Category: चंद्रपूर शहर

चंद्रपूर शहर (Chandrapur City) आणि आसपासच्या परिसरातील प्रत्येक लहान-मोठी बातमी वाचा news34.in वर. महानगरपालिका, स्थानिक राजकारण, गुन्हेगारी, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचे त्वरित आणि अचूक कव्हरेज येथे उपलब्ध आहे. तुमच्या चंद्रपूर शहर परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या विषयावर सविस्तर माहिती आणि सत्य घटनांचे अपडेट्स मिळवा. स्थानिक नागरिकांसाठी हे सर्वात विश्वसनीय स्रोत आहे.

  • Chandrapur MNS agitation | चंद्रपुरात मनपाची धूळ आणि मनसेचे मास्क वाटप आंदोलन

    Chandrapur MNS agitation

    Chandrapur MNS agitation : चंद्रपूर : चंद्रपूर येथील नागरिकांना महानगरपालिकेने कोणतीही पूर्व सूचना न देता चंद्रपुरात ठिकठिकाणी रस्ते खोदल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

    मात्र याकडे लोकप्रतिनिधी आणि मनपाचे दुर्लक्ष होत असल्याने आज दिनांक 11 फेब्रुवारीला दुपारी चंद्रपूर शहरातील जटपूरा गेट येथे मनपाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मनदीप रोडे यांच्या नेतृत्वात आक्रमक आंदोलन करण्यात आले. (Mns protest)

    एक व्हाट्सएप संदेश, आणि निराधार महिलेला झाली मोठी मदत

    आंदोलनादरम्यान मनसेच्या कार्यकर्त्यांनी मास्क लावून महानगरपालिकेचा जाहीर निषेध नोंदविला. 

    चंद्रपूर शहरात जाण्यासाठी एकच मुख्य मार्ग असल्याने या रस्त्यावर महानगर पालिकेने कोणतीही पूर्व सूचना न देता खोदकाम केले यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांसह रुग्णांना सुद्धा या रस्त्यावरून येजा करताना त्रास सहन करावा लागत असताना याकडे मनपा आयुक्त जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे मनसेने आंदोलन केले व या रस्त्यावर मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांना मास्कचे वाटप केले. येत्या काही दिवसात रस्त्याची दुरुस्ती न केल्यास मनपासमोर आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी मनदीप रोडे यांनी दिला. (Chandrapur traffic issues)

    भूमिगत गटार योजनेवरून मनपा विरुद्ध नागरिकांमध्ये आधीच रोष आहे, 15 वर्षापूर्वी सुद्धा चंद्रपुरात 100 कोटींची भूमिगत गटार योजनेचे काम करण्यात आले होते, मात्र सदर काम अयशस्वी झाल्याने आता 500 कोटींच्या भूमिगत गटार योजनेचे काम सुरू करण्यात आले आहे.

    यामुळे शहरातील मुख्य मार्ग खोदण्यात आल्याने नागरिकांना रहदारी करण्यासाठी धुळीचा सामना करावा लागत आहे, शहरातील वाहतूक व्यवस्था खोळंबून गेली आहे, मनसेने आज या विषयावर निषेध आंदोलन केले मात्र या आंदोलनाचा काय परिणाम होणार ही येणारी वेळ ठरवेल.

  • Nagpur Divisional Sports Championship | “नागपूर विभागीय क्रीडा स्पर्धेत चंद्रपूरचा दबदबा – जनरल चॅम्पियनशिपवर मोहोर!”

    Nagpur Divisional Sports Championship

    Nagpur Divisional Sports Championship : चंद्रपूर येथे पार पडलेल्या नागपूर विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी करत 356 गुणांसह ‘जनरल चॅम्पियनशीप’ चा किताब पटकाविला. तर उपविजेता गडचिरोली जिल्ह्याला 305 गुण मिळाले. राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी चंद्रपूर जिल्हा विजयी चमुसह ‘जनरल चॅम्पियनशीप’’ चषक स्वीकारला. (Chandrapur District Wins General Championship)

    दिनांक 7 ते 9 फेब्रुवारी 2025 या कालावधीत विसापूर येथील सैनिक शाळेत नागपूर विभागीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. नागपूर विभागातील सहा जिल्हे आणि नागपूर येथील आयुक्त कार्यालयातील चमूने सदर स्पर्धेत सहभाग नोंदविला. या स्पर्धेचा समारोप सैनिक स्कूल येथे 9 फेब्रुवारी 2025 रोजी पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, नागपूरच्या विभागीय आयुक्त माधवी खोडे – चवरे, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पंडा, नागपूर येथील उपायुक्त दिपाली मोतिहाळे, सहायक जिल्हाधिकारी अपुर्वा बासुर, कश्मिरा संख्ये, सैनिक स्कूलचे प्राचार्य कॅप्टन अश्विन अनुपदेव, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (Inter-District Sports Competition 2025)

    एका व्हाट्सअप मॅसेजने निराधार महिलेला मिळाली मोठी मदत

    राज्य स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करा – पालकमंत्री डॉ. अशोक उईके

    यावेळी बोलतांना पालकमंत्री डॉ. अशोक उईके म्हणाले, महसूल विभाग प्रशासनाची मुख्य रक्तवाहिनी आहे. दैनंदिन काम करीत असतांनाच अशा प्रकारच्या क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमातून अधिकारी – कर्मचा-यांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध होते. जिल्हास्तर, विभागीय स्तर आणि राज्य स्तरावर खेळण्याची चांगली संधी त्यांना मिळते. खेळामध्ये यश प्राप्त करणे हे ध्येय ठेवायलाच पाहिजे. प्रशासनामध्ये काम करीत असतांना आपण आपली ओळख निर्माण करतो, तशीच ओळख खेळाच्या माध्यमातूनही निर्माण झाली पाहिजे. राज्यस्तरावरील क्रीडा स्पर्धेत आता नागपूर विभाग आणि चंद्रपूर जिल्ह्यानेसुध्दा उत्कृष्ट कामगिरी करावी, अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली. (Chandrapur Sports Achievements)

    जिल्हा प्रशासनाच्या वतीने क्रीडा स्पर्धांचे उत्कृष्ट आयोजन : आमदार किशोर जोरगेवार

    राज्य शासनाच्या 590 कोटीतून ही सैनिक स्कूल उभी राहिली आहे. खेळाच्या अत्याधुनिक सोयीसुविधा येथे आहेत. शासनाला महसूल प्रशासनाकडून जास्त अपेक्षा असतात. महसूल विभागाच्या क्रीडा स्पर्धांप्रमाणेच नागपूर विभागाने इतरही शासकीय  विभागांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा आयेाजित कराव्यात. जेणेकरून इतर विभागातील अधिकारी कर्मचा-यांनासुध्दा स्वत:तील कलागुण विकसीत करता येईल. या क्रीडा स्पर्धांचे चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने उत्कृष्ट आयोजन केले, असे त्यांनी सांगितले. (Best Performing District in Sports)

    राज्यात नागपूर विभाग नेहमीच अग्रेसर राहावा : विभागीय आयुक्त माधवी खोडे

    महसूल विभागावर प्रशासनाची मोठी जबाबदारी असते. कामाच्या तणावातून मुक्त होण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन आवश्यक आहे. नागपूर विभागातील सहा जिल्हे आणि आयुक्त कार्यालयाच्या टीम येथे आल्या. सर्वांनी चांगली कामगिरी केली असून खेळभावना केवळ खेळातच नव्हे तर कामातूनही दिसू द्यावी. तसेच संपूर्ण राज्यात नागपूर विभाग नेहमीच अग्रेसर असावा, अशी अपेक्षा विभागीय आयुक्त माधवी खोडे – चवरे यांनी व्यक्त केली.

    प्रास्ताविकात जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. म्हणाले, तीन दिवस या स्पर्धा घेण्यात आल्या. नागपूर विभागातून एकूण 1080 अधिकारी आणि कर्मचा-यांनी यात सहभाग नोंदविला. 22 क्रीडा प्रकारामध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या. अशा स्पर्धांमधून व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत होते.

    कार्यक्रमाचे संचालन तहसीलदार प्रताप वाघमारे यांनी तर आभार निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांनी मानले. यावेळी उपविभागीय अधिकारी संजय पवार, रविंद्र माने, उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) संजय पवार, तहसीलदार विजय पवार, श्रीधर राजमाने यांच्यासह इतर खेळाडू अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

    हे संघ ठरले विजेता आणि उपविजेता : कबड्डी – विजेता गडचिरोली जिल्हा, उपविजेता चंद्रपूर जिल्हा. व्हॉलीबॉल – विजेता चंद्रपूर, उपविजेता गडचिरोली.  थ्रो बॉल – विजेता गडचिरोली, उपविजेता चंद्रपूर. खो-खो  महिला : विजेता गडचिरोली, उपविजेता चंद्रपूर. खो-खो पुरुष : विजेता गडचिरोली, उपविजेता चंद्रपूर. क्रिकेट – विजेता चंद्रपूर, उपविजेता नागपूर. फुटबॉल – विजेता चंद्रपूर, उपविजेता गडचिरोली. याशिवाय उत्कृष्ट गायन सोलो, उत्कृष्ट अभिनय सोलो, वैयक्तिक नृत्य, उत्कृष्ट वेशभुषा, नक्कल, युगल गीत, दिग्दर्शन, कलाप्रकार मध्ये चंद्रपूर आणि गडचिरोलीसह गोंदिया, भंडारा, वर्धा, नागपूर जिल्ह्यांनी चांगली कामगिरी केली.

  • Shrimati’s soubhagya utsav । “श्रीमतीचा सौभाग्य सोहळा : संघर्षशील महिलांच्या जिद्दीला सलाम”

    Shrimati’s soubhagya utsav

    Shrimati’s soubhagya utsav : स्त्रीशक्ती ही केवळ कुटुंबाचीच नाही, तर संपूर्ण समाजाची ताकद आहे. जेव्हा एखादी महिला आत्मनिर्भर होते, तेव्हा ती केवळ स्वतःपुरती मर्यादित राहत नाही, तर संपूर्ण समाजाला प्रेरणा देते. आज या मंचावर अनेक महिलांनी आपले अनुभव सांगितले. त्यामध्ये संघर्ष होता, कष्ट होते, पण त्याहीपेक्षा जिद्द, आत्मविश्वास आणि काहीतरी करून दाखवण्याची हिम्मत होती. श्रीमतीचा सौभाग्य सोहळा हा याच संघर्षशील प्रवासाची दखल घेत समाजात सकारात्मक परिवर्तन घडवणारा उपक्रम असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

    संकल्प संस्था आणि निमा ह्युमन फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने इंदिरा नगर येथे एकल पालकतत्व करणाऱ्या परितक्ता आणि विधवा महिलांच्या संघर्षमय वाटचालीला सन्मान देण्यासाठी “श्रीमतीचा सौभाग्य सोहळा” आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संकल्प संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोक  वासलवार, निमा ह्युमन फोरमच्या अध्यक्ष डॉ. शिमला गाजर्लावार, सचिव डॉ. मनीष घुगल, डॉ. वैशाली बदनोरे, डॉ. स्नेहल पोटदुखे, संकल्प संस्थेचे व्यवस्थापक कुंदन खोब्रागडे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. (Celebrating Women’s Strength)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस उत्साहात

    यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, समाजामध्ये अनेक महिला वेगवेगळ्या परिस्थितींशी सामना करत आपले जीवन साकारत असतात. काही विधवा होतात, काही परीतक्ता असतात, पण त्यांनी कठीण परिस्थितीसमोर हार न मानता आपल्या कुटुंबासाठी उभे राहणे, ही खऱ्या अर्थाने एक शौर्यगाथा आहे.

    आज येथे उपस्थित असलेल्या महिलांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर केवळ स्वतःचे जीवन नव्हे, तर आपल्या मुलांचे आणि परिवाराचे जीवन घडवले आहे. संकल्प संस्थेने हा उपक्रम राबवून या महिलांना सन्मानित करण्याचे मोठे कार्य केले आहे. या गौरवामुळे त्यांना अधिक आत्मविश्वास मिळेल आणि इतर महिलांसाठीही हे एक नवे मार्गदर्शन ठरेल. समाजानेही अशा महिलांच्या जिद्दीला आणि कर्तृत्वाला प्रोत्साहन दिले पाहिजे.

    indira nagar

    स्त्रियांच्या सशक्तीकरणासाठी, त्यांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचावा, त्यांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. महिला म्हणजे केवळ कुटुंबाचा आधारस्तंभ नाहीत, तर त्या संपूर्ण समाजाची शक्ती आहेत. आपल्या कर्तृत्वाने त्यांनी हे सिद्ध केले आहे. आणि पुढेही करत राहतील,” असा विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमाला परीतक्ता आणि विधवा महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • Vipin Paliwal transfer demand | मनपा आयुक्त पालीवाल विरुद्ध माजी नगरसेवकाने पुकारला एल्गार

    Vipin Paliwal transfer demand

    Vipin Paliwal transfer demand : चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त विपिन पालीवाल यांची तात्काळ बदली करून त्यांची कठोर विभागीय चौकशी करण्याची मागणी जनविकास सेनेने केली आहे. संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख तसेच जनविकास सेनेचे इमदाद शेख,प्रफुल बैरम व अमोल घोडमारे यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी विनय गौडा यांची भेट घेऊन लेखी पत्राद्वारे ही मागणी केली. आयुक्त पालीवाल यांनी अनेक कामांमध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा जनविकास सेनेचा आरोप आहे.

    शासकीय आश्रमशाळेत अधिकाऱ्यांचा मुक्काम

    महानगरपालिकेत वाढलेला भोंगळ कारभार व भ्रष्टाचार याला मनपा आयुक्त पालीवाल जबाबदार असून त्यांच्या कारकिर्दीतील सर्व कामांची सखोल व निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे असल्याने त्यांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी या भेटीच्या वेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे करण्यात आली. मनपातील भोंगळ कारभार व भ्रष्टाचाराविरुद्ध लवकरच जनआंदोलन सुरू करण्यात येत असल्याची माहिती सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आली. (Chandrapur Municipal Corporation corruption)

    अमृत पाणीपुरवठा व भूमिगत गटार योजनेच्या भ्रष्टाचाराची तक्रार

    234 कोटी रुपयांच्या पहिल्या अमृत पाणीपुरवठा योजनेसाठी फोडलेले रस्ते दुरुस्त करणे, काम पूर्ण झाल्यानंतर एक वर्षापर्यंत योजना चालवणे इत्यादी पूर्ण केलेली नसतांना कंत्राटदार मे. संतोष एजन्सीचे देयके देण्यात आली. 270 कोटी रुपयांच्या दुसऱ्या अमृत पाणीपुरवठा योजनेसाठी मंजुरी घेताना अनेक नियमांना बगल देण्यात आली. नवीन अमृत भुमिगत गटार योजनेचे सुरुवातीला 450 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मधील अधिकाऱ्यांना हाताशी धरून निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आयुक्त पालीवाल यांनी अंदाजपत्रकीय किमंतीत वाढ केली. सुमारे 450 कोटी रुपयांचे काम कंत्राटदाराला 506 कोटी रुपयांमध्ये देण्यात आले. या कामात कंत्राटदाराला सुरुवातीलाच 50 कोटी रुपयांचा लाभ पोहोचविला माजी नगरसेवक देशमुख यांचा आरोप आहे. (Corruption in Chandrapur projects)

    आयुक्तांचा भूतकाळ वादग्रस्त

    बल्लारपूर नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून कार्यरत असतांना पालीवाल यांनी नगरपालिकेतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही सामाजिक कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसात खोट्या तक्रारी केल्याचा आरोप होता. वर्धा नगरपालिकेत त्यांची कारकीर्द वादग्रस्त होती. त्यांच्याविरुद्ध शासनाकडे आजपर्यंत अनेक तक्रारी झालेल्या आहेत.

    चंद्रपूर महानगरपालिकेत अतिक्रमण काढतांना किंवा ब्ल्यु झोन मधील अवैध बांधकाम पडताना त्यांनी निवडक व भेदभावपूर्ण कारवाई केल्याचा आरोप आहे. निळ्या पूर रेषेच्या आतील अनेक मध्यमवर्गीयांची बांधकामे पाडण्यात आली. त्याचवेळी श्रीमंत व वजनदार लोकांच्या अवैध बांधकामांना संरक्षण दिल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. लोकसभागातून विविध उपक्रम राबवून जनमानसात प्रतिमा संवर्धन करणे व या प्रतिमेच्या आडून करोडो रुपयांचा मलिदा लाटणे ही आयुक्त पालीवाल यांची कार्यपद्धती असल्याचा देशमुख यांचा आरोप आहे.

  • How to pay property tax in Chandrapur | मालमत्ता करात सूट हवी तर करा हे काम

    How to pay property tax in Chandrapur

    How to pay property tax in Chandrapur : चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे 15 फेब्रुवारी पर्यंत थकबाकीसह मालमत्ता कराचा एकरकमी भरणा करणाऱ्याना शास्तीत सवलत देण्यात येत ऑनलाईन पद्धतीने कराचा भरणा केल्यास 50 टक्के तसेच ऑफलाईन पद्धतीने कराचा भरणा केल्यास 45 टक्के शास्तीत सवलत देण्यात येत आहे.सवलत केवळ 15 फेब्रुवारी पर्यंतच असल्याने अधिकाधिक मालमत्ता धारकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.  


       सदर योजनेचा आतापर्यंत 5241 मालमत्ता धारकांनी लाभ घेतला असुन एकुण 3 कोटी 96 लक्ष 58 हजार 420 रकमेचा भरणा या योजनेअंतर्गत करण्यात आला आहे. 15 फेब्रुवारी नंतर थकबाकीसह पूर्णतः कराचा भरणा करण्याऱ्या मालमत्ता धारकांना ऑनलाईन पद्धतीने कराचा भरणा केल्यास 25 टक्के तसेच ऑफलाईन पद्धतीने कराचा भरणा केल्यास 22 टक्के शास्तीत सूट देण्यात येणार आहे. ही सूट 31 मार्च पर्यंत लागू अराहणार असुन कर भरणा करणे सुविधेचे व्हावे या दृष्टीने 31 मार्च पर्यंत येणाऱ्या प्रत्येक सुटीच्या दिवशी मालमत्ता कर भरणा कार्यालय सुरु राहणार आहे.  (Chandrapur Municipal Corporation property tax discount)

    चंद्रपूर मनपाची मोठी कारवाई, 10 गाळे केले सील


       महापालिका क्षेत्रात 80 हजाराहुन अधिक मालमत्ता असून, संपूर्ण मालमत्तांच्या माध्यमातून दरवर्षी मागणी नोंदवली जाते. करदात्यांना कराची नोटीस पाठवून कर भरणा करण्यासाठी विनंती करण्यात येते. कर न भरल्यास दंड वसुली तसेच प्रसंगी मालमत्ता सील करण्याची कारवाई करण्यात येते. जास्तीत जास्त वसुली होऊन ती शहराच्या विकास कामांसाठी उपयोगी यावी या अनुषंगाने यंत्रणा जोमात कामाला लागली आहे. (Chandrapur property tax penalty waiver)


        चंद्रपूर महानगरपालिकेचे स्वतःचे उत्पन्न वाढुन कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर किरकोळ खर्च पालिकेला स्वतःच्या उत्पन्नातून भागविण्याचे दृष्टीने मालमत्ता कराची वसुली नियमित व प्रभावी होण्याकरीता शासनाने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमामध्ये सुधारणा करून विहित कालावधीनंतर शास्ती लागु करण्याची तरतूद केलेली आहे. अश्या प्रकारे लागु होणाऱ्या शास्तीमध्ये पुर्णतः किंवा अंशतः सूट देण्याचे अधिकारी महानगरपालीकेस आहेत.


        मालमत्ता कराच्या प्रभावी वसुलीकरीता व संभाव्य उद्दिष्ट पूर्ती करीता मनपातर्फे शास्तीत सवलत जाहीर करण्यात आली आहे. 15 फेब्रुवारी पूर्वी या शास्ती माफीचा लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

  • Chandrapur food license updates । चंद्रपूर शहरातील अन्न व्यावसायिकांना नोंदणी बंधनकारक

    Chandrapur food license updates

    Chandrapur food license updates : अन्न सुरक्षा व मानदे कायदा – 2006 मध्ये अन्न व्यावसायिकांची व्याख्या स्पष्ट केली आहे. पदार्थाचा व्यवसाय करणारे स्टॅालधारक व फिरते विक्रेते जसे पाणीपुरी, भेलपुरी, पावभाजी विक्रेते, आइसक्रीम, बर्फ गोळा, ज्यूस, शरबत विक्रेते, भाजीपाला व फळ विक्रेते, किरकोळ किराणा, डेली निड्स,बेकरी, घाऊक विक्री करणारे वितरक व वाहतूकदार, गृहउद्योग ते अन्न पदार्थाचे उत्पादक तसेच उपहारगृह, हॉटेल, खानावळ, चहा विक्रेते, दुध विक्रेते त्याच बरोबर स्वस्त धान्य दुकानदार, कॅटरर्स, शालेय पोषण आहार पुरवठादार, बचतगट, शासकीय/ अशासकीय कार्यालयातील कॅटीन, वसतिगृहातील खानावळ, धार्मिक ठिकाणी वितरित होणारा प्रसाद, मेळावे व प्रदर्शना मधील अन्न पदार्थांचे स्टॉलधारक आदी सर्व अन्न व्यावसायिक या वर्गवारीच्या कक्षेत येतात. Food license registration India

    चंद्रपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा लवकरच

    या सर्व अन्न व्यावसायिकांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006  चे कलम 31 अंतर्गत परवाना किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. परवाना अथवा नोंदणी प्रमाणपत्र न धेता व्यवसाय करणे कायद्याचे कलम 63 अन्वये दंडनीय गुन्हा आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज रोजी 2350 परवाना व 13035 नोंदणी प्रमाणपत्र, असे  एकूण 15385 सक्रिय परवाना व नोंदणीधारक अन्न व्यावसायिक आहेत. Food Safety Act 2006 compliance

               परवाना किंवा नोंदणी  प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी foscos.fssai.gov.in  या संकेत स्थळावर ऑनलाईन पध्दतीने आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करणे आवश्यक आहे. तरी सर्व अन्न व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायासाठी त्वरित ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करून परवाना अथवा नोंदणी प्रमाणपत्र करून  घ्यावे.  परवाना व नोंदणी प्रमाणपत्राची मुदत संपली असल्यास नूतनीकरण करण्यात यावे. सक्रिय परवाना अथवा नोंदणी प्रमाणपत्र न घेता व्यवसाय करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधित व्यक्तिविरुध्द अन्न सुरक्षा व मानदे कायदा  अंतर्गत कारवाई करण्यात येईल, याची सर्व अन्न व्यावसायिकांनी नोंद घ्यावी, असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त प्र.अ.उमप यांनी कळविले आहे.

  • Chandrapur property tax updates । चंद्रपूर मनपाची कारवाई, कर चुकवेगिरी १० गाळे सील

    Chandrapur property tax updates

    Chandrapur property tax updates : 9 लक्ष 78 हजार रुपयांची थकबाकी असणाऱ्या झोन क्रमांक 2 मधील नेहरू मार्केट येथील टिळक मैदान येथील 10 ओटे-गाळ्यांना मनपा कर वसुली पथकाने टाळे ठोकले आहे. मनपा कर विभागाद्वारे वारंवार सूचना देऊन, यापुर्वी तीनदा थकबाकीची नोटीस दिल्यानंतरही सदर मालमत्ता धारकांनी कराचा भरणा न केल्याने सदर कारवाई करण्यात आली आहे.

    खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर


        टिळक मैदान येथे गाळे असणाऱ्या विठाबाई निंबाळकर यांच्याकडे 62,922,देविदास राहुलकर यांच्याकडे 1,10,809,मंगला राऊत यांच्याकडे 63790,इंदिराबाई बनकर यांच्याकडे 67,790,किशोर येरणे यांच्याकडे 40,294,सईबाई निंबाळकर यांच्याकडे 1,37,293,अंजनाबाई खरतड यांच्याकडे 63,188,दिनेश पायधन यांच्याकडे 2,23,525,विजय आमटे यांच्याकडे 97,552 तर चंद्रभागा मंगरूळकर यांच्याकडे1,11,051 रुपयांची थकबाकी आहे.यापुर्वी तीनदा थकबाकीची नोटीस या सर्वांना बजाविण्यात आली होती. मात्र करचुकवेगिरी करत असल्याने मनपा कर विभागाने गाळे सील केले आहेत.  Property tax defaulters


        चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून कर वसुलीसाठी झोननिहाय विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी मनपा अधिकारी कर्मचारी यांची पथके सुटीच्या दिवशीही कार्यरत आहेत. थकीत कराचा भरणा न करणाऱ्या मालमत्ता धारकांच्या मालमत्तेला सिल लावण्याची कारवाई मोठ्या प्रमाणात सुरु आहे. काही मालमत्ता धारक हे धनादेशाद्वारे कराचा भरणा करतात, अधिकतम धनादेश हे वटले जातात, मात्र जे धनादेश वटले जाणार नाही त्यांच्यावर फौजदारी कारवाई मनपातर्फे करण्यात येत आहे. Municipal tax recovery news

       
         सदर कारवाई मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील,उपायुक्त मंगेश खवले यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी ,कर विभाग प्रमुख अनिल घुले, श्रीकांत होकाम,मनोज सोनकुसरे,अनिल नन्हेट,प्रल्हाद भावरकर,नीरज कमटलवार,गोपाळ वाळके व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी यांनी केली.

  • House fire incident | गंजवार्डातील घराला आग

    House fire incident

    House fire incident : गुरुवारी सकाळच्या सुमारास गंज वॉर्डात घर जळाल्याची घटना घडली. दरम्यान, आमदार किशोर जोरगेवार यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन घराची पाहणी केली.

    पुरूषोत्तम गोवर्धन यांचे हे घर असून, घटनेच्या वेळी घरात कोणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. आमदार किशोर जोरगेवार यांनी पीडित कुटुंबाला आर्थिक मदत दिली असून, तात्काळ पंचनामा करून शासकीय मदत देण्याच्या सूचना तहसील विभागाला दिल्या. (Ganj Ward fire news)

    चंद्रपुरात भरदिवसा युवकाची धारदार शस्त्राने हत्या

    पुरूषोत्तम गोवर्धन हे सकाळच्या सुमारास भाजीपाला विकण्यासाठी बाजारात गेले होते. दरम्यान, त्यांच्या घरातून आगीचा धूर निघत असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्वरित ही माहिती पुरूषोत्तम गोवर्धन यांना दिली. स्थानिक नागरिकांनी बोरवेलच्या पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते. या घटनेत गोवर्धन कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

    घटनेची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी गोवर्धन कुटुंबीयांची भेट घेऊन घराची पाहणी केली. तसेच, तहसीलदारांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्वरित पंचनामा करून आर्थिक मदत देण्याच्या सूचना दिल्या. आग कशाने लागली याचे कारण अद्याप कळलेले नाही.  

     

  • Chhatrapati Shivaji Maharaj statue | चंद्रपुरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा लवकरचं…

    Chhatrapati Shivaji Maharaj statue

    Chhatrapati Shivaji Maharaj statue : चंद्रपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्याची चंद्रपूरकरांची भावना आहे. या स्मारकाच्या उभारणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जागा निश्चित करण्यात आली आहे. मात्र, या कामाच्या प्रक्रियेत विलंब होत असल्याने आता या कामाला गती देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून आवश्यक परवानग्या तातडीने घ्याव्यात, असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी महानगरपालिका आयुक्तांना दिले आहेत.

    बर्ड फ्लू च्या पार्श्वभूमीवर चिकन खाऊ शकता काय?

    चंद्रपूर शहर महानगरपालिकेत विविध विकासकामांवर चर्चा करण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत नेताजी सुभाषचंद्र बोस आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकांसंदर्भातील अडचणींवर सविस्तर चर्चा झाली. शिवरायांच्या स्मारकाच्या उभारणीस कोणताही अडथळा येऊ नये आणि ही प्रक्रिया अधिक वेगाने पूर्ण व्हावी, यासाठी प्रशासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अशी स्पष्ट सूचना आमदार जोरगेवार यांनी केली. या बैठकीला मनपा आयुक्त विपिन पालिवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले, शहर अभियंता विजय बोरिकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी आणि माजी नगरसेवक उपस्थित होते. Chandrapur city development

    चंद्रपुरात शिकाऱ्याची कॉलिंग

    आमदार जोरगेवार यांनी यावेळी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्रापुरते सीमित नसून संपूर्ण देशासाठी प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांचे अश्वारूढ स्मारक चंद्रपूरच्या मध्यवर्ती ठिकाणी उभा राहिल्यास तो येथील नागरिकांसाठी अभिमानास्पद ठरेल. त्याचबरोबर, नव्या पिढीला शिवरायांच्या कर्तृत्वाची प्रेरणा मिळेल. शिवप्रेमी आणि शहरातील नागरिकांनी या स्मारकासाठी मोठा पाठिंबा दिला असून, लवकरच हे काम पूर्ण व्हावे, अशी त्यांची अपेक्षा आहे. पुतळ्याच्या उभारणीसाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वय साधावा, सर्व प्रकारच्या परवानग्या आणि तांत्रिक बाबी तातडीने मार्गी लावाव्यात, अशी सूचना आमदार जोरगेवार यांनी या बैठकीत दिल्या आहेत. Chandrapur equestrian statue

    चंद्रपूर महानगरपालिकेने या कामाची प्राथमिक पातळीवरील कार्यवाही सुरू केली असून, लवकरच सर्व प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष उभारणीच्या कामाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने आणि नागरिकांच्या सहकार्याने लवकरच हा पुतळा उभारला जाईल, असा विश्वास शिवप्रेमींनी व्यक्त केला आहे.

     

    बंगाली कॅम्प येथे होणार नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे स्मारक

    चंद्रपूरात बंगाली समाज बांधव मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. त्यामुळे बंगाली कॅम्प येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे स्मारक तयार करण्यात येणार आहे. हे काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहेत. या संदर्भातील सर्व परवानग्या घेण्यात आल्या असून उर्वरित असलेल्या वाहतूक विभागाच्या परवानग्या तात्काळ घ्याव्यात, असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिले आहेत.

  • Summer water shortage solutions | उन्हाळ्यात पाणीटंचाई टाळण्यासाठी आमदार जोरगेवार यांच्या महत्त्वपूर्ण सूचना

    Summer water shortage solutions

    Summer water shortage solutions : उन्हाळा जवळ येत असताना शहरात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या. नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागू नये, यासाठी तातडीने नियोजन करून तात्पुरत्या पाण्याच्या टाक्यांमध्ये वाढ करावी, तसेच शहरातील गळती असलेल्या पाईपलाइन आणि टाक्यांच्या दुरुस्तीची कामे (Leaking pipeline repair) त्वरित पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले आहे.

    चंद्रपुरात रस्ते खोदकामामुळे नागरिकांचे चेहरे लाल

    मनपात झालेल्या बैठकीत पाणीपुरवठा व्यवस्थेचा आढावा घेताना आ. जोरगेवार यांनी नवीन टँकर (Municipal water tanker funding) खरेदीसाठी ५० लाख रुपयांच्या निधीची घोषणा केली. उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर गरज पडल्यास आणखी निधी मंजूर केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी शहरातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला मनपा आयुक्त विपिन पालिवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले, शहर अभियंता विजय बोरिकर यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी आणि माजी नगरसेवक उपस्थित होते.

    यावेळी आ. जोरगेवार म्हणाले की,  प्रशासनाने पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कोणतीही कमी ठेवू नये, उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या टाळण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी एकत्र येऊन जबाबदारीने वागावे, असेही ते म्हणाले. रमाई योजना, प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना या सर्व घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. स्वच्छतेबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढत असल्याने पुन्हा एकदा शहर स्वच्छ करण्याची मोहिम हाती घेण्याचे निर्देशही आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले.

    रात्रीचा प्रवास,वाहन चालकाला आली डुलकी, चंद्रपुरात भयावह अपघात, चालक जिवंत जळाला

    शहरात सांडपाणी वाहिन्यांसाठी पुन्हा रस्ते खोदले जात आहेत. त्यामुळे काम पूर्ण होताच खोदलेल्या रस्त्यांची त्वरित डागडुजी करण्यात यावी. कचरा संकलनाच्या बाबतीत नव्याने धोरण तयार करून दररोज कचरा उचलण्याचे नियोजन करण्यात यावे. बाबूपेठ येथे कबड्डी मैदान तयार करण्याची सूचनाही आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिल्या आहे.

     

    महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह  तयार करा

    शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी महिलांसाठी विशेष स्वच्छतागृह (Women’s public restroom facilities) तयार करण्यात यावीत, यासाठी लागणारा निधी आपण उपलब्ध करून देऊ, असेही या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी स्पष्ट केले.