bogus matdar चंद्रपूर – नुकतेच जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी लोकसभा निवडणुकीनंतर चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 51 हजार 393 नव्या मतदारांची नोंदणी झाल्याचा गवगवा केला मात्र यामध्ये काही बोगस मतदारांचा समावेश असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
Bogus matdar कोरपना तालुक्यात शहरात व ग्रामीण भागातील 52 गावातील एकूण 62 बुथवर हजारो बोगस मतदारांची ऑनलाइन नोंदणी झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. विशेष म्हणजे बोगस ऑनलाईन नोंदणी झालेले सर्व मतदार हे परप्रांतीय असल्याचे आडनावावरून दिसून येते. यात यादव, परमार, पांडे अशी नावे आहेत.
गुन्हेगारी : चंद्रपूर मेडिकल कॉलेजच्या मागे सुरू होता हा खेळ, 7 जणांना अटक
निवडणूक आयोगाच्या प्राथमिक चौकशीदरम्यान या मतदार नोंदणीतील अनियमितता उघडकीस आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे आगामी निवडणुकीच्या निष्पक्षतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. Bogus matdar
आदर्श आचारसंहिता : बनावट दारू व ट्रॅव्हल्स ची चौकशी करा
यात तालुक्यातील गडचांदूर, कोरपना, लखमापूर, नांदा, बिबी, बाखर्डी, आवाळपूर, उपरवाही या मोठ्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस नावांची नोंद झालेली आहे. तर गेल्या 10 ऑक्टोंबर पर्यंत कोरपना तालुक्यात 3 हजार बोगस मतदार असल्याचं स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आलं असून हा आकडा निश्चितच वाढणार आहे.
बोगस नोंदणी कशी उघड झाली?
मतदार यादीतील नावे आणि नोंदणीकृत माहितीची सखोल छाननी सुरू असताना काही स्थानिकांच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर प्रशासनाने मतदार यादी तपासली असता, अनेक बोगस मतदारांची नोंदणी आढळली. हजारो परप्रांतीयांची नावे, खोटा मोबाईल क्रमांक व बनावट पत्ते आणि जन्मतारीख या नोंदवलेल्या मतदार यादीत आढळल्या आहेत. विशेष म्हणजे बहुतांश ऑनलाईन अर्ज रात्री 12.00 वाजताच्या नंतर भरण्यात आल्याचे दिसून आले.
मी दोनदा लखमापूर ग्राम पंचायत उपसरपंच आहे मात्र 328 नवे मतदार एकच वेळेस नोंदणी झालेली ही पहिली वेळ आहे. आणि ते मतदार माझ्या गावात राहत नाही हे सर्व बोगस मतदार आहे याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी आहे.
प्रतिक्रिया – मोरेश्वर आस्वले उपसरपंच (लखमापूर)

Leave a Reply