Tag: MH34

  • Limited Prohibition of alcohol : चंद्रपूर जिल्ह्यात 4 दिवस दारूबंदी

    Limited Prohibition of alcohol : चंद्रपूर जिल्ह्यात 4 दिवस दारूबंदी

    Prohibition of alcohol विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 ही खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक कालावधीत चंद्रपूर जिल्हयातील सर्व ठोक व किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्त्या चार दिवस बंद राहणार आहेत.

    महत्त्वाचे : दहावीची परीक्षा झाली सोप्पी

    Prohibition of alcohol 18 नोव्हेंबरच्या सायंकाळी 6 वाजतापासून 19 व 20 नोव्हेंबरचा संपूर्ण दिवस तसेच मतमोजणीचा दिनांक 23 नोव्हेंबर रोजी संपूर्ण दिवस मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले आहे.

    Prohibition of alcohol विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून सदर कार्यक्रमानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेच्या सर्व जागांकरीता बुधवार, दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तसेच मतमोजणी शनिवार, दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे.

                 लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1951 च्या कलम 135 (सी) च्या तरतुदीनुसार तसेच महाराष्ट्र देशी दारु नियम 1973 नियम 26(1)(सी) (1) महाराष्ट्र विदेशी मद्य (सेल ऑन कॅश, रजिस्टर ऑफ सेल्स इ.) नियम 1969 मधील नियम 9 ए (2) (सी )(1) तसेच विशेष परवाने व अनुज्ञप्ती नियम 1952 चे नियम 5(10) (बी) (सी) (1) व महाराष्ट्र ताडी दुकाने (अनुज्ञप्ती) आणि ताडी झाडे (छेदणे)  नियम 5 (अ) (2) मधील तरतुदीनुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 ही खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणुक कालावधीत चंद्रपूर जिल्हयातील सर्व ठोक व किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्त्या नमुना (सीएल-2, सीएल-3, सीएल/ एफएल/टिओडी-3  एफएल-1,  एफएल-2  एफएल-3  एफएल-4, एफएल/बीआर-2, टिडी-1 (ताडी) इत्यादि सर्व प्रकारच्या अनुज्ञप्त्या खालीलप्रमाणे पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.

                 नमुद कालावधीत सदर ओदशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित अनुज्ञप्ती धारकांविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अन्वये कडक कारवाई करण्यांत येईल, तसेच ते धारण करीत असलेली अनुज्ञप्ती निलंबीत अथवा रद्द करण्यात येईल, त्यांनी नोंद घ्यावी, असेही आदेशात नमुद आहे.

  • Latest 10th ssc board exam : दहावीची परीक्षा आता आणखी सोपी

    Latest 10th ssc board exam : दहावीची परीक्षा आता आणखी सोपी

    10th ssc board exam दहावीची परीक्षा आता आणखी सोपी! गणित, विज्ञानात ३५ पेक्षा कमी गुण मिळूनही अकरावीला प्रवेश जाणून घ्या नवे बदल काय?

    10th ssc board exam राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यात दहावीच्या परीक्षेसंदर्भात ( SSC ) महत्त्वाचा बदल प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यानुसार गणित आणि विज्ञान या विषयात ३५ गुणांपेक्षा कमी आणि २० गुणांपेक्षा अधिक गुण असल्यास अकरावीला प्रवेश घेता येणार आहे.

    सुकाणू समितीने कुठल्या आराखड्याला दिली मंजुरी?

    राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) तयार केलेल्या राज्य अभ्यासक्रम आराखड्याच्या मसुद्याला राज्य शासनाने नियुक्त केलेल्या सुकाणू समितीने अंतिम मान्यता दिली आहे. हा आराखडा राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

    महत्त्वाचे : उमेदवारी अर्ज भरण्याचा पहिला दिवस

    राज्य मंडळातर्फे दहावीची परीक्षा ( SSC ) घेण्यात येते. प्रचलित पद्धतीनुसार दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी सर्व विषयांत किमान ३५ गुण मिळवावे लागतात. मात्र अनेकांना गणित, विज्ञान विषयांची भीती वाटते. त्या दडपणाखाली अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण होतात. त्यांना सत्र कायम ठेवण्याची मुभा (एटीकेटी) असल्याने अकरावीला प्रवेश मिळतो. पण, पुरवणी परीक्षा देऊन अनुत्तीर्ण विषयांत उत्तीर्ण व्हावे लागते. 10th ssc board exam

    गणित आणि विज्ञानात ३५ पेक्षा कमी गुण मिळाले तरी काळजी नाही

    आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार होणाऱ्या बदलानुसार दहावीच्या परीक्षेत ( SSC ) विद्यार्थ्याने गणित आणि विज्ञान या विषयांत ३५ पेक्षा कमी आणि २०पेक्षा जास्त गुण मिळवल्यास त्या विद्यार्थ्याला अकरावीला प्रवेश दिला जाणार आहे. मात्र, पुढील शिक्षणात गणित किंवा विज्ञान किंवा दोन्ही विषयांवर आधारित विषय घेता येणार नाहीत असा शेरा गुणपत्रिकेवर नमूद केला जाईल. तसेच गणित, विज्ञान या विषयांतील अभ्यासक्रम घ्यायचे असल्यास विद्यार्थ्याला पुरवणी परीक्षेत त्या विषयांत उत्तीर्ण ( SSC ) व्हावे लागणार आहे. 10th ssc board exam

    तज्ञ काय म्हणतात?
    या बदलाबाबत माजी मुख्याध्यापक म्हणाले, की दहावीला अनुत्तीर्ण झाल्याने शिक्षण सोडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे गणित आणि विज्ञान विषयांत तांत्रिकदृष्ट्या अनुत्तीर्ण झाल्यास गणित आणि विज्ञान विषयांशी संबंधित उच्च शिक्षण घ्यायचे नसलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे पुढील शिक्षण सुरू ठेवता येऊन उच्च शिक्षण घेता येऊ शकेल. मात्र, गणित आणि विज्ञानाशी संबंधित विषयांत उच्च शिक्षण घ्यायचे असल्यास त्या विषयांसाठी पुनर्परीक्षा देऊन उत्तीर्ण व्हावे लागणार आहे. सध्याही ही पद्धती वापरली जाते आहे.

    पुस्तकासहित परीक्षा
    राज्य मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे विद्यार्थ्यांवरील दडपण कमी केले पाहिजे. त्या दृष्टीने भविष्यात पुस्तकासहित, वस्तुनिष्ठ स्वरुपाचे प्रश्न, ओएमआर शीटद्वारे परीक्षा घेण्याचा विचार भविष्यात करता येईल. विषय, परीक्षेच्या स्वरुपाप्रमाणे लॉग टेबल, योग्य स्वरुपाचे गणकयंत्र वापरण्यास परवानगी देण्याचा विचार करावा. मात्र, या मुळे विद्यार्थ्यांच्या गणितीय कौशल्यांशी तडतोड होणार नाही याची काळजी घ्यावी, असेही नमूद करण्यात आले आहे.

    आम्ही ही निवडणुकीच्या रिंगणात

  • Today crime news : पोक्सो गुन्ह्यातील आरोपीला 20 वर्षाची शिक्षा

    Today crime news : पोक्सो गुन्ह्यातील आरोपीला 20 वर्षाची शिक्षा

    crime news पोलीस स्टेशन जिवती हद्दीतील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्न करतो म्हणुन फुस लावुन पळवुन नेवुन तिचेशी जबरीने लैंगिक अत्याचार करणाऱ्या 21 वर्षीय आरोपीला न्यायालयाने 20 वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

    Crime news वर्ष 2020 मध्ये जिवती येथील 21 वर्षीय आरोपीने 16 वर्षीय अल्पवयीन मुलीशी ओळखी करीत तुझ्यासोबत लग्न करतो म्हणत फुस लावत तिच्याशी जबरीने लैंगिक अत्याचार केला होता.

    विधानसभा निवडणूक – पहिल्या दिवशी चंद्रपुरातून कुणी केला उमेदवारी अर्ज दाखल

    याबाबत मुलगी व कुटुंबाने जिवती पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती, पोलिसांनी कलम 376, 376 (2) (एन), (जे), 506 भांदवी सहकलम 4, 5 (1) व 6 लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 अनव्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

    सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक रेखा काळे यांनी करीत आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले, 22 ऑक्टोबर रोजी या प्रकरणाचा विशेष सत्र न्यायाधीश दीक्षित यांनी निकाल देत 21 वर्षीय आरोपीला 20 वर्षे कठोर कारावासाची शिक्षा ठोठावली.


    सदर गुन्हयात आरोपीस शिक्षा ठोठावण्यास सरकार तर्फे सहा.सरकारी अभियोक्ता श्री डी.व्ही. महाजन आणि पैरवी अधिकारी म्हणुन पोअं/1117 दिनेष गरमडे पोस्टे जिवती यांनी कामगिरी बजावली आहे.

  • Teacher training : ते प्रशिक्षण स्थगित करा – आमदार सुधाकर अडबाले

    Teacher training : ते प्रशिक्षण स्थगित करा – आमदार सुधाकर अडबाले

    Teacher training राज्‍यातील नवनियुक्‍त शिक्षकांसाठी जिल्हास्तरावर सात दिवसांचे प्रशिक्षण ०४ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर २०२४ या कालावधीत आयोजित केले आहे.

    Teacher training या कालावधीत दिवाळी सुट्ट्या व निवडणुक ड्युट्या असल्‍याने सदर प्रशिक्षण स्‍थगित करून विधानसभा निवडणुकीतनंतर घेण्याची मागणी नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी राज्‍य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पूणेचे संचालक यांच्याकडे केली आहे.

    निवडणूक : चंद्रपुरात कुणी भरला उमेदवारी अर्ज?

    राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मधील मुद्दा क्रमांक ५.१५ ते ५.२१ मध्ये शासकीय, खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित, स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था शाळांतील सर्व नवनियुक्‍त शिक्षकांसाठी जिल्हास्तरावर सात दिवसांचे (५० तासांचे) प्रशिक्षण ०४ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर २०२४ या कालावधीत राज्‍य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पूणेच्या वतीने आयोजित केले आहे.

    सदर कालावधीमध्ये दिवाळीच्‍या सुट्ट्या आहेत. त्‍यामुळे अनेक शिक्षक बाहेरगावी जात असतात. तसेच या कालावधीदरम्‍यान विधानसभेची निवडणूक आहे. या विधानसभा निवडणुकीसाठी शिक्षकांच्या ड्युट्या सुद्धा लागलेल्‍या आहेत.

    गुन्हेगारी : चंद्रपुरात वाघ नखे जप्त

    अशावेळी सदर प्रशिक्षण योग्‍यरित्‍या होणे शक्‍य नाही. त्‍यामुळे हे प्रशिक्षण तात्‍पुरते स्‍थगित करून विधानसभा निवडणुकीनंतर घेण्यात यावे, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी राज्‍य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पूणेचे संचालक, प्रधान सचिव, आयुक्‍त (शिक्षण), संचालक (प्राथ./माध्य/उच्च माध्य.) यांच्याकडे केली आहे.

  • Today nomination of candidates : पहिल्या दिवशी चंद्रपुरात कुणी केला उमेदवारी अर्ज दाखल?

    Today nomination of candidates : पहिल्या दिवशी चंद्रपुरात कुणी केला उमेदवारी अर्ज दाखल?

    nomination of candidates महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नामांकन दाखल करावयाच्या पहिल्या दिवशी आज (दि. 22) चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात एकही नामांकन दाखल करण्यात आलेले नाही. तर इच्छुकांकडून 216 अर्जांची उचल करण्यात आली.
    वाहन चालक देणार टक्कर

    nomination of candidates विधानसभा निवडणुकीची अधिसूचना 22 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर नामनिर्देशन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. नामांकन दाखल करावयाच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील 70-राजुरा विधानसभा मतदारसंघात 44 अर्ज, 71-चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात 31 अर्ज, 72-बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात 56 अर्ज, 73-ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात 34 अर्ज, 74-चिमूर मतदारसंघात 24 अर्ज आणि 75-वरोरा विधानसभा मतदारसंघात 27 अर्ज असे एकुण सहा विधानसभा मतदारसंघात इच्छुकांकडून 216 अर्जांची उचल करण्यात आली आहे.

    राजकारण : वाहन चालक देणार विजय वडेट्टीवार यांना निवडणुकीत टक्कर

    महाराष्ट्रातील विधानसभेच्या एकूण 288 जागांसाठी  20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे.  22 ऑक्टोंबर रोजी निवडणूक अधिसूचना जारी झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 29 ऑक्टोंबर असून, 30 ऑक्टोबरला अर्जांची छाननी होणार आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत 4 नोव्हेंबर पर्यंत आहे. nomination of candidates


    सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून भाजपचे सुधीर मुनगंटीवार, चिमूर मधून भाजपचे बंटी भांगडीया, राजुरा मतदार संघात स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप, मनसेचे सचिन भोयर व चंद्रपुर विधानसभा क्षेत्रातून मनसेचे मनदिप रोडे यांना अधिकृतपणे उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

  • Health Care Center : बल्लारपूर विधानसभा आरोग्यसेवेत तत्पर

    Health Care Center : बल्लारपूर विधानसभा आरोग्यसेवेत तत्पर

    Health Care Center बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील आरोग्यसेवा अद्ययावत करण्यासाठी सदैव कटिबद्ध असलेले राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सदैव तत्परता दाखवली आहे. त्याचाच परिणाम म्हणून त्यांच्या पाठपुराव्यानंतर आता मुल व पोंभुर्णा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सात उपकेंद्रांना राज्य शासनाची मंजुरी मिळाली आहे.

    राजकीय – वाहनचालक विरोधी पक्ष नेत्याला विधानसभा निवडणुकीत भिडणार

    Health Care Center बल्लारपूर विधानसभेतील मुल व पोंभुर्णा तालुक्यातील  सर्वसामान्य नागिरकांची अनेक वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उपकेंद्राची मागणी होती. त्याची दखल घेत ना. श्री. मुनगंटीवार यांनी तसा प्रस्ताव तातडीने संबंधित मंत्रालयाला पाठविला होता.

    पत्रकार परिषद

    या प्रस्तावाची दखल घेत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने उपकेंद्राच्या मंजुरीची अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये मुल तालुक्यातील चितेगांव, पिंपरी दीक्षित, फिस्कुटी, सुशी, तर पोंभुर्णा तालुक्यातील सातारा तुकूम, फुटाणा व जामतुकूम या गावांमध्ये उपकेंद्र मंजूर करण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘विशेष बाब’ म्हणून या केंद्रांना मंजुरी दिल्याचे पत्रात नमूद आहे.

    ना. श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने उपकेंद्रांची मागणी मंजूर झाल्यामुळे खेड्यापाड्यातील सर्वसामान्य, गोरगरीब जनतेला तत्परतेने आरोग्यसेवा मिळणार आहे. त्यामुळे स्थानिकांनी ना. श्री. मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत. आयुष्यात रुग्णसेवेचे कार्य सर्वोपरी आहे, असे ना. श्री. मुनगंटीवार सातत्याने म्हणत असतात. त्याची पुन्हा एकदा प्रचिती यानिमित्ताने आली आहे. Health Care Center

    जिल्ह्यात कर्करोग रुग्णालय
    ना. श्री. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांतून जिल्हात १४० खाटांचे कर्करोग रुग्णालय उभारले जात आहे. याचा उपयोग संपूर्ण जिल्ह्यातील रुग्णांना होणार आहे. एक धर्मशाळा देखील उभारण्यात येणार आहे. खनिज निधितून कॅन्सर व्हॅनसाठी निधी मंजुर केला आहे. त्याचे नुकतेच लोकार्पण करण्यात आलेले आहे. या व्हॅनचा फायदा गावागावातील नागरिकांना होणार आहे. Health Care Center

    मुल येथे १०७ कोटी रुपयांचे आधुनिक रुग्णालय
    मुल येथे १०७ कोटी रुपयांचे १०० खाटांचे आधुनिक रुग्णालयाचे भूमिपूजनही नुकतेच पार पडले. केवळ मुल नव्हे तर परिसरातील प्रत्येकाला हे आरोग्य मंदिर वाटेल, अशी त्यामागची संकल्पना ना.मुनगंटीवार यांची आहे. यापूर्वी आरोग्यक्षेत्रातील अनेक कामे ना.मुनगंटीवार यांनी केली आहे. बल्लारपूर येथे ग्रामीण रुग्णालय, ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र,पोंभुर्णा येथे ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती,पोंभुर्णा तालुक्यातील उमरी पोतदार येथे प्राथमिक आरोग्य केंद्र अशी असंख्य कामे झाली आहे.

    दिव्यांग, नेत्र रुग्णांची सेवा
    ना. श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून आतापर्यंत नेत्र चिकित्सा शिबिरातून ५० हजार रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. ५ हजारांपेक्षा जास्त मोतीबिंदू ऑपरेशन केले. ३५ हजारांहून अधिक जास्त चष्मे दिले आहेत.

    मुलांची मोफत हृदय शस्त्रक्रिया
    लहान मुलांच्या हृदय शास्त्रक्रियेकरिता खाजगी रुग्णालयात १० लाख रुपये लागत असताना या शस्त्रक्रिया मुंबईतील फोर्टीज हॉस्पिटलच्या चमूद्वारे मोफत करून देण्यात आल्या. ना. श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकारातूनच हे शक्य झाले. २ ते १० वर्षांपर्यंतच्या ६० लहान मुलांचे ऑपरेशन करण्यात आले.

  • Maharashtra Assembly Elections 2024 : वाहन चालक मालक संघटना ब्रह्मपुरी विधानसभा निवडणूक लढविणार

    Maharashtra Assembly Elections 2024 : वाहन चालक मालक संघटना ब्रह्मपुरी विधानसभा निवडणूक लढविणार

    Maharashtra Assembly Elections 2024 22 ऑक्टोबर पासून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. विविध राजकीय पक्षातील इच्छुक व अपक्ष उमेदवार आजपासून अर्जप्रक्रियेला प्रारंभ करतील.

    महत्त्वाचे : राजुरा विधानसभा क्षेत्रात यंदा परिवर्तनाचे वारे

    Maharashtra Assembly Elections 2024 अश्यातच राज्यातील जय संघर्ष संस्था प्रणित वाहन चालक मालक संघटना यंदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे, त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात उमेदवार घोषित केला आहे.

    जय संघर्ष संस्था प्रणित संघर्ष वाहन चालक मालक संघटना महाराष्ट्र राज्य मागील दहा वर्षापासून राज्यातील वाहन चालक आणि मालक यांच्या समस्या घेऊन मागण्यांची पूर्तता करण्यासाठी मोर्चे, आंदोलने, करून शासन दरबारी मागण्या मागत आहेत. मात्र कोणत्याही लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष दिले नाही.

    राजकीय : सुधीर मुनगंटीवार सातव्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

    अखेर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात संघटनेच्या वतीने १५ उमेदवार उभे करून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात सुधीर महादेव टोंगे यांना संघटनेकडून उमेदवारी दिली असल्याची माहिती संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विनोद चांदेकर यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे.

    पत्रकार परिषदेतून केली उमेदवारीची घोषणा


    जय संघर्ष वाहन चालक मालक संघटना संस्थापक अध्यक्ष संजय माणिकराव हाळनोर यांचे नेतृत्वात मागील अनेक वर्षापासून सदर संघटना काम करीत असून ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात संघटनेचे १५ हजार सदस्य कार्यरत आहेत. ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात सुधीरभाऊ टोंगे या ओबीसी प्रवर्गातील कार्यकर्त्याला जय संघर्ष वाहन चालक मालक संघटना कडून उमेदवारी घोषित केली आहे.

  • Amma funeral : अम्मा पंचतत्वात विलीन

    Amma funeral : अम्मा पंचतत्वात विलीन

    Amma funeral चंद्रपूर: निराधार आणि गरीबांच्या सेवेसाठी झटणाऱ्या आणि समाजसेवेचे प्रतीक असलेल्या आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री गंगुबाई उर्फ अम्मा यांच्या पार्थिवावर आज सकाळी भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

    Amma funeral अम्मा यांनी काल सकाळी चंद्रपूरच्या राजमाता निवासस्थानी सर्वांचा निरोप घेतला. त्यानंतर आज त्यांच्या पार्थिवावर चंद्रपूर येथील बिनबा गेट शांतीधाम येथे शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले.

    राजकीय : सातव्यांदा सुधीर मुनगंटीवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार

    Amma funeral त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवर,  समाजसेवक, आणि राजकीय नेते उपस्थित होते. अंत्यविधीमध्ये आमदार किशोर जोरगेवार आणि त्यांचे छोटे बंदू प्रशांत जोरगेवार यांनी आपल्या मातोश्रींना अग्नी दिला. तत्पूर्वी सर्वधर्मीय प्रार्थना करण्यात आली. अम्मांच्या निधनामुळे संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

    आज सकाळी 10 वाजता कोतवाली वार्ड येथील मातोश्री निवासस्थानातून अम्मांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली. त्यानंतर बिनबा गेट येथील मौक्षधाम येथे अम्मांच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात आला. यावेळी अम्मा टिफिन परिवारासह हजारो नागरिकांनी नमत्या डोळ्यांनी अम्मांना अखेरचा निरोप दिला. Amma funeral

    अम्मा यांचा “अम्मा का टिफिन” आणि “अम्मा की दुकान” या उपक्रमांनी चंद्रपूरात समाजसेवेचा नवा आदर्श निर्माण केला. गरजू, निराधार, आणि गरीब व्यक्तींना मदत करण्यासाठी त्या झटल्या. या उपक्रमातून अनेकांना रोजीरोटी मिळाली आणि समाजात एक नवा विश्वास निर्माण झाला. त्यांचे योगदान नेहमीच प्रेरणादायी ठरेल, असे यावेळी शोकसभेत नागरिकांनी म्हटले. अम्मांचे कष्टमय आणि सेवाभावी जीवन समाजातील प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा देणारे राहील, असे नागरिकांनी भावुकतेने सांगितले.

    सर्वधर्मीय धर्मगुरूंची प्रार्थना
    अम्मांचे पार्थिव शरीर अंत्यदर्शनासाठी राजमाता निवासस्थानी  ठेवण्यात आले होते. यावेळी सर्वधर्मीय धर्मगुरूंनी प्रार्थना करत अम्मांना आदरांजली अर्पण केली. यात हिंदू धर्मगुरू, ख्रिश्चन धर्मगुरू, बौद्ध धर्मगुरू, मुस्लिम धर्मगुरू आणि शीख धर्मगुरूंनी प्रार्थना केली.

  • Ballarpur Assembly Constituency : सुधीर मुनगंटीवार सातव्यांदा विधानसभा निवडणुकीच्या मैदानात, यंदा कुणाचं असेल आव्हान?

    Ballarpur Assembly Constituency : सुधीर मुनगंटीवार सातव्यांदा विधानसभा निवडणुकीच्या मैदानात, यंदा कुणाचं असेल आव्हान?

    Ballarpur Assembly Constituency विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने 99 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे, त्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर व चिमूर विधानसभा क्षेत्रातील दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार व बंटी भांगडीया यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

    Ballarpur Assembly Constituency बल्लारपूर विधानसभा यंदा चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे परंतु महाविकास आघाडीने अजूनही आपला उमेदवार जाहीर केला नसल्याने संभाव्य उमेदवार अजूनही विधानसभा क्षेत्रात भेटी देत आहे.

    महत्त्वाचे : भाजपचे चंद्रपूर जिल्ह्यातील 4 उमेदवार वेटिंगवर

    विधानसभा निवडणूक लढण्यापूर्वी सुधीर मुनगंटीवार यांनी लोकसभा निवडणुकीत आपलं नशीब आजमावल होत मात्र त्यावेळी त्यांना दोनदा पराभव स्वीकारावा लागला, वर्ष 1995 मध्ये मुनगंटीवार यांनी पहिल्यांदा चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवली, मुनगंटीवार यांनी मंत्री व कांग्रेसचे नेते शाम वानखेडे यांचा पराभव केला, त्यावेळी सुधीर मुनगंटीवार यांना 94 हजार 379 मते मिळाली होती तर कांग्रेसचे शाम वानखेडे यांना 29 हजार 915 मतांवर समाधान मानावे लागले. Ballarpur Assembly Constituency

    वर्ष 1999 मध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या समोर कांग्रेसचे उमेदवार विनय बांगडे यांनी आव्हान निर्माण केले मात्र त्यावेळी सुधीर मुनगंटीवार यांना 84 हजार 688 मते मिळाली व कांग्रेसचे बांगडे यांना 54 हजार 101 मतांवर समाधान मानावे लागले होते. Sudhir mungantiwar

    वर्ष 2004 मध्ये कांग्रेसचे गजानन गावंडे यांनी मुनगंटीवार यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला मात्र कांग्रेसचा प्रयत्न त्यावेळी फसला, सुधीर मुनगंटीवार यांना 94 हजार 3 मते तर कांग्रेसचे गावंडे यांना 67 हजार 102 मतांवर समाधान मानावे लागले, मुनगंटीवार यांनी विजयाची हट्रिक मारली.

    वर्ष 2009 मध्ये चंद्रपूर विधानसभा क्षेत्र अनुसूचित जातीकरिता राखीव झाले, त्यावेळी बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अस्तित्वात आले, सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर विधानसभा निवडणुकीत आपलं नशीब आजमावलं, 15 वर्षाच्या अनुभवाला सोबत घेत मुनगंटीवार मैदानात उतरले, त्यावेळी सुधीर मुनगंटीवार यांना 86 हजार 196 मते तर कांग्रेसचे राहुल पुगलिया यांना 61 हजार 460 मते मिळाली. Ballarpur Assembly Constituency

    वर्ष 2014 मध्ये सुधीर मुनगंटीवार यांना 1 लाख 3 हजार 718 मते तर कांग्रेसचे घनश्याम मूलचंदानी यांना 60 हजार 118 मते मिळाली.

    वर्ष 2019 मध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या मतांचा आकडा घटला आणि त्यांना 86 हजार 2 मते तर कांग्रेसचे विश्वास झाडे यांना 52 हजार 762 मते मिळाली.

    वर्ष 2024 मध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी लोकसभा निवडणुकीत नशीब आजमविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना 2 लाख 60 हजार मतांनी पराभव पत्करावा लागला, कांग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर लोकसभेतून विजय मिळविला, धानोरकर यांना प्रत्येक विधानसभा क्षेत्रात 1 लाखांच्या वर मते मिळाली होती.

    विधानसभेत 6 वेळा विजय तर लोकसभेत तीनदा पराभव स्वीकारल्यावर सुधीर मुनगंटीवार हे सातव्यांदा विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे, सध्या त्यांच्यासमोर कांग्रेस पक्षातर्फे डॉ.अभिलाषा गावतुरे व संतोष रावत किंवा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांची नावे चर्चेत आहे. Sudhir mungantiwar

    कांग्रेस पक्षाला बल्लारपूर विधानसभा निवडणूक लढण्याचा मोठा अनुभव आहे, वर्ष 2014 मध्ये शिवसेनेने केशवराव कटरे यांना बल्लारपूर विधानसभेची उमेदवारी दिली होती त्यावेळी त्यांना केवळ 2 हजार 555 मते मिळाली होती.

    सध्याच्या स्थितीत डॉ.अभिलाषा गावतुरे व शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गिर्हे यापैकी एक मुनगंटीवार यांच्या विरुद्ध बल्लारपूर विधानसभा निवडणूक लढवू शकतात.

  • BJP candidate : भाजपचे 2 उमेदवार जाहीर 4 वेटिंगवर

    BJP candidate : भाजपचे 2 उमेदवार जाहीर 4 वेटिंगवर

    BJP candidate 20 ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पक्षाने आगामी विधानसभा 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, या यादीत चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर व बल्लारपूर या 2 विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे.
    उर्वरित 4 विधानसभा क्षेत्रातील उमेदवारीवर अजूनही सस्पेन्स कायम आहे.


    BJP candidate राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली आहे, मात्र काही जागेवर तेच उमेदवार तर काही जागांवर मेरिट नुसार उमेदवारी देण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 6 विधानसभा पैकी 3 कांग्रेस 2 भाजप व 1 जागा अपक्षाकडे आहे. BJP candidate

    महत्त्वाचे : निराधारांचा आधार अम्मा चं निधन


    वर्ष 2019 च्या विधानसभा निवडणुकीत चंद्रपूर मधून अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांनी विजय मिळविला होता.
    किशोर जोरगेवार यांना 1 लाख 17 हजार 570 मते मिळाली होती तर भाजपचे नाना शामकुळे यांना 44 हजार 909 मते मिळाली.


    राजुरा विधानसभा क्षेत्रात कांग्रेसचे सुभाष धोटे यांना 60 हजार 228 तर शेतकरी संघटनेचे वामनराव चटप यांना 57 हजार 727 मते मिळाली.
    बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांना 86 हजार 2 मते तर कांग्रेसचे डॉ विश्वास झाडे यांना 52 हजार 762 मते मिळाली होती. BJP candidate


    ब्रह्मपुरी मतदार संघातून कांग्रेसचे विजय वडेट्टीवार यांना 96 हजार 726 मते तर शिवसेना पक्षाचे संदीप गड्डमवार 78 हजार 177 मते मिळाली, वरोरा विधानसभा मतदार संघातून कांग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांना 63 हजार 862 तर भाजपचे संजय देवतळे यांना 53 हजार 665 मते मिळाली. चिमूर मतदार संघातून भाजपचे बंटी भांगडिया यांना 87 हजार 146 मते तर कांग्रेसचे सतीश वारजूरकर यांना 77 हजार 394 मते मिळाली होती.


    चिमूर मतदार संघातील भाजप आमदार बंटी भांगडिया हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू व खंदे समर्थक आहे, त्यामुळे यंदा त्यांना विजयाची हॅट्रिक साधण्याची संधी भाजपने दिलेली आहे. BJP candidate


    सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यात केलेला विकास व राज्यात आपल्या मंत्रालयात केलेल्या उत्कृष्ट कार्यामुळे पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवीत संधी दिली आहे.
    चंद्रपूर विधानसभा मतदार संघात भाजपने उमेदवार जाहीर केला नसून विद्यमान आमदार काय भूमिका घेतात ते कोणत्या पक्षातून निवडणूक लढणार अशी वाट भाजप पक्ष पाहत आहे, वेळेवर भाजप आयात उमेदवाराला संधी देऊ शकतो.


    वरोरा मतदार संघात भाजप पक्षाकडून इच्छुकांची गर्दी आहे बंडखोरी होऊ नये यासाठी भाजपने अद्यापही उमेदवारी जाहीर केली नाही.
    राजुरा मतदार संघ हा कांग्रेसचे बालेकिल्ला आहे सध्या भाजप कडून देवराव भोंगळे, माजी आमदार संजय धोटे व माजी आमदार सुदर्शन निमकर यांची नावे चर्चेत आहे. याठिकाणी सुद्धा भाजपला बंडखोरीची शक्यता वाटत असल्याने उमेदवार जाहीर केला नाही.


    ब्रह्मपुरी मतदार संघात कांग्रेसचे विजय वडेट्टीवार हे बलाढ्य उमेदवार आहे त्यांच्यासमोर अजूनही भाजप पक्षाने उमेदवार जाहीर केलेला नाही, ब्रह्मपुरी विधानसभेत वडेट्टीवार यांच्या तोडीतला उमेदवार अद्याप भाजपला मिळालेला नाही.

    एकूण मतदार किती?
    राजुरा मतदार संघात 3 लाख 24 हजार 209, चंद्रपूर 3 लाख 72 हजार 455, बल्लारपूर 3 लाख 11 हजार 094, ब्रह्मपुरी 2 लाख 75 हजार 221, चिमूर 2 लाख 79 हजार 581 तर वरोरा मतदार संघात 2 लाख 80 हजार 980 मतदारांचा समावेश आहे.