनी समाधान ला 27 जून ला अटक केली होती.
    आरोपीने लॉकअप मध्ये आत्महत्या केल्याने चंद्रपूर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
    पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या सह वरोरा तहसीलदार देखील प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले.

    पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या कार्यकाळात गुन्हेगारीचा आलेख वाढत चालला आहे मात्र आता पोलीस कोठडीत सुद्धा अश्या घटना घडत असल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

     

    Chandrapur police news 29 जून ला आरोपी समाधान माळी वर बलात्काराचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला होता, आरती ची हत्या केल्यावर समाधान कुठेही पळून गेला नव्हता, पोलिसांनी समाधान ला आनंदवन मधून अटक केली, मात्र गुन्हा केल्यावर तो नैराश्यात गेला होता. त्या नैराश्यातून आज सकाळी त्याने स्वतःच्या जोड्याच्या लेस ने गळफास घेतला.

    https://ads.timesdiginews.com/2024/06/maharashtra-prevention-of-defacement-of-property-act-chandrapur-mahanagar-palika/

    विशेष म्हणजे आरोपीला 24 तासाच्या आत अटक केली म्हणून पोलीस स्वतःची पाठ थोपटवीत होते मात्र आरोपीने आत्महत्या केल्यावर पोलिसांचे बोट एकमेकांवर उठत आहे. याप्रकरणात सुद्धा काही लहान पोलीस कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणा मुळे आरोपीचा मृत्यू झाला असा ठपका ठेवत त्यांच्यावर कारवाई केल्या जाणार हे नक्की, मोठे अधिकारी मात्र यातून बचावाचा मार्ग काढणार. पोलिसांच्या चुकीमुळे सदर प्रकार घडला असून आता या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे गेला आहे.

  • Congress party news : नवनियुक्त कांग्रेस तालुकाध्यक्ष यांचे नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा विश्वास

    Congress party news : नवनियुक्त कांग्रेस तालुकाध्यक्ष यांचे नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा विश्वास

    Congress party news पोभुर्णा : केंद्रीय नेतृत्व आणि प्रदेशाध्यक्ष यांचे अनुमतीने पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांनी वासुदेव पाल यांची तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती केली असून जिल्हाध्यक्ष यांनी केलेल्या नियुक्तीचे तालुक्यातील कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे. असे असतांना पक्षादेश न पाळणारी काही मंडळी पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचे उल्लंघन करून पक्षविरोधी कृती करीत आहेत.

    https://ads.timesdiginews.com/2024/06/maharashtra-prevention-of-defacement-of-property-act-chandrapur-mahanagar-palika/

     

    या कृत्याचा पक्षाच्या निष्ठावंतावर कोणताही परिणाम पडणार नसून नवनियुक्त तालुकाध्यक्ष यांचे नेतृत्वावर आमचा विश्वास असल्याने यापुढील काळात नव्या दम आणि उत्साहाने कामाला लागणार असल्याचे मत काॅंग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी ओमेश्वर पद्मगीरीवार यांनी व्यक्त केले.

     

    Congress party news स्थानिक पत्रकार भवनात आयोजीत पत्रकार परिषदेत बोलतांना ओमेश्वर पदमगिरीवार यांनी लोकसभा निवडणुक काळात तालुकाध्यक्ष यांनी राजीनामा देवून विरोधी पक्षात प्रवेश केल्यानंतर तालुकाध्यक्ष पद रिक्त होते. त्यामूळे तालुक्यातील काॅंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या मध्यें मरगळ निर्माण झाली होती. पक्षकार्ये शिवाय जनतेचे काम करतांना अनेक अडचणी येत होत्या. त्यामूळे तालुक्यातील काॅंग्रेस कार्यकर्त्याची मागणी लक्षात घेवून रिक्त असलेल्या तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यासाठी जिल्हाध्यक्ष आ. सुभाष धोटे यांचे निर्देशान्वये पोंभुर्णा येथे काॅंग्रेस कार्यकर्त्याची बैठक आयोजीत केली.

    अवश्य वाचा : बल्लारपूर विधानसभेवर राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गटाचा दावा

    बल्लारपूरचे माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी आणि डाॅ. विश्वास झाडे यांचे उपस्थितीत तालुकाध्यक्ष पद निवडीची सभा पार पडली. सभेत झालेल्या चर्चेनुसार घनश्याम मुलचंदानी आणि डाॅ. विश्वास झाडे यांनी तालुकाध्यक्ष पदा करीता इच्छुक असलेल्यांची नांवे व सभेचा अहवाल जिल्हाध्यक्ष यांचे कडे सादर केला. प्राप्त झालेला अहवाल आणि इच्छुकांची नांवे जिल्हाध्यक्ष यांनी प्रदेश कार्यालयाकडे पाठविले. प्राप्त नांवे आणि अहवालावर चर्चा झाल्यानंतर केंद्रीय नेतृत्व आणि प्रदेशाध्यक्ष यांचे शिफारसी नुसार जिल्हाध्यक्ष आ. सुभाष धोटे यांनी नुकतीच काॅंग्रेसचे ज्येष्ठ, अनुभवी आणि अभ्यासु कार्यकर्ते वासुदेव पाल यांची पोंभुर्णा तालुकाध्यक्ष पदावर नियुक्ती केली. केलेली नियुक्ती पक्षशिस्त आणि पक्षहित लक्षात घेवून करण्यांत आली.

     

    असे असतांना तालुक्यातील काही संधीसाधु मंडळी काही कार्यकर्त्याना हाताशी धरून पक्षात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. असा आरोप ओमेश्वर पद्मगिरीवार यांनी केला. सर्वानुमते झालेली तालुकाध्यक्ष पदाच्या नियुक्तीचा विरोध करत तालुकाध्यक्ष बदलविण्यात यावा. अन्यथा पक्ष सोडण्याची भाषा बोलत निवडीच्या प्रक्रीयेसंबंधी निराधार आणि बिनबुडाचे आरोप करीत आहे. ही कृती पक्षशिस्तीचे उल्लंघन करणारी असून बोटावर मोजण्या इतक्या कार्यकर्त्याना हाताशी धरून काही संधीसाधु मंडळी पक्ष सोडण्याची धमकी देत आहे.

    Congress party news परंतू तालुक्यातील निष्ठावंत आणि ज्येष्ठ काॅंग्रेस कार्यकर्ते सदैव काॅंग्रेस पक्षासोबत राहणार असून वासुदेव पाल यांनाच तालुकाध्यक्ष पदावर कायम ठेवण्यांत यावे व संधीसाधु मंडळींना पक्षात स्थान देण्यांत येवू नये. अशी मागणी पक्षनेतृत्वाकडे करणार असल्याचे सांगीतले. यावेळी नवनियुक्त तालुकाध्यक्ष वासुदेव पाल यांचेशिवाय माजी नगार सेलक जयपाल गेडाम, वसंत मोरे, ईश्वर पिंपळकर, दत्तु मोरे, जयदिश सेमला, राजाराम मोहुर्ले यांचेसह ४० ते ५० काॅंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

  • Ballarpur vidhansabha : बल्लारपूर विधानसभेत माळी समाजाचा उमेदवार हवा

    Ballarpur vidhansabha : बल्लारपूर विधानसभेत माळी समाजाचा उमेदवार हवा

    Ballarpur vidhansabha मुल – राज्यात मराठा आणि ओबीसींमध्ये आरक्षणाच्या प्रश्नावरून वाद पेटलेला आहे. त्यावरुन विधानसभेच्या निवडणुकीत पक्षांचा चांगलाच कस लागणार आहे. त्यातच आता माळी समाजाने राज्यातील ४३ विधानसभा मतदार संघांवर दावा केला. याठिकाणी जो राजकीय पक्ष संधी देईल, त्याच पक्षाला माळी समाज साथ देईल. अशा स्वरूपातील उभे राहण्याचा ठराव रविवारी भुसावळ येथे माळी समाज हक्क परिषदेत करण्यात आला. तसेच मराठा समाजाला ओबीसी मधून नव्हे तर स्वतंत्र आरक्षण द्यावे व 54 लाख कुणबी मराठा नोंदी रद्द कराव्या असा ठराव घेण्यात आला.

    अवश्य वाचा : अमरावती येथील युवकांचा चंद्रपुरात मृत्यू

    Ballarpur vidhansabha हक्क परिषदेत कण्यात आलेल्या मागण्या. १) विधान परिषदेवर माळी समाजाला प्रतिनित्त्व द्यावे. २) राज्यातील ४३ मतदार संघात समाजाचे प्राबल्य आहे. तेथे समाजाला विधान सभेदाठी प्राधान्य मिळावे. जो पक्ष उमेदवारी देईल, त्या पक्षाला माळी समाज साथ देईल व खंभिरपने पाठिशी उभे राहील.

    ३) ज्या ठिकाणी समाजाचा सक्षम उमेदवार आहे, पण त्याला कोणत्याही पक्षाने उमेदवारी दिली नाही तर अपक्ष म्हणून समाजाने पाठबळ द्यावे. असेही ठरविण्यात आले. अशी मागणी पुढे आली. भुसावळ शहरातील नाहाटा महाविद्यालयाजवळील माळी भवनात रविवारी ‘ दिनांक २३ जून २४ रोजी माळी समाज हक्क परिषद' आयोजित केली होती.

    Ballarpur vidhansabha या परिषदेला राज्यभरातून १९२ प्रतिनिधींसह वेगवेगळ्या पक्ष, संघटनांमध्ये कार्यरत माळी समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. सकाळी पहिल्या सत्राच्या अध्यक्षस्थानी माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे, माजी आमदार कृष्णराव इंगळे प्रदेश अध्यक्ष अरुण तीखे, माजी जी.प. अध्यक्ष संध्याताई गुरनुले, सचिव नाना साहेब कांडलकर, व राज्यस्तरीय पदाधिकारी उपस्थित होते. पहिल्या सत्रात आलेल्या सर्वांचा परिचय घेण्यात आला. सह भोजन नंतर दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली.

     

    अध्यक्षस्थानी माजी आमदार कृष्णराव इंगळे होते. याप्रसंगी राजकीय विषयावर जिल्हानिहाय मंथन मनोगत घेण्यात आले. पूर्वी समाजाचे १८ आमदार राहायचे परंतु आता ही संख्या कमी झाली यावर चर्चा करण्यात आली. आता येणाऱ्या विधान सभेत माळी समाजाचे संघटन मजबूत करुन तिकिटासाठी संघर्ष करण्याचे ठरविण्यात आले.

    https://ads.timesdiginews.com/2024/06/mp-pratibha-dhanorkar-in-loksabha/

    माळी समाजाचे प्राबल्य असलेले मतदार संघ गोंदिया, साकोली, नागपूर (दक्षिण), बल्लारपूर, काटोल,मोर्शी, अचलपूर,तिवसा, आकोट, बाळापूर ,जळगाव जामोद, मलकापूर, धरणगाव, एरंडोल, मालेगाव,सठणा, नांदगाव,नाशिक,(मध्य), विंचूर,नगर,(दक्षिण), मिरजगाव, कर्जत ,जुन्नर, हडसपर, शिकापुर, पालघर, कन्नड, फुळंबी, परतूर, घनसांगवी, कळंबनुरी, कारंजा,वाशिम, मंग्रुळपिर, आष्टी,धाराशिव, मंगोला ,माढा, अक्कलकोट, जिंतूर वाई, या मतदार संघात माळी समाज प्रतिनिधित्व करेल असे ठरविण्यात आले.

     

    Ballarpur vidhansabha माळी समाज हक्क परिषदेचे यशस्वी आयोजन मुख्य संयोजक कैलास महाजन, गजेंद्र महाजन, व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. माळी हक्क परिषदेला चंद्रपूर जिल्ह्यातून माळी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष अरुण तीखे, माळी महासंघाच्या महिला आघाडीच्या प्रमुख संध्याताई गुरनुले, चंद्रपूर महानगर पालिका माजी नगर सेविका वंदना तीखे, माळी महासंघाचे विभागीय महासचिव तथा मुल तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष गुरुभाऊ गुरनूले, समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी प्राचार्य, बंडूभाऊ गुरनुले, माळी महासंघाचे विभागीय पदाधिकारी व ओबीसी कांग्रेस सेलचे राज्यस्तरीय सरचिटणीस, गुरुदास चौधरी उपस्थित होते. प्रत्येक जिल्हा निहाय हक्क परिषदेचे आयोजन करण्याच्या सूचना आलेल्या माळी पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या. माळी हक्क परिषदेला २५० च्या वर राज्यातून पदाधिकारी उपस्थित होते.

  • Youth killed in train collision : अमरावती येथील 2 युवकांचा चंद्रपुरात मृत्यू, नेमकं कारण काय?

    Youth killed in train collision : अमरावती येथील 2 युवकांचा चंद्रपुरात मृत्यू, नेमकं कारण काय?

    Youth killed in train collision भद्रावती- तालुक्यातील मुरसा येथे रेल्वे पटरी जवळ दोन युवकांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याचे प्रकरण 24 जून ला सकाळी 11 वाजता उघडकीस आले.
    या प्रकरणी भद्रावती पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.
    मृतक संदीप सहादेव बेलसरे वय 25 राहणार जामणी (आर ) तालुका चिखलदरा जिल्हा अमरावती व दुसरा मृतक विजय तुलसाराम मावसकर वय 28 राहणार राहणार जामनी (आर ) असे दोन्ही मृतकाचे नाव आहे.

    अवश्य वाचा : संविधानाचा जयघोष करीत प्रतिभा धानोरकर यांनी घेतली खासदारकी ची शपथ

    मृतक युवक हे अत्यंत हलाखीच्या कुटुंबातील आहे, त्यांच्या मृत्यूची वार्ता आई-वडीलपर्यंत पोहचली असता त्यांना भद्रावती येथे पोहचायला वेळ लागला, कुटुंबाला आधार मिळावा यासाठी संदीप व विजय हे एकाच गावातील युवक घुग्गुस येथील लोयड कंपनी मधील केवी कन्स्ट्रक्शन कंपनीत मजुरी करायला आले होते.
    विशेष बाब म्हणजे ते दोघेही काही दिवसांपूर्वी घुग्गुस येथे आले होते. घटनेच्या दिवशी दोन्ही युवक कंत्राटदाराकडून पैसे घेत घुग्गुस बाजारात जातो असे सांगत बाहेर निघाले होते. मात्र त्यादिवशी ते दोघे परतले नाही. दुसऱ्या दिवशी दोघांचे मृतदेह भद्रावती तालुक्यातील मुरसा गावाजवळील रेल्वे पटरी जवळ आढळले.

    Youth killed in train collision याबाबत लोको पायलट यांनी याबाबत भद्रावती पोलीस स्टेशनला माहिती दिली. त्यांनी सांगितले की दोन्ही युवक रेल्वे पटरी वर बसून होते, त्यानंतर त्यांना रेल्वेने धडक दिली. या धडकेत दोघे जागीच ठार झाले.

    माहिती मिळाल्यावर भद्रावती पोलीस घटनास्थळी दाखल झाले, यावेळी मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. 25 जून ला दोघांचे शवविच्छेदन करीत त्यांचे मृतदेह कुटुंबाला सोपविण्यात आले. भद्रावती पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गेडाम करीत आहे.

    अवश्य वाचा : खरीप पीकविमा बाबत ही गोष्ट लक्षात ठेवा

    Youth killed in train collision सदर घटनेत नेमकं काय घडलं, हे घटनेच्या दुसऱ्या दिवशी कुणाला कळले नाही, याबाबत पोलिसांशी सम्पर्क साधला असता त्यांनीही आधी माहिती दिली नाही, अखेर सायंकाळी याबाबत माहिती मिळाली.
    दोन्ही युवक गरीब कुटुंबातील असल्या कारणाने पोलिसांनी जी तत्परता दाखवायला हवी होती ती दाखवली नाही.

  • Leader of Opposition Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार यांच्या उपक्रमाची चर्चा

    Leader of Opposition Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार यांच्या उपक्रमाची चर्चा

    Leader of Opposition Vijay Wadettiwar
    ग्रामीण भागातील नागरिकांना ग्रामस्तरावर विविध समस्या भेडसावत असतात. त्यामध्ये प्रशासनाबाबत काही तक्रारी असतात सोबतच विकासकामां संदर्भात देखील अनेक प्रश्न असतात. त्यामुळे नागरिक आपल्या समस्या घेऊन माझ्यापर्यंत येतील याची वाट न बघता महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी तालुक्यातील विविध गावांत भेटी देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत तात्काळ मार्गी लावल्या.  यामध्ये झिलबोडी(परसोडी), धामणगाव, तुलन्हानमेंढा, गायडोंगरी, परसोडी(तु.) या गावांचा समावेश आहे.
    सोबतच ब्रम्हपूरी मतदारसंघात गावांगावात सुरू असलेली विकासकामे, जनसेवा याबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली. जनतेच्या सेवेसाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्वखर्चातून सुरू केलेल्या “विजयदुत” या उपक्रमाबाबत माहिती देऊन शासकीय कामासंदर्भात येणाऱ्या अडचणींसाठी विजयदुत यांच्या कडून कामे करून घ्यावीत असेही त्यांनी यावेळी सांगितले. नागरिकांनी दिलेली निवेदने तातडीने मार्गी लावून पुढील विकासकामांचे नियोजन करण्यात आले.
    Leader of Opposition Vijay Wadettiwar यावेळी प्रामुख्याने विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, माजी जि.प.सदस्य डॉ. राजेश कांबळे, न.प.माजी बांधकाम सभापती विलास विखार, माजी पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर, महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगलाताई लोनबले, काॅंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मोंटु पिलारे, बाजार समितीचे संचालक किशोर राऊत, अॅड आशिष गोंडाणे, अतुल राऊत, रवी पवार, जनसंपर्क अधिकारी सुधीर पंदीलवार, सरपंच निता शेंडे, सरपंच सचिन लिंगायत, मंगेश शेंडे, कैलाश खरकाटे, रवी शेंडे, अमर गाडगे, प्रमोद भर्रे, धनराज मिसार, संदीप राऊत, सुशील शेंडे, भगवान ठाकरे, ईश्वर कुथे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.