Category: चंद्रपूर शहर

चंद्रपूर शहर (Chandrapur City) आणि आसपासच्या परिसरातील प्रत्येक लहान-मोठी बातमी वाचा news34.in वर. महानगरपालिका, स्थानिक राजकारण, गुन्हेगारी, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचे त्वरित आणि अचूक कव्हरेज येथे उपलब्ध आहे. तुमच्या चंद्रपूर शहर परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या विषयावर सविस्तर माहिती आणि सत्य घटनांचे अपडेट्स मिळवा. स्थानिक नागरिकांसाठी हे सर्वात विश्वसनीय स्रोत आहे.

  • Sudhir Mungantiwar meeting on sand for housing । चंद्रपुरात घरकुलांना रेती मिळेना, मुनगंटीवार ऍक्शन मोडमध्ये!

    Sudhir Mungantiwar meeting on sand for housing

    Sudhir Mungantiwar meeting on sand for housing : चंद्रपूर, दि. 4: घरकुल योजनेंतर्गत मंजूर लाभार्थ्यांना आवश्यक त्या प्रमाणात आणि वेळेत रेती उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन भवन सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेत महत्वपूर्ण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले.जिल्ह्यातील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना आवश्यक रेती उपलब्ध करून देणे हा महाराष्ट्राचा यक्षप्रश्न असून, त्याच्या सोडवणुकीसाठी प्रभावी नियोजनाची अंमलबजावणी करणे अत्यंत आवश्यक असल्याचे आ. श्री. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. sand availability for gharkul scheme Chandrapur

    चंद्रपुरात बालकामगार प्रकरणाचा पर्दाफाश; व्यवस्थापक आणि HR अडचणीत

    मंजूर घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देण्याबाबत नियोजन भवन सभागृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, उपविभागीय अधिकारी संजय पवार (चंद्रपूर), रवींद्र माने(राजुरा), अजय चरडे(मुल), जिल्हा खनिकर्म अधिकारी, चंद्रपूरचे तहसीलदार विजय पवार, तहसीलदार(मुल) मृदुला मोरे, तहसीलदार( बल्लारपूर) रेणुका कोकाटे, तहसीलदार (पोम्भुर्णा) रेखा वाणी, मनपा अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, मुलचे मुख्याधिकारी संदीप दोडे, बल्लारपूरचे मुख्याधिकारी विशाल वाघ, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप बाराहाते तसेच मतदारसंघातील सर्व तालुका कृषी अधिकारी तसेच गट विकास अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

    sand availability for gharkul scheme Chandrapur
    रेती उपलब्धतेच्या बैठकीत मार्गदर्शन करताना आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार.

    रेती न मिळाल्याने घरकुल धारकात असंतोष

    आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘घरकुलधारकांना वेळेत रेती न मिळाल्याने प्रचंड असंतोष पसरला असून, येत्या आठ दिवसांत रेतीसंबंधी निर्णय घेणे आवश्यक आहे. विशेषतः मुल तालुक्यातील पाच महसूल मंडळांतील रेती घाटांमध्ये सध्या 8 हजार ब्रास रेतीसाठा उपलब्ध आहे, तर एकूण 25 हजार ब्रास रेतीची आवश्यकता आहे. पोंभुर्णा तालुक्यात एकूण 19,600 ब्रास रेतीसाठा असून, बल्लारपूरमध्ये मात्र 18,465 ब्रास मागणी असताना केवळ 260 ब्रास रेती उपलब्ध आहे. जिल्ह्यातील सर्व रेती घाट 10 जूननंतर बंद होणार असल्याने उर्वरित एक महिन्याच्या कालावधीत योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.’ Mungantiwar directives on sand for housing scheme

    रेतीची मागणी तहसीलदार यांच्याकडे नोंदवा

    गट विकास अधिकारी यांनी प्रत्येक मंजूर घरकुलासाठी आवश्यक रेतीची मागणी तहसिलदार यांचे कडे नोंदवावी. तसेच नदी, नाले व घाटांची पाहणी करून शक्य तेवढी रेती तहसिलदार यांनी उपलब्ध करून द्यावी. कोणत्याही गरीब घरकुल लाभार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी, असे निर्देश आ. श्री. मुनगंटीवार यांनी दिले. sand solution for gharkul Yojana Chandrapur

    पुढील टप्प्यात महसूल मंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या समवेत झूम बैठकीचे आयोजन करण्यात येईल. घरकुल लाभार्थ्यांना वेळेत व नियमानुसार रेती मिळावी यासाठी प्रशासनाने समन्वय साधून काम करावे, अशी अपेक्षा यावेळी आ. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

  • BJP supports caste based census । जातिनिहाय जनगणना लोकशाहीस बळकटी देणारी – राहुल पावडे

    BJP supports caste based census

    मोदी सरकारच्या जातिनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे चंद्रपूरमध्ये जल्लोषात स्वागत!

    BJP supports caste based census : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार आता जातिनिहाय जनगणना करणार आहे. याबाबत कॅबिनेट बैठकीत निर्णय घेण्यात आला.या निर्णयामुळे लोकशाही मजबूत होईल.देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर पहिल्यांदाच जातीनिहाय जनगणना होणार आहे.या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो,असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष(श)राहुल।पावडे यांनी केले. Narendra Modi caste census decision 2025

    जातीय जनगणनेच्या निर्णयाचे आमदार जोरगेवार यांनी स्वागत करीत वाटले पेढे


     चंद्रपूर भारतीय जनता पार्टीच्या वतीने शुक्रवारी (दि.2) सायंकाळी गांधी चौक येथे निर्णयाचे स्वागत करून जल्लोष करतांना ते बोलत होते.

    माजी पालकमंत्री व बल्लारपूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार सुधीर  मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात व भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांच्या नेतृत्वा हे आयोजन करण्यात आले. यावेळी फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.मोदी हैं तो मुमकींन हैं अशी घोषणाबाजी करण्यात आली.


     कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी महानगर अध्यक्ष राहुल पावडे, ओबीसी नेते अशोक जीवतोडे, सुरज पेदुलवार,भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा अध्यक्ष सविता कांबळे,शीला चव्हाण, नम्रता टेमसकर,पुरुषोत्तम सहारे, रवी लोणकर, दिनकर सोमलकर, सचिन कोतपल्लीवार,शिला चव्हाण, चाद सय्यद, रवी सहारे, मनीषा महातव, शाम कनकम, सारिका संदुरकर, मधुकर राऊत, प्रवीण गुरमवार, महेश जीटे, बी बी सिंग,बाळू कोलनकर, कैलास संगेवार, मुन्ना अलटम,दीपक प्रलय सरकार, महेंद्र जुमडे, आकाश मस्के, आकाश ठोसे,  कविता जाधव, राजेंद्र खांडेकर, प्रदीप किरमे, गणेश गेडाम, अनिल सुरपाम, प्रमोद शास्त्रकार, पराग मलोडे, उपस्थित होते.

  • Sudhir Mungantiwar on railway encroachment । चंद्रपूरमधील रेल्वे अतिक्रमणधारकांसाठी 900 नवीन घरे!

    Sudhir Mungantiwar on railway encroachment

    रेल्वे अतिक्रमण प्रकरणी मुनगंटीवारांचा पुढाकार, म्हाडाची घरे लवकरच

    Sudhir Mungantiwar on railway encroachment : चंद्रपूर, दि. 3: चंद्रपूर शहरातील रेल्वे अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनासाठी ठोस उपाययोजना करण्यात येत असून, यासंदर्भात आ.सुधीर मुनगंटीवार यांची केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे महत्त्वपूर्ण चर्चा झाली. शहरातील रेल्वे स्टेशन यार्ड, सावरकर नगर, रयतवारी आणि लखमापूर परिसरातील अतिक्रमणधारकांसाठी पर्यायी घरे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मध्य रेल्वेचे मुख्य महाप्रबंधक धर्म वीर मीना यांनाही पत्र पाठवून चंद्रपूर शहर व परिसरातील रेल्वे अतिक्रमणधारकांना पर्यायी घरे उपलब्ध करून देण्यासंदर्भात मुंबई येथे बैठक घेऊन चर्चा उपस्थित केली होती. railway housing project in Chandrapur

    चंद्रपूर जिल्ह्यात वाघाची दहशत, आतापर्यंत १३ नागरिकांची शिकार

    चंद्रपूर शहरातील रेल्वे अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनासाठी सकारात्मक पावले उचलल्या जात असून अतिक्रमणधारकांना पर्यायी घरे उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही, राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

    नियोजन भवन येथे आढावा

    नियोजन भवन सभागृह येथे रेल्वे अतिक्रमणधारकांना पर्यायी घरे उपलब्ध करून देणे व इतर समस्या संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, उपविभागिय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, रेल्वे विभागाचे सहाय्यक मंडळ अभियंता सुबोध कुमार, कार्यकारी अभियंता नवीन शर्मा, उपकार्यकारी अभियंता योगेंद्र कुमार तसेच नागरिकांची उपस्थिती होती. alternative housing for railway encroachers

    आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर शहरात सध्या तिसरी रेल्वेलाईन टाकण्याचे काम प्रगतीपथावर असून, या प्रकल्पात सुमारे 640 घरे बाधित होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. मात्र, रेल्वे प्रशासनाने कोणतेही काम जबरदस्तीने न करता नागरिकांच्या सहकार्याने पार पाडावे, असे स्पष्ट निर्देश आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी रेल्वे प्रशासनाला दिले. या प्रकल्पादरम्यान बाधित होणाऱ्या 68 घरांचे सर्वेक्षण करून, संबंधित नागरिकांशी बैठक घ्यावी. तसेच रेल्वे विभागाने अतिक्रमण हटविण्यापूर्वी पुनर्वसनाची ठोस व्यवस्था करावी. या पुनर्वसनासाठी म्हाडा येथील उपलब्ध घरांची पाहणी करण्यात येईल. MHADA homes for displaced families Chandrapur

    alternative housing project in chandrapur

    ९०० घरे उपलब्ध होणार

    महानगरपालिकेने रेल्वे लाईनमधून जाणाऱ्या नाल्यांची योग्यरीत्या स्वच्छता करावी. तसेच जिल्हा प्रशासनाने अतिक्रमित घरांची सविस्तर यादी तयार करावी. रेल्वे लाईनसाठी नेमण्यात आलेल्या कंत्राटदाराने सीएसआर (CSR) अंतर्गत स्थानिक विकासासाठी निधी खर्च करावा. दरम्यान, रेल्वे विभागामार्फत येत्या दोन महिन्यांत अतिक्रमित 68 घरे हटविण्यात येणार असून, संबंधित नागरिकांना म्हाडामार्फत 100 घरे तातडीने उपलब्ध करून देण्यात येतील. पुढील दीड वर्षाच्या कालावधीत टप्प्याटप्याने एकूण 900 घरे नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येईल असेही ते म्हणाले.

    या संपूर्ण प्रक्रियेस गती देण्यासाठी लवकरच केंद्रीय रेल्वेमंत्री आणि मा. मुख्यमंत्री यांच्यासोबत झूमद्वारे उच्चस्तरीय बैठक घेण्यात येणार असल्याचेही आमदार श्री.सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

    सर्व नागरिकांना कठीण व मानसिक तणावाच्या परिस्थितीतून बाहेर काढल्याबद्दल नागरिकांनी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे मनःपूर्वक आभार मानले.

  • MSEDCL employee awards । चंद्रपूर व गडचिरोली विभागाचे ३६ कर्मचारी ठरले ‘गौरवशाली कामगार’

    MSEDCL employee awards

    MSEDCL employee awards : चंद्रपूर – महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळातील सर्व कार्यालयात १ मे रोजी गुरुवारला महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महावितरणच्या बाबुपेठ येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात मुख्य अभियंता हरिश गजबे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. तर जागतिक कामगार दिनानिमित्त वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी कारणाऱ्या ३६ उत्कृष्ट तांत्रिक कर्मचाऱ्यांना गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. Chandrapur MSEDCL news

    जंगल जमीन हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय – शेतकऱ्यांना दिलासा मिळणार?


    यावेळी चंद्रपुर मंडळाच्या अधिक्षक अभियंता संध्या चिवंडे, अधिक्षक अभियंता (पायाभुत आराखडा) रमेश सानप, सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) (प्र.) सुशिल विखार, चंद्रपुर विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर दारव्हेकर, बल्लारशा विभागाचे सत्यदेव पेगल्लापट्टी चाचणी विभाग योगेंद्र निचत वरिष्ठ व्यवस्थापक (विवले) राकेश बोरीवार, यांच्यासह अधिकारी, आभियंते व कर्मचारी उपस्थित होते. Best MSEDCL workers in Chandrapur

    सत्कारमूर्ती कर्मचाऱ्यांमध्ये चंद्रपूर मंडळ कार्यालयाचे ३ यंत्रचालक व १५ तांत्रिक कर्मचारी तर गडचिरोली मंडळ कार्यालयातील ३ यंत्रचालक व १५ तांत्रिक कामगारांचा समावेश आहे. यामध्ये कपिल कावळे, संजय तपासे, सुरज पोहिनकर, संदिप नगराळे, विजयकुमार सोंडवले, आकाश देवगडे, मनोज गराडे, महादेव सलाम, रुक्सार अब्दुलरफिक शेख, आशा भगतकर, संजय येरणे, शहिद नौशद मोहम्मद सलिम शेख, निलेश लोदेल्लिवार, गणेश इंदुलवार, जितेंद्र बंसोड, सुधीर चौधरी, दिलीप येरमा, विलास धाकडे, पवन बोरकुटे, आकाश बांबोळे, मोहम्मद निसार शेख, सागर घोरपडे, नितेश श्रीराम, योगेश्वर कोवे, शंकर गेडाम, अमित परचाके, रितेश गाईन, विजय दिवठे, गणेश बुलबुले, विकास घरत, सचिन पेटकर, नितिन कांबळे, नितीन सोनकुसरे, दिनेश मेश्राम, जितेंद्र शहारे यांचा समावेश आहे.

  • Maharashtra day celebration 2025 । महाराष्ट्र दिन 2025: चंद्रपूरमध्ये अभिमानास्पद सोहळा, विकासाचे नवे संकल्प!

    Maharashtra day celebration 2025

    Maharashtra day celebration 2025 : संपूर्ण देशात महाराष्ट्र हे आर्थिक संपन्न आणि प्रगत राष्ट्र म्हणून ओळखले जाते. त्याप्रमाणेच नैसर्गिक वनाच्छादन असलेला चंद्रपूर जिल्हा हा जगप्रसिध्द ताडोबा व्याघ्र प्रकल्प, विविध उद्योग, उर्जानिर्मिती प्रकल्प, सैन्याकरीता लागणारी आयुधी निर्माणी आदीमुळे जागतिक पटलावर ओळखला जातो. जिल्ह्याची ही ओळख कायम राहावी, विकासाच्या मार्गावर जिल्हा अग्रेसर राहावा, यासाठी शासन आणि प्रशासन सैदव प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली. chandrapur

    Guardian minister ashok uike

    दुचाकी विकायला आला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला

    कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती

    महाराष्ट्र दिनानिमित्त पोलिस मुख्यालय येथे ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुधाकर अडबाले, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, आयुक्त विपीन पालीवाल आदी उपस्थित होते.

    हुतात्म्यांना वंदन

    संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना सर्वप्रथम वंदन करून पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, स्वातंत्र्याच्या इतिहासापासून स्वत:ची ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याला ऐतिहासिक गोंडकालीन वंशाचा वारसा लाभला आहे. स्वातंत्र्यानंतर राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारशीनुसार वेगवेगळ्या घटक राज्यांच्या निर्मितीच्या प्रक्रियेने वेग घेतला. याच अनुषंगाने 1 मे 1960 या दिवशी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. यासाठी मोठा लढा उभा करावा लागला. हुतात्म्यांच्या बलिदानातून साकारलेल्या महाराष्ट्र राज्याने सुरवातीपासूनच सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक व इतर क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे.

    Chandrapur news
    ७ कलमी कृती कार्यक्रमात चंद्रपूर जिल्हा उत्कृष्ट

    सहा महिन्यांपूर्वी राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भरभक्कम सरकार सत्तेत आले आहे. शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित, वंचित यांच्यासह दुर्बल घटकाला विकासाचा केंद्रबिंदू मानून राज्य सरकार काम करीत आहे. तसेच पहिल्या 100 दिवसात सात कलमी कृती कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या दृष्टीने देखील पाऊले टाकली आहेत. वैशिष्ट म्हणजे चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने सात कलमी कृती कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

    ‘सर्वांसाठी घरे’ अंतर्गत चंद्रपूर जिल्हा परिषदमार्फत एकाच वेळी जवळपास 35 हजाराच्यावर लाभार्थ्यांच्या घरकुलाचे भुमिपूजन करण्यात आले आहे. औद्योगिक गुंतवणूकीस प्रोत्साहन अंतर्गत जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या औद्योगिक परिषदेत 12 कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले असून 17 हजार 431 कोटींची गुंतवणूक आकर्षित करण्यात आली आहे. यातून 14 हजार थेट रोजगार निर्मिती होणार आहे, असे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी सांगितले. 

    उत्कृष्ट कार्य करणा–यांचा सत्कार : राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान अंतर्गत चंद्रपूर महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले, संदीप छिद्रावार, विजय बोरीकर, रविंद्र हजारे, शुभांगी सुर्यवंशी, अनिलकुमार घुले, अमुल भुते, युधिष्ठिर रैच यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणारे चांदा पब्लिक स्कुल, माउंट कार्मेल कॉन्व्हेंट, आनंद निकेतन महाविद्यालय, वरोरा यांचा, आदर्श ग्राम महसूल अधिकारी प्रविण ठोंबरे यांना तसेच ‘पर्यावरण बचाओ वसुंधरा सजाओ’ या ब्रीदवाक्य स्पर्धेतील हिमाशू संजय वडस्कर, समृध्दी गुप्ता, चांदणी बलराम झा यांचाही पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

  • Monsoon drainage preparation । मान्सूनपूर्व तयारीला वेग! चंद्रपूरात युद्धपातळीवर नालेसफाई सुरू

    Monsoon drainage preparation

    Monsoon drainage preparation : चंद्रपूर – शहरातील तीनही झोन अंतर्गत येणाऱ्या 6 मोठे नालेसफाई स्वच्छतेचे कार्य युद्धपातळीवर हाती घेऊन 10 छोट्या नाल्यांच्या स्वच्छता मोहिमेला चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे सुरवात करण्यात आली असुन 2 मे पासुन नाल्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. Drainage cleaning campaign

    खासदार धानोरकर यांनी प्रकल्पग्रस्तांना मिळवून दिला न्याय

       
        नाल्यावर अतिक्रमण केल्याने पाण्याच्या प्रवाहाला अवरोध निर्माण होऊन पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते,याशिवाय पावसाळ्यात नाला ओव्हरफ्लो झाल्यास परिसरात पाणी शिरून साधन संपत्ती व आरोग्यालाही धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे ज्या नागरिक, दुकानदारांनी नाल्यावर अतिक्रमण करून बांधकाम केले आहे त्यांनी ते त्वरित काढण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे. नाल्यावरील अतिक्रमण हे पाणी तुंबण्याचे कारण ठरू शकत असल्याचे लक्षात घेता मनपातर्फे नाल्यावरील अतिक्रमणाचा सर्व्हे करण्यात आला होता. यात गडर लाईन कव्हर करणे,पक्के बांधकाम करणे,व्हरांडा बांधण्यासारखे अतिक्रमण केलेले आढळुन आले होते. या सर्व अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्याची विशेष मोहीम आता राबविण्यात येणार आहे. Chandrapur drainage maintenance


         शहरातील तीनही झोनअंतर्गत बहुतांश नाल्यांमध्ये गाळ आणि कचरा जमा झाला आहे. यामुळे नाल्याच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण होतो. मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थितीही निर्माण होण्याची शक्यता असते. हे सर्व टाळण्यासाठी मान्सूनपूर्व नाले स्वच्छता करण्याच्या कामाला सुरवात करण्यात येत आहे.


          शहरातील महाविदर्भ वृत्तपत्र कार्यालय ते मच्छीनाला, सावरकर नगर, बगड़खिडकी रेल्वेपटरी, बिनबा मोरी ते सटवाई, रहमत नगर , सिस्टर कॉलोनी, चांबारकुंडी, आकाशवाणी, निंबाळकर वाडी, एस.पी कॉलेज ते नगराळे दवाखाना इत्यादी मोठ्या नाल्यांची साफसफाई सुरु असून मनुष्यबळ व जेसीबीच्या मदतीने तेथील गाळ आणि कचरा बाहेर काढण्यात येत आहे. नाल्याभोवती वाढलेली झाडेझुडपी व नाल्यातील माती दगड बाहेर काढून सांडपाण्याला वाट काढून दिली जाणार आहे. त्यामुळे सांडपाणी तुंबून न राहता पुढे वाहून जाईल, सांडपाण्याला वेग आल्याने नाल्याजवळील दुर्गंधी कमी व्हायला मदत होईल.


         नाले सफाईचे कार्य मशीनद्वारे आणि जेथे मशीनद्वारे शक्य नाही तेथे स्वच्छता कर्मचाऱ्यांतर्फे होणार आहे. सध्या स्वच्छतेच्या कामात नियमीत 315 सफाई कर्मचारी व अतिरिक्त 130 असे एकुण 445 कर्मचारी कार्यरत असणार आहेत. याशिवाय मोठ्या नाल्यांच्या सफाईकरीता 3 जेसीबी लावण्यात आल्या असून 2 पोकलेनद्वारे स्वच्छता सुरू करण्यात आली आहे. अन्य नाले जेथे पोकलेन जाऊ शकत नाही अशा उर्वरीत नाल्यांची स्वच्छता मनुष्यबळाद्वारे करण्यात येत आहे.

    chandrapur drainage maintenance


        विविध विभागांच्या समन्वयातून स्वच्छता विभाग हे उद्दिष्ट साध्य करणार आहे. नाले स्वच्छतेची संपूर्ण जबाबदारी झोनचे सहायक आयुक्त यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात, मुख्य स्वच्छता अधिकारी, झोनचे  स्वच्छता निरिक्षक, आपत्ती व्यवस्थापन पथक सांभाळणार असुन नाला स्वच्छतेदरम्यान निघणारा गाळ हा परिसरातील सखल भागात टाकण्यात येणार आहे. 

  • Kishor Jorgewar social initiatives । किशोर जोरगेवार यांच्या सामाजिक कार्यामुळे दिव्यांग मुलांना मिळाली सशक्तता

    Kishor Jorgewar social initiatives

    Kishor Jorgewar social initiatives : चंद्रपूर – आपल्या समाजातील प्रत्येक व्यक्तीला हक्काचे स्थान मिळाले पाहिजे. बौद्विक दिव्यांग मुले ही आपल्या समाजाचा अविभाज्य घटक आहेत. त्यांच्या आयुष्यात आनंद, आत्मसन्मान आणि स्वतंत्रतेची भावना निर्माण करणे, ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने हातात हात घालून या कार्यात सहभागी होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. Support for disabled children

    आमदार जोरगेवार मुले पहलगाम मधील कुटुंब परतले

    श्री साई मतिमंद शिक्षण संस्था, चंद्रपूर द्वारा संचालित स्विकार दुर्बल मनस्कर (मतिमंद) मुलांची निवास शाळा, ताडाळी येथे मार्गदर्शन शिबिर आणि बस लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला रेखाजाई पिंपळशेंडे, अ‍ॅड. अभय पाचपोर, समाजकल्याण विभागाचे उपयुक्त राजेशजी पांडे, डॉ. दिलीप चौधरी, शाश्वत शेरे, शेरे, नंदकुमार फुले, जैन, मुधोळकर, वैभव सनास्कर, नलगंटिवार, अमोल मारुतकर आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

    यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, “श्री साई मतिमंद शिक्षण संस्था ज्या प्रकारे या मुलांच्या विकासासाठी कार्यरत आहे, हे अत्यंत कौतुकास्पद आहे. केवळ शिक्षणच नव्हे, तर प्रेम, सहकार्य आणि योग्य दिशा या मुलांसाठी येथे दिली जात आहे. आजच्या या कार्यक्रमात नव्या बसचे लोकार्पण करण्यात आले आहे. ही बस या मुलांसाठी केवळ वाहतुकीचे साधन नसून त्यांच्या स्वप्नांना गती देणारे साधन ठरेल. शिक्षणाचा आणि विकासाचा हा प्रवास अधिक सुलभ व सुरक्षित व्हावा यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू. Mental disability education programs

    या मुलांसाठी केवळ भौतिक सुविधा पुरवणे पुरेसे नाही, तर त्यांना प्रेमाने, मायेने समजून घेऊन जगण्याची संधी देणे आवश्यक आहे. आम्हीही येथे आवश्यक त्या सर्व मदतीसाठी कटिबद्ध आहोत. ही मुले समाजाचा अविभाज्य भाग आहेत. त्यांना वेगळे न मानता, त्यांच्या गरजांनुसार विशेष प्रेम, काळजी आणि संधी देणे, ही प्रत्येक सुजाण नागरिकाची जबाबदारी आहे असे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • Sudhir Mungantiwar helping women । सुई-धाग्याने विणलेले स्वावलंबनाचे स्वप्न; सुधीर मुनगंटीवार यांचा मोलाचा हातभार

    Sudhir Mungantiwar helping women

    Sudhir Mungantiwar helping women : चंद्रपूर –  दादाभाई नौरोजी वॉर्ड, बल्लारपूर येथील संगीता दासरवार यांना स्वतःचा शिलाई व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने शिलाई मशीन उपलब्ध करून देण्यात आली. आर्थिक अडचणींमुळे अपूर्ण राहिलेलं स्वप्न आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सहकार्यामुळे पूर्ण झाले. याबद्दल आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याप्रती संगीता दासरवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. Sewing machine help for women

    त्या ४५ कंत्राटी कामगारांना मुनगंटीवार यांनी मिळवून दिला न्याय

    संगीता विशाल दासरवार आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मिळेल ते काम करत होत्या. मात्र तुटपुंज्या उत्पन्नामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. स्वतःचा शिलाई मशीन व्यवसाय सुरू करण्याची तीव्र इच्छा असूनही आर्थिक अडचणीमुळे त्यांचे स्वप्न अपूर्ण होते. यासंदर्भात आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयात भेट घेऊन मदत मिळण्यासंदर्भात निवेदन दिले. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी तात्काळ शिलाई मशीन उपलब्ध करून दिली.

    शिलाई मशीन मिळाल्याने संगीता दासरवार यांनी स्वतःचा शिलाई मशीन व्यवसाय सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या मदतीमुळे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळविण्यात मोलाचा हातभार लागणार आहे.

    यावेळी संगीता दासरवार यांनी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानत, “ही मदत मला नवी उमेद आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवणारी आहे,” असे भावनिक उद्गार काढले.

  • Chandrapur water conservation movement । चंद्रपूरमध्ये जलरथाचा शुभारंभ; तलाव व नाल्यांचे होणार पुनरुज्जीवन

    Chandrapur water conservation movement

    Chandrapur water conservation movement : (चंद्रपूर) महाराष्ट्र शासनाच्या ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ तसेच ‘नाला खोलीकरण व रुंदीकरण’ या योजनेचा गावागावात जाऊन प्रचार-प्रसार तसेच जनजागृतीसाठी करणार्‍या जलरथाचे उद्घाटन ( चंद्रपूर विधानसभा आमदार) श्री किशोर भाऊ जोरगेवार यांच्या हस्ते संपन्न झाले.
    या वेळी महासचिव सकल जैन समाज चंद्रपूर –संदीपजी बांठिया, भारतीय जैन संघटनेचे विदर्भ अध्यक्ष गौतमजी कोठारी , सामाजिक कार्यकर्ते श्री. संजय कोठारी, बिजेस जिल्हाध्यक्ष दिपेंद्र भाई पारेख, जिल्हा सदस्य अनिकेत लूनावत, जिल्हा सचिव ऋषभ सकलेचा, सामाजिक कार्यकर्ते मोहित मोदी, तसेच भारतीय जैन संघटनेचे जिल्हा समन्वयक दीक्षांत जी बेले आदी मान्यवर उपस्थित होते. Pond rejuvenation scheme Maharashtra

    आमदार जोरगेवार मुळे पहलगाम मध्ये अडकलेले ते कुटुंब चंद्रपुरात परतले

    सदरील योजनेद्वारे शासन गावागावांतील तलावांमधील गाळ काढून त्यांचे पुनरुज्जीवन करणार आहे. गाळ काढण्याचा संपूर्ण खर्च शासन करणार असून यासाठी पूर्ण राज्यात एकच दर निश्चित करण्यात आला आहे. ग्रामपंचायत किंवा पात्र स्वयंसेवी संस्थेला या कामासाठी अर्ज करून जिल्हा प्रशासनाने दिलेल्या पद्धतीनुसार काम करता येईल. तसेच तलावातून काढलेला गाळ शेतात टाकण्यासाठी अल्प व अत्यल्पभूधारक शेतकरी, विधवा, अपंग शेतकरी व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाकडून निश्चित दरानुसार अनुदानही दिले जाणार आहे. BJS water conservation initiative

    BJS water conservation initiative


    शासनाची ही योजना गावागावात पोहोचवणे, शेतकर्‍यांना गाळ घेऊन जाण्यासाठी प्रोत्साहन देणे, जनजागृती करून जनआंदोलन उभे करणे, मागणी अर्ज निर्माण करणे तसेच ‘गाळमुक्त धरण’ हे टेक्नॉलॉजी पोर्टल तयार करण्यासाठी भारतीय जैन संघटना (बीजेएस) आणि महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. त्या अनुषंगाने जलरथाची निर्मिती करण्यात आली असून तो जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये जाऊन या योजनेचा प्रचार-प्रसार करणार आहे.


    या योजनेत सहभागी होण्यासाठी सरपंचांनी आपल्या गावांचा मागणी अर्ज ‘बीजेएस डिमांड अॅप’वर ऑनलाइन भरावा. बीजेएसने सर्व जिल्ह्यात नेमलेले प्रशिक्षित जिल्हा समन्वयक तसेच महाराष्ट्रातील बीजेएसचे हजारो कार्यकर्ते हे बीजेएसच्या माध्यमातून शेतकर्‍यांना, ग्रामपंचायतींना, तालुका-जिल्हा प्रशासनाला सहयोग करण्यासाठी सज्ज आहेत. या योजनेच्या जनजागृतीसाठी ‘सुहाना स्पाइसेस’ यांनी बीजेएसला सहकार्य केले आहे.

    योजनेची सर्व माहिती ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ म्हणजेच www.shiwaar.com या शासनाच्या पोर्टलवर दिली आहे. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त गावांनी तलावातील गाळ काढण्यासाठी, नाला खोलीकरण-रुंदीकरणासाठी त्वरित अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान बीजेएस च्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

  • Chandrapur citizens rescued from terrorism । चंद्रपूरचे कुटुंबिय जम्मू काश्मीरमधून सुखरूप परत – आमदार जोरगेवारांचा विशेष पुढाकार

    Chandrapur citizens rescued from terrorism

    Chandrapur citizens rescued from terrorism : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीत अडकलेल्या चंद्रपूरच्या सात नागरिकांना अखेर सुखरूप परत आणण्यात यश आले आहे. या संपूर्ण प्रयत्नात आमदार किशोर जोरगेवार यांचे विशेष योगदान राहिले.

    धानोरा बॅरेज साठी आमदार जोरगेवार यांचा पाठपुरावा, निधी मंजूर

    चंद्रपूर मधील नागीनाबग वार्ड येथील अंकीत नगराळे, शिल्पा नळे, स्पर्श नळे, प्रितेश नळे, अजय गाडीवान, वर्षा गाडीवान आणि तेजस्विनी गाडीवान हे सात नागरिक पहलगाममध्ये अडकले होते. दहशतवादी हल्ल्याच्या जवळपासच ते थांबलेले होते. माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी तात्काळ या कुटुंबीयांशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून त्यांच्या सुरक्षिततेची चौकशी केली आणि त्यांना धीर दिला. Kishore Jorgewar Jammu Kashmir rescue

    यानंतर, आमदार जोरगेवार यांनी मदत व पुनर्वसन विभागाचे संचालक सतीशकुमार खडके तसेच जम्मू-काश्मीर प्रशासनाशी थेट संपर्क साधून संबंधित कुटुंबीयांना सुरक्षित परत आणण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत मागितली. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे स्थानिक प्रशासनाने तातडीने या नागरिकांशी संपर्क साधला आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले. या सर्व हालचालींनंतर, आमदार जोरगेवार यांच्या पुढाकाराने या सात नागरिकांना घरी परत आणण्यासाठी रेल्वेचे तिकीट उपलब्ध करून देण्यात आले. Jammu Kashmir crisis rescue operation

    आज दुपारी १२ वाजता हे सर्वजण बल्लारपूर रेल्वे स्थानकावर पोहोचले. रेल्वे स्थानकावर भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सर्व कुटुंबीयांनी आमदार किशोर जोरगेवार यांचे विशेष आभार मानले. हे कुटुंब सुरक्षित घरी पोहोचेपर्यंत मी स्वतः सतत प्रशासनाशी संपर्कात होतो. त्यांच्या घरी सुखरूप परत येणं हेच माझं कर्तव्य होतं एक दोन दिवसात आणखी काही नागरिक चंद्रपुरात पोहोचणार असून आपण सतत संपर्कात असल्याचे आमदार जोरगेवार यांनी सांगितले. चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आमदार जोरगेवार यांनी दाखवलेली तत्परता व संवेदनशीलता विशेष उल्लेखनीय ठरली आहे.