Tag: MH34

  • Chandrapur local crime branch । गुन्हेगारीच्या वाढत्या छायेत चंद्रपूर – नवा पोलीस निरीक्षक कसा ठरेल प्रभावी?

    Chandrapur local crime branch

    Chandrapur local crime branch : चंद्रपूर जिल्ह्यात दिवसेंदिवस अंमली पदार्थ विक्री, वाळू तस्करी, तंबाखू माफिया आणि इतर अवैध धंद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांची चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या निर्णयानुसार करण्यात आली आहे. काचोरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

    नागपूर क्राईम ब्रँचमध्ये केलेली उल्लेखनीय कामगिरी

    पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी यापूर्वी नागपूर शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात मोठी भूमिका बजावली आहे. नागपूर क्राईम ब्रँचमध्ये कार्यरत असताना त्यांनी विविध मोठ्या गुन्ह्यांची उकल केली होती. अतिसंवेदनशील गुन्ह्याची त्यांनी उकल केल्याने त्यांना पोलीस आयुक्तांनी सन्मानित केले होते हे विशेष. त्यांच्या कौतुकास्पद कामगिरीमुळेच त्यांची चंद्रपूरमध्ये बदली करण्यात आली असून, आता त्यांनी इथल्या गुन्हेगारीवरही कठोर कारवाई करण्याची जबाबदारी घेतली आहे. Amol Kachore police inspector

    चंद्रपूर जिल्ह्यात पूर्वीही दाखवले कार्यकौशल्य

    पोलीस निरीक्षक काचोरे यांना चंद्रपूर जिल्ह्यातील गुन्हेगारीचे स्वरूप चांगलेच परिचित आहे. याआधी त्यांनी नागभीड, वरोरा आणि भद्रावती पोलीस ठाण्यात काम करताना आपल्या कार्याची छाप सोडली होती. या ठिकाणी त्यांनी अवैध धंद्यांविरोधात कठोर भूमिका घेतली होती. त्यामुळेच स्थानिक गुन्हे शाखेच्या जबाबदारीसाठी ते योग्य उमेदवार ठरले आहेत. Amol Kachore crime branch news

    हैद्राबाद येथील कंपनीने गुंतवणुकीच्या आमिषाने चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांची केली कोट्यवधी रुपयाने फसवणूक

    पूर्वीच्या पोलीस निरीक्षकांनी गुन्हेगारीवर घेतला होता कठोर आळा

    यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेचे नेतृत्व पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी केले होते. त्यांच्या कार्यकाळात एमडी ड्रग्स, वाळू माफिया, तंबाखू माफिया आणि इतर अवैध धंद्यांविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली होती. त्यांनी जिल्ह्यातील अनेक मोठ्या गुन्ह्यांची उकल केली होती, त्यामुळे गुन्हेगारीला काही प्रमाणात आळा बसला होता. मात्र, गेल्या काही महिन्यांत पुन्हा गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असल्याने नवीन अधिकाऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे आहे.

    गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्याचे मोठे आव्हान

    सध्या चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. विशेषतः अंमली पदार्थांचा सुळसुळाट, वाळू तस्करी, अवैध मद्यविक्री आणि इतर बेकायदेशीर व्यवसाय खुलेआम सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत अमोल काचोरे यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे. How Chandrapur police fights crime

    लोकांची अपेक्षा – गुन्हेगारीवर कठोर कारवाई होणार का?

    पोलीस निरीक्षक काचोरे यांनी यापूर्वी केलेल्या कामगिरीमुळे त्यांच्या कार्यक्षमतेबाबत कोणालाही शंका नाही. मात्र, चंद्रपूरसारख्या गुन्हेगारी वाढलेल्या जिल्ह्यात त्यांना आता छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या गुन्हेगारीचे लचके तोडण्याचे मोठे आव्हान आहे. ते या जबाबदारीत कितपत यशस्वी ठरतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

    जिल्ह्यातील नागरिक आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा कठोर कारवाई करेल, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांमध्ये आहे. त्यांच्यामुळे जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा बसतो का, हे पाहण्यासाठी सर्वांचे लक्ष त्यांच्यावर केंद्रित झाले आहे.

  • Chandrapur district jobs for sound operators । लाईट आणि साऊंड हाताळण्याचा अनुभव आहे? मग ही नोकरी तुमच्यासाठीच!

    Chandrapur district jobs for sound operators

    Chandrapur district jobs for sound operators : जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या अधिनस्त असलेल्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहासाठी लाईटींग व साऊंड सिस्टीममधील साहित्य हाताळण्याचे किमान एक वर्षाचे ज्ञान/ अनुभव असलेल्या व्यक्तिची मानधन तत्वावर आवश्यकता आहे. विविध व्यक्ती/ संस्थाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांसाठी प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहातील साऊंड सिस्टीम तसेच लाईट ऑपरेटींग  हाताळणे, सदर साहित्याची देखरेख व जतन करणे, तसेच वरिष्ठांनी वेळेावेळी केलेल्या आदेशाचे पालन करणे आदी कामांकरीता कंत्राटी पध्दतीने मासिक मानधन तत्वावर 11 महिन्याकरीता अस्थायी स्वरुपात साऊंड ऑपरेटर व लाईट आपॅरेटर यांची नियुक्ती करावयाची आहे. Sound operator job in Chandrapur

    चंद्रपूर जिल्ह्यातील २.३६ कोटींची नागरिकांची फसवणूक

    तरी इच्छुक पात्र व अनुभवी व्यक्तिंनी आवश्यक कागदपत्रासह सहा. करमणुक कर अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर 25 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावे. 3 मार्च नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अस्थायी स्वरुपात कंत्राटी पध्दतीने भरावयाच्या पदास खालील अटी व शर्ती लागू राहतील. How to apply for a sound operator job in Chandrapur?

    लक्ष द्या

    1. अर्जदार हा चंद्रपूर मुख्यालयी राहणारा असावा. 2. अर्जदाराची वयोमर्यादा 21 ते 50 पर्यंत असावी. 

    3. अर्जदारास लाईट व साऊंड  सिस्टीममधील साहित्य हाताळण्याचे किमान 1 वर्षाचे ज्ञान/ अनुभव असणे आवश्यक  आहे. तसेच विविध निमशासकीय, खाजगी संस्था किंवा इतर ठिकाणी सदरबाबतचे अनुभव असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. 4. साऊंड ऑपरेटर पदांकरीता 10500 रुपये व लाईट ऑपरेटर करीता 10 हजार रुपये पदाचे मासिक मानधन रुपये राहील. 5. निवड केलेल्या उमेदवारास सभागृहातील कार्यक्रम सुरु होणेपासून ते संपेपर्यंत सभागृहात उपस्थित राहणे  बंधनकारक राहील. Where to find cultural hall technician jobs?

    6. निवड केलेल्या उमेदवाराची नेमणूक मा. जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचे अधिकारात 11 महिन्याच्या कालावधीकरिता अगदी तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने करण्यात येईल. 7. सदर कालावधीत त्यांची सेवा असमाधानकारक आढळुन आल्यास त्यांना कोणतीही पूर्व सुचना न देता सेवा केव्हाही समाप्त करण्यात येईल तसेच त्यांना कोणत्याही सेवाविषयक लाभाचा हक्क सांगता येणार नाही. 8. त्याचप्रमाणे नवीन नेमणुकीचा हक्क, रजा, भरपाई, वैद्यकीय परिपुर्ती, सेवाजेष्ठता, सेवानिवृत्ती वेतन इत्यादि सवलती अनुज्ञेय राहणार नाही. Light and sound system technician jobs near me

    9. कंत्राटी तत्तवावरील नियुक्तींचा  सदर कालावधी संपल्यानंतर त्यांची सेवा आपोआप संपुष्टात येईल. 10. उमेदवारांची सेवा समाधानकारक वाटल्यास त्यांना पुढील कालावधीकरीता जास्तीत जास्त 3 वर्षापर्यंत कंत्राटी तत्तवावर मुदतवाढ देण्याचे अधिकार मा. जिल्हाधिकारी यांनी राखुन ठेवले आहे.

    11.  नियुक्ती कालावधी संपण्यापूर्वी त्यांना सेवेचा त्याग करावयाचा असल्यास त्यांनी या कार्यालयास 1 महिन्याचे अगोदर लेखी नोटीस देणे आवश्यक राहील. तशी नोटीस त्यांनी सादर न केल्यास त्यांचे 1 महिन्याचे मानधन कपात करण्यात येईल. 12. नेमून दिलेली कामे तसेच जिल्हाधिकारी यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशानूसार कामे करणे बंधनकारक राहील, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

  • Investment fraud case Chandrapur | हैद्राबादच्या कंपनीकडून चंद्रपुरातील नागरिकांची 2.36 कोटींची फसवणूक

    Investment fraud case Chandrapur

    Investment fraud case Chandrapur : आपल्या कंपनीत गुंतवणूक केल्यास जास्त परतावा मिळेल, असे आमिष दाखवून गोरगरिबांची तब्बल 2 कोटी 36 लाख 60 हजार रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी हैद्राबाद येथील ग्रँड फॉच्युन इन्फ्रा डेव्हलपर्स या कपंनीविरुध्द तसेच आरोपी टेकुला मुक्तीराज रेड्डी विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आाहे. याबाबत अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत असून आरोपीचा शोध घेणे सुरू असल्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर चिकनकर यांनी कळविले आहे.

    महाराष्ट्र ठेविदारांच्या (वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण ) अधिनियम 1999 अन्वये नोंद गुन्ह्यातील आरोपी टेकुला मुक्तीराज रेड्डी, रा. घर नं 1-6-174 ए/बी,  गंगापुत्र कॉलनी, मुर्शीदाबाद, आंध्रप्रदेश याच्याविरुद्ध फिर्यादी रेवनाथ आनंदराव एकरे, रा.वार्ड क्र.3, गडचांदुर, यांच्या लेखी रिपोर्ट वरून पो.स्टे रामनगर येथे अपराध कलम 406, 420, 465, 568, 471, 34.भादंवि सहकलम 3, 4 महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थामधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999 अन्वये ग्रॅन्ड फॉच्युन इंन्र्फॉ डेव्हलपर्स  कंपनी हैद्राबाद विरुध्द गैरव्यवहारप्रकरणी  गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (Grand Fortune Infra Developers scam)

    गडचिरोली जिल्ह्यातील शासन मान्य कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी

            आरोपी टेकुला मुक्तीराज रेड्डी (Tekula Muktiraj Reddy fraud) याने ग्रॅन्ड फॉच्युन इंन्र्फॉ डेव्हलपर्स  कंपनी हैद्राबाद स्थापन करून विविध स्किमद्वारे चंद्रपूर जिल्ह्यातील गोरगरीब लोकांची फसवणूक केली. त्याच्या कंपनीमध्ये गुंतवणुक केल्यास त्यांना जास्त परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. याबाबत रेवनाथ आनंद एकरे (46 वर्षे) रा. वार्ड न. 3, पोलीस स्टेशनच्या मागे गडचांदूर  यांनी पो.स्टे.  रामनगर येथे दिली असून सदरचा गुन्हा 18 नोव्हेंबर 2022 रोजी नोंद करण्यात आला. सदर गुन्हयाचे तपासात आरोपीने 2 कोटी 36 लक्ष 60 हजार रुपयांची फसवणुक केल्याचे दिसून आलेले आहे. (Ponzi scheme Hyderabad company)

    या गुन्ह्यातील आरोपी टेकुला मुक्तीराज रेड्डी हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असून सदर गुन्ह्यातील गुंतवणुकदारांना आवाहन करण्यात येते की, आजपावेतो ज्या गुंतवणुकदारांनी परिशिष्ट क्र. 1 चे फॉर्म भरून दिले नाही, त्यांनी आठ दिवसाचे आत आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथे जमा करावे. तसेच आरोपीचा सुगावा लागल्यास पोलिस नियंत्रण कक्ष, चंद्रपूर 07172-273258, 07172-264702 तसेच तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर चिकनकर (मो. 9359258365) या क्रमांकावर आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथे कळवावे, असे पोलिस विभागाने कळविले आहे.

  • Chandrapur Lokshahi Din 2025 | “चंद्रपूर महानगरपालिकेत लोकशाही दिन: तक्रारींच्या तत्पर निवारणासाठी नागरिकांना सुवर्णसंधी!”

    Chandrapur Lokshahi Din 2025

    Chandrapur Lokshahi Din 2025 : सर्व सामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणींची न्याय व तत्परतेने शासकिय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी  उपाय योजना म्हणून ‘लोकशाही दिन’ चंद्रपूर महानगरपालिका कार्यालयात दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजीत केला जातो. मार्च महीन्यातील लोकशाही दिन, सोमवार दि.3 मार्च 2025 रोजी महानगरपालिका कार्यालयात मा. आयुक्त यांचे अध्यक्षतेखाली दुपारी 1 वाजता आयोजीत करण्यात आलेला आहे.

    शबरी आदिवासी घरकुल योजनेचा नागरिकांना मिळेल असा लाभ


        ज्या नागरिकांना प्रत्यक्षरित्या उपस्थीत राहणे शक्य नाही त्यांच्यासाठी मनपाने ई-लोकशाही दिनाची सुविधा करून दिली असुन यात त्यांना आपले निवेदन   lokshahidincomplaint@gmail.com या ईमेल आयडी वर पाठविता येईल.लोकशाही दिन प्रसंगी अर्जदारांनी विहीत नमून्यातील दोन प्रतीत अर्ज सादर करावे. लोकशाही दिनाच्या १५ दिवस आधी अर्जदार अर्ज /निवेदन सादर करतील. अर्ज सादर केल्यानंतर संबंधीत विभागाकडे निवेदन कार्यवाही करीता पाठविण्यात येईल. (Chandrapur Municipal Corporation grievances)


        संबंधीत विभागप्रमुख अर्जदाराला आपल्या स्तरावर निवेदनासंबंधी केलेली कार्यवाही किंवा चालु असलेली कार्यवाही याबाबत अवगत करतील,तसे विभाग प्रमुखाकडून न झाल्यास किंवा अर्जदाराचे समाधान न झाल्यास अर्जदारांना  लोकशाही दिनामध्ये मा. आयुक्त यांचे कार्यालयात हजर राहून आपले म्हणणे सादर करता येईल. आयुक्त हे सदर अहवाल, अर्जदाराची विनंती, त्याबद्दलचे नियम, शासनाची भुमिका,तरतुदी या बाबींचा विचार करून योग्य निर्णय देतील.

  • Local body elections Maharashtra | चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा विजय संकल्प; खासदार प्रतिभा धानोरकर यांची आढावा बैठक

    Local body elections Maharashtra

    Local body elections Maharashtra : लोकभेतील अभुतपूर्व यशानंतर राज्यात कॉग्रेस ला अपेक्षीत असे विधानसभेत यश मिळू शकले नाही. परंतु येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकांसाठी कार्यकर्त्यांना सज्ज होण्याचे आवाहन खासदार प्रतिभा धानोरकर यांनी कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकी दरम्यान केले.

    येत्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होणार असून त्या जिंकण्याचा काँग्रेस पक्षाने निर्धार केला असून त्यासाठी चंद्रपूर शहरातील पठाणपूरा प्रभागातून स्थानिक स्वराज्य संस्थेचा बिगुल वाजविला आहे. या प्रभागात माजी नगरसेवक नंदु नागरकर यांच्या घरी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

    ओबीसी प्रवर्गात आर्य वैश्य कोमटी समाजाला समाविष्ट करण्याचा प्रयत्न, चंद्रपुरात ओबीसी महासंघाचे निषेध आंदोलन

    काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधताना खासदार धानोरकर म्हणाल्या की, प्रत्येक निवडणूका या वेगवेगळ्या पध्दतीने होत असतात. एक पराभवाने खचून न जाता, पुन्हा जोमाने कामाला लागा व संघटन मजबूत करुन येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत यश प्राप्त करा. मी प्रत्येक प्रभागात आढावा बैठक घेणार असून त्या ठिकाणी संबंधित नागरिकांशी चर्चा करुन प्रभागातील समस्येवर महानगरपालिकेत बैठक देखील घेईल. आपण सर्वांनी एक होऊन काम केल्यास निश्चित येणाऱ्या निवडणूकांत विजय संपादन करता येईल. (Pratibha Dhanorkar speech)

    या बैठकी वेळी मंचावर माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, विनायक बांगडे, सुभाष गौर, चंद्रपूर शहर कॉग्रेस अध्यक्ष रामू तिवारी, चंद्रपूर विधानसभेचे कॉग्रेसचे उमेदवार प्रविण पडवेकर, माजी नगरसेवक नंदु नागरकर, प्रशांत दानव, सुनिता लोढिया यांच्या सह अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

  • Arya Vaishya OBC Inclusion | ओबीसी प्रवर्गात आर्य वैश्य समाज समाविष्ट करण्याच्या हालचालींना विरोध; राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आंदोलन

    Arya Vaishya OBC Inclusion

    Arya Vaishya OBC Inclusion : चंद्रपूर : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या हालचालींना आक्रमक विरोध करणाऱ्या ओबीसी समाजाने आता आर्य वैश्य (कोमटी) समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या हालचालींविरोधात आंदोलन पुकारले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाने जनता कॉलेज चौकात निदर्शने करत शासनाच्या भूमिकेचा निषेध केला.

    शिकारीच्या शोधात बिबट्या पडला विहिरीत

    राज्य शासनाने यापूर्वीच स्पष्ट केले होते की, इतर कोणत्याही समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट केले जाणार नाही. यासंदर्भात शासनाने लिखित आश्वासनही दिले होते. मात्र, या आश्वासनानंतरही मागील वर्षी चंद्रपुरात अत्यंत गोपनीय पद्धतीने आर्य वैश्य समाजाचा सर्व्हे करण्यात आला होता. National OBC Federation

    राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांनी यासंदर्भात परिपत्रक जारी केले होते आणि दोन सदस्यीय टीम चंद्रपुरात येऊन हा सर्व्हे पूर्ण केला होता. त्यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने याला विरोध दर्शवून निवेदन दिले होते. मात्र, त्यानंतरही आर्य वैश्य समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या हालचालींना वेग आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या निर्णयाचा तीव्र निषेध करण्यासाठी ओबीसी महासंघाने पुन्हा आंदोलन छेडले आहे.

    या निदर्शनांमध्ये महासंघाचे सचिव सचिन राजूरकर यांनी शासनाच्या भूमिकेवर तीव्र टीका केली. ते म्हणाले, “मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या हालचालींना मोठ्या प्रमाणात विरोध करून आम्ही यश मिळवले होते. मात्र, आता प्रशासन गोपनीय पद्धतीने आर्य वैश्य समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे, हे अत्यंत चुकीचे आहे. शासनाने ओबीसी समाजाचा अंत पाहू नये.” Backward Class Reservation

    या आंदोलनाला मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधवांनी पाठिंबा दर्शवला. ओबीसी समाजाच्या अस्तित्वाचा हा प्रश्न असून, इतर कोणत्याही नव्या समाजाला ओबीसी प्रवर्गात स्थान दिल्यास मोठे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा महासंघाने दिला आहे.

  • Leopard death Chandrapur | वन्यजीव मृत्यूचा नवा धक्का; चिमूरमध्ये बिबट्याचा पाण्यात बुडून मृत्यू

    Leopard death Chandrapur

    Leopard death Chandrapur : चिमूर: चंद्रपूर जिल्ह्यात महिन्याभरापूर्वी वाघाच्या शिकारीचे प्रकरण उघडकीस आल्याने वनविभाग सतर्क झाला आहे. जानेवारी महिन्यात जिल्ह्यात विविध कारणांमुळे चार वाघांचा मृत्यू झाला होता. आता फेब्रुवारी महिन्यात चिमूर वनपरिक्षेत्रात बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता उघडकीस आली आहे.

    चिमूर वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र मुरपार नियतक्षेत्र मिनझरी येथे एका शेतात बिबट्याचा मृतदेह आढळला. वनरक्षक गस्तीवर असताना ही घटना त्यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. (Leopard found dead well)

    नागरिकांना असा मिळेल शबरी आदिवासी घरकुल योजनेचा लाभ

    सदर बिबट मादी असून, तिचे अंदाजे वय 6 वर्षे होते. ती शिकारीच्या शोधात असताना विहिरीत पडून पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. मृत बिबट्याचे सर्व अवयव शाबूत असल्याचे आढळले असून, अधिक तपासासाठी मृतदेहाचा रासायनिक विश्लेषणासाठी नमुना घेण्यात आला आहे. या घटनेच्या संदर्भात वनविभागाने वनगुन्हा नोंदवत पुढील तपास सुरू केला आहे.

    Leopard found dead well

    बिबट्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन वनविश्रामगृह खडसंगी येथे करण्यात आले. त्यानंतर त्याठिकाणीच दफन करण्यात आले. या वेळी वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊरकर, अमोद गौरकार, उत्तम घुगरे, सरूला भिवापुरे आणि रामदास नैताम उपस्थित होते.

    या घटनेमुळे स्थानिक शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने अशा घटनांना आळा घालण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

  • Shabari Tribal Housing Scheme Chandrapur | चंद्रपूर शहरातील नागरिकांना असा मिळेल घरकुल योजनेचा लाभ

    Shabari Tribal Housing Scheme Chandrapur

    Shabari Tribal Housing Scheme Chandrapur : चंद्रपूर महानगरपालिका हद्दीत गावठाण क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या ज्या लाभार्थ्यांकडे जमीनीची मालकी नाही अशा लाभार्थ्यांना मागील 3 वर्षाच्या मालमत्ता कर पावतीच्या (टॅक्स पावती) आधारे, मनपा कार्यालयात अर्ज करुन घरकुलाचा लाभ (रु.2.50 लक्ष अनुदान) देण्यात येत आहे.

    गडचिरोली मधील नामांकित संस्थेत काम करण्याची सुवर्णसंधी


        आदिवासी उपयोजनेंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वतःची घरे नाहीत, जे अनुसूचित जमातीचे लोक, कुडा मातीच्या घरात, झोपड्यांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवाऱ्यात राहतात अशा अनुसूचितील पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करुन देण्यासाठी वैयक्तिक लाभाची राज्य शासनाची “शबरी आदिवासी घरकुल योजना” चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत राबविण्यात येत आहे. (Chandrapur Municipal Corporation Housing Scheme)


        त्याचप्रमाणे चंद्रपूर शहरात अनुसूचित जमातीतील जागा उपलब्ध नसणाऱ्या नागरिकांना गावठाण क्षेत्रांतर्गत बांधण्यात आलेल्या (बांधण्यात येणाऱ्या) सदनिकांमध्ये (फ्लॅट्स) शबरी आदिवासी घरकुल योजनेचा लाभ घेण्याकरिता मनपा कार्यालयात घरकुल मागणीसाठी रितसर अर्ज करुन रु. 2.50 लक्षचा लाभ मिळविता येईल.


       चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, सदर योजनेबाबत आवश्यक माहिती जसे योजनेसाठी पात्रता,उत्पन्न मर्यादा,  आवश्यक कागदपत्रे इत्यादींकरिता चंद्रपूर शहर महानगरपालिका कार्यालय, सात मजली इमारत, प्रथम माळा, घरकुल विभाग येथे संपर्क साधावा.

  • Gadchiroli job update | गडचिरोली जिल्ह्यातील शासन मान्यता प्राप्त संस्थेत नोकरीची सुवर्णसंधी

    Gadchiroli job update

    Gadchiroli job update : लोककल्याण बहुउद्देशिय शिक्षण संस्था, ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर द्वारा संचालित
    विशेष दत्तक संस्था (SAA) गडचिरोली (Lok Kalyan Sanstha recruitment)

    सरकारी मान्यता प्राप्त संस्था मार्फत विविध पदांची भरती

    राज्य शासनाच्या रिटपी -2024/प्र.क्र.44/का-08, दिनांक 28 ऑगस्ट 2024 या शासन निर्णयानुसार तसेच अनुज्ञाप्ती क्रमांक GAD-2/SAA/2024/486 दिनांक 11.09.2024 अंतर्गत विशेष दत्तक संस्था (SAA) गडचिरोली येथे खालील पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

    रिक्त पदांची माहिती:

    1. समुपदेशक (Counselor) – 1 पद
    • शैक्षणिक पात्रता: बी.एस.डब्लु (B.S.W) / एम.एस.डब्लु (M.S.W)
    • अनुभव: संबंधित क्षेत्रात अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
    1. अधिपरिचारीका (नर्स) – 1 पद
    • शैक्षणिक पात्रता: ए.एन.एम (A.N.M) / जी.एन.एम (G.N.M)
    • अनुभव: अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
    1. चौकीदार (Watchman) – 1 पद
    • शैक्षणिक पात्रता: किमान 10वी उत्तीर्ण
    • अनुभव: अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.

    वेतन आणि इतर सुविधा:

    • वेतन शासन निर्णयानुसार दिले जाईल.
    • सर्व नियुक्त्या संबंधित नियम आणि अटींच्या अधीन राहून करण्यात येतील.

    अर्ज करण्याची पद्धत:

    इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खालील पत्त्यावर प्रत्यक्षरित्या येऊन अर्ज सादर करावा किंवा संपर्क साधावा:

    संपर्क पत्ता:
    विशेष दत्तक संस्था (SAA) गडचिरोली,
    आय.टी.आय. बायपास चौक, हनुमान मंदिराच्या मागे,
    बजरंग नगर, गडचिरोली – 442605
    मोबाइल: 8879699138

    अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.

    चंद्रपूर RTO चा वसुली नाका

    महत्वाची सूचना:

    • निवड प्रक्रियेत अनुभव आणि शैक्षणिक पात्रतेला प्राधान्य दिले जाईल.
    • संस्थेचा निर्णय अंतिम राहील आणि कोणत्याही प्रकारचे शिफारस पत्र स्वीकारले जाणार नाहीत.
    • अर्जासोबत शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे आणि ओळखपत्राच्या छायांकित प्रती जोडणे आवश्यक आहे.

    नोकरीच्या संधीचा लाभ घ्या आणि संस्थेचा एक भाग बना!

  • Ballarpur new court building project । बल्लारपूरमध्ये नव्या न्यायालयाची उभारणी – राज्यातील सर्वोत्तम न्यायालयांपैकी एक होणार!

    Ballarpur new court building project

    Ballarpur new court building project : बल्लारपूर येथे नवीन न्यायालयाची इमारत उभारण्यास मंजुरी देण्यात आली असून, या प्रकल्पासाठी रु. 36 कोटी 70 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या इमारतीत सौरऊर्जा प्रणाली, अत्याधुनिक लिफ्ट सुविधा, महिला वकिलांसाठी हिरकणी कक्ष, डिजिटल सुविधांनी सुसज्ज ई-लायब्ररी, तसेच परिसराचे सौंदर्य खुलविण्यासाठी लँडस्केपिंग आदी अत्याधुनिक सुविधांचा समावेश करण्यात येणार आहे. ही न्यायालयीन इमारत केवळ बल्लारपूरच नव्हे, तर संपूर्ण राज्यातील उत्कृष्ट न्यायालयीन इमारतींपैकी एक ठरेल, असा विश्वास राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. Women lawyers’ facility Ballarpur

    बल्लारपूर विश्रामगृह येथे न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाबाबत आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी, मुकेश टांगले कार्यकारी अभियंता,संजोग मेंढे उपअभियंता ,पवन सावरकर कनिष्ठ अभियंता, ॲड. आशिष धर्मपुरीवार, ॲड. आय.आर. सय्यद, ॲड बुराडे, ॲड. विकास गेडाम, ॲड. भाले, ॲड. लिंगे, ॲड उपाध्याय, ॲड. जिवणे, ॲड. पिंपळकर, ॲड. पोसलवार, ॲड. हस्ते, ॲड. आमटे, ॲड. खर्तड, ॲड. तित्रे, ॲड. गेडाम, ॲड. केशवानी, ॲड भाळे, ॲड. बाजपेयी, ॲड. अविनाश सिंग, ॲड. खनके आदीची उपस्थीती होती.

    चंद्रपूर जिल्ह्यात नवं महसुली गाव

    आमदार श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले, भविष्यातील गरजांचा विचार करून, 100 वकिलांसाठी स्वतंत्र इमारत उभारण्याच्या दृष्टीने नियोजनबद्ध आराखडा तयार करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. सदर न्यायालयीन इमारतीमध्ये सोलर व्यवस्थेसह प्रत्येक मजल्यावर आरो मशीनसह स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत आहे. ई-लायब्ररी, वकिलांसाठी विशेष ॲडव्होकेट कॉन्फरन्स हॉल, महिलांसाठी स्वतंत्र हिरकणी कक्ष, आधुनिक सुसज्ज स्वच्छतागृहे, तसेच सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे. अखंड वीजपुरवठासाठी 200 केव्ही क्षमतेचा जनरेटर, तसेच महत्वाच्या दस्तऐवजांच्या सुरक्षिततेसाठी लॉकर्स आणि कॉम्पॅक्टरची व्यवस्था करावी. Ballarpur court construction approval

    वाहनांसाठी नियोजनबद्ध पार्किंग सुविधा याशिवाय, इमारतीसाठी उत्कृष्ट दर्जाचे टिकवुडचा फर्निचरसाठी वापर करण्याचे निर्देश संबंधितांना दिलेत. पुढील दोन ते तीन महिन्यांत वकिलांच्या उपस्थितीत या इमारतीचे भूमिपूजन करण्याचा निर्णय वकील परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम सुरू करण्यात येणार आहे. सदर इमारत महाराष्ट्राच्या उत्तम न्यायालयाच्या इमारतीपैकी एक असेल असा विश्वास देखील श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला.