Category: चंद्रपूर शहर

चंद्रपूर शहर (Chandrapur City) आणि आसपासच्या परिसरातील प्रत्येक लहान-मोठी बातमी वाचा news34.in वर. महानगरपालिका, स्थानिक राजकारण, गुन्हेगारी, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचे त्वरित आणि अचूक कव्हरेज येथे उपलब्ध आहे. तुमच्या चंद्रपूर शहर परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या विषयावर सविस्तर माहिती आणि सत्य घटनांचे अपडेट्स मिळवा. स्थानिक नागरिकांसाठी हे सर्वात विश्वसनीय स्रोत आहे.

  • Shehnaz Akhtar live in Chandrapur । भक्ती आणि सूरांचे संगम: महाकाली यात्रेत शहनाज अख्तर यांच्या आवाजाची जादू!

    Shehnaz Akhtar live in Chandrapur

    महाकाली यात्रेतील भव्य भक्ती संगीत संध्या

    Shehnaz Akhtar live in Chandrapur : आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर विधानसभा तथा श्री माता महाकाली महोत्सव ट्रस्टच्या वतीने महाकाली मंदिर यात्रा परिसरात आयोजित करण्यात आलेला सुप्रसिद्ध गायिका शहनाज अख्तर यांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला चंद्रपूरकर भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून भक्तीरसात न्हाल्याचा अनुभव घेतला. Shehnaz Akhtar Bhajans

    चंद्रपुरात जय भीम यात्रा

      या कार्यक्रमास आमदार किशोर जोरगेवार, सत्कारमूर्ती जिल्हाधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, उपविभागीय अधिकारी संजय पवार, महानगरपालिकेचे आयुक्त विपिन पालीवाल, तहसीलदार विजय पवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खेवले, शहर अभियंता विजय बोरीकर, सिटी पोलीस स्टेशनच्या निरीक्षक प्रभावती एकुरके, रामनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक आसिफ रजा, वाहतूक पोलीस निरीक्षक प्रविण पाटील, वेकोलीचे क्षेत्रीय महाप्रबंधक, 

    विद्युत वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता व सहाय्यक अभियंता, एस.टी. महामंडळाच्या विभाग नियंत्रक स्मिता सुतावणे, महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता रविंद्र हजारे, प्रभारी उप-अभियंता आशीष भारती, शहर स्वच्छता निरीक्षक डॉ. अमोल शेळके, नगर रचनाकार राहुल भोयर, सहाय्यक नगर रचनाकार प्रतीक देवतळे, सुरक्षा अधिकारी राहुल पंचबुद्धे, सहाय्यक अभियंता शुभांगी सूर्यवंशी, नगर सचिव नरेंद्र बोबाटे, यांत्रिकी विभाग प्रमुख रविंद्र कळंबे, पाणीपुरवठा विभागाचे सहाय्यक अभियंता सोनुजी थुल, विद्युत विभागाच्या उपअभियंता प्रगती भुरे, सिस्टम मॅनेजर अमोल भुते, भांडारपाल सिद्दीकी शेख, झोन क्र. ३ चे सहाय्यक आयुक्त संतोष गर्गेलवार, आणि झोन क्र. १ चे सहाय्यक आयुक्त अक्षय गडलिंग, अतिक्रमण विभागाचे मनिष शुक्ला यांची उपस्थिती होती. यात्रेत उत्तम व्यवस्था केल्याबद्दल या सर्व अधिकाऱ्यांचा आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

    shehnaz akhtar bhajans

    यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले की, सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे समाजात आध्यात्मिक सकारात्मकता निर्माण होते. अशा उपक्रमांद्वारे चंद्रपूरमध्ये भक्ती आणि संस्कृती यांचे संतुलन राखले जात आहे. यंदा यात्रा परिसरात प्रशासनाच्या सहकार्याने आपण उत्तम व्यवस्था उभी करू शकलो. यात्रा परिसराचा विस्तार केल्यामुळे भाविकांना राहण्याची सोय झाली. पिण्याच्या पाण्याची, पूजा साहित्य खरेदीची, आंघोळीची, चेंजिंग रूमची व्यवस्था उत्तम प्रकारे करण्यात आली. यात्रेकरूंच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. Bhajan Sandhya Event

    या वर्षीच्या यात्रेचे आयोजन विशेष ठरले. प्रशासनाच्या सक्रिय सहकार्यामुळे यात्रा परिसरात पूजा साहित्य विक्रीसाठी दुकाने, अन्नदान वितरण व्यवस्था, आणि भाविकांसाठी मार्गदर्शक स्वयंसेवक यामुळे संपूर्ण यात्रा शिस्तबद्ध आणि सुसंगठित झाली. ही सर्व व्यवस्था करताना जनतेच्या गरजा केंद्रस्थानी ठेवण्यात आल्या. त्यामुळे भाविकांचा चेहरा आनंदी आणि समाधानी दिसत होता, हीच आपल्या प्रयत्नांची खरी पावती असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले. Bhakti Geet Program

    शहनाज अख्तर यांच्या सुमधुर आवाजात सादर झालेल्या संतवाणी, भक्तिगीते आणि भावगीतांनी संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी अल्पावधीत सदर व्यवस्था उभारण्यात आल्याचे सांगितले. पुढील वर्षी यापेक्षाही अधिक चांगली व्यवस्था करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.

    या कार्यक्रमाला मनीष महाराज, भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष दशरथसिंग ठाकूर, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, रघुवीर आहिर, प्रकाश देवतळे, तुषार सोम, मनोज पाल, श्री माता महाकाली महोत्सवचे सचिव अजय जयस्वाल, कोषाध्यक्ष पवन सराफ, माजी नगरसेविका छबू वैरागडे, पुष्पा उराडे, वंदना तिखे, माजी नगरसेवक बलराम डोडाणी, मोनू चौधरी, प्रदीप किरमे, राजेंद्र अडपेवार, पुरुषोत्तम राऊत, कल्पना बबूलकर, श्री माता महाकाली महोत्सव समितीचे विश्वस्त वंदना हातगावर, सविता दंढारे, श्याम धोपटे, चंदू वासाडे, अजय वैरागडे, संजय बुरघाटे, रूपेश भुते, रंजन ठाकूर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रज्ञा जीवनकर यांनी केले.

    शहनाज अख्तर Live – भावगीते आणि संतवाणींचा संगम

  • Kshatriya Mali Samaj । महात्मा फुले जयंतीची सामाजिक भेट : क्षत्रिय माळी समाज भवन नूतनीकरणासाठी ४० लाखांचा आमदार निधी

    Kshatriya Mali Samaj

    ४० लाखांचा आमदार निधी – सामाजिक बांधिलकीचा नमुना

    Kshatriya Mali Samaj : महात्मा फुले हे केवळ नाव नाही, तर सामाजिक परिवर्तनाची एक अखंड ज्वाळा आहेत. त्यांनी शिक्षण, समता आणि सामाजिक न्याय या तत्त्वांना समाजाच्या केंद्रस्थानी आणले. आज ४० लाख रुपये आमदार निधीतून क्षत्रिय माळी समाज भवनाच्या नूतनीकरणाचे भूमिपूजन होत आहे. ही जागा समाजाच्या भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शन करणारी ठरेल, नव्या विचारांचे केंद्र बनेल, आणि सामाजिक ऐक्य वाढवणारी भूमी ठरेल. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त ही समाजाला विकासाची भेट असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार (mla kishor jorgewar) यांनी केले.

    हंसराज अहिर यांनी वेकोलि प्रशासनाला धरले धारेवर

    आमदार किशोर जोरगेवार यांनी उपलब्ध करून दिलेल्या ४० लाख रुपयांच्या स्थानिक आमदार निधीतून क्षत्रिय माळी समाज भवनाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. आज गुरुवारी  या कामाचे भूमिपूजन आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला माजी नगरसेवक नंदू नागरकर, क्षत्रिय माळी सेवा मंडळाचे अध्यक्ष राजू बनकर, भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, अमोल शेंडे, क्षत्रिय माळी सेवा मंडळाचे उपाध्यक्ष धनंजय वासेकर, सागर वासेकर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. Community hall renovation ideas

    यावेळी पुढे बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की, चंद्रपूर मतदारसंघाच्या विकासासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत. शहराचा शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या विकास करण्यावर आमचा भर आहे. हे विकासकार्य सुरू असताना प्रत्येक समाजाला सक्षम करण्याचे कामही आमच्या वतीने केले जात आहे. समाज बांधवांकडे स्वतःच्या हक्काचे भवन असावे यासाठी शहरी भागासह ग्रामीण भागातही समाज भवन निर्मितीवर भर दिला आहे. आता क्षत्रिय माळी समाज भवनाचे नूतनीकरण करण्यासाठी निधी देता आला याचा आनंद आहे.

    महात्मा फुले हे सामाजिक क्रांतीचे अग्रदूत होते. शोषित, वंचित आणि मागासलेल्या घटकांसाठी त्यांनी शिक्षणाचे दरवाजे खुले केले. आमदार निधी अंतर्गत ४० लाख रुपयांची तरतूद करून क्षत्रिय माळी समाज भवनाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. समाजासाठी ही जागा एक महत्त्वाची सांस्कृतिक आणि सामाजिक ओळख आहे. येथून अनेक उपक्रम, एकत्र येणं, आणि भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शन होणार आहे. या माध्यमातून प्रत्येक समाजघटकाला न्याय मिळावा, संधी मिळावी, आणि त्या संधींच्या माध्यमातून विकासाची वाट मोकळी व्हावी. असेही आमदार जोरगेवार यांनी यावेळी बोलताना सांगितले.

    यावेळी माळी समाज युवा मंचाचे अध्यक्ष सागर वानखेडे, सचिन निंबाळकर, अभिजीत मारोतकर, कार्तिक वानखेडे, भालचंद्र दानव, शैलेश इंगोले, आशुतोष वानखेडे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • loktantra senani pension । माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार – सेनानींच्या हक्कासाठी नवे पर्व सुरू

    loktantra senani pension

    लोकशाही सेनानींच्या हक्कांसाठी विधानसभेत बुलंद आवाज

    राज्याचे माजी मंत्री आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे लोकतंत्र सेनानी संघाकडून विशेष आभार

    loktantra senani pension : चंद्रपूर – आणीबाणीच्या काळात कुटुंबाचा आणि स्वतःचा जराही विचार न करता केवळ “राष्ट्र सर्वोपरी” म्हणून देशासाठी कारावास भोगून संघर्ष करणाऱ्या लोकतंत्र सेनानींचा आवाज विधानसभेत बुलंद केल्याबद्दल लोकतंत्र सेनानी संघाने राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत. sudhir mungantiwar news

    दारू दुकान वाटपात मोठा भ्रष्टाचार

    लोकतंत्र सेनानींना मानधन मिळण्यात व इतर प्रशासकीय बाबींमध्ये येत असलेल्या अडचणींचे निवेदन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संघटनेच्या शिष्टमंडळाने आ. श्री. मुनगंटीवार यांची अलीकडेच प्रत्यक्ष भेट घेतली. लोकतंत्र सेनानी संघाचे (जालना, परतूर) कार्याध्यक्ष रघुनाथ दीक्षित, महासचिव विश्वास कुलकर्णी (जळगाव), प्रदीप ओगले (सांगली),  अरुण भिसे (यवतमाळ), पांडुरंग जिंजुर्डे (यवतमाळ) आणि यादवराव गहूकार (यवतमाळ) यांनी आ. श्री. मुनगंटीवार यांची भेट घेतली.

    लोकतंत्र सेनानींच्या सन्मान निधित भरीव वाढ करण्याची मागणी आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली होती. आ. श्री. मुनगंटीवार यांनी निवेदनामध्ये राजस्थान सरकारच्या निर्णयाचा दाखला दिला आहे. आणीबाणीमुळे देशाच्या लोकशाहीचे महत्त्व लक्षात घेऊन लोकतंत्र सेनानी म्हणून ज्यांनी  करावास भोगला, त्या सर्व लोकतंत्र सेनानींचा सन्मान करणे ही शासनाची जबाबदारी आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

    राजस्थान सरकारने लोकतंत्र सेनानी सन्मान म्हणून पेन्शन राशी 20 हजार रुपये केली आहे. तसेच आरोग्य चिकित्सा सहाय्य म्हणून 4 हजार रुपयांची राशी दर महिन्याला तेथे दिली जाते. महाराष्ट्रात सध्यस्थितीत 4 हजार 103 स्वातंत्र्य सेनानी सन्मान निधीस पात्र आहेत. राजस्थान सरकारची अधिसूचना लक्षात घेऊन महाराष्ट्रात देखील हा सन्मान निधी वाढविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती आ. श्री. मुनगंटीवार यांनी केली आहे.

    विधानसभेतील चर्चेत विविध मतदारसंघांच्या आमदारांनी सहभागी होणे तसेच हा मुद्दा सरकारच्या लक्षात आणून देणे, हे केवळ आ. श्री. मुनगंटीवार यांच्यामुळे शक्य झाले आहे. तसेच आ. श्री. मुनगंटीवार यांनी दिलेल्या निवेदनावर देखील कार्यवाही करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. आणीबाणीमध्ये लोकशाहीच्या रक्षणासाठी समर्पितपणे लढणाऱ्या सेनानींसाठी आ. श्री. मुनगंटीवार यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत, या शब्दांत लोकतंत्र सेनानी संघाने आभार व्यक्त केले आहेत.

    ताम्रपत्रासाठी प्रयत्न करण्याचा शब्द
    सर्व सेनानींना सरकारतर्फे ताम्रपत्र देण्याची विनंती संघटनेतर्फे करण्यात आली. यावर सरकारदरबारी नक्की प्रयत्न करणार, असा शब्द आ. श्री. मुनगंटीवार यांनी दिला. यासोबतच सेनानींच्या निधनानंतर त्यांच्या वारसदारांना मिळणारे मानधन बंद झाल्याचा मुद्दाही आ. श्री. मुनगंटीवार यांनी नोंदवून घेतला. त्यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. tamrapatra for freedom fighters

  • youth joining congress party । “शंतनू धोटेंच्या नेतृत्वावर विश्वास; चंद्रपूरातील कर्तृत्ववान युवकांचा युवक काँग्रेसमध्ये प्रवेश!”

    youth joining congress party

    “राजकीय अस्थैर्य, बेरोजगारी आणि वाढत्या जातीय तणावाच्या पार्श्वभूमीवर युवकांनी निवडली युवक काँग्रेसची वाट”

    youth joining congress party : चंद्रपूर :– चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू अजय धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत चंद्रपूर जिल्ह्य़ातील विविध गावातील अनेक कर्तृत्ववान युवकांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला.

    चंद्रपूर जिल्ह्यात दारू दुकानाच्या परवाना वाटपात मोठा भ्रष्टाचार

    यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे व युवक कॉंग्रेस चे माजी सचिव राजीव खजांजी यांनी सर्वांना युवक काँग्रेसचे दुपट्टे देऊन सर्वांचे स्वागत केले. तसेच येणाऱ्या काळात विविध पक्षातील अनेक तरुण कार्यकर्ते हे युवक काँग्रेसमध्ये प्रवेश घेऊन काम करण्यास इच्छुक असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी यावेळी चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे माजी सचिव राजीव खाजांजी, यु. काँ. महासचिव हर्षल येलमुले यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. Shantanu Dhote youth congress


    वाढती बेरोजगारी, महागाई तसेच सध्यास्थितीत वाढता जातीयवाद, अराजकता याला कंटाळून युवक काँग्रेसच्या मानवतावादी विचारधारेवर विश्वास व्यक्त करीत चंद्रपूर जिल्हातील विविध गावातील वेदांत प्रदीप देठे, आयुष बंडू सोनटक्के, श्रीनाथ लेटावार, चैतन्य पांडे, अमोल अड्बाले, तेजस देवगडे, नवीन एगुले, समशेर शाह, जय पेटला, शरद येड्लावार, जतीन पळ, क्रिष्णा तवारी, मोहम्मद अल्तमास शाह, पियुष गुडे, भारत कांबटकर, युगल मडावी, सिद्धार्थ कोंडागुरला यासह अनेक युवकांनी युवक काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला.

  • illegal liquor license Maharashtra । “दारू दुकानांच्या नावाखाली भ्रष्टाचार! आम आदमी पार्टीची SIT कडे कारवाईची मागणी”

    illegal liquor license Maharashtra

    illegal liquor license Maharashtra : चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी उठवल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाच्या तत्कालीन अधीक्षक संजय पाटील यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य देशी दारू व बिअर विक्री परवाने वितरित करण्यात आले. या परवान्यांचे वाटप करताना नियमानुसार आवश्यक असलेली कागदपत्रे, जागेची वैधता, पार्किंग व्यवस्था, धार्मिक स्थळांपासूनचे अंतर आदी बाबींकडे दुर्लक्ष करून केवळ आर्थिक व्यवहारांवर आधारित परवाने मंजूर करण्यात आले. illegal alcohol permits in Chandrapur

    भद्रावती तालुक्यात वाळू तस्करीला अभय

    बाबुपेठ परिसरात अशाच प्रकारे चार नवीन परवाने नियमबाह्य पद्धतीने देण्यात आले आहेत. अनेक बार चालकांकडे वाहन पार्कींगची कोणतीही व्यवस्था नसतानाही खोटे कागद तयार करून परवाने मिळविण्यात आले आहेत. काही मध्यविक्री दुकाने धार्मिक स्थळांच्या अगदी जवळ असूनही त्यांना नियम झुगारून परवाने देण्यात आले. ही गंभीर बाब असून त्यास जबाबदार असलेल्या तत्कालीन अधीक्षक संजय पाटील यांच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे.

    राज्य शासनाने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) याची गंभीर दखल घेऊन अशा सर्व नियमबाह्य परवाने रद्द करावेत, आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी आम आदमी पार्टीची जोरदार मागणी आहे.

    यावेळी आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, जिल्हा सचिव प्रशांत सिदूरकर, शहर संघटनमंत्री संतोष बोपचे, महिला शहराध्यक्षा ऍड. तब्बसूम शेख आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

  • Chandrapur Mahakali Temple flag hoisting । “५१ फूट ध्वज, चांदीची मूर्ती आणि भक्तांची गर्दी – चंद्रपूरात चैत्र पौर्णिमेची भक्तिमय झळाळी!”

    Chandrapur Mahakali Temple flag hoisting

    Chandrapur Mahakali Temple flag hoisting : आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून चैत्र पौर्णिमेनिमित्त भारतीय जनता पार्टी चंद्रपूर विधानसभा व श्री महाकाली माता महोत्सव ट्रस्ट यांच्या वतीने सकाळी ८ वाजता श्री महाकाली मंदिर परिसरात १०१ माता भक्तांच्या हस्ते ५१ फूट उंच ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माता महाकालीची चांदीची मूर्ती, रथ आणि पालखीचे विधीवत पूजन करण्यात आले. Kishor Jorgewar Mahakali Temple event

    भाजप स्थापना दिवस, चंद्रपुरात आमदारांचे वेगवेगळे कार्यक्रम

    या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार, मनिष महाराज, सुनील महाकाले, श्री महाकाली माता ट्रस्टचे सचिव अजय जयस्वाल, विश्वस्त श्याम धोपटे, मिलिंद गंपावार, राजू शास्त्रकार, तुषार सोम, भाजपच्या माजी नगरसेविका छबू वैरागडे, कल्पना बबुलकर, प्रदीप किरमे, वंदना हातगावकर, संजय बुराघाटे, अरुण तिखे, राजेंद्र खांडेकर, अनिल तहलानी, जितेश कुळमेथे, निलीमा वनकर, कल्पना शिंदे, दुर्गा वैरागडे, रुपा परसराम, वंदना हजारे, अनिता झाडे, चंपा विश्वास, दीक्षा सातपुते, चंदा ईटनकर, अस्मिता डोणारकर, आशा देशमुख, नितीन शाहा, कालिदास धामणगे, करणसिंग बैस, प्रविण गिलबीले, मुन्ना जोगी, संजय महाकालीवार, सुमित बेले, कैलास धायगुने, चंद्रकांत बातव, प्रशांत दिवेदी आदींची उपस्थिती होती. Mahakali Mata festival Chandrapur

    यावेळी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. उत्सवाला चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील महिला, पुरुष, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. महाकाली माता ही शक्ती, श्रद्धा आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. चैत्र पौर्णिमेनिमित्त आपण येथे एकत्र आलो आहोत, हे केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक एकतेचे प्रतीक आहे.

    kishor jorgewar mahakali temple event

    ५१ फूट उंच ध्वज हा आपल्या भक्तीची आणि परंपरेची साक्ष आहे. हजारो भक्तांनी दिलेला भावपूर्ण सहभाग, चंद्रपूरची सांस्कृतिक श्रीमंती दर्शविणारा आहे. दरवर्षी नवरात्रात आपण महाकाली महोत्सव साजरा करतो. यावेळी रथातून मातेची भव्य पालखी  मिरवणूक निघते. चैत्र यात्रेत येणाऱ्या भाविकांना दर्शन घेता यावे, यासाठी रथ आणि पालखीची विधीवत पूजा करून ती दर्शनासाठी ठेवण्यात आल्याचे आमदार किशोर जोरगेवार (mla kishor jorgewar) यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाला मातेच्या भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • MNS demands Marathi in banks । मराठीचा अपमान खपवून घेतला जाणार नाही – मनोज तांबेकर यांचा इशारा

    MNS demands Marathi in banks

    चंद्रपूरातील सर्व बँकांना मराठीसाठी निवेदन – मनसेचा निर्णायक इशारा

    MNS demands Marathi in banks : चंद्रपूर | चंद्रपूर शहरातील सर्व बँकांमध्ये मराठी भाषा वापरणे सक्तीचे करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) दिला आहे. मनसेच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने शहरातील विविध बँकांना मराठी भाषेच्या वापराबाबत निवेदन सादर केले. Marathi language usage in banks

    चंद्रपुरात ७० रुपयांच्या पेट्रोल वरून वाद

    या निवेदनात नमूद करण्यात आले की, महाराष्ट्रात राहून मराठी भाषा न बोलणं ही मराठी जनतेचा आणि भाषेचा थेट अपमान आहे. अनेक बँकांमध्ये आजही परप्रांतीय कर्मचारी कार्यरत असून, त्यांना मराठी येऊनही ते मुद्दामहून मराठी भाषा टाळतात. याचा फटका मुख्यतः सर्वसामान्य ग्राहकांना – विशेषतः मजूर आणि ग्रामीण भागातून आलेल्या लोकांना – बसतो. अशा ग्राहकांना हिंदी येत नसल्याने त्यांना बँकिंग व्यवहार करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. काही वेळा तर बँकेचे कर्मचारी उद्धटपणे “मुझे मराठी आती नही, तुमको हिंदी आती है तो बात करो” अशा स्वरूपाचे अपमानास्पद वक्तव्य करतात.

    मनसेच्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या प्रत्येक बँक कर्मचाऱ्याला मराठी भाषा अवगत असणे आवश्यक आहे. ज्या कर्मचाऱ्यांना मराठी येत नाही त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी स्पष्ट मागणीही मनसेने केली आहे. मराठी भाषेचा अवमान महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधीच सहन करणार नाही, असा ठाम इशाराही यावेळी देण्यात आला. Manoj Tambekar bank language protest

    निवेदन देताना मनसेचे रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर यांच्यासह जिल्हा सचिव किशोर मडगुलवार, राज वर्मा, संदीप पटेल, महिला आघाडीच्या वर्षा ताई भोमले, मंदा ताई कहाडे, शिवराज चौहान आणि इतर मनसैनिक उपस्थित होते.

    मनसेने स्पष्टपणे सांगितले आहे की, जर बँकांनी मराठी भाषेचा वापर वाढवला नाही, तर लवकरच तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल.

  • WCBTRL road project delay | चंद्रपूरमध्ये रखडलेल्या प्रकल्पाविरोधात ‘आप’चा हल्लाबोल!

    WCBTRL road project delay

    WCBTRL road project delay : चंद्रपूर शहरातील बल्लारशाह बायपास महामार्गावरील अष्टभूजा ते बाबूपेठ दरम्यानच्या रेल्वे ओव्हर ब्रिजचे काम गेली ८ ते १० वर्षांपासून रखडलेले आहे. या मार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे अनेक निरपराध नागरिकांचे प्राण गेले आहेत. या गंभीर विषयाकडे वारंवार दुर्लक्ष केल्या जात असल्याने आम आदमी पार्टीच्या वतीने युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांच्या नेतृत्वात वेळोवेळी आंदोलने करण्यात आली आहेत.

    70 रूपयांच्या पेट्रोल वरून चंद्रपुरात वाद

    ब्रिजचे काम अद्याप सुरू न झाल्यामुळे आम आदमी पार्टीने WCBTRL व विश्वराज Infrastructure या कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. कंपनीने पूर्वी रेल्वे परवानगीसाठी अर्ज दाखल केल्याचे सांगून एका वर्षाच्या आत काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता दीड वर्ष उलटूनही कोणतीही प्रत्यक्ष कार्यवाही न झाल्यामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. pending bridge construction cases

    उल्लेखनीय बाब म्हणजे विश्वराज कंपनीचे नाव जिल्ह्यातील अनेक वादग्रस्त कामांमध्ये आढळले आहे. विशेष म्हणजे, भारतीय जनता पार्टीला देण्यात आलेल्या ७ कोटी रुपयांच्या इलेक्ट्रॉल बॉण्ड प्रकरणातही या कंपनीचे नाव चर्चेत आले होते. यासंदर्भात आम आदमी पार्टी भविष्यात आणखी खुलासे करणार असल्याची माहिती पक्षातर्फे देण्यात आली आहे. AAP demands legal action on contractor

    या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने कार्यकारी अभियंत्यांना WCBTRL व विश्वराज कंपन्यांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. अन्यथा पक्षाच्या वतीने अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी दिला आहे.

    pending bridge construction cases

    यावेळेस आप नेते सुनील मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, प्रशांत शिदूरकर, महानगर संघटन मंत्री संतोष बोपचे, महानगर महिला अध्यक्ष तब्बसूम शेख, अनुप तेलतूमडे आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


  • petrol pump fraud chandrapur । ’70 रुपयांच्या पेट्रोलवरून वाद!’ चंद्रपुरात पेट्रोल पंपावर ग्राहकांची फसवणूक!

    petrol pump fraud chandrapur

    petrol pump fraud chandrapur : चंद्रपूर: चंद्रपूर शहरातील वासेकर पेट्रोल पंपावर ग्राहकाची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घुटकाला वॉर्डातील भारत मुधोळकर यांनी 70 रुपयांचे पेट्रोल टाकले, मात्र 100 मीटरवरच त्यांची दुचाकी बंद पडली. या घटनेमुळे पंपावर एकच गोंधळ उडाला. 70 rupees petrol

    चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात ९ वा बळी

    मिळालेल्या माहितीनुसार, भारत मुधोळकर हे सकाळी रामनगर येथील सेंट मायकल शाळेत गेले होते. त्यांच्या मोपेडमध्ये (क्रमांक एमएच 34 एजे 7611) पेट्रोल कमी असल्याने त्यांनी शाळेजवळच्या वासेकर पेट्रोल पंपावर 70 रुपयांचे पेट्रोल टाकले. त्यानंतर ते घरी निघाले असता सेंट मायकल शाळेजवळच त्यांची दुचाकी बंद पडली.

    भारतने दुचाकी तपासली असता त्यात पेट्रोलचा एक थेंबही नव्हता. त्यांनी तातडीने पेट्रोल पंपावर जाऊन कर्मचाऱ्यांना जाब विचारला. सुरुवातीला कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर कर्मचाऱ्यांनी 500 रुपयांचे पेट्रोल टाकण्याचे आमिष दाखवले, मात्र भारतने कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा आरोप केला. petrol pump customer rights

    पंपावरील कर्मचाऱ्यांनी पेट्रोल टाकल्याचे सांगितले, मात्र पेट्रोल वाहनात आले की नाही, याबाबत ते मूग गिळून बसले. यापूर्वीही वासेकर पेट्रोल पंपावर असे प्रकार घडल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. पंपावरील इलेक्ट्रॉनिक मशीनमध्येही फेरफार केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी पेट्रोल भरताना सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

  • Janvikas Sena protest Chandrapur । ‘आमच्या शहराचा विनाश थांबवा!’ – चंद्रपूरमध्ये जनविकास सेनेचं आंदोलन पेटलं

    Janvikas Sena protest Chandrapur

    Janvikas Sena protest Chandrapur : चंद्रपूर : ‘मेन रोड तो झाकी है, पुरा शहर खोदना बाकी है’, महानगरपालिकेच्या वतीने असा लक्षवेधी व खोचक नारा देऊन जनविकास सेनेने गांधी चौकातील मनपा इमारती समोर उभ्या असलेल्या आयुक्त विपिन पालीवाल यांच्या चार चाकी वाहनावर खेळण्यातील नकली नोटांची उधळण केली. जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी एका लाल ब्रिफकेस मध्ये आणलेल्या या नकली नोटा जनविकास सेनेच्या कार्यकर्त्यांनी आयुक्ताच्या वाहनावर उधळल्या.

    महाकाली यात्रा – चंद्रपुरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

    केवळ कमिशनच्या हव्यासापोटी व मर्जीतील कंत्राटदाराच्या हितासाठी मनपातर्फे 506 कोटी रुपयांची नविन भुमिगत गटार योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी केवळ मुख्य रस्तेच नाही तर संपूर्ण शहरातील रस्ते पुन्हा एकदा खोदण्यात येतील असा जनविकास सेनेचा दावा आहे. Chandrapur sewage scheme controversy

    pappu deshmukh chandrapur


    नवीन गटार योजनेच्या खोदकामाला तातडीने स्थगिती देण्यात यावी व या योजनेच्या निविदा प्रक्रियेतील 50 कोटी रुपयांच्या गैर-व्यवहाराची चौकशी करण्यात यावी तसेच 15 वर्षांपूर्वी काम झालेल्या 100 कोटी रुपयांच्या जुन्या भूमिगत गटार योजनेचे काय झाले ? याची, 234 कोटी रुपयांची पहिली अमृत पाणीपुरवठा योजना व मनपातील इतर सर्व घोटाळ्यांची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी जनविकास सेनेची मागणी आहे. माजी नगरसेवक देशमुख यांनी मनापातील कोट्यावधी रुपयांच्या अनेक घोटाळ्यांची पुराव्यासह शासन-प्रशासनाकडे तक्रार केली. तक्रारीनंतर शासनाने अनेक निविदा रद्द केल्या परंतु दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही. Pappu Deshmukh Chandrapur


    मुख्यमंत्र्यांना पाठवणार एक लक्ष्य सह्यांचे पत्र

    जनविकास सेनेने आज शहरातील गांधी चौकातून महा-स्वाक्षरी अभियानाची सुरुवात केली. या अभियानाला रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांनी उत्सुर्फ प्रतिसाद दिला.गोल बाजार व मुख्य रस्त्यावरील दुकानातही स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. पहिल्या दिवशी 1000 च्या जवळपास नागरिकांनी या महा-स्वाक्षरी अभियानामध्ये सहभाग घेतला.
    राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शहरातील एक लक्ष नागरिकांच्या सह्यांचे पत्र पाठवण्यात येईल. पुढील काही दिवस संपूर्ण शहरात पदयात्रा व कॉर्नर सभा घेऊन एक लक्ष सह्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येईल अशी माहिती यावेळी देशमुख यांनी दिली. कोणत्याही परिस्थितीत चंद्रपूरकरांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या भ्रष्ट अधिकारी व लोकप्रतिनिधी यांना सोडणार नाही असा इशाराही देशमुख यांनी यावेळी दिला. Chandrapur public protests

    chandrapur sewage scheme controversy


    महा-स्वाक्षरी अभियानासाठी मनिषा बोबडे,अक्षय येरगुडे,निर्मला नगराळे, प्रफुल बैरम,इमदाद शेख, अजित दखने, दिलीप होरे, सुरेश विधाते, किशोर जामदार, अशोक दिघिकर, देवराव बोढे, अजय महाडोळे,कुशाब कायरकर, सुधाकर मत्ते, पुरषोत्तम सोयाम,रविंद्र टोंगे, नितिन बनसोड, मनोज भैसारे,पुष्पा मुळे, माया गेडेकर, किरण कांबळे, रेखा टिपले, माया गोडे, अरुणा महातळे, अरुणा मांदाळे, ललिता उपरे, कुसुम वैद्य, रेखा निकुरे, अजय लांडे, नंदू लभाने, सतिश आकनूरवार, नकुल मुसळे, अमोल पांढरे, अंकित पोईनकर, रोहित उमाटे, सुजल पाटील, संदीप कष्टी, सचिन भिलकर इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.