Tag: MH34

  • condolence message : आम्ही जोरगेवार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी – उपमुख्यमंत्री अजित पवार

    condolence message : आम्ही जोरगेवार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी – उपमुख्यमंत्री अजित पवार

    condolence message अम्मांच्या निधनाची बातमी समजताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून, “ईश्वरी सत्तेपुढे इलाज नाही” या शब्दांत दु:ख व्यक्त केले आहे. अम्मांचे आज सकाळी निधन झाले असून, उद्या सकाळी 9 वाजता बिनबा गेट येथील शांतीधाम येथे अंत्यविधी पार पडणार आहे.

    मजुराच्या अंगावर पडलं 200 किलो स्टील स्क्रॅप, झाला मृत्यू

    condolence message आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री गंगुबाई उर्फ अम्मा यांचे दीर्घ आजाराने आज रविवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता पसरताच नागरिकांनी त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी राजमाता निवासस्थानी मोठी गर्दी केली. अनेकांनी शोकसंदेशातून आपल्या भावना व्यक्त करत अम्मांना आदरांजली अर्पण केली. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पत्राद्वारे शोकसंवेदना व्यक्त करत अम्मांना आदरांजली अर्पण केली आहे.

    “अम्मांच्या निधनाची वार्ता ऐकून अतिशय वाईट वाटले, परंतु ईश्वरी सत्तेपुढे इलाज नाही. त्यांच्या आत्म्यास सद्गती मिळो. आम्ही आपल्या दु:खात सहभागी आहोत,” असे अजित पवार यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

  • OMAT WEST LIMITED : मजुराच्या अंगावर पडले 200 किलो स्क्रॅप

    OMAT WEST LIMITED : मजुराच्या अंगावर पडले 200 किलो स्क्रॅप

    OMAT WEST LIMITED चंद्रपूर : ताडाळी एमआयडीसी येथील ओमॅट वेस्‍ट लिमिटेड (जुने सिद्धबली इस्पात लिमि.) या कंपनीमध्ये २० फुटावरून २०० किलो स्‍टील स्‍क्रॅप अंगावर पडल्‍याने एक कामगार (अजय रवींद्र राम, रा. बिहार) मागील रविवारी गंभीररित्‍या जखमी झाला. रुग्णालयात नेले असता त्‍याला मृत घोषित केले. सदर कामगाराच्या कुटूंबियांना कुठलाही मोबदला न देता कंपनी व्‍यवस्‍थापनाने मृतदेह त्‍याच्या मूळगावी पाठवून दिला.

    राजकीय : भाजपची पहिली यादी जाहीर

    OMAT WEST LIMITED मृत्यू झालेल्‍या कामगारास तात्‍काळ आर्थिक मदत देण्यात यावी व कंपनी व्‍यवस्‍थापकांवर मनुष्यवधाचा गुन्‍हा दाखल करून कंपनीची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी उद्योग व कामगार विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

    ओमॅट वेस्‍ट लिमिटेड (जुने सिद्धबली इस्पात लिमि.) कंपनीमध्ये झालेल्‍या घटनेनंतर आमदार सुधाकर अडबाले यांनी भेट देऊन पाहणी केली असता अनेक गंभीर बाबी दिसून आल्‍या. सदर कंपनीचे स्ट्रक्चरल ऑडिट झालेले नाही. कंपनीत कामगारांना सुरक्षेच्या दृष्टीने नियमानुसार कोणत्याच सुविधा पुरविल्‍या जात नसून सेफ्टी ऑफिसर नाही. प्रदूषण मोठ्या प्रमाणात असून प्रदूषण नियंत्रणार्थ कुठल्‍याच उपाययोजना नाही. OMAT WEST LIMITED

    निवडणूक : विजय वडेट्टीवार यांची लीड किती?

    प्रदुषणामुळे कंपनी परिसरातील शेतपिकांचे मोठे नुकसान होत आहे. याकडे प्रदूषण नियंत्रण विभागाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. कंपनीत स्‍थानिक कामगार कमी आणि परप्रांतीय कामगारच जास्‍त प्रमाणात घेण्यात आले आहे. या परप्रांतीय कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशन न करता कामगारांची भरती करण्यात आली आहे. या कामगारांकडून नियमानुसार ८ तासांऐवजी १२ तास काम करवून घेतले जाते. वेतनसुध्दा नियमानुसार दिले जात नाही. यासह अनेक बाबींमध्ये अनियमितता सदर कंपनीत सुरू असल्‍याचे आमदार अडबाले यांना आढळून आले. OMAT WEST LIMITED

    या कंपनीमध्ये आधीदेखील अनेक कामगारांचा कंपनी व्‍यवस्‍थापनाच्या निष्काळजीपणामुळे मृत्‍यू झालेला आहे. यामुळे अजय रवींद्र राम या मयत कामगारास तात्‍काळ आर्थिक मदत देण्यात यावी व सदर कंपनीत व्‍यवस्‍थापनाच्या निष्काळजीपणामुळे झालेल्‍या कामगारांच्या मृत्‍यूस कंपनी व्‍यवस्‍थापन सर्वस्‍वी जबाबदार असून या कंपनी व्‍यवस्‍थापकांवर मनुष्यवधाचा गुन्‍हा दाखल करून कंपनीची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी उद्योग व कामगार विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

    तसेच येत्‍या हिवाळी अधिवेशनात सदर कंपनीच्‍या अनियमिततेबाबत प्रश्‍न उपस्‍थित करून कामगार व शेतकऱ्यांना न्‍याय मिळवून देणार असल्‍याचे आमदार सुधाकर अडबाले यांनी सांगितले.

  • Assembly candidate list bjp : चंद्रपूर जिल्ह्यातून भाजपचे 2 दिग्गज पुन्हा निवडणुकीच्या मैदानात

    Assembly candidate list bjp : चंद्रपूर जिल्ह्यातून भाजपचे 2 दिग्गज पुन्हा निवडणुकीच्या मैदानात

    Assembly candidate list bjp भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

    Assembly candidate list bjp विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 29 ऑक्टोबर असून उमेदवारी मागे घेण्याची तारीख ही 30 ऑक्टोबर आहे, विशेष म्हणजे 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे, 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

    भाजपची यादी

    लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यात मिळालेले मोठे यश बघता विधानसभा निवडणुकीत सुद्धा mva आघाडीवर राहणार अशी शक्यता वर्तविली जात आहे.

    महत्त्वाचे : चंद्रपूरचे विद्यमान आमदार जोरगेवार यांना मातृशोक

    राष्ट्रवादी कांग्रेस व शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर ही पहिली निवडणूक असणार, यामध्ये राष्ट्रवादी-शिवसेना दोन्ही पक्ष एकमेकांना भिडणार आहे.

    भाजप केंद्रीय समितीने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत 99 उमेदवारांचा समावेश आहे, ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना नागपूर-दक्षिण-पश्चिम, चंद्रशेखर बावनकुळे यांना कामठी मधून तर चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून सुधीर मुनगंटीवार, चिमूर विधानसभा क्षेत्रातून बंटी भांगडीया यांच्या नावाचा समावेश आहे.

    भाजप, राष्ट्रवादी कांग्रेस व वंचित आघाडीने उमेदवारांची नावे जाहीर केली आहे मात्र अद्यापही महाविकास आघाडी, शिवसेना शिंदे यांनी उमेदवार घोषित केले नाही.

  • Amma chandrapur : निराधारांना आधार देणारी ‘अम्मा” यांचं निधन

    Amma chandrapur : निराधारांना आधार देणारी ‘अम्मा” यांचं निधन

    amma chandrapur आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री गंगुबाई उर्फ अम्मा यांचे आज आजाराने निधन झाले. चंद्रपूर येथील राजमाता निवासस्थानी सकाळी 9.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

    महत्त्वाचे : चंद्रपूर जिल्ह्यात बोगस मतदार, डाव कुणाचा?, प्रशासनाने केली पोलिसात तक्रार

    Amma chandrapur सोमवारी 21 ऑक्टोबरला सकाळी 9 वाजता गांधी चौक येथील कोतवाली वार्ड येथील घरून अंत्ययात्रा निघणार आहे. बिनवा गेट येथील शांतीधाम येथे त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात येणार आहे.

    अम्मांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना विविध संस्थांच्या वतीने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या नावाने चंद्रपूरात सुरु असलेल्या “अम्मा का टिफिन” आणि “अम्मा कि दुकान” या उपक्रमामुळे अनेकांना हक्काची साथ मिळाली होती. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने उपचारासाठी त्यांना नागपूर येथे दाखल करण्यात आले होते. amma chandrapur

    सामाजिक : त्या दोघांसाठी आमदार जोरगेवार बनले देवदूत

    जवळपास 10 दिवस नागपूर येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा झाल्याने काल शनिवारीच त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. घरी डॉक्टरांच्या निगराणीत त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज सकाळी त्यांच्या प्रकृतीत पुन्हा बिघाड झाला आणि सकाळी 9.30 वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

    मागील अनेक वर्षांपासून गंगुबाई उर्फ अम्मा या गांधी चौकात टोपल्या विकायच्या, आपल्या साध्या भोळ्या स्वभावाने त्यांची एक वेगळीच ओळख निर्माण झाली होती, गरिबी व संघर्षांच्या काळात त्यांनी टोपल्या विणून मुलगा किशोर व प्रशांत यांना मोठं केलं, विशेष बाब म्हणजे अम्मा चा आशीर्वाद सोबत घेत किशोर जोरगेवार हे समाजकार्यात रुजू झाले, काळ लोटला आणि वर्ष 2019 ला किशोर जोरगेवार हे आमदार बनले, अनेक भाषणावेळी मी टोपली विकणाऱ्याचा मुलगा आहे माझी आई आजही टोपल्या विकते असा उल्लेख आमदार जोरगेवार करायचे.

    शहरातील असलेले निराधार नागरिक उपाशी झोपू नये यासाठी गंगुबाई यांनी किशोर जोरगेवार यांना निराधार नागरिकांना आपल्याद्वारे टिफिन उपलब्ध करूया अशी कल्पना दिली, मातोश्री चा आदेश मिळाल्यावर आमदार जोरगेवार यांनी अम्मा का टिफिन उपक्रम राबविला.

    आज निराधारांचा आधार हिरावला, आज अनेक निराधारांचे डोळे अम्माच्या जाण्याने अश्रूने पाणावले आहे.

  • Online Voter Registration : चंद्रपूर जिल्ह्यात बोगस मतदार आले कुठून?

    Online Voter Registration : चंद्रपूर जिल्ह्यात बोगस मतदार आले कुठून?

    Online Voter Registration राजुरा विधानसभा मतदार संघात अज्ञात व्यक्तिंकडून ऑनलाईन पध्दतीने मतदारांची नोंदणी केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच चुकीच्या पध्दतीने नोंदणी केलेल्या 6853 मतदारांच्या नावांचा समावेश मतदार यादीत करण्यात आला नाही. दरम्यान या प्रकरणाची योग्य तपासणी करून तात्काळ कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी पोलिस विभागाला दिले आहे.

    मानव वन्यजीव संघर्ष : वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू

    Online Voter Registration 70-राजुरा विधानसभा मतदार संघातील मतदार यादीचा निरंतर कार्यक्रम भारत  निवडणूक आयोगाद्वारे सुरू आहे. यापुर्वी मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला व राजकीय पक्षाची बैठक घेऊन 6 ऑगस्ट 2024 रोजी प्रारुप मतदार यादी व 30 ऑगस्ट 2024 रोजी अंतिम मतदार यादी राजुरा विधानसभा मतदार संघातील प्रत्येक मतदान केंद्रावर प्रसिध्द करण्यात आली.

    याअंतर्गत 70- राजुरा विधानसभा मतदार संघातील राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यांमधून 3 ऑक्टोबर 2024 पासून मोठया प्रमाणात ऑनलाईन स्वरुपात नवीन मतदार नोंदणी करीता अर्ज प्राप्त झाले होते. सदर नोंदणी अर्जाची सर्व सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरीच्या तहसीलदारांमार्फत सखोल तपासणी करण्यात आली.

    राजकीय : विजय वडेट्टीवार यांचं पारडं जड

    त्यापैकी 6853 अर्जांमध्ये अर्जदाराचा फोटो नसणे, अर्जासोबत जन्मतारीख व  रहिवासीचा पुरावा नसणे, अर्जामध्ये नमूद नाव व पुरावा हा वेगवेगळया व्यक्तीचा असणे, एकच फोटो एकापेक्षा अधिक अर्जावर असणे, वेगवेगळया नावाने अर्ज करणे, अशा स्वरुपाचे अर्ज निदर्शनास आले.

    या सर्व अर्जांची बीएलओ मार्फत पडताळणी करून सदरचे सर्व अर्ज नाकारण्यात आले असून त्यांचा समावेश मतदार यादीमध्ये करण्यात आलेला नाही. सदरचे सर्व अर्ज हे Voter Helpline App किंवा  NVSP Portal याद्वारे Online स्वरुपात करण्यात आले होते. वास्तविकपणे वयाचे 18 वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांकरीता मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करणे, नाव कमी करणे, त्यामध्ये बदल करणे याकरीता भारत निवडणूक आयोगामार्फत ही ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. Online Voter Registration

    परंतु या सुविधेचा गैरफायदा घेवून काही अज्ञात व्यक्तींनी चुकीचे फॉर्म ऑनलाईन भरल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्यांचा शोध घेऊन संबंधित व्यक्तिंवर कायदेशीर कार्यवाही करण्याकरीता पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. Online Voter Registration

    मतदार नोंदणी करीता ऑनलाईन प्राप्त झालेले 6853 अपात्र अर्ज विहित कार्यपध्दतीचा अवलंब करून नामंजुर करण्यात आले आहेत व अशा अर्जदारांचा मतदार म्हणून मतदार यादीत समावेश करण्यात आला नसल्याचे राजुराचे उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी रविंद्र माने यांनी कळविले आहे.

  • sindewahi tiger attack : वाघाचा हल्ला, पुन्हा बळी

    sindewahi tiger attack : वाघाचा हल्ला, पुन्हा बळी

    sindewahi tiger attack वाघाच्या हल्ल्यात शेतमजूर जागीच ठार, सिंदेवाही तालुक्यातील डोंगरगाव बिटातील घटना

    sindewahi tiger attack वर्षभरापासून चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्षांच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, मूल, सिंदेवाही या भागात गावकरी वाघाच्या दहशतीमध्ये आले आहे. सिंदेवाही येथे वाघाच्या हल्ल्यात एकाचा बळी गेल्याची घटना आज घडली.

    राजकीय : विकासक्रांती आणि ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात विजय वडेट्टीवार यांचं पारडं जड

    ब्रह्मपुरी वनविभागांतर्गत येणाऱ्या सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील डोंगरगाव बीट, राखीव वन कक्ष क्रमांक २५२ मध्ये एका शेतमजुरावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना शनिवारी (दि. १९) दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. विलास तुळशीराम मडावी (४७, रा. डोंगरगाव) असे मृतकाचे नाव आहे.


    सध्या धान कापणी सुरू असल्यामुळे धान कापल्यानंतर त्याचे गठ्ठे बांधण्यासाठी शेतमजूर हे जंगलामधून जाऊन सिंधी कापून गोळा करतात. त्याची दोरी बनवितात. यासाठी आज डोंगरगाव येथील चार-पाच इसम जंगलामध्ये सिंधी आणायला गेले होते. गावालगत सिंधीची झुडपे असतानासुद्धा कमी वेळात जास्तीत जास्त सिंधी मिळाव्या म्हणून घनदाट जंगलात हे सर्वजण गेले. Sindewahi tiger attack

    गुन्हेगारी : चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

    कक्ष क्रमांक २५२ मध्ये अचानक विलास मडावी यांच्यावर वाघाने हल्ला केला. यात विलास जागीच ठार झाला. घटनेची माहिती तत्काळ सिंदेवाही पोलिस कर्मचारी व सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर यांना देण्यात आली. त्यांनी वन कर्मचाऱ्यासह घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. मृतदेह सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठविण्यात आला. वनविभागाकडून तात्काळ मदत म्हणून मृतकाच्या कुटुंबीयांना २५ हजार रुपयांची मदत करण्यात आली.


    घटनास्थळी लावले कॅमेरे

    विलास मडावी याला वाघाने ज्या ठिकाणी ठार केले, त्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावून परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे. अशा घटना घडू नये म्हणून परिसरातील लोकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे, तर परिसरातील लोकांनी तात्काळ त्या वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.

  • Brahmapuri Assembly Constituency : विकासक्रांती मुळे विजय वडेट्टीवार यांचं पारडं जड

    Brahmapuri Assembly Constituency : विकासक्रांती मुळे विजय वडेट्टीवार यांचं पारडं जड

    Brahmapuri Assembly Constituency ब्रम्हपुरी मतदारसंघात केलेल्या “विकासक्रांतीमुळे’ वडेट्टीवारांचे पारडे जड

    Brahmapuri Assembly Constituency २०२४ च्या विधानसभा निवडणुकीचे नुकतेच बिगुल वाजले. सर्व राजकीय पक्ष होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कामाला लागून उमेदवार चाचपणीत व्यस्त झाले आहे. अशातच संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात राज्याचे विरोधी पक्षनेते,काँग्रेस पक्षनेते तथा महाविकास आघाडीचे उमेदवार विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या विकास क्रांतीमुळे त्यांचे पारडे जड असुन भाजप व अन्य पक्षाला या विधानसभा क्षेत्र निवडणूकीत तगड्या आव्हानाला सामोरे जावे लागण्याची परिस्थिती पुन्हा एकदा उद्भवली आहे.

    महत्त्वाचे : निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केले हे महत्वाचे आवाहन

    राज्याच्या राजकारणात राज्याचे विकासाभिमुख नेतृत्व म्हणून विजय वडेट्टीवार हे नाव कानाकोपऱ्यात पोहचले आहे. वनविकास महामंडळ अध्यक्ष ते राज्याचे विरोधी पक्षनेते पदापर्यंत मजल मारतांना अनेक कठीण परिश्रम घेणाऱ्या वडेट्टीवारांनी जनतेच्या मूलभूत गरजा, क्षेत्राच्या अडचणी, क्षेत्रात सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक परिस्थिती, व सामजिक गरजा लक्षात घेत सर्व धर्म, सर्व समाज यांना न्याय देऊन मतदारांची मने जिंकली. (Brahmapuri Assembly Constituency)

    चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यांतील करंजी हि त्यांची जन्म भूमी असली तरी वडिलांचे छत्र हरपल्या नंतर गडचिरोली येथे त्यांच्या कुटुंबाचे स्थानांतर झाले. अगदी कमी वयात लोकसेवा करण्यासाठी दुर्गम गडचिरोली जिल्हा पिंजून काढून अनेक प्रश्नांना घेऊन त्यांनीं आंदोलने केली. व जनतेसाठी तुरुंगवास देखील भोगला. यानंतर त्यांनीं चिमूर विधानसभेवर विजय मिळवला. तर मागील दहा वर्षापासून ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे ते प्रतिनिधित्व करीत आहे. (Brahmapuri Assembly Constituency)

    झुडपात खेळ सुरू, 7 जणांना अटक


    राजकारणा पुरते राजकरण मात्र उर्वरित वेळेत क्षेत्राचा सर्वांगिण विकास , जनतेच्या मूलभूत समस्या, आरोग्याच्या समस्या, शुद्ध पेयजल, उच्च प्रतीचे प्रवास मार्ग, सामाजिक बांधिलकी जोपासत अनेकांच्या हाती काम, आरोग्य शिबिरे,शैक्षणिक विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी वाचनालये, क्रीडा पट्टू साठी क्रीडा मैदाने व ईतर गरजा पूर्ण करीत क्षेत्राचा विकास साधण्यात त्यांनीं कुठलीही कसर सोडली नाही.

    २०१४ च्या निवडणुकांमध्ये संपूर्ण देशात मोदी लाट असताना व खुद्द मोदी हे ब्रम्हपुरी येथे प्रचार सभेसाठी आले असतांनाही जनतेनी पुर्ण ताकदीनिशी वडेट्टीवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून विजयश्रीची माळ त्यांच्याच गळ्यात घातली. आज घडीला काँग्रेस तथा महाविकास आघाडीचे उमेदवार विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात कुठला उमेदवार द्यावा असा पेच विरोधकांपुढे उभा ठाकला आहे.

    गेल्या १० वर्षात ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात गोसेखुर्द धरणाच्या पाणीसाठ्यातून मुबलक पाणी क्षेत्रासाठी उपलब्ध करून दिले. यामुळें ब्रम्हपुरी मतदार संघातील सावली, ब्रम्हपुरी, व सिंदेवाही या तीनही तालुक्यांतील ८० टक्के शेतकऱ्यांची शेती ओलिताखाली येऊन समृद्ध शेती कडे वाटचाल सुरू आहे. या सर्व विकासात्मक दूर दृष्टिकोना मुळे ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात विजय वडेट्टीवार यांचेच पारडे जड असुन विरोधी पक्षांच्या उमेदवारांना येथे आगामी निवडणुकांमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. हे तेवढेच सत्य…!

  • Election campaign 2024 : वरोरा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे महत्त्वाचे आवाहन

    Election campaign 2024 : वरोरा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे महत्त्वाचे आवाहन

    Election campaign 2024 भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. त्याकरीता 75 – वरोरा विधानसभा मतदारसंघांतर्गत निवडणूक प्रक्रियेत प्रचार रॅली, मिरवणुका व सभेकरिता परवानगी मिळण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षेत स्थापन करण्यात आलेल्या एक खिडकी परवानगी कक्षामध्ये अर्ज सादर करण्यात येतो, परंतु निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शन पुस्तिकेनुसार नमूद केलेल्या अटीच्या अधीन राहून परवानगी प्रदान करण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे.

    चंद्रपूर मनपाने 2 हजार 60 किलो प्लॅस्टिक केले जप्त

    Election campaign 2024 परवानगी मागणारा राजकीय पक्ष / उमेदवार निर्धारित नमुन्यात जोडपत्र ड -एक खर्च योजनांच्या तपशीलासह 48 तास आधी संबंधित निवडणूक अधिकाऱ्याच्या कार्यालयात परवानगीसाठी कक्ष प्रभारीकडे अर्ज करेल. कोणत्याही राजकीय पक्षास / /उमेदवारास अर्ज केल्याच्या सात दिवसाच्या आत आयोजित करावयाचे कार्यक्रम / प्रचार यात्रा / मिरवणुका यासंदर्भात परवानगीसाठी अर्ज करता येईल. एका विशिष्ट दिवसासाठी एकापेक्षा जास्त कार्यक्रमासाठी स्वतंत्र अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

    जंगलातील झुडपात जुगार, स्थानिक गुन्हे शाखेने मारली धाड

    त्यानुसार 75 – वरोरा विधानसभा मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शन पुस्तिकेतील नमूद अटींच्या अधीन राहून निवडणूक प्रक्रियेत प्रचार रॅली, मिरवणुका व सभेबाबत परवानगी अर्ज सादर करण्यात यावा, असे आवाहन वरोराच्या उपविभागीय अधिकारी तथा वरोरा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी दोन्तुला जेनित चंदा यांनी केले आहे.

    आवाहन

  • Nuisance Investigation Team : चंद्रपूर मनपाची मोठी कारवाई

    Nuisance Investigation Team : चंद्रपूर मनपाची मोठी कारवाई

    Nuisance Investigation Team चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकवर धडक कारवाई सुरूच असुन उपद्रव शोध पथकाद्वारे शहरात २ जागी कारवाई करून सुमारे २ हजार ६० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.

    महत्त्वाचे : चंद्रपूर जिल्ह्यात बोगस मतदारांच्या नोंदणी

    Nuisance Investigation Team  बंदी असलेल्या व एकदाच वापर करता येणाऱ्या प्लास्टिकवर कारवाई करण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या निर्देशानुसार ८ टीम्स बनविण्यात आल्या आहेत. या सर्व चमूंनी काल शहरात एकाच वेळी कारवाई सुरु केली. यात पठाणपुरा येथील वाडी गोल्ड ट्रान्सपोर्ट तसेच बिनबा गेट येथील कुमार ट्रान्सपोर्ट या दोन्ही गोडाऊनवर संध्याकाळच्या सुमारास उपायुक्त रवींद्र भेलावे व सहायक आयुक्त अक्षय गडलिंग यांच्या वेगवेगळ्या चमुने धाड टाकत वाडी गोल्ड ट्रान्सपोर्ट येथुन २ हजार १० किलो तर कुमार ट्रान्सपोर्ट येथुन ५० किलो असे एकुण २ हजार ६० किलो बंदी असलेले प्लास्टिक जप्त केले. 

    गुन्हेगारी : चंद्रपूर मेडिकल कॉलेज च्या मागील झुडपात सुरू होता हा खेळ  

    यावेळेस सुद्धा या गोडाऊन संबंधी गुप्त माहिती मनपास प्राप्त झाली होती. प्लास्टीक साठा,पिशव्यांची माहीती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येत असुन दिलेली माहीती खरी निघाल्यास ५ हजारांचे बक्षिस दिल्या जात असल्याने अनेक सुजाण व्यक्तींकडुन अवैध साठ्यासंबंधी तक्रारी मनपास प्राप्त होत आहेत. Nuisance Investigation Team

         एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरावर राज्यात १ जुलै २०२२ पासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली असुन महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना २०१८ नुसार पाचशे रुपये जागेवरच दंड, संस्थात्मक पातळीवर ५ हजार रुपयांपर्यंत दंड,दुसऱ्यांदा वापर केल्यास १० हजार रुपये, तर तिसऱ्यांदा गुन्हा केला तर २५ हजार रुपये दंड आणि ३ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आहे.


         सदर कारवाई आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त रवींद्र भेलावे व उपायुक्त मंगेश खवले यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात सहायक आयुक्त अक्षय गडलिंग,सहायक आयुक्त संतोष गर्गेलवार, डॉ. अमोल शेळके,राहुल पंचबुद्धे,स्वच्छता निरीक्षक भूपेश गोठे, जगदीश शेंद्रे,मनीष शुक्ला,अनिल खोटे, भरत बिरिया,डोमा रंगारी, बंडू चहारे, विक्रम महातव,डोमा विजयकर,अमरदीप साखरकर यांनी केली.

  • Bogus Matdar : चंद्रपूर जिल्ह्यात बोगस मतदारांच्या नोंदणी

    Bogus Matdar : चंद्रपूर जिल्ह्यात बोगस मतदारांच्या नोंदणी

    bogus matdar चंद्रपूर – नुकतेच जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी लोकसभा निवडणुकीनंतर चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 51 हजार 393 नव्या मतदारांची नोंदणी झाल्याचा गवगवा केला मात्र यामध्ये काही बोगस मतदारांचा समावेश असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.


    Bogus matdar कोरपना तालुक्यात शहरात व ग्रामीण भागातील 52 गावातील एकूण 62 बुथवर हजारो बोगस मतदारांची ऑनलाइन नोंदणी झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. विशेष म्हणजे बोगस ऑनलाईन नोंदणी झालेले सर्व मतदार हे परप्रांतीय असल्याचे आडनावावरून दिसून येते. यात यादव, परमार, पांडे अशी नावे आहेत.

    गुन्हेगारी : चंद्रपूर मेडिकल कॉलेजच्या मागे सुरू होता हा खेळ, 7 जणांना अटक


    निवडणूक आयोगाच्या प्राथमिक चौकशीदरम्यान या मतदार नोंदणीतील अनियमितता उघडकीस आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे आगामी निवडणुकीच्या निष्पक्षतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. Bogus matdar

    आदर्श आचारसंहिता : बनावट दारू व ट्रॅव्हल्स ची चौकशी करा

    यात तालुक्यातील गडचांदूर, कोरपना, लखमापूर, नांदा, बिबी, बाखर्डी, आवाळपूर, उपरवाही या मोठ्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस नावांची नोंद झालेली आहे. तर गेल्या 10 ऑक्टोंबर पर्यंत कोरपना तालुक्यात 3 हजार बोगस मतदार असल्याचं स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आलं असून हा आकडा निश्चितच वाढणार आहे.

    बोगस नोंदणी कशी उघड झाली?

    मतदार यादीतील नावे आणि नोंदणीकृत माहितीची सखोल छाननी सुरू असताना काही स्थानिकांच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर प्रशासनाने मतदार यादी तपासली असता, अनेक बोगस मतदारांची नोंदणी आढळली. हजारो परप्रांतीयांची नावे, खोटा मोबाईल क्रमांक व बनावट पत्ते आणि जन्मतारीख या नोंदवलेल्या मतदार यादीत आढळल्या आहेत. विशेष म्हणजे बहुतांश ऑनलाईन अर्ज रात्री 12.00 वाजताच्या नंतर भरण्यात आल्याचे दिसून आले.

    मी दोनदा लखमापूर ग्राम पंचायत उपसरपंच आहे मात्र 328 नवे मतदार एकच वेळेस नोंदणी झालेली ही पहिली वेळ आहे. आणि ते मतदार माझ्या गावात राहत नाही हे सर्व बोगस मतदार आहे याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी आहे.

    प्रतिक्रिया – मोरेश्वर आस्वले उपसरपंच (लखमापूर)