Category: चंद्रपूर शहर

चंद्रपूर शहर (Chandrapur City) आणि आसपासच्या परिसरातील प्रत्येक लहान-मोठी बातमी वाचा news34.in वर. महानगरपालिका, स्थानिक राजकारण, गुन्हेगारी, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचे त्वरित आणि अचूक कव्हरेज येथे उपलब्ध आहे. तुमच्या चंद्रपूर शहर परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या विषयावर सविस्तर माहिती आणि सत्य घटनांचे अपडेट्स मिळवा. स्थानिक नागरिकांसाठी हे सर्वात विश्वसनीय स्रोत आहे.

  • Chandrapur pollution issues । रस्ता खोदकामामुळे नागरिकांचे चेहरे ‘लाल”

    Chandrapur pollution issues

    Chandrapur pollution issues : दक्षिण भारताच्या जवळ असलेला चंद्रपूर जिल्हा, ब्लॅक गोल्ड सिटी म्हणून व औद्योगिक जिल्हा म्हणून चंद्रपूरची ओळख आहे सोबतच प्रदूषणासाठी हा जिल्हा प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात अनेकी प्रदूषण पसरविणारे उद्योग आहे मात्र उद्योगातून निघणार जीवघेणं प्रदूषण थांबविण्याची एकाही लोकप्रतिनिधी मध्ये हिंमत नाही. विकासाच्या नावावर चंद्रपूर शहरात सध्या वायू प्रदूषण सुरु आहे. Chandrapur pollution issues

    अमृत व भूमिगत गटार योजनेचे काम सध्या शहरात सुरु आहे, १६ वर्षांपूर्वी सुद्धा चंद्रपुरात भूमिगत गटार योजनेचे काम झाले विशेष म्हणजे कंत्राटदाराला पूर्ण पैसे मिळाले मात्र योजना फसल्याने नागरिकांच्या कराचे पैसे बुडाले आता पुन्हा ५०४ कोटी रुपये खर्च भूमिगत गटार योजनेचे काम सुरु करण्यात आले आहे. Chandrapur underground drainage project

    चंद्रपुरात भीषण अपघात, ट्र्क चालक जिवंत जळाला

    या कामामुळे शहरातील नागरिकांचे चेहरे मेकअप विना लाल होताना दिसत आहे, रस्ता खोदून त्याला कित्येक दिवस तसेच ठेवायचं आणि जनतेला नाहक त्रास द्यायचा हे काम मनपाने सुरु केले आहे. लाल चेहरे फक्त नागरिकांचे होत आहे कारण लोकप्रतिनिधी काचबंद वाहनात असल्याने त्यांच्या चेहऱ्याला लाल धूळ स्पर्श करू शकत नाही.

    जटपुरा गेट समोर रस्त्याची एक बाजू पूर्णतः बंद करण्यात आली आहे, त्यामुळे या मार्गावर उडणाऱ्या धुळीने नागरिकांच्या आरोग्यावर अपायकारक परिणाम होत आहे. पण चंद्रपूरकरांना याचा काही एक फरक पडत नाही, कारण मागील अनेक वर्षांपासून चंद्रपुरातील हवा प्रदूषणयुक्त झाली आहे, तेव्हापासून आतापर्यंत नागरिकांनी आपल्या तोंडून याविरोधात एक ब्र सुद्धा काढलेला नाही तर आता कुणाला काय फरक पडणार आहे.

    लोकप्रतिनिधी यांना या प्रदूषणाचा काही एक फरक पडत नाही, कारण भाड में जाये जनता अपना काम बनता हे घोषवाक्य अंगीकारत लोकप्रतिनिधी आपली वाटचाल करीत आहे. जटपुरा गेट मार्गावरून कितीही गोरा नागरिक गेल्यास तो क्षणार्धात लाल होऊनच बाहेर निघत आहे, म्हणून या मार्गावरून जाताना आपल्याला विशेष खबरदारी घ्यावी लागेल.

    शहरात प्रदूषणाची तीव्रता मोजण्यासाठी कृत्रिम हृदय लावण्यात आले असता ४ दिवसात ते हृदय काळे पडले होते, यावरून समजते कि ते तर कृत्रिम होते मग नागरिकांच्या हृदयाची काय अवस्था होत असेल याबाबत विचार न केलेला बरा. वायू प्रदूषणावर जनतेनी बोलायला हवं अन्यथा भविष्यात भावी पिढीला प्रदूषणात जगावे लागणार. अनेक वर्षांपासून जिल्ह्यात प्रदूषण होत आहे. अनेकदा जगात चंद्रपूर प्रदूषणाच्या बाबतीत अव्वल आलं होत. याविरोधात जनता उठाव करेल त्यादिवशी हे प्रश्न मार्गी लागेल. अनेक दुर्धर आजारावर आपल्याकडे हॉस्पिटलची निर्मिती होते मात्र ते आजार न व्हावे यासाठी काही खबरदारी घेतली जात नाही. Air pollution in Chandrapur

    शहरातील रस्ते खड्ड्यात गेले आहे, गांधी चौक ते जटपुरा गेट हा मार्ग म्हणजे अर्धा डांबरीकरण तर अर्धा काँक्रिटीकरण आहे हे चित्र फक्त आपल्या चंद्रपुरात बघायला मिळते हे विशेष. Chandrapur pollution issues

    चंद्रपूर शहरातील रस्ते कित्येक वर्षांपासून अरुंद आहे त्याला रुंद करण्याचा साधा प्रयत्न कधीही झाला नाही, फक्त खोदण्याचे काम मात्र प्राथमिकतेने झाले, जर चुकून या विरोधात कुणी आंदोलन केले तर आपण समजून घ्या कि तू मारल्या सारखं कर मी रडल्यासारखं करतो. आंदोलनामागची हि पार्श्वभूमी राहणार हे नक्कीच.

    Chandrapur pollution issues

  • Indian Constitution Burning Incident | महापुरुषांच्या पुतळा विटंबना प्रकरणी कठोर कायदे करा

    Indian Constitution Burning Incident

    Indian Constitution Burning Incident : समता सैनिक दल,भारतीय बौद्ध महासभा,रिपब्लिकन पक्ष, डॉ बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती महोत्सव समिती तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील बौद्ध विहार कमिटी सामाजिक धार्मिक आंबेडकरी चळवळीतील राजकीय प्रतिनिधी तसेच कार्यकर्त्यांनी प्रवीण हेमचंद्र खोब्रागडे यांच्या पुढाकारातून अमृतसर येथील प्रजासत्ताक दिनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करत भारतीय संविधानाची प्रत जाळली या घटनेचा धिक्कार करण्यासाठी निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते.

    चंद्रपूर ग्रंथोत्सवातून वाचनसंस्कृतीला उजाळा – आमदार मुनगंटीवार

    तत्पूर्वी मा.जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मा.राष्ट्रपती आणि मा.प्रधानमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले सदर निवेदनातून भारतात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या विटंबनाचे प्रकार वाढत जात आसून भारतीय भारतीय राज्यघटनेचे पावित्राला गालबोट लावण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे. (Ambedkarite Movement Protest)

    या दोन्ही घटना अत्यंत गंभीर असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावे यासाठी अश्या प्रवृत्तीच्या समाजद्रोही लोकांना देशद्रोहाचा खटला दाखल करून त्यांचे नागरिकत्व रद्द करून कठोर शिक्षा व्हावी या मागण्याचे निवेदन देण्यात आले,या सर्व घटनेमुळे जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा मलिन होत असल्याने अश्या प्रवृत्तीच्या गुन्हेगारांना शासन प्रशासन आणि कायदेमंडळाद्वारे कठोर कायदे व्हावे ही विनंती केली.

    या निवेदन सुपूर्द करताना आणि निषेध नोंदविण्यात येताना अशोक निमगडे, विशाल आलोने,अशोक टेंभरे,किशोर सवाणे,राजूभाऊ खोब्रागडे,सुरेश नारनवरे,महादेव कांबळे,शंकर वेलहेकर,राजकुमार जवादे, ॲड. राजस खोब्रागडे बुद्धप्रकाश वाघमारे,राजेश वनकर विजय करमरकर,सुशील बुजाडे वामनराव चांद्रिकापुरे,चेतन पाटील, विद्याधर लाडे,मुन्ना खोब्रागडे, प्रमोद मून,बाजीराव उंदिरवाडे, सिद्धार्थ सुमन,संतोष रामटेके, मृणाल कांबळे,निर्मला नगराळे, वर्षा घडसे निर्मला पाटील, पंचफुला वेल्हेकर छाया थोरात,अनिता जोगे,आनंद वनकर, सिध्दार्थ धोटे,यशवंत मुंजमकर,दिलीप डांगे यांच्या सोबत असंख्य नागरिकांची उपस्थिती होती.

  • Chandrapur Granthotsav | चंद्रपूर ग्रंथोत्सवातून वाचनसंस्कृतीला नवा उजाळा – आमदार मुनगंटीवार यांचा ग्रंथप्रेमींसाठी पुढाकार

    Chandrapur Granthotsav

    Chandrapur Granthotsav : चंद्रपूर – ग्रंथ मानवी जीवनात मार्गदर्शकाची भूमिका बजावितात. मी पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर वाचनालये सुरू करण्याबाबत आग्रही होतो. चंद्रपूर, बल्लारपूर, मुल व पोंभूर्णा येथे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय उभारले. अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी वाचनालयाचा उपयोग करत आहेत. विपरित परिस्थितीवर मात करत यशाचा झेंडा उंच फडकावत आहेत, हे या गोष्टीचे द्योतक आहे.

    अलीकडच्या काळात वाचन कमी होत असताना ग्रंथोत्सवासारखे उपक्रम महत्त्वाचे ठरतात. अशा कार्यक्रमांमधून वाचन चळवळीला प्रोत्साहन मिळते, असे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. (Library events in Chandrapur)

    आ. श्री. मुनगंटीवार यांनी ग्रंथोत्सवाला भेट दिली. यावेळी आयोजित कार्यक्रमाला ज्येष्ठ साहीत्यिक श्रीपाद भालचंद्र जोशी, डाॅ. शाम मोहोरकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी रत्नाकर नलावडे, अनिल बोरगमवार आदी उपस्थित होते. व्हाट्सअप युनिव्हर्सिटीच्या युगामध्ये ग्रंथवाचन, ग्रंथखरेदी किंवा प्रकाशक या संदर्भातील आस्था दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे, अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली.

    मच्छीमारांच्या आयुष्यात परिवर्तन आणणार – नितेश राणे

    आमदार श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात ग्रंथोत्सव, ग्रंथ प्रदर्शन व विक्रीचे आयोजन होत आहे. समाजावर दीर्घकालीन चांगले परिणाम करणारे जे विषय आहेत, त्यात ग्रंथ वाचन आणि प्रोत्साहन याचा देखील समावेश आहे. मी अर्थमंत्री असताना मुंबईतील एशियाटिक लायब्ररीला 15 कोटी रुपयांचा निधी न मागता उपलब्ध करुन दिला. (Importance of books in education)

    चंद्रपूर जिल्हा ग्रंथालयाचे बांधकाम आणि तत्सम कामासाठी 14 कोटी 90 लक्ष रुपये मंजूर केले. विदर्भातील उत्तम असे हे ग्रंथालय होऊन याठिकाणी चर्चा, चिंतन व विविध विषयावर मंथन होईल. ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून या क्षेत्रामधील असणाऱ्या उणिवा आणि 21 व्या शतकातील आव्हाने निश्चितपणे लिहिल्या गेली पाहिजे.’

    या ग्रंथोत्सवाला मोठं रूप देण्याची आवश्यकता आहे. चांदा क्लब ग्राउंड येथे भव्य ग्रंथोत्सवाचे आयोजन होईल तेव्हा हजारो विद्यार्थी सहभागी होतील. पुस्तकांचे शेकडो दालन लागतील. लाखो पुस्तके विकल्या जाईल, तेव्हा खऱ्या अर्थाने ग्रंथोत्सवाचे उद्दिष्ट साध्य होईल, असेही ते म्हणाले. तत्पूर्वी, ग्रंथोत्सवाचे उद्घाटन ग्रंथालय चळवळीचे प्रणेते डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

  • Woman Empowerment Event | उत्सव नारीशक्तीचा कार्यक्रमात सैराट फेम रिंकू राजगुरू ठरली आकर्षण

    Woman Empowerment Event

    Woman Empowerment Event : आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने शनिवारी घुग्घूस येथील स्नेहप्रभा मंगल कार्यालयात “उत्सव नारिशक्तीचा” या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू (आर्ची) यांची उपस्थिती या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली. घुग्घूस वासियांनी या कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला.

                या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. एकल नृत्य, युगल नृत्य आणि समूह नृत्य स्पर्धेत ५० हून अधिक गटांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेतील सादरीकरणांनी उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सैराट फेम रिंकू राजगुरू हिच्या उपस्थितीमुळे संपूर्ण वातावरण अधिक रंगतदार झाले. (Cultural Festival for Women)

    मच्छीमारांच्या आयुष्यात परिवर्तन आणणार – नितेश राणे

    कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, कल्याणी किशोर जोरगेवार, विवेक बोडे, नितू चौधरी, सुचिता लुटे, शारदा दुर्गम, वैशाली ढवस, सुषमा सावे, कुसुम सातपुते, नंदा कांबळे, उषा आगदारी, नितू जयस्वाल, उज्वला उईके, वनिता निहाल, किरण बोंढे, निरीक्षण तांड्रा, संतोष नुने, संजय तिवारी, राजकुमार गोडशेलवाल, साजन गोहणे, सीनू इसारप, इमरान खान, स्वप्निल वाढई, मुन्ना लोढे, सुरज मोरपाका, अनिल बाम, राजेश मोरपाका, मयूर कलवल, सुनिता घिवे, जयश्री राजूरकर सिनल भरडकर आदी मान्यवर उपस्थित होते.  

      कार्यक्रमाला संबोधित करताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, “महिला सबलीकरण हे समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. महिलांना संधी मिळाल्यास त्या कोणत्याही क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करू शकतात. आजच्या या कार्यक्रमातून घुग्घूस शहरातील महिला कलावंतांना आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी मोठे व्यासपीठ मिळाले आहे. महिलांनी आत्मनिर्भर होण्यासाठी शिक्षण, कला आणि सामाजिक कार्य यामध्ये पुढाकार घ्यावा. अशा प्रकारच्या सांस्कृतिक उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडतात. भविष्यातही अशाच प्रकारचे उपक्रम राबवून महिलांना संधी उपलब्ध करून दिली जाईल असे ते यावेळी म्हणाले. (Female Talent Showcase)                 

    समोर सैराट फेम रिंकू राजगुरू (आर्ची) या उत्तम अभिनेत्री आज उपस्थित आहेत. तिच्या संघर्षमय प्रवासातून आणि अभिनय कारकिर्दीतून तरुणींना प्रेरणा मिळेल. महिलांनी आत्मनिर्भर व्हावे, कला, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात पुढे जावे, हीच या कार्यक्रमामागची संकल्पना आहे. या भागातील विकासकामांबरोबरच महिला शक्तीला प्रोत्साहित करणारे कार्यक्रम पूढेही आयोजित करणार असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले. (Dance Competition for Women)

     घूग्घूस वासीयांचा मिळालेला प्रतिसाद आजिवन स्मरणात राहिल. आमदार किशोर जोरगेवार यांनी अशा आयोजनातून महिलांना संधी उपलब्ध करुन दिली आहे. आपल्या शहरात आल्यावर उर्जावान घूग्घूसवासी पाहून आनंद झाला. आयोजन उत्तम असून आपल्या उपस्थितीने त्याची भव्यता आणखी वाढल्याचे यावेळी रिंकू राजपूत यांनी सांगीतले. यात एकल स्पर्धेत प्रिती झाडे, युगल नृत्य स्पर्धेत शोभा आणि विभा, तर सामुहिक नृत्य स्पर्धेत शेणगाव येथील नचले गृपने प्रथम पारितोषिक पटकावले. कार्यक्रम पाहण्यासाठी घुग्घूस वासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती. 

  • Chandrapur accident | शहरातील बायपास मार्गावर भीषण अपघात

    Chandrapur accident

    Chandrapur accident : चंद्रपुरातील बायपास मार्गावर 2 फेब्रुवारीला दुपारी 2 वाजताच्या सुमारास चारचाकी वाहनाने दुचाकी वाहनाला जबर धडक दिल्याने दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला, अपघातानंतर कार चालक घटनस्थळावरून पसार झाला.

    राष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पाचा विकास करा – आमदार मुनगंटीवार

    दुचाकी वाहन क्रमांक MH34G 6197 हे चंद्रपूर वरून बल्लारपूर च्या दिशेने जात होते त्यावेळी जुनोना मार्गावरून चंद्रपूरच्या दिशेने निघाले होते मात्र चालकाने वाहन विरुद्ध दिशेने टाकले, अतिवेगात असलेल्या चारचाकी वाहनाने आधी मार्गावर उभ्या असलेल्या स्कुल बस ला धडक दिली.

    त्यानंतर अनियंत्रित कार दुचाकी ला धडकली, धडक इतकी जबर होती की दुचाकी चालक रस्त्याच्या कडेला पडला, या अपघातात दुचाकी चालक जागीच ठार झाला.
    कार चालक घटनास्थळावरून पसार झाला मृतकाचे नाव अद्याप कळू शकले नाही. (Chandrapur bypass crash)


    रामनगर पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यावर ते घटनास्थळी दाखल झाले, घटनेचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला.

  • Utsav Narishakticha । अभिनेत्री रिंकू राजगुरू शनिवारी चंद्रपुरात

    Utsav Narishakticha

    Utsav Narishakticha : आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने १ फेब्रुवारीला शनिवारी घुग्घूस येथील स्नेहप्रभा मंगल कार्यालयात उत्सव नारिशक्तीचा या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. सैराट (Sairat) फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु (आर्ची) (Rinku Rajguru) यांची उपस्थिती या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण राहणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने घुग्घूस शहरवासीयांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

    कंपनीची मुजोरी गावातील रस्ताच खोदला

    घुग्घूस शहरातील महिला कलावंतांना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात संध्याकाळी ५ वाजता होणार असून, यात एकल नृत्य, युगल नृत्य आणि समूह नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये सुमारे ५० नृत्य गटांनी सहभाग नोंदवला आहे.

    या विशेष कार्यक्रमाला अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित राहणार असून, महिलांसाठी प्रेरणादायी कार्यक्रम म्हणून याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे घुग्घूस शहरवासीयांनी या भव्य आयोजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

  • Chandrapur Municipal Corporation action | चंद्रपुरात 180 किलो प्लॅस्टिक पन्नी जप्त

    Chandrapur Municipal Corporation action

    Chandrapur Municipal Corporation action : चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकवर कारवाई सुरू असुन उपद्रव शोध पथकाद्वारे रामनगर येथील साई पान शॉप येथे कारवाई करून खर्ऱ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सुमारे 180 किलो प्लास्टिक पन्नी जप्त करण्यात आल्या तसेच संबंधितांवर 5 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. (Single-use plastic ban Chandrapur)

    चंद्रपूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे, वाळू तस्करांनी मुजोरी, तलाठ्याच्या अंगावर ट्रॅक्टर चढविण्याचा प्रयत्न


        बंदी असलेल्या व एकदाच वापर करता येणाऱ्या प्लास्टिकवर कारवाई करण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या निर्देशानुसार 8 टीम्स बनविण्यात आल्या आहेत. या सर्व चमूंद्वारे शहरात नियमित कारवाई करण्यात येते. यावेळेस सुद्धा या दुकानासंबंधी गुप्त माहिती मनपास प्राप्त झाली होती. प्लास्टीक साठा,पिशव्यांची माहीती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येत असुन दिलेली माहीती खरी निघाल्यास 5 हजारांचे बक्षिस दिल्या जात असल्याने अनेक सुजाण व्यक्तींकडुन अवैध साठ्यासंबंधी तक्रारी मनपास प्राप्त होत आहेत.


         एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरावर राज्यात 1 जुलै 2022 पासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली असुन महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना 2018 नुसार पाचशे रुपये जागेवरच दंड, संस्थात्मक पातळीवर 5 हजार रुपयांपर्यंत दंड,दुसऱ्यांदा वापर केल्यास 10 हजार रुपये, तर तिसऱ्यांदा गुन्हा केला तर 25 हजार रुपये दंड आणि 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आहे. (One-time use plastic penalty)


         सदर कारवाई आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त रवींद्र भेलावे व उपायुक्त मंगेश खवले यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात डॉ. अमोल शेळके,स्वच्छता निरीक्षक शुभम खोटे,शुभम चिंचेकर,राहुल गगपल्लिवर, प्रफुल पोतराजे यांनी केली

  • Chandrapur Constituency Development | चंद्रपुरातील विकासकामांवर उपमुख्यमंत्री पवार समवेत चर्चा

    Chandrapur Constituency Development

    Chandrapur Constituency Development : चंद्रपूर विधानसभा मतदार संघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई मंत्रालय येथे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांची सदिच्छा भेट घेतली.

    या भेटीमध्ये मतदार संघातील विविध विकासकामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आमदार जोरगेवार यांनी मतदार संघातील प्रलंबित विकासकामे, नवीन प्रकल्प आणि आवश्यक निधी यासंदर्भात उपमुख्यमंत्र्यांसमोर मागण्या मांडल्या.

    चंद्रपुरातील अतिक्रमण हटाव मोहिमेत भेदभाव पूर्ण कारवाईचा आरोप

    या चर्चेदरम्यान, चंद्रपूर मतदार संघातील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्याची गरज असल्याचे अजित पवार  यांनी मान्य केले. त्यांनी या विकासकामांना प्राधान्याने मंजुरी देण्याचे आश्वासन दिले. विशेषतः रस्ते, पूल, जलसंधारण प्रकल्प, आणि सार्वजनिक आरोग्य सेवांसाठी आवश्यक सुविधा या विषयांवर लक्ष केंद्रित करण्यात आले.

    आमदार किशोर जोरगेवार यांनी मतदार संघातील कृषी क्षेत्राच्या सुधारणांसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी नवीन योजनांच्या अंमलबजावणीबाबतही सविस्तर चर्चा केली. यामध्ये सिंचन प्रकल्प, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब आणि शेतकरी उत्पादने बाजारपेठेत सहज विक्रीसाठी आवश्यक धोरणे राबविण्याची मागणी करण्यात आली.

    चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची पदभरती रद्द होणार?

    औद्योगिक विकासाच्या अनुषंगाने, स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत अशी मागणीही आमदार जोरगेवार यांनी केली. या चर्चेत चंद्रपूर मतदारसंघातील रोजगार निर्मितीवर भर देण्यात आला.

    स्थानिक युवकांना अधिक संधी मिळाव्यात यासाठी नवीन औद्योगिक संकुले, प्रशिक्षण केंद्रे आणि स्टार्टअप्ससाठी विशेष प्रोत्साहन देण्याबाबत ही चर्चा करण्यात आली. यासोबतच, नागरी सुविधा सुधारण्यासाठी पाणीपुरवठा,  स्वच्छता मोहिमा, कचरा व्यवस्थापन आणि स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत प्रस्तावित प्रकल्पांची माहिती आमदार जोरगेवार यांनी मांडली.

    यावेळी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर, मतदार संघातील विकास योजनांना लवकरच गती मिळेल असा विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला.

  • Chandrapur encroachment | अतिक्रमण हटाव मोहिमेत सुरू झाली गांधीगिरी

    Chandrapur encroachment

    Chandrapur encroachment : चंद्रपूर महानगरपालिका तर्फे आज शहरातील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी म्हणजेच गोल बाजारात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. मात्र मोठ्या दुकानदारांना सोडून लहान दुकानदारांवर कारवाई करण्यात आल्याने एकाने थेट अतिक्रमण हटाव पथकाच्या वाहनाखाली येत गांधीगिरी आंदोलन सुरू केले, माझे साहित्य मला परत करा अशी मागणी त्या दुकानदाराने केली. मनपाने यावेळी पोलिसांना पाचारण केले होते.

    सिडीसीसी बँकेची नोकरभरती रद्द होणार? मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले कारवाईचे संकेत

    अत्यंत वर्दळ व गर्दीचे ठिकाण असलेले गोल बाजारात यापूर्वी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली मात्र काही काळ लोटल्यावर परिस्थिती जैसे थे झाली.

    29 जानेवारी रोजी चंद्रपूर मनपाने अतिक्रमण हटाव मोहीम राबवली, रस्त्याच्या कडेला असलेल्या लहान दुकानदार यांच्यावर आधी कारवाई करण्यात आली, मात्र एका लहान व्यापाऱ्याने आमच्यावरचं कारवाई का करता? ज्यांनी अतिक्रमण केलं त्यांच्यावर कारवाई का करीत नाही म्हणून संताप व्यक्त करीत माझे साहित्य मला परत करा असे म्हणत तो व्यापारी अतिक्रमण हटाव पथकाच्या चारचाकी वाहनाखाली येत गांधीगिरी आंदोलन करू लागला.


    गोल बाजारात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे, सर्व अतिक्रमण हटले पाहिजे, मात्र कारवाई ही अतिक्रमणाचे नियम न पाळण्यावर झाली पाहिजे, वारंवार लहान व्यापाऱ्यांवर कारवाई केल्या जाते.
    मनपा पथकाने यावेळी पोलिसांना पाचारण केले, 4 ते 5 तास सदर आंदोलन चाललं.

    यावेळी काही काळ गोल बाजार परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम थांबविण्यात आली होती.

  • Retired teacher protest | सेवानिवृत्त शिक्षकांच्या धरणे आंदोलनाला आमदार किशोर जोरगेवार यांची भेट

    Retired teacher protest

    सेवानिवृत्त शिक्षकांचा प्रशासनविरुद्ध एल्गार

    Retired teacher protest : विविध मागण्यांसाठी चंद्रपूर जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षण संघाच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर आयोजित धरणे आंदोलनाला आमदार किशोर जोरगेवार यांनी सोमवारी भेट देत शिक्षकांच्या मागण्या समजून घेतल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांना सदर मागण्यांसंदर्भात आठवडाभरात बैठक लावण्याचे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले.

    सन २०१२, २०१४, २०१८ मध्ये जिल्हा परिषद चंद्रपूर कडून मंजूर झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकांना निवड श्रेणीचा लाभ देण्यात यावा, शिल्लक राहिलेल्या सेवानिवृत्त शिक्षक, केंद्र प्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी यांचे सातवे वेतन आयोगाचे २, ३, ४ व ५ हप्ते देण्यात यावे, सेवानिवृत्त शिक्षक, केंद्र प्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी यांचे डि.ए. अरिअर्सची रक्कम देण्यात यावी, सेवानिवृत्त शिक्षक, केंद्रप्रमुख, शिक्षण अधिकारी यांचे उपदान, अंशराशीकरण ची रक्कम देण्यात यावी, सेवानिवृत्त शिक्षक, केंद्र प्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी यांचा प्रलंबित गटविमा त्वरीत देण्यात यावा, जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांना न्यायालयाच्या आदेशानुसार वेतनवाढी देण्यात यावी, सेवानिवृत्त शिक्षकांच्या प्रलंबित असलेल्या काल्पनिक वेतनवाढी त्वरित मंजूर करून निकाली काढण्यात याव्यात, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त दिनांकाला गट विमा रक्कमेचा चेक देण्यात यावा.  

    चंद्रपुरात अलिखित सट्टा ला परवानगी

                 

       या मागण्यांसह इतर मागण्यांसाठी चंद्रपूर जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षण संघाच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांनी आंदोलनाला भेट दिली असून आंदोलकांच्या मागण्या समजून घेतल्या. यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांना आंदोलनस्थळी बोलावून घेत सदर मागण्या सोडविण्यासाठी आठवडाभरात बैठक घेण्याचे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले. या आंदोलनात शेकडो निवृत्त शिक्षक सहभागी झाले होते.