Tag: MH34

  • Mahavitaran Abhay Yojana 2025 । महावितरण अभय योजना: वीज थकबाकी माफीची सुवर्णसंधी, 31 मार्च 2025 पर्यंत अंतिम संधी

    Mahavitaran Abhay Yojana 2025

    Mahavitaran Abhay Yojana 2025 : चंद्रपूर:- मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, वीज बिलांची थकबाकी असलेल्या एखाद्या जागेची मालकी बदलल्यानंतर देखील नवीन जागामालक किंवा ताबेदारांना थकबाकीची रक्कम भरावी लागेल. त्यामुळे जागा वापरासह विजेची गरज असो किंवा नसो. मात्र वीज बिलांच्या थकबाकीतून मुक्त होण्याची संधी महावितरणच्या अभय योजनेअंतर्गत घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर अकृषक ग्राहकांना येत्या मार्चपर्यंत उपलब्ध झाली आहे.

    चंद्रपुरात फ्लाईंग क्लबचे उदघाटन


    दरम्यान, चंद्रपूर परिमंडळ मध्ये या योजनेत सहभागी वीज ग्राहकांनी सध्या विजेची गरज नसतानाही योजनेचा लाभ घेऊन थकबाकीमुक्ती मिळवली आहे. वीजपुरवठा खंडित झालेल्या तसेच कृषी व सार्वजनिक पाणीपुरवठा योजना वगळून उर्वरित सर्व अकृषक वीजग्राहकांसाठी महावितरण अभय योजना दिनांक 31 मार्च 2025 पर्यंत सुरू राहणार आहे. (Electricity Bill Waiver Scheme Maharashtra)


    चंद्रपूर परिमंडळ कार्यालयांतर्गत अभय योजनेचा तपशील
    चंद्रपूर मंडळातील 1925 ग्राहकांनी अभय योजनेत सहभाग नोंदविला असून त्यापैकी 1730 ग्राहकांनी अभय योजनेचा लाभ घेतलेला आहे. लाभ घेतलेल्या पैकी 124.41 (लाखात) ग्राहकांनी थकबाकी रकमेचा भरणा केलेला आहे.
    गडचिरोली मंडळातील 3723 ग्राहकांनी अभय योजनेत सहभाग नोंदविला असून त्यापैकी 3540 ग्राहकांनी अभय योजनेचा लाभ घेतलेला आहे. लाभ घेतलेल्या पैकी 144.90 (लाखात) ग्राहकांनी थकबाकी रकमेचा भरणा केलेला आहे.
    महावितरण अभय योजनेनुसार थकबाकीदारांनी केवळ मूळ थकबाकीचा भरणा केल्यास संपूर्ण 100 टक्के व्याज व विलंब आकाराची (दंड) रक्कम माफ होत आहे.

    तसेच मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा केल्यास लघुदाब ग्राहकांना आणखी 10 टक्के तर उच्चदाब ग्राहकांना आणखी 5 टक्के सूट मिळत आहे. यासोबतच मूळ थकबाकीची सुरुवातीला 30 टक्के रक्कम भरून उर्वरित 70 टक्के रक्कम व्याजमुक्त सहा हप्त्यात भरण्याची देखील सोय आहे. थकबाकीमुक्तीसाठी वीज ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता हरीश गजबे यांनी केले आहे. How to Avail Abhay Yojana for Electricity Bills


    फ्रेंचायझीमधील ग्राहकांना सुद्धा लागू असलेल्या या अभय योजनेत सहभागी होण्यासाठी महावितरणच्या अधिकृत वेबसाईट व मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज व थकबाकी भरण्याची सोय उपलब्ध आहे. तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी नजीकच्या कार्यालयात संपर्क साधावा. Mahavitaran Abhay Yojana Benefits

    महावितरण अभय योजनेचे ठळक मुद्दे:-
    *घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर अकृषक जागेसाठी वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीची संधी.
    *मागणीप्रमाणे त्वरित नवीन वीज जोडणी उपलब्ध.
    *मूळ थकबाकी एकरकमी भरल्यास लघुदाब ग्राहकांना आणखी 10 टक्के तर उच्चदाब ग्राहकांना 5 टक्के सूट.
    *मूळ थकबाकीची 30टक्के रक्कम भरून उर्वरित 70 टक्के रक्कम सहा व्याज मुक्त हप्त्यात भरण्याची सोय.
    *दिनांक 31 मार्च 2024 पर्यंत कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या थकबाकीदार वीज ग्राहकांना संधी.
    *महावितरण अभय योजना येत्या दिनांक 31 मार्च 2025 पर्यंत सुरू राहणार.

  • Chandrapur Flying Club । राजीव प्रताप रुडी आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांनी चंद्रपूरमध्ये वैमानिक क्रांती

    Chandrapur Flying Club

    मोरवा येथे फ्लाईंग क्लबचे उद्घाटन

    Chandrapur Flying Club : वैमानिक आणि फ्लाईंग हा माझा आवडीचा विषय आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळामध्ये केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री असताना देशात अनेक ठिकाणी वैमानिक प्रशिक्षण केंद्र उघडले. आज (मोरवा) चंद्रपूर मध्ये वैमानिक प्रशिक्षण केंद्राचे (Morwa Aviation Training Center) उद्घाटन करण्याची संधी मिळाली, याचा मला अतिशय आनंद आहे. हे प्रशिक्षण केंद्र उत्कृष्टच होईल, अशी अपेक्षा खासदार तथा एरो क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष राजीव प्रताप रुडी यांनी व्यक्त केली. (Rajiv Pratap Rudy Aviation Initiatives)

    चंद्रपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे धरणे आंदोलन

    मोरवा येथे फ्लाईंग क्लबचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., कॅप्टन ऐजिल, उपविभागीय अधिकारी संजय पवार आदी उपस्थित होते.

    यावेळी खासदार राजीव प्रताप रुढी म्हणाले, चंद्रपूर येथे फ्लाईंग क्लबच्या निर्मितीमध्ये मी योगदान देऊ शकलो, याचा मला आनंद आहे. भारतातील अनेक तरुण-तरुणी वैमानिक प्रशिक्षणासाठी बाहेर जातात. आपल्या जिल्ह्यातच कमीत कमी खर्चात हे प्रशिक्षण मिळावे, हेच आमचे उद्दिष्ट आहे. यासाठी येथील आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अतिशय दूरदृष्टी ठेवून हा उपक्रम मार्गी लावला. चंद्रपूरचा आदर्श महाराष्ट्रात इतर ठिकाणी सुद्धा जाईल. भविष्यात येथे पर्यटकांसाठी एअरस्पोर्ट, पॅराग्लायडिंग, हॉट एअर बलून आदी बाबी करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू. येथील कॅप्टनने सर्व परवानग्या त्वरित पूर्ण कराव्यात. दोन वर्षात हे उत्कृष्ट प्रशिक्षण केंद्र होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. Commercial Pilot License in India

    rajiv pratap rudy aviation initiatives

    चंद्रपूर हे वैमानिकांचे चॅम्पियन केंद्र व्हावे – आमदार सुधीर मुनगंटीवार

    जिल्ह्यात एस.एन.डी.टी. विद्यापीठ, वन अकादमी, सैनिक स्कूल, बॉटनिकल गार्डन अशी अनेक विकासकामे करण्यात आली आहे. येथील तरुण-तरुणी वैमानिक व्हावे, यासाठी आम्ही एक स्वप्न पाहिले. ही स्वप्नपूर्ती आज वैमानिक प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनातून पुर्णत्वास येत आहे. या प्रशिक्षण केंद्रात कारपेट, संरक्षण भिंत, हँगर बनवण्यात आले आहे. मोरवा येथील वैमानिक प्रशिक्षण केंद्राला भविष्यात आणखी विमाने देण्याचे राजीव प्रताप रुडी यांनी कबूल केले आहे. त्यामुळे चंद्रपूर हे वैमानिकांचे चॅम्पियन केंद्र होईल, असे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. (Chandrapur as an Aviation Hub)

    विद्यार्थ्यांची संख्या 50 पर्यंत वाढवावी – आमदार किशोर जोरगेवार

     चंद्रपूर येथील फ्लाईंग क्लबसाठी खासदार राजीव प्रताप रुडी यांनी मान्यता दिली, याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. जगात वैमानिकांची मागणी वाढत आहे. चंद्रपूर हे देशाच्या मध्यस्थानी आहे. तसेच हा उद्योगांचा जिल्हा आहे. उद्योगांना चालना मिळण्यासाठी चंद्रपुरात कमर्शियल वैमानिक प्रशिक्षण केंद्रसुद्धा व्हावे. तसेच विद्यार्थी संख्या 10 वरून 50 करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

    प्रास्ताविकात जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, नागपूर फ्लाईंग क्लबची स्थापना 1947 मध्ये झाली. सहा दशकात अनेक वैमानिक तयार झाले. (Nagpur Flying Club Expansion) नागपूर फ्लाईंग क्लबमध्ये विमानांची आवागमन जास्त असल्यामुळे प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना कमी वेळ मिळतो. त्यामुळे चंद्रपूरमध्ये नागपूर फ्लाईंग क्लबचा अतिरिक्त बेस तयार करण्यात येत आहे. जगात आज वैमानिकांची मागणी वाढली आहे. चंद्रपूर येथून वैमानिक तयार होतील व हे प्रशिक्षण केंद्र एक नवी उंची गाठेल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

    तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते 172 आर. या प्रशिक्षण विमानाला हिरवी झेंडी दाखवून उड्डाण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन तहसीलदार विजय पवार यांनी केले.

  • OBC protest in Maharashtra । ओबीसी मागण्यांसाठी एकदिवसीय धरणे आंदोलन – सरकारच्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह?

    OBC protest in Maharashtra

    ओबीसींच्या मागण्या पूर्ण केल्याच नाही मग भाजपाचा DNA ओबीसी कसा? सचिन राजूरकर

    OBC protest in Maharashtra : ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने राज्यव्यापी एकदिवसीय धरणे आंदोलनाचे आयोजन केले होते.
    चंद्रपुरात 11 सप्टेंबर 2023 रोजी रविंद्र टोंगे यांनी ओबीसी समाजातील विविध मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी आमरण उपोषण सुरू केले होते, त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis OBC promise) यांनी चंद्रपुरात येत रविंद्र टोंगे यांचं आमरण उपोषण सोडवीत ओबीसींच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले, मात्र फडणवीस यांचं आश्वासन फोल ठरल्याने राष्ट्रीय ओबीसी महासंघाने एकदिवसीय धरणे आंदोलन केले. (National OBC Federation rally)

    जिल्हा प्रशासनाची बदनामी खपवून घेतली जाणार नाही – पालकमंत्री अशोक उईके


    जिल्हाधिकारी कार्यालय समोर या आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी संघाचे महासचिव सचिन राजूरकर म्हणाले की सरकारने ओबीसींच्या मागण्या पूर्ण करा आणि जर भाजपाचा DNA ओबीसी समाज असेल तर सरकारने लिखित दिलेले आश्वासन पूर्ण का करत नाही असाही सवाल केला. Maharashtra OBC protest 2024

    ओबीसी समाजाच्या मागण्या काय?


    बिहारच्या धर्तीवर (Bihar-style caste census OBC) जातनिहाय सर्वे करण्यात यावा,ओबिसी, व्हीजे,एनटी & विमाप्र विद्यार्थ्याना अजूनही आधार योजनेतील रक्कम मिळाली नाही ,जिल्हा मध्यवर्ती बँकेतील मागासवर्गीयाचे आरक्षण लागू करण्यात यावे,सारथी व बार्टी प्रमाणे दि.23 सप्टेंबर 2024 च्या मंत्री मंडळ निर्णयाप्रमाणे महाज्योती अंतर्गत नोंदणी असणाऱ्या ओबीसी, भटके विमुक्त व एस.बी.सी विद्यार्थी यांना २ वर्षांपासून प्रलंबित असणारी फेलोशिप तात्काळ अदा करावी. ओबीसी, विजा, भज व विमाप्र सुशिक्षित बेरोजगारा व्याज परतावा कर्ज मर्यादा 15 लक्ष करण्यात यावी,

    ओबीसी मुलांना भारत सरकार स्कॉलरशिप 100%करण्यात यावी, अनुसूचित क्षेत्रात महामहीम राज्यपालांच्या अधिसूचनेनुसार वर्ग 3 व वर्ग 4 चे 17 संवर्गीय पदे भरताना शंभर टक्के अनुसूचित जमातीतूनच भरली जातात त्यामुळे ओबीसी सहित इतर होणारा अन्याय तात्काळ थांबविण्यात यावा. ओबीसी, विजा,भज व विमाप्र समाजातील पाल्यांना सफाई कामगारांच्या व्याख्येत बसणारे सर्व सफाई कामगांराना लाड समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने वारसा हक्काने नियुक्ती देण्यात यावी , केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्यात यावी, ओबीसी साठी केंद्रात स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे, क्रिमीलेअरची उत्पन्न मर्यादा 15 लक्ष रुपये करण्यात यावी, आरक्षणाची 50% मर्यादा रद्द करण्यात यावी ,ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात यावा.

    मागण्याचे निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री, सामाजिक न्याय मंत्री, ओबीसी आयोगाचे अध्यक्ष यांना पाठविण्यात आले तर राज्य सरकारच्या मागण्याचे निवेदन, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, ओबीसी मंत्री, मुख्य सचिव, ओबीसी खात्याचे सचिव, जिल्हाचे पालकमंत्री , जिल्ह्याच्या खासदार व सर्व आमदार यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले.

    धरणे आंदोलनात राष्ट्रीय ओबीसी महासंघ,प्रदेश कार्याध्यक्ष दिनेश चोखारे, कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्याम लेडे, ओबीसी योद्धा रवींद्र टोंगे,महिला महासंघाच्या जिल्हाध्यक्ष भावना बावनकर, महासचिव मनिषा बोबडे, दुर्गाताई चवरे, ममता डुकरे,इमदाद शेख,श्रीहरी सातपुते,अक्षय येरगुडे ,रामदास कामडी,मनोहर शेंडे, प्रदीप पावडे, देवा पाचभाई, गणेश आवारी, विपिन देऊळकर, पूजा राऊत,आतकरी सर,प्रेमा जोगी,अक्षय लांजेवार,रामराव हरडे लोहकरे सर,प्रा पिसे सर, सतीश भीवगडे , पप्पू देशमुख,अ. भा. ओबीसी संघटनेचे अध्यक्ष मा. डी. के. चौधरी , कोषाध्यक्ष मा. पी. एन. बगमारे, सहसचिव मा.एस. एस. बावनकर,संघटक मा. डी. एस. समर्थ, संघटक मा. आर. एम. मोरांडे, संघटक मा. ए. जी. समर्थ, इ.पधादिकारी, विद्यार्थी धरणे आंदोलनात सहभागी झाले.

  • Zakir Hussain Madrasa Modernization Scheme । शाळांसाठी आनंदाची बातमी, आता २ लाख नव्हे, मिळणार १० लाखांचे अनुदान

    Zakir Hussain Madrasa Modernization Scheme

    डॉ. झाकीर हुसेन योजना: शाळांसाठी अधिक आर्थिक मदत, तुमचा अर्ज दाखल केलात का?

    Zakir Hussain Madrasa Modernization Scheme : बहुल शासनमान्य प्राप्त खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत पायाभूत सुविधांसाठी आता 2 लाखाऐवजी 10 लाखांचे अनुदान मिळणार आहे. सन 2024 – 25 या आर्थिक वर्षासाठी इच्छुक शाळांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 22 फेब्रुवारी 2025 आहे. Educational Grants for Minority Institutions

    भारत सरकारच्या अल्पसंख्यांक मंत्रालयाने अल्पसंख्यांक समुदायासाठी पंतप्रधानांचा 15 कलमी कार्यक्रम जाहीर केला आहे. या योजनेच्या 15 उद्दिष्टांमध्ये अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावणे, अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, अल्पसंख्यांक समाजाला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे, अल्पसंख्यांक समुदायाचा जीवनस्तर उंचाविण्यासाठी उपाययोजना करणे, अशा स्वरूपाची उद्दिष्टे निश्चित केली आहे.

    चंद्रपुरात २० फेब्रुवारीला फ्लाईंग क्लब चे उदघाटन

    तसेच केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने, अल्पसंख्यांक समुदायास केंद्र शासनाच्या इतर विविध कल्याणकारी योजनांचा, जसे राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत अल्पसंख्यांक शाळांमधील विद्यार्थ्यांना शुद्ध पेयजलाची व्यवस्था करणे, अल्पसंख्यांक बहुल शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणात विद्युत व्यवस्थेअभावी खंड पडू नये म्हणून जनरेटरची सुविधा निर्माण करणे, या योजनांचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे.

    तरी अल्पसंख्यांक शाळांकडून सन 2024- 25 या आर्थिक वर्षात शासन निर्णय 7 ऑक्टोबर 2015 मध्ये नमूद करण्यात आलेल्या 12 पायाभूत सुविधांपैकी वरील दोन पायाभूत सुविधांच्या प्रस्तावांचा उल्लेख आवर्जून करावा. तसेच इतर आवश्यक सोयीसुविधांकरिता 10 लाखापर्यंत अनुदानाचे (10 Lakh Grant for Minority Schools) प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत सादर करावे. यानंतर आलेल्या प्रस्तावांचा विचार करण्यात येणार नाही, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

  • Illegal Activities in Chandrapur । चंद्रपूर प्रशासनाची बदनामी खपवून घेतली जाणार नाही – अवैध उत्खनन व तस्करीविरोधात कारवाईचा इशारा

    Illegal Activities in Chandrapur

    Illegal Activities in Chandrapur : नैसर्गिक संपत्तीचे वरदान असलेला चंद्रपूर जिल्हा हा शांतताप्रिय जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोळसा, सिमेंट व इतर उद्योगांचे विस्तृत जाळे पसरले आहे. त्यातून लोकांना रोजगार निर्मिती होते. तसेच जल, जंगल, जमीन याचे रक्षण करून वनौपजावर आधारित उद्योगातून नागरिक आपला उदरनिर्वाह करीत असतात. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात सामान्य नागरिकांना त्रास होईल, किंवा शासन – प्रशासनाची बदनामी होईल, अशा बाबी खपवून घेतल्या जाणार नाही.  अवैध धंदे करणाऱ्यांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे. (Ashok Uike Latest News)

    छावा चित्रपट करमुक्त करा – खासदार प्रतिभा धानोरकर

    नियोजन सभागृह येथे कोळसा खाण बाधित क्षेत्रातील नागरिकांचे पुनर्वसन व त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री डॉ. उईके बोलत होते. पुढे ते म्हणाले, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोळशाच्या खाणी आहेत. या खाणींमधून कोळशाचे उत्पादन घेतले जाते. त्यासाठी गावकऱ्यांनी आपल्या जमिनी प्रकल्पाला दिल्या. मात्र 15-20 वर्षानंतरही प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अजूनही सुटले नाहीत. त्यांचे योग्यरित्या पुनर्वसन झाले नाही.  त्यातच कोळशाची अवैध वाहतूक, शासकीय आदेशाला न जुमानता अवैध उत्खनन, गावकऱ्यांसोबत दमदाटी करणे, कोणालाही विश्वासात न घेता शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, स्थानिकांचा नोकरीत समावेश न करणे, अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.  या तक्रारींची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी. Police Action Against Illegal Business

    पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी

    चंद्रपूर जिल्हा हा राज्याच्या टोकावर असून तेलंगणा राज्याची सीमा जिल्ह्याला लागून आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गोवंश तस्करी, गुटखा तस्करी (Smuggling in Chandrapur District) होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या बाबीला पोलीस प्रशासनाने त्वरित आळा घालावा. सोबतच दारूबंदी असलेले वर्धा आणि  गडचिरोली हे जिल्हे चंद्रपूर जिल्ह्याला लागून असल्यामुळे अवैध दारू तस्करी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील दारू तस्कर, वाळू माफिया यांच्यावर पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करून गुन्हे दाखल करावे.  अवैध धंदे करणाऱ्या कोणालाही प्रशासनाने पाठीशी घालू नये. अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर सुद्धा नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल, असा इशारा पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिला.

    बैठकीला खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार करण देवतळे, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

  • Chandrapur Flying Club Inauguration । चंद्रपूर-गडचिरोलीतील तरुणांसाठी आकाशाला गवसणी घालण्याची संधी

    Chandrapur Flying Club Inauguration

    “सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूरमध्ये वैमानिक प्रशिक्षण केंद्र!”

    Chandrapur Flying Club Inauguration :  चंद्रपूर-गडचिरोली या जिल्ह्यांतील तरुणांना वैमानिक होता यावे, यासाठी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला होता. विद्यार्थ्यांचे आकाशात उंच झेप घेण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी चंद्रपूर येथे फ्लाईंग क्लब स्थापन करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. याठिकाणी प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी वैमानिक होतील, तेव्हा चंद्रपूर आणि गडचिरोलीचीच मान अभिमानाने उंचावणार आहे, याचा विचार आमदार श्री. मुनगंटीवार यांनी केला होता. उद्या, दि. २० फेब्रुवारी २०२५ ला दूपारी १.०० वाजता चंद्रपूर फ्लाईंग क्लबचे उद्घाटन होत आहे. त्यामुळे आता आ. श्री. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना खऱ्या अर्थाने यश आले आहे.

    चंद्रपुरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा लवकरचं

    हा प्रकल्प भविष्यातील वैमानिकांसाठी मोठ्या संधी निर्माण करेल, असा विश्वास आ. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. या फ्लाईंग क्लबचे उदघाटन केंद्रिय माजी नागरी विमान वाहतूक मंत्री, खासदार राजीव प्रताप रुडी यांच्या हस्ते दि. २० फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ०१ वाजता मोरवा येथे पार पडणार आहे. प्रशिक्षणार्थी विमानाचे उड्डाण करण्यासाठी मोरवा येथील धावपट्टीच्या (Chandrapur Airstrip Development) दुरुस्तीसाठी ५ कोटी ६३ लक्ष तर संरक्षण भिंतीसाठी ११ कोटी ९३ लक्ष रुपये तातडीने मंजूर करण्याच्या सूचना आ. मुनगंटीवार यांनी दिल्या होत्या. दिलेल्या सूचना पुर्णत्वास आल्या असून आता विमानतळ परिपूर्ण तयार आहे.

    सार्वजनिक बांधकाम विभागाने येथील धावपट्टीचे कार्पेटिंग विमानाच्याच गतीने करावे, यात संबंधित यंत्रणेने विशेष लक्ष द्यावे. निवड करताना पहिल्या टप्प्यातील १० प्रशिक्षणार्थ्यांमध्ये मागास प्रवर्गातील विद्यार्थी आणि विद्यार्थीनींचा समावेश आवर्जून करावा, अशा सूचनाही आ. श्री. मुनगंटीवार यांनी दिल्या होत्या.

    चंद्रपूरसाठी ऐतिहासिक पाऊल !

    आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूरचे फ्लाईंग क्लबचे उद्धाटन होत आहे . यामुळे जिल्ह्यातील तरुणांचे वैमानिक होण्याचे स्वप्न साकार होणार आहे. आ.मुनगंटीवार यांनी फ्लाईंग क्लबसाठी केलेल्या अथक प्रयत्नांसाठी जनतेकडून आभार व्यक्त करण्यात येत आहे. Sudhir Mungantiwar Aviation Initiative

  • Chhatrapati Shivaji Maharaj Equestrian Statue । चंद्रपूरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला जाणार – आ. किशोर जोरगेवार

    Chhatrapati Shivaji Maharaj Equestrian Statue

    छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा – महाराष्ट्राच्या अभिमानाचा नवा अध्याय

    Chhatrapati Shivaji Maharaj Equestrian Statue : छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला माल्यार्पण करण्याचा योग लाभला आहे. पण इथेच थांबायचे नाही. याच ठिकाणी लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला जाणार आहे. ही केवळ एक कल्पना नव्हे, तर हा आपला संकल्प आहे. याबाबतच्या सर्व प्रक्रिया गतीशीलपणे पुढे नेण्यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत, असे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

    शिवजयंतीनिमित्त (Shivaji Maharaj Jayanti Celebration) छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आमदार किशोर जोरगेवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी भाजपचे नेते विजय राऊत, अनिल फुलझेले, दशरथसिंग ठाकूर, माजी महापौर अंजली घोटेकर, संदीप आवारी, रवी आसवानी, रघुवीर अहिर, तुषार मोहुर्ले, माजी नगरसेवीकां वंदना तिखे, वनिता डुकरे, माजी नगरसेवकर देवानंद वाढई, रवी लोणकर, प्रशांत चौधरी, विकास खटी, अरुण तिखे, शेखर शेट्टी, विनोद शेरकी, रमेश भुते, तेजा सिंग, वंदना हातगावकर, सविता दंढारे, प्रमोद शास्त्रकार, वंदना हजारे, कौसर खान, विमल कातकर, संगीता लोखंडे, प्रवीण गिलबिले, मीना गरडवा, राजू घरोटे, ईश्वर विरुटकर, आशा मोगरे, रेणू घोडेस्वार यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    छावा चित्रपट करमुक्त करा – खासदार प्रतिभा धानोरकर यांची मागणी

    यावेळी ते म्हणाले, शिवरायांचा अश्वारूढ पुतळा हा केवळ एक स्मारक नसून, तो आपल्या अभिमानाचा आणि प्रेरणेचा स्तंभ असणार आहे. या पुतळ्याकडे पाहताच आपल्या पिढ्या शिवरायांच्या पराक्रमाची आठवण ठेवतील, त्यांचे विचार आत्मसात करतील आणि आपल्या संस्कृतीचे दर्शन घडेल. हा पुतळा म्हणजे आपल्या इतिहासाचा साक्षीदार आणि भविष्यातील प्रेरणास्थान असेल. Shivaji Maharaj Historical Landmark

    यासंबंधी सर्व प्रक्रिया वेगाने सुरू आहेत. रामकुमार अक्कापेल्लीवार या शिवप्रेमीने याबाबत जवळपास सर्व परवानग्या मिळवल्या आहेत. शेवटच्या काही परवानग्या मिळविण्याचे काम सुरू असून, नुकतीच महानगरपालिकेत बैठक घेऊन प्रशासनाला लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. केवळ स्मारक उभारणे हा उद्देश नाही, तर हे स्मारक भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणा देणारे ठरावे, यासाठी त्याचे भव्य आणि ऐतिहासिक स्वरूप असावे, यावर भर दिला जाणार असल्याचेही ते म्हणाले.

    छत्रपती शिवाजी महाराज हे सामर्थ्य, शौर्य आणि न्यायाचा आदर्श होते. (Chhatrapati Shivaji Maharaj Inspiration) त्यांच्या स्मारकाच्या उभारणीसाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन कार्य केले पाहिजे. शिवराय हे केवळ एका व्यक्तीचे किंवा एका गटाचे नाहीत, तर संपूर्ण महाराष्ट्राचे, संपूर्ण भारताचे प्रेरणास्थान आहेत. शिवरायांचा पुतळा हा न्यायप्रिय राज्यकारभाराची जाणीव ठेवणारा आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा ठरेल. हा स्मारक उभारणीचा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावे, आणि भविष्यात ही भूमी केवळ एक स्मारक नसून, प्रेरणेचे, सन्मानाचे आणि इतिहासाच्या उज्ज्वल आठवणीचे केंद्र बनेल, यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहू, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी शिवप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

    Chhatrapati Shivaji Maharaj Equestrian Statue

  • Chhava Movie Tax-Free Maharashtra । खासदार धानोरकर यांची मोठी मागणी

    Chhava Movie Tax-Free Maharashtra

    ‘छावा’ चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त?

    Chhava Movie Tax-Free Maharashtra : संभाजी राजे यांच्या जिवनाची यशोगाथा सांगणारा छावा चित्रपट महाराष्ट्रासह संपूर्ण देशात प्रसिध्द झाला असून सदर चित्रपटातून संभाजी राजे यांच्या यशोगाथेतून युवकांना तसेच सर्व सामान्यांना ऐतिहासिक महाराष्ट्र व तत्कालीन शुर राजांचा वारस्याची माहिती सर्व सामान्यांना व्हावी या करीता छावा हा चित्रपट महाराष्ट्रात कर मुक्त करावा अशी मागणी खासदार धानोरकर यांनी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या कडे पत्राद्वारे केली आहे. Ashish Shelar Cultural Minister

    चंद्रपुरात शिवकालीन युद्धकौशल्याचे पुनरुज्जीवन

    संपुर्ण देशात प्रसिध्द झालेला छावा ह्या चित्रपटातून संभाजी राजे यांच्या जिवनाची यशोगाथा तसेच ऐतिहासकालीन महाराष्ट्रातील परिस्थिती दाखवण्यात आलेली आहे. विपरीत परिस्थितीतील संभाजी राजे यांनी केलेले कार्य व आपल्या राज्यातील जनतेची घेतलेली काळजी, हि संपुर्ण यशोगाथा सर्व सामान्य नागरीकांना बघता यावी व युवा पिढीला यातून प्रेरणा मिळावी व विद्यार्थ्या मध्ये देशभक्ती निर्माण व्हावी.

    तसेच सर्व सामान्यांना ऐतिहासीक महाराष्ट्राची माहिती व्हावी याकरीता सदर चित्रपट महाराष्ट्रात कर मुक्त करण्याची विनंती खासदार धानोरकर यांनी ज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या कडे पत्राद्वारे केली आहे. यासंदर्भात स्वतः ते मंत्री महोदयांशी वार्तालाप करुन विनंती करणार असल्याचे त्यानी पाठविलेल्या प्रसिध्दी पत्रकातून कळविले आहे.

  • Lathi Kathi demonstration । चंद्रपुरात शिवकालीन युद्धकौशल्याचे पुनरुज्जीवन

    Lathi Kathi demonstration

    आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने लाठीकाठी प्रशिक्षण!

    Lathi Kathi demonstration : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून लाठीकाठीचे प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी प्रभावी प्रात्यक्षिके सादर केली. आपल्या युद्धकौशल्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना लाठीकाठी च्या कौशल्याने विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली. या सर्व विद्यार्थ्यांचा आमदार किशोर जोरगेवार यांनी ‘अम्माचा टिफिन’ देऊन सत्कार केला.

    चंद्रपूर मनपातर्फे मालमत्ता कारवाई

    लाठी काठी ला आमदार जोरगेवार यांचं प्रोत्साहन

    लुप्त होत चाललेल्या या क्रीडा प्रकाराला प्रोत्साहन देण्याचे कार्य भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने केले जात आहे. याच उद्देशाने त्यांनी नेहरू विद्यालय येथे लाठीकाठीचे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात प्रशिक्षक मेघा राहुल मुधोळकर  यांनी जवळपास ३० युवक-युवतींना प्रशिक्षण दिले. पुढेही हे शिबिर सुरू राहणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले. Lathi Kathi training program

    विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके
    lathi kathi training program

    आज शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौकात या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार किशोर जोरगेवार कार्यक्रमस्थळी पोहोचताच विद्यार्थ्यांनी लाठीकाठीची प्रात्यक्षिके सादर करीत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. या वेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहन दिले. Shiv Jayanti event 2025

    शिवजयंती निमित्त चंद्रपुरात किल्ले सफाई अभियान

    विद्यार्थ्यांनी सादर केलेली प्रात्यक्षिके शिवकालीन युद्धतंत्राचे उत्कृष्ट दर्शन घडवणारी होती.छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम, त्यांचे लढाऊ तंत्र आणि शौर्य नव्या पिढीने आत्मसात करावे, यासाठी या प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मरक्षण कौशल्ये विकसित होणार असून त्यांना आत्मविश्वास मिळेल,”असे आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी सांगितले.

  • How to avoid property tax seizure | चंद्रपूर मनपाच्या 15 पथकांची धाड: दररोज 10 मालमत्ता जप्त

    How to avoid property tax seizure

    How to avoid property tax seizure : मालमत्ता कराचा भरणा न करणाऱ्या थकबाकीदारांवर मनपा वसुली पथकांनी कारवाई केली असुन 51 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत, विहित मुदतीत जर कराचा भरणा झाला नाही तर या मालमत्ताचा लिलाव केला जाणार आहे.

    शिवजयंतीनिमित्त चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियान

       
       यापुढेही अशीच धडक कारवाई सतत सुरु राहणार असल्याचे मनपातर्फे स्पष्ट करण्यात येत असुन सवलत देऊनही मालमत्ता कर न भरण्याकडेच नागरिकांचा कल दिसत असल्याने सक्त पाऊले मनपाला उचलावी लागत आहे. जप्त केलेल्या मालमत्तांवर असलेली थकबाकी ही जप्त केल्यानंतर 15  दिवसांच्या आत मनपाला जमा करावी लागते, अन्यथा त्या मालमत्तांचा लिलाव करण्याचा अधिकार मनपाला आहे. (Property tax defaulters action)


       15 फेब्रुवारी पर्यंत केवळ 8734 मालमत्ता धारकांनी 50 टक्के शास्तीत सवलतीचा लाभ घेतला होता. 15 फेब्रुवारी नंतर ऑनलाईन 25 टक्के व ऑफलाईन 22 टक्के शास्तीत सूट मनपातर्फे देण्यात येत आहे. करवसुली करिता महानगरपालिकेतर्फे 15 पथके नेमण्यात आली असुन प्रत्येक पथकाला दर दिवशी किमान 10 मालमत्ता धारकांवर कारवाई करण्याचे तसेच जप्तीसोबतच मालमत्तांचे नळ कनेक्शन खंडित करण्याचे निर्देश देण्यात आले होते त्यानुसार कारवाई करण्यात येत आहे.  

    property tas defaulters action


        ऑनलाईन 25 टक्के व ऑफलाईन 22 टक्के शास्तीत सूट ही 31 मार्चपर्यंत लागू राहणार असुन कर भरणा करणे सुविधेचे व्हावे या दृष्टीने 31 मार्च पर्यंत येणाऱ्या प्रत्येक सुटीच्या दिवशी मालमत्ता कर भरणा कार्यालय सुरु राहणार आहे. ज्या मालकांना त्यांच्या मालमत्तेच्या अनुषंगाने आर्थिक उत्पन्न प्राप्त होत असतानाही मालमत्ता कर थकविणार्‍या थकबाकीदारांनी लवकरात लवकर आपल्या थकीत कराचा भरणा करून महानगरपालिकेकडून करण्यात येणारी जप्तीची कारवाई टाळण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. (Municipal corporation tax concession)