Category: ग्रामीण वार्ता

ग्रामीण वार्ता (Gramin Varta) विभागात वाचा news34.in वर चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बातम्या आणि घडामोडी. शेतकरी योजना, ग्रामपंचायत राजकारण, स्थानिक विकास प्रकल्प, कृषी आणि ग्रामीण जीवनाशी संबंधित सर्व महत्त्वाचे अपडेट्स येथे उपलब्ध आहेत. चंद्रपूर ग्रामीण भागातील समस्या, यशोगाथा आणि सकारात्मक बदलांना आम्ही प्राधान्य देतो. ग्रामीण भागातील विश्वासार्ह माहितीसाठी नियमित भेट द्या.

  • Chandrapur news : मूल शहरात शिवसेनेच्या कार्यक्रमात उसळला महिलांचा जनसागर

    Chandrapur news : मूल शहरात शिवसेनेच्या कार्यक्रमात उसळला महिलांचा जनसागर

    Chandrapur news मूल येथे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान महिलांचा खेळ पैठणीचा सन्मान स्त्री कर्तुत्वाचा कार्यक्रम सोहळा भाग्यरेखा सभागृह मुल येथे 14 जुलैला मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

    महत्त्वाचे : आर्टिफिशियल ज्वेलरी चे मोफत प्रशिक्षण


    या कार्यक्रमाचे आयोजक सौ. मनस्वीताई संदिप गिऱ्हे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ महिला सौ.चारूशिला नथूजी आरेकर, सौ.अनिता बट्टे मॅडम, रानिताई अवजे, माजी नगरसेविका न.पं.मुल सौ.रिणाताई महेश हरडे, सौ.रिणाताई ठाकरे, शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार व आदी मान्यवर होते.
    तर कार्यक्रमात उत्कृष्ट शिक्षिका तथा मुख्याध्यापिका म्हणून आदरणीय सौ. सुनिता बुटे मॅडम यांचा सत्कार जिजा फोडेशनचे अध्यक्षा सौ. मनस्वीताई संदीप गिऱ्हे,यांनी शाल श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन सत्कार केले.

    Chandrapur news या कार्यक्रमात विविध खेळ घेण्यात आले संगीत खुर्ची,लिंबू चमचा, पोत्या वरील उड्या,दोन पाय उडी, उखाने स्पर्धा व आदी खेळ घेण्यात आले.या मद्ये विविध स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीया विजेत्यांना मानाची पैठणी, नवारी साडी, इरकणी पैठणी व सन्माचिन्ह देऊन पारितोषिके देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येत महिलांची उपस्थिती होती.

    अवश्य वाचा : अखेर त्या सांबरचा मृत्यू

    कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना महिला आघाडीचे सौ सोनियाताई डोरलीकर,सौ.मीनाताई शंभरकर,
    सौ.टिनाताई ठाकरे,राधाताई वर्मा,सौ. मीनाक्षीताई गट्टूवार,सौ. सारिकाताई डांगे,सौ. भावना डोरलिकर, सौ.मिरा नरूले, सौ.मैथिली हेडाऊ,सौ.पायल देऊळवार,सौ.सोनूताई मोरे व आदी मुल,महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होते.

  • Mahila Bachat Gat : मूल येथे महिला बचत गटाचा भव्य मेळावा

    Mahila Bachat Gat : मूल येथे महिला बचत गटाचा भव्य मेळावा

    Mahila bachat gat गुरू गुरनुले मूल – महिलांचा आर्थिक विकास होऊन त्यांना सक्षम व आत्मनिर्भर करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कटिबद्ध असून संघटित होऊन बचत गटाची निर्मिती केलेल्या शेकडो महीला बचत गटांना विनातारण कर्जाच्या माध्यमातुन आर्थिक सहकार्य केल्याने आज हजारो महीला सक्षम व आत्मनिर्भर झाल्याचे दिसत असल्याने समाधान बँकेला व संचालक मंडळाला आहे असे मत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी व्यक्त केले.

    अवश्य वाचा : स्वच्छतेचे 2 रंग अभियानाला चंद्रपुरात सुरुवात

    चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मूल, राजोली आणि चिरोली शाखेच्या वतीने आयोजित महिला बचतगट मेळावा व गटाला कर्जवाटप करतांना बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत बोलत होते. स्थानिक श्री माँ दुर्गा मंदिराचे सभागृहात पार पडलेल्या मेळाव्यास बँकेचे ज्येष्ठ संचालक संदीप गड्डमवार, कृषी उत्पन्न बाजार समिती मूलचे सभापती राकेश रत्नावार, क्रांतीज्योती नागरी सहकारी पत संस्थेचे अध्यक्ष गुरु गुरनुले, उपाध्यक्ष गुरुदास चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंगल बुरांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
    महिला बचत गटाच्या पदाधिकारी पुष्पा कच्चेवार, वैशाली सावसाकडे, प्रणाली मल्लेवार, चंद्रकला सातपुते, आणि कुसुमबाई कोवे आदींच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून मेळाव्याचे उद्घाटन झाले.

    Bachat gat loan
    महिला बचत गटाच्या मेळाव्यात उपस्थित महिला

     

    Mahila bachat gat उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंगल बुरांडे यांनी प्राप्ताविक केले. यावेळी महिला बचत गटाच्या फरहाना शेख, मंदाताई चलावार, नलिनी आडपवार, जयमाला चंदनखेडे या पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करताना बचत गटाला आर्थिक सहकार्य देऊन महिलांना आत्मनिर्भर होण्याची संधी दिली. याबद्दल बँकेच्या संचालक मंडळाचे आभार मानले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर, बँकेचे ज्येष्ठ संचालक संदीप गड्डमवार, कृषी उत्पन्न बाजार समिती मूलचे सभापती राकेश रत्नावार, क्रांतीज्योती पत संस्थेचे अध्यक्ष गुरु गुरनुले, यांनी मनोगत व्यक्त करताना बँकेच्या विविध कल्याणकारी योजना व कार्यावर प्रकाश टाकला.

     

    मेळाव्यात बचत गटाच्या कार्यात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मुल येथील गृहिणी महिला बचत गट आणि सावित्रीबाई महिला बचत गटाच्या पदाधिका-यांचा बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत व संचालक संदीप गड्डमवार यांचे हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. संतोषसिंह रावत यांच्या अध्यक्षीय मनोगतनंतर बँकेच्या मूल शाखेतील ११ राजोली शाखेतील ७ आणि चिरोली शाखे अंतर्गत कार्यरत असलेल्या ७ अश्या एकूण २५ महिला बचत गटांना ८० लाखाचे वर कर्जाचे धनादेश वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन संजय पडोळे यांनी तर विभागीय अधिकारी प्रशांत तोटावर यांनी आभार मानले.

     

    Mahila bachat gat मेळावा यशस्वी करण्यासाठी विभागीय अधिकारी प्रशांत तोटावार यांचे मार्गदर्शनात मूल शाखा व्यवस्थापक मधुकर लेनगुरे, राजोली शाखा व्यवस्थापक नरेश पाडेवार, चिरोली शाखा व्यवस्थापक भास्कर पांचभाई, निरीक्षक नंदकिशोर मडावी, विनोद वेठे, अनिल सिरस्कर, तिन्ही शाखेचे निरीक्षक व कर्मचारी वृंद यांचे सह बँकेच्या बचत गटाच्या मार्गदर्शक महिला प्रतिनिधींनी माधुरी मांडवगडे,नलिनी आडपवार मुल सोनी शेंडे राजोली, नाजूका नागुलवार यांनी सहकार्य केले.

  • Zilla parishad chandrapur : स्वच्छतेचे दोन रंग अभियानाला सुरुवात

    Zilla parishad chandrapur : स्वच्छतेचे दोन रंग अभियानाला सुरुवात

    Zilla parishad chandrapur चंद्रपूर जिल्हात स्वच्छतेचे दोन रंग हिरवा ओला व सुका निळा  या अभियानाला सुरुवात करण्यात आली असून, सदर अभियान 7 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. या अभियान कालावधित जास्तीत जास्त गृहभेटी देवुन गावस्तरावर शाश्वत स्वच्छतेसह अतिसार निर्मुलन करण्याचा प्रयत्न करावा. असे आवाहन जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन यांनी केले आहे.

    अवश्य वाचा : त्या सांबराचा मृत्यू

    या अभियानाकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये पाच संवादक यांची निवड करण्यात आली असून, यांचे पाणी व स्वच्छता या विषयावर प्रत्येक तालुक्यात प्रशिक्षण झालेले आहे. या प्रशिक्षित संवादका कडून जिल्ह्यातील प्रत्येक गावात गृहभेटी देण्याचे काम चालू आहे.अतिसार निर्मूलन, पाणी व स्वच्छता याची नीट काळजी घेणे, स्वच्छतेच्या सवयी अंगीकारणे, स्त्रोतांची सुरक्षितता राखणे, मैला गाळ व्यवस्थापन, वैयक्तिक स्वच्छता, शौचालयाचा नियमित वापर या विषयावर जनजागृती करण्यात येत आहे. घराघरातून निघणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण हे कुटुंब स्तरावरच व्हावे .याची जनजागृती मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे ‌. यामध्ये हिरव्या रंगाची कचराकुंडी ही ओला कचऱ्यासाठी व निळा रंगाची कचराकुंडी ही सुक्या कचऱ्यासाठी अशा प्रकारचे दोन रंगाचे अभियान मोठ्या प्रमाणावर चंद्रपूर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. यामुळे प्रत्येक गावात कुटुंब स्तरावर कचरा वर्गीकरणाचे काम मोठ्या प्रमाणावर चालू आहे.

    Zilla parishad chandrapur त्यासोबतच या अभियानात पावसाळ्यात उद्भवणारा अतिसार हा आजार कायमस्वरूपी कसा थांबवता येईल .याची काळजी कशी घ्यावी, गावात कुठल्या उपाययोजना कराव्या. याबाबत सुद्धा जनजागृती करण्यात येत आहे. त्यानुसार गावात कार्यवाही चालू असून , गावागावात पाणी नमुन्याची तपासणी वेळेत केल्या जात आहे.  स्त्रोतांची स्वच्छता ठेवल्या जात आहे.

     

    या मोहिमेत गाव स्तरावर गावचे सरपंच , उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामीण पाणीपुरवठा स्वच्छता समितीचे सदस्य, महिला बचत गटाचे सदस्य, अंगणवाडी सेविका, स्वच्छतागृही , जलसुरक्षक यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून गावात सर्व दूर गृहभेटी देण्यात येत असुन, याद्वारे गावात शाश्वत स्वच्छते विषयी जनजागृती केल्या जात आहे. यामुळे गाव शाश्वत स्वच्छ राखण्यास मदत व गाव पातळीवर अतिसार सारख्या साथ रोगांचे निर्मूलन करण्यास  मदत होणार आहे.

     

    Zilla parishad chandrapur गाव स्तरावर चालू असलेल्या गृहभेटी मुळे शाश्वत स्वच्छता व अतिसार निर्मूलन याविषयी गावकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यास मदत होत असून ,गृहभेट अभियान गावातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवावे .याकरिता यंत्रणेतील सर्वांनी प्रयत्न करावे .असे आवाहन जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन यांनी केले आहे.

  • jangli sambar : अखेर त्या सांबराचा मृत्यू

    jangli sambar : अखेर त्या सांबराचा मृत्यू

    jangli sambar (गुरू गुरनुले) 13 जुलै ला दुपारी ४ वाजता मूल चंद्रपूर मार्गावर मूल पासून अवघ्या तीन कीलोमीटर अंतरावर चंद्रपूर ला जाना-या एका कार वर रस्ता ओलांडताना सांबराने उडी मारली आणि तो सांबर कारच्या सामोरील काचेवर धडकला या अपघातात सांबर गंभीर जखमी झाला आणि कारचे पण भरपूर नुकसान झाले.

     

    jangli sambar या घटनेची माहिती मिळताच fdcm चिचपल्ली चे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री एस.बी.बोथे यांचे मार्गदर्शनात वन कर्मचारी व संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य घटना स्थळी जाऊन गंभीर जखमी सांबराला मूल येथे उपचारासाठी वाहनात आणताना त्याचा मृत्यू झाला.

    महत्वाचे : सावित्रीबाई फुले आधार योजनेला मुदतवाढ द्या – सचिन राजूरकर 

    अपघातात मृत झालेले सांबर मादि असुन त्याचे वय जवळपास दोन वर्ष होते, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ संदिप छौनकर यांनी मृत सांबराचे शवविच्छेदन केले व नंतर त्याचे दहण करण्यात आले.

     

    jangli sambar या सर्व कार्यवाही दरम्यान fdcm चे क्षेत्र सहाय्यक आर.जी.कुमरे, वनरक्षक यु.आर.गवई, प्रादेशिक चे वनरक्षक सूधिर ठाकुर संजीवन पर्यावरण संस्थेचे उमेशसिंह झिरे, प्रशांत मुत्यारपवार, स्वप्नील आक्केवार, प्रभाकर धोटे, दिनेश खेवले, विशाल टेकाम, संदिप सोयाम, आदित्य दहिवले उपस्थित होते.

  • Chandrapur Van Vibhag : भूषण फुसे यांच्या नेतृत्वात हजारो शेतकरी धडकणार वनविभाग कार्यालयावर

    Chandrapur Van Vibhag : भूषण फुसे यांच्या नेतृत्वात हजारो शेतकरी धडकणार वनविभाग कार्यालयावर

    Chandrapur van vibhag चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हाला चारही बाजूने जंगलाने वेढले आहे. घनदाट असलेल्या या वनात विविध जातींच्या वन्यजीवांचा मोठा अधिवास आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला मोठ्या संख्येने देश-विदेश्यातील पर्यटक भेट देत असतात. यातून सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असते. ही सकारात्मक बाजू नेहमी माध्यमातून मांडली जाते.मात्र याची दुसरी बाजू फारच विदारक आहे. जिल्हातील मानव-वन्यजीव संघर्ष टोकावर पोहचला आहे.

    अवश्य वाचा : 10 वर्षांपासून केंद्र सरकार संविधानाची हत्या होत आहे – प्रतिभा धानोरकर

    जंगलातील वन्यजीव आता थेट शेतात,गावात पोहचत आहेत.वन्यजीवांचा हैदोसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान होत आहे. गोंडपिपरी तालुक्यातील बहुतांश शेती जंगलालगत आहे. जंगलातील रानडूक्करे थेट शेतात येऊन शेत पिकांची नासधुस करीत असतात. यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असतो. सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी गोंडपिपरी तालुक्यात जनसंवाद, जनसंपर्क यात्रा केली.

     

    Chandrapur van vibhag या यात्रे दरम्यान हजारो शेतकऱ्यांनी रानडुकरामुळे होणाऱ्या नुकसानीचा पाडा वाचला. रानडुकरांच्या हल्ल्यात काही शेतकरी आणि नागरिकांचा जीव गेलेला आहे.वन विभागातर्फे डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी जणवन योजने अंतर्गत झटका मशीन दिली. ज्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला त्या शेतकऱ्यांना वन्यजीवांनी शेताचे कितीही नुकसान केलं तरी तीन वर्ष कुठलाच मोबदला मिळणार नाही, अशी अट आहे.

     

    वन विभागाच्या काही कर्मचाऱ्यांनी या योजनेत सुद्धा सेटिंग केली. झटका मशीन विकणाऱ्या दुकानदारांकडून अतिशय दर्जाहीन वस्तू दिल्या गेल्या. या झटका मशीन वन्यजीवांना रोखण्यात अपयशी ठरल्या आहेत. दुसरीकडे शेत पिकांचे मोठे नुकसान होत आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी फसवेगिरीची ठरली. यातून झटका मशीन विक्रेते आणि त्यांच्यासोबत सेटिंग केलेले वन कर्मचारी मात्र आर्थिक दृष्ट्या संपन्न झालेत, अशी तक्रार हजारो शेतकऱ्यांनी फुसे यांच्याजवळ केली.

     

    Chandrapur van vibhag या योजनेची निवृत्त न्यायाधीशा मार्फत सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भूषण फुसे यांनी केली आहे. या सर्व मागण्यांना घेऊन 24 जुलैला भूषण फुसे धाबा वन विभाग कार्यावर धडक मोर्चा नेणार आहेत. या मोर्चात तालुक्यातील वीस हजार शेतकरी सहभाग होतील असे फुसे यांनी सांगितले आहे.

  • Gharkul yojana : ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात 3 हजार 493 घरकुल मंजूर

    Gharkul yojana : ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात 3 हजार 493 घरकुल मंजूर

    Gharkul yojana महाविकास आघाडी सरकार काळात विमुक्त जाती व भटक्या जमाती समाजातला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे करिता राज्याचे तत्कालीन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना कार्यान्वित केली.

     

    या योजनेतून अनेक लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळाले. तर आज विरोधी बाकावर बसूनही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील विमुक्त जाती व भटक्या जमाती समाजातील लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी वारंवार पाठपुरावा करून शासन स्तरावर मागणी भेटून धरल्याने विधानसभा क्षेत्रातील सिंदेवाही, सावली व ब्रह्मपुरी तालुक्यातील एकूण 3493 लाभार्थ्यांना या योजनेचा हा मिळणार असून यामुळे लाभार्थ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.

    Gharkul yojana समाजातील हातावर आणून पानावर खाणे अशा प्रचंड संघर्ष जीवन जगणाऱ्या भोई समाजाला आजवर कुठल्याही योजनेमार्फत हक्काचे घर मिळाले नाही. तर पोटाची भूक भागविण्यात संपूर्ण मिळकत खर्च होत असल्याने तसेच बचत शिल्लक राहत नसल्याने फार विवंचनेच सापडलेल्या या समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून या समाजाचा सर्वांगीण विकास साधावा या उद्यान हेतूने महाविकास आघाडी सरकार काळात राज्याचे तत्कालीन इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री तथा कॅबिनेट मंत्री तसेच विद्यमान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ता काळात समाजातील एक दुर्बल घटकांकरिता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अंमलात आणली.
    सदर योजनेमार्फत राज्यातील लाखो लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला व त्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले. यात ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील हजारोच्या संख्येने लाभार्थ्यांचा सहभाग आहे. मात्र मागील वर्षी उद्दिष्ट पूर्तीत काही तांत्रिक अडचणी व कागदी त्रुट्यांमुळे जे लाभार्थी अपात्र ठरले व ज्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. अशा अपात्र व गरजू लोकांना हक्काचे घरकुल मिळावे याकरिता राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी शासन स्तरावर सतत पाठपुरावा सुरू ठेवला. त्यांनी चालवलेल्या प्रयत्नांना आज फलश्रुती मिळाली असून एकट्या ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील सिंदेवाही, सावली व ब्रह्मपुरी तालुक्यात एकूण 3493 घरकुलांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असून मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळणार आहे.
    Gharkul yojana यात सिंदेवाही तालुक्यात 666, सावली-2365, तर ब्रह्मपुरी तालुक्यात-462 अशी लाभार्थी संख्या समाविष्ट आहे. सत्ता काळातील विरोधी वाका पर्यंत च्या प्रवासात सर्वसामान्यांची नाळ जुळून असलेला नेता म्हणून सर्व दूर परिचित असलेले राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांमुळे आज विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना आपल्या हक्काचे घर मिळणार असून त्यांच्या या यशाच्या फलश्रुतीमुळे लाभार्थ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
  • The defense wall collapsed : त्या बोगस बांधकाम विरोधात आप पक्षाचा एल्गार

    The defense wall collapsed : त्या बोगस बांधकाम विरोधात आप पक्षाचा एल्गार

    The defense wall collapsed दिनांक 08 जुलैला रोजी आम आदमी पार्टी च्या वतीने नगर परिषद वरोरा विरोधात ठिय्या आंदोलन करण्यात आले. नुकताच शहरात मुसळधार पावसाने हजेरी दिली. राजीव गांधी वॉर्ड वरोरा येथे 2 महिन्याअगोदर नालीचे बांधकाम करून संरक्षण भिंत उभी करण्यात आले होते. त्याच नालीचे बांधकाम इतके बोगस होते की, पहिल्याच पावसात नालीचे पूर्ण बांधकाम व संरक्षण भिंत वाहून गेले व त्यामुळे सर्व नालीचे पाणी हे लोकांच्या घरात घुसले. त्यामुळे राजीव गांधी वॉर्ड मधल्या लोकांचे हाल झाले.

    अवश्य वाचा : चंद्रपूर विधानसभा निवडणुकीसाठी कांग्रेसला मिळाला उमेदवार

    लोकांच्या घरात कमरे इतके पाणी साचले होते. साप, विंचू मुळे जीवाला धोका निर्माण झाला होता. पाण्यामुळे लोकांचे धान्य ओले होऊन खराब होण्याच्या स्थितीत होते. या विषयाची माहिती आम आदमी पार्टी वरोरा चे तालुका अध्यक्ष गौरव मेले यांनी जिल्हा उपाध्यक्ष सुरज शहा व जिल्हा युवा उपाध्यक्ष सुमित हस्तक यांना दिली. त्यांनी जागेवर येऊन पाहणी केली व नगर परिषद वरोरा चे मुख्यधिकारी साहेब यांचाशी दूरध्वनी द्वारे संपर्क केले असता ते म्हणाले की, मी इंजिनियर साहेब यांना जागेवर पाठवत आहो व योग्य ते मदत करू असे आश्वासन दिले. परंतु त्या जागेवर इंजिनियर साहेब पोहचू शकले नाही व नागरिकांना मुख्याधिकारी यांनी आश्वासन देऊन सुद्धा मदत भेटू शकली नाही.

     

    The defense wall collapsed त्यामुळे सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना घेऊन आम आदमी पार्टी चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा वरोरा – भद्रावती विधानसभा अध्यक्ष सुरज शहा यांच्या नेतृत्वात, युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक यांच्या मार्गदर्शनात व तालुका अध्यक्ष गौरव मेले यांच्या प्रमुख उपस्थितीत जनसामान्य नागरिकांना घेऊन नगर परिषद वरोरा समोर ठिय्या आंदोलन करून मुख्याधिकारी यांना निवेदन द्वारे इशारा दिला की येत्या सात दिवसाच्या आत नालीचे बांधकाम पूर्ण करा व येत्या पंधरा दिवसाच्या आत नालीचे बांधकाम बोगस करणाऱ्या ठेकेदारावर व इंजिनियर वर कार्यवाही करा अन्यथा येत्या काळात अजून तीव्र आंदोलन करण्यात येईल. यावेळी आम आदमी पार्टी चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा वरोरा – भद्रावती विधानसभा प्रमुख सुरज शहा, युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक, वरोरा तालुका अध्यक्ष गौरव मेले व असंख्य महिला कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

  • Minister Sudhir Mungantiwar : पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते अडीच कोटीच्या वाचनालयाचे लोकार्पण

    Minister Sudhir Mungantiwar : पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते अडीच कोटीच्या वाचनालयाचे लोकार्पण

    Minister sudhir mungantiwar चंद्रपूर – नागरिकांना चांगले रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण या सर्व सुविधा पुरविण्याची जबाबदारी स्थानिक यंत्रणा म्हणून ग्रामपंचायतीची असते. मात्र या सुविधा अधिक दर्जेदार करून नागरिकांच्या जीवनात सुलभता आणण्यासाठी सरकारचे सहकार्य सर्वतोपरी असते. त्यातूनच पुढे अनेक कल्याणकारी योजना पुढे येतात. विद्यार्थी, नागरिकांच्या बौद्धिक विकासासाठी वाचनालयाची निर्मिती हा महत्वपूर्ण पुढाकार आहे. उथळपेठ गावात अशा अनेक दर्जेदार सुविधा प्रदान करताना कुणीही नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय, तथा चंद्रपूरचे पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

    महत्त्वाचे : चंद्रपूर जिल्ह्यातील 7 लक्ष महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ

    जिल्हा खनिज प्रतिष्ठान, चंद्रपूर अंतर्गत मुल तालुक्यातील उथळपेठ येथे वाचनालयाच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले. या इमारतीचे ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी उथळपेठचे सरपंच पलिंन्द्र सातपुते, उपसरपंच भारतीताई पिंपळे,नंदकिशोर रणदिवे, वर्षाताई लोनबाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, उपकार्यकारी अभियंता प्रशांत वसुले, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, तहसीलदार श्रीमती मृदुलाताई मोरे, सहायक अभियंता राठोड, पोलीस पाटील भाग्यश्री चिचघरे यांच्यासह ग्रामपंचायतचे सर्व सदस्य उपस्थित होते.

     

    Minister sudhir mungantiwar सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून उथळपेठमध्ये वाचनालयाच्या इमारतीसाठी २ कोटी ५० लक्ष रुपये निधी खर्चून वाचनालयाची इमारत बांधण्यात आली . गावातील वाचनालयाची इमारत भव्य आणि अत्याधुनिक सुसज्ज असल्याचे सांगत त्यांनी इमारतीच्या बांधकामावर समाधान व्यक्त केले. नागरिकांना महत्वाच्या सेवा देण्यासोबतच त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण करून बौद्धिक विकास साधण्याच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल आहे. वाचनालयाची इमारत नागरिकांसाठी सेवाकेंद्र ठरावे, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.

    अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यातील गुन्हेगारी अनियंत्रित, गृहमंत्री फडणवीस यांनी लक्ष द्यावे – खासदार प्रतिभा धानोरकर

    उथळपेठ गावात प्राधान्याने पांदण रस्ते बनविण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन देखील यावेळी दिले. जात, पात, धर्म महत्वाचे नाही विकासासाठी आम्ही तत्पर आहोत, असे सांगताना त्यांनी जास्तीत जास्त घरकुल उथळपेठमध्ये व्हावेत, यासाठी प्रयत्न करू, असे आश्वस्त केले.

    Minister sudhir mungantiwar उथळपेठ गावात ब्रिज कम बंधाराची मागणी अनेक दिवसांपासून आहे. ते लवकरच बांधून देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ उथळपेठच्या प्रत्येक बहिणीला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कमेटीचा अध्यक्ष स्वतः असल्यामुळे योजनेच्या लाभापासून कुणीही वंचीत राहणार नाही, अशी ग्वाही देखील ना. मुनगंटीवार यांनी दिली. शेतकरी बांधवांना केंद्र सरकार कडून ६ हजार आणि राज्य सरकारचे ६ हजार रुपये मिळत आहेत, असेही त्यांनी सांगितले. मुलींच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च आता सरकार उचलणार आहे. उद्या उथळपेठ गावातील मुलींना शिक्षणातील ध्येय या योजनेमुळे गाठता येईल, असेही ते म्हणाले. आता साडेसात हॉर्सपॉवरच्या पम्पांना शंभर टक्के वीज माफी दिली जाईल, अशी घोषणा देखील ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

    दिलेला शब्द पूर्ण केला

    नागरिकांनी विकासासंदर्भात मागणी केली तेव्हा तेव्हा ती पुर्ण करण्‍यासाठी प्रयत्‍नांची पराकाष्‍ठा केली. चिचाळा व लगतच्‍या सहा गावांमध्‍ये बंद नलिका वितरण प्रणाली द्वार सिंचनाची सुविधा उपलब्‍ध केली, टाटा ट्रस्‍टच्‍या सहाय्याने ९० गावांमध्‍ये शेतक-यांचे उत्‍पन्‍न वाढविले, जे.के. ट्रस्‍टच्‍या माध्‍यमातुन दुग्‍ध उत्‍पादनाचा प्रकल्‍प राबविला.रस्ते,आरो मशिन, बंदिस्‍त नाल्‍या, कृषी वाचनालय आदी विकासकामे या गावात यापूर्वी पुर्णत्‍वास आणली.
    आज वाचनालय इमारतीच्‍या बांधकामाबाबत दिलेला शब्‍द पुर्ण होत आहे. याचा मनापासून आनंद होत आहे असेही ते म्‍हणाले.

  • Petrol Bomb Attack : पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर व्यापाऱ्यांची पत्रकार परिषद

    Petrol Bomb Attack : पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर व्यापाऱ्यांची पत्रकार परिषद

    Petrol bomb attack चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात रविवारी 7 जुलैला भर दिवसा मालू वस्त्र भांडार येथे पेट्रोल बॉम्ब ने हल्ला करण्यात आला होता, 3 अज्ञात युवकांनी सदर दुकानात प्रवेश करीत दुकानात बसलेले अभिषेक मालू यांच्या दिशेने पेट्रोल बॉम्ब फेकला, प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितले त्यानंतर त्यांनी बंदूक काढत गोळीबार सुद्धा केला.

    अवश्य वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अम्मा ला व्हिडीओ कॉल 

    चंद्रपूर जिल्ह्यात लागोपाठ घडणाऱ्या घटनेमुळे पोलिसांची तारांबळ उडाली आहे.
    बल्लारपूर शहरातील व्यापाऱ्यांनी सायंकाळी 7 वाजता पत्रकार परिषद घेत व्यापाऱ्यांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे, भरदिवसा व्यापाऱ्यांवर असे हल्ले होत असेल तर आम्ही कुणाकडे न्याय मागायचा असा प्रश्न यावेळी उपस्थित केला.

    Petrol bomb attack मालू वस्त्र भांडार चे अभिषेक मालू यांनी आजपर्यंत झालेल्या हल्ल्याबाबत माहिती देत सरळ हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव घेतले.

    महत्त्वाचे : चंद्रपूर जिल्ह्यातील गुन्हेगारीकडे लक्ष द्या – खासदार प्रतिभा धानोरकर

    आम्ही वारंवार याबाबत पोलीस विभागाला होत असलेल्या घटनेबाबत सूचना दिल्या मात्र ठोस कारवाई काही झाली नाही.

    याप्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी मालू वस्त्र भांडार येथे गोळीबार झाला नाही अशी माहिती दिली, मात्र सदर दुकानात घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्याने गोळीबार झाला असल्याची माहिती दिली आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यात सध्या गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात फोफावत आहे, आजच्या घटनेमुळे व्यापारी वर्गात चांगलीच दहशत पसरली आहे.

    Petrol bomb attack 4 जुलै रोजी चंद्रपूर शहरात गोळीबार, 6 जुलै रोजी मूल तालुक्यातील हळदी गावात हत्या व 7 जुलै रोजी बल्लारपूर शहरात पेट्रोल बॉम्ब हल्ला विशेष म्हणजे सर्व गुन्हे भरदिवसा घडले आहे.

    बल्लारपूर शहरातील व्यापाऱ्यांनी आपली एकजूट दाखवीत न्यायाची मागणी केली आहे, भरदिवसा असे हल्ले म्हणजेच त्या गुन्हेगारांना कायद्याचा धाक नाही.

  • meritorious student : संघर्षाच्या काटेरी वाटेतुनच उज्वल भविष्यातील यशाचा मार्ग सुकर – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

    meritorious student : संघर्षाच्या काटेरी वाटेतुनच उज्वल भविष्यातील यशाचा मार्ग सुकर – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

    meritorious student ज्ञानातुन मिळणारे सामर्थ्य हे चिरकाल टिकते. मिळालेले हे सामर्थ्य अंगिकारून समाजातील प्रत्येक यशस्वी व्यक्ती व विद्यार्थी यांनी संघर्षातुनच उज्ज्वल भविष्य घडविल्याचा इतिहास आहे. यशाचे शिखर गाठण्यासाठी परिस्थिती नाही तर उत्तम मनस्थिती, दृढ आत्मविश्वास, प्रगल्भ इच्छाशक्ती यांची नितांत गरज आहे. आपणा सर्व होतकरू विद्यार्थ्यांच्या पाठीशी मी सदैव खंबीरपणे उभे असुन संघर्षाच्या काटेरी वाटेतुनच प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या यशाचा मार्ग सुकर करावा असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.
    ते ब्रम्हपूरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित ब्रम्हपूरी मतदारसंघातील ब्रम्हपूरी, सावली , सिंदेवाही येथील १०वी व १२वी च्या परिक्षेत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कार्यक्रमप्रसंगी अध्यक्ष म्हणून बोलत होते.
    कार्यक्रमाचे उद्घाटक खासदार डॉ. नामदेव किरसान, प्रमुख मार्गदर्शक म्हणून जळगाव येथील दिपस्तंभ फाउंडेशनचे संचालक यजुर्वेंद्र महाजन, मोटीव्हेशनल स्पीकर सचिन बुरघाटे हे होते.
    meritorious student तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार अभिजीत वंजारी, काॅंग्रेस नेते देविदास जगनाडे, ने.ही. महाविद्यालय माजी प्राचार्य डॉ नामदेव कोकोडे, अॅड गोविंदराव भेंडारकर, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष हितेंद्र राऊत, बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, माजी जि.प.सदस्य डॉ राजेश कांबळे, माजी जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, न.प.माजी सभापती विलास विखार, माजी नगरसेवक डॉ नितीन उराडे, माजी पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर, काॅंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष मोंटु पिलारे, सिंदेवाही तालुका काँग्रेस अध्यक्ष रमाकांत लोधे ,युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, धनराज मुंगले, महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगला लोनबले, महीला काँग्रेसच्या शहराध्यक्षा योगिता आमले यांसह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
    यावेळी पुढे बोलतांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, आज स्पर्धेचे युग आहे. सर्व क्षेत्रात प्रचंड स्पर्धा सुरू आहे. अशा कठीण परिस्थितीत देशाची भावी पीढी यांनी मनाने व आत्मविश्वासाने खचुन न जाता ज्ञानाची भुक वाढवून आपली विद्वत्ता व आत्मविश्वासाच्या बळावर लक्ष गाठेपर्यंत कुठेही न थांबता प्रयत्नांची पराकाष्ठा करून संघर्ष करावा. तरच यश तुमच्या पदरी पडेल. याप्रसंगी त्यांनी शिक्षणकाळात बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले मात्र भविष्यकाळात आयपीएस अधिकारी म्हणून यश मिळवणारे मनोजकुमार शर्मा यांच्या जिवनप्रवासावर आधारित १२ वी फेल या चित्रपटातील प्रेरणादायी उदाहरण देऊन उपस्थित विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
    meritorious student यानंतर पदवीधर शिक्षक आमदार अभिजीत वंजारी यांनी देशातील वाढती बेरोजगारी, बदलती शिक्षणप्रणाली, पालक व शाळा व्यवस्थापन यांतील संभ्रम व शिक्षणाचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. तर गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ नामदेव किरसान यांनी आपल्या अभ्यासु शैलीतुन शिक्षणातुन चांगले विद्यार्थी व नागरिक कसे होता येईल व देशसेवेसाठी पुढाकार घेऊन सोबतच आपले भविष्य घडविणे कसे शक्य आहे यावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील सिंदेवाही ,सावली व ब्रह्मपुरी येथील इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व विद्यार्थिनींचा तसेच पालक व शिक्षक तथा मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ब्रह्मपुरी सावली व सिंदेवाही तालुक्यातील विद्यार्थी पालक शिक्षक व मुख्याध्यापक प्रामुख्याने बहुसंख्येने उपस्थित होते.
    कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन सतीश डांगे, सुरज मेश्राम यांनी प्रास्ताविक डॉ राजेश कांबळे तर आभार ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस अध्यक्ष खेमराज तिडके यांनी मानले.
    यश नक्की मिळेल धीर सोडु नका
    जीवनाच्या प्रवासात अनेक अडथळे येतात. हा संघर्षाचा काळ समजून मनोधैर्याने खचुन न जाता संकटांना सामोरे जावे. म्हणजे यश नक्की प्राप्त होईल.
    — यजूर्वेंद्र महाजन, संचालक दिपस्तंभ फाउंडेशन जळगाव
    यशप्राप्तीसाठी ज्ञान व अनुभवाचा संग्रह वाढवा
    जगात सर्वत्र ज्ञान वाटले जात आहे. अशातच जीवनाला दिशा देणाऱ्या ज्ञानाला आत्मसात करून व यशस्वी थोरांच्या अनुभवाची शिदोरी संगतीला घेऊन कणखर मार्गावर प्रस्थान करा. यामुळे परिस्थिती कितीही बेताची असली तरी आपल्याला यशाचे शिखर नक्की गाठता येईल.
    — सचिन बुरघाटे
     मोटीव्हेशनल स्पीकर मुंबई