चंद्रपूर जिल्ह्यात वीज कोसळून महिलेचा मृत्यू

News34 chandrapur गुरू गुरनुले

मुल – मूल तालुक्यातील चिचाळा येथे वीज पडून एक महिला ठार झाल्याची घटना आज बारा वाजताच्या दरम्यान घडली. चंद्रकला संजय वैरागडे वय 45 असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे ही महीला अत्यंत गरीब कुटुंबातील आहे.

 

आज 1 ऑक्टोम्बरला सकाळी 11 वाजता पासून मूल शहरात पाऊस बरसला आणि विजांचा कडकडाट होत होता. विजांचा कडकडाट खूप मोठ्या प्रमाणात असल्याने चिचाळा येथील महिला चीचाला शेतशिवारात आपल्या शेतात काम करीत होती, त्याचवेळी चंद्रकला वर वीज कोसळली, त्यामध्ये ती जागीच ठार झाली. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. झालेल्या घटनेत दोन महिला जखमी झाले.

 

या घटनेची माहिती पोलिस व महसूल प्रशासनाला देण्यात आली असता ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास प्रशासन करीत आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *