Tag: News34 chandrapur

  • Durgapur PHC Quality Certification । राष्ट्रीय मानांकन प्राप्त दुर्गापूर प्रा.आ.केंद्राला आमदार मुनगंटीवार यांची भेट

    Durgapur PHC Quality Certification

    Durgapur PHC Quality Certification : चंद्रपूर, दि. 03 : भरघोस गुणांसह राष्ट्रीय मानांकन प्राप्त करणा-या दुर्गापूर प्राथमिक आरोग्य केंद्राला बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी भेट देऊन पाहणी केली. संस्थेचा नावलौकिक राष्ट्रीय स्तरावर वाढविल्याबद्दल अधिकारी व कर्मचा-यांचे त्यांनी कौतुक केले. तसेच जिल्यातील इतर आरोग्य संस्थांनी सुद्धा राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन समितीचे (एन.क्यू.ए.एस.) मानांकन पात्र होण्यासाठी प्रयत्न करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

    Also Read : धक्कादायक घटना; वरोरा मध्ये ४ मुले वर्धा नदीत बुडाली, दोघे बचावले

    यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कोमल मुनेश्वर,    प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित जैस्वाल यांच्यासह  केंद्रातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

    सर्वोत्कृष्ट मानांकन

    आरोग्य क्षेत्रात गुणवत्तेचे अनन्यसाधारण महत्व असते. या गुणवत्तेचे मूल्यमापन वस्तुनिष्ठ पद्धतीने करण्याकरिता अनेक पद्धती आहेत. त्यापैकी राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन समितीचे (एन.क्यू.ए.एस.) मानांकन हे सर्वोत्कृष्ठ मानले जाते. या मानांकन प्राप्त आरोग्यसंस्थेद्वारे रुग्णांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यात येतात. आयुष्मान आरोग्य मंदिर, प्राथमिक आरोग्य केंद्र दुर्गापूरला (NQAS) मार्फत केल्या गेलेल्या मुल्याकंनामध्ये मानांकन प्राप्त झालेल आहे. Sudhir Mungantiwar health initiatives Maharashtra

                राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानक मध्ये आरोग्य संस्थेत एकूण 6 विभाग असतात. यात बाह्यरुग्ण विभाग,  आंतररुग्ण विभाग, प्रसूती विभाग, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, प्रयोगशाळा विभाग, सामान्य प्रशासन विभाग याचा समावेश आहे. या प्रत्येक विभागामध्ये किमान 70 टक्के गुणांकन प्राप्त करणे अत्यावश्यक असते.  यामध्ये आधी राज्य पातळीवर यशस्वी झाल्यानंतर राष्ट्रीय पातळीवर मुल्यांकन करण्यात येते. मूल्यांकनामध्ये प्रा. आ. केंद्र, दुर्गापूर ला 94.64 टक्के गुणांकन मिळून जिल्ह्यामध्ये एन.क्य.ए.एस. पात्र संस्थेचा प्रथम मान मिळाला. national quality assurance standards healthcare

    सध्यस्थितीत चंद्रपूर जिल्यातील 11 आरोग्य संस्था राज्य पातळीवर  एन.क्यू.ए.एस. साठी पात्र झाल्या असून त्यापैकी 3 संस्थांचे राष्ट्रीय पातळीवर मुल्याकंन पूर्ण झाले आहे. प्रा. आ. केंद्र, गंगालवाडी आरोग्य संस्था अटी व शर्तीच्या अधीन राहून पात्र ठरलेली आहे. तसेच प्रा. आ. केंद्र, नांदा फाटा या संस्थेचे राष्ट्रीय पातळीवर मुल्याकंन पूर्ण झाले असून निकाल लागायचा आहे. उर्वरित ८ आरोग्य संस्था – प्रा. आ. केंद्र राजोली (मुल),  कळमना (बल्लारपूर),  नेरी (चिमूर), वाढोणा (नागभीड), नवेगाव पांडव (नागभीड),  बाळापुर (नागभीड),  मोहाडी नलेश्वर (सिंदेवाही),  माढेळी (वरोरा) यांचे NQAS मूल्यमापन माहे नोव्हेंबर मध्ये होण्याचे नियोजित आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी कळविले आहे.

  • Chandrapur cancer hospital inauguration । चंद्रपूरात नवं कॅन्सर हॉस्पिटल; मोहन भागवत यांच्या हस्ते २२ डिसेंबरला लोकार्पण

    Chandrapur cancer hospital inauguration

    Chandrapur cancer hospital inauguration : चंद्रपूर ३ नोव्हेम्बर (News३४) – राज्याच्या अर्थमंत्री पदावर असताना  चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाला वेगळा आयाम देणारे आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातुन साकारलेल्या चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलचे लोकार्पण 22 डिसेंबर  2025 रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे सरसंघचालक श्री मोहनजी भागवत यांच्या हस्ते होणार असून मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती या लोकार्पण सोहळ्याला लाभणार आहे.

    Also Read : अवकाळी पावसाने शेतकरी त्रस्त, ६ एकरवरील सोयाबीन पेटवले

    अर्थमंत्री, वनमंत्री, सांस्कृतिक कार्य मंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आ. मुनगंटीवार यांनी कार्यशील दृष्टिकोन आणि विकासनिष्ठ सेवाव्रत यांच्या बळावर चंद्रपूर जिल्ह्यात मोठया प्रमाणावर विकासकामे पूर्णत्वास आणली.  “विकास हा धर्म” आणि “समाजहित हे ध्येय” या धोरणातुन त्यांनी जिल्ह्याच्या विकासाचा मार्ग प्रशस्त केला. या वाटचालीत चंद्रपूरच्या जनतेसाठी एक महत्त्वपूर्ण लोककल्याणकारी प्रकल्प प्रत्यक्षात उतरत आहे, तो म्हणजे 280 कोटी रु. किंमतीचे टाटा ट्रस्ट च्या सहकार्याने साकारलेले चंद्रपूर कॅन्सर रुग्णालय. Tata Trust cancer hospital

    वर्ष २०१४ पासून पाठपुरावा

    2014 मध्ये अर्थमंत्री झाल्या पासून आ. मुनगंटीवार यांनी या विषयाचा जोरदार पाठपुरावा केला. दिनांक 17 एप्रिल 2018 रोजी  झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चंद्रपूर येथे अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालय उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला. दि. 26 जून 2018 रोजी याबाबत शासन निर्णय निर्गमित झाला.  जिल्हा खनिज विकास प्रतिष्ठान, राज्य शासन आणि टाटा ट्रस्ट यांच्या सहकार्याने 280 कोटी रुपये खर्चातून उभारण्यात आलेले अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल आज पूर्णत्वास आले आहे. पूर्वविदर्भातील आदिवासी, ग्रामीण आणि सर्वसामान्य घटकांसाठी हे केंद्र खऱ्या अर्थाने नवजीवनाचा आधार आणि आशेचा किरण ठरणार आहे. Sudhir Mungantiwar cancer care initiative

    या कॅन्सर हॉस्पिटलची महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.तळमजला + ४ मजले, अंदाजे १,००,०००+ चौ.फुट क्षेत्रफळ, १४० बेड क्षमतेचे अत्याधुनिक उपचार केंद्र, कॅन्सर निदान व उपचारासाठी सुसज्ज तंत्रसामग्री :यात सीटी सिम्युलेटर (CT-S), मॅमोग्राफी, 3D/4D अल्ट्रासाऊंड, 3D/4D आणि इलास्टोग्राफीसह उसग, सीटी – १६ स्लाइस आणि स्पेक्ट, २ रेषीय प्रवेगक (Linear Accelerators),ब्रेकीथेरपी, डिजिटल एक्स-रे, विशेष उपचार विभाग :यात केमोथेरपी, सर्जिकल ऑन्कोलॉजी, आधुनिक प्रयोगशाळा : सूक्ष्मजीवशास्त्र (Microbiology), रक्तविज्ञान (Haematology), हिस्टोपॅथोलॉजी आदींचा समावेश आहे. या सर्व बाबींमुळे हे रुग्णालय पूर्वविदर्भातील सर्वात सक्षम, सुसज्ज आणि पूर्णत्वाने Cancer Care देणारे केंद्र ठरणार आहे.

    स्व. रतन टाटा यांची इच्छा

    या प्रकल्पाबाबत आ. सुधीर मुनगंटीवार यांची  टाटा समूहाचे प्रमुख स्व. रतनजी टाटा यांच्याशी चर्चा होत असताना त्यांनी या रुग्णालयाचे लोकार्पण सर संघचालक मोहनजी भागवत यांच्या हस्ते व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती. आ. मुनगंटीवार यांनी मोहनजी भागवत यांना प्रत्यक्ष भेटून विनंती केली असता त्यांनी 22 डिसेंबर रोजी या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहण्यास मान्यता दिली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती या सोहळ्याला लाभणार आहे. Chandrapur cancer hospital inauguration

    चंद्रपूर जिल्ह्यात आरोग्य सेवेवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करणाऱ्या आ. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून चंद्रपूरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालया पाठोपाठ कॅन्सर रुग्णालया सारखा महत्वाचा आरोग्य प्रकल्प साकारत आहे. त्यांच्या पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात जिल्ह्यात 14 प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकामांना मंजूरी देण्यात आली असून बल्लारपूर, पोंभुर्णा येथे ग्रामीण रुग्णालय, मुल येथील उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन, उमरी पोतदार, कळमना येथे स्मार्ट प्रा. आ. केंद्र तसेच आरोग्य संकुले पूर्णत्वास आली आहेत. आरोग्य सेवेचे नवे मानदंड जिल्ह्यात निर्माण करणाऱ्या मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातुन साकारलेले हे कॅन्सर रुग्णालय रुग्णसेवेचे प्रशस्त दालन ठरणार आहे.

  • farmers burning soyabean after rain । अवकाळी पावसाने शेतकरी संकटात; ६ एकरवरील सोयाबीन पेटविले

    farmers burning soyabean after rain

    farmers burning soyabean after rain : कोरपना ३ नोव्हेम्बर (News३४): आधीच अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत असताना, अवकाळी पावसाने कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर नवे आणि मोठे संकट उभे केले आहे. कढोली येथील प्रशांत मसे या शेतकऱ्याने याच संकटापुढे हतबल होऊन 6 एकर क्षेत्रावरील कापणी केलेल्या सोयाबीनच्या ढिगाऱ्याला अखेर आग लावून जाळून टाकले. या हृदयद्रावक घटनेमुळे मसे यांचे केवळ पीकच नव्हे, तर सुमारे 25 हजार रुपयांचा कापणी खर्च देखील पाण्यात गेला असून, ते आता मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.

    Also Read : वरोऱ्यात दुर्दैवी घटना, ४ शाळकरी मुले वर्धा नदीत बुडाली, दोघांना वाचविण्यास यश

    घडलेला प्रकार:

    • प्रशांत मसे यांनी आपल्या 6 एकर क्षेत्रावर मोठ्या आशेने सोयाबीनची लागवड केली होती.
    • पीक पूर्ण झाल्यानंतर त्यांनी कापणी केली आणि सोयाबीन काढण्यासाठी तयार ठेवले होते.
    • मात्र, सुरुवातीच्या अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे कापणी केलेले सोयाबीन ओलसर झाले.
    • हे सोयाबीन उन्हात सुकविण्यासाठी शेतात ठेवले असताना, अवकाळी पावसाने पुन्हा तडाखा दिला आणि सोयाबीन पुन्हा पूर्णपणे ओले झाले.
    • ओलसरपणामुळे थ्रेशर मशीनच्या मालकाने सोयाबीन काढण्यास स्पष्ट नकार दिला.
    • परिणामी, ढिगाऱ्यात साचलेल्या ओल्या सोयाबीनला अंकुर फुटण्यास सुरुवात झाली आणि पीक कुजण्याच्या मार्गावर आले.

    अखेर हतबलता

    सततच्या पावसामुळे पीक काढता येत नाही आणि ढिगाऱ्यातच ते कुजत चालले आहे, हे पाहून शेतकरी प्रशांत मसे पूर्णपणे हतबल झाले. लाखोंचे नुकसान डोळ्यांदेखत होताना पाहून त्यांनी जड अंतःकरणाने आपल्या 6 एकर क्षेत्रावरील जमा झालेल्या सोयाबीनच्या संपूर्ण ढिगाऱ्याला आग लावून दिली. soyabean crop loss due to unseasonal rain

    या घटनेमुळे मसे यांचे संपूर्ण 6 एकरावरील उत्पादन नष्ट झाले असून, ते पूर्णपणे आर्थिक संकटात सापडले आहेत. नैसर्गिक संकटांमुळे हतबल झालेल्या या शेतकऱ्याला शासनाकडून त्वरित मदतीची अपेक्षा आहे.


  • Wardha river missing children । वर्धा नदीत ४ शाळकरी मुलं बुडाली; गुराख्याच्या धैर्याने दोघं वाचले पण

    Wardha river missing children

    Wardha river missing children : वरोरा, २ नोव्हेम्बर (News३४): वरोरा शहरापासून जवळच असलेल्या वर्धा नदीच्या तुराना घाटावर पोहण्यासाठी गेलेल्या चार मित्रांपैकी दोन शाळकरी मुले नदीच्या खोल पाण्यात वाहून गेली आहेत. ही दुर्दैवी घटना रविवार, दि. २ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली. वाहून गेलेल्या मुलांमध्ये रूपेश विजेंद्र कुळसंघे (वय १३, रा. कर्मवीर वॉर्ड, वरोरा) आणि प्रणय विनोद भोयर (वय १५, रा. जिजामाता वॉर्ड, वरोरा) यांचा समावेश आहे. नदीपात्रातून दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असले तरी, वाहून गेलेल्या मुलांचा रात्री उशीरपर्यंत शोध लागला नाही.

    नेमकी घटना काय?

    शहरातील चार मित्र – रुपेश कुळसंघे, प्रणय भोयर, उमंग धर्मेंद्र आत्राम, आणि कृष्णा चंद्रकांत कुईजडे हे रविवारी दुपारच्या सुमारास सायकलने तुराना घाटावर पोहण्यासाठी गेले होते. चौघेही नदीच्या पात्रात उतरले. त्याच वेळी घाटाच्या दिशेने कोणीतरी महिला येत असल्याचे दिसल्याने, चौघांनीही नदीच्या पात्रात लपण्याचा प्रयत्न केला. लपण्याच्या प्रयत्नात ते नदीतील खोलगट भागात गेले आणि चौघेही बुडू लागले.

    गुराख्याने वाचवले दोघांना

    मुलांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू करताच, जवळच जनावरे राखत असलेल्या एका गुराख्याने तातडीने धाव घेतली. त्याने आपल्या जीवाची पर्वा न करता उमंग आत्राम आणि कृष्णा कुईजडे या दोन मुलांना नदीतून सुखरूप बाहेर काढले.

    Also Read : कांग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

    मात्र, दुर्दैवाने, रूपेश आणि प्रणय हे दोन मित्र पाण्याचा प्रवाह आणि खोली जास्त असल्याने खोल पाण्यात वाहून गेले. त्यांना वाचवण्यात गुराख्याला यश आले नाही.

    शोधमोहीम थांबली, उद्या पुन्हा सुरू होणार

    गुराख्याने तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी बेपत्ता असलेल्या मुलांच्या कुटुंबीयांना माहिती दिली, ज्यामुळे कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच चंद्रपूर येथील पोलिस रेस्क्यू चमू घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी वाहून गेलेल्या मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली. Warora search operation river

    परंतु, रात्री उशीर झाल्यामुळे आणि अंधारामुळे रेस्क्यू चमूने शोधमोहीम थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार, ता. ३ नोव्हेंबर रोजी सकाळी पुन्हा शोधमोहीम राबविण्यात येणार आहे.

    या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण वरोरा शहरावर शोककळा पसरली आहे.

    आईचे छत्र हरवलेल्या प्रणयवर काळाचा घाला

    वर्धा नदीच्या पात्रात वाहून गेलेल्या प्रणय विनोद भोयर याचा शोध अद्याप लागलेला नाही. प्रणय केवळ अकरा महिन्यांचा असताना त्याच्या आईचे निधन झाले होते. त्याचे वडील विनोद भोयर यांनी त्याचे एकट्याने पालनपोषण केले होते. आधी पत्नी आणि आता एकुलत्या एका मुलगा नदीत बुडल्याने वडील विनोद भोयर यांच्यावर मोठा आघात झाला असून ते एकाकी पडले आहेत.

  • Chandrapur police raid animal trafficking । गोवंशाची अवैध वाहतूक; गोंडपिपरी पोलिसांनी केली कारवाई, ४ आरोपीना अटक

    Chandrapur police raid animal trafficking

    Chandrapur police raid animal trafficking : गोंडपिपरी २ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी पोलिसांनी जनावरांची अवैध आणि क्रूरपणे वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत दोन पिकअप वाहनांमधून क्रूरतेने दाटीवाटीने कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात घेऊन जात असलेली एकूण १० गोवंशीय जनावरे ताब्यात घेण्यात आली असून, त्यांची सुटका करण्यात आली आहे.

    Also Read : डॉ संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण, कांग्रेसचे निषेध आंदोलन

    मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९:०० वाजता मौजा विठ्ठलवाडा ते भंगाराम तळोथी रोडवरील चेकविठ्ठलवाडा बसस्टॉपजवळ ही कारवाई करण्यात आली.

    नेमका प्रकार काय घडला?

    पोलीस कर्मचाऱ्यांनी MH-34 BZ 2383 क्रमांकाची पिकअप आणि MH-34 AB 8938 क्रमांकाची अशोक लेल्यॉड छोटी पिकअप ही दोन वाहने थांबवली. तपासणी केली असता, या दोन्ही वाहनांमध्ये क्रूरपणे आणि निदर्यतेने दाटीवाटीने, दोरखंडाने बांधून, तसेच चारा-पाण्याची कोणतीही सोय न करता, १० गोवंशीय जनावरे कोंबलेली आढळली. Gondpipri police animal cruelty arrest

    जप्त केलेल्या जनावरांची किंमत ८,६४,००० रुपये इतकी आहे. आरोपी हे जनावरे अवैध मार्गाने कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात घेऊन जात असल्याचे उघड झाले.

    चार आरोपींना अटक

    या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांची नावे खालीलप्रमाणे:

    1. सुधाकर पांडुरंग निकोडे (वय ५०, रा. भंगाराम तळोधी, चालक, पिकअप क्र. MH-34 BZ 2383)
    2. सुधाकर वारलु झाडे (वय ५२, रा. चेकविठ्ठलवाडा, ता. गोंडपिपरी)
    3. अमर सुदर्शन मडावी (वय ३०, रा. वेळगाव, ता. गोंडपिपरी, चालक, पिकअप क्र. MH-34 AB 8938)
    4. प्रभाकर हनुमंतु कन्नाके (वय ६०, रा. बामनपेठ, ता. चार्मोर्शि, जि. गडचिरोली)

    या चारही आरोपींविरुद्ध गोंडपिपरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

    सदरची यशस्वी कारवाई श्री. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधिक्षक, श्री. ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधिक्षक, आणि श्री. सत्यजित आमले, उपविभागीय पोलीस अधिकारी, मुल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

    या कारवाईत सपोनि रमेश हत्तीगोटे, सा. सफौ माणिक वाग्दरकर, पोहवा विलास कोवे (ब.नं. २४१९), पो. अं. सचिन गायकवाड (ब.नं. ११७४), आणि चालक मपोशि. मनिषा ठाकरे (ब.नं. ६०२७) या गोंडपिपरी पोलीस स्टेशनच्या पथकाने सक्रिय सहभाग घेतला.

  • Justice for Dr Sampada Munde । डॉ संपदा मुंडे ना न्याय द्या; महिला कांग्रेसचे निषेध आंदोलन

    Justice for Dr Sampada Munde

    Justice for Dr Sampada Munde : चंद्रपूर २ नोव्हेम्बर (News३४) – महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी च्या अध्यक्षा मा.संध्याताई सव्वालाखे यांचा निर्देश्यानुसार खासदार मा.प्रतिभाताई धानोरकर, विरोधी पक्ष नेते मा. विजयभाऊ वडेटीवार,चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष मा,सुभाषभाऊ धोटे यांच्या मार्गदर्शनात,तसेंच शहर जिल्हाध्यक्ष मा. रामूभैय्या तिवारी यांचे प्रमुख उपस्थितीत चंद्रपूर ग्रामीण महिला जिल्हा अध्यक्षा सौ कुंदाताई जेणेकर,शहर जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष सौ चंदाताई वैरागडे यांच्या नेतृत्वात बिड जिल्यातील फलटण येथील डॉ संपदा मुंडे यांना आत्महत्येकरिता प्रवृत्त करणाऱ्या दोन नराधमाना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी गांधी चौक चंद्रपूर येथे भव्य निषेध आंदोलन करण्यात आले. Dr Sampada Munde suicide case updates

    आरोपीना तात्काळ फाशी द्या

    आपल्या देशात वारंवार महिलांवर लैगिक अन्याय अत्याचार करून हत्या करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे,आणि सरकार मात्र हत्त्यारयाला कठोर शिक्षा न करता बघ्याची भूमिका घेत अश्या घटनेमुळे महिलांमध्ये अत्यंत भीतीचे वातावरण पसरतले आहे.त्यामुळेच डॉ संपदा मुंडे यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या त्या दोन्ही नराधमाना तत्काळ फाशीची शिक्षा दिली तर नक्कीच महिलांवरील अत्याचारयाच्या घटना घडणार नाही त्यामुळे त्या दोन्ही नराधमाना तत्काळ फासी झालीच पाहिजे यासाठीच चंद्रपूर जिल्हा व शहर महिला काँग्रेस रस्त्यावर उतरलो आहे. अशी प्रतिक्रिया महिला जिल्हाध्यक्ष कुंदाताई जेणेकर आणि महिला शहर अध्यक्ष चंदाताई वैरागडे यांनी दिल्या. Women’s Congress protest Chandrapur

    Also Read : मुद्रांक विक्रेत्याने घेतली १४० रुपयांची लाच

    निषेध आंदोलनात रामूभैया तिवारी कुंदाताई जेणेकर,चंदाताई वैरागडे , जेष्ठ नेते विनोदभाऊ दत्तात्रय,अनुसूचित जाती विभाग राष्ट्रीय समन्वयक अश्विनी खोब्रागडे माजी महापौर संगीता अमृतकर माजी सभापती हर्षाताई चांदेकर,माजी नगर सेविका संगीता भोयर, सुनीता अग्रवाल, सोबतच शालिनी भगत, मीनाक्षी गुजरकर, अफसाना सैय्यद, साधना रामटेके शोभा वाघमारे, निर्मला कुळमेथे, संध्या चांदेकर, पूनम गीरसावळे, सुमित्रा कुचनकर,सुशीला रामटेके, राजेशजी अडूर,अनिलजी नरुले,नरेंद्रजी बोबडे, मनीषजी तिवारी, पिंटूभाऊ शिरवार, दुर्गेशभाऊ कोडाम, प्रशांतजी भारती,युषूप चाचा, शिरीषजी गोगुलवार पप्पूभाऊ सिद्धीकी, नौशाद शेख,नासिरजी शेख मोनू रामटेके, यांचे सह जिल्हा व शहर काँग्रेस कमिटी चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    निषेध आंदोलनानंतर महिला कांग्रेस च्या शिस्टमंडळानी मा.पोलीस अधीक्षक चंद्रपूर याना स्व.डॉ संपदा मुंडे याना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या नराधमांवर कठोर कार्यवाही करण्यासाठी निवेदन दिले.

  • Congress workers join BJP Chandrapur । नकोड्यात काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश; आगामी निवडणुकीत भाजपाची ताकद वाढणार!

    Congress workers join BJP Chandrapur

    Congress workers join BJP Chandrapur : चंद्रपूर २ नोव्हेम्बर (News३४) – आजचा दिवस नकोडा गावासाठी आणि भारतीय जनता पक्षासाठी ऐतिहासिक आहे. आज नकोडा येथील असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून एक विचार, एक संस्कार आणि एका राष्ट्रनिर्मितीच्या प्रवासाशी स्वतःला जोडले आहे. पक्ष बदलणे म्हणजे केवळ ध्वज बदलणे नव्हे, तर तो विचारांचा स्वीकार असतो. आज आपण भारतीय जनता पक्षाच्या कार्यसंघात सामील झालात, तेव्हा तुम्ही फक्त एका पक्षात नाही तर सेवा, राष्ट्रभक्ती आणि विकासाच्या प्रवासात सहभागी झाले असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

    Also Read : चंद्रपुरात ताडोबाच्या नावाने देह व्यवसाय, गुन्हे शाखेने केली कारवाई

    शनिवारी नकोडा येथील असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. नकोडा येथे आयोजित या पक्षप्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, जिल्हा संघटन महामंत्री नामदेव डाहुले, भाजप तालुका अध्यक्ष विनोद खेवले, भाजप नेते प्रकाश देवतळे, घुग्घूस शहर महामंत्री इमरान खान, भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अनुप भंडारी, महामंत्री मनोज पाल, सविता दंढारे, आशिष माशिरकर, राकेश पिंपळकर, दुर्गा वैरागडे, भाग्यश्री हांडे आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती. Chandrapur BJP new members induction

    यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा केवळ सत्तेसाठीचा पक्ष नाही, तो संस्कार, सेवा आणि संघटनेचा पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची ओळख जागतिक पातळीवर मजबूत झाली आहे, तर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य प्रगतीची नवी उंची गाठत आहे. जनतेच्या जीवनात परिवर्तन घडविणाऱ्या योजना  गरीब कल्याण, महिला सक्षमीकरण, शेतकरी सन्मान, उज्ज्वला, जनधन, प्रधानमंत्री आवास, आयुष्मान भारत अशा अनेक उपक्रमांद्वारे आज सबका साथ सबका विकास हे ब्रीद वास्तवात उतरले आहे. Congress workers join BJP Chandrapur

    नकोडा आणि परिसरात आम्ही विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. रस्ते, पिण्याचे पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे. प्रत्येक नागरिकापर्यंत योजनांचा लाभ पोहोचावा, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. आज भारतीय जनता पक्षात सामील होणारे हे सर्व कार्यकर्ते म्हणजे नवीन ऊर्जा आणि नवसंजीवनी आहेत. तुमचा हा निर्णय केवळ राजकीय नाही, तर सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने उचललेले पाऊल असल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सर्व नवनियुक्त सदस्यांच्या गळ्यात भारतीय जनता पक्षाचा दुपट्टा ओढून त्यांचे पक्षात स्वागत केले. Kishor Jorgewar BJP leadership event

    काँग्रेसला खिंडार – विजय बावरे यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश

    मागील काही महिन्यांमध्ये काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत. शनिवारी नकोडा येथे झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात पडोलीचे विजय बावरे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. विजय बावरे यांच्या पत्नी शारदा बावरे यांनी २०१७ च्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली होती. त्यामुळे आता विजय बावरे यांच्या प्रवेशामुळे ग्रामीण भागात पक्षाची ताकद वाढणार आहे.

  • Kishor Jorgewar Amma Ka Tiffin event । मानवतेचा प्रकाश फैलवणारा ‘अम्मा का टिफिन’ दिवाळी स्नेहमिलन सोहळा

    Kishor Jorgewar Amma Ka Tiffin event

    Kishor Jorgewar Amma Ka Tiffin event : चंद्रपूर १ नोव्हेम्बर (News34) – अम्मा हे नाव उच्चारताच ममत्व, प्रेम, काळजी आणि त्याग यांची भावना जागृत होते. आई ही केवळ एक व्यक्ती नसून ती जगाला जगविण्याची प्रेरणा देणारी एक भावना आहे. अम्मा का टिफीन या नावातही सेवा, समर्पण आणि माणुसकीची भावना दडलेली असून, राहू नये कोणीही भुकेला उपाशी, अम्मा का टिफीन येईन घराशी हे ब्रीदवाक्य म्हणजे मानवतेचा खरा दीप प्रज्वलित करणारी प्रेरणा असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

    आज शनिवारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने राजमाता निवासस्थानी अम्मा का टिफिन परिवार याकरिता दीपावली स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा अत्यंत आनंदोत्साहात पार पडला. यावेळी अम्मा का टिफिन परिवारातील सदस्यांची आरोग्य तपासणीही करण्यात आली. Diwali social welfare programs

    Also Read : ते ९ तालुके पुन्हा नक्षलग्रस्त घोषित होणार, मुनगंटीवार यांचा पुढाकार

    या कार्यक्रमाला कल्याणी किशोर जोरगेवार, भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महिला आघाडी अध्यक्ष छबु वैरागडे, अम्मा का टिफिन उपक्रमाच्या संयोजिका तथा भारतीय जनता पार्टीच्या महामंत्री सविता दंढारे, सूर्यकांत खनके, माजी नगरसेविका पुष्पा उराडे, मंडळ अध्यक्षा अॅड. सारिका संदुरकर, सायली येरणे, कौसर खान, दुर्गा वैरागडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

    अम्मा माझ्या जीवनाची पहिली गुरु

    यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, अम्मा हा शब्द उच्चारला की डोळ्यांसमोर एक शांत, प्रेमळ, त्यागमय आणि कर्तृत्ववान व्यक्ती उभी राहते. अम्मा माझ्या जीवनाची पहिली गुरु होती. तिच्या शिकवणींनी आणि संस्कारांनीच मला आज समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा दिली आहे.
    मुला, जेवढं शक्य होईल तेवढं दुसऱ्याला दे. पोटभर खाऊ घाल, कोणाला भुकेलं ठेवू नको. ही तिची वाक्यं आजही माझ्या हृदयात कोरलेली आहेत. त्या शिकवणीमुळेच अम्मा का टिफीन ही संकल्पना जन्माला आली. आईच्या त्या मायेच्या हातचं अन्न, तिचा तो प्रेमळ स्वभाव आणि कोणाचंही पोट रिकामं राहू नये ही भावना हेच या उपक्रमाचं बळ असल्याचे ते म्हणाले. Amma Ka Tiffin social initiative

    आजच्या या दीपावली स्नेहमिलन सोहळ्यात उपस्थित राहून मला अत्यंत आनंद आणि समाधान वाटत आहे. या उपक्रमात केवळ अन्नदान नाही, तर माणसांमधील आपुलकीचे नाते जपले गेले आहे. कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता, निःस्वार्थ भावनेने रोज कोणाचातरी पोट भरले जाते हीच खरी सेवा परंपरा आहे.Kishor Jorgewar Amma Ka Tiffin event

    आजच्या या स्नेहमिलन सोहळ्यात आपण सर्वजण केवळ दीप प्रज्वलित करत नाही, तर समाजात मानवतेचा प्रकाश पसरवत आहोत. या उपक्रमाची ज्योत अशीच अखंड पेटत राहील. माझी अम्मा, माझी आई आज आपल्या सोबत नसली तरी तिच्या नावाने सुरू केलेला हा उपक्रम आजही अत्यंत यशस्वीपणे आणि सेवाभावाने सुरू आहे, याचा आम्हाला अपार आनंद आणि अभिमान वाटतो. या उपक्रमामागे अम्माची शिकवण आहे. त्यामुळे हा सामाजिक उपक्रम आपण अधिक विस्तारित करून शेवटच्या गरजूंपर्यंत पोहोचविणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.या स्नेहमिलन सोहळ्यात अम्मा का टिफीन परिवारातील सर्व सदस्यांची आरोग्य तपासणी देखील करण्यात आली.

  • Government land patta distribution Chandrapur । नागरिकांना शासकीय पट्टे वाटपाचा मार्ग मोकळा – महसूल मंत्री बावनकुळे

    Government land patta distribution Chandrapur

    Government land patta distribution Chandrapur : चंद्रपूर, दि. 01 : राज्यातील 14 कोटी जनतेच्या विविध प्रश्नांच्या सोडवणूक करण्याकरीता महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबविण्यात आले. त्याला सेवा पंधरवड्याची जोड देत नागरिकांना दिलासा देण्यासाठी महत्वाचे उपक्रम राज्य सरकारने राबविले. शासकीय पट्टेवाटपासंदर्भात सुध्दा सर्व अडचणी दूर करून राज्य सरकारने नवीन शासन निर्णय काढले. त्यानुसार शासकीय जमिनीवर राहणा-यांना कायमस्वरूपी पट्टे देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एवढेच नाही तर झुडपी जंगल जमिनीवर राहणा-यांना सुध्दा पट्टे देण्याचा निर्णय लवकरच राज्य शासन घेणार आहे, अशी ग्वाही राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. Government land patta distribution Chandrapur

    ब्रम्हपुरी येथे शासकीय पट्टे व विविध योजनांचे प्रमाणपत्र, कृषी साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार कीर्तीकुमार भांगडिया, माजी आमदार अतुल देशकर, डॉ. उसेंडी, सुधाकर कोहळे, प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, अतिरिक्त जिल्हाधिकारी संतोष थिटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे, ब्रह्मपुरीच्या उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील, तहसीलदार श्री. मासळ, प्रताप वाघमारे आदी उपस्थित होते.

    Also Read : ताडोबाच्या नावावर चंद्रपुरात वेश्याव्यवसाय

    आज जवळपास विविध योजनांच्या अडीच हजार लाभार्थ्यांना लाभ देण्यात येत आहे, असे सांगून महसूलमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, गाव खेड्यातील पाणंद रस्ते मोकळे करण्याचा महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी राज्य सरकार ‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना’ लवकरच आणत आहे. शासकीय पट्टे वाटपासंदर्भात राज्य शासनाने सर्व अडचणी दूर केल्या. त्यानुसार सर्व पट्टेधारकांना पट्टे देण्यात येणार असून कोणीही यापासून वंचित राहणार नाही. याबाबत तहसीलदारांनी प्रत्येक महिन्याला बैठक घ्यावी. ब्रह्मपुरीतील सरकारी जागेवर राहणाऱ्या सर्व नागरिकांचा नगर परिषदेने प्लेन टेबल सर्वे करावा. Chandrapur revenue department land certificate

    भुमी अभिलेख विभागाच्या सनदकरिता आता नागरिकांना पैसे भरावे लागणार नाही. हा निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. आज सनद देण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे 12 लक्ष रुपये शासन भरणार आहे. पूर्व विदर्भात 86 हजार हेक्टर जमीन झुडपी जंगलाने व्यापली आहे. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत आता निर्णय दिला असून झुडपी जंगल जमिनीवर राहणाऱ्या 2 लक्ष नागरिकांनाही पट्टे वाटपाचा निर्णय घेण्यात येईल. पुढील सहा महिन्यात हे पट्टे वाटप होणार आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील 2.5 कोटी बहिणींना पाच वर्ष लाभ देण्यात येईल. तसेच राज्यातील 45 लक्ष शेतकऱ्यांना पुढील पाच वर्षात विजेचे बिल येणार नाही.

    पुढे मंत्री बावनकुळे म्हणाले, योग्य आणि गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. 30 जून 2026 पर्यंत ही कर्जमाफी करण्यात येईल. 15 ऑक्टोबर 2024 पूर्वीच्या सर्व अनधिकृत लेआउट मधील प्लॉट /घरे कायदेशीर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात येईल. त्याचा फायदा एक कोटी नागरिकांना होणार आहे. यासाठी सरकार कायदासुद्धा आणत आहे. अवैध वाळू वाहतूक, साठवणूक व विक्री संदर्भात कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. वाळू घाटांचे लिलाव झाल्यावर 10 टक्के वाळू स्थानिक नागरिकांसाठी राखीव राहणार आहे. Permanent land patta for forest dwellers

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील यांनी तर संचालन जगदीश मेहेर यांनी केले. कार्यक्रमाला विविध विभागाचे अधिकारी, योजनांचे लाभार्थी, सरपंच, पोलिस पाटील, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    नागरिकांच्या मालमत्तेच्या संरक्षणाची जबाबदारी महसूल विभागाची

    महसूल विभाग गतिमान, लोकाभिमुख आणि पारदर्शक होत आहे. नागरिकांच्या मालमत्तेच्या संरक्षणाची जबाबदारी महसूल विभागाची आहे. यापुढे प्रत्येक महसुली मंडळात चार महिन्यात विशेष शिबीर घेऊन नागरिकांच्या सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल.

    अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना मदत

    अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतमालाचे पंचनामे करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले असून त्यानुसार अनुदान मिळणार आहे. धनाचे चुकारे आणि बोनस त्वरित देण्यात येईल. संजय गांधी निराधार योजनेचे पैसे आता लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा होईल. ज्या लाभार्थ्यांचे खाते ऑनलाईन नाही, तेथे तलाठी घरोघरी जाऊन त्यांचे खाते ऑनलाईन करणार. पुढील पाच वर्षात एकही नागरिक शासकीय योजनांपासून वंचित राहणार नाही, असेही महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले. Government land patta distribution Chandrapur

    शासकीय पट्टे वाटप हा क्रांतीकारक निर्णय : आमदार किर्तीकुमार भांगडिया

    अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पट्टे वाटपाचा महत्त्वाचा आणि क्रांतीकारक निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. त्यानुसार ब्रह्मपुरी -चिमूर क्षेत्रात हा पहिलाच कार्यक्रम होत आहे, असे आमदार किर्तीकुमार भांगडिया यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे धान आणि शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देणारे हे सरकार आहे. मुख्यमंत्र्यांनी 20 हजार रुपये प्रति हेक्टर धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस दिला आहे. कृषी पंपाचे वीज बिल सरकारने माफ केले आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभे असून 32 हजार कोटींचे पॅकेज राज्य शासनाने जाहीर केल्याचेही आमदार भांगडिया म्हणाले. Government land patta distribution Chandrapur

    लाभार्थ्यांना पट्टेवाटप व विविध योजनांचा लाभ

    यावेळी मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना पट्टेवाटप तसेच विविध योजनांचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यात श्रीकृष्ण दोनोडकर, छाया नाकोडे, नानाजी ठाकरे, बाबुराव ठोंबरे, हेमराज गगने, रवींद्र उराडे, विकास नागतोडे, रघुनाथ झाडे, वसंती झाडे, योगेश्वर थोरे, धनंजय सहारे यांच्यासह प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत 211 लाभार्थ्यांना, लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत 26 लाभार्थ्यांना, स्वामित्व योजनेअंतर्गत सनद वाटप, कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत 6 लाभार्थ्यांना ट्रॅक्टरच्या चाव्यांचे वाटप, नगर परिषदेतील 46 लाभार्थ्यांना पट्टे वाटप तर भूमी अभिलेख विभागांतर्गत 41 लाभार्थ्यांना सनद वाटप करण्यात आली. Government land patta distribution Chandrapur

  • Chandrapur police raid on illegal brothel । चंद्रपुरातील ‘लकी” चा कारनामा; ताडोबा च्या नावाने ठरला अनलकी

    Chandrapur police raid on illegal brothel

    Chandrapur police raid on illegal brothel : चंद्रपूर, महाराष्ट्र: स्थानिक गुन्हे शाखा (Local Crime Branch – LCB) चंद्रपूरने शहरात अवैध मानवी तस्करी आणि वेश्याव्यवसायाच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री उशिरा रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हॉटेल ताडोबा अतिथी इन, लोहारा येथे छापा टाकून कुंटणखाना चालवणाऱ्या एका हॉटेल मॅनेजरला अटक करण्यात आली आहे.

    मॅनेजर स्वतःच्या फायद्यासाठी चालवत होता अवैध धंदा

    स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी रामनगर पोलीस स्टेशन परिसरात नियमित पेट्रोलिंग करत असताना, त्यांना मुखबिरामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, हॉटेल ताडोबा अतिथी इन येथे ‘लकी’ नावाचा व्यक्ती पीडित महिलांना हॉटेलमध्ये बोलावून त्यांच्याकडून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता अवैध वेश्याव्यवसाय चालवत आहे.

    Also Read : चंद्रपुरात १४० रुपयांची लाच घेताना दोघांना अटक

    या माहितीच्या आधारे, पोलिसांनी तातडीने हॉटेलवर छापा टाकला. छाप्यादरम्यान, आरोपी नामे लकी उर्फ लक्ष्मण रामसिंह शर्मा (वय २६, रा. अलवर, राजस्थान) हा हॉटेलचा मॅनेजर असून, तो पीडित महिलेकडून वेश्याव्यवसाय करून उपजीविका करत असल्याचे निष्पन्न झाले. Brothel trafficking case Chandrapur 

    ‘PITA’ ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल

    आरोपी लकी उर्फ लक्ष्मण शर्मा याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन रामनगर येथे अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम (PITA Act), कलम ३, ४, ५ आणि ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनैतिक मानवी व्यापार आणि वेश्याव्यवसाय चालवणाऱ्यांविरुद्ध हे कठोर कायदे लागू होतात. Maharashtra law enforcement prostitution

    सदरची महत्त्वपूर्ण आणि यशस्वी कारवाई श्री मुम्मका सुदर्शन (पोलीस अधीक्षक, चंद्रपूर) आणि श्री ईश्वर कातकडे (अपर पोलिस अधीक्षक, चंद्रपूर) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

    या पथकामध्ये विशेष पोलीस अधिकारी अमोल काचोरे (पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा), पोउपनी संतोष निंभोरकर, पोउपनी सुनील गौरकर, स.फो. धनराज कारकाडे, पो.हवा. सुरेंद्र महतो, दीपक डोंगरे, पोअ प्रफुल गारघटे, सुमित बरडे, शशांक बादमवार, किशोर वाकाटे, हिरालाल गुप्ता, चालक मिलिंद टेकाम, महिला पोलिस छाया निकोडे, अपर्णा मानकर, उषा लेडांगे, निराशा तीतरे (सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर/AHTU) यांचा समावेश होता.

    या कारवाईमध्ये समाजसेविका सरिता मालू, रेखा भारसकडे आणि एनजीओ चंद्रपूर यांनीही सक्रिय सहभाग घेतला.

    हॉटेल व्यावसायिकांना पोलिसांचे आवाहन

    “सर्व लॉजिंग हॉटेल व्यावसायिकांनी अशाप्रकारे अवैध कुंटणखाणी चालवू नयेत. जर कोणत्याही हॉटेलमध्ये अशा प्रकारचा अवैध धंदा चालवताना आढळून आला, तर संबंधित व्यक्ती आणि आस्थापनांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.”