Tag: News34 chandrapur

  • Juvenile crime Chandrapur । चंद्रपुरात अल्पवयीन मुलाचा कारनामा; १७ मोबाईल, सोने व दुचाकी जप्त

    Juvenile crime Chandrapur

    Juvenile crime Chandrapur : चंद्रपूर ५ नोव्हेम्बर (News३४) – २२ सप्टेंबर रोजी चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरीची घटना घडली होती ज्यामध्ये तब्बल २६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञाताने चोरून नेला होता, शहर पोलिसांना या प्रकरणात दीड महिन्यांनी यश मिळाले असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.

    २२ सप्टेंबर ला नांदगाव पोडे मध्ये राहणाऱ्या ३४ वर्षीय नीता आकाश आत्राम या आपल्या बिनबा गेट मध्ये राहणाऱ्या आईकडे गेली होती, रात्री घराचा दरवाजा टेकवून नीता आत्राम ह्या झोपी गेल्या असत्या त्यावेळी अज्ञाताने घरी प्रवेश करीत सोनीचे मंगळसूत्र, दोन सोन्याच्या जिवत्या व रोख रक्कम असा एकूण २६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमालावर हात साफ केला.

    Also Read : चंद्रपुरात मनसे पक्षात असंख्य नागरिकांचा प्रवेश

    याबाबत नीता आत्राम यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असता तब्बल दीड महिन्याच्या कालावधीनंतर चोरीचा गुन्हा विधिसंघर्ष बालकाने केला असल्याचे निष्पन्न होताच, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी विधिसंघर्ष बालकाकडून १८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. Chandrapur minor theft arrest

    अनेक गुन्हे उघड

    विशेष बाब म्हणजे त्या विधिसंघर्ष बालकाने चंद्रपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुचाकी चोरी व इतर गुन्हे केले असल्याची कबुली दिली, आरोपी बालकाकडून दुचाकी क्रमांक MH ३४ BS २४५२ सह तब्बल १७ वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल अँपल कंपनीचा लॅपटॉप असा एकूण ३ लाख २३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले, पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकाचे सपोनि राजेंद्र सोनवणे, पोउपनि दत्तात्रय कोलटें, विलास निकोडे, संजय धोटे, सचिन बोरकर, निकेश ढेंगे, जावेद सिद्दीकी, भावना रामटेके, कप्र्रचंड खरवार, रुपेश पराते, निलेश ढोक, योगेश पिदूरकर, विक्रम मेश्राम, प्रफुल भैसारे, दीपिका झिंगरे व सारिका गौरकार यांनी केली.

  • Chandrapur MNS new members entry । चंद्रपुरात मनसेची वाढती लोकप्रियता; असंख्य नागरिकांचा मनसेत प्रवेश

    Chandrapur MNS new members entry

    Chandrapur MNS new members entry : चंद्रपूर ५ नोव्हेम्बर (News३४) | जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग येत असतानाच, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवारी दाखवलेल्या शक्तीप्रदर्शनाने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे ढवळून काढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून चंद्रपूर शहर व परिसरातील मोठ्या संख्येने नागरिकांनी मनसेत प्रवेश केला. जिल्हा मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष अमन अंधेवार यांच्या पुढाकारातून झालेल्या या सामूहिक प्रवेश सोहळ्याने मनसेचा जनाधार झपाट्याने वाढत असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले.

    Also Read : चंद्रपूर मनपातील भ्रष्ट अधिकाऱ्यांची फाईल तयार

    दिनांक ०४ नोव्हेंबर २०२५ रोजी चंद्रपूर येथील मनसे कामगार सेनेच्या जिल्हा कार्यालयात आयोजित या पक्षप्रवेश कार्यक्रमात चंद्रपूर शहरासह नजिकच्या ग्रामीण भागातील विविध समाजघटक, वाड्या-तोड्यांतील कार्यकर्ते, युवक, अंगमेहनतीतून जगणारे कामगार आणि स्थानिक प्रश्नांवर आवाज उठविण्याची तयारी असलेल्या नागरिकांनी मनसेची विचारधारा स्वीकारली. मनसेच्या जिल्हा पातळीवरील नेतृत्वाने या नव्या उर्जेला संघटनात्मक बळ देण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक पातळीवरील रूढ पक्षसंघटनांना दशकानुदशके पर्यायी नेतृत्व न मिळाल्याने अनेक तरुणांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, राजकीय कामकाजात पारदर्शकता, बोलण्यापेक्षा कृतीला महत्त्व आणि स्थानिक प्रश्नांवरील आक्रमक भुमिकेमुळे मनसेकडे आकर्षण वाढत आहे. Chandrapur political shifts MNS party growth

    मनसेला जिल्ह्यात वाढता प्रतिसाद

    आमदार-नगरसेवक या पारंपरिक राजकारणापेक्षा “घोषणांपेक्षा अंमलबजावणी” या तत्त्वावर उभ्या असलेल्या मनसेला जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत कामगार, छोटे दुकानदार, ऑटोचालक, युवक आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जोडले जात असल्याचे दिसत आहे. चंद्रपूर शहरातील वाढत्या नागरी समस्या, रोजगार प्रश्न, वाहतूक कोंडी, स्थानिक उद्योगांच्या अडचणी आणि प्रशासनातील विलंब यांविषयी मनसेने सातत्याने आक्रमक भुमिका घेतल्याने नागरिकांत असलेली नाराजी आता पक्ष प्रबळ पर्याय म्हणून स्वीकारत असल्याचे या पक्षप्रवेशातून अधोरेखित झाले. Chandrapur MNS new members entry

    या भव्य प्रवेशामध्ये अमोल बापूजी लोनगाडगे, अरविंद वसता माडवगड, शेट्टीन गंगाराम कुर्मी, राजू लटारी उरकुडे, दत्ता रामाजी उखते, संदीप महादेव तोडासे, दिनेश कमलाकर ठेंगने, अमोल रामचंद्र काळे, सुलतान रजा, नितेश मोहन कपाले, मनिष सुरेश वांढरे, संदीप योगेश्वर मोहारे, नवनाथ कैलाश आत्राम, सचिन विठ्ठल धोटे, विनोद अशोक कोहळे, शैलेश चोखाजी रामटेके, सदीप शिवराम नागापुरे, सागर विजय कवाडे, एकनाथ कुवई सातपुते, दूरकर शंकर रोडे, हरिभाऊ वापराव वैद्य, दर्शन चंदजी दौड, संतोष सिताराम मडावी, पवन रमेश कुडसंगे, शुभम ननांवरे, अमित बाबुराव बडनेरवार, गणेश निलकंठ सोनटक्के, रमेश सरदार रायपुरे, Chandrapur local leadership MNS upcoming elections

    संतोष मारोतराव कुमरे, संजय रमेश कानकाटे, बाळ विठ्ठल सातहारे, लोकेश नामदेव जनहार, शेख शेरुशेख कादर, रमेश महादेव मानकर, रामकृष्ण गोविंदा भोंगर, अनिल भदजी कापूट, विजय गोपाल उपरे, संजय बालाजी जोशी, वाहधेंद्र आबाजी ड्रोनाडकर, पात्लम कवपूजी कोसर, फिरोज खान गुल खान, राकेश रतिंद्रनाथ मंडल, राजू भोंगळे, दिवाकर अरुण वाकडे, प्रेमाानंद कुशल साहू, गुलाब नामदेव पिंपळशेंडे, उत्तम सुभाष क्षीरसागर, रोहील जीवन येलकुलवार, विशाल दिलीप चिसुदे, रविंद्र बापूजी सिडाम, पंढरी कानकाटे, राकेश नागो आत्राम, सतीश भैय्याजी सुरपम, आयुष सुभाष खाडीलकर, तेजराम श्यामराव चंदनखेडे, उनमोल जीवन बगडे, गणेश विदेहले बल्लावार, प्रमोद शंकर सेदोकार, प्रफुल नामदेव नागोसे आणि आकाश दुर्गे यांसह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता. Chandrapur MNS new members entry

    या प्रवेशानंतर मनसे कामगार सेनेच्या जिल्हा नेतृत्वाने नव्या कार्यकर्त्यांना संघटनशिस्त, मनसेची कार्यसंहिता, निवडणूकपूर्व तयारी, बूथरचना आणि जनसंपर्क अभियान याविषयी मार्गदर्शन केले. स्थानिक निवडणुकांच्या दृष्टीने मनसेने चंद्रपूरात “बदलाचा पर्याय” म्हणून आक्रमक पद्धतीने मैदानात उतरण्याची तयारी केल्याचे स्पष्ट झाले आहे.

    मनसेचा हा विस्तार जिल्ह्यातील स्थापित पक्षांसाठी इशारा मानला जात असून, पुढील काही आठवड्यांत राजकीय समीकरणे अधिक तीव्रतेने हलतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

  • Maharashtra Local Body Elections Date । निवडणुकीची रंगत; चंद्रपूर जिल्ह्यातील १० नगरपरिषद व १ नगरपंचायत

    Maharashtra Local Body Elections Date

    Maharashtra Local Body Elections Date : चंद्रपूर ४ नोव्हेम्बर (News३४) – महाराष्ट्र राज्यातील २४६ नगरपालिका व ४२ नगरपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषदेत मतदानाच्या तारखा जाहीर केल्या आहे. २ डिसेम्बर ला मतदान तर ३ डिसेम्बर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. ४ नोव्हेम्बरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

    Also Read : महानगरपालिकेमधील भ्रष्ट अधिकाऱ्यांची तक्रार

    निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात नगरपंचायत व नगरपालिकेच्या निवडणूका घेण्यात येणार असून पुढच्या टप्प्यात जिल्हा परिषद व महानगरपालिकेच्या निवडणूक होणार आहे. राज्यातील 29 महापालिका, 32 जिल्हा परिषदा, 42 नगर पंचायती, 336 पंचायत समिती, 246 नगरपालिकांची मुदत संपली असून त्यासाठी निवडणुका घेण्यात येणार आहेत.

    चंद्रपूर जिल्ह्यातील १० नगरपरिषद तर १ नगरपंचायतीची होणार निवडणूक

    • बल्लारपूर नगरपरिषद
    • भद्रावती
    • वरोरा
    • ब्रह्मपुरी
    • घुग्गुस
    • राजुरा
    • गडचांदूर
    • चिमूर
    • मूल
    • नागभीड नगरपरिषद
    • भिसी नगरपंचायत

    चंद्रपूर जिल्ह्यात १० नगरपरिषद तर ७ नगरपंचायती आहे, ६ नगरपंचायतीमध्ये वर्ष २०२२ मध्ये निवडणूक झाली आहे. निवडणूक झालेल्यामध्ये सिंदेवाही, सावली, गोंडपिपरी, पोंभुर्णा, कोरपना, जिवती चा समावेश आहे.

    असं आहे निवडणुकीचे वेळापत्रक

    • नामनिर्देशन पत्र – 10 नोव्हेंबर
    • अंतिम मुदत – 17 नोव्हेंबर
    • छाननी – 18 नोव्हेंबर
    • अर्ज माघारी घेण्याची तारीख – 21 नोव्हेंबर
    • निवडणूक चिन्ह वाटप – 26 नोव्हेेबर
    • मतदान – 2 डिसेंबर
    • निकाल – 3 डिसेंबर

  • Congress stance on road divider corruption । विकासाच्या नावाखाली सुरु असलेल्या भ्रष्टाचाराला कांग्रेसचा विरोध – रामू तिवारी

    Congress stance on road divider corruption

    Congress stance on road divider corruption : चंद्रपूर : बागला चौक ते राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत सुरू असलेल्या रस्ता व दुभाजकाच्या वादग्रस्त कामावर काँग्रेस ने स्पष्ट भूमिका मांडली आहे. “विकास कामांना विरोध नाही, पण विकासाच्या नावाखाली होणाऱ्या भ्रष्टाचाराला विरोध आहे, अशी भूमिका काँग्रेसने प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून जाहीर केली आहे.

    Also Read : चंद्रपूर मनपातील भ्रष्ट अधिकाऱ्यांची फाईल तयार

    बागला चौक ते राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत रस्त्याचे बांधकाम व्हावे, यासाठी शहर काँग्रेसच्या वतीने यापूर्वी देखील आंदोलन करण्यात आले होते.  महाकाली प्रभागातील काँग्रेसच्या माजी नगरसेविका कल्पना लहामगे यांनी या दुभाजक कामातील गैरव्यवहारांविरोधात महानगरपालिका आयुक्तांना लेखी तक्रार सादर केली आहे.

    अव्वाच्या सव्वा दराने दुभाजक बांधण्याचे कंत्राट

    रस्त्याऐवजी अव्वाच्या सव्वा दराने दुभाजक बांधण्याचे ठेके देण्यात आले असून, हे सार्वजनिक निधीचा अपव्यय असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. माजी नगरसेविका लहामगे यांनी दिलेले पत्र हीच काँग्रेसची अधिकृत भूमिका असल्याचे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले. 


    तिवारी यांनी म्हटले की, मर्जीतल्या कंत्राटदाराला लाभ देण्यासाठी मनपाचे सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले, तर कंत्राटदाराला तितकाच फायदा झाला. कामाची गुणवत्ता शून्य असून जनतेच्या पैशांची दिवसाढवळ्या लूट सुरू आहे. काँग्रेसने या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित अभियंते, कंत्राटदार व अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

  • Mahapalika corruption against public funds । चंद्रपूर मनपातील भ्रष्ट अधिकाऱ्यांची फाईल तयार; देशमुखांची तक्रार

    Mahapalika corruption against public funds

    Mahapalika corruption against public funds : चंद्रपूर ४ नोव्हेम्बर (News३४) : मनपा आयुक्त विद्या गायकवाड व सर्व संबंधित अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराचे पुरावे व लेखी पत्र देऊनही वादग्रस्त रस्ता दुभाजकाचे काम मनपा प्रशासनाने बंद केले नाही. घामाच्या पैशातून कर देणाऱ्या नागरिकांना विकास कामाच्या नावाखाली खुलेआम लुटल्या जात आहे.परंतु मनपातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या या मुजोरीला सडेतोड उत्तर देण्यात येईल. या मुजोर अधिकाऱ्यांना योग्य वेळी हिशेब द्यावा लागेल.प्रत्येक भ्रष्ट अधिकाऱ्याची फाईल आपल्याकडे तयार आहे. कोणीही सुटणार नाही असा इशारा जनविकास सेनेचे अध्यक्ष माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी दिला.

    Also Read : कॅन्सर हॉस्पिटलला रतन टाटा यांचे नाव द्या – खासदार धानोरकर


    मुख्यमंत्री, नगर विकास मंत्री, प्रधान सचिव यांना पुराव्यासह तक्रार देऊनही भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई होत नाही. शासन-प्रशासनाचे भ्रष्ट अधिकाऱ्यांना संरक्षण मिळत आहे. सत्ताधारी पक्षाचे स्थानिक आमदार किशोर जोरगेवार मनपातील भ्रष्टाचाराविरुद्ध एक शब्दही काढत नाही. त्यांचे या सर्व भ्रष्टाचाराला अप्रत्यक्ष समर्थन मिळत असल्याचा आरोप देशमुख यांनी केला. Demand for action on municipal corruption Chandrapur

    निविदा प्रक्रियेत १ कोटीचे नुकसान

    दरम्यान वादग्रस्त रस्ता दुभाजकातील भ्रष्टाचाराच्या विरोधात देशमुख यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार केली. कारण नसतांना जुने मजबूत रस्ता दुभाजक तोडण्यात आले. निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार मनपाचे एक कोटी रुपयांचे नुकसान केले.

    तोडण्याच्या खर्चासह जुन्या दुभाजकाच्या कामाचा तसेच नविन दुभाजक तयार करण्याचा खर्च या प्रकरणातील संबंधित अधिकारी तत्कालीन आयुक्त विपिन पालीवाल व तत्कालीन शहर अभियंता विजय बोरीकर, भ्रष्टाचाराच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रभारी आयुक्त विद्या गायकवाड, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील,विद्यमान शहर अभियंता रवी हजारे,उपअभियंता आशिष भारती, सहाय्यक अभियंता प्रतीक्षा जनबंधू व कंत्राटदार मे. सूर्यवंशी एंटरप्राईजेस यांच्याकडून वसूल करण्यात यावा व त्यांचे विरुद्ध चौकशी करून शासकीय निधीचा अपव्यय केल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी अशी मागणी देशमुख यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे केलेल्या लेखी तक्रारीद्वारे केली आहे.

  • UDID Cards Maharashtra । मिशन मोडवर दिव्यांगांचे ‘UDID’ Card काढा – जिल्हाधिकारी गौडा

    UDID Cards Maharashtra

    UDID Cards Maharashtra : चंद्रपूर,  दि. 04 : जिल्ह्यात नोंदणीकृत  दिव्यांगांची संख्या 8578 असून त्यांच्या सक्षमीकरणासाठी शासन प्रशासन अनेक उपक्रम राबवित आहे. यात दिव्यांगांना ‘युडीआयडी’ कार्ड (स्वावलंबन कार्ड) वितरीत करणे, याचा समावेश आहे. त्यामुळे मिशन मोडवर दिव्यांगांना ‘युडीआयडी’ कार्डचे वाटप करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिल्या.

    जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांग सक्षमीकरणबाबत आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, जिल्हा सक्षमीकरण अधिकारी धनंजय साळवे, वैद्यकीय अधिकारी डॉ. बंडू रामटेके, दिव्यांग प्रतिनिधी निलेश पाझारे आदी उपस्थित होते.

    Also Read : चंद्रपूर जिल्ह्यातील सुगंधित तंबाखू माफियांवर होणार कारवाई

    ‘मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान’ उपक्रमांतर्गत दिव्यांगांचे ‘युडीआयडी’ कार्ड मोठ्या प्रमाणात काढण्याच्या सुचना राज्य शासनाने दिल्या आहेत, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, यासाठी तालुकानिहाय विशेष शिबिरांचे आयोजन करावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे काम अतिशय दर्जेदार आणि गतीने करावे. अत्याधुनिक उपकरणांची तेथे उपलब्धता असावी. या केंद्राकरीता मनुष्यबळ आणि इतर साधनसामुग्री बाबत आताच नियोजन करा, अशाही सूचना त्यांनी दिल्या. Disability empowerment UDID card

    नियोजनबध्द कार्यक्रम आखा

    सादरीकरण करतांना दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी धनंजय साळवे यांनी, जिल्ह्यात आतापर्यंत 2727 दिव्यांग बांधवांचे ‘युडीआयडी’ कार्ड काढण्यात आल्याचे सांगितले. यावेळी इंडियन रेडक्रॉस सोसायटीद्वारा संचालित दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या पदभरतीस मान्यता देणे, या केंद्राचे तात्पुरत्या स्वरुपात कामकाज डीईआयसी येथे सुरू करणे, ‘युडीआयडी’ कार्ड मिळण्याच्या दृष्टीने नियोजनबध्द कार्यक्रम आखून त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे, दिव्यांग व्यक्तिसाठी दृष्टी पोर्टल, चंद्रपूर जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणे, संकेतस्थळे, वाहतूक व इतर अनुषंगिक सोयीसुविधा दिव्यांगांसाठी सुगम्य करणे आदींचा आढावा घेण्यात आला.

  • Kishor Jorgewar demand for Ghugus hospital start । घुग्गुस ग्रामीण रुग्णालय तात्काळ सुरु करा – आमदार जोरगेवार यांची मागणी

    Kishor Jorgewar demand for Ghugus hospital start

    Kishor Jorgewar demand for Ghugus hospital start : चंद्रपूर ४ ऑक्टोबर (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक ग्रामीण रुग्णालयाची इमारत पूर्णत्वास आली आहे. मात्र, आवश्यक मनुष्यबळ आणि वैद्यकीय उपकरणांच्या अभावी हे रुग्णालय अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे घुग्गुस शहरासह आसपासच्या २० ते २५ गावांतील सुमारे ७० हजार नागरिकांना उपचारासाठी चंद्रपूरपर्यंत २५ ते ३० किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबईतील मंत्रालयात महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन  घुग्घुस ग्रामीण रुग्णालय तातडीने सुरू करण्याची मागणी केली.

    Also Read : कॅन्सर हॉस्पिटलला स्व. रतन टाटा यांचे नाव द्या – खासदार धानोरकर

    या भेटीत आमदार जोरगेवार यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले की, सार्वजनिक निधीतून उभारलेली ही आरोग्य सुविधा नागरिकांच्या सेवेत लवकरात लवकर रुजू होणे अत्यावश्यक आहे. रुग्णालयाची नवीन इमारत सर्व आधुनिक सोयींनी सुसज्ज असून, केवळ मनुष्यबळ आणि वैद्यकीय उपकरणांच्या अभावी ती वापरात येऊ शकलेली नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन रुग्णालय तात्काळ कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय व वित्तीय मंजुरी देण्याची मागणी आमदार जोरगेवार यांनी केली.

    उपकरणांची तात्काळ खरेदी करा

    रुग्णालयात स्त्रीरोग, बालरोग, भूलतज्ज्ञ अशा विशेषज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांसह वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, प्रयोगशाळा व क्ष-किरण तंत्रज्ञ, फार्मासिस्ट आणि इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच रुग्णालयासाठी पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, डिजिटल क्ष-किरण मशीन, ऑपरेशन थिएटर, प्रसूतिगृह, ॲनेस्थेशिया मशीन, व्हेंटिलेटर, ईसीजी मॉनिटर यांसारख्या आधुनिक उपकरणांची तात्काळ खरेदी करावी, असेही त्यांनी सांगितले. Ghugus hospital modern medical equipment

    आ. जोरगेवार यांनी पुढे सांगितले की, या सर्व प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यास  घुग्घुस  ग्रामीण रुग्णालय लगेच कार्यान्वित होऊन परिसरातील नागरिकांना स्थानिक पातळीवरच दर्जेदार आणि तात्काळ आरोग्य सेवा मिळेल. त्यामुळे नागरिकांना जिल्हा मुख्यालयावर अवलंबून राहावे लागणार नाही आणि ग्रामीण आरोग्यव्यवस्था अधिक सक्षम होईल. ना. प्रकाशजी आबिटकर यांनी या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले आहे.

  • Ratan Tata Cancer Hospital Chandrapur । चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलला ‘पद्मविभूषण स्व. रतन टाटा’ यांचे नाव द्या!

    Ratan Tata Cancer Hospital Chandrapur

    Ratan Tata Cancer Hospital Chandrapur : चंद्रपूर ४ ऑक्टोबर (News३४) : महाराष्ट्र शासन आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर येथे मध्य भारतातील सर्वात मोठे कर्करोग निदान आणि उपचार रुग्णालय उभारले जात आहे. या मानवतावादी आणि महत्त्वपूर्ण प्रकल्पात उद्योगपती आणि थोर दानशूर व्यक्तिमत्त्व पद्मविभूषण स्व. रतन टाटा यांचे अमूल्य योगदान आहे.

    Also Read : चंद्रपूर जिल्ह्यातील सुगंधित तंबाखू माफियांवर होणार कारवाई

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी या अत्याधुनिक रुग्णालयाला ‘पद्मविभूषण स्व. रतन टाटा कॅन्सर रुग्णालय’ असे नाव देण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन ही लोकहितकारी मागणी केली आहे आणि राज्य सरकार तसेच टाटा ट्रस्टकडे विशेष आग्रह धरला आहे.

    कॅन्सर हॉस्पिटलमुळे रुग्णांना मिळेल आधार

    स्व. रतन टाटा यांनी चंद्रपूरसारख्या दुर्गम भागात एवढे मोठे आणि अद्ययावत रुग्णालय उभे करण्यासाठी पुढाकार घेतला, ज्यामुळे विदर्भासह मध्य भारतातील लाखो गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पत्रात नमूद केले की, रतन टाटा हे चंद्रपूरच्या माता महाकालीच्या पावन भूमीवर येऊन गेले आहेत, ज्यामुळे चंद्रपूरकरांसाठी हा प्रकल्प अधिक महत्त्वपूर्ण ठरतो. Pratibha Dhanorkar appeal Ratan Tata hospital name

    खासदार धानोरकर म्हणाल्या, “रतन टाटा हे केवळ मोठे उद्योगपती नाहीत, तर ते माणुसकी आणि निस्वार्थ समाजसेवेचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. त्यांनी चंद्रपूरला दिलेले हे रुग्णालय विदर्भासाठी एक वरदान आहे. त्यांच्या या महान योगदानाचा यथोचित गौरव करण्यासाठी, या रुग्णालयाला त्यांचे नाव देणे ही कृतज्ञता व्यक्त करण्याची योग्य पद्धत ठरेल.”त्यांच्या नावाने हे रुग्णालय ओळखले गेल्यास, ते रतन टाटांच्या समाजसेवेच्या विचारांना कायम प्रेरणा देत राहील आणि इतरांनाही सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देईल, असे भावनिक आवाहनही खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केले आहे.

  • illegal tobacco supply chain chandrapur । चंद्रपूर जिल्ह्यात सुरु असलेल्या तंबाखूच्या अवैध व्यापाऱ्यांवर कठोर कारवाईची गरज

    illegal tobacco supply chain chandrapur

    illegal tobacco supply chain chandrapur : चंद्रपूर ३ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यात मागील अनेक वर्षांपासून प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा व्यवसाय जोमात सुरु आहे मात्र हे सर्व प्रशासनाच्या समोर होत असताना सुद्धा यावर कारवाई करण्याचं साधं धाडस प्रशासन तर्फे दाखविल्या जात नाही. चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर व चंद्रपूर शहर मधून मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखूची वाहतूक केल्या जाते. या सर्व अवैध व्यवसायाची चौकशी व्हावी याकरिता उच्चस्तरीय समिती नेमावी यासाठी सामाजिक समता संघर्ष समितीतर्फे जिल्हाधिकारी गौडा यांना निवेदन देण्यात आले.

    Also Read : २२ डिसेम्बर रोजी चंद्रपुरात कॅन्सर हॉस्पिटलचे लोकार्पण

    चंद्रपूर जिल्ह्यात प्रतिबंधित सुगंधित तंबाकू (गुटखा/पान मसाला) चा अवैध व्यवसाय उघडपणे फोफावत असून, यामुळे ओरल कॅन्सरची साथ वेगाने वाढत आहे. हा धंदा FSSAI कायदा २००६, COTPA २००३ आणि महाराष्ट्र गुटखा बंदी २०१२ चा थेट भंग करतो. जिल्हा रुग्णालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २ वर्षांत ओरल कॅन्सर रुग्णांत २५% वाढ झाली असून, यातील ६०% रुग्ण ४० वर्षांखालील आहेत. टीनएजर्स आणि युवक गुटख्याच्या व्यसनात सर्वाधिक अडकले असून, शाळा-कॉलेज परिसर, बसस्टँडवर २० रुपयांत गुटखा सहज उपलब्ध होतो. १५-१९ वयोगटातील मुले ओरल कॅन्सरच्या मार्गावर आहेत. illegal gutkha trade Chandrapur

    खुलेआम चालतो हा धंदा

    हा अवैध धंदा अपराधी तत्त्वांनी चालवला जातो, ज्यात तस्करी, करचोरी आणि माफिया नेटवर्क सामील आहे. पोलीस व औषध प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे हा कारोबार गल्ली-चौराह्यावर खुलेआम चालतो. नाममात्र कारवाई फक्त चिल्लर विक्रेत्यांवर होते, तर मुख्य सप्लायर आणि माफिया मोकाट राहतात, ज्यामुळे प्रशासनावर संशय निर्माण होतो. अधिवक्ता प्रीतीशा शाह यांनी जिल्हाधिकारी श्री विनय गौडा (आयएएस) यांना निवेदना द्वारे उच्चस्तरीय चौकशी समिती तात्काळ स्थापन करण्याची मागणी केली आहे.


    समितीचे उद्देश: अवैध व्यवसायाचे मूळ कारण, सप्लाय चेन आणि संरक्षण देणारे घटक शोधणे. मुख्य सप्लायर, डिस्ट्रीब्यूटर, गोदाम मालक आणि तस्करी नेटवर्कचे मास्टरमाइंड यांची ओळख पटवणे. कालबद्ध अहवाल सादर करणे.


    कारवाई केवळ पान ठेले किंवा छोटे विक्रेते यांच्यापुरती मर्यादित नसावी. हा धंदा थांबला नाही तर हजारो कुटुंबे उध्वस्त होतील आणि चंद्रपूरला “कॅन्सर फ्री जिल्हा” बनवण्याची संधी हातची जाईल
    निवेदन देतांना सामाजिक समता संघर्ष समितीचे अध्यक्ष मोहम्मद इरफ़ान शेख अधिवक्ता प्रीतिशा शाह सचिव धीरज तामगड़े व समिति चे सदस्य उपस्थित होते.