Tag: MH34

  • Mining company environmental impact । “उसगावमध्ये खाण कंपनीच्या प्रदूषणाविरुद्ध नागरिकांचा संघर्ष; आमदार जोरगेवार यांचा हस्तक्षेप”

    Mining company environmental impact

    “उसगावमध्ये खाण कंपनीविरोधात नागरिकांचा आवाज; आमदार जोरगेवार यांनी हस्तक्षेप केला”

    Mining company environmental impact : उसगाव लगतच्या महामिनरल मायनिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कार्यप्रणाली मुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. कंपनीच्या कामकाजामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले असून, त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडविण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी कंपनी व्यवस्थापनाला दिल्या आहेत.

    कोरोना काळापासून फरार असलेल्या २ आरोपीना स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक

    भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या शिष्टमंडळाने आणि गावकऱ्यांनी कंपनी व्यवस्थापनाची भेट घेतली असून, आमदार किशोर जोरगेवार यांचे निवेदन कंपनी व्यवस्थापनाला दिले आहे. यावेळी उसगाव ग्रामपंचायत सरपंच निविता ठाकरे, उपसरपंच मंगेश आसुरकर, सदस्य यमुना राजुरकर, रेखा कोडापे, वर्षा बोंदरे, धनंजय ठाकरे, रमेश काळे, कवडू ठोबरे, मोहनदास राजुरकर, दिलीप ठाकरे, उसगाव पोलिस पाटील नरेंद्र बुच्चे, इमरान खान, संजय तिवारी, निरिक्षण तांडा, संतोष नुने, मिन्टु कलवल, पसी गादे, विशाल अड्डूर, इमरान खान, स्वप्निल वाढई, नंदकिशोर यादव, विजय कपूर, सागर रामटेके, रमन तांडा, महेश लठ्ठा, मयुर कलवल, राहुल चुपाका, सागर गेडाम, उदय कलवल, अरुण दाभेरे, हेमराज बोबडे,यांची उपस्थिती होती.

    कंपनीच्या जड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे (Mining company road damage complaints). हे रस्ते गावकऱ्यांच्या दैनंदिन रहदारीसाठी असून, कंपनीने त्वरित त्यांची डागडुजी करावी तसेच अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग तयार करावा. कंपनीतून उत्सर्जित होणाऱ्या धुरामुळे आणि कोळसा वॉशरीजमधून होणाऱ्या धुळीच्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. लहान मुले, वृद्ध आणि इतर रहिवाशांना श्वसनासंबंधी आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रणासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात. कंपनीच्या प्रदूषणामुळे गावांमधील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. म्हणून, कंपनीने आपल्या सामाजिक दायित्व निधीअंतर्गत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करावीत. त्याचप्रमाणे, या निधीच्या माध्यमातून गावातील मूलभूत सुविधा आणि विकासकामांवर भर द्यावा. ग्रामपंचायतीकडे प्रलंबित असलेला कर तातडीने भरावा, अशा सूचनाही निवेदनाच्या माध्यमातून आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्या आहेत. Health issues due to mining pollution

    कंपनीतून निघणाऱ्या धुरामुळे परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, शेतकऱ्यांच्या उत्पादनावर गंभीर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा तसेच नुकसानभरपाई वाढवावी, अशी मागणीही गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली होती. तसेच गावकऱ्यांच्या वतीने स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी वारंवार करण्यात आली आहे. मात्र, अद्याप यावर कोणतीही ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत. त्यामुळे स्थानिकांना प्राथमिकता देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचेही आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. यावर येत्या 10 दिवसांत निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने शिष्टमंडळाला देण्यात आले आहे. Local community mining protests

  • Chandrapur Zilla Parishad achievements । चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासात नवीन अध्याय: विवेक जॉन्सन यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गौरव

    Chandrapur Zilla Parishad achievements

    Chandrapur Zilla Parishad achievements : चंद्रपूर जिल्ह्यातील विकासात्मक आणि नाविन्यपूर्ण कार्यक्रमांसाठी जिल्हा परिषद चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विवेक जॉन्सन यांचा राज्य स्तरावर गौरव करण्यात आला. 27 फेब्रुवारी 2025 रोजी मुंबई येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विवेक जॉन्सन यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. हा गौरव जिल्ह्यातील विकासात्मक कार्यक्रमांच्या अभूतपूर्व यशाचा पुरावा आहे. Vivek Johnson CEO Chandrapur

    चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या हाती लागले ४ वर्षांपासून पसार

    नाविन्यपूर्ण उपक्रमांची सुरुवात
    विवेक जॉन्सन यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील विकासाच्या नवीन मानदंड घालण्यात आले आहेत. त्यांनी सुरू केलेल्या उपक्रमांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:

    1. मिशन सक्षम: जिल्ह्यातील युवकांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून स्वावलंबी बनवण्याचा हा उपक्रम.
    2. मिशन अंकुर: शिक्षणक्षेत्रातील गुणवत्ता सुधारण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला.
    3. खुली विज्ञान बाग: विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी ही बाग तयार करण्यात आली.
    4. स्टेम लॅब: विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ही प्रयोगशाळा सुरू करण्यात आली.
    5. ॲस्ट्रॉनॉमी लॅब: खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी विशेष प्रयोगशाळा सुरू करण्यात आली.
    6. मोबाईल प्लॅनेटोरीयम: जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राचे ज्ञान देण्यासाठी मोबाईल प्लॅनेटोरीयम सुरू करण्यात आले.
    7. स्मार्ट पीएचसी: आरोग्य सेवा सुधारण्यासाठी स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू करण्यात आली.
    8. मोबाईल कॅन्सन व्हॅन: कर्करोगाच्या लवकर निदानासाठी मोबाईल कॅन्सन व्हॅन सुरू करण्यात आली.
    9. स्मार्ट वाचनालय: ज्ञानप्रसारासाठी स्मार्ट वाचनालये सुरू करण्यात आली.
    10. बचतगट मॉल: महिला बचतगटांना आर्थिक सक्षमीकरणासाठी मॉलची सोय उपलब्ध करून देण्यात आली.
    11. बळीराजा समृद्धी मार्ग अभियान: शेतीक्षेत्रातील उत्पादकता वाढवण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले.
    12. सोमनाथ कृषी पर्यटन: कृषी आधारित पर्यटन विकसित करण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला.
    13. ई-ऑफिस प्रणाली: प्रशासकीय कामकाज अधिक सुगम आणि पारदर्शक करण्यासाठी ई-ऑफिस प्रणालीचा प्रभावी वापर सुरू करण्यात आला.

    राज्य स्तरावर दखल
    विवेक जॉन्सन यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल राज्य स्तरावर घेण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर जिल्ह्यातील विकासाचे नवे परिमाण गाठले गेले आहे. या सर्व उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे जिल्ह्यातील लोकांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणण्यात आला आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले. Devendra Fadnavis honors Chandrapur CEO

    मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन
    या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विवेक जॉन्सन यांच्या कार्याची प्रशंसा करताना म्हटले, “विवेक जॉन्सन यांनी चंद्रपूर जिल्ह्यात केलेले कार्य खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे जिल्ह्यातील लोकांचे जीवन सुधारले आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श इतर जिल्ह्यांनीही स्वीकारला पाहिजे.”

  • Criminal arrest in Chandrapur । नागपूर मध्यवर्ती कारागृहातून पसार आरोपी चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने पकडले!

    Criminal arrest in Chandrapur

    Criminal arrest in Chandrapur : चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा आणि रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारे गंभीर गुन्ह्यातील दोन आरोपी कोरोना काळात आकस्मिक अभिवचन रजेवर बाहेर आले होते. मात्र, रजेचा कालावधी संपल्यानंतर ते परत न जाता ४ वर्षांपासून फरार होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विशेष मोहिम राबवत त्यांचा शोध घेतला आणि अखेर दोघांना अटक करण्यात यश मिळवले.

    उन्हाळा येतोय, चंद्रपूरकरांनो सावधान

    इंदिरानगर, चंद्रपूर येथील खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला आरोपी विकास उर्फ विक्की बद्रीप्रसाद तिवारी हा ४५ दिवसांच्या रजेवर नागपूर मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आला होता. तसेच, राजुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दीपक उर्फ सुरेश यशवंत पुणेकर यानेही कारागृहातून रजा घेतली होती, परंतु दोघेही परत न जाता फरार झाले होते. Chandrapur police latest news

    शिवद्रोही प्रशांत कोरटकर ला अटक करा, संभाजी ब्रिगेडची मागणी

    गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेले आरोपी फरार असल्याने त्यांना अटक करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दिले होते. त्यानुसार, २२ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी या कालावधीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विशेष फरार बंदी शोध मोहीम राबवली. त्यादरम्यान, दोन्ही आरोपींचा ठावठिकाणा मिळवत त्यांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींना संबंधित पोलीस स्टेशनच्या स्वाधीन करून त्यांची रवानगी नागपूर मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. Chandrapur LCB operation success

    यशस्वी कारवाई करणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी :
    ही यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक दीपक कांक्रेडवार, स्वामीदास चालेकर, प्रकाश बल्की, अजय बागेसर, किशोर वैरागडे, नरोटे आणि अराडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

  • Legal action against Prashant Koratkar | प्रशांत कोरटकरच्या विवादास्पद विधानांनी शिवप्रेमींचा रोष, गुन्हा नोंदवून अटक करण्याची मागणी

    छत्रपतींच्या अपमानाला शिवप्रेमींचा जोरदार प्रतिकार, पोलिसांकडे कारवाईची मागणी

    Legal action against Prashant Koratkar : चंद्रपूर: छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने करणाऱ्या तसेच इतिहासतज्ञ श्री इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर (नागपूर) यांच्या विरोधात शिवप्रेमींचा रोष वाढत आहे. दिनांक २५ फेब्रुवारीला मध्यरात्री प्रशांत कोरटकर यांनी इंद्रजीत सावंत यांच्या मोबाईलवरून फोन करून धमकी दिली. या संभाषणात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याविषयी अभद्र भाषा वापरली असून त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर आक्षेपार्ह टीका केली. Threats to historian Indrajit Sawant

    चंद्रपुरात 3 सख्य्या बहिणीचा वैनगंगा नदीत बुडून मृत्यू

    या संभाषणात प्रशांत कोरटकर यांनी खालील विवादास्पद विधाने केली:
    १) “संभाजी महाराज अय्याश होते, हे लोकांना सांगा.”
    २) “बाजीप्रभू देशपांडे नसते तर तुमचा महाराज आज जिवंत नसता.”
    ३) “तुमचे महाराज पळून गेले.”
    ४) “जेम्स लेन यांनी आपल्या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे शिवाजीचा बायोलॉजिकल फादर कोण होता, हे लोकांना सांगा.”
    ५) “जास्त मराठा-मराठा करू नका, तुम्हाला ब्राह्मणांची औकात काय आहे ते दाखवू.”
    ६) “शिवाजी महाराजांना देशभर भालजी पेंढारकर यांनी पोहचविले, नाहीतर तुमचा छत्रपती कुठे गेला असता माहीतही पडलं नसतं.”

    या घटनेमुळे देशभरातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. शिवप्रेमींनी प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांच्या मागे कोणत्या विकृत शक्ती आहेत, याची सखोल चौकशी करून त्यांच्याविरुद्ध कठोर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. शिवप्रेमींचा आग्रह आहे की, प्रशांत कोरटकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून तत्काळ अटक करण्यात यावी. Prashant Koratkar arrest demand

    या संदर्भात इतिहासतज्ञ इंद्रजीत सावंत यांनी म्हटले आहे की, “छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याविषयी अशी आक्षेपार्ह विधाने करणे हा केवळ व्यक्तिगत अपमान नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाच्या इतिहासाविषयीचा अनादर आहे. या प्रकारच्या वक्तव्यांना नकार दिला पाहिजे.”

    शिवप्रेमींनी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांकडे या घटनेविषयी तक्रार नोंदवली आहे. त्यांची मागणी आहे की, या प्रकरणात त्वरित कार्यवाही करून प्रशांत कोरटकर यांच्याविरुद्ध कायदेशीर पावले उचलली जावीत.


    अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप चौधरी, शरद पवार विचार मंचाचे जिल्हाध्यक्ष ऍड. निमेश मानकर, शिवप्रेमी संतोष कुचनकर, निशिकांत देशमुख, दिलीप रिंगणे, गजानन नागपुरे आदींनी केली.

  • Marathi Bhasha Gaurav Din celebration | बजाज विद्या भवनमध्ये उत्साहात साजरा झाला मराठी भाषा गौरव दिन

    Marathi Bhasha Gaurav Din celebration

    Marathi Bhasha Gaurav Din celebration :
    चंद्रपूर : सर्वोदय महिला मंडळ द्वारा संचालीत बजाज विद्या भवनमध्ये मराठी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला शाळेच्या निर्देशिका ममताजी बजाज आणि मुख्याध्यापिका रुबिना शेख मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.

    उष्माघातापासून सावध रहा, मनपाने केल्या सूचना


    मराठी भाषा आणि तिच्या संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून मराठी भाषेचे महत्व अधोरेखित केले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलाने झाली. त्यानंतर वर्ग तिसरीचा विद्यार्थी यथार्थ ठाकरे याने मराठी भाषेचे महत्त्व सांगणारे प्रभावी भाषण दिले. Bajaj Vidya Bhavan cultural programs


    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वल्लभ पांडे , रियांश नगराळे , प्रियांशी चवलढाल आणि स्पृहा गांगवे यांनी उत्कृष्ट पद्धतीने पार पाडले. विद्यार्थ्यांच्या कला आणि प्रतिभेला वाव देणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत वर्ग तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे गोडवे गाणारे सामूहिक गीत सादर केले, तर तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांनी तालबद्ध आणि मनमोहक नृत्याविष्कार सादर करून महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे प्रदर्शन घडवले. Marathi Diwas activities for students


    कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण बिंदू म्हणजे विद्यार्थ्यांनी सादर केलेला नाट्यप्रयोग. या नाटकाद्वारे मराठीचे जतन व तिचे महत्व उत्कृष्ट पणे विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आले. व भविष्यात आपली मराठी भाषा जतन करण्याची गरज यावर प्रकाश टाकण्यात आला.


    या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेचा अभिमान जागृत करणारे प्रयत्न शाळेमार्फत करण्यात आला. प्रमुख मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कौतुक केले आणि मराठी भाषेच्या जतन व संवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असा संदेश दिला. शाळेच्या शिक्षिका शीतल आभारे यांनी उपस्थितांचे आभार मानले. शाळेच्या मराठी विभागाच्या शिक्षिका भाग्यश्री आईंचवार, शितल आभारे , राजश्री हिवराळे , वैशाली नन्नावरे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता विशेष मेहनत घेतली.

  • Chandrapur heatwave action plan | चंद्रपूरकरांनो सावधान! उष्माघातापासून बचावासाठी महापालिकेचा कृती आराखडा

    Chandrapur heatwave action plan

    चंद्रपूरचा उन्हाळा आणखी तीव्र होणार? उष्णतेपासून संरक्षणासाठी महत्त्वाच्या सूचना

    Chandrapur heatwave action plan : चंद्रपूर शहर हॉट सिटी म्हणून संपूर्ण जगात ओळखले जाते.आता उन्हाळ्याच्या दिवसांना सुरवात झालेली आहे. दरवर्षी येथील सूर्याचा पारा उच्चांक गाठतो. अशा तप्त उन्हात नागरिक उष्माघाताला बळी पडू नये यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका उष्माघात कृती आराखडा राबविणार आहे. याकरीता 27 फेब्रुवारी रोजी उष्माघात कृती आराखडा समन्वय समितीची बैठक अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मनपा स्थायी समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती. (Chandrapur summer safety tips)

    एकलव्य निवासी मॉडेल स्कुलमध्ये मोबाईल, तंबाखू व खर्रा, प्राचार्याने विद्यार्थ्यांची केली कान उघाडणी


        याप्रसंगी मार्गदर्शन करतांना अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांनी सांगीतले की, कोरोना काळाचे वर्ष सोडता २०१६ पासून दर उन्हाळ्यात चंद्रपूर मनपातर्फे आरोग्य विभागातर्फे उष्माघात कृती आराखड्याची यशस्वी अंमलबजावणी करण्यात येत आहे. यावर्षी अधिक कडक उन्हाळा राहण्याची शक्यता आहे.आज समितीची प्रथम आढावा बैठक असुन १५ मार्च पर्यंत समितीच्या सर्व सभासदांनी नेमुन दिलेली कार्ये जबाबदारीने पार पाडून त्याचा लेखी अहवाल द्यावा.  

    चंद्रपूर मनपाने जप्त केले 250 किलो प्लॅस्टिक


        उन्हाळ्यात घर थंड राहण्यास नागरीकांनी कुल रूफ टेक्नोलॉजीचा (Cool roof technology) वापर करावा म्हणजेच उष्णतारोधक पेंट जर घराच्या छतावर मारले तर २ ते ३ डिग्री तापमान कमी होण्यास मदत मिळते. मागील वर्षी शहरात २१ जागी पाणपोईची व्यवस्था करण्यात आली होती.यावर्षी त्याहुन अधिक पाणपोईची व्यवस्था स्वयंसेवी संस्थां व चिल्ड वॉटर असोसिएशनतर्फे करण्यात यावी.घर बांधकामाच्या रचनेत उष्णता कमी करण्याच्या दृष्टीने बदल करणे आवश्यक आहे. (Heat stroke prevention in Chandrapur)

    स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा


        बेघर आणि भिकारी यांची व्यवस्था बेघर निवाऱ्यात करणे, अनेकदा भिकारी बेघर निवाऱ्यात येत नाही तेव्हा पोलीस विभागाला सोबत घेऊन नियोजन करणे तसेच मानसीक रुग्ण यांच्यासाठीही ॲक्शन प्लॅन तयार करण्यात येईल. काही तात्पुरते व कायमचे प्रवासी निवारे मनपा व स्वयंसेवी संस्थांद्वारे तयार करण्यात यावे. स्वयंसेवी संस्था व दुकानदार यांनी जर आपल्या दुकानासमोर पाण्याच्या कॅन किंवा पाण्याची व्यवस्था करावी,व्यापारी संघटनांनी याचे नियोजन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. (Hot city Chandrapur weather)

    महाकाली यात्रेसाठी मनपाचे नियोजन                    
        महाकाली यात्रेला निवाऱ्यासाठी शेड तसेच पाण्यासाठी स्प्रिंकलर्सची व्यवस्था दरवर्षी मनपातर्फे करण्यात येते तसेच स्प्रिंकलर्स शहरात इतर कुठे लावता येईल याची निश्चिती करणे,ट्रॅफीक सिग्नल दुपारी बंद ठेवणे ,सार्वजनिक खेळांचे आयोजन दुपारी न करणे, सार्वजनिक बगीचे सुरु राहण्याच्या वेळेत वाढ करणे, १०८ रुग्णवाहिकेचा सहभाग, बांधकाम कंत्राटदाराद्वारे मजुरांच्या कामाच्या वेळेत बदल व व्यापक जनजागृती करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. यावेळी डॉ.नयना उत्तरवार यांनी पावर पॉईंट प्रेझेंटेशन द्वारे सदस्यांना हीट ॲक्शन प्लॅन संबंधी विस्तृत माहिती दिली.


         याप्रसंगी उपायुक्त मंगेश खवले,सहायक आयुक्त अक्षय गडलिंग,शुभांगी सूर्यवंशी,संतोष गर्गेलवार,उपअभियंता रवींद्र हजारे, डॉ. जयश्री वाडे, डॉ. विजया खेरा, डॉ.अश्विनी भारत, डॉ. अमोल शेळके, डॉ. योगेश्वरी गाडगे,डॉ. शरयु गावंडे,डॉ.आरवा लाहिरी,डॉ. नरेंद्र जनबंधू,तसेच विविध शासकीय कार्यालय व संस्थांचे प्रतिनिधी उपस्थीत होते.

    उष्माघाताचा विशेष धोका कुणाला –  ५ वर्षापेक्षा कमी व ६५ वर्षावरील नागरीकांना तसेच उन्हात काम करणारे मजूर,प्राणी,अल्कोहोल, धूम्रपान करणारे, शुगर, डायबिटिजचे रुग्ण यांना उष्माघाताचा विशेष धोका असतो.        

    उष्माघाताची लक्षणे –  अस्वस्थपणा, थकवा येणे, शरीर तापणे, अशक्तपणा, अंगदुखी, डोकेदुखी,अतिसार,भारी घाम येणे, मळमळणे,फिकट त्वचा,हृदयाचे ठोके जलद होतात,पोटाच्या वेदना ही लक्षणे आहेत.

    संरक्षणासाठी काय करावे – उन्हाच्या उष्णतेमुळे शरीरावर होणारे दुष्परीणाम टाळण्यास भरपूर पाणी प्यावे, थंड पेये – ताक, आंब्याचे पन्हे, नारळ पाणी प्यावे, अत्यावश्यक असल्याशिवाय उन्हात जाऊ नये, सैल व फिकट रंगाचे कपडे घालावेत, थंड जागेत, वातावरणात राहावे तसेच भर उन्हात म्हणजे साधारणतः दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत उन्हात जाणे टाळावे. विना चप्पल बाहेर जाऊ नये,लहान मुलांना तसेच प्राण्यांना कारमध्ये बंद करून जाऊ नये.  

    थंडगार पाण्याने अंघोळ करावी. ( डोक्यावरून गार पाण्याने अंघोळ केल्याने तापलेले शरीर थंड होण्यास मदत होते ) थंड जागेत आराम करावा, परिश्रमाचे काम करू नये, भरपूर थंड पाणी प्यावे, तसेच मनपा आरोग्य केंद्रात किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयात त्वरित औषधोपचार करवून घ्यावा. 

  • Modern study center Chandrapur | आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अभ्यासिका – विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सपनांची पूर्तता

    Modern study center Chandrapur

    Modern study center Chandrapur : खनिज विकास निधीतून जिल्हा ग्रंथालय येथे तयार होत असलेली आधुनिक अभ्यासिका फक्त एका इमारतीपुरती मर्यादित न राहता चंद्रपूर शहराच्या शैक्षणिक प्रगतीचे प्रतीक बनली पाहिजे. ही सुविधा विद्यार्थ्यांसाठी ज्ञानार्जनाचे शक्तिशाली माध्यम बनावी असे नियोजन करत शहराच्या शैक्षणिक प्रगतीसाठी या अभ्यासिकेला मॉडेल म्हणून विकसित करा अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहेत.

    राजुरा येथे 3 मित्रांचा वर्धा नदीत बुडून मृत्यू

    खनिज विकास निधीतून मंजूर झालेल्या 15 कोटी रुपयांच्या जिल्हा ग्रंथालय येथे उभारल्या जात असलेल्या आधुनिक अभ्यासिकेच्या कामात येणाऱ्या अडचणी समजून घेण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्हा ग्रंथालय येथे आमदार किशोर जोरगेवार यांच्या अध्यक्षतेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी येणाऱ्या अडचणी तात्काळ सोडविण्याचे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले आहेत. Advanced study facilities for students

    चंद्रपुरातील 3 सख्य्या बहिणींना वैनगंगा नदीत जलसमाधी

    या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश तांगडे, उपविभागीय अभियंता विवेक अंकुले, जिल्हा ग्रंथालय अधिकारी नलावडे, कार्यकारी अभियंता पगारे, उपविभागीय अभियंता प्रकाश अमरशेट्टीवार, सलीम शेख, रुपेश पांडे, कुमार जुनमुलवार, संजय महाकालीवार आदींची उपस्थिती होती.

    सदर बैठकीत कामाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला, तसेच अडचणींवर चर्चा करत आवश्यक सुधारणा आणि उपाययोजना सुचवण्यात आल्या. बांधकामाच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष द्यावे, विद्युत व जलव्यवस्थापनाची योग्य तयारी करावी आणि अभ्यासिकेच्या सुविधांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करावा. सदर अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा उपक्रम असून, त्यामध्ये वाचन, स्पर्धा परीक्षांची तयारी, डिजिटल शिक्षण आणि ग्रंथसंपदेचा उत्तम उपयोग यासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. Chandrapur educational progress

    या उपक्रमामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि सुविधा-संपन्न अभ्यासिकेचा लाभ मिळणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ग्रंथालय प्रशासनाने नियमित समन्वय साधत अडचणी दूर कराव्यात ही अभ्यासिका केवळ एक इमारत नसून, विद्यार्थ्यांसाठी ज्ञानसाधनेचे महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाची पूर्तता वेळेत आणि उत्कृष्ट दर्जात व्हावी, सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधकामाच्या गुणवत्तेवर विशेष भर द्यावा. विद्यार्थी येथे दिवसरात्र अभ्यास करतील, त्यामुळे सुविधाजनक बैठक व्यवस्था, चांगला वाय-फाय, योग्य वायुवीजन आणि प्रकाशव्यवस्था असणे अत्यावश्यक आहे.

    विद्युत आणि जलव्यवस्थापनाच्या अडचणी त्वरित सोडवल्या जाव्यात, विद्यार्थ्यांसाठी केवळ पारंपरिक वाचनालय न राहता डिजिटल अभ्यासिकेची संकल्पना राबवावी. त्यामुळे येथे ई-लायब्ररी, ऑनलाइन अभ्यास साहित्य, आणि स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक डिजिटल साधनसामग्री उपलब्ध करून द्यावी. ही अभ्यासिका केवळ बांधून थांबण्याचा प्रकल्प नाही, तर सुरक्षित आणि नियोजनबद्ध व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. या ठिकाणी सीसीटीव्ही, प्रवेश नियंत्रित व्यवस्था आणि स्वच्छता यावर विशेष भर द्यावा. अशा सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

  • Plastic seizure in Chandrapur | चंद्रपूर महानगरपालिकेच्या प्लास्टिकबंदी अभियानात मोठी कारवाई

    Plastic seizure in Chandrapur

    Plastic seizure in Chandrapur : चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकवर कारवाई सुरू असुन उपद्रव शोध पथकाद्वारे दादमहाल वॉर्ड येथील वाशिम खान यांच्या घरून 250 किलो प्लास्टिक पन्नी जप्त करण्यात आले आहेत तसेच संबंधितांवर 5 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

    वैनगंगा नदीत बुडून चंद्रपुरातील 3 सख्ख्या बहिणीचा करून अंत


        बंदी असलेल्या व एकदाच वापर करता येणाऱ्या प्लास्टिकवर कारवाई करण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या निर्देशानुसार 8 टीम्स बनविण्यात आल्या आहेत. या सर्व चमूंद्वारे शहरात नियमित कारवाई करण्यात येते. यावेळेस सुद्धा या दुकानासंबंधी गुप्त माहिती मनपास प्राप्त झाली होती. (Chandrapur Municipal Corporation plastic ban)

    प्लास्टीक साठा,पिशव्यांची माहीती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येत असुन दिलेली माहीती खरी निघाल्यास 5 हजारांचे बक्षिस दिल्या जात असल्याने अनेक सुजाण व्यक्तींकडुन अवैध साठ्यासंबंधी तक्रारी मनपास प्राप्त होत आहेत. (Illegal plastic storage in Chandrapur)


         एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरावर राज्यात 1 जुलै 2022 पासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली असुन महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना 2018 नुसार पाचशे रुपये जागेवरच दंड, संस्थात्मक पातळीवर 5 हजार रुपयांपर्यंत दंड,दुसऱ्यांदा वापर केल्यास 10 हजार रुपये, तर तिसऱ्यांदा गुन्हा केला तर 25 हजार रुपये दंड आणि 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आहे.


         सदर कारवाई आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी,स्वच्छता निरीक्षक शुभम खोटे,शुभम चिंचेकर, राहुल गगपल्लिवर, प्रफुल पोतराजे,रुचिर कोरेकर यांनी केली. 

  • Three Youths Drowned in Wardha River । चंद्रपूर हादरले! वर्धा नदीत तिघे बुडाले

    Three Youths Drowned in Wardha River

    Three Youths Drowned in Wardha River : चुनाळा : महाशिवरात्रीनिमित्त चुनाळा येथील काही नागरिक वर्धा नदीच्या घाटावर आंघोळीसाठी गेले असता, त्यांच्यासोबत घराजवळील तुषार आत्राम, मंगेश चणकापुरे आणि अनिकेत कोडापे हे तिन्ही युवकही आंघोळीसाठी नदी पात्रात उतरले. महिला एका बाजूला आंघोळ करत असताना, तिन्ही युवक काही अंतरावर जाऊन पाण्यात उतरले. मात्र, त्यांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. Wardha River Accident

    चंद्रपूर जिल्ह्यातील सावली येथे वैनगंगा नदी पात्रात ३ सख्य्या बहिणी बुडाल्या

    यावेळी त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकताच जवळ उपस्थित असलेले रामचंद्र रागी यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश आले नाही. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच चुनाळाचे सरपंच बाळनाथ वडस्कर यांनी तत्काळ राजुरा पोलिसांना कळवले. घटनास्थळी राजुरा पोलिस दाखल झाले. मात्र, सदर क्षेत्र बल्लारपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याने बल्लारपूर पोलिससुद्धा घटनास्थळी दाखल होऊन मृतदेहाचा शोध घेऊ लागले. Wardha River Drowning News

    बचावकार्य सुरू, मृतदेहांचा शोध अद्याप सुरू

    राजुराचे तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गोंड यांनी आपत्ती व्यवस्थापन विभाग, चंद्रपूर येथे संपर्क साधून बोटीची व्यवस्था केली. सध्या बोटीद्वारे मृतदेहांचा शोध सुरू आहे. वृत्त लिहीपर्यंत एक मृतदेह सापडला होता तर २ मृतदेहाचा शोध युद्धपातळीवर सुरु आहे. Chandrapur Drowning Case

    पुन्हा दुर्घटना!

    गेल्या वर्षी याच ठिकाणी चुनाळा येथील मासिरकर यांचा मुलगा बुडाल्याची घटना घडली होती. या भागात वारंवार अपघात घडत असल्याने स्थानिक प्रशासनाने विशेष सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे.

    घटनास्थळी अधिकारी आणि ग्रामस्थांची उपस्थिती

    घटनास्थळी राजुराचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पवार, बल्लारपूर पोलिस स्टेशनची टीम, राजुराचे नायब तहसीलदार किशोर तेलंग, आपत्ती व्यवस्थापन चंद्रपूरची टीम, चुनाळा ग्राम पंचायत सरपंच बाळनाथ वडस्कर, पोलिस पाटील निमकर तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    ही दुर्दैवी घटना संपूर्ण परिसराला हादरवून टाकणारी असून, भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

  • Chandrapur sisters drowning । वैनगंगा नदीत भीषण दुर्घटना, तीन सख्य्या बहिणी बुडाल्या

    Chandrapur sisters drowning

    सावली : महाशिवरात्रीच्या निमित्ताने चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलाखाली आंघोळीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या पाच जणांना जलसमाधी मिळाली. यामध्ये तीन सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी अंत झाला, तर दोघांना वाचविण्यात यश आले. ही हृदयद्रावक घटना दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. Vainganga River accident

    बुडालेल्यांमध्ये प्रतिमा प्रकाश मंडल (२३), कविता प्रकाश मंडल (२२), लिपिका प्रकाश मंडल (१८) या बाबूपेठ, चंद्रपूर येथील रहिवासी होत्या. प्रसंगावधान राखत प्रणव वसंत मंडल (४०) यांनी प्रथमेश प्रणव मंडल (५) याला वाचवले, तर पोलिसांच्या मदतीने पुनम प्रणव मंडल (३०) यांना बचावण्यात यश आले. वृत्त लिहीपर्यंत कविता मंडल हिचा मृतदेह हाती लागला होता, तर इतर दोन बहिणींचा शोध सुरू होता. Maha Shivratri river tragedy

    चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे नवे शिलेदार पोलीस निरीक्षक अमोल काचोरे

    घटना कशी घडली?

    मंडल कुटुंबातील आठ सदस्य महाशिवरात्रीनिमित्त गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा देवस्थानाला निघाले होते. मात्र, मंदिरात मोठी गर्दी असल्याचा अंदाज घेत त्यांनी वैनगंगा नदीच्या पुलाखाली आंघोळ करून सोमनाथला जाण्याचा निर्णय घेतला. आंघोळी दरम्यान प्रतिमा, कविता, लिपिका, प्रथमेश आणि पुनम यांचा तोल गेल्याने ते पाण्यात बुडाले. प्रसंगावधान राखत प्रणव मंडल यांनी प्रथमेशला वाचवले, तर पुनम एका दगडाला अडकल्याने त्यांना सुरक्षित बाहेर काढता आले. मात्र, तिन्ही बहिणी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या. Chandrapur family tragedy

    बचावकार्य आणि पोलिसांचा तपास

    घटनेची माहिती मिळताच सावली पोलिसांचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पुनमला वाचवण्यात यश मिळवले. कविताचा मृतदेह तत्काळ सापडला, मात्र प्रतिमा आणि लिपिकाचा शोध बोटीच्या सहाय्याने सुरू आहे. सावलीचे ठाणेदार प्रदीप पुल्लरवार, पोलिस उपनिरीक्षक सचिन मुसळे, धीरज पिदुरकर, मोहन दासरवार, केवल तुरे आणि राहुल तुमरेटी हे या प्रकरणाचा तपास करत आहेत. Chandrapur news today

    मंडल कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

    प्रकाश मंडल आणि कल्पना प्रकाश मंडल यांच्या तीन मुली – प्रतिमा, कविता आणि लिपिका यांचा या घटनेत मृत्यू झाल्याने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. प्रणव मंडल हे चंद्रपूरच्या सरदार पटेल महाविद्यालयात प्राध्यापक आहेत, तर त्यांच्या पत्नी पुनम शिकवणी वर्ग घेतात. त्यांना प्रतिमा मदत करायची. कविता आणि लिपिका शिक्षण घेत होत्या. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण मंडल कुटुंबावर शोककळा पसरली आहे.